घरातून शिक्षण अर्थात homeschooling

तिरकीट's picture
तिरकीट in काथ्याकूट
18 Jan 2018 - 12:43 pm
गाभा: 

सध्या मुलीच्या शिक्षणासाठी शाळा, बोर्ड, माध्यम निवडणे यातून जात आहे.
अनेक ठिकाणी चाचपणी चालू आहे. या दरम्यान homeschooling चा पर्यायही समोर आहे परंतु त्याबद्दल सविस्तर माहिती मिळवतोय.

१. भारतात हा पर्याय कायदेशीर आहे का?
२. फायदे/तोटे काय आहेत?
३. खरचच या पद्धतीच्या शिक्षणाने पालक/पाल्य यांना पुढे काही फायदा होतो का?

या किंवा या संबंधी कुठल्याही माहितीची मला मदत होऊ शकेल. या संबंधी आधीचा एखादा धागा मिपावर असेल तर तोही दिला तरी चालेल.

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

18 Jan 2018 - 1:26 pm | आनन्दा

वा वा.. या विषयावरची चर्चा वाचणे रोचक ठरेल..
वाखु साठवत अहे.

पगला गजोधर's picture

18 Jan 2018 - 2:50 pm | पगला गजोधर

३. खरचच या पद्धतीच्या शिक्षणाने पालक/पाल्य यांना पुढे काही फायदा होतो का?

शाहरुखखान चा टेड टॉक वाला कार्यक्रम लागतो रविवारी टीव्हीवर ...
मागच्याच आठवड्यात इंग्लंडस्थित भारतीय व्यक्ती .. याचे भाषण तुमच्या मुद्दा क्र ३ च्या संदर्भात वाटतोय...
यु ट्यूबवर बघा एपिसोड मिळाला तर ..

तिरकीट's picture

18 Jan 2018 - 3:10 pm | तिरकीट

नक्की शोधतो...धन्स

साहना's picture

19 Jan 2018 - 12:38 am | साहना

> १. भारतात हा पर्याय कायदेशीर आहे का?

ह्यावर १००% स्पष्टता नाही. आधी हे RTE अंतर्गत बेकायदेशीर आहे असे कपिल सिब्बल ह्यांचे म्हणणे होते. पण त्याच वेळी काही वेळा सरकारने त्याला कायदेशीर सुद्धा ठरवले आहे. शिक्षण क्षेत्रांतील कायदे मुद्दाम हुन अश्या प्रकारे अस्पष्ट ठरवले जातात. माझे ह्या विषयावरील आधीचे लिखाण वाचा.

https://homeschoolingindia.in/homeschooling-legal-india/

> २. फायदे/तोटे काय आहेत?

omeschool नक्की का पाहिजे ह्यावर हे अवलंबून आहे. मुंबई बेंगलोर सारख्या शहरांत अश्या पालकांच्या संघटना आहेत ज्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. शेवटी फायदे तोटे हे तुमच्या पाल्ल्या वर अवलंबून आहेत. शेवटी सर्वच मुलांचे खरे शिक्षण शिकवण्या किंवा घरीच होते.

स्वानुभवरून असे सांगू शकते कि सांगल्यांत चांगला पर्याय म्हणजे अप्लाय ओळखीच्या माणसाच्या स्वस्त शाळेंत ऍडमिशन करावे आणि फक्त गरज असेल तेंव्हांच मुलाला शाळेंत पाठवावे. मुलगा हुशार असेल तर शाळेला दांडी मारून इंटेन्सिव्ह कोर्से वगैरे मध्ये पाठवता येते. मी ११वि बारावीला कधी फक्त प्रॅक्टिकल साठी कॉलेज मध्ये जायची. पण ह्या सर्वासाठी शाळा मॅनेजमेंट अनुकूल असायला पाहिजे.

> ३. खरचच या पद्धतीच्या शिक्षणाने पालक/पाल्य यांना पुढे काही फायदा होतो का?
सब्जेक्टिव्ह आहे. तुमच्या मुलीविषयी जास्त माहिती दिली तरच काही सल्ला शक्य आहे.

चौथा कोनाडा's picture

22 Jan 2018 - 5:23 pm | चौथा कोनाडा

समर्पक मुद्दे.
घरशाळा शिक्षणामुळे नोकरी मिळू शकते का हे अजून तरी स्पष्ट नाही.
पोटासाठी नोकरी करणार असाल ( लोअर केडर, कष्टाची सोडून. लोअर केडर, कष्टाच्या नोकरीला आताही शाळाशिक्षण/प्रमानपत्र इ. गरजेचे नाही) तर सध्या तरी घरशिक्षण गृहित येणार नाही.

सध्या क्र. दोनची सुचवणी अतिशय योग्य वाटतेय.

मला वाटते ज्या पालकांना हे आपण १००% पेलू याची खात्री असेल त्यांनीच ह्याचं वाट्याला जावे . शाळेत मुले खूप काही शिकतात . चार मुला-मुलीत मिसळण्याचे धैर्य , इतरांसाठीही कणव , जीवा भावाचे बोलण्यासाठी मित्र मैत्रिणी आणि खूप काही .

डॉ .अभय आणि राणी बंग यांचा मुलगा होम स्कुलिंग करून शिकला आहे पण त्यांनी जातीने त्याच्या शिक्षणावर लक्ष दिलेय . त्यांनी आपल्या मुलाला विज्ञान शिकवण्यासाठी अक्षरशः घरातच एक प्रयोगशाळा विकसित केलीय . मुख्य म्हणजे गणित ,विज्ञानाच्या संकल्पना शिकवायला अवघड असतात तेंव्हा तुमची त्यात मास्टरी हवी. किंवा तुमची स्वतः शिकून पाल्याला शिकवणायची तयारी हवी . शिवाय जस जसे मूल मोठे होईल तसतसे त्याला काय शिकवायला हवे हे हि तुम्हाला समजायला हवे . हे सर्व तुम्हाला जमणार असेल तर नक्की हे पाऊल उचला अन्यथा नको .

त्यापेक्षा मी म्हणेन तुम्ही तुमच्या मुलाला /मुलीला क्लास ट्युशन ला न पाठवता सर्व घरीच शिकवा . पण शाळेत घालाच .

तिरकीट's picture

22 Jan 2018 - 5:04 pm | तिरकीट

नक्की विचार करेन यावर

भास्कर केन्डे's picture

23 Jan 2018 - 12:24 am | भास्कर केन्डे

एक पर्याय अजून आहे पण जरा खर्चिक आहे. परदेशी शिक्षण संस्था आहेत ज्या ऑनलाईन शाळा घेतात. गरजे नुसार त्यांचे वर्ग घेऊ शकता. याचा फायदा विज्ञानासोबतच जागतिक विषयांच्या तसेच एरोस्पेस वगैरे विषिष्ट विषयांसाठी होऊ शकतो. आमच्या मित्राचे मुले भरतीय कला, संस्कृत, गायन, प्राचिन वस्तुशास्त्र असे विषय घरी शिकतात तर कॅलक्युलस, जगतिक अर्थकारण, जगतिक राजकारण असे विषय स्टॅनफर्ड ऑनलाईन मधून शिकतात. पर्याय महगडा आहे पण आता त्यांच्या मोठ्या मुलाला ख्यातनाम आंतरराष्ट्रीय विद्यापिठात सहज प्रवेश मिळाला आहे.