ओटीतले ब्लाऊजपीस...

Primary tabs

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
12 Jan 2018 - 4:54 pm

- काकी, पुन्हा सुरू झाले बघ..
- आता काय... थांब बघते..
अरे देवा… तिकडे सुखी कुटुंब च्या ग्रुपवर पुन्हा एकदा मेसेज आला होता..
आशय काहीसा असा..

कोकणात हाणामारी, मोर्चे हे प्रकार फार होत नाहीत,
कारण,
लिंबू पुरतं..

आता यावर हसावं की रडावं..

तर विनोद म्हणून हसावं. पण किती वेळा? एकच विनोद तीन माणसांनी सलग तिनदा टाकला की हसू येण्याऐवजी संतापच येतो हल्ली.
मग मला पर्सनलवर मेसेज करणाऱ्या पुतण्याने सुखी कुटुंब वर मेसेज टाकला..
“संक्रांत येतेय. तिळगुळाचे मेसेज सुरू करायचे का...”
मी त्याला प्रतिसाद दिला, थांब जरा. लिंबं संपू देत..
त्यावर अनेकांचे उत्स्फूर्त स्मायली.
मग कोणी म्हणे, येऊ देत लिंबं.
मी म्हटलं, इथे सगळेच कोकणातले. माणशी एक तरी येणारच.
त्यावर दुसऱ्याचा प्रतिसाद, मग काय, लिंबाचं लोणचं, लिंबाचा भात, लिंबाचं मटण,...
मग त्यावरून लिंबू कलरची साडी आणि बनवाबनवी कडे मोर्चा वळला...
रिपीट मेसेज टाळू या, असा सरतेशेवटी उपस्थित सगळ्यांचा सूर लागला आणि, अवघ्या तिसऱ्या मेसेजनंतर... पहिले पाढे पंचावन्न...

अशा मेसेजेसना आम्ही ओटीतले ब्लाऊजपीस म्हणतो. कोणी दिले, कधी दिले, का दिले या कशाचाही विचार न करता, आली सवाष्ण घरी की घाल तिच्या ओटीत.. त्याच धर्तीवर आजकाल व्हॉट्स ॲप मेसेज पुढे ढकलले जातात. बहुतेकदा काय लिहिलंय, हे ही पूर्ण वाचायचे कष्ट घेत नाहीत लोक. व्हॉट्स ॲपच्या अनेक ग्रुपवर हे होत राहतं. या प्रकाराला कंटाळून मी आँटो डाऊनलोड बंद करून टाकलं. पण हा काही उपाय नाही ना..

आरोग्यविषयक माहिती देणारा आणखी एक ग्रुप. तो बनवणारे गृहस्थ खरोखर जाणकार. उत्तम माहिती देतात ते. शक्यतो औषधांचा वापर टाळून योग्य आहार, योग्य दिनक्रम आणि योगमुद्रांच्या आधारे आरोग्यपूर्ण कसं जगता येईल, याबाबत त्यांचे सल्ले उत्तम असतात. मी या ग्रुपची सदस्य झाले. सुरूवातीला काही काळ सुरळीत गेला. पण नंतर काहींचे सुप्रभात संदेश, सचित्र सुप्रभात, अमके व्हिडीयो, तमकी गाणी आणि असा बराच गाळ येऊ लागला. काही सदस्यांनी सांगून बघितलं, आरोग्यविषयकच पोस्ट टाका. पण नाही. काहींनी ग्रुप ॲडमिनना सांगून पाहिलं, पण ते व्यस्त असावेत. मग असे संदर्भहीन मेसेज आले की मी, यात आरोग्यविषयक काय? असा प्रश्न टाकायला सुरूवात केली. अनेकांना त्याचीही मौज वाटली. काहींनी दाद दिली तर काहींनी अशा मेसेजेसना गुलाबाची फुलं पाठवू, गेट वेल सून चे मेसेज पाठवू, अशा सूचना केल्या. काही काळाने लक्षात आलं की असंबद्ध मेसेज टाकणारे एकतर मठ्ठ असावेत किंवा ग्रुपवरचे मेसेजेस पाहतही नसावेत... पुन्हा एकदा ओटीतले ब्लाऊजपीस, आले की ढकल पुढे...

एकंदरच व्हॉट्स ॲपवरची ही चालढकल हा काही फार हवाहवासा प्रकार नाही. काही ग्रुप विशिष्ट विषयांना समर्पित असतात, काही मित्रमंडळींचे असतात, काही फक्त मित्रांचे, काही फक्त मैत्रिणींचे, काही बल्लवांचे आणि सुगरणींचे तर काही चक्क शाळासोबत्यांचेही. या सगळ्याच ठिकाणी समविचारी माणसं एकत्र आली असतील, किमान काही समान सूत्र असणारी माणसं एकत्र असतील, असं गृहित धरलं जातं. ते सूत्रं जपलं जावं ही माफक अपेक्षाही अवास्तव नाही ना...

प्रकटनमुक्तक

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 Jan 2018 - 5:42 pm | मुक्त विहारि

त्यामुळे व्हॉट्स अप गृप्स पण त्याला अपवाद कशाला?

असो,

एक-दोन गृप्स सोडले तर बर्‍याच गृप्स मधे हीच ओरड असते.

आपण असल्या मारामार्‍यांचा आनंद घ्यायचा.बघा तर फूटपाथ वर उभे राहून मारामारी एंजॉय करण्यात फारच सूख असते.....

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Jan 2018 - 6:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

आपल्याला हे शीर्षकच भारी आवडले बुवा!!

बाकी तुमचे म्हणणे पटले. चेपु, लिन्क्ड इन, वगैरे सगळ्या सोशल मिडियावर हळु हळु तसेच व्हायला लागले आहे. त्यामुळे "सोसल तेव्ह्ढाच मिडिया" असे माझे धोरण आहे.

ग्रूप म्युटवर टाकावेत आणि एकदाच अनरीड करुन सोडुन द्यावं.

ओटीतले ब्लाउज पीसेस खूप जमा झाले असतील तर एक छानशी क्विल्ट करता येईल.
नाहीतरी सध्या गोधडी हि इन थिंग आहेच :)

सुबोध खरे's picture

12 Jan 2018 - 7:18 pm | सुबोध खरे

जाता जाता -- पुण्यात लक्ष्मी रोड वर पाटी होती (१९८५ ची गोष्ट आहे)
देण्या घेण्याचे ब्लाउज पीस मिळतील १६ रुपये.
हे ब्लाउज पीस ५० किंवा ६० सेमी आकाराचे असत (म्हणजे ब्लाउज शिवण्यासाठी तोकडे) याचा उपयोग फक्त देण्याघेण्यासाठी होत असे.
(त्याच्याखालीच पूजेसाठी सुपार्या मिळतील असेही लिहिलेले होते)

व्हाट्सऍप, फेसबुक इ. इ. सर्व प्रकारच्या अनसोशल मीडियापासून दूर असल्याने आमचे आयुष्य अगदी सुखेनैव सुरू आहे! :-)

बाकी वेलकम बॅक. लिहीत रहा.

व्हाट्सऍप, फेसबुक इ. इ. सर्व प्रकारच्या अनसोशल मीडियापासून दूर असल्याने आमचे आयुष्य अगदी सुखेनैव सुरू आहे! :-)

याच्याशी प्रचंड सहमत! पण व्हाट्सअ‍ॅप जीवनावश्यक नाही हे बर्‍याच जणांना पचत नाही.

लेख मात्र छान आहे.

सुखीमाणूस's picture

12 Jan 2018 - 9:39 pm | सुखीमाणूस

अशी असंख्य लोक असतात ज्यान्च्याकडे वेळच वेळ असतो.
किवा कोणाशी खूप बोलावसं वाटत असत.
त्यान्च्यासाठी व्हाट्सप हा एक वेळ घालवायचा चांगला उद्योग आहे. माझ्या नात्यात एक व्रुध्द स्त्री एकटी राहाते.मुली दुसर्‍या शहरात आहेत. तिला निद्रानाशाचा विकार आहे. या आजी रात्रंदिवस कायप्पा वर पडीक असतात आणि मेसेजेस चा रतीब चालू असतो. कोणाचा मेसेज आला की यांचे लगेच प्रतिसाद येतात.
कशाचा अतिरेक वाईट पण तरी याचे फायदे पण आहेत.
बाकी लेखाचे शीर्षक आवडले.

पैसा's picture

12 Jan 2018 - 10:46 pm | पैसा

:)

पलाश's picture

13 Jan 2018 - 7:11 am | पलाश

लेख आवडला. :)

पद्मश्री चित्रे's picture

13 Jan 2018 - 8:16 am | पद्मश्री चित्रे

हैराण करतात हे ओटीतले ब्लाउजपीस..
छान लिहिलं आहे.

विशुमित's picture

13 Jan 2018 - 8:59 am | विशुमित
विशुमित's picture

13 Jan 2018 - 8:59 am | विशुमित
विशुमित's picture

13 Jan 2018 - 9:01 am | विशुमित
विशुमित's picture

13 Jan 2018 - 9:02 am | विशुमित

आधीच इतके ओटीचे ब्लाउज पीसेस पडलेत त्यात तुम्ही चार ची भर घातलीत विशूभैय्या :)

विशुमित's picture

13 Jan 2018 - 9:51 am | विशुमित

ब्लॉउज पीस आलेच नाहीत. हे फक्त तांदूळ आणि खोबऱ्याची ओटी आली.

(कोणता तरी ERROR आला प्रतिसाद पाठवताना.)

विशुमित's picture

13 Jan 2018 - 9:55 am | विशुमित

नम्र सुचना वजा विनंती

प्रिय स्नेहीजनहो,थोडी technical information Share करतो.. गेल्या काही दिवसात तुम्ही-आम्ही पाहिलं असेल..
नेहमी येणारे good morning आणि शुभेच्छांचे text messages हल्ली Images किंवा videos सोबत येतात... परंतु Image ला आपल्या नेहमीच्या messages च्या 150 पट जास्त memory size (bytes) लागते तर video साठी 1000 पट जास्त data लागतो.
हे सर्व मेसेजेस मोबाईल कंपन्यांद्वारा बनविलेले असतात.. आपले data usage वाढविण्यासाठी... असे messages forward केल्याने तुमचे पैसे तर फुकट जातातच पण माझेही जातात.. फक्त मोबाईल कंपन्या त्यातून रग्गड नफा कमवितात...
माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की जेव्हा तुम्हाला messages type करून पाठविणे शक्य असेल तेव्हा तो तसा पाठवा.. खरोखरच चांगला Photo किंवा महत्वाचा Video असल्याशिवाय तो forward करू नका..
आता तुम्ही म्हणाल मोबाईल कंपन्या दररोज 1 GB डाटा देते मग कसली फिकीर,पण आपण या लालसे पोटी,आपला किती वेळ व्हाट्सअप किंवा फेसबुकवर घालवतो याचा कधी विचार केलाय का ?
*या कंपनीचे(Whatsapp & Facebook) दोन्ही मालक आता जागतीक श्रीमंताच्या यादीत प्रथम क्रमांकावर येत आहे.व आपण भारतीय कंगाल व बेरोजगाराच्या यादित प्रथम क्रमांकावर येतोय...
तर मग थोडा विचार करा,कामातुन वेळ मिळालाच तरच टाईमपास करा व देशातील बेरोजगारी कमी करण्यास हातभार लावा !
तर मगं लागा कामाला...किमान रेडी फोटो व व्हिडिओज् सेंड करू नका.ऐवढे केल्याने,देशाचे 10 करोड रू.दररोज वाचतील.

हा message इतर ग्रुपमध्ये पाठवुन ग्राहक जागरणास मदत करा..

Customer Awareness Forum

उपयोजक's picture

13 Jan 2018 - 12:56 pm | उपयोजक

त्या ब्लाऊजपीस पाठवणार्‍याला तोच ब्लाऊजपीस परत ५० वेळा पर्सनलवर पाठवायचा.परत तो अशी आगळीक करणार नाही.

अॅडमिन किती कठोर आहे यावर सगळं अवलंबून आहे.ग्रुप कोणत्या प्रकारचा आहे हे सुध्दा महत्वाचं आहे.टाईमपास या प्रकारातला ग्रुप असेल तर भारंभार पोस्टस येऊ शकतात.पण विशिष्ट विषयाला वाहिलेले वॉटसअॅप ग्रुप्स असतील तर तिथे अॅडमिनने कठोर राहिलेच पाहिजे.मी माझ्या ग्रुपात तरी हेच करतो.एकदा वॉर्निंग द्यायची.ऐकलं नाही तर सरळ निरोप! यामुळे इतरांना योग्य तो संदेश जातो.सगळ्यात कहर तेव्हा होतो;जेव्हा अवांतर काही पाठवल्यानंतर ती व्यक्ती पर्सनलवर चुकून पाठवला,सगळे ग्रुप्स सिलेक्ट झाले.परत नाही पाठवणार वगैरे म्हणते तेव्हा.
व्हॉटसअॅप ग्रुपवर पाठवताना तुम्ही ज्या ग्रुपला पाठवता त्याला नाव असतं,त्या ग्रुपला डिपी असतो,एकापेक्षा जास्त सिलेक्शन्स असतील तर खाली नावं येतात,परत एकदा व्हॉटसअॅप विचारुन खातरजमा करतं.तरीही नको त्या ग्रुपला मॅसेज कसा जातो? याचा अर्थ पाठवणारा ग्रुपला सिरियसली घेत नाहीये.मग अशा सदस्याला निरोप देणंच उत्तम! तुला ग्रुप सिरियसली घ्यायचा नाही ना? मग ग्रुपलाही तुझी गरज नाही.निघ बाहेर!

उपयोजक's picture

13 Jan 2018 - 1:08 pm | उपयोजक

त्रास व्हायचाच असेल तर कशाहीपासून होऊ शकतो. काहीजणांना सकाळी फक्त gm पाठवलं तरी त्याचा य्रास होतो.व्हॉटसअॅप,फेबु,ट्विटर,टेलिग्रामचं काय घेऊन बसलात? अनेकांना तर मिपाचाही त्रास होतो म्हणून कैक वर्षं मिपापासून लांब आहेत.त्रास होण्यासाठी व्हॉटसअॅप,फेबु,मिपा,ऐसी,माबो ही फक्त निमित्तमात्र आहेत.त्याकरता व्हॉटसअॅपला नाव ठेवून काय उपयोग?

ग्रुपवर शिस्त प्रस्थापित करावी लागते.जरा वेळ द्यावा लागतो त्यासाठी.अोव्हरएक्सायटेड सदस्य हा व्हॉटसअॅप ग्रुपवर सगळ्यात मोठा धोका असतो.त्यांना फक्त आवरावं लागतं.बाकी शहाण्या सदस्यांना सांगावही लागत नाही.

आपल्याला कोणी सुप्रभात म्हटलं तर तितकं वाचायचा कंटाळा का?

वेशीवरचा म्हसोबा's picture

13 Jan 2018 - 1:32 pm | वेशीवरचा म्हसोबा

व्हाट्सआपने जर प्रत्येक मेसेजला एसेमेसप्रमाणे पैसे घेतले तर लोक हे फॉरवर्ड करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचे काम पुढच्या क्षणाला बंद करतील.

विनागट वाटसप उपयुक्त. उगाचच विडिओ ,ढकलपत्र पाठवतात ते म्यूट केलेत. ओटो डाउनलोड नाहीच.

माधुरी विनायक's picture

15 Jan 2018 - 4:59 pm | माधुरी विनायक

मुवि, राजेंद्र मेहेंदळे, डॉ. सुबोध खरे, पैसा, पलाश, पद्मश्री चित्रे, निशाचर, चामुंडराय _/\_
सूड यांची सूचना अनुकरणीय आणि ब्लाऊजपीसची गोधडी हा पर्यायही मस्तच...
एस... अनुकरणीय, सुखी माणूस - बरोबर आहे तुमचं...
विशुमित - ब्लाउजपीस, तांदूळ, खण, नारळासह दिलेला सल्ला उपयुक्त...
केअशु - अॅडमिन ची भूमिका महत्वाची हे अगदी खरं...
अरूणाजोशी - दिवसाला किमान ३० जण संदेश, चित्र, चलत् चित्र आणि गोष्टी सांगून सुप्रभात म्हणू लागले तर ती प्रभात सुप्रभात राहत नाही (डिलीट करण्यात जाणारा वेळ लक्षात घेता), हा माझा अनुभव...
वेशीवरचा म्हसोबा, कंजूस - मान्य...