महाराष्ट्राच्या ईतिहासातील ऐतिहासिक प्रसंगांबद्दल माहिती हवी आहे.

सतिश म्हेत्रे's picture
सतिश म्हेत्रे in जनातलं, मनातलं
7 Jan 2018 - 9:08 pm

नमस्कार मंडळी,
मी National Institute of Technology Karnataka, Surathkal येथे संगणक अभियांत्रिकी शिकत आहे. आमच्या येथे दरवर्षी भारत दर्शन नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम होतो. त्यामध्ये प्रत्येक राज्यामधून आलेले विद्यार्थी त्या त्या राज्याची कला व संस्कृती सादर करतात. येथील महाराष्ट्र मंडळ देखील महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांपुढे मांडते.
यामध्ये आम्हाला (प्रत्येक सहभागी राज्याला) ऐतेहासिक गोष्टींवर आधारित दोन नाटिका सादर कराव्या लागतात. ज्यातून राजयाबद्दल काही तरी माहिती मिळेल किंवा येथील महत्त्वाच्या लोकांच्या जीवनात घडलेले आणि ऐतेहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे प्रसंग लोकांना दिसतील. आतापर्यंत आम्ही शिवाजी महाराजांच्या वरील काही प्रसंग (उदा. अफझलखान वध, राज्याभिषेक) दाखवले आहेत. नरेंद्र दाभोळकरांचे अंधश्रद्धा निर्मूलन तसेच टिळकांच्या जीवनातील “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” हे प्रसंग देखील झाले आहेत.
यावर्षी आम्ही ईतर काही प्रसंग (किंवा घटना ) यांचा विचार करायचा असे ठरवले आहे. मिपावर असे अनेक जाणकार आहेत की ज्यांचा ईतिहासाचा अभ्यास आहे. (किंवा ज्यांना असे काही प्रसंग माहीत आहेत.) त्यामुळे मी हा धागा ईथे उघडीत आहे. जर तुम्हाला असे काही प्रसंग माहीत असतील तर कृपया ईथे प्रतिक्रिया द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे.

मांडणी

प्रतिक्रिया

सतिश म्हेत्रे's picture

7 Jan 2018 - 9:16 pm | सतिश म्हेत्रे

नाटिकांसोबत ईतर गोष्टीही असतात. सर्व मिळून 22-25 मिनिटे ईतका वेळ असतो. त्यामुळे नाटीकांसाठी फक्त 4-4 मिनिटे ईतकाच वेळ मिळतो. त्याहिशोबाने प्रसंग सांगा.
तसेच मागील दोन वर्षातील आमचा performance पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
२०१६ - https://www.youtube.com/watch?v=gcMjRD6UI6o
२०१७ - https://www.youtube.com/watch?v=awtp4oqSHw0

अमोल खरे's picture

7 Jan 2018 - 11:42 pm | अमोल खरे

चाफेकर बंधुंवर करा नाटिका," गोंदया आला रे" . तीन भाऊ होते, रँड वधात शिक्षा झाल्याने तिघांना फाशी झाली व चाफेकर कुटुंबाचा निर्वंश झाला. देशासाठी सामान्य माणसे काय करू शकतात त्याचे हे क्लासिक उदाहरण आहे. आणखी उदाहरणे हवी असल्यास सर्वसाक्षी काकांना विचारा. अनेक शुभेच्छा.

हो, चापेकर आहेत, सावरकर आहेत.
जरा मागे जायचं तर फडके, झाशीची राणी.
त्याहून मागे जायचं तर पानिपत,
औरंगजेबाची 27 वर्षे, संभाजीराजांची 9 वर्षे..
शिवाजी झाले म्हणता..
मागे तुकोबा, एकनाथ, रामदास, ज्ञानोबा
देवगिरी राज्य फितुरानी कसे पाडले ते,

यातलं के हवं ते दाखवा. नाहीतर एखादा मोठा कालिडोस्कोपच करा ना.

आनन्दा's picture

7 Jan 2018 - 11:53 pm | आनन्दा

या व्यतिरिक्त,
वेदोक्त/पुराणोक्त वाद, ताईमहाराज खटला, न्या. रानडे, आगरकर यांची समाजसुधारणा
फुले शाहू आंबेडकर यांचा जीवनपट, विशेषतः आंबेडकर...

या देखील महाराष्ट्रात घडलेल्या विशेष घटना आहेत असे मी मानतो..

पुणे भारतीय इतिहासाचे एके काळी केंद्र होते. तत्कालिन पुण्यासंबंधी(१८२०- १९२०) नाटिका सादर करू शकता.

सतिश म्हेत्रे's picture

8 Jan 2018 - 7:37 pm | सतिश म्हेत्रे

....आम्हाला नाटीकेसाठी 5 मिनिटे वेळ आहे. त्यामुळे एक लहान प्रसंग किंवा तेवढ्याच वेळात दाखवता येणारी नाटिका आम्हाला दाखवायचे आहे. पुण्यासंबंधी(१८२०- १९२०) नाटिका सादर करणे एतक्या कमी वेळात शक्य नाही. त्यामुळे कृपया पुंबा यांनी एखादा दुसरा प्रसंग सांगावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आनंदा यांना मी अशी विनंती करतो की आपण न्या. रानडे किंवा आगरकर किंवा फुले यांच्या समाजसुधारणा मध्ये घडलेला एखादा प्रसंग सांगावा.