२०१८ मधील काही महत्वाच्या खगोलिय गोष्टी !

ओरायन's picture
ओरायन in जनातलं, मनातलं
31 Dec 2017 - 3:48 pm

नमस्कार! उद्यापासुन नविन इंग्रजी व आंतरराष्ट्रिय वर्ष २०१८ सुरू होत आहे त्यानिमित्त काही मोजक्या २०१८ मधील खगोलिय घटना इथे थोडक्यात देत आहे.
१. जानेवारीमध्ये २ पोर्णिमा व १ चंद्रग्रहण आहेत. पहिल्या पोर्णिमेला ( २ जानेवारी, पौष पोर्णिमा ) आपण सुपरमुन बघू शकतो.सुपरमुन म्हणजे मायक्रोमुनच्या आकारापेक्षा १४ टक्के मोठा व पर्यायाने अधिक तेजस्वी चंद्र. हाच सुपरमुन परत माघ पोर्णिमेला म्हणजे ३१ जानेवारीला बघु शकतो. ऐकाच महिन्यात दुसरा सुपरमुन आला की त्याला ंब्ल्यु मुन ं असे पण म्हणतात.
२. २०१८ मध्ये ' संपुर्ण सूर्य ग्रहण ' नाही. केवळ २ छोटेसे सुर्यग्रहण आहेत. ( भारतातून दिसणार नाही) ़माञ २ संपूर्ण चंद्रग्रहण आहेत. व ते दोन्हीं भारतातून दिसु शकतील. पहिले चंद्रग्रहण ३१ जानेवारी व दूसरे २७,२८ जुलै मध्ये आहे.
३. तसे बघायला वेगवेगळ्या प्रकारचे १० उल्कावर्षाव आहेत. फक्त फेब्रुवारी व मार्च महिना सोडला तर प्रत्येक महिन्यांत काही ठराविक दिवशी उल्कावर्षाव आहेत.हे उल्कांचे प्रमाण ताशी १० ते ताशी १५० इतके वेगवेगळे आहे.
येथे मला मृग नक्षत्रातील ओरायनिडस् ह्या उल्कावर्षावाविषयी सांगाचचे आहे. अत्यंत मोहक दिसणारा व सहज ओळखू येणारा हा ताशी २० उल्का असा वेग असणारा उल्कावर्षावाचा अनुभव घेऊ शकता २१ ,२२ आक्टोबर रोजी.
४. स्पेस ऐक्स ह्या खाजगी अमेरीकन संस्थाचे २०१८ चे मानवांना चंद्रभोवती विशिष्ट जवळ नेऊन परत सुखरूप परत आणण्याचे व त्यायोगे स्पेस टुरिझम सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे मंगळावर वसाहत हा पण त्यांचा एक उद्देश आहे.
५. ईस्ञो १० जानेवारीच्या जवळपास ३१ उपग्रह एकाचवेळी सोडणार आहे.ह्यात अमेरीका व फिनलंडचे नँनो सैटेलाइट पण आहेत. तसे मार्च मध्ये चांद्रयान २ मार्फत मुन लँन्डर सोडणार आहे.ह्याव्यतिरिक्त नेहमीचे कम्युनिकेशन व नेव्हिगेशनचे काही सैटेलाइट २०१८ मध्ये आहेतच.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

अमितदादा's picture

31 Dec 2017 - 4:40 pm | अमितदादा

छान माहिती.. हा धागा 2018 मध्ये येणाऱ्या खगोलीय घडामोडी नुसार वाहता राहील ही अपेक्षा।

तुषार काळभोर's picture

31 Dec 2017 - 4:57 pm | तुषार काळभोर

ओरायनभाऊ,
सकाळ मध्ये दर महिन्याच्या सुरुवातीला प्रकाश तुपे यांचं एक सदर यायचं, त्या महिन्यात काय परिस्थिती असेल, कोणत्या उल्लेखनीय घटना घडणार आहेत, इ. (लै महिने झाले सकाळ वाचून, आता असतं की नाही माहिती नाही).
खगोलीय घडामोडी - जानेवारी २०१८ अशी लेखमाला जमवता येते का बघा प्लिज.
नाहीतर आमचा आणि आकाशाचा तसा तर काहीच संबंध नसतो. अशी लेखमाला येत राहिली तर अधून मधून वरई बघत राहू.

उपयुक्त धागा. २१-२२ ऑक्टोबरचे नियोजन करून ठेवायला हवे.

Nitin Palkar's picture

1 Jan 2018 - 8:02 pm | Nitin Palkar

+१११
चलो वांगणी.

Nitin Palkar's picture

1 Jan 2018 - 8:19 pm | Nitin Palkar

माझ्या माहितीप्रमाणे एकाच इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा आल्यास दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास ब्लू मून म्हणतात. A second full moon in a calendar month.
२०१८ च्या मार्च महिन्यात देखील दोन पौर्णिमा आहेत म्हणजे ३१ मार्चला देखील ब्लू मून दिसणार आहे.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये पौर्णिमा नाही.

ओरायन's picture

12 Jan 2018 - 1:08 pm | ओरायन

हो..मार्च मध्ये पण दोन पोर्णिमा आहेत.

रुपी's picture

3 Jan 2018 - 3:25 am | रुपी

अरे वा! छान धागा.

आज ३१ उपग्रह सोडून ईस्ञोने शतक पूर्ण केले आहे. आज सोडलेल्या उपग्रहांमध्ये भारतासहित अजुन ६ देशांचे उपग्रह आहेत. अर्थात ऐकाचवेळी विक्रमी १०४ छोटेमोठे उपग्रह ( २०१७ मघ्षे ) सोडणा्रया ईस्य़ोला ही कामगिरी विशेष अशी नव्हती. माञ २०१७ मध्येच यात अपयश आले होते.
असो. तर २०१८ सुरवात चांगली झालेली आहे.
मला या संस्थेबद्दल सरकारी असूनदेखील नेहनीच आदर व कौतुक वाटते. कारण सरकार कोणत्याही पक्षाचे असो..यांचे काम अलिप्तपणे चालते व कोणतेही सरकार त्यात ढवळाढवळ करत नाही वा केलेली नाही.
हा धागा प्रवाही ठेवण्याचा मी प्रयत्नच करेल. पण आंपणास या संदर्भात जी माहिती असेल ती आपणपण या धाग्यावर करावी ही विनंती,जेणेकरून सर्व माहिती एकञित राहिल.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद अमितदादा, पैलवान, एस , nitin palkar, रूपी.

दुर्बिणी आणि टेलिस्कोपस ( बाइनो , टेलिस्कोप) बद्दल माहिती लिहून धागा चालू ठेवता येईल. तुमच्याकडे असेल्या वस्तूविषयी माहिती अपेक्षित, विकि अमेझॅानची नको. आकाश निरीक्षण नवीन जागा सांगा.

ओरायन's picture

15 Jan 2018 - 12:28 am | ओरायन

प्रतिसादाबद्दल धन्यवाद कंजुष..मी आकाश निरीक्षण अावडणारा सामान्य हौशी माणुस..साधारण सामुग्री आहे..तरी बघतो काय शेअर करता येईल ते.

अभिजीत अवलिया's picture

17 Jan 2018 - 8:40 am | अभिजीत अवलिया

करा लवकर शेअर. मला पण लवकर एक टेलिस्कोप घ्यायचा आहे.

धागा चांगला आहे.

कल्याण कर्जत रेल्वे मार्गावर वांगणी हे एक चांगले ठिकाण आहे. मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांचे आकाश दर्शनाचे अनेक कार्यक्रम तिथे होतात. इतरही काही हौशी मंडळे तिथे कार्यक्रम आयोजित करतात. दुर्बीण (telescope) असणारा कुणी जाणकार माहितीचा असल्यास उत्तमच अन्यथा द्विनेत्री (binoculars) च्या सहाय्याने देखील आकाश दर्शनाचा आनंद उपभोगता येतो.

सुधांशुनूलकर's picture

17 Jan 2018 - 7:53 pm | सुधांशुनूलकर

मुंबईच्या 'खगोल मंडळ' या संस्थेने शनिवारी १३-१४ जानेवारीला रात्रभर आकाशदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आम्ही उभयता गेलो होतो. नेरळला सगुणा बागेमध्ये १३ तारखेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १४च्या पहाटे ५ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होता.
अत्यंत सुनियोजित असा हा कार्यक्रम होता. मंडळाच्या तज्ज्ञ लोकांनी मराठीमध्ये माहिती दिली, आणि एकूण सहा टेलिस्कोप वापरून तीन सत्रांमध्ये दीर्घिका (Galaxy), गुरू ग्रह त्याच्या चार उपग्रहांसह, तेजोमेघ (Nebula), जुळे तारे (Binary Star), तारकापुंज (Star clusters) अशा जवळपास नऊ-दहा खगोलीय वस्तूंचं (astronomical objectsचं) प्रत्यक्ष दर्शन घडवलं. मध्ये मध्ये चहा होताच. प्रश्नोत्तरांचंही सत्र होतं. मंडळाच्या एका सदस्याने पुरा-खगोलशास्त्रात स्वतः केलेल्या संशोधनाचं सादरीकरण फारच छान होतं.

आता येत्या २०-२१ तारखेला शनिवार-रविवारी हाच कार्यक्रम याच ठिकाणी इंग्लिशमध्ये होणार आहे. http://khagolmandal.com/ या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळेल आणि नोंदणीही करता येईल. खगोल विज्ञानात रुची असलेल्यांनी जरूर जा.

चंद्रग्रहणाचे लाईव्ह स्ट्रिमिंग...दुवा
https://youtu.be/P11y8N22Rq0

अमितदादा's picture

8 Feb 2018 - 1:29 am | अमितदादा

स्पेसएक्स ने अपोलो मोहिमेनंतरच्या सर्वात ताकत वर अश्या Falcon Heavy ह्या रॉकेट चे यशस्वी प्रेक्षपण केलं आहे. यातून मस्क ने आपली टेस्ला स्पोर्ट कार मंगळाच्या दिशेने रवाना केलीय. अंतरिक्ष क्षेत्रात मधील हा महत्वाचा टप्पा आहे. अंतरिक्ष सफर, मंगळ सफर आवाक्यात आलीय असे दिसतेय, जरी यासाठी अजून बराच टप्पा घाटायचं असला तरी. सर्व तंत्रज्ञांच अभिनंदन. खालील बातमीत Falcon Heavy रॉकेट चा मार्ग ग्राफिकल दाखवला आहे तो पाहण्यासारखा आहे.

Falcon Heavy