'फेकू'किस्से

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं
27 Dec 2017 - 10:46 pm

काही लोकांना थापा मारायची बालपणापासून सवयच असते. त्यातील काहींची मोठे झाल्यावर ही सवय मोडते तर काहीजण आयुष्यभर फेकुगीरी करत राहतात. समोरचा थापा मारतो हे आपल्याला कळत असतं, परंतू आपण बऱ्याचदा त्या व्यक्तीचे वय, पद किंवा परिस्थीती बघून दुर्लक्ष करतो.अडाण्यापासून ते उच्च शिक्षितापर्यंत अशा थापा मारणारे सर्रास आढळतात. गंमत म्हणून मी प्रत्यक्ष ऐकलेले काही फेकू किस्से देतो.
किस्सा: १
आमच्या घरी नवीन फ्रिज घेवून माणसं आली त्यांच्या मागे एक पिळदार शरीर असलेला तरुणही आला. तो नेमका बाबांच्या मित्राचा मुलगा होता. बाबांनी त्याला विचारले तू ह्यांच्याबरोबर कसा काय? मी टेंपोवर ड्रायव्हर म्हणून काम करतोय सध्या, बारावी नापासाला कोणती कंपनी नोकरी देतय काका? अनेक कंपन्यांमध्ये प्रयत्न केला, प्रत्येक ठिकाणी मुलाखतीत नापास झालो. हां! एका टायर कंपनीत मुलाखतीत नापास झालो, परंतू त्या साहेबाने माझ्या शरीराकडे बघून एक जॉब देता येईल तुला ,करशील तू? एका दमात आपली कहाणी सांगून बाबांना ओळखायला सांगितलं,काय जॉब असेल सांगा? बाबा - हम्म्म.. अहो उघड्या अंगाने टायर दोन्ही हाताने वर उचलून ८ तास कंपनीच्या गेटसमोर उभं राहण्याचा जॉब होता.

किस्सा:२

एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो, लग्नही मुहूर्तावर लागले होते. आम्ही मित्र बाहेर गप्पा मारत असताना आमचा एक इंजिनिअर मित्र रिक्षातून उतरताना दिसला. हा एक नंबरचा फेकू. चार माणसं दिसली की ह्याच्या फेकुगीरीला चेव चढतो. आल्या आल्या त्याची टकळी सुरू. काय रिक्षावाले आहेत इकडचे , अक्षरशः मेंढरांसारखे पॅसेंजर कोंबतात रिक्षात. आमच्या रिक्षाला ट्रॅफिक पोलिसाने अडवले, एकेकाला रिक्षातून बाहेर उतरवले. बारा पॅसेंजर एका रिक्षात पाहून तो पोलिसही आश्चर्यचकित झाला.मी म्हटलं आता ह्या रिक्षावाल्याचं काही खरं नाही. पण कसलं काय त्या पोलिसाने रिक्षावाल्याला त्याच्या समोर सर्व पॅसेंजरला पुन्हा रिक्षात बसवून दाखवायला सांगितले. रिक्षावाल्यानेही थ्री सीटर मध्ये आम्हा बारा जणांना व्यवस्थीत कोंबले. पोलिसानेही खूष होऊन रिक्षाला दंड न करता सोडून दिले.

किस्सा: ३

असाच एक मित्र खाजगी कंपनीत कामाला आहे . त्याच्या मते त्याचा बॉस मूर्खच आहे. मालकाचा ट्रक ड्रायव्हर नेहमी गाडी दुरुस्तीच्या नावाखाली मालकाकडून पैसे घेत असतो. गाडी पंक्चर झाली, गेअर तुटला, पाटा तुटला काहीही कारण सांगून मालकाला लुटत असतो. एकदा तर त्याने गाडीचा 'मोसम तुटला ' असं सांगून मालकाकडून पैसे वसूल केले होते.

वरील प्रत्येक किस्से मी आतापर्यंत ३-४ व्यक्तींकडून अगदी असेच्या असे अगोदर ऐकलेले आहेत. त्यामुळे खरंच असे किस्से घडले असतील का अशी शंका येते.

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

27 Dec 2017 - 11:07 pm | श्रीरंग_जोशी

रोचक आहेत किस्से. या निमित्ताने फोका तानणे हा वाकप्रचार आठवला.

बाकी शीर्षकामुळे हा वेगळाच धागा वाटला होता ;-).

महेश हतोळकर's picture

27 Dec 2017 - 11:47 pm | महेश हतोळकर

बाकी शीर्षकामुळे हा वेगळाच धागा वाटला होता ;-).

तोच तर उद्देश्य आहे

श्री गावसेना प्रमुख's picture

28 Dec 2017 - 9:52 am | श्री गावसेना प्रमुख

वाचणखुण साठवण्यायोग्य धागा

http://www.misalpav.com/node/28491
वाचून घ्या. मनोरंजन होईल ☺

टवाळ कार्टा's picture

28 Dec 2017 - 10:50 am | टवाळ कार्टा

हे तर काहीच नाही....काही आमच्या इथले ट्रकवाले 20-25 लाखाची कॅश घेऊन फिरतात =))

सतिश गावडे's picture

28 Dec 2017 - 11:04 am | सतिश गावडे

फक्त 20 लाखच हो. 25 लाख ही तुमची मनकी बात आहे.

बाकी धाग्यातले किस्से अगदीच पाणचट वाटले.

बाकी धाग्यातले किस्से अगदीच पाणचट वाटले.

+१
बबन तांबेंचा धागा मस्त आहे त्यापेक्षा..

ट्रेड मार्क's picture

28 Dec 2017 - 11:43 pm | ट्रेड मार्क

नजर एका दिशेला आणि बाण दुसऱ्याच दिशेला मारलाय त्यामुळे असेल.

... की नाशिकला या असं (चेपू वर) म्हणतात.

ज्योति अळवणी's picture

28 Dec 2017 - 3:13 pm | ज्योति अळवणी

खरच असतात असे फेकू. हा लेख वाचून असे काही किस्से आठवले

सिरुसेरि's picture

28 Dec 2017 - 6:34 pm | सिरुसेरि

फेकु ( फोकाडे ) लोकांचे किस्से मस्तच . " काय अंटसंट फोका मारुन राहिला बे ? " असेच यांना म्हणले पाहिजे .

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Dec 2017 - 11:17 pm | अमरेंद्र बाहुबली

हे तर काहीच नाही. मी शाळेत असताना मास्तरने असे फेकले होते. "अमेरिकेत population कंट्रोल करण्यासाठी माणूस 60 वर्षाचा झाला की त्याला गोळी घालून ठार मारतात."