गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक-२०१७ मतमोजणी

गॅरी ट्रुमन's picture
गॅरी ट्रुमन in काथ्याकूट
16 Dec 2017 - 7:18 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सोमवार १८ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. नेहमीप्रमाणे त्या दिवशी मी मिपावर ऑनलाईन असणारच आहे. जसेजसे कल आणि निकाल येतील तसेतसे ते इथे पोस्ट करणार आहे. त्यासाठी हा नवा धागा उघडत आहे. या धाग्यावर विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्याअनुषंगाने संबंधित विषयांवर चर्चा व्हावी ही अपेक्षा.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

16 Dec 2017 - 7:54 pm | पगला गजोधर

सर्वच एक्झिट पोल भाजप ला स्पष्ट बहुमत दाखवत आहेत.
त्यामुळे नक्कीच भाजप ठसाठशत विजयी होण्याची शक्यता वाटते
.
यातून एकच गोष्ट अधोरेखित होतीये, देशात अजूनही, मोदी यांना भरपुर सपोर्ट आहे, शिवाय विरोधी पक्षाकडे मोदींना आव्हान देईल अशी शक्ती व कुवत नाहीये, विरोधी पक्षाने सखोल आत्मचिंतन व सातत्यपूर्ण प्रयत्न व मेहनत केलीच पाहिजे.

पगला गजोधर's picture

18 Dec 2017 - 4:14 pm | पगला गजोधर

आपला संबीत पात्रा/मणी अय्यर तर होत नाहीये नं?
अशी विचार करण्याची वेळ काही लोकांवर आहे.

दु ४ वा bjp 98, cong 81

मी मागच्या वेळेस अंदाज दिलेली 95/85
http://www.misalpav.com/comment/974440#comment-974440

कदाचित मणीला पडमभूषण देतील यावेळी....

जर 98 म्हणजे विकासासाठी... तर 81 हे विकास पोकळ आहे हे दाखवतो.
जर 98 जातीय राजकारणाविरुद्ध तर 81 हे धार्मिक विद्वेषा विरुद्ध का नाही समजायचे ?
जर 49 टक्के मतदार देशप्रेमी तर 43% देशद्रोही नाही...
5 लाख मते नोटा ला ?
जर सलग 22 वर्षे राज्य हातात ठेवणे आचिव्हमेंट तर, 55 वर्षे देश हातात ठेवणे आचिव्हमेंट कसे नाही ?
जर 98 आमदार राज्यसभेच्या निवडणुकीत प्रभाव टाकणार तर 82 आमदार पण प्रभाव टाकणारच नं ?

पगला गजोधर's picture

18 Dec 2017 - 4:16 pm | पगला गजोधर

150+ आमदार व काँग्रेस मुक्त भारत या केवळ वालग्ना करून ठेवल्या मतदारांनी !

पगला गजोधर's picture

18 Dec 2017 - 4:25 pm | पगला गजोधर

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींवर जनतेने विश्वास टाकला, त्यावेळीसचा विरोधी पक्ष व आताचा विरोधी पक्ष यात
गुणात्मक दृष्टया फरक जाणवतोय का ? होम पिच वरची ही मॅच
Bjp जिकणार होतीच, परंतु किती फरकाने हाच मुद्दा होता.
या होम पिचवर नाही म्हटलं तरी थोडासा bjp ला अडवांतेज होताच, त्यांची कार्यकर्ता फळी मजबूत होतीच,
तरीही टफ फाईट झाली, तर विरोधी पक्ष आत्मनिरीक्षण करून
स्वतः सुधारणा करू शकतात, फक्त अमित शाहच सुधारणा करत नाही....
आज सुधीर चौधरी चं (झी वाल्या)तोंड पाहण्यासारखं होतं...

पगला गजोधर's picture

18 Dec 2017 - 5:03 pm | पगला गजोधर

गुजरातेत Bjp चा सीट ट्रेंड हा डाऊनट्रेंड कन्टीन्यू राहिलाय....
ट्रेंड रिवर्सल आजिबात पाहण्यात नाहीये....
उलट काँग्रेस चा पॅटर्न दोजी मॉर्निंग स्टार आहे का ?

SHASHANKPARAB's picture

16 Dec 2017 - 11:59 pm | SHASHANKPARAB

मला वाटतं की टाइम्सने त्यांच्या साईटमार्फत केलेला देशव्यापी सर्व्हे बरच काही सांगून जातो...

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 7:31 am | गॅरी ट्रुमन

मतमोजणी ८ वाजता सुरू होईल. सुरवातीला पोस्टल मतांची मोजणी होईल. ती पूर्ण झाल्यानंतर ई.व्ही.एम उघडण्यात येतील. साधारण ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास पहिले कल हाती येतील. जसेजसे कल (आणि नंतर निकाल) हातात येतील तसेतसे मी ते इथे पोस्ट करणार आहेच.

कंजूस's picture

18 Dec 2017 - 7:46 am | कंजूस

भाजपा हरली तर कोणत्या मुद्याचा जनमतावर परिणाम झाला म्हणाल?
१) नोटाबंदी

२) जाएसटी

३) गोहत्या बंदी व त्यांचा अतिरेक

४) आरक्षण

५)इतर?

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 7:49 am | गॅरी ट्रुमन

भाजपचा पराभव झाल्यास अ‍ॅन्टी इन्कबन्सीला तोंड देण्यात आलेले अपयश, मोदींच्या नावावर लोक नेहमीच मते देतील हा आत्मविश्वास नडणे, काँग्रेसने हार्दिक पटेल
प्रभृतींना पुढे आणून भाजपला चेकमेट केले आणि त्याला तोंड देण्यात भाजपला अपयश आले वगैरे मुद्दांचा समावेश असेल.

चाणक्य's picture

18 Dec 2017 - 10:12 am | चाणक्य

GST मुळे व्यापारी वर्गाचा असंतोषही थोडाफार हातभार लावेल असे वाटते. कारण यामुळे cash flow वर नाही म्हणलं तरी परीणाम झाला आहेच.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 5:11 pm | गॅरी ट्रुमन

जी.एस.टी चा सुरतमध्ये मोठा परिणाम होईल असे म्हटले जात होते. पण सुरत शहरातील सगळ्या जागा भाजपनेच जिंकल्या आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 7:54 am | गॅरी ट्रुमन

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना भाजप जिंकल्यास मुख्यमंत्री होणार का हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी 'पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल' असे म्हटले. त्यामुळे पक्षाचा रूपाणी सोडून अन्य कोणाला मुख्यमंत्री करायचा बेत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना निवडणुक झाल्यानंतर मुख्यमंत्री केले जाणार का? ते मेहसाणामधून निवडणुक लढवत आहेत. त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर पटेल मतदार आहेत त्यामुळे त्यांची जागा धोक्यात आहे असे म्हटले जात आहे.

मुळात विजय रूपाणी किंवा अन्य कोणा भाजप नेत्याला मुख्यमंत्री करायचा प्रश्न उभा राहणार की नाही हे समजेल अजून काही तासात.

उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Dec 2017 - 8:45 am | डॉ सुहास म्हात्रे

नितीन पटेल सद्या मागे !

मतमोजणी पद्धत चुकीची आहे. गुप्त मतदान नसते. एकेका भागाला एकेक मतपेटी असते ती जोडली की त्यात्या भागातल्या लोकांनी कोणत्या पक्षाला मत दिले हे पक्षांना कळते. तसं करायला नको. फक्त त्या पेटीत किती मतं आहेत ते दिसले पाहिजे. प्रभागाच्या सर्व मतपेट्या जोडून झाल्यावरच पक्षांची मते दिसली पाहिजेत आणि विभागाचा निकाल.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:00 am | गॅरी ट्रुमन

मतमोजणी सुरू झाली आहे. पहिले कल काही मिनिटात हाती येतील.

काटें की टक्कर होईल अशी आशा आहे

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:06 am | गॅरी ट्रुमन

गुजरातमधील पहिले कल हाती आले आहेत. पहिला कल भाजपच्या बाजूने गेला आहे. नक्की जागा कोणती हे अजून सांगितलेले नाही.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:06 am | गॅरी ट्रुमन

ही जागा कच्छ जिल्ह्यातील अंजार ही आहे. २०१२ मध्येही ही जागा भाजपने जिंकली होती.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:09 am | गॅरी ट्रुमन

गुजरातमधून आणखी काही कल आले आहेत. भाजप ४ जागांवर तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:11 am | गॅरी ट्रुमन

आता गुजरातमध्ये भाजप १० जागांवर तर काँग्रेस २ जागांवर पुढे आहे. काँग्रेस गांधीनगर उत्तर आणि पाटणमधून तर भाजप अंजार, दहेगाम, दीसा या जागांवरून पुढे आहे.

मागील धाग्यातला अंदाज १२०-१३० अजूनही कायम आहे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:13 am | गॅरी ट्रुमन

हे आकडे पोस्टल मतांचे आहेत. त्यामुळे हे आकडे वेगवेगळ्या चॅनेलवर थोडे वेगळे आहेत. हे आकडे थोडेफार बदलू शकतात.

नितीन पटेल मेहसाणामधून पुढे आहेत. घाटलोडिया या भाजपच्या बालेकिल्ल्यातून भाजप पुढे आहे.

मुख्यमंत्री विजय रूपाणी राजकोट पश्चिम मधून आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल मेहसाणामधून पुढे आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:16 am | गॅरी ट्रुमन

एन.डी.टी.व्ही वर भाजप २० आणि काँग्रेस ४ वर पुढे असे दाखवत आहेत तर रिपब्लिकवर ९-९ असे आकडे दाखवत आहेत.

योगी९००'s picture

18 Dec 2017 - 8:18 am | योगी९००

मटा : गुजरात भाजपा ११ तर कॉग्रेस १० असे दाखवत आहे.

हिमाचल मध्ये भाजपा १ असे दाखवत आहे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:26 am | गॅरी ट्रुमन

एन.डी.टी.व्ही वर दावा केला जात आहे की त्यांनी निवडणुक आयोगाने व्हेरीफाय केलेले आकडे दाखवत आहेत. एन.डी.टी.व्ही वर भाजप ४४ तर काँग्रेस ११ जागांवर पुढे दाखवत आहेत. तर इतर लोकल चॅनेल्सवर भाजप ५२ ठिकाणी आणि काँग्रेस ४१ ठिकाणी आघाडीवर आहे असे दाखवत आहेत.

टाईम्स नाऊ वर BJP ४५ CONG २५ दाखवत आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:33 am | गॅरी ट्रुमन

आता एन.डी.टी.व्ही आणि इतरांमधला फरक थोडा कमी झाला आहे. एन.डी.टी.व्ही अर भाजप ५७ आणि काँग्रेस १९ जागांवर पुढे दाखवत आहेत तर लोकल चॅनेलवर भाजप ६३ आणि काँग्रेस ४१ जागांवर पुढे दाखवत आहेत.

एन.डी.टी.व्ही वर हिमाचलमध्ये भाजप ३ आणि काँग्रेस १ जागेवर दाखवत आहेत तर इतर लोकल चॅनेलवर भाजप २७ आणि काँग्रेस ८ जागांवर पुढे दाखवत आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:36 am | गॅरी ट्रुमन

आताच एन.डी.टी.व्ही वर जाहिर केले की आतापर्यंत आकडे आले आहेत त्यापैकी ९०% मते पोस्टल मते आहेत. त्यामुळे हे आकडे बदलू शकतात.

सध्याचे आकडे--- भाजप ६०, काँग्रेस २४ आणि इतर १ (गुजरातमध्ये) तर हिमाचलमध्ये भाजप ३ आणि काँग्रेस १.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:37 am | गॅरी ट्रुमन

काँग्रेसचे शक्तीसिंग गोहिल मांडवीमधून आघाडीवर आहेत, वडगाममधून जिग्नेश मेवानी आघाडीवर आहेत.

राधनपूरमधून अल्पेश ठाकोर पिछाडीवर आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:41 am | गॅरी ट्रुमन

मेहसाणामधून काँग्रेस आघाडीवर दाखवत आहेत. याचा अर्थ उपमुख्यमंत्री नितीन पटेल पिछाडीवर गेलेले दिसत आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:43 am | गॅरी ट्रुमन

एन.डी.टी.व्ही वरील नकाशावरून काँग्रेसने सौराष्ट्रमध्ये बर्‍यापैकी आघाडी मिळवलेली दिसत आहे.

आताचे आकडे
गुजरातः भाजप: ६९ , काँग्रेसः ३४
हिमाचलः भाजपः ८, काँग्रेसः २

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:48 am | गॅरी ट्रुमन

आता काँग्रेसने फरक बराच कमी केलेला दिसत आहे. आता भाजप ७२ तर कॉम्ग्रेस ४३ जागांवर पुढे आहे. भाजपने मागच्या वेळेपेक्षा ४ जागांवर मागे आहे तर काँग्रेसने ६ जास्त जागा मिळवताना दिसत आहे.

हिमाचलमध्ये भाजप १२ तर काँग्रेस ४ जागांवर पुढे आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Dec 2017 - 8:48 am | डॉ सुहास म्हात्रे

गुजरात : टाईम्स नाऊ :

भाजप : ८०
काँग्रेस : ५५
इतर : ४

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Dec 2017 - 8:50 am | डॉ सुहास म्हात्रे

अरे सगळे हिमाचलला विसरून गेले की काय ?!

टाईम्स नाऊ :

भाजप : १६
काँग्रेस : १०
इतर : २

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:51 am | गॅरी ट्रुमन

आतापर्यंतचे आकडे बघता गुजरातमध्ये भाजप जिंकेल पण २०१२ पेक्षा काहीशा कमी जागा घेऊन असे वाटते. हिमाचलमध्ये मात्र भाजपचा विजय होताना दिसत आहे.

याक्षणी: गुजरातमध्ये भाजप-- ७९, काँग्रेस-- ५६ तर हिमाचलमध्ये भाजप--१६ आणि काँग्रेस-- १०

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:53 am | गॅरी ट्रुमन

टाईम्स नाऊवर जाहिर केले की मुख्यमंत्री विजय रूपाणी पिछाडीवर गेले आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:54 am | गॅरी ट्रुमन

सौराष्ट्रमधून आणि उत्तर गुजरातमधून काँग्रेस पुढे आहे तर दक्षिण आणि मध्य गुजरातमधून भाजप.

भाजप-- ८०, काँग्रेस-- ५७

हिमाचलमध्ये भाजप--१८ आणि काँग्रेस--१०

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:55 am | गॅरी ट्रुमन

भाजप सुरतमधील सगळ्या जागांवर पुढे आहे. सुरतमध्ये पटेलांची संख्या लक्षणीय आहे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 8:57 am | गॅरी ट्रुमन

ही निवडणुक रंगतदार होत आहे. आता गुजरातमध्ये आता भाजप-- ७७ आणि काँग्रेस--६३ जागांवर पुढे आहे.

भाजप जिंकेल पण २०१२ पेक्षा कमी जागांवर असे दिसत आहे. आता नितीन पटेल पुढे गेले आहेत.

रंगीला रतन's picture

18 Dec 2017 - 8:58 am | रंगीला रतन

८:५९ टाईम्स नाऊ वर BJP ७९ CONG ६०.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:00 am | गॅरी ट्रुमन

सौराष्ट्रमधील ४८ जागांपैकी काँग्रेस २८ जागांवर तर भाजप २० जागांवर आघाडीवर दिसत आहे.

आता भाजप ७७ आणि काँग्रेस ६४ जागांवर पुढे आहे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:03 am | गॅरी ट्रुमन

सध्या काँग्रेसने सौराष्ट्रमध्ये आघाडी घेतलेली दिसत आहे. भाजप मागच्या वेळेपेक्षा पिछाडीवर दिसत आहे त्याचे कारण सौराष्ट्र आहे. सौराष्ट्र-कच्छ मधून ५४ पैकी ४९ जागांचे कल आले आहेत. काँग्रेस २९ तर भाजप २० जागांवर पुढे आहे.

आता भाजप ७९ आणि काँग्रेस ६५ जागांवर पुढे आहे.

काहि मिनिटांपुर्वी काँग्रेस पुढे होते. आता परत मागे पडलेले दिसतेय..

विकास's picture

18 Dec 2017 - 10:28 am | विकास

India Today ने भाजपा जिंकणार असे आत्ताच जाहीर (प्रोजेक्ट) केले आहे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:05 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप ७८ तर काँग्रेस ६६ जागांवर पुढे आहे.

बर्‍याच महिन्यांनंतर अशी निवडणुकींमध्ये चुरस बघायला मिळत आहे.

विजय रूपाणी राजकोट (पश्चिम) मधून पिछाडीवर आहे.

काँग्रेसने १९८५ मध्ये १४९ जागा जिंकल्या होत्या. त्याखालोखाल २०१२ मधील ६१ जागा ही काँग्रेसची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. या क्षणी १४८ जागांचे कल हाती आले आहेत. त्यापैकी काँग्रेस ६८ जागांवर आहे. म्हणजे ही काँग्रेसची ३२ वर्षातील सर्वोत्तम कामगिरी असे म्हणायला हरकत नसावी.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:08 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप आणि काँग्रेस दोघेही ७६ जागांवर पुढे आहेत.

हे लिहिता लिहिता काँग्रेस ८० जागांवर तर भाजप ७८ जागांवर पुढे आहे.

रंगीला रतन's picture

18 Dec 2017 - 9:08 am | रंगीला रतन

०९:०८ टाईम्स नाऊ वर BJP ७७ CONG ७९.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:09 am | गॅरी ट्रुमन

आता काँग्रेस ८२ तर भाजप ७७ जागांवर पुढे आहे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:10 am | गॅरी ट्रुमन

आता काँग्रेस ८४ आणि भाजप ७६ जागांवर पुढे आहे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:12 am | गॅरी ट्रुमन

आता काँग्रेस ८६ आणि भाजप ७४ जागांवर पुढे आहे.

भाजपचे माजी नेते यतीन ओझांनी काँग्रेस ९९ जागांवर पुढे आहे अशी बातमी दिली आहे.

मोदी-शहांना हा मोठा धक्का असे म्हणायला हरकत नसावी

जेसीना's picture

18 Dec 2017 - 9:18 am | जेसीना

महाराष्ट्रात लवकरच इलेक्शन होणार ह्याची चाहूल दिसतेय .............. पण नक्कीच सुरेख निकाल , दिल गार्डन गार्डन होतेय
ABP माझा
भाजप ७७
काँग्रेस ८८
इतर 4

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:20 am | गॅरी ट्रुमन

आता काँग्रेस-८६ आणि भाजप-- ७७ जागांवर पुढे आहे.

सौराष्ट्रमधून काँग्रेस ३३ तर काँग्रेस १७ जागांवर पुढे आहे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:22 am | गॅरी ट्रुमन

भाजपला आता थोडीफार आशा असेल तर ती मध्य गुजरातमधून. तिथे अजून १० जागांचे कल हाती यायचे आहेत. सौराष्ट्रामधून सगळ्या जागांचे कल आले आहेत. दक्षिण गुजरातमधून जवळपास सगळ्या जागांचे कल आले आहेत.

रंगीला रतन's picture

18 Dec 2017 - 9:23 am | रंगीला रतन

९:२२ लाईव्ह मिंट वर BJP ९१ CONG ७९.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:23 am | गॅरी ट्रुमन

आता काँग्रेस- ८४ आणि भाजप- ८० असे यशवंत देशमुखांनी जाहिर केले आहे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:23 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप- ८४ आणि काँग्रेस-८२

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:24 am | गॅरी ट्रुमन

या रोलरकोस्टरवरून छत्तिसगड निवडणुकांची आठवण येत आहे.

रंगीला रतन's picture

18 Dec 2017 - 9:26 am | रंगीला रतन

मला मुंबई महानगर पालिकेची.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:24 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप- ८६ आणि काँग्रेस-८१

जेसीना's picture

18 Dec 2017 - 9:25 am | जेसीना

अजूनही भाजप जिंकेल असा वाटते ... पण टक्कर झालीये ह्याचे इतर राज्यात नक्कीच परिणाम दिसतील
भाजप ८८
काँग्रेस ८२
इतर 2

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:26 am | गॅरी ट्रुमन

आता विजय रूपाणी आघाडीवर आहेत.

अभ्या..'s picture

18 Dec 2017 - 9:26 am | अभ्या..

लैच भारी निकाल वाटायलाय, स्वयंघोषित पंडितांची भाकिते चुकल्याचा आनंद आहे,
काँग्रेस पुढे आल्याचा आनंद नाही पण भाजपाच्या माजूरडेपणाला चाप लागेल ह्याचा जास्त आनंद आहे.
बहुधा मोदी शहा पेक्षा रुपाणीमुळे इलेक्शन फसली हा युक्तिवाद लौकर यावा ही अपेक्षा.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:27 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप ८७ आणि काँग्रेस ८३ जागांवर पुढे आहे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:28 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप ८८ आणि काँग्रेस ८२

जेसीना's picture

18 Dec 2017 - 9:29 am | जेसीना

भाजप ८८
काँग्रेस ८२
इतर १

अवांतर : मला शेअर बाजार गडगडलाय त्याचा टेन्शन आलाय , उगाच नको तिथे गुंतवणूक करून ठेवलीये :(

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:30 am | गॅरी ट्रुमन

काँग्रेस नेते शक्तीसिंग गोहिल मांडवीमधून मागे. तर भाजपचे जितू वाघानी भावनगरमधून मागे. गोधरामधून भाजप पुढे

आता भाजप ८८ आणि काँग्रेस ८२

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:30 am | गॅरी ट्रुमन

आता उपमुख्यमंत्री नितीन पटेल मेहसाणामधून पुढे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:31 am | गॅरी ट्रुमन

अजून ११ जागांवरील कल हाती यायचे आहेत. त्या सगळ्या जागा दक्षिण आणि मध्य गुजरातमध्ये आहेत.

आता भाजप ८९ आणि काँग्रेस ८० जागांवर पुढे

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Dec 2017 - 9:32 am | डॉ सुहास म्हात्रे

गुजरातमध्ये सीसॉ चालले आहे ! भाजप/काँग्रेस्/इतर : ९०/८०/२

मध्ये एकदा भाजपला हार्ट अ‍ॅटॅक येण्यासारखी परिस्थिती झाली होती ! :)

हिमाचलमध्ये भाजपचा विजय जवळजवळ नक्की आहे : ३८/२६/२

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:33 am | गॅरी ट्रुमन

आता १७४ जागांवरील कल हाती आले आहेत. भाजप ९० तर काँग्रेस ८१ जागांवर पुढे आहे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:33 am | गॅरी ट्रुमन

कलांचे रिव्हर्सल होत आहे. आता भाजप ९६ आणि काँग्रेस ८२ जागांवर पुढे आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Dec 2017 - 9:34 am | डॉ सुहास म्हात्रे

भाजप प्रथमच अर्ध्यापेक्षा जास्त पुढे : ९६/८३/२

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:34 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप ९५ आणि काँग्रेस ८४

जेसीना's picture

18 Dec 2017 - 9:35 am | जेसीना

भाजप ९६
काँग्रेस ८२
इतर ३

आलेसुद्धा असतील काही जणांना हार्ट अ‍ॅटॅक :)

रंगीला रतन's picture

18 Dec 2017 - 9:36 am | रंगीला रतन

०९:३४ टाईम्स नाऊ वर BJP ९६ CONG ८३.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:36 am | गॅरी ट्रुमन

छत्तिसगड विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-काँग्रेस यात तीन वेळा कलांचे वरखाली झाले होते त्याची आठवण झाली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Dec 2017 - 9:37 am | डॉ सुहास म्हात्रे

९८/८५/१

रंगीला रतन's picture

18 Dec 2017 - 9:40 am | रंगीला रतन

कहितरि चुकतय...९८+८५+१ = १८४

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Dec 2017 - 9:45 am | डॉ सुहास म्हात्रे

काहीतरी गडबड झालेली दिसत आहे. एक आकडा लिहून दुसरा वाचायला जावे तर तो बदललेला दिसतोय ! :)

आता ९५/८४/३

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Dec 2017 - 9:46 am | डॉ सुहास म्हात्रे

लगेच ९३/८६/३ ! :)

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:38 am | गॅरी ट्रुमन

सौराष्ट्रमध्ये भाजपने पिछाडी कमी केली आहे. १५ मिनिटांपूर्वी काँग्रेस ३५ जागांवर पुढे होती आता २९ जागांवर पुढे आहे.

आता भाजप-- ९८ आणि काँग्रेस ८० जागांवर पुढे

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:39 am | गॅरी ट्रुमन

हिमाचलमध्ये भाजप ४१ आणि काँग्रेसमध्ये २५ जागांवर पुढे

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:40 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप ९६ आणि काँग्रेस ८२ जागांवर पुढे

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:43 am | गॅरी ट्रुमन

काँग्रेसने पाटीदार भागात मोठे यश मिळवलेले दिसत आहे. पण भाजपने वनवासी भागात मोठे यश मिळवलेले दिसत आहे.

आता भाजप ९७ आणि काँग्रेस ८१

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:43 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप ९४ आणि काँग्रेस ८४.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:46 am | गॅरी ट्रुमन

पाटीदारांची मते मिळवायच्या मागे काँग्रेस गेली पण त्यांनी त्यांचे स्वतःचे निष्ठावान मतदार गमावलेले दिसत आहेत. जर काँग्रेसने आपले हक्काचे मतदार राखले असते आणि वर पाटीदार मते घेतली असती तर काँग्रेसला मोठा विजय मिळाला असता असे म्हटले जात आहे.

मणीशंकर अय्यर यांचे विधान भावले का?

भाजप--- ९४ आणि काँग्रेस-८४

आता नितीन पटेल मागे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:49 am | गॅरी ट्रुमन

मणीशंकर अय्यर यांचे विधान भावले का?

भावले नाही भोवले :)

इतक्या रोलरकोस्टर निवडणुका चालू असताना अशा चुका व्हायच्याच :)

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:48 am | गॅरी ट्रुमन

आता मुख्यमंत्री विजय रूपाणी मागे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:52 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप ९३ आणि काँग्रेस ८५

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:55 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप ९२ आणी काँग्रेस ८५.

जेसीना's picture

18 Dec 2017 - 9:56 am | जेसीना

९८/८०/४

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:57 am | गॅरी ट्रुमन

कुठच्या चॅनेलवर?

टाईम्स नाऊवर ९२/८५/५ दाखवत आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:58 am | गॅरी ट्रुमन

कुठच्या चॅनेलवर?

टाईम्स नाऊवर ९२/८५/५ दाखवत आहेत.

जेसीना's picture

18 Dec 2017 - 9:57 am | जेसीना

हे ओखि वादळासारखा झालाय ... एकदा महाराष्ट्राकडे एकदा गुजरातकडे

जेसीना's picture

18 Dec 2017 - 9:59 am | जेसीना

गॅरी भाऊ
ABP माझा

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 9:59 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप ९५, काँग्रेस ८३ आणि इतर ४.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Dec 2017 - 10:00 am | डॉ सुहास म्हात्रे

टाईम्स नाऊवर एका भूतपूर्व इसींनी मोठी चपखल व अर्थपूर्ण टिप्पणी केली:

गुजरात निवडणूकीत इव्हिएमची जीत झाली ! (पक्षी : अटीतटीची लढत झाल्याने इव्हिएमबद्दलच आरोप निकालात निघाले आहेत !)

जेसीना's picture

18 Dec 2017 - 10:00 am | जेसीना

गॅरी भाऊ
NDTV
भाजप १०५
काँग्रेस ७६
इतर १

ABP माझा
भाजप ९८
काँग्रेस ८०
इतर ४

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 10:01 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप ९४, काँग्रेस-८५.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 10:03 am | गॅरी ट्रुमन

आता उत्तर गुजरातमध्ये भाजप १७ तर कोंग्रेस १४ जागांवर पुढे दिसत आहे.

हे लिहिता लिहिता भाजप ९८ आणि काँग्रेस ८२.

पूर्ण निकाल येईपर्यंत मला जागेवरून उठू द्यायचे नाही असे गुजरातच्या मतदारांनी ठरवलेले दिसते :) :)

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 10:04 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप ९९ आणि काँग्रेस ८१.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 10:05 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप १०० आणि काँग्रेस ८०.

उत्तर गुजरातमधील कल बदललेले आहेत.

जेसीना's picture

18 Dec 2017 - 10:06 am | जेसीना

१०५/७४/३

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 10:07 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप १०३ आणि काँग्रेस ७७.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 10:08 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप १०१ आणि काँग्रेस ७९.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 10:08 am | गॅरी ट्रुमन

आता नितीन पटेल आघाडीवर.

आयुष्यात पहिल्यादाच असे निकाल अनुभवते आहे , लगेच बदल झालेले दिसत आहेत
१०४/७६/२

रंगीला रतन's picture

18 Dec 2017 - 10:10 am | रंगीला रतन

१०:०९ लाईव्ह मिंट वर BJP १०८ CONG ७३.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 10:13 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप १०० आणि काँग्रेस ८०.

जेसीना's picture

18 Dec 2017 - 10:14 am | जेसीना

१०६/७४/२

श्रीगुरुजी's picture

18 Dec 2017 - 10:14 am | श्रीगुरुजी

गुजरात -

भाजप १०६, काँग्रेस - ७४ (एबीपी)

हिमाचल -

भाजप ४०, काँग्रेस २४

दोन्ही राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही.

रंगीला रतन's picture

18 Dec 2017 - 10:21 am | रंगीला रतन

दोन्ही राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही.
गुजरात च्या बाबतित अंशतः मान्य. हिमाचल मध्ये नसलेलि सत्ता मिळणे हे मोठे यशच म्हणावे लागेल.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 10:18 am | गॅरी ट्रुमन

आता ए.सी.निल्सनने भाजपला १०७ आणि काँग्रेस्ला ७१ जागांवर आघाडी आहे असे सांगितले आहे.

श्रीगुरुजी's picture

18 Dec 2017 - 10:19 am | श्रीगुरुजी

गुजरात -

भाजप १०६, काँग्रेस - ७३ (एबीपी)

हिमाचल -

भाजप ३९, काँग्रेस २५

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 10:22 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप १०३ आणि काँग्रेस ७५ जागांवर पुढे.

हिमाचलमध्ये भाजप ३९ आणि काँग्रेस २५ जागांवर पुढे

ईव्हिम हॅकिंग चालू झाली वाटते :)
१०५/७४/3

समाधान राऊत's picture

18 Dec 2017 - 10:26 am | समाधान राऊत

१००-१०५ वाले हात वर करा....

श्रीगुरुजी's picture

18 Dec 2017 - 10:26 am | श्रीगुरुजी

गुजरात -

भाजप १०३, काँग्रेस - ७६ (एन्डीटीव्ही)

हिमाचल -

भाजप ४१, काँग्रेस २२

एन्डीटीव्हीच्या दाव्यानुसार आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार काँग्रेसला ४९% व भाजपला ४४% मते मिळाली आहेत. काँगेसला तब्बल ५% जास्त मते मिळूनसुद्धा मागे कशी हे गूढच आहे.

प्रसाद_१९८२'s picture

18 Dec 2017 - 10:28 am | प्रसाद_१९८२

सध्या कॉंग्रेसला ज्या काही ७३ जागा मिळताना दिसत आहेत त्याचे श्रेय राहुल गांधींना द्यायला टिव्हीवरच्या चर्चेत बसलेल्या काही तथाकथित पुरोगामी वक्त्यांनी सुरु केलेय. मात्र त्यांच्या हे लक्षात येत नाही की, २०१२ पेक्षा ज्या काही वाढीव जागा कॉंग्रेसला मिळत आहेत त्या हार्दीक, अल्पेश व जिग्नेश या तिकडींने पाटीदार व इतर लोकांना भाजपा पासून फोडलेय त्याचा तो परिणाम आहे.

सुबोध खरे's picture

18 Dec 2017 - 10:29 am | सुबोध खरे

निवडणूक आयोगाच्या वेब साईट वर आता (१०. ३०) जाहीर झालेले निकाल १६७ आहेत त्यात भाजप ९७ आणि काँग्रेस ६४ दाखवत आहेत. याचा अर्थ आता भाजपचे सरकार आले आहे असे म्हणता येईल
बाकी सर्व मोह माया आहे

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 10:29 am | गॅरी ट्रुमन

आता गुजरातमध्ये भाजप १०७, काँग्रेस ७३ तर हिमाचलमध्ये भाजप ४० आणि काँग्रेस २२ जागांवर पुढे

श्रीगुरुजी's picture

18 Dec 2017 - 10:32 am | श्रीगुरुजी

भांडवली बाजार सकाळी जवळपास ७०० अंकांनी (अडीच टक्क्यांनी) कोसळला होता. आता बाजार १७१ अंकांनी वर आहे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 10:35 am | गॅरी ट्रुमन

अरे अरे डे- ट्रेडिंग मध्ये इंडेक्समधले शेअर्स घ्यायला हवे होते सकाळी :) माझी बस चुकली म्हणायची.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 10:34 am | गॅरी ट्रुमन

गुजरातमधील दोन निकाल आले आहेत.

जमालपूर-खाडियामधून काँग्रेसचा तर एलीसब्रीजमधून भाजपचा विजय झाला आहे. हे दोन्ही मतदारसंघ अहमदाबाद शहरात आहेत. जमालपूर-खाडियाविषयी मी मतमोजणीपूर्व धाग्यात लिहिले होते.

लाल टोपी's picture

18 Dec 2017 - 10:34 am | लाल टोपी

गुजरात मध्ये सध्या ५ अन्य आघाडीवर आहेत ते कोण? काही माहिती आहे का?

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 10:39 am | गॅरी ट्रुमन

विजय रूपाणी आणि नितीन पटेल दोघेही आघाडीवर.

आता गुजरातमध्ये भाजप १०५ आणि काँग्रेस ७५. तर हिमाचलमध्ये भाजप ४२ आणि काँग्रेस २२.

श्रीगुरुजी's picture

18 Dec 2017 - 10:41 am | श्रीगुरुजी

या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील १९८५ मधील विधानसभा निवडणुकीची आठवण झाली.

डिसेंबर १९८४ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने देशात तब्बल ४१४ जागा जिंकल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातील ४८ पैकी तब्बल ४३ जागांचा समावेश होता. त्यानंतर जेमतेम ३ महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणुक झाली. लोकसभा निवडणुकीतील अपयशाचा धडा घेऊन पवारांनी विरोधी पक्षांची मोट बांधली. पवारांच्या अध्यक्षतेखालील तत्कालीन समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, भाजप व शेकाप यांनी एकत्र येऊन पुलोद स्थापन करून काँग्रेसविरूद्ध एकत्रित निवडणुक लढवून मतांची फाटाफूट टाळायचा प्रयत्न केला.

त्या निवडणुकीचे निकाल यायला सुरूवात झाल्यानंतर सुरवातीस पुलोदचे उमेदवार आघाडीवर होते. नाशिकमधील सर्व १४ जागांवर पुलोद उमेदवारांनी विजय मिळविला. निकालांचा कल बघून काँग्रेसच्या गोटात घबराट पसरली होती. शेवटी संध्याकाळी मतमोजणी संपल्यानंतर २८८ पैकी काँग्रेसला १६२ जागा मिळून बहुमत मिळाले. पुलोद गटाला १०४ जागा मिळाल्या होत्या (समाजवादी काँग्रेस ५६, जनता पक्ष २०, भाजप १६ आणि शेकाप १२). लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर काँग्रेसला कमीतकमी २२५ जागा मिळायला हव्या होत्या. परंतु त्यांना १६२ जागांवर समाधान मानावे लागले.

आताची स्थिती -

गुजरात -

भाजप १०७, काँग्रेस - ७४ (एबीपी)

हिमाचल -

भाजप ४२, काँग्रेस २३

रंगीला रतन's picture

18 Dec 2017 - 10:43 am | रंगीला रतन

मगाशी १२५ अंकानी गडगडलेल्या सेन्सेक्सनी अता १८१ अंकांनी उसळि घेतलि आहे.

श्रीगुरुजी's picture

18 Dec 2017 - 10:43 am | श्रीगुरुजी

भाजप १०८, काँग्रेस ७३

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 10:45 am | गॅरी ट्रुमन
गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 10:54 am | गॅरी ट्रुमन

गुजरातमध्ये आता भाजप १०६ आणि काँग्रेस ७४ . हिमाचलमध्ये भाजप ४२ आणि काँग्रेस २३.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी विजयी. हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांचे घर असलेल्या विरमगाममधून भाजपच्या डॉ. तेजश्री पटेल पुढे.

श्रीगुरुजी's picture

18 Dec 2017 - 10:55 am | श्रीगुरुजी

भाजप १०५, काँग्रेस ७६

श्रीगुरुजी's picture

18 Dec 2017 - 10:57 am | श्रीगुरुजी

एलिस ब्रिज मधून भाजपचे उमेदवार राकेश शाह तब्बल ९२,४४८ मतांनी विजयी.

हिमाचल प्रदेश: भाजप ४०, काँग्रेस २५

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 11:29 am | गॅरी ट्रुमन

एलीसब्रिज मतदारसंघ अहमदाबाद शहरात आहे. किंबहुना साबरमती नदीवर ५-६ पूल आहेत त्यापैकी एक एलिसब्रिज आहे. त्या पूलाच्या नावावरून या मतदारसंघाचे नाव आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. १९९३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे हरेन पंड्या पहिल्यांदा निवडून गेले होते. त्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून भाजपने ७५% पेक्षा जास्त मते घेतली आहेत.

एलिसब्रिजबरोबरच भाजपचे घाटलोडिया, नारणपुरा (पूर्वीचा सरखेज), मणीनगर हे अहमदाबाद आणि परिसरामधील इतर बालेकिल्ले आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 10:59 am | गॅरी ट्रुमन

या निवडणुकांची मतमोजणी बघता गुजरातमधील २००७ च्या निवडणुकांच्या मतमोजणीचीही आठवण झाली. हिरव्या देशातून बघितलेली मी ती शेवटची मतमोजणी होती आणि पूर्ण रात्र जागून निकाल बघितले होते हे लक्षात आहे. त्यावेळीही काही काळ काँग्रेस भाजपच्या पुढे होती पण मार्जिन यावेळेइतके नव्हते. यावेळी एक वेळ अशी आली होती की काँग्रेस भाजपपेक्षा १२ जागांनी पुढे होती. २००७ मध्ये हा फरक ५ पेक्षा जास्त कधीच नव्हता.

काँग्रेस ८६ आणि भाजप ७४ जागांवर पुढे बघून माझ्याही काळजाचा ठोका चुकला होता :) :)

अजूनही मतमोजणी पूर्ण झालेली नाही. नक्की निकाल काय लागतात हे बघायचे. मी अंदाज व्यक्त केला होता १३० ते १३५. बर्‍याचदा निकालांचे अंदाज व्यक्त करताना मला काय होईल असे वाटते त्याबरोबरच काय व्हावे असे वाटते याचाही प्रभाव नकळत पडतोच. पुढच्या वेळी ती काळजी घ्यायला हवी. मलाही हा धडा मिळालाच आहे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 11:03 am | गॅरी ट्रुमन

आता भाजप ११० आणि काँग्रेस ७० जागांवर पुढे आहे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 11:07 am | गॅरी ट्रुमन

रिपब्लिक चॅनेलवर म्हटले जात आहे की भाजपने २०१२ पेक्षा जास्त (४७.८५% पेक्षा जास्त) मते मिळवली आहेत. तसे असेल तर हे बर्‍यापैकी इन्क्रेडिबल (मराठी शब्द?) आहे.

२००२ मध्ये भाजपने ४९.८५%, २००७ मध्ये ४९.१२% तर २०१२ मध्ये ४७.८५% मते मिळवली होती. जर १५ वर्षांपर्यंत भाजप ४८-४९% मते राखत असेल तर ते नक्कीच काहीतरी वेगळे आहे हे नक्कीच.

हे लिहितालिहिता भाजप १०७ आणि काँग्रेस ७२.

हतोळकरांचा प्रसाद's picture

18 Dec 2017 - 12:08 pm | हतोळकरांचा प्रसाद

भाजपाला गुजरातमध्ये ४९.३% तर हिमाचलमध्ये ४८.५% वोट शेअर दिसत आहे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 12:12 pm | गॅरी ट्रुमन

अजून मतमोजणी पूर्ण व्हायला वेळ आहे. जर ४९.३% इतकीच मते कायम राहिली तर २००७ पेक्षा जास्त मते मिळाली असतील. २००७ मध्ये ११७ जागा होत्या. या क्षणी भाजप ११० जागांवर पुढे आहे. ११७ पेक्षा काही जागा कमी पडल्या तर त्या मतांचे डिस्ट्रीब्युशनमुळे होईल.

पण इतक्या वर्षांनंतरही ४९% पेक्षा जास्त मते मिळवणे सोपे नाही.

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 11:11 am | गॅरी ट्रुमन

मागच्या दोन मिनिटात कल बदलले आहेत.

गुजरातमध्ये भाजप १०१ आणि काँग्रेस ७८ जागांवर पुढे आहे.

हिमाचलमध्ये भाजप ४३ आणि काँग्रेस २१ जागांवर पुढे आहे.

आता गुजरातमध्ये १०२/७७ आणि हिमाचलमध्ये ४४/२०.

कलंत्री's picture

18 Dec 2017 - 11:12 am | कलंत्री

जीएसटी, नोटाबंदी असे लोकविरोधधी निर्णय करुनही मतदारांनी मोदींना स्विकारले आहे असे दिसत आहे.

राहुल गांधींना अजूनही बरीच मजल गाठायची आहे असे दिसते.

मोदींचा महाविजय असे म्हणता येईल का?

नाखु's picture

18 Dec 2017 - 12:03 pm | नाखु

जीएसटी, नोटाबंदी असे लोकविरोधी निर्णय करुनही

हे निश्चित लोकांना विरोधी वाटले की तुम्ही काढलेला निष्कर्ष आहे?

मतदारांनी मोदींना स्विकारले आहे असे दिसत आहे.

उपरोक्त सर्व बाबी सोडल्या तर इतर काही सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या कामांचा प्रभाव असेल असं अजिबात वाटत नाही का?

कुठलेही शिक्के न मारता उघड्या डोळ्यांनी बघणारा अडाणी नाखु

श्रीगुरुजी's picture

18 Dec 2017 - 11:15 am | श्रीगुरुजी

एबीपीनुसार

गुजरात -
भाजप १०२, काँग्रेस ७८

- काँग्रेस २०१२ मधील जिंकलेल्या २६ जागांवर मागे
- पटेलबहुल ३७ मतदारसंघांपैकी २१ जागांवर भाजप पुढे
- झी च्या वृत्तानुसार दोन्ही पक्षांना ४६% मते आहेत. परंतु भाजप अंदाजे २४ जागांवर पुढे आहे.

हिमाचल प्रदेश -

भाजप ४४, काँग्रेस २०, इतर ४

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 11:30 am | गॅरी ट्रुमन

गुजरातः भाजप-१०२, काँग्रेस-७७
हिमाचलः भाजप-४५, काँग्रेस-१९

प्रसाद_१९८२'s picture

18 Dec 2017 - 11:34 am | प्रसाद_१९८२

हिमाचल प्रदेश मध्ये
पहिला निकाल कॉंग्रेसच्या बाजूने आला आहे.

नाही हा मोदींचा महाविजय बोलताच येणार नाही
सध्या जनतेकडे मोदींशिवाय कोणताच पर्याय नाहीये म्हणून भाजप निवडून येणार हे सर्वमान्य आहे , मोदींनी हे निवडणूक स्वतःहून खूप महत्वाची केली कारण त्यांना आमदारांची संख्या वाढवायची होती जे होताना दिसत नाहीये त्यामुळे हा मोदींचा विजय न म्हणता नैतिकदृष्ट्या त्यांचा एक प्रकारे पराभव झालेला आहे असेच म्हणता येईल
सध्या तरी काँग्रेस हा पर्याय आहे हे जनतेने पूर्णपणे अमान्य केले आहे , राहुल खूप मेहनत घेतोय पण त्यांचाच पक्षातले काही अतिहुशार व्यक्ती जसे दिग्विजय, मणिशंकर आणि आता मनमोहन मध्ये मध्ये पाय घालत आहेत , जसे मोदींनी स्व पक्षातले असे घोडे स्वतः लगाम घालून चूप बसवले तसाच काहीतरी राहुल ला करावे लागणार आहे नाहीतर काँग्रेस साठी येणार काळ कधीच सोपा नसणार आहे.
पण ह्या निवडणुकीचे परिणाम लुवकाराचं महाराष्ट्रात दिसून येतील असा मला तरी वाटतेय , शिवसेना नक्कीच ह्या संधीच्या शोधात होती (जसा त्यांनी आधीच पूर्वसूच दिली होती कि सत्तेतून बाहेर पडू )

श्रिपाद पणशिकर's picture

19 Dec 2017 - 12:31 am | श्रिपाद पणशिकर

शिवसेना नक्कीच ह्या संधीच्या शोधात होती (जसा त्यांनी आधीच पूर्वसूच दिली होती कि सत्तेतून बाहेर पडू )
68 and Counting.....

गॅरी ट्रुमन's picture

18 Dec 2017 - 11:41 am | गॅरी ट्रुमन

गुजरातः भाजप-१०५, काँग्रेस-७४
हिमाचल: भाजप-४५, काँग्रेस-१९

काँग्रेसचे अर्जुन मोडवाढीया पोरबंदरमधून पराभूत झाले आहेत.