चीनचा भारतावर हल्ला

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
14 Dec 2017 - 11:49 pm

चीनचा हल्ला
चीनने एका युद्धात आपल्यावर हल्ला केलेलाच आहे. आपण तो अद्याप विसरू शकलेलो नाही. आता यामधे नव्या अस्त्रांची भर पडली आहे. ती म्हणजे संपर्क माध्यमे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने मोबाईलमधल्या धोकादायक अशा जवळ जवळ ४२ सॉफ्टवेयर प्रॉग्रॅमची यादी जाहीर केली आहे. त्यांच्यामते हे प्रॉग्रॅम मोबाईलमधील माहिती आपल्या नकळत चोरतात. त्यामधे आपले पत्ते, मोबाईल नंबर्स असतात. व्हॉट्स अप किंवा मेलवरील आपले संभाषण असू शकते. या गोष्टी सर्वरकडे पाठवल्या जातात.
ashutoshjog@yahoo.com
कोणतेही अ‍ॅप्स डाऊनलोड केले आणि त्याच्या अटी (T & C) मान्य केल्या की ते अ‍ॅप्लिकेशन मोबाईलमधली आपली माहिती वाचू शकते. आपला कॅमेरा वापरू शकते, लोकेशन माहिती होते.

अनेकदा या अ‍ॅप्लिकेशनचे काम पडद्यामागे चालते. यूजरने ते मुद्दाम सुरु करण्याची गरज नसते. संरक्षण मंत्रालयाच्या मते ही अ‍ॅप्लिकेशन्स ताबडतोब उडवून टाकावीत. त्यांना आपल्या मोबाईलमधे थारा देऊ नये. यामधे यूसी ब्राउझर आणि यूसी न्यूज यांचा समावेश आहे. यूसी ब्राउझर हा सर्व मोबाईल्सवर, सर्व ओ.एस. वर चालणारा प्रॉग्रॅम आहे. उत्तम इंटरफेस आणि कमी मेमरी व्यापणे यामुळे पूर्वी तो लोकप्रिय होता. ब्राउझर ही गोष्ट आपण खूपच महत्त्वाच्या कामांसाठी वापरतो. बँक, बिल भरणे, मेल्स वाचणे. इतर कुठल्याही मित्रापेक्षाही जीवाचा सखा. त्याला आपल्या सगळ्या हालचाली, आपल्या आवडत्या साइट्स माहीत असतात.

मग हा ब्राऊझर विश्वासार्ह नको का ?
प्ले-स्टोअरवरची प्रत्येक गोष्ट डाऊनलोड केलीच पाहीजे का !

तर चीनने सॉफ्टवेयरमधून भारतावर असाही हल्ला केलेला आहे. याहून घातक म्हणजे यात काही हार्डवेयरही सामील आहेत. अनेक दूरसंचार उपकरणे सुद्धा चीनसाठी हेरगिरीची कामे करतात असा संरक्षण मंत्रालयाचा दावा आहे.

या पुढे प्रत्येकाने अगदी ताकही फुंकून पिण्याची सवय लावून घेतली पाहीजे !

सुब्रमण्यम स्वामी यांनी कोणते इशारे दिले होते, कोणत्या कंपन्या संशयाच्या भोवर्‍यात आहेत आणि का आहेत तेही कमेंटमधे पाहू.

ashutoshjog@yahoo.com

धोरणविचार

प्रतिक्रिया

आशु जोग's picture

14 Dec 2017 - 11:52 pm | आशु जोग

स्वान टेलिकॉम, हुवई, शाओमी या त्या कंपन्या आहेत !

आशु जोग's picture

14 Dec 2017 - 11:53 pm | आशु जोग

अनेक मोबाईल कंपन्यांचे सर्वर्स चीनमधे असतात. त्यांची छाननी, तपासणी भारतात करता येत नाही.

सुमीत's picture

15 Dec 2017 - 12:14 pm | सुमीत

वनप्लस ची चोरी गेल्या दहा महिन्यात दोनदा पकडली गेली, पहिल्यांदा बेंचमार्क आणि नंतर फोन मधली माहिती चिनी सर्वर वर साठवणूकीची.
पुढच्या मे महिन्यात युरोप मधे GDPR सुरु झाले की अश्या बर्याच कंपन्या उघड्या पडतील.

आशु जोग's picture

15 Dec 2017 - 12:37 pm | आशु जोग

यासंबंधीचा काही तर दुवा असेल तर द्या ना

पगला गजोधर's picture

15 Dec 2017 - 2:07 pm | पगला गजोधर

माझा डाऊट....
जगामध्ये मोबाईल (आयफोन सुद्धा),टॅब लॅपटॉप इ डिव्हाईस ,
मॅन्युफॅक्चर करणारे देश आणि त्यांचं बाजारपेठतील % हिस्सा
कळेल का ? उदा मला मोबाईल घ्यायचाय, ज्यातील एकही पार्ट(कितीही छोटा व नगण्य असला तरीही) चीन मधे निर्माण झालेला नकोय...
कोणता मोबाईल घेऊ....
असेंबल इन थायलंड वैगरे प्रकारातील असा नकोय, कारण चिप ही मेड इन चायना असू शकते.....

सुमीत's picture

15 Dec 2017 - 3:14 pm | सुमीत

Blackberry, up to Z10 and Z30. Current models are made by some Chineese.
Samsung, few models are being built in India, few parts from Taiwan and major from Korea

मराठी कथालेखक's picture

15 Dec 2017 - 5:35 pm | मराठी कथालेखक

मी तर कबूतरं पाळायचं म्हणतोय.. पण एक शंका आहे, ती तरी भारतीयच असतील ना ?