काथ्याकूट

भीमराव's picture
भीमराव in काथ्याकूट
14 Dec 2017 - 9:25 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,
रामराम,
कस्काय बरय ना?
सहज विचार करत होतो कि बाबा आपल्याला मिसळपाव का आवडतं? आसं काय आहे ईथं जे सारखं ईथ यायला भाग पाडतं?
वाचायला मिळणारे वैविद्ध्यपुर्ण लेख आणि ईथ होणाऱ्या स्पर्धा यांच्यासोबतच ईथ अजुन १ गोष्ट आहे ती म्हणजे काथ्याकूट. जुण्या काळापासुन आपल्या लोकांना लष्कराच्या भाकरी भाजणे, स्वतःचच खरं करणे, वाद घालने याचे लै लै नाद, त्याच नादाचं हक्काचं आपलं हे व्यासपीठ, परंतु काथ्या कुटत असताना काही लोक्स खंडीच्या वरणात लघुशंका करायला नटुनच बसलेले असतात.
या काथ्याकुटातुन होणारे स्कोर सेटलींग व फाटे फोडणे सोडलं तर हा विभाग कडक टिआरपीचा आहे,

तर नमनाला एवढ तेल सांडुन मला फक्त इतकच विचारायच/सांगाय/सुचवायच होतं की,

आपण दिवसांचे बंधन देऊन काथ्याकूट महाचर्चा ठेवायची का?
विषय ठरवुन द्यायचा,
सहभागी सदस्य सुद्धा आधीच ठरवायचे,
दिवसांच(ठराविक काळाने चर्चा बंद व्हावी) व शब्दांचं प्रतीसादासाठी बंधन(फापटपसारा टाळण्यासाठी) ठेवायचं,
आणि चर्चा-परिसंवाद-काथ्याकूट करायला आमंत्रीत करायचं,

या मधे वाचकाची भुमिकेत असलेल्या मिसळपावकऱ्यांना सुद्धा प्रतीसादाचा अधिकार ठेवता येईल पण ऊगाच पिंक टाकणारे कमी नाहीत,

तर मंडळी कस्काय मंग करायचा का बेत?

प्रतिक्रिया

मिपा चा झी आणि आजतक करायचा का?

पिवळा डांबिस's picture

15 Dec 2017 - 2:23 am | पिवळा डांबिस

थोड्क्यात बिर्याणीचं फोडणीच्या भातात रूपांतर करायचं.
अजिबात नको!!

जुण्या काळापासुन आपल्या लोकांना लष्कराच्या भाकरी भाजणे, स्वतःचच खरं करणे, वाद घालने याचे लै लै नाद, त्याच नादाचं हक्काचं आपलं हे व्यासपीठ, परंतु काथ्या कुटत असताना काही लोक्स खंडीच्या वरणात लघुशंका करायला नटुनच बसलेले असतात.

काही प्रमाणात खरं आहे. पण जर आविष्कारस्वातंत्र्याचा पुरस्कार करायचा असेल तर पॉर्न सहन करण्याची तयारीही हवी!
नसेल तर पान उलटण्याची सुविधा आहेच..

जुण्या काळातला,
पिवळा डांबिस

> आविष्कारस्वातंत्र्याचा पुरस्कार करायचा असेल तर पॉर्न सहन करण्याची तयारीही हवी!

पॉर्न सहन करावं लागतं ? बहुतेक लोक तर आनंदाने त्याचा उपभोग घेतात !