आधार कार्ड - अपडेट आणि नेमकी माहिती...

मोदक's picture
मोदक in काथ्याकूट
11 Dec 2017 - 1:40 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकर्स..

आधार कार्ड काढणे / न काढणे व वेगवेगळ्या ठिकाणी लिंक करणे याची भवती न भवती बरेच दिवस सुरू आहे.

३१ डिसेंबरला आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे आवश्यक आणि ३१ मार्च पर्यंत मोबाईल सर्विस प्रोव्हायडरला देणे आवश्यक ही बातमी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऐकली होती. यानंतर हळूहळू ओला आणि अ‍ॅमेझॉनचेही आधार कार्ड लिंक करा असे मेसेज येऊ लागले. बँक आणि मोबाईलच्या मेसेजला कधीच फाट्यावर मारले आहे. त्यामुळे ओला अ‍ॅमेझॉनचा प्रश्नच नाही.

याबाबत शोधाशोध करून फारसे हाती लागले नाही त्यामुळे इथे काथ्याकुटात धागा काढत आहे.

माझे वैयक्तिक विचाराल तर सरकारकडे / NIC कडे आपला महत्वाचा डेटा नीट सांभाळणारी व्यवस्था / यंत्रणा आहे का? व कितपत कार्यक्षम आहे याची मला वैयक्तीक शंका असल्याने अजूनही आधार कार्ड काढले नाहीये. अगदीच नाईलाज झाला तरच काढेन.

या धाग्यावर आधार कार्ड संबंधी महत्वाचे अपडेट, तुमची मते, तुमचा सरकारी यंत्रणेचा NIC चा अनुभव वगैरे वगैरे माहिती देऊन ज्ञानात भर टाकावी ही विनंती.

प्रतिक्रिया

एस's picture

11 Dec 2017 - 1:42 pm | एस

कॉलिंग साहनाजी.

माझे वैयक्तिक विचाराल तर सरकारकडे / NIC कडे आपला महत्वाचा डेटा नीट सांभाळणारी व्यवस्था / यंत्रणा आहे का?

बाकी विशेष काही माहीत नाही पण..... जगात कोणताही डेटा सेफ नाही, त्यामुळे कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल. तस हा विचार reliance jio चे कार्ड घेतांना कुणे केल्याचे आठवत नाही. असो...

त्यामुळे नाईलाज आहेच हे समजून घ्या आणि आधार कार्ड काढून घ्या.

babu b's picture

11 Dec 2017 - 2:59 pm | babu b

आधार पोस्ट बॅंक मोबाइलला लिंक करत आहे.

सुखीमाणूस's picture

11 Dec 2017 - 3:16 pm | सुखीमाणूस

तुम्ही बेहिशोबी मालमत्ता जमवलेली नाही ना?
काळे धंदे करत नाही ना?
असे लोक सुद्धा आधार कार्ड राखून आहेत.
मग तुम्ही कशाला आधार कार्ड काढायला आणि वापरायला नाही म्हणताय?
वैयक्तीक माहिती चा गैरवापर होण्याचा धोका आहे पण आपण सजग राहीलो तर धोक्यापासून स्वताला वाचवू शकतो.
आधीचे आणि आताचे सरकार आधार राबवितात म्हणजे निश्चित काही योजना आहेत.
आधीचे आणि आताचे विरोधक विरोध करतायत ते बहुधा राजकीय लाभासाठी

सहमत आहे पण हा सगळा प्रकार "यू आर गिल्टी अंटिल प्रूव्हन" प्रकारातला आहे म्हणून पटत नाही. नाईलाज झाला तर आधार कार्ड काढावेच लागेल.

दीपक११७७'s picture

11 Dec 2017 - 5:58 pm | दीपक११७७

जवळ जवळ सगळे कायदे अशेच आहेत you are guilty until proven. त्या साठीच तर राशन कार्ड , विविध ओळखपत्र असतात ई ई

इरसाल कार्टं's picture

11 Dec 2017 - 4:31 pm | इरसाल कार्टं

माझ्या रोजच्या कामात आधार कार्ड आणि पण कार्ड याचा फार संबंध येतो त्यानुसार काही माहिती शेअर करतो...
आता सर्वच बँकांनी आधार कार्ड शिवाय खाते उघडणे बंद केले आहे. काही दिवसांपासून पॅन कार्डही अनिवार्य झालेले आहे.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यापूर्वी दोन्हींवर असलेले नाव आणि जन्मतारीख तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. सुरुवातीला आधार कार्ड काढताना उडालेल्या प्रचंड गोंधळात बऱ्याच जणांच्या आधार कार्ड मध्ये चुका आहेत त्या आता आधार कार्ड अपडेट करून सुधारता येतील.
तसेच आपला मोबाईल नंबरही आधार कार्डशी लिंक करावा कारण त्याशिवाय कुठल्याही सरकारी योजनेचा अर्ज भरता येत नाही(बायोमेट्रिक्स चा उपयोग करून युजर आयडी बनवणे खूप जिकरीचे आहे).
जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर नवीन आधार कार्ड मिळवण्यासाठीही मोबाईल नंबर लिंक केलेला असणे आवश्यक आहे(लक्षात असुद्या, तुम्ही मोबाईल ऑपरेटरच्या गॅलरीत जाऊन मोबाईल नंबर लिंक करणे आणि आधार कार्ड सेंटरला जाऊन मोबाईल नंबर लिंक करणे या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत).
सर्वात महत्वाचे, तुम्ही मोबाईल गॅलरीत जाऊन मोबाईल नंबर अंधाराशी लिंक केला असल्यास ससंबंधित ऑपरेटरने त्यांच्या पेमेंट बँक मध्ये तुमचे खाते तुम्हाला न विचारता उघडले असल्यास तसे चेकवा. बऱ्याचदा आपण शेवटाला ज्या बँक खात्याशी आपला आधार नंबर लिंक करतो ते आपले प्राधान्य क्रमात वरचे खाते म्हणून निवडले जाते आणि सगळी अनुदाने त्याच खात्यावर जमा होण्याची शक्यता असते म्हणून या कंपन्या आपल्याला न विचारता असली खाती उघडत आहेत. हे एक- दोन विद्यार्थ्यांच्या बाबतीत आलेले आहे. यामुळे शिष्यवृत्ती तसेच इतर अर्ज भरताना अडचणी येतात.

आणखी जसे माहिती मिळेल तसे कळवीत जाईन.

नितिन थत्ते's picture

11 Dec 2017 - 5:52 pm | नितिन थत्ते

>>तुम्ही मोबाईल ऑपरेटरच्या गॅलरीत जाऊन मोबाईल नंबर लिंक करणे आणि आधार कार्ड सेंटरला जाऊन मोबाईल नंबर लिंक करणे या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत).

अरे बापरे !! दोन्ही करायचे आहे का?

मोबाईलला आधार कार्ड जोडणं सोपं आहे.
आधार कार्डला दिलेला फोन आता चालत नसेल तरच बदलायला जावं लागतं. मला चार महिने फेर्या माराव्या लागल्या. फोन नंबर तोच आणि सुरू असेल तर अन्य बदल आपण OTP ने करू शकतो.

संग्राम's picture

11 Dec 2017 - 8:01 pm | संग्राम

मोबाइल नंबर बदलला नसेल तरीही लिंक करावा लागेल काय ?
१ डिसेंबर पासून ऑनलाईन करणार होते त्याबद्द्ल विचारल तर माहीती मिळत नाही ..... Idea चे तर सारखे SMS येत आहेत

भाते's picture

12 Dec 2017 - 11:17 am | भाते

माझ्याकडे मुंबईत घेतलेले एमटीएनएलचे ट्रम्प कार्ड आहे. एमटीएनएलवाले त्यापध्दल काहीच बोलत नाहीत आणि डोंबिवलीमधले बीएसएनएलवाले मुंबईतल्या एमटीएनएलचे सिमकार्ड आधारला जोडायला तयार नाही आहेत. १ जानेवारी २०१८ पासून ऑनलाईन सोय होणार आहे असे वाचले. मीसुध्दा त्याचीच वाट पहात आहे.

खेडूत's picture

11 Dec 2017 - 4:32 pm | खेडूत

काढावं लागेल. जागोजागी विचारणा/अडवणूक होणार. असलेले बरे.

मराठी_माणूस's picture

11 Dec 2017 - 4:58 pm | मराठी_माणूस

ह्या संबंधातील अजुन एक प्रश्न

एक टीपिकल मध्यमवर्गीय कुटुंब. नवरा, बायको (गृहीणी), मुले (शिक्षण). सर्वांकडे मोबाईल. सर्व मोबाईल नवर्‍याच्या नावावर ऑफीस च्या corporate scheme मधुन
घेतलेले. आता हे मोबाईल प्रत्येकाच्या आधार कार्डाशी कसे जोडणार ?

नितिन थत्ते's picture

11 Dec 2017 - 5:50 pm | नितिन थत्ते

माझा व माझ्या आईचा मोबाईल माझ्या नावावर आहे म्हणून माझ्या आधारशी संलग्न केला आहे. बायकोचा व मुलीचा मोबाईल बायकोच्या नावे आहे म्हणून बायकोच्या आधारशी लिंक केला आहे. तुम्ही सगळे मोबाईल तुमच्या आधारशी लिंक करा.

मराठी_माणूस's picture

11 Dec 2017 - 8:13 pm | मराठी_माणूस

मोबाइल कं. च्या डेटा प्रमाणे मो. फोन हा कुटुंब प्रमुखाच्या नावावर आणि आधार वर मात्र ज्याच्या त्याच्या नावाशी निगडीत केला तर काही समस्या होईल का ?

पिशी अबोली's picture

11 Dec 2017 - 6:40 pm | पिशी अबोली

वडिलांच्या नावावर घेतलेल्या सिमला गावी नेटवर्क नाही, म्हणून इतकी वर्षं मी वापरत होते. आता ज्या प्रोव्हायडरचं सिम आहे, त्याची गॅलरीच आमच्या इथे नाही. बाबांना कुठे नेऊ फिंगरप्रिंट्स लावायला? म्हणून मी आज कस्टमर केअर मध्ये चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की मी माझा आधार क्रमांक देऊन लिंक केलं तर ते आपोआप माझ्या नावावर ट्रान्सफर होईल. विविध कंपन्यांचे एफएक्यू बघितले असता व्होडाफोन पेजवर या माहितीशी जुळणारी माहिती सापडली. थोडक्यात, कनेक्शन कुणाच्याही नावावर असो, जिच्याकडे सिम आहे आणि आधार पण आहे, अशी व्यक्ती तो नंबर आपल्या नावावर घेऊ शकते.

हा नंबर कोणत्याही स्कीममधला नसल्याने त्यासाठी काही विशेष करावं लागेल का माहीत नाही. पण असं काही नसावं.

तुषार काळभोर's picture

14 Dec 2017 - 11:26 am | तुषार काळभोर

मी हेच केलंय.
माझा नंबर कोणाच्या नावाने होता माहिती नाही (मोठा भाऊ किंवा वडील), वडिलांचा नंबर त्यांच्या नावाने होता, मी लोकल दुकानात जाऊन प्रत्येक 20 रुपये देऊन दोन्हीला माझं आधार लिंक केलं.

खेडूत's picture

11 Dec 2017 - 5:06 pm | खेडूत

एक बातमी..
आधार कार्डचा असाही उपयोग होईल असे कुणाला वाटले नसेल.
कॅप्टन बाजीराव रणगाडेचं बिंग आधार कार्डमुळे फुटले असते..:))

अभ्या..'s picture

11 Dec 2017 - 6:38 pm | अभ्या..

हायला. खत्तर्नाक स्टोरी.
येवूडू कुठे लागावा? ही स्टोरी त्यापेक्षा जबरदस्त आहे.
.
पोलीस टाइम्सात बातमी अशी आसती.
"प्रियकराने प्रेयसीच्या नवर्‍याची अशी कन्नी कटवली"
"आधारकार्डावरच्या ठशाने मात्र खरी ओळख पटवली"

नितिन थत्ते's picture

11 Dec 2017 - 5:48 pm | नितिन थत्ते

माझे आधार कार्ड बहुतांश ठिकाणी लिंक केले आहे. प्रॉव्हिडंट फंडाला लिंक झाले नाही कारण नाव/जन्मतारीख "यापैकी काहीतरी" मॅच होत नाही असे म्हणतात.

नितिन केशव थत्ते आणि नितिन थत्ते/थत्ते नितिन केशव याला मिसमॅच समजले जाणार असेल तर अवघड आहे.

जन्मतारीख सोडल्यास असा क्णता डेटा आधारवाल्यांकडे आहे जो मिसयुज होऊ शकतो.

ठाण्यात आधार कार्ड काढण्याचे केंद्र कोठे आहे? "आपल्याला काही कसली सबसिडी घ्यायची नाहीये" असे म्हणून वृद्ध आईचे आधारकार्ड काढले नव्हते. आता ते काढणे क्रमप्राप्त आहे. पण आधीची बरीच आधारकेंद्रे बंद झाली आहेत. :(

babu b's picture

11 Dec 2017 - 6:26 pm | babu b

ऑनलाइन अपाँटमेंट घेता येते

अनुप ढेरे's picture

13 Dec 2017 - 9:09 am | अनुप ढेरे

जन्मतारीख सोडल्यास असा क्णता डेटा आधारवाल्यांकडे आहे जो मिसयुज होऊ शकतो.

बायोमेट्रिक/रेटिना स्कॅन !!
आणि आता तुमचं ब्यांक बॅलंस, एलायसी, फोन, पत्ता, प्रॉपर्टी

मोदकराव, पौडफाटावगैरे विचार असेल तर पुढे काय बोलणार? स्थानिक लोक निरुत्साह दाखवतात आणि बांगलादेशींकडे रेशन,आधार कसे हा धागाही काढतील लोकं.
( एवढा सल्ला देईन की लिंक करा.)
काहींच्याकडे मतदार कार्डंही नाहीत. मतदानाला जायचं नाही तर कार्डं कशाला काथ्याकुटही करतील लोक.)

Ranapratap's picture

11 Dec 2017 - 7:00 pm | Ranapratap

अरे तू काय सायकल चालवायला आधार सक्तीचं केल्यावर आधार कार्ड काढणार का? आपल्या शासनाची योजना आहे आणि त्यातून काही चांगले होणार असेल तर देशाचा एक नागरिक म्हणून हे कारण आपले कर्तव्य आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Dec 2017 - 3:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे तू काय सायकल चालवायला आधार सक्तीचं केल्यावर आधार कार्ड काढणार का? =))

अस्सल पुणेरी आहे तो !

अगोदर "हेल्मेट नको. आमचे डोके, त्याचे काय करायचे ते आमचे आम्ही पाहून घेऊ. त्याबद्दल सांगणारे तुम्ही कोण ?" आंदोलन झाले.
आता आधार कार्डाची पाळी आहे ;) =))

चौकटराजा's picture

11 Dec 2017 - 7:55 pm | चौकटराजा

माझ्या मते आधारकार्ड हे फक्त आय डी पुरावा आहे पत्ता पुरावा नाही. दुसरे असे की मोबाईल कुणाच्याही नावाने असला तरी आधार कार्डाशी त्याचा फक्त एक नंबर म्हणून सम्बंध आहे. चार महिन्याच्या मुलाचेही आधार कार्ड काढता येते त्याचा मोबाईल कुठून असणार ?आताची मागणी मोबाईल आधारला जोडा ही आहे आधार मोबाईल ला नव्हे ! आपले काय म्हणजे आहे मंडळी.

babu b's picture

11 Dec 2017 - 11:00 pm | babu b

सगळेच एकमेकाना जोडायचे आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Dec 2017 - 3:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

मोबाईल असला/घेतला तर तो चालू ठेवण्यासाठी त्याला आधार कार्डाशी जोडा.

आधार कार्डाने सहज व खात्रिलायकरित्या ओळख पटवता येत असल्याने, मोबाईलचा अवैध (अतिरेकी, इ) वापर करणे कठीण व्हावे व केल्यास दोषी माणसाला पकडणे सोपे व्हावे असा साधा व सोपा विचार त्यामागे आहे. तसेही ओळखीच्या पुराव्याशिवाय मोबाईलची सिम मिळत नाहीच. आता जास्त विश्वासू पुरावा मागितला जात आहे, इतकेच.

आधार कार्ड काढण्यासाठी मोबाईल आवश्यक नाही. मात्र रजिस्टर्ड/लिंक्ड मोबाईल असल्यास, आधार कार्ड वापरून, बरीच कामे ऑनलाईन करण्याची सुविधा मिळेल.

राघवेंद्र's picture

11 Dec 2017 - 8:20 pm | राघवेंद्र

भारतात रहात नसल्याने माझे आधार कार्ड वडिलांच्या मोबाईल जोडले आहे. OTP पद्धत भारताबाहेर रहात असल्यास वापरायला अवघड आहे.

HDFC बँक आंतरराष्टीय मोबाईल नंबर OTP ला लिंक करून देते बाकीच्याचे माहिती नाही.

कालच एका पुस्तकात वाचले कि भारत जगातील सर्वात मोठा वैयक्तिक माहितीचा डाटाबेस बनवत आहे. भारी वाटले.

अरविंद कोल्हटकर's picture

11 Dec 2017 - 11:58 pm | अरविंद कोल्हटकर

मी भारत शासनाचा पेन्शनर असून गेली कित्येक वर्षे भारताबाहेर राहात आहे. मजपाशी भारतातील असा घराचा पत्ता नाही. माझे पेन्शन दरमहिना माझ्या भारतातील बँकखात्यात बिनबोभाट भरले जाते. बँकेत कधी काही चौकशी इत्यादिसाठी जायची वेळ आले तर माझे मेव्हणे ते काम करतात. माझा परदेशातील पत्ता बँकेकडे KYCसाठी नोंदविलेला आहे.

सुमारे एकदीड वर्षांपूर्वी माझे आधार कार्ड लागेल असे बँकेने आम्हाला सांगायला सुरुवात केली. आधार कार्डाचा अर्ज भारायचा मी प्रयत्न केला तर तो पूर्ण भरलाच जाईना कारण अर्जामध्ये Postal Code No हा केवळ भारतातील PIN असायला लागतो तो मजपाशी नव्हता. तेव्हा मी खोलात जाऊन संशोधन केले आणि मला असे दिसले की १) आधार कार्ड घेणे वा न घेणे हा संपूर्ण ऐच्छिक प्रकार आहे आणि २) आधार कार्ड घेण्यास तोच पात्र आहे की जो भारताचा 'निवासी' आहे.

त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये आधार कार्डासंबंधात काही दावे चालू होते. हे सर्व बँक कर्मचार्‍यांच्या नजरेत वेळोवेळी आणून देत होतो पण त्यांचे समाधान होत नव्हते. सुदैवाने पेन्शनच थांबविण्यासारखे आततायी कृत्य बँकेने केले नाही.

आमच्यासारख्यांची संशयाची स्थिति Central Board of Direct Taxes ने ५ एप्रिल २०१७ ला जारी केलेल्या Notification/Press Release मुळे संपली. ह्यामध्ये खालील स्पष्ट घोषणा आहे:

"It is clarified that such mandatory quoting of Aadhaar or Enrolment ID shall apply only to a person who is eligible to obtain Aadhaar number. As per the Aadhaar (Targeted Delivery of Financial and Other Subsidies, Benefits and Services) Act, 2016, only a resident individual is entitled to obtain Aadhaar. Resident as per the said Act means an individual who has resided in India for a period or periods amounting in all to one hundred and eighty-two days or more in the twelve months immediately preceding the date of application for enrolment. Accordingly, the requirement to quote Aadhaar as per section 139AA of the Income-tax Act shall not apply to an individual who is not a resident as per the Aadhaar Act, 2016."

Aadhaar Card Authority कडून १५ नोवेंबर २०१७ ला काढण्यात आलेल्या No 6-1/2016 - UIDAI (DBT) ह्या प्रसिद्धिपत्रकामुळे हीच बाब अधिकच स्पष्ट झाली आहे. त्याचा परिच्छेद ४ असा आहे:

"4. The laws regarding submitting/linking of Aadhaar for availing the services/benefits applies to the resident as per the Aadhaar Act, 2016. In view of the foregoing, most of the NRIs/PIOs/OCIs may not be eligible for Aadhaar enrolment as per the Aadhaar Act, 2016. However, the implementing agency may devise a mechanism to ascertain the genuineness of status of such NRIs/PlOs/OCIs. "

येथील सदस्यांपैकी कोणास बँक वगैरे आधार कार्डासाठी त्रास देत असेल तर त्यांना उपयुक्त व्हावे म्हणून हा प्रतिसाद दिला आहे.

रमेश आठवले's picture

12 Dec 2017 - 12:15 am | रमेश आठवले

सर्वोच्च न्यायालयाचे ५ न्यायाधीशांचे घटना पीठ आधार कार्ड सक्तीचे असावे की नाही ह्यावर दोन्ही बाजूंच्या वकिलांचे प्रतिपादन ऐकून निर्णय देणार आहे. तेवढ्या साठीच सरकारने ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदत वाढ केली आहे. तरी त्या निर्णयाची वाट पहावी असे वाटते.
माझ्या मते ज्यांना सरकारी सवलती ब्यांकेत त्यान्च्या खात्यात अनुदान रूपाने मिळत नसतील अशांच्या बाबतीत सक्ती नसावी.

नितिन थत्ते's picture

18 Dec 2017 - 5:21 pm | नितिन थत्ते

>>माझ्या मते ज्यांना सरकारी सवलती ब्यांकेत त्यान्च्या खात्यात अनुदान रूपाने मिळत नसतील अशांच्या बाबतीत सक्ती नसावी.

असाच विचार करून आईचे आधार कार्ड काढलेच नव्हते (सबसिडी घेऊ नका-चांगले नागरिक बना वगैरे). परंतु आता जिवंत राहण्यासाठी (तुमच्याच खात्याचे व्यवहार करण्यासाठी) आणि मरण्यासाठीही (मेल्यावर अंत्यविधी-कोणत्याही प्रकारचे) आधार नंबर आवश्यक आहे असे दिसते.

babu b's picture

12 Dec 2017 - 12:34 am | babu b

आधारला लोकांचा का विरोध आहे , समजत नाही.

एकाच वेळी , फोटो , नाव , पत्ता , जन्मतारीख यांचा एकाच कागदात पुरावा होइल. यावरच पॅन नंबर् अपडेट करायला हवा .

बापाचे नावही आहे. आईचेही लिहा.

यावरच पुढे डिग्र्या , रजिस्ट्रेशन नंबर्स इ अपडेट होतील तर बरे होइल.

टवाळ कार्टा's picture

12 Dec 2017 - 5:47 pm | टवाळ कार्टा

अज्जून एकदा सहमत....अमेरिकेतल्या सोशल सेक्युरिटी नंबरसारखा एकच नंबर सगळीकडे चालावा....एकदा तो दिला कि कोणत्याही सर्कारी खात्यात आणखी काहिही गरजेचे नसावे

चित्रगुप्त's picture

12 Dec 2017 - 5:07 am | चित्रगुप्त

हरवलेली / पळून गेलेली / पळवून नेलेली लहान मुले (ज्यांचे आधार कार्ड बनलेले आहे अशी) सापडल्यावर अल्पावधीत त्यांच्या पालकापर्यंत पोलीस पोहोचवू शकत आहेत, असे समजते.
जुन्या दिल्लीत कोणतेही अधिकृत ओळखपत्र (राशन कार्ड, पॅन, विजेचे बील, व्होटर आयडी वगैरे) नसतानाही तीनशे-पाचशे रुपयात आधार कार्ड बनवून मिळते, असेही ऐकले आहे.
आधार क्रमांक विचारण्याचा कायदेशीर अधिकार कोणकोणत्या संस्थांना आहे, हे सरकारने स्पष्टपणे जाहीर करणे गरजेचे आहे.

नाखु's picture

12 Dec 2017 - 10:20 am | नाखु

परवा महाराष्ट्र टाईम्स मध्ये जानेवारीला फोन वरून एकाच OTPने आधार कार्ड लिंक करण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे असं आलं आहे
मी बातमी छापील आवृत्ती मध्ये वाचली आहे

विमा कंपन्या ही सोय त्यांच्या संकेतस्थळी देत आहेत

आधार कार्डच निराधार होऊ नये याची काळजी घेतलेला नाखु

चौकटराजा's picture

12 Dec 2017 - 7:19 pm | चौकटराजा

असे मी लिन्क करून घेतले आहे. तरीही प्रत्यक्ष डीलर कडे जाऊन खात्री करून घेणार आहे. कारण मी भारतात रहातो. इथे विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री यांचे फोटोसकट बनावट " डी एल " नागपुरात सापडले होते. दोन ठिकाणी फोटो देऊन ही निवडणूक ओळखपत्र मिळाले नव्हते ते तिसर्‍या प्रयत्नात मिळाले. खरोखच आपली स्टेटस विकसनशील अशीच अजून आहे. त्या मानाने मोठे आश्चर्य म्हणजे पासपोर्ट व इटली विजा चा आलेला सुखद अनुभव !

भाते's picture

12 Dec 2017 - 11:20 am | भाते

पोस्ट ऑफिसमधल्या सर्व सेवांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. माझे बँक ऑफ इंडियामध्ये फक्त सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी खाते आहे. त्यासाठी तिकडे चौकशी केली असता सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी खात्यासाठी आधार कार्ड क्रमांक जोडणे गरजेचे नाही असे समजले. भविष्यात त्याने काही अडचण येणार नाही ना?

babu b's picture

12 Dec 2017 - 11:44 am | babu b

पोस्टात आधार सक्तीचे आहे , असे व्हाट्सपवर वाचले.

म्हणून पोस्टात वाचले, तेही हो बोलले.

आधारची कॉपी व अर्ज पाठवला आहे.

काही पोस्टात स्वतंत्र फॉर्म छापले आहेत म्हणे. त्यावरच अर्ज घेतात

इथे भारतात बहुसंख्य लोकांना पेंशन नाहीये... ९-१० तासाची ड्युटी करून private कंपनी वाले ७००-८०० रुपये पेन्शन घेताहेत ....वर्षातून ६ महिने ..अन तेही रोज ४/५ तास सरकारी बाबू ४०-५० हजाराची पेंशन जीवावर युरोप तूर करत आहेत... काका तुम्ही परदेशात राहत राहत आहेत.. म्हणजे तुमचा मुलगा/मुलगी तुम्हाला म्हातारपणी नक्कीच चांगले सांभाळू शकत आहेत..द्या ना सोडून भारतातली पेन्शन ...कशाला आधार/पत्ता/खाते करायच्या भानगडीत पडत आहेत? राग मानू नका पण जरा देशातील गरिबांचा करा आणि करा सुरुवात तुमच्यापासून .....

टवाळ कार्टा's picture

12 Dec 2017 - 2:02 pm | टवाळ कार्टा

अजिबात सोडू नका...इतकी वर्षे मेहनत केल्याचा परतवा आहे तो...आणि तुम्ही पेंशन सोडलीत म्हणून ती खरोखर कोणा गरजूच्या कामी येईल याची काय खात्री?
पेंशन घेतल्यावर त्या पैशांचे काय करावे हा तुमचा वैयक्तीक मामला आहे...मग ते ऐय्याशीत उडवा किंवा कोणाचा शाळेचा खर्च उचलण्यात घालवा :)

दादाभौ तुम्ही जीव द्या, त्रासातून सुटाल असा सल्ला तुम्हाला दिला तर चालेल?

सालदार's picture

12 Dec 2017 - 4:09 pm | सालदार

https://uidai.gov.in/enrolment-update/aadhaar-enrolment/aadhaar-data-upd...

ह्या दुव्यावर बघा, आता फक्त पत्ता ऑनलाईन बदलता येतो. नाव, जन्मतारिख वगैरे आता फक्त एनरोलमेंट सेंटर/उपडेट सेंटरवरती बदलले जातिल.
खुप अडचणी निर्माण होत आहेत. आधार सेंटर्स वर तुफान गर्दि जमत आहे. ह्यावर लवकर काहितरी उपाययोजना व्हायला हवी. नाहितर आधार योजनाच गुडाळन्याची वेळ येईल असे वाटते....

babu b's picture

12 Dec 2017 - 5:05 pm | babu b

एनरोलमेंट सेंटरं गल्लीबोळात आहेत. मला बर्डे आणि फोन् नंबर बदलायचा आहे.

पुर्वी आधार काढताना फक्त जन्मसाल विचारायचे , आता तारीख महिनाही छापतात. म्हणून ते बदलून घेणार आहे.

स्टेशनच्या जवळ, पोस्ट हफिस इथे सेंटर्स असतात. ते ३० की ४० लोकाना डेली सर्विस देतात. १ दिवस जातो. पण आठ दिवसात नवे कार्ड मिळून जाते.

टवाळ कार्टा's picture

12 Dec 2017 - 5:43 pm | टवाळ कार्टा

वाटले नव्हते तुमच्याशी कधी सहमती होईल....पण आधार केंद्रांवर तुफान वगैरे काही गर्दी नसते...असलीच तर शन्वारी सकाळी १५-२० लोक आपल्या आधी रांगेत असू शकतात...बरीच आधार सेंटर्स उघडली आहेत या दुव्यावर शोधता येतील

दुव्याबद्द्ल धन्यवाद.

मला ठाण्याच्या केंद्रावर आधार अपडेट करता येईल का? (मुलुंड मध्ये राहतो आणि मुंबईतील केंद्र कुर्ल्याला आहे)

टवाळ कार्टा's picture

13 Dec 2017 - 12:12 am | टवाळ कार्टा

व्हायला हवे...

सालदार's picture

12 Dec 2017 - 7:09 pm | सालदार

वरील प्रतिसाद मी लेटेस्ट स्वानुभावावर दिला होता. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, प्रत्येक उपडेट सेंटरला मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत (रोज १० आधार उपडेट वगैरे सारख्या). मी स्वतः २ डिसेंबरला उपडेट सेंटरवर गेलो असता मला, २ जानेवारीची अपॉईंटमेंट मिळाली आहे. सहज म्हणुन एखाद्या उपडेट सेंटरवर फेरफटका मारा म्हणजे परिस्थिती कळेल.
सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा कि सुरळीत सुरु असलेली ऑनलाईन उपडेटची व्यवस्था का म्हणून बंद केली असावी? मी आधारचे सगळे प्रेस रिलिज वाचले पण कुठेच हि सुविधा का बंद केली किंवा फक्त बंद केली याबद्दल उल्लेख नाही.

सालदार's picture

12 Dec 2017 - 7:25 pm | सालदार

*अपडेट असे वाचावे

babu b's picture

12 Dec 2017 - 7:42 pm | babu b

अपडेट मुख्यता खालील गोष्टीना लागतात..

१. फोन नंबर
२. जन्मतारीख
३. पत्ता
४. इतर चुका.

पैकी फोन अपडेट हे जास्त कॉमन आहे. कारण जुन्या काळचे मोबाइल नंबर आता बहुतेकानी बदलले आहेत. तेंव्हा पोर्टॅबिलिटीही बहुदा नव्हती.

फोन अपडेट करायला तो मनुष्य स्वत: त्या फोनसकट हजर लागतो . कारण otp येतो. शिवाय अंगठ्याचा ठसा लागतो.

म्हणजे फोन अपडेट ऑनलाइन शक्य नाही.

इतर गोष्टी पुर्वी ऑनलाइन व्हायच्या , पण आता वॅलिड प्रूफची झेरॉक्सही लागते.

वॅलिड प्रूफ आधिही लागायचे. ऑनलाईन अपडेट साठी स्कॅन डॉक्युमेंट लागत असे. आजही पत्ता तुम्ही ऑनलाईन बदलू शकता, पण नाव, बर्थडेट का नाही हे काही कळत नाही.

राघवेंद्र's picture

12 Dec 2017 - 8:20 pm | राघवेंद्र

मला ठाण्याच्या केंद्रावर आधार अपडेट करता येईल का? (मुलुंड मध्ये राहतो आणि मुंबईतील केंद्र कुर्ल्याला आहे)

महाराष्ट्रात कुठेही आधार कार्ड अपडेट करता येईल. अपडेट करायला किती रुपये घेतात हे चेक करा ? कायद्याने रु १५ घ्यायला पाहिजेत पण काही केंद्र खूप जास्त पैसे घेतात.

टवाळ कार्टा's picture

13 Dec 2017 - 12:13 am | टवाळ कार्टा

मी एका ठिकाणी ५० आणि दुसर्या ठिकाणी १०० दिलेले

babu b's picture

12 Dec 2017 - 9:36 pm | babu b

मॅरेज सर्टिफिकेटलाही आधार जोडायचे म्हणे.

ते कसे ?

रविकिरण फडके's picture

12 Dec 2017 - 10:41 pm | रविकिरण फडके

समजा, आजच्या घटकेला माझ्याकडे आधार आणि मोबाईल दोन्ही नाहीत. मोबाईल घ्यायला गेलो तर तो मिळणार नाही कारण आधार नाही. आधार कार्ड काढायला गेलो तर ते देणार नाहीत कारण मोबाईल नाही.
(आधी कोंबडी की आधी अंडं?)

असो. विनोद सोडा, आपल्या नोकरशाहीची (आणि नेतृत्वाची) गम्मत ही आहे की सर्व शक्यतांचा विचारच कोणतीही योजना सुरु करताना, कोणतीही घोषणा करताना, करायचाच नाही. अडचणी आल्या की प्रथम अडेलतट्टूपणा करायचा, मग खूपच ओरडा झाला म्हणजे मुदत वाढवायची, सवलती द्यायच्या, अपवाद करायचे, आणि अशा प्रकारे मूळ योजनाच पातळ करून टाकायची.
पण काय करणार, जुगाड करणे ही आपली संस्कृतीच आहे ना?

babu b's picture

12 Dec 2017 - 10:52 pm | babu b

लहान मुलांचा आधार मिळतो की . बिना मोबाइल

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Dec 2017 - 10:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

आधार कार्ड काढण्यासाठी मोबाईल आवश्यक नाही. मोबाईल सिम घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. :)
+
http://www.misalpav.com/comment/974426#comment-974426

कंजूस's picture

13 Dec 2017 - 4:03 am | कंजूस

शेवटी काय ठरले मोदकाचे?
आधार लावणार का?

रमेश आठवले's picture

13 Dec 2017 - 6:00 am | रमेश आठवले

वयस्क मंडळींना आधार कार्ड मिळाल्यांनतर मोतीबिंदू झाल्याने तो काढण्यासाठी डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागते. तसे केल्या नन्तर त्यांचा डोळ्याचा फोटो त्यांच्या आधीच्या आधार कार्डासाठी काढलेल्या फोटोशी विसंगत होतो का ? मिपाचे डॉक्टर सदस्य या बाबत मत देऊ शकतील का ?मोतीबिंदू काढल्यावर पुन्हा आधार कार्ड काढले पाहिजे का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Dec 2017 - 10:58 am | डॉ सुहास म्हात्रे

आधार कार्डात "आयरिस स्कॅन" वापरतात. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केल्यावर "बुबुळाची रचना (आयरिस स्कॅन)" बदलू शकते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर, योग्य तो पुरावा सादर करून, आधार डेटाबेसमध्ये आयरिस स्कॅन अपडेट करून घ्यावा.

संजय पाटिल's picture

13 Dec 2017 - 1:42 pm | संजय पाटिल

काही पुरवा लगत नाही! फिंगर प्रिंट मॅच झाल्यास आयरीस स्कॅन अपडेट करून घेतात!

रमेश आठवले's picture

13 Dec 2017 - 7:39 pm | रमेश आठवले

धन्यवाद. डॉ सुहास म्हात्रे आणि श्री संजय पाटिल .

१) एमटिएनेल आणि बिएसेनेल या कंपन्या अगोदर प्रुफ घेतात नंतरच कार्ड देतात त्यामुळे माफ आहे. परंतू आता करावं लागेल बायोमेट्रिक.
२) बहिणीचे स्टेट बँकेत पैसे पडून होते. परदेशातून इथे आल्यावर काढायला गेली तर ते म्हणाले
अकाउंट ब्लॅाक झालं आधार न दिल्याने दोन वर्षांपुर्वी.
- -चेकने ट्रान्सफर करा.
- चेक बुक द्या .
- असं लगेच मिळणार नाही. पोस्टाने घरी पाठवतो.
- मी सात दिवसासाठी शेवटची आले आहे, इथे राहातच नाही. पेसे द्या आताच.
- म्यानेजरला विचारा.
- मी देऊ शकत नाही. वरून विचारतील हे ओपन का/ कसे केले?
- पोलिसांना घेऊन बहिण बँकेत आली.
- म्यानेजरने पोलिसांना विटनेस सह्या घेऊन पैसे दिले.

**
एचडिएफसी बँकेने पासपोर्ट + ग्रीन कार्ड पाहून तिकडेच मागे कळवले होते - इकडे येण्याची गरज नाही तिकडूनच खाते चालवा. नो प्राब्लेम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Dec 2017 - 11:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

एचडिएफसी बँकेने पासपोर्ट + ग्रीन कार्ड पाहून तिकडेच मागे कळवले होते - इकडे येण्याची गरज नाही तिकडूनच खाते चालवा. नो प्राब्लेम.

असे नुसते बँकेला कळवून फायदा नाही. परदेशी स्थायी वास्तव्याचे पुरावे (रेसिडेंट व्हिसा व अ‍ॅड्रेस प्रूफ) देऊन, बँकेतले "एसबी" खाते "एनआरओ" खात्यात परिवर्तित केले असते, तर असे झाले नसते.

मंदार कात्रे's picture

13 Dec 2017 - 7:22 pm | मंदार कात्रे

modi aadhar

आता आधार लिंक करण्याची डेडलाइन ३१ मार्च २०१८
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/government-extends-aa...

मंदार कात्रे's picture

13 Dec 2017 - 7:24 pm | मंदार कात्रे

modi

भाते's picture

14 Dec 2017 - 11:35 am | भाते

आधार नोंदणी केंद्राची मुंबई विभागाची यादी आजच्या मटामध्ये आली आहे.

http://epaper.timesgroup.com/Olive/ODN/MaharashtraTimes/get/MTMUM-2017-1...

धर्मराजमुटके's picture

17 Dec 2017 - 8:39 pm | धर्मराजमुटके

एअरटेल ने ग्राहकांनी मोबाईल क्रमांकासाठी जोडलेल्या आधार कार्डांची माहिती वापरुन ग्राहकाच्या संमंतीविना एअरटेल पेमेंट बँक खाती उघडली आहेत. सध्या सुमारे २३ लाख लोकांनी याविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. या खात्यांत आतापर्यंत एलपीजी सबसीडीचे ४७ लाख रुपये जमा झाले आहेत. यावरुन युआयडीएआय ने एअरटेल चे 'ई-केवायसी' लायसन्स सध्यासाठी निलंबीत केले आहे. आधार चा आधार घेऊन केल्या जाऊ शकलेल्या घोटाळ्यांमधे हा माहित झालेला पहिलाच मोठा घोटाळा असावा.