वाचक व चर्चाकारांच्या हितार्थ सल्ला

रंगीला रतन's picture
रंगीला रतन in काथ्याकूट
10 Dec 2017 - 11:33 am
गाभा: 

सध्या मिपा वर लाल व हिरव्या सापांच्या काही पिल्लावळी अनेक चांगल्या धाग्यांवर गरळ ओकताना दिसत आहेत. मूळ मुद्दा किंवा विषयाला बगल देऊन उगाच चर्चा इतरत्र भटकावण्याचा त्यांचा उद्देश स्पष्ट जाणवतो (टीव्ही वरील चार्चासत्रां प्रमाणे). त्यामुळे अभ्यासपूर्ण प्रतिसाद, चांगली चर्चा व लेख वाचण्यासाठी इथे आलेल्या माझ्यासारख्या अनेक वाचकांची निराशा होतेच पण मूळ विषयावर आधारित चर्चा करणाऱ्या लोकांचापण हिरेमोड होतो. अशा लोकांच्या उपद्रवापासून मुक्ती मिळवण्याचे काही अगदी साधे उपाय मी खालील प्रमाणे सुचवत आहे.

१) त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करावे कारण ते विषारी असले तरी त्यांच्या विषाचा सर्वसामान्य माणसांवर कुठलाही परिणाम होत नाही. एकवेळ मच्छर चावला तर मलेरिया किंवा डेंग्यू वगैरे व्हायची शक्यता असते पण ह्यांच्यापासून कुठलाही धोका नाही.
२) हे साप स्वतः शक्यतो कुठलाही स्वतंत्र धागा काढायच्या भानगडीत पडत नाहीत कारण त्यांच्या अनेक कालबाह्य विषयांमध्ये बहुतांश वाचकांना कोणताही रस नसल्यामुळे येणाऱ्या प्रतिसादांचे प्रमाण अगदीच नगण्य किंवा अजिबातच नसते, त्यामुळे ते इतरांच्या चांगल्या रंगलेल्या चर्चेची वाट लावायला सदैव उत्सुक असतात. त्यांनी जर कुठल्या चर्चेवर गरळ ओकलेच तर त्यांना प्रतिसाद न देता अनुल्लेखानेच मारावे.
३) लाल सापांची तर जगभर केविलवाणी अवस्था झालेलीच आहे आता हिरवे साप पण त्याच मार्गावर आहेत, त्यामुळे त्यांचे गरळ ओकणे हि त्यांचे अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे, चर्चां मध्ये वगैरे त्यांना खरा रस काहीच नसतो तेव्हा बाकीच्यांनी विचलित न होता मूळ विषयाला धरूनच आपले प्रतिसाद देत राहावे.
४) अनेक जण त्यांच्या फालतू प्रतिसादांना उत्तरे देण्याचे कष्ट घेतात पण त्याची अजिबात गरज नाही. त्यात चर्चेत सहभागी झालेल्यांनी आपला वेळ व शक्ती खर्च करू नये. त्यामुळे झालाच तर एक अतिरिक्त फायदा होऊ शकतो कि हे साप आपला ईगो (चुकून माकून असलाच तर) हर्ट झाला म्हणून स्वतंत्र धागा काढायचे कष्ट घेतील आणि मग इतरांवर कंपूबाजी वगैरेचे आरोप करणारे त्यांचे टोळीवाले जेव्हा त्या धाग्यांवर आपले प्रतिसाद देतील तेव्हा ह्यांची कंपूबाजी उघडी पडेल आणि त्यांनाहि आपले समविचारी किती आहेत ह्याचा पक्का अंदाज येईल.

न मागता वाचक व चर्चाकारांच्या हितार्थ सल्ला देणारा गारुडी,
(नाखुंची स्वाक्षरीची स्टाईल आवडली म्हणून कॉपी करणारा)
रंगीला रतन.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

10 Dec 2017 - 11:38 am | प्रचेतस

भगव्या सापांचा उल्लेखही नसल्याने निषेध.

एमी's picture

10 Dec 2017 - 12:57 pm | एमी

+१ :D

पण एकंदर धाग्यातल्या भावनेशी सहमत आहे. या असल्याच पकडापकडी चर्चेमुळे बरेच माबोकर वैतागले होते. मालकानी दोन्हीकडच्या बऱ्याचजणांना खटाखट उडवून टाकलं. आता शांत आहे. बरं वाटत तिकडे!

रंगीला रतन's picture

11 Dec 2017 - 12:35 am | रंगीला रतन

धन्यवाद...भावनाच महत्वाचि...

ईतरांच्या धाग्याचि वाट लावताना आढळले नाहित अजुन तरी... ज्या दिवशी आढळतील त्या दिवशी स्वतंत्र धागा काढुन उल्लेख केला जाईल, काळजी नसावी.

टर्मीनेटर's picture

10 Dec 2017 - 12:06 pm | टर्मीनेटर

:) lol

मार्मिक गोडसे's picture

10 Dec 2017 - 12:26 pm | मार्मिक गोडसे

एक नानेटा/नानेटी मारल्यास सात नानेट्या तयार होतात. पुरावा मागू नये.

... असा विचार यामागे असावा.

रंगीला रतन's picture

11 Dec 2017 - 12:38 am | रंगीला रतन

बरोब्बर... म्हणुनच अनुल्लेखाने मारावे असे म्हंटले आहे मी.

रंगीला रतन's picture

10 Dec 2017 - 11:42 pm | रंगीला रतन

अंधश्रध्दा ... दुसरे काय? पुराव्याचि गरज नहिये साहेब... जेव्हा पासुन कळायला लागलय, कमीत कमी २२ ते २५ नानेट्या मारल्या आहेत आमच्या फार्म हाऊस वर पण कधी ह्या पटित वाढलेल्या अजुन तरि बघितल्या नाहियेत गेल्या २० वर्षात.

babu b's picture

10 Dec 2017 - 1:39 pm | babu b

छान. यथा राजा तथा प्रजा... देशपातळीवर मोठा खेळ रंगला आहे. तिथे ह्या चर्चा अगदी क्षुल्लक

आपल्या कडुन हिच अपेक्षा होति मोहोदय.

आयडी आवडला.. हे विचार पूर्वी एकदा अंमलात आणले होते.. तुम्ही म्हणताय तर पुन्हा प्रयत्न करून बघू. :)

रंगीला रतन's picture

10 Dec 2017 - 11:46 pm | रंगीला रतन

नक्की परत करुन बघा :)

विशुमित's picture

10 Dec 2017 - 3:05 pm | विशुमित

<<<न मागता वाचक व चर्चाकारांच्या हितार्थ सल्ला देणारा गारुडी,>>>
==>> गारुड्याला वाटते कि आपल्या आपल्या पुंगी मुळेच नाग डोलत आहे. पण प्रत्येक्षात विज्ञान वेगळे सांगते.

सुबोध खरे's picture

10 Dec 2017 - 4:33 pm | सुबोध खरे

हो ना
साप तर बधिरच असतात.))--((

babu b's picture

10 Dec 2017 - 4:54 pm | babu b

हे खाली डिझाइन कसले काढता ?

मला तर ते डेंटेट / पेक्टिनेट line सारखे वाटते.

रंगीला रतन's picture

11 Dec 2017 - 12:54 am | रंगीला रतन

:)

रंगीला रतन's picture

11 Dec 2017 - 1:21 am | रंगीला रतन

+१००

श्रिपाद पणशिकर's picture

11 Dec 2017 - 2:51 am | श्रिपाद पणशिकर
श्रिपाद पणशिकर's picture

11 Dec 2017 - 2:52 am | श्रिपाद पणशिकर
श्रिपाद पणशिकर's picture

11 Dec 2017 - 2:52 am | श्रिपाद पणशिकर

ठ्ठो ;)

बादवे हे नागांबद्दल नव्ह्ते, सापांबद्दल होते.
आणि तसेहि आम्हि पुंगी बजाओ लुन्गी हटाओ वाले गारुडि आहोत.

mayu4u's picture

10 Dec 2017 - 3:43 pm | mayu4u

प्रयत्न करणेत येईल.

रंगीला रतन's picture

10 Dec 2017 - 11:57 pm | रंगीला रतन

प्रयत्नांती परमेश्वर...

सिंथेटिक जिनियस's picture

10 Dec 2017 - 5:02 pm | सिंथेटिक जिनियस

उजव्या विचारसरणीच्या लोकांची प्रवृत्तीच आहे ,विचाराचा प्रतिवाद करता येत नसेल तर असले धागे काढून टोळ्या बनवता येतात.शुभेच्छा.

सीं. जी. तुम्ही पूर्वीचे नानासाहेब नेफळे आहात हे खरे आहे का ?

रंगीला रतन's picture

11 Dec 2017 - 1:02 am | रंगीला रतन

कोणीही का असेना...त्याचा येळ्कोट राहीना , मूळ स्वभाव जाई ना.

लूक व्हु ईज टॉकींग...उजव्या विचारसरणीच्या लोकांची प्रवृत्ती वगैरे बोलणारे म्हणजे आपण डाव्या विचारसरणीचे ना? चला निदान तसे गृहीत धरुन हा प्रतीसाद देतो...
आपल्या पेक्षा दुसरा विचार अस्तित्वात असतो हे मान्य तरी करतात का हो डाव्या विचारसरणीचे लोकं?

नाखु's picture

10 Dec 2017 - 7:37 pm | नाखु

सापसफाई हे मिपा स्वच्छता अभियानात समाविष्ट करून घेतलं पाहिजे
किमानपक्षी मिपा नियमित वाचणारे तरी "वाचतील"

अखिल मिपा हसतं खेळतं ठेवा आणि ठेवण्यासाठी सदोदित प्रयत्न करा या संघाच्या "गाजर गवत' निर्मूलन समितीचे पत्रकातून साभार

वाचकांचीही पत्रेवाला नाखु

समाधान राऊत's picture

10 Dec 2017 - 8:38 pm | समाधान राऊत

+१

रंगीला रतन's picture

11 Dec 2017 - 1:10 am | रंगीला रतन

सहमत.

रंगीला रतन's picture

11 Dec 2017 - 12:18 am | रंगीला रतन

"गाजर गवत' निर्मूलन समिती हे खुप आवडले.
तसेहि अभ्यासपुर्ण प्रतिसाद देणार्‍यांपैकी आपण आहातच.

सतिश गावडे's picture

10 Dec 2017 - 8:52 pm | सतिश गावडे

तुम्हाला फक्त लाल व हिरव्या रंगांचे साप दिसले का? अजून एका रंगाचे सापही लाल व हिरव्या रंगांच्या सापांईतकेच फुत्कार टाकत असतात. ते कसे काय दिसले नाहीत तुम्हाला? की ते "आपले" साप आहेत? =))

ईतरांच्या धाग्याचि वाट लावताना आढळले नाहित अजुन तरी... ज्या दिवशी आढळतील त्या दिवशी स्वतंत्र धागा काढुन उल्लेख केला जाईल, काळजी नसावी.
राहिलि गोष्ट "आपले" असण्याची... तर महाशय मी एक वाचक आहे, लेखक नाहि... एकंदरित प्रतिसाद देण्यच्या शैली वरुन जे काहि जाणवले तेच ईथे मांडले. चुक भुल द्यावि घ्यावि.