दोन घटना

Primary tabs

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
7 Dec 2017 - 11:23 am
गाभा: 

हल्ली हल्ली ऐकिवात आलेल्या दोन घटना.

१. आमच्या शेजारच्या गावात एक वेडसर गृहस्थ होते, त्यांना वेड कधी लागले माहीत नाही, त्यापूर्वी गडगंज श्रीमन्त, कराराने आंब्याच्या बागा घेउन लाखो कमवायचे त्या काळात (१९८०), पण नंतर अचानक वेड लागले, आणि मग ते वेडाच्या भरात कसेही वागू लागले.. दणकट शरीर, कमरेला कायम कोयती, आणि शिवराळ भाषा यामुळे त्यांच्या वाटेला कोणी जात नसे. बाबा डोक्टर होते, आणि तसा त्यांचा आणि बाबांची जुनी ओळख, त्यामुळे ते १५ दिवस, महिन्यातून एक फेरी घरी टाकायचेच. बर यायचे ते पण सरळ नाही, त्यांच्या गाण्यांचा आवाज साधारण ५०० मीटरवरून ऐकायला यायचा, आणि मग आम्ही विचार करायचो, की आता हे कोणाकडे जाणार आहेत म्हणून.. आले की कोपभर चहा, आणि थोड्याश्या गप्पा (वेडसर झालेले असले तरी व्यवहाराचे भान सुटले नव्हते. भगत झाले, वैद्य झाले, अगदी मेंटल होस्पिटलपर्यण्त नेउन झाले, पण काही गुण नाही)
त्यांचे येणे म्हणजे सुट्टीला गावाला गेल्यावर थोडासा विरंगुळा होता आम्हाला.
मधे मी वर्षभर अमेरिकेत गेलो, त्यामुळे मग फारसा संबंध राहिला नाही. वर्षभराने परत आल्यावर घरी गेलो तेव्हा विचारले, क्ष्क्ष्काका येतात का नाही हल्ली? तर भाऊ म्हणाला, तुला माहीत नाही? ते बरे झाले. म्हटलं कसे काय? त्यावर त्याने एक गंमत सांगितली.
रत्नागिरीजवळ एका गावात कोणी गृहस्थ "बघतात", त्यांच्याकडे त्यांचा मुलगा विचारायला गेला होता. त्यांनी उपाय सांगितला. तर झालं होतं असं, की त्यांच्या घराच्या खाली एक पिंपळ होता, केव्हातरी रात्री यांनी त्या पिंपळाखाली आग घातली, त्यामुळे त्या मुंज्याने यांना पकडले होले म्हणे. उपाय काय सांगितला? तर सोपा उपाय, एका पानावर जेवण वाढून त्या पिंपळाखाली नेऊन ठेवा आणि प्रार्थना करा म्हणजे तो यांना सोडेल. त्याप्रमाणे यांनी केले, आणि ते गृहस्थ बरे झाले की हो..

पैसे किती घेतले? शून्य.

घटना २:

एक मुलगा ५-६ वर्षांचा, पोटात असह्य दुखते म्हणून त्याचे आईवडील त्याला रत्नगिरीतील एका चांगल्या डॉक्टरकडे घेउन गेले. शक्य त्या सगळ्या तपासण्या करून झाल्या, पण निदान होत नव्हते. पोटदुखी थांबेना.
एका मीटिंगच्या वेळेस डॉक्टरने सुचवले, तुमचा कदाचित विश्वास नसेल, आणि मी सुचवणे योग्य नाही, तरी पण मला एकदा असे वाटते की तुम्ही अन्य मार्गांचा विचार करावा. एव्हढ्या सूचनेवरून ते एका "जाणत्याकडे" बघायला गेले. त्यांनी काहीतरी उपाय सांगितला पण त्याने गुण आला नाही. मग ते दुसर्‍या एका भगताकडे गेले. आता खरी गंमत सुरू होते..
तो भगत म्हणाला, की मला असा आदेश झालेला आहे की तुमचे काम अमुक अमुक माणसाकडे सोपवले आहे (त्याच्याकडेच ते अगोदर गेले होते), तेव्हा मी यात पडणार नाही. तुमचे काय करायचे ते त्यांना सांगितलेले अहे, तेव्हा तुम्ही परत त्यांच्याकडेच जा.
त्याच्या सांगण्यावरून ते परत जुन्या माणसाकडे आले, तेव्हा त्याने म्हणे याच्या पूर्वजन्माची कथा सांगितली, की तो म्हणे दक्षिणेतील एका मंदिरात पुजारी होता, आणि काहीतरी पूजेची इच्छा मनात राहून गेलेली आहे, त्यामुळे त्याला हा त्रास होत आहे. तुम्ही त्या देवळात जा, आणि काही विधी सांगितले त्या देवळात करायला. (हे देऊळ तिरुपती सारखे कॉमन प्रसिद्ध देऊळ नव्हे) गंमत म्हणजे त्या मुलाची पोटदुखी त्या उपायाने गेली.

पैसे? तो माझा आणि त्या पुजार्‍याचा हिशोब आहे. तुमच्याशी काही संबंध नाही.

माझी तर्कबुद्धी मला या घटनांचे स्पष्टीकरण देत नाही.. नेमके काय झाले असेल? दोन्ही घटना माझ्या पडताळणीत तरी सत्य घटना आहेत.

प्रतिक्रिया

केअशु's picture

7 Dec 2017 - 11:34 am | केअशु

या मागचे शास्त्रीय कारण समजायला हवेच!

babu b's picture

7 Dec 2017 - 11:38 am | babu b

..

प्रकाश घाटपांडे's picture

7 Dec 2017 - 11:47 am | प्रकाश घाटपांडे

हे दोन्ही अनुभव प्रत्यक्ष व थेट स्वतःशी संबंधीत नाहीत. त्या अनुभवांची छाननी कशी करणार?

पहिल्या अनुभवातील व्यक्ती माझ्या नेहमीच्या पाहण्यातील होती.
दुसऱ्या अनुभवातील घटना मला प्रत्यक्षदर्शीकडून समजली आहे, जो या घटनाक्रमाचा भागीदार/साक्षीदार होता.. तरीदेखील यांची चिकित्सा करणे कठीणच हे मान्य..

माझया स्वतःच्या अनुभवांची देखील मी अजून चिकित्सा करू शकलो नाहीये..

प्रकाश घाटपांडे's picture

7 Dec 2017 - 1:36 pm | प्रकाश घाटपांडे

मला आलेले या वर्षातला दोन अनुभव

ताथवडे उद्यानात मी कधी कधी संध्याकाळी जातो. त्या दिवशी तिथे जवळ मोटरसायकल लावली व जरा लवकर झाल्याने टंगळ मंगळ करत चालत होतो. तिथे टॆंकर जवळ एक भिकारी म्हातारी बसली होती. मी तंद्रीत तिथून चालत गेलो. एकदम मनात आले की त्या म्हातारीला काहीतरी दिले पाहिजे. आपल्या आईच्या वयाची आहे. मग मागे आलो पाहिले तर म्हातारी गायब. अरे इतक्यात कुठे गायब झाली. फुगेवालीला विचारल ती म्हणली गेली. झपाझप चालत आजूबाजूला पाहिले. दिसली नाही. विचार केला एवढी जक्ख म्हातारी चालून चालून किती लांब जाणार? गाडी काढली व आजूबाजूला गेलो तिचा पत्ता लागला नाही. अस्वस्थ झालो. नंतर सात आठ दिवस त्याच वेळी तिथे येउन म्हातारी दिसते का हे पहात राहिलो. म्हातारी परत दिसलीच नाही विषय डोक्यात असाच रेंगाळत राहिला.
२) सकाळी चालायला जातो डहाणूकर कॊलनी ते गांधीभवन वरुन पुढे गोपीनाथनगर. तिथे द्त्ताच देउळ आहे. पुढे टेकडीचा पायथा व डेड एंड आहे. भुभु लोक असतात तिथे. माझी बहिण जवळच राहते. ती पण येते कधी कधी दिसते. त्या दिवशी टेकडीच्या पायथ्याशी दिसली. मी विचार केला जरा भुभु मंडळींशी दोन मिनिट खेळून जावे भेटायला. नंतर गेलो तर बहिण गायब. अरे आता इथे होती. मग झपाझप पावले उचलली द्त्तमंदीरात पाहिले दिसली नाही. पुढे परतीच्या वाटेवर वेगाने जात राहिलो. दिसली नाहि. परत मागे येउन पाहिले नाहीच कुठे? अरे दोन मिनिटात कशी गायब झाली. कालावधी व वेग याची तुलना करत मी परिसर पिंजला होता. अरे त्या म्हातारी सारखी गायब! मग घरी आलो. बहिणीला फोन लावला. ती म्हणाली मी थेट नेहमीच्या रस्त्याने घरीच आले. मग मी कोडे सोडावण्याचा प्रयत्न केला व निष्कर्ष काढला की माझ्या मेंदुत time & space चे गणित काहीतरी चुकले असावे. आपल्या अंदाजापेक्षा मेंदुत वेगळेच काहीतरी गणित झाले असावे. ती दोन मिनिटे प्रत्यक्षात जास्त असणार आहेत.

हे खरे आहे, अश्या अनेक गोष्टी आयुष्यात घडत असतात, दखल किती गोष्टींची म्हणून घेणार?

काही गोष्टी मात्र बोलाफुलाला गाठ पडावी अश्या घडतात. एक ताजी घटना.

आम्हाला आत्ता मुलगी झाली 2 महिन्यापूर्वी. त्यावेळेस 6 महिने पूर्ण झाले आणि बायकोला अंगावर भयंकर खाज सुटायला लागली, कोणतीही rash नाही काहीही नाही. Gynac ने अँटी alergic औषधे दिले, पण गुण नाही, मग आमच्या फॅमिली डॉ कडून आयुर्वेदिक औषधे घेतली तरी काही नाही.. लिव्हर function टेस्ट केली ती पण नॉर्मल, काही कळत नव्हते. बायको रात्रभर जागी असायची.. आता पुढचे 3 महिने हे सहन करायचे आहे असे धरून चाललो होतो.. पण मध्येच एक गंमत झाली.

आम्हाला premature डिलीव्हरी ची शक्यता सांगितली होती, म्हणून नंतर मुलीला शेक द्यायला म्हणून मी थोडे लवकरच कोळसे आणले.. आठव्या महिन्यात..
कोळसे आणले त्या रात्री ते पेटवले, आणि सहजच बायकोची दृष्ट काढली. गम्मत म्हणजे त्या रात्री खाज आली नाही.. म्हणून मी सलग 3 दिवस दृष्ट काढली, आणि पुढचे 2 महिने एकही दिवस खाज आलेली नाही..

दृष्ट काढण्यामागे खाज जावी असा विचार देखील नव्हता.. बरेच दिवस अशी दृष्ट काढलेली नाहीये, तर एकदा काढून टाकू असा विचार करून मी हे सगळे केले.
पण बोलाफुलाला गाठ पडली म्हणूया. आता आयुष्यभर हे माझ्या डोक्यातून काही जाणार नाही.

महेश हतोळकर's picture

8 Dec 2017 - 9:52 am | महेश हतोळकर

आम्हाला premature डिलीव्हरी ची शक्यता सांगितली होती, म्हणून नंतर मुलीला शेक द्यायला म्हणून मी थोडे लवकरच कोळसे आणले.. आठव्या महिन्यात..
कोळसे आणले त्या रात्री ते पेटवले,

एखाद्या dermatologist वा microbiologist कडून सल्ला घ्यावा. कदाचित काही microbial infection असू शकते जे fumigation ने गेले.
बाकी चालू द्या.

सांगणे कठीण आहे.. पण मी धुरी केली नव्हती. फक्त 4 कोळशाचे तुकडे पेटवून दृष्ट काढली होती..

अजून एक दृष्टीची गम्मत म्हणजे आमच्याकडे घरात रुटीन म्हणून आताशा दृष्ट काढतात, अंघोळ आणि शेक झाल्यावर.. तेच मीठ तीच मोहरी पण एखाद्या दिवशी टी दृष्ट जळताना भयानक घाण वास येतो, कधी कधी काहीही नाही. हे काय गौडबंगाल आहे माहीत नाही

विशुमित's picture

7 Dec 2017 - 12:27 pm | विशुमित

माझे एक अनुभव:

माझ्या पुतणीचा पहिला वाढदिवस होता. तिला खूप मस्त फ्रॉक मी घेतला होता. वाढदिवसाचा कार्यक्रम चालू झाला. ती माझ्याच मांडीवर बसली होती. खूप हसत होती आणि सुंदर ही दिसत होती. वाढदिवसाचा कार्यक्रम घरासमोरच असणाऱ्या विठ्ठल मंदिराच्या कट्ट्यावर चालू होता. सगळे व्यवस्थित चालले होते. केक कापून झाला आणि जसे कट्ट्यावरून मी तिला घेऊन खाली उतरलो, फोटो ही काढून झाले. ५ मिनिटांनी तिने जी जोर जोराने रडायला सुरवात केली की सगळ्यांची तारांबळ उडाली. सगळ्यांना वाटले तिच्या डोळ्यात हळदी कुंकू गेले असेल पण असे काही झाले नव्हते. मी कोणाला ही हळदी कुंकू लावूनच दिले नव्हते. ती रडायची काही थांबेना. पोटात वगैरे दुखत असेल असे वाटले. तिच्या मम्मीने, आजीने, मी सर्वानी समजावण्याचा प्रयत्न केला, रडणे काही थांबेना. नंतर खूपच कर्कश रडू लागली. लगातार (नॉनस्टॉप) २ तास ती रडत होती. पोट दुःखीच औषध देण्याचा प्रयत्न केला पण तिने पिऊन घेतलं नाही.
वाडीतल्या एका जुन्या म्हातारीला आईने घेऊन यायला सांगितले. ती आली. तिने वहिनींना विचारले संध्याकाळी घराबाहेर कुठे गेली होती का ? त्यावेळेस वाहिनी म्हणाली मागच्या रानात कोथिंबीर आणायला गेले होते ६ वाजता.
म्हातारीने उतारा बनवून दिला आणि आमच्या फादरला तो मागच्या रानात ठेऊन द्यायला सांगितला. फादरने उतारा ठेवून माघारी परतले तशी ही आमचं पिल्लू पूर्वी सारखा खिदळायला लागले. रात्री २ वाजे पर्यंत खेळत बसले आणि शेवटी माझ्याच मांडीवर झोपी गेले. कशाने फरक पडला काही माहित नाही.
खर्च शून्य...

तुमचे आधीचे प्रतिसाद बघता, तुमच्या कडुन ह्या घटनेची अपेक्षा केली नव्हती.

<<<तुमचे आधीचे प्रतिसाद बघता, तुमच्या कडुन ह्या घटनेची अपेक्षा केली नव्हती.>>>
नक्की काय मत बनवले होते माझ्याबद्दल, कृपया सांगू शकाल का ?
असे काही नाही. अजून तरी मी भूत पिशाच्च वगैरे काही असते कि नाही याच्या निकर्षा पर्यंत पोहचलो नाही आहे.
एक अनुभव डोळ्यासमोर घडला तो फक्त मांडला आहे.
माझा तसा लहान मुलांची दृष्ट काढण्यावर श्रद्धा/विश्वास आहे. ऑफिस मध्ये बॉस ने कधी थोडे कौतुक केले तर घरी येऊन मी आईला मीठमोहरीने दृष्ट काढायला सांगत असतो. बरं वाटते. (आल्यागेल्याची वगैरे काहीतरी म्हणत असते ती)

नाखु's picture

8 Dec 2017 - 9:31 am | नाखु

आवडला आणि पटलाही

ज्या छोट्या (निरूपद्रवी,साधी) गोष्ट घरातील जेष्ठ करीत असतील तर सुधारकाचा झेंडा फडकवून त्यांचाही अपमर्द करायचा का नातेसंबंध राखायचे यांचं तारतम्य ज्याचं त्यानं ठरवावं आपण फक्त प्रेक्षक रहावं

जाता जाता दिवाळी/नवीन वर्षाच्या/वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात, त्या दिल्याने वा न दिल्याने खरं काही फरक पडतो का?
तरीही आपणं प्रेमापोटी, रीतभात, परतभेट म्हणून देतोच की
तोही भावनांचा, मनाचा प्रकार आहे,पण अश्या शुभेच्छा देणर्या व्यक्तीस थेट बुवाबाजी नादी लागलेल्या, नरबळी देणार्यांचे रांगेत उभे करणार असेल तर फार थोर वगैरे.......वगैरे

नाखुक साफगावकर

दीपक११७७'s picture

7 Dec 2017 - 1:09 pm | दीपक११७७

मला तर परसाला उघड्यावर (open space) बसलेला असतो ही गोष्ट आठवली, त्याला साप..... जातांना दिसतो इ. इ.

..................शेवटी त्याच्या पार्श्व भागातुन एक साप काढल्याचे एक डाॅक्टर त्याला खोट खोट सांगतात...
मग त्याची वळवळ थंबते इ.इ.

असं जर बरं वाटायचं असेल तर डॉ ने पहिल्या वेळेस औषधे दिली असतील तेव्हाच बरे वाटायला हवे ना? लक्षात घ्या पेशंट लहान मूल आहे, ज्याला सोनोग्राफी वगैरे शब्दांचा अर्थ देखील काळात नाही

दीपक११७७'s picture

8 Dec 2017 - 10:10 am | दीपक११७७
असं जर बरं वाटायचं असेल तर डॉ ने पहिल्या वेळेस औषधे दिली असतील तेव्हाच बरे वाटायला हवे ना?

त्या गोष्टीत साप पार्श्वभागतुन आपल्या शरिरात गेलाय असे त्या व्यक्तीस वाटत असते, जो पर्यंत तो साप काढुन टाकला जात नाही तो पर्यंत त्याला वळवळल्या सारख होत. हा सॉयकोलॉजीचा भाग आहे.

पण.. अश्या ब-याच घटना असतात ज्याला केवळ सॉयकोलॉजीचा भाग आहे असे म्हणुन सोडुन देने योग्य ठरणार नाही.

मराठी_माणूस's picture

7 Dec 2017 - 3:25 pm | मराठी_माणूस

आमच्या शेजारच्या गावात एक वेडसर गृहस्थ होते

वेडसर हे कशावरुन ठरवले ?

पिंपळाखाली आग घातली

म्हणजे काय ?

वेडसर हे कशावरुन ठरवले ? >> +१ काय काय केले
होत त्यांनी वेडं म्हणण्यासारखं?

दुसरी एक शंका: त्यांच्या बरं होण्याच्या थोडंफार आधी घरातल्या त्यांच्यापेक्षा मोठ्या कोणाचा मृत्यू झाला होता का? वडील, आई, मोठा भाऊ, बहीण ,माहेरी राहणारी आत्या, काका........

===
विशुमित, पुतणीला अजून ब्रेस्ट फीडिंग चालू होतं का? असेल तर तिच्या आईने गॅस होईल असे काहीतरी खाल्ले असेल. पुरणपोळी वगैरे. गॅस झाला कि रडतात बाळं २-३ तास. नंतर दमून झोपी जातात. डॉक्टर अधिक सांगू शकतील.

विशुमित, पुतणीला अजून ब्रेस्ट फीडिंग चालू होतं का?
==>> हो चालू होते.
असेल तर तिच्या आईने गॅस होईल असे काहीतरी खाल्ले असेल. पुरणपोळी वगैरे.
==>> आठवत नाही पण एवढे नक्की की त्यादिवशी घरातल्या सगळ्यांना जेवणाची देखील उसंत नव्हती.

गॅस झाला कि रडतात बाळं २-३ तास. नंतर दमून झोपी जातात.
==>> आईला तो अंदाज होताच पोट दुखत असेल तर लहान मुले रडतात. औषध देण्याचा प्रयत्न केला होता. पण ती रडून रडून दमून झोपी गेली नाही. उतारा टाकून आल्यावर ती अचानकच शांत झाली. नंतर ती २ तास खेळत होती. मग ती झोपली. ह्याला योगायोग म्हणा किंवा काही पण मला तरी आश्चर्य वाटले होते.

<<<डॉक्टर अधिक सांगू शकतील.>>>
==>> लहान मुलांचा दवाखाना १० किलोमीटर दूर असल्या कारणाने आणि रात्रीचे १० वाजून गेल्यामुळे डॉक्टरांकडे घेऊन जाऊ नाही शकलो.

लहान मुलांचा दवाखाना १० किलोमीटर दूर असल्या कारणाने आणि रात्रीचे १० वाजून गेल्यामुळे डॉक्टरांकडे घेऊन जाऊ नाही शकलो. >> तसं नव्हतं म्हणायचं मला. इथले डॉक्टर अंदाजाने सांगू शकतील काय झालं असेल असं म्हणत होते....

आनन्दा's picture

7 Dec 2017 - 9:51 pm | आनन्दा

#1 - उत्तर खाली दिले आहे रात्रीच्या वेळी मोठमोठ्याने गाणी म्हणत गावात फिरणे, कपड्यांची फारशी शुद्ध नसणे, वगैरे सामान्य लक्षणे म्हणता येतील, आणि त्यांना पूर्वीपासून ओळखणाऱ्या लोकांना जाणवण्याइतका फरक पडला होता. ते मुळात असे वेडे नव्हते, अचानक वेडे झाले होते, कारण नसताना.

#2 - नाही, ते 40 च्या पुढे वेडे झाले, 65च्या आसपास नॉर्मल झाले.

विशुमित यांच्या पुतणीबद्दल - माझ्यामते वर्षाच्या वाढदिवसाला मूल बाहेरचे सगळे पदार्थ खात असते, त्यामुळे आईने पुरणपोळी खाल्ली म्हणून त्याचे पोट फुगयाचे कारण नाही. फुगले असेल तर तिनेच केक खाल्ला म्हणून फुगेल..
हे सगळे ओन्ली ब्रेस्टफीड वाल्या मुलांचे आजार असतात. 1 वर्षाच मूल बऱ्यापैकी समज आलेलं असतं

डॉक्टर अधिक सांगू शकतील. पण सर्वसामान्य ज्याला वेडे म्हणतात ते आजार जन्मतःच असतात (सिझोफ्रेनिया, बायपोलर वगैरे) आणि टीनेजर पासूनच त्याची लक्षण दिसायला लागतात.

वय ४० ते ६५ म्हणजे डिप्रेशन असू शकते. यातून पूर्ण बरे होणे शक्य आहे. हा सगळा माझा अंदाज....

===
हे सगळे ओन्ली ब्रेस्टफीड वाल्या मुलांचे आजार असतात. >> हो फक्त ब्रेस्ट फीडिंगवर असलेल्या जवळपास प्रत्येक मुलासोबत कमीतकमी एकदा का होईना हा 2 तास रडण्याचा कार्यक्रम झालेला असतो. तेव्हा टेन्शन यायच ते येतच! पण हे कॉमन आहे :)

वेडसर माणूस ओळखायला फारसे कठीण जात नाही. त्याच्या सामान्य वागण्यातून ते सहज कळते.
सर्किट ची पुढची पायरी म्हणा ना.
फक्त तो माणूस अन्य वेड्यांसारखा स्वात:च्या विश्वात रममाण नव्हता, म्हणजेच मनोरुग्ण म्हणू हवे तर.

आग घातली म्हणजे पाला पाचोळा काड्या वगैरे एकत्र करून पेटवून दिले.. कारण काहीही असेल.

मराठी कथालेखक's picture

7 Dec 2017 - 4:12 pm | मराठी कथालेखक

माझ्या मित्राचा एक अनुभव ..
वरील अनुभव क्रमांक २ प्रमाणेच त्याच्या सहा वर्षाच्या मुलीचे पोट दुखत होते अनेक दिवस. बरेच डॉक्टर , स्पेशलिस्ट केलेत तरी पोटदुखी थांबेना. अनेक दिवस शाळा बुडाली.
अखेर मित्राने आणि त्याच्या बायकोने मन घट्ट केले आणि निर्णय घेतला... पोट दुखण्याची कितीही तक्रार केली तरी मु़लीला शाळेत पाठवायचेच.. काही दिवसांनी पोटदुखी थांबली.
:)

सर्वसामान्य पालकांना आपले मूळ फसवत असेल तर लगेच कळते. मी स्वतः या अनुभवातून गेलेला आहे. 2री 3री मध्ये केव्हातरी अचानक माझं पॉट बरोबर शाळेत जायच्या वेळेत दुखायला लागायचे. मी अक्षरशः गडबडा लोळायचो. लोकांना वाटलं मी फसवतोय. पण प्रत्यक्षात त्याचा जंतांशी काहीतरी संबंध होता. आणि औषधाने ते बरे झाले. त्यामुळे दम द्यायचा प्रयत्न त्यांनी केलेला असणारच यात काही शंका नाही..

बाय द वे आमच्याच गावात अश्या अनाकलनीय पोटाच्या दुखण्यामुळे एका माणसाने कुटुंबासकट आत्महत्या केली होती, त्याचा रेफरन्स मी यनावालांच्या धाग्यावर दिला आहे.

मराठी कथालेखक's picture

8 Dec 2017 - 12:25 pm | मराठी कथालेखक

माझ्या मित्राची मुलगी त्याला मुद्दाम फसवत होती असं नाही... खूप गोड आहे ती मुलगी , तिला अभ्यासही आवडतो. पण महिनाभर गावाला राहून आली, नंतर पहिलीला नवीन शाळा यामुळे बहूधा तिला शाळेत जायचा उत्साह नसावा. त्या काळात मित्त्र बायको, मुलीला घेवून माझ्या घरी भेटायला आला होता. पठ्ठीने आम्हा मित्रांना पाच मिनटं काही नीट बोलू दिलं नाही, तिला सतत आम्ही तिच्यासोबत हवे असायचो. रात्री झोपतानाही बायकोला सतत गप्पा मारायला , गोष्टी सांगायला लावल्या.
मग आम्ही अनुमान लावला की तिला सतत कुणीतरी लक्ष देतंय , आपल्या अवती भवती आहे, आपल्याला महत्व मिळतंय याची खूप सवय लागलीय. आणि शाळेत मात्र ती वर्गातल्या २०-३० मुलांच्या गर्दीतली एक असते ते तिला आवडंत नसावं.

हे खरे आहे, सर्वसामान्यपणे आपण प्रथम मुलांना धाक दाखवून शिस्त लावायव्हा प्रयत्न करतो.. पण ते खरे दुखणे असेल तर अश्या धाकाना पुरून उरते आणि मग त्याचा समाचार घ्यावा लागतो..

सांगावे की नाही, हा विचार करत लिहतोय..
कधीतरी लाल सुकलेल्या मिरच्या जाळून पहा.. व नंतर एकदा माझ्या घरी या!
इव्हाच्या (वय वर्ष 1) अंगावर उतरवून पेटत्या आगीत टाकून पण साधा धूर होत नाही, बाकी गोष्टी सोडाच.
आणि लाल मिरची म्हणजे बागडी लाल मिरची.

आणि हे सध्याचे सांगतोय! मी नास्तिक आहे हे सांगावे लागेल काही नवीन सदस्यांना. असो!

आनन्दा's picture

7 Dec 2017 - 11:34 pm | आनन्दा

मला अनुभव आहे.

ट्रेड मार्क's picture

8 Dec 2017 - 1:23 am | ट्रेड मार्क

माझ्या मुलीच्या बाबतीत कितीतरी वेळा असं झालेलं आहे की ती बराच वेळ खूप रडत आहे आणि कुठल्याही उपायाने रडणं थांबत नाहीये. पण दृष्ट काढल्यावर बटन बंद करावं तसं रडणं थांबलं. आमच्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत. स्वभावाने अतिशय चांगले, पण लहान मुलांना त्यांची दृष्ट लागते म्हणतात. माझी मुलगी १ वर्षाची असताना ते आमच्याकडे आले होते. १०-१५ मिनिटांसाठी बसले असतील पण त्यावेळेला माझ्या मुलीने जे भोकाड पसरलं ते काही केल्या थांबेना. तेव्हा आमच्या आजीबाई म्हणाल्या ते गृहस्थ येऊन गेलेत ना मग तिची दृष्ट काढून टाकू. दृष्ट काढल्या काढल्या लगेच रडणं थांबलं. हा प्रकार जेव्हा जेव्हा ते यायचे तेव्हा तेव्हा व्हायचा.

आमच्या शेजारी एक बाई राहायच्या त्या काळी जादू करायच्या. त्यामुळे त्यांचे ते विधी, त्या अनुषंगाने घडलेल्या अनाकलनीय घटना यांचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. त्यातल्या काही तर अगदी मृत्यूपर्यंत सुद्धा गेल्या आहेत. वेगळा धागा काढून ते अनुभव सांगीन.

काढाच, वाचायला आवडेल. माझेही काही अनुभव पुन्हा आठवले.

सुबोध खरे's picture

8 Dec 2017 - 10:10 am | सुबोध खरे

माझ्या मुलीच्या पोटात अगदी लहान असताना मधूनमधून दुखत असे. एकदा आमच्या सासू बाई आणि त्यांची आई आल्या होत्या तेंव्हा मुलगी एकदम कळवळून रडायला लागली तेंव्हा आमच्या आजेसासू बाईंनी तिची दृष्ट काढायला सांगितली. दृष्ट काढून दहा मिनिटे झाली तरी मुलगी रडायची थांबेना. मी नेमका तेंव्हा बाहेर गेलो होतो तेवढ्यात मी घरी आलो. तेंव्हा घरात तीन बायका चिंताक्रांत बसल्या होत्या. ( बायको, तिची आई आणि तिची आजी). मी रडणाऱ्या मुलीच्या पोटाला हात लावून पाहिला तर ते कडक लागले म्हणून मी मुलीचे पाय पोटाशी धरून थोडासा दाब दिला. मागून टूरूक करून आवाज येऊन गॅस बाहेर पडला आणि मुलगी खेळायला लागली.
असे पुन्हा झाले तेंव्हा तिला कॉलिमेक्स नावाचे औषध देत असू.पाच सात मिनिटात ती परत खेळायला लागत असे. याला infantile colic किंवा baby colic म्हणतात. बाळ काही मिनिटे कळवळून रडू लागते आणि बाळाची आई वडील आजी आजोबा इ नातेवाईक चिंताक्रांत होतात. मग सर्व तर्हेचे उपचार होतात आणि काकतालीय न्यायाने त्या उपायानंतर बाळ परत हसू खेळू लागते.
https://en.wikipedia.org/wiki/Baby_colic
गम्मत म्हणजे दृष्ट काढणे सारखे उपाय १०० % वेळेस लागू पडत नाहीत.पण जुन्या लोकांचे मानसिक समाधान होते म्हणून त्याबद्दल बोलत नाही.
हे दृष्ट काढणे हे हि एक कर्मकांडच आहे असे आमच्या एका पुरोगामी मित्राला सांगितले तेंव्हा तो अगतिकतेने म्हणाला घरच्या लोकांना का दुखवा. पण त्याची मुलगी कळवळून रडत होती तेंव्हा त्यालाही काही सुचत नव्हते हि वस्तुस्थिती. अर्थात पुढे त्याच्याही मुलीने माझ्यामुलीसारख्या कॉलिमेक्सच्या बऱ्याच बाटल्या( १५ मिली) संपवल्या.
हि कुणाच्याही भावनेवर टीका नाही. कृपया समजून घ्या
कर्मकांड हे संकटकाळी मानसिक आधार देते हि वस्तुस्थिती. मग ते संपूर्णपणे निरुपयोगी असते तरीही.

अॅमी's picture

8 Dec 2017 - 11:20 am | अॅमी

प्रतिसाद आवडला डॉक!

<<<मागून टूरूक करून आवाज येऊन गॅस बाहेर पडला आणि मुलगी खेळायला लागली.>>>
==>> एक्साक्टली असंच घडले होते. मला चांगले आठवते की आम्ही सर्वजण खूप हसलो होतो त्या टूरूक आवाजाने.
डॉक्टरांचा उतारा कामाला आला म्हणायचा.
धन्यवाद...!!

गॅस बाहेर पडला असेल तर संबंध गॅसशी आहे असेच म्हणावे लागेल..
खखोदेजा

चौकटराजा's picture

10 Dec 2017 - 6:20 am | चौकटराजा

हा टुरूक आवाज लय भारी आहे. त्यात सर्व दुखे: सम्पविण्याची ताकद आहे कारण त्यात ओम यातील फक्त मकार नाही अकार व उकार दोन्ही आहेत. अरे ! मलाही सुडो थेरम मांडायला यायला लागले की !

आनन्दा's picture

8 Dec 2017 - 2:20 pm | आनन्दा

आमच्याकडे हा गॅसेस चा कार्यक्रम रोज असतो, सर्वसामान्यपणे आमची मुलगी रडायला लागली की आम्ही हे सगळे प्रकार करतोच, अगदीच अती झालं तर ग्राईप वॉटर वगैरे, अजून कोलिकेड वगैरे वापरले नाहीये, आमचे डॉक्टर हे नॉर्मल आहे, वाट बघा म्हणून सांगतात.

बाकी सध्या आमची मुलगी बरोबर 6:45 ते 7 च्या दरम्यान सुरुवात करून 1 तास कुरकुर करत असते, ते काय असेल याचा विचार करतोय.. बहुधा अचानक अंधार पडल्यामुळे घाबरत असावी. परवाच हे कोरिलेशन लक्ष्यात आलंय.. सध्या तो वेळ मी तिला अलोकेट करून ठेवलाय..

अॅमी's picture

8 Dec 2017 - 2:42 pm | अॅमी

ती baby colic ची लिंक वाचली.
एकंदर हे 40% मुलांना होतं आणि त्यातल्या केवळ 5 ते 10% ना खरंच काही दुखणं असतं असं लिहिलंय.

आणि या किरकिऱ्या बाळांचा आईवडलांवरच जास्त परिणाम होतो.

मग खरेच काही दुखणे नाहीय हे कन्फर्म केल्यानंतर त्या बाळांना रडू देणे, उगाच काही शांतबींत करायचा प्रयत्न न करणे ठिक आहे का? पूर्वीतर ओपीयम वगैरे खाऊ घालून गुंगी आणून झोपवायचे..... रडणारच असतील आणि त्याच कारण कळणारच नसेल तर आटापिटा करण्यात काय अर्थ आहे?

आनन्दा's picture

8 Dec 2017 - 3:16 pm | आनन्दा

मी तरी तेच करतो.. लक्ष डायव्हर्ट करणे

सुबोध खरे's picture

8 Dec 2017 - 3:32 pm | सुबोध खरे

Infantile colic मध्ये मुलाच्या पोटात मुरडा(colic) झाल्यासारखं होतं त्यामुळे ते बाळ कळवळून रडतं. अशा वेळेस बाळाला रडू दिल्याने बाळाला काहीही फायदा होत नाही उलट तासन तास बाळ रडत असल्याने आईवर परिणाम होतो. सुरुवातीला बाळाला भूक लागली असेल म्हणून दूध पाजायला घेतले जाते पण पोट भरलेले असल्याने बाळ काही मिनिटात दूध पिणे बंद करते आणि परत रडू लागते अशा सतत प्रक्रियेने एखाद्या आईचे दूध आटण्याची शक्यता असते.
बाळाला रडत ठेवल्याने बाळाला काहीही फायदा होत नाही. कोलिकेड सारखे औषध निःशंक मनाने द्या. त्याचा कोणताही दूरगामी दुष्परिणाम होत नाही.
बाकी दृष्ट काढणे किंवा मीठ मोहऱ्या ओवाळून टाकणे याने घरच्या मोठ्यांचे मानसिक समाधान होत असेल तर त्यात आपण का खोडा घाला असे माझे विचार आहेत.

सुबोध खरे's picture

8 Dec 2017 - 3:38 pm | सुबोध खरे

बाळ दोन तास रडत राहिले तर आईची मनोवृत्ती सहा आठ तास अशांत (disrurbed) राहते. आपण आई म्हणून कमी पडतो आहोत असे सारखे वाटत राहते. बाळाचे लक्ष विचलित करणे जवळ जवळ अशक्य आहे कारण पोटात जोरात दुखत असेल तर ते शांत बसणार नाही. आईबाप जास्त जोराने आवाज करून त्याचा आवाज बुडवून टाकण्याचा प्रयत्न करतात. त्याचा बाळाला आणि आईवडीलाना दोघांना केवळ त्रासच होतो.

हो, पण रोज रडे त्याला कोण डरे?

बाकी मुलांचं मानसशास्त्र फारच दुर्बोध आहे.. आमच्या तेल लावणाऱ्या बाईने आमच्या मुलीला बहुतेक कधीतरी जास्त जोर लावला. त्यामुळे तिचा चेहरा दिसला की ती खवळते..

आणि तिच्यामुळे कोणाचाही चष्मा ती सहनच करत नाही..वय वर्ष 3 महिने पूर्ण नाही

धन्यवाद दोन्ही प्रतिसादासाठी _/\_

===
बाकी दृष्ट काढणे किंवा मीठ मोहऱ्या ओवाळून टाकणे याने घरच्या मोठ्यांचे मानसिक समाधान होत असेल तर त्यात आपण का खोडा घाला असे माझे विचार आहेत. >> याच्याशीदेखील वैयक्तिक पातळीवर सहमती आहे.
फक्त याचे खापर दुसर्या कोणा इसमावर फोडणे वगैरे सामाजिक पातळीवर ठीक नाही वाटत (वर एका प्रतिसादात आले आहे तसे)े

विशुमित's picture

8 Dec 2017 - 4:59 pm | विशुमित

<<<फक्त याचे खापर दुसर्या कोणा इसमावर फोडणे वगैरे सामाजिक पातळीवर ठीक नाही वाटत >>>
==>> प्रचंड सहमत.

लग्नानंतर काही वैदकीय कारणास्तव आम्हाला मूल होत नव्हते. एकदा एका मावस भावाच्या घरी गेलो असता त्याचे घरात एक लहान बाळ होते जे नुकतेच चालायला शिकत होते.
आमच्या सौ मला फक्त हळूच सांगत होती कि किती क्युट आहे बाळ , असे म्हणे पर्यंत ते बाळ चालताना खाली पडले.
त्याच्या आईने एवढ्या कुत्सित नजरेने पाहून आमच्या समोरून त्याला उचलून नेले कि जणू काही आमचीच नजर त्याला लागली.

अॅमी's picture

8 Dec 2017 - 8:31 pm | अॅमी

हेच माझ्या मनात होतं!
मुल न होणारी स्त्री, अविवाहित स्त्री, विधवा याच प्रायमरी टार्गेट असतात या ब्लेम गेम च्या.... नेहमीच!

नेमका हाच अनुभव मला माझ्या मुलीच्याबाबत आला. मला वाटते दुधामुळे गॅसेस धरले जात असावेत. लहानमुलांचा नेमका प्रॉब्लेम म्हणजे ती बोलु शकत नाहीत, त्यामुळे नेमके काय होतय हे कळतच नाही. माझी बायको लहान असताना तीला ओवा कुटून द्यायची. मी ही कॉलिमॅक्सच वापरले आहे.
या निमीत्ताने लोकसत्तामधे डॉ. ब्रम्हनाळकर मॅडम लिहायच्या, त्यांनी लिहीलेला एक किस्सा आठवला. एक लहान मुल त्यांच्याकडे अ‍ॅडमिट झाले होते. ते एकदा रडायला लागले ते काही केल्या थांबेच ना, शेवटी मॅडमनी त्याची तपासनी करण्यासाठी अंगातील कपडे काढले तर, कंबरेतील कडदोरा त्या मुलाच्या पोटात रुतला होता, सहाजिकच वेदनेने ते रडत होते. कडदोरा कापला आणि त्याचे रडणे एकदम थांबले. थोडक्यात काय, तर मुल रडण्याचे नेमके कारण समजले पाहिजे, जे सर्वात अवघड आहे. ;-)

प्रकाश घाटपांडे's picture

9 Dec 2017 - 9:38 am | प्रकाश घाटपांडे

कर्मकांड हे संकटकाळी मानसिक आधार देते हि वस्तुस्थिती. मग ते संपूर्णपणे निरुपयोगी असते तरीही.

मानसिक आधार त्या व्यक्तीला मिळतो ही उपयुक्तता नाही का? मग निरोपयोगी कसे? अंधश्रद्धांची देखील एक उपयुक्तता असते म्हणून त्या टिकून आहेत. ( संदर्भ- डॉ मिलिंद वाटवे यांनी विज्ञानातील अंधश्रद्धा या विषयावर दिलेले व्याख्यान)
प्लासिबो हा देखील एक परिणाम आहेच की आता चिकित्सकांना त्याचा परिणाम जाणवत नाही हे मी स्वानुभवाने सांगतो.

सुबोध खरे's picture

9 Dec 2017 - 10:26 am | सुबोध खरे

अमंत्रम अक्षरं नास्ती
नास्ती मूलं अनौषधम
अयोग्यो पुरुषो नास्ती
योजकस्तत्र दुर्लभ:
या नात्याने संपूर्ण निरुपयोगी असे जगात काहीच नाही
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे कि संकटकाल नसताना या कर्मकांडाचा नक्की उपयोग होताना दिसत नाही.
प्लासिबोचे सुद्धा असेच आहे. एखाद्याला उच्च रक्त दाब असेल तर त्यावरील औषध त्याचा रक्त दाब कमी करते पण तेच औषध सामान्य रक्तदाब असलेल्या माणसाचाही रक्त दाब कमी करते. पण प्लासिबो मध्ये असा परिणाम सामान्य माणसावर दिसत नाही. केवळ ज्याला मानसिक तणाव आहे त्याचा तणावामुळे वाढलेला रक्तदाब तेवढा कमी होईल.

चौकटराजा's picture

10 Dec 2017 - 6:25 am | चौकटराजा

कारण पेरेफेरल रेसिस्टन्स मुळे होणारा रक्तदाब प्लासिबो ने दूर होणार नाही. मन हे अव्यक्त इंद्रिय आहे त्याला प्लसिबो ठीक !

नमकिन's picture

30 Dec 2017 - 7:05 pm | नमकिन

वाचल्यावर असे आठवले की तुम्हाला २मुले आहेत, ही मुलीची कथा??

सिरुसेरि's picture

8 Dec 2017 - 1:28 pm | सिरुसेरि

रोचक अनुभव

मी पण अशा गोष्टी ऐकल्या आहेत पण मला विश्वास बसायला जरा कठीण जात.

जगात दोन प्रकारची स्पष्टीकरणे असतात. वैज्ञानिक आणि अवैज्ञानिक. तात्विक पातळीवर दोन्ही सारखीच कुचकामी असतात. मात्र वैज्ञानिक स्पष्टीकरण देणे नॉर्मल मानले जाते. अवैज्ञानिक स्पष्टीकरण मात्र स्वतःच्या इज्जतीच्या रिस्कवर द्यावे लागते.

विशुमित's picture

8 Dec 2017 - 6:46 pm | विशुमित

हि तात्विक पातळी काय असते ?

पैसे? तो माझा आणि त्या पुजार्‍याचा हिशोब आहे. तुमच्याशी काही संबंध नाही.

हे समजले नाही. तुम्ही पुजार्‍याला पैसे दिलेत असे का?

मी पुजाऱ्याला पैसे दिले +
मी माझे पैसे कोणाला, कशासाठी देतो तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे

हो पण हे आनन्दा का सांगताहेत? त्यांनी का पैसे दिले? की ज्याने पैसे दिले त्याने आनन्दांना असे सांगितले?

हिशोब देवळाचा पूर्वजन्मीचा पुजारी, म्हणजेच तो मुलगा आणि सदर व्यक्ती यांचा आहे असे त्यंचे मत.. त्यामुळे प्रत्यक्ष पैशाचा व्यवहार झालेला नाही.