Whats app वरील आहार-विहार मेसेज भाग -१

Primary tabs

दीपक११७७'s picture
दीपक११७७ in काथ्याकूट
5 Dec 2017 - 7:33 pm
गाभा: 

Whats app वर कधीना कधी आहार-विहार विषयीचे मेसेज सर्वांनी वाचले असणारच आहे. त्यातील किती गोष्टी ख-या आहेत व किती खोट्या या विषयी शंका मनात येतेच, ह्या शंकांचे निरसन बरेचदा होत नाही किंवा करता येत नाही. मला अस वाटतं की मिपाकर आश्या मेसेजची चिर फाड चांगल्या प्रकारे करतील व निर्विवाद सत्य बाहेर येईल. याच मालीकेतील पहीला मेजेस खाली प्रमाणे आहे

प्रत्येकाने लिहून ठेवा ही विनंती.

घसा दुखत आहे ?
घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण
पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी
कमी होते.

घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला
होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि
चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून
चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.
खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा
गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे.

कफ
झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व
मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.

तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे.
तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात
जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन
दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक,
सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन
हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला
की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ
कमी होण्यासही मदत मिळते.

घशात जळजळ, घसा बसणे- वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे.
बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या
गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.

पाय दुखणे
मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट
सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण
पाहातो. यावर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर
हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.

पोटदुखी
ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते.
लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते.
अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर
तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र
गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून
त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो

चरबी कमी करा
> शरीरात जास्त चरबी वाढलेली असणाऱ्यांसाठी चरबी कमी करण्याचा खात्रीशीर रामबाण उपाय येथे देत आहोत.
> साहित्य : १०० ग्राम मेथी, ४० ग्राम ओवा, २० ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.
> कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.
> हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.
> फायदे :
> ०१) जुनाट वातविकार कायमचा जातो.
> ०२) हाडे मजबूत होतात.
> ०३) काम करण्यास स्फूर्ती येते.
> ०४) डोळे तेजस्वी होतात.
> ०५) केसांची वाढ होते.
> ०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.
> ०७) रक्ताभिसरण चांगले होते.
> ०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.
> ०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते.
> १०) बहिरेपणा दूर होतो.
> ११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.
> १२) अॅलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.
> १३) दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.
> १४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.
> १६) ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते.
> १७) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.
> १८) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.
> १९) स्त्रियांना तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.
> २०) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.
> २१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
> २२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.
> २३) कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर

कृपया वाचा आणि लिहुन ठेवा
●●●● उपयोग होईल ●●●●
▪▪..आरोग्य टिप्स..▪▪
१) अम्लपित्त वाढलले असता ऊस खावे अथवा ऊसाचा रस प्यावा त्वरीत पोट साप होते. तसेच ऊस जेवना पुर्वी खाल्यास पित्त वाढ होत नाही.

2) आवाज बसला असता बारीक वस्त्रगाळ केलेला कात दोन घोट पाण्या सोबत घ्यावा त्वरीत घसा साफ होतो.

3) काविळ झाला असल्यास एक आठवडाभर रोज एक-दोन ऊस चाऊन खावे, किंवा दिवसातून ३/४ ग्लास ऊसाचा रस घेतल्याने रक्त तयार होण्याची क्रिया चालु होउन रूग्न बरा होतो. तसेच ताज्या गुळवेलीचा रस २० ग्रॅम खडीसाखर घालुन घेतल्यास सुध्दा काविळ बरा होतो.

४) सतत कान फुटत आसल्यास ऊसाचे कांडे गरम करून नंतर त्याचा रस काढून दोन- तिन चमचे कानात पिळल्यास कान फुटने कायमचे बंद होते.

५) केस येण्यासाठी व कोंडा नाहीसा होन्यासाठी :– वडाच्या कवळ्या पारंब्या वाटुन १०० ग्रॅम लगदा करावा त्यात एक लिटर तिळाचे तेल व ५० मि.ली. लिंबरस घालुन मंदाग्नीवर कढवावे. नुसते तेल राहीले असता ते गाळुन घ्यावे हे तेल नियमीत लावल्याने नविन केस यायला सुरूवात होते. व कोंडा सुध्दा नाहिसा होतो.

६) मुख दुर्गंधी :- तुरटिच्या पाण्याने गुळण्या केल्याने मुख दुर्गंधी तर जातेच व तोडाचे सर्व आजार सुध्दा दुर होतात.

७) दात दुखी :- वडाच्या पारंबिचे दातवन केल्याने दाताचे सर्व आजार बरे होतात. दाताचे किडने थांबते, दाताचे कवच पुन्हा तयार होते.

८) दमा :- दम्याचा त्रास असनाऱ्या रूग्नाने लवंग तोंडात ठेउन ति नरम झाल्यास खावी, असे एक-एक तासाने एक-एक लवंग खात रहावे दमा कमी कमी होत जाउन १/२ महिन्यात कायमचा नाहिसा होतो.

९) पोट साफ होण्यासाठी :- लसणच्या ८/१० पाकळ्या वाटुन तुपात तळुन सैधव लावुन दिवसातुन १/२ वेळेस खाल्याने पोट साप होते. तसेच तिळाचे तेल रोज अनशा पोटी २० मिली घेतल्याने पोट साप तर होतेच पण पोटाचे आन्सर सुध्दा बरे होतात.

१०) पोट दुखी :- आल्याचा रस, लिंबाचा रस व सैधव किंवा पादेलोन घालुन घेतल्याने पोट दुखायचे थांबते. तसेच हे मिश्रन रोज जेवना पुर्वी घेतल्याने अन्न पचन होन्यास मदत होते. हा उपक्रम जर एक वर्ष चालु ठेवला तर घशा पासुन गुद्दव्दारा पर्यत कॅन्सरची बाधा कधीच होनार नाही.

११) बल्डप्रेशर :- ६/७ लसणाच्या पाकळ्या आर्धा लिटर पाण्याच्या बाटलित टाकुन ति बाटलित हालवावी व नंतर दोन तास ठेवावी व त्या नंतर जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा हे पाणी प्यावे याने हाय बल्डप्रेशर कमी होउन नॉर्मल होतो.

१२) मुळव्याध :- रोज सकाळी तुळशीची पाने खल्याने मुळव्याध बरा होतो.

१३) मुतखडा :- पानफुटिचे पान व सोबत एक काळा मिरा असे दिवसातुन तिन वेळा खाल्याने मुतखडा १५ दिवसात गळुन पडतो.
▪नोट :-▪
मुतखडा असलेल्या व्यक्तीनी खालील वस्तु खावु नये –
१) आवळा २) चिकु ३) भेंडी
४) पालक ५) गोबी ६) काकडी
७) स्ट्रॉबेरी ८) वाटान्याच्या शेंगा
९) टोमॅटो १०) काळी द्राक्षे ११) काजु १२) कॉफी पिउ नये १३) मशरूम १४) वांगे.
कारण यात खूप कॅल्शियम जास्त असते.
▪माहीती संकलन व प्रसारण ▪ हिन्दवी चँरिटेबल ट्रस्ट
- इंद्रायणीनगर-भोसरी - पुणे
हार्ट अटॅक..???
घाबरू नका..!!!
सहज सुलभ उपाय...!
99 टक्के ब्लॉकेजेसना काढून टाकणारे पिंपळाचे पान...15 पिपळळाची पाने जी गुलाबी नसावीत,पण हिरवी,
कोवळी, चांगली वाढलेली असावीत...प्रत्येक पानांचे
वरचे टोक व खालचा जाड देठ पानाचा थोडाश्या भागासकट कापून टाका, मग सर्व पंधरा पाने
स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात ही पाने व एक ग्लास पाणी घालून मंद आचेवर उकळत ठेवा.जेव्हा पाणी(1/3)
एक त्रितीयांश उरेल तेव्हा उकळवणे बंद करा व गाळून घ्या...नंतर थंड जागी ठेवा.झाले आपले औषध तयार...!
हा काढा 'तीन भागात' प्रत्येक तीन तासांनी
सकाळपासून घ्यावयाचा आहे.हार्ट अटॅक नंतर लागोपाठ पंधरा दिवस अशा प्रकारे पिंपळकाढा घेतल्याने
ह्रदय पुनः स्वस्थ होते व पुन्हा हा दौरा पडण्याची
शक्यता राहात नाही...ह्रदय विकारी व्यक्तींनी ह्या ईलाजाचा प्रयोग अवश्य करून पहावा.. यातून कोणताही
साईड इफेक्ट होत नाही..!
पिंपळाच्या पानात ह्रदयाला शक्ति आणि शांती देण्याची अदभूत क्षमता आहे..!ह्या पिंपळकाढ्याचे
तीन डोस सकाळी 8.00वा., 11.00वा., व 2.00वा. म्हणजे दर तीन तासांनी घ्यावयाचे आहेत....डोस घेण्यापूर्वी
पोट रिकामी असता कामा नये. हलका, पाचक नाश्ता किंवा आहार केल्यानंतरच काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.
सदरच्या पंधरा दिवसांत तळलेले पदार्थ,भात व्यर्ज आहेत...तसेच मांस, अंडी, दारु, धुम्रपान पूर्णतः बंद करावीत... मीठ व तेलकट पदार्थ सेवन करू नये...
डाळींब, पपई, आवळा, लसूण, मेथी, सफरचंद,मोसंबी, रात्री भिजवलेले काळे चणे, गुगूळ,
मनुका,दही, ताक इ. घ्यावे...
"पिंपळकाढा घेऊन तर बघा..!"भगवंताने पिंपळाचे पान
ह्रदयाच्या आकाराचे कां बनविले आहे..?
हे आर्टीकल आपल्या पर्यंत Dr.Devendra Sathe
यांनी पाठवले आहे..!!!
आरोग्य वार्ता

"पाणी पिण्याची योग्य वेळ"
● 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर शरीरातील उर्जेला Activateकरतो.
● 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर -ब्लड प्रेशर त्रास संपवतो.
● 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -पचनक्रिया सुधारतो.
● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी -हार्ट अटैक पासुन वाचवतो.

जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीतदुखायला लागले,हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंतजाणवत असेल..तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेल, तर तुम्ही स्वत:ची मदत करूशकता....* जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत रहा.* प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.* दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांनाअधिकप्रमाणातऑक्सिजनमिळतो.* अशा वेळी खोकत राहिल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतचालू राहते.मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो.. कृपया जास्तीत जास्त लोकांना हि पोस्ट शेअर करा.का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात.....!!!

टिप:- वरिल मेसेज whats app वर आलेला असुन यातील दाव्यांचा उहापोह करण्यासाठी इथे दिला आहे

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

5 Dec 2017 - 9:33 pm | चौथा कोनाडा

ह्या असल्या व्हॉअ मेसेजकडं कश्या करता लक्ष द्यायचं ?

दीपक११७७'s picture

5 Dec 2017 - 10:45 pm | दीपक११७७

योग्य असल्यास स्वीकारायला काय हरकत आहे. पण लिहिलेले खरे असावे

चौथा कोनाडा's picture

6 Dec 2017 - 7:17 pm | चौथा कोनाडा

व्हाट्सप्प !!!!

व्हाट्सप्प वर कुणीही कसे ही कॉपी पेस्ट करतात, मला तरी विश्वासार्ह वाटत नाही.

तेव्हा फॉर्वर्ड्स योग्य कसे ठरवणार ?
त्यात काही चुकीचे लिहिलं असेल काय करणार ?
त्या पेक्षा पुस्तके/वृत्तपत्र/मासिकातील तज्ज्ञांच्या सदरावर विश्वास ठेवणे योग्य नाही काय ?

चांगला धागा आहे. जाणकारांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत..
प्रथम दर्शनी हे जे काही उपाय आहेत त्यात अपायकारक काही वाटत नाही. वैद्यकीय सल्ल्यांना पर्याय म्हणून नाही पण पूरक म्हणुन किंवा वैद्यकीय मदत मिळेपर्यंत हे उपाय आपण करूच शकतो.

दीपक११७७'s picture

5 Dec 2017 - 10:46 pm | दीपक११७७

++१
योग्य असल्यास नक्कीच

>>वैद्यकीय सल्ल्यांना पर्याय म्हणून नाही पण पूरक म्हणुन किंवा वैद्यकीय मदत मिळेपर्यंत हे उपाय आपण करूच शकतो.>>>

पूरक म्हणून कशाला? औषध हे गुणकारीच असायला हवे. एकमात्र सेवनाने रोग बरा झाला पाहिजे.

यातले काही सल्ले हे आजीबाईचा बटवा म्हणून उपयुक असू शकतात.
तब्बेत ठीक असताना ती टिकवण्यासाठी बटवा ठीक असतो.
पण रोग झाल्यावर कुठल्याही औषधा ची प्रमाणित मात्रा घ्यावी लागते. तेव्हा वैद्यकीय सल्ला हवा

दीपक११७७'s picture

6 Dec 2017 - 10:28 am | दीपक११७७

exactly

तब्बेत ठीक असताना ती टिकवण्यासाठी बटवा वापरायचा जेणे करुन डॉक्टर कडे जाण्याची गरज पडत नाही
subject to condition यातील दावे scientifically correct असावे.
आणि त्यावरच चर्चा व्हावी. नाहीतर नविन पिढीला acidity म्हण्टंले की ENO तत्सम आठवणार, पण साधे जिरे खाल्ले तरी तोच परीणाम होतो हे माहीत नसते.

पिंपळाच्या पणाबद्दल माहीत नाही, पण बाकीचे बरेचसे उपाय घरगुती म्हणून करायला चांगले वाटतात.

इथे संकलन केलेत तर बरे. जे योग्य वाटेल ते करायचे घरगुती उपाय.

अशी यादी आणि बटवा यात फरक असा असतो की आजी/आजोबांचा अनुभव गाठीशी असतो. त्यावर आपण निश्चिंत राहतो.

का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात.....!!!

ह्याचा अर्थ कुणाला लागलाय का?

चौथा कोनाडा's picture

7 Dec 2017 - 2:31 pm | चौथा कोनाडा

+१११

:-)))

का कुणास ठाऊक, पण असलं काही वाचलं की मला ज्याम हसायला येतं !

सुबोध खरे's picture

6 Dec 2017 - 7:50 pm | सुबोध खरे

शरीरात जास्त चरबी वाढलेली असणाऱ्यांसाठी चरबी कमी करण्याचा खात्रीशीर रामबाण उपाय येथे देत आहोत.
> साहित्य : १०० ग्राम मेथी, ४० ग्राम ओवा, २० ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.
> कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.
> हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.
> फायदे :
> ०१) जुनाट वातविकार कायमचा जातो.
> ०२) हाडे मजबूत होतात.
> ०३) काम करण्यास स्फूर्ती येते.
> ०४) डोळे तेजस्वी होतात.
> ०५) केसांची वाढ होते.
> ०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.
> ०७) रक्ताभिसरण चांगले होते.
> ०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.
> ०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते.
> १०) बहिरेपणा दूर होतो.
> ११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.
> १२) अॅलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.
> १३) दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.
> १४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.
> १६) ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते.
> १७) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.
> १८) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.
> १९) स्त्रियांना तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.
> २०) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.
> २१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हा
र्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
> २२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.
> २३) कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर

अतिशयोक्ती आणि बिनबुडाचे दावे आहेत एवढेच म्हणेन.
एकंदर सर्वच लेख हा केराच्या टोपलीत टाकण्याच्या लायकीचा आहे.
या सर्व व्हॉट्स अँप लेखाची व्युत्पत्ती आणि कार्यपद्धती(modus oprendi) काय आहे हे लक्षात घ्या.

हे आर्टीकल आपल्या पर्यंत Dr.Devendra Sathe
यांनी पाठवले आहे..!!!
आरोग्य वार्ता

हे हळूच मध्ये घुसवलेले आहे.
Dr.Devendra Sathe
N.D.D.Y., M.D.(AM),M.D.(Accu.), D.N.Y.S.,D.N.Y.T.,D.M.H.,M.B.A., Shri Datt Mahayog Sansthan at Sinor, Gujarat.
Vadodara, Gujarat, IndiaAlternative Medicine
हे यांचे लिंकेड इन वरील प्रोफाइल आहे.
अशा तर्हेने स्वस्त कीर्ती मिळवण्याचे प्रयत्न करणारे लोक आहेत. कारण आपण असे लेख वाचलेले असताना या डॉक्टरांचे नाव लक्षात राहते मग आपण त्या रस्त्याने जाताना यांची पाटी दिसली कि एकदम वाटायला लागते की अरे हे डॉक्टर तर फेमस आहेत.
पोटदुखी, पाठदुखी, डोकेदुखी या तीन आजारांपैकी एक तरी आजार १०० मध्ये ९० लोकांना कधीना कधी आणि पाळीचा त्रास हा १०० पैकी ८० महिलांना कधीना कधी होतोच. मग यांचे नाव आणि पत्ता आठवतो आणि मग जाऊन तर पाहू म्हणून लोक जातात.
हा आपला धंदा वाढवण्याचा एक असनदशीर मार्ग आहे एवढेच म्हणेन.
बाकी सर्व लोक सूज्ञ आहेतच

दीपक११७७'s picture

6 Dec 2017 - 11:24 pm | दीपक११७७

धन्यवाद सर, पण आम्हा सामान्य माणसांच्या (non doctor) मनात एक शंका आहे,

१:- एकीकडे अजारी असल्यास डाॅक्टरांना दाखवा अंगावर काढुन आजार मोठ करुन घेऊ नका अस सांगतात, व्हायरल फिवरसाठी डाॅक्टरांन कडे गेलो की ते antibiotics देतात इ. इ.
VS
२:- दुसरी कडे साध्या साध्या गोष्टी साठी antibiotics घेऊनका म्हणुन सुद्धा डाॅक्टरच सल्ला देतात, भारतीय लोक वारंवार antibiotics घेतात म्हणुन भरतात कोणत्याही antibiotics चा रेजीसटंट ६ महिन्यात तयार होतो करिता लोकांनी antibiotics सतत वापर करु नाही असे सुध्दा डाॅक्टरच सांगतात कृपया लोकसत्तेतील हा लेख वाचावा लोकसत्ता लेख

असे बरेच लेख आहेत जे avoid antibiotics -medicine for small problem असे सांगतात.
मग नेमक करायच काय असा प्रश्न येतो, कस ठरवायच antibiotics-medicine घ्यायच्या की नाही

परिणामी लोक alternative मेडिसिन -आजिचा बटवा या फंद्यात पडतात.

दीपक११७७'s picture

6 Dec 2017 - 11:24 pm | दीपक११७७

धन्यवाद सर, पण आम्हा सामान्य माणसांच्या (non doctor) मनात एक शंका आहे,

१:- एकीकडे अजारी असल्यास डाॅक्टरांना दाखवा अंगावर काढुन आजार मोठ करुन घेऊ नका अस सांगतात, व्हायरल फिवरसाठी डाॅक्टरांन कडे गेलो की ते antibiotics देतात इ. इ.
VS
२:- दुसरी कडे साध्या साध्या गोष्टी साठी antibiotics घेऊनका म्हणुन सुद्धा डाॅक्टरच सल्ला देतात, भारतीय लोक वारंवार antibiotics घेतात म्हणुन भरतात कोणत्याही antibiotics चा रेजीसटंट ६ महिन्यात तयार होतो करिता लोकांनी antibiotics सतत वापर करु नाही असे सुध्दा डाॅक्टरच सांगतात कृपया लोकसत्तेतील हा लेख वाचावा लोकसत्ता लेख

असे बरेच लेख आहेत जे avoid antibiotics -medicine for small problem असे सांगतात.
मग नेमक करायच काय असा प्रश्न येतो, कस ठरवायच antibiotics-medicine घ्यायच्या की नाही

परिणामी लोक alternative मेडिसिन -आजिचा बटवा या फंद्यात पडतात.

सुबोध खरे's picture

8 Dec 2017 - 10:59 am | सुबोध खरे

दीपक साहेब
आपण भारतीय लोक दोन्ही बाजूनी बोलतो.
मुख्यतः शहरात लोकांना सगळ्या गोष्टी तातडीने करून हव्या असतात. त्यामुळे विषाणू जन्य आजार किंवा ताप हा ७ दिवस राहतो हे स्वीकार करण्याची लोकांची तयारीच नसते. दोन दिवसात (किंवा आय टी मध्ये तर उद्याच) लोकांना कामावर हजर व्हायचे असते.
उद्या प्रेझेंटेशन आहे तेंव्हा उद्यापर्यंत घसा बरा झालाच पाहिजे म्हणून स्टिरॉइड घेण्याची तयारी असणारे रुग्ण माझ्या पाहण्यात आहेत.
आजारपणासाठी (आणि त्यातून बरे होण्यासाठी विश्रांती घेण्यासाठी) रजा घेणे हे लोकांना पटत नाही.
आजारपणाची रजा घेऊन फिरायला/ सहलीला जाणे आणि आल्यावर खोटे सर्टिफिकेट सादर करणे हा स्थायीभाव झालेला आहे.
यातून काय होते साधी औषध देणारा डॉक्टर चांगला नाही. दोन दिवसात ताप बरा झाला नाही कि लोक एकतर इंजेक्शन द्या म्हणून मागे लागतात किंवा सरळ दुसऱ्या डॉक्टरकडे जातात. मग त्याचा मानसिक दबाव डॉक्टरांवर राहतो आणि ते असे होऊ नये म्हणून पॉली थेरेपी किंवा सर्व औषधे एकत्र देतात.
ज्यात प्रतिजैविके सुद्धा येतात. जो फॅमिली डॉक्टर असे करत नाही त्याला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होईल अशी परिस्थिती आहे.
याला उपाय काय हे समाजानेच ठरवायची वेळ आली आहे.
antibiotic resistance हा प्लास्टिक पिशव्या किंवा बिस्लेरीचे पाणी यासारखा व्हॉट्स अँप विद्यापीठावर चघळण्याचा पण प्रत्यक्षात अमलात कुणी आणायचा? असा विषय आहे.
घरगुती औषधे याला विरोध असायचे कारण नाहीच. खोकला झाला तर जेष्ठमध, दालचिनी, लवंग आणि अडुळसाची पाने घालून काढा करून तीन वेळा प्यायला तर बहुसंख्य वेळेस खोकला बरा होतोच. पण चार दिवस थांबण्याची तयारी लोकांची नाहीच.
इतर पॅथीबद्दल न बोलणेच बरे.

दीपक११७७'s picture

8 Dec 2017 - 12:59 pm | दीपक११७७

खरे सर एकदम बरोबर आहे टाळी एका हताने वाजत नाही पेशंट ही तीतकेच जबाबदार आहेत.

दोन दिवसात (किंवा आय टी मध्ये तर उद्याच) लोकांना कामावर हजर व्हायचे असते ई . ई.

वरील वाक्याच्या अणुषंगाने माझ्या ऑफीस मध्ये घडलेले दोन किस्से सांगतो. दोन्ही पण स्त्रियाच आहेत ४५-५० वर्ष

१. एकीचे अधुन मधुन डोकं दुखत असे, म्हणुन फॅमीली डॉक्टरकडे जायची, त्यांनी एक गोळी लिहुन दिली पेनकिलर व नंतर च्या भेटीत ही पेनकिलर द्यायचे . बाईंना गोळी नेमक काय करते हे माहीत नव्हतं मग काय दुखलं डोकं की घे गोळी, तिन एक वर्ष हाच कार्यक्रम सुरु होत, एक दिवस फॅमीली डॉक्टर शहरात नव्हते म्हणुन दुस-या डॉक्टरांना दाखवले, त्यांनी टेस्ट लिहून दिल्या त्यात दोन्ही कीडण्या खराब झाल्याचे समजले.......

२. दुसरी पण स्वतःच्या मनाने पेनकिलर घ्यायची तीच्याही दोन्ही कीडण्या खराब झाल्याचे समजले.........

ह्या गोष्टी इथे यासाठी सांगीतल्या की, स्वतः च्या मनाने गोळया घेऊ नये, करीअर कीती मोठे केले तरी शेवट इतरांसारखाच होणार आहे आणि कीतीही कामे केले तरी कामे संपणार नाहीत. आयुष्य हे पिसाळल्या सारखे करीअरच्या मागे पळण्यासाठी मिळालेले नाही. छोट्या-छोट्या अजारांनसाठी आजीचा बटवा वापरा (योग्य शहानीशा करुन)