गुजरात विधानसभा निवडणुक-२०१७

गॅरी ट्रुमन's picture
गॅरी ट्रुमन in काथ्याकूट
1 Dec 2017 - 11:34 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,

गुजरात विधानसभा निवडणुकांसाठीचे पडघम वाजू लागले आहेतच. राज्यात विधानसभेच्या १८२ जागांसाठी ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होणार आहे तर मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. नेहमीप्रमाणे १८ डिसेंबरला सकाळपासूनच मिपावर ऑनलाईन असणारच आहे. या लेखातून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याविषयीचे माझे मत मांडणार आहे.

खालील नकाशात दाखविल्याप्रमाणे गुजरात राज्यात कच्छ, सौराष्ट्र, मध्य गुजरात, उत्तर गुजरात आणि दक्षिण गुजरात असे पाच विभाग आहेत.

Gujarat

(संदर्भः http://www.gujaratindia.com/images/guj-map-divied.jpg)

खालील तक्त्यात या विभागांमध्ये येणारे जिल्हे आणि एकूण विधानसभा मतदारसंघ दाखविले आहेतः

Regions

खालील तक्त्यात या विभागांमध्ये गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये निकाल कसे लागले हे बघता येईल.

1

२००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना करण्यात आली होती. त्यामुळे २००७ आणि २०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील विभागांमधील मतदारसंघांच्या संख्येत फरक होता हे या तक्त्याच्या शेवटच्या दोन कॉलमवरून कळेलच.

या तक्त्यावरून आपल्याला पुढील निष्कर्ष काढता येतातः

१. राज्यात भाजप सर्व विभागांमध्ये बर्‍यापैकी शक्तीशाली आहे. अनेकदा राज्यात सत्तेत असले तरी राज्याच्या सर्व विभागांमध्ये एखाद्या पक्षाची ताकद असतेच असे नाही. गुजरातमध्ये भाजपची अशी स्थिती नाही. २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्येच भाजपने काँग्रेसपेक्षा दोन जागा कमी जिंकल्या होत्या. इतर सर्व विभागांमध्ये भाजपने काँग्रेसपेक्षा बर्‍याच जागा जास्त जिंकल्या होत्या.

२. एकेकाळी दक्षिण गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष बर्‍यापैकी ताकद राखून होता. पण हळूहळू भाजपने काँग्रेसला तिथूनही हुसकावून लावले असे दिसते.

३. तक्त्यावरून कळेलच की मध्य गुजरातमध्ये २०१२ मध्ये २००७ च्या तुलनेत ४ विधानसभा जागा जास्त होत्या तर दक्षिण गुजरातमध्ये ३. सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमधील जागांची संख्या अनुक्रमे ४ आणि ३ ने कमी झाली. यातही अजून महत्वाचे म्हणजे मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागातील विधानसभा जागांची संख्या वाढली आहे तर ग्रामीण भागातील जागांची संख्या कमी झाली आहे. राज्यातील तीन सर्वात मोठी शहरे आहेत अहमदाबाद, सुरत आणि वडोदरा. त्यापैकी दोन, अहमदाबाद आणि वडोदरा मध्य गुजरातमध्ये आहेत तर सुरत दक्षिण गुजरातमध्ये आहे. २००७ मध्ये अहमदाबाद शहरामध्ये १२, सुरत शहरामध्ये ७ तर वडोदरा शहरामध्ये ३ जागा होत्या. त्या २०१२ मध्ये वाढल्या आणि अहमदाबादमध्ये आता १७, सुरतमध्ये ९ आणि वडोदरामध्ये ५ जागा झाल्या आहेत.

गुजरात हे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेले राज्य आहे त्यामुळे त्या राज्यात शहरी भागातील विधानसभेच्या जागांची संख्या वाढणे क्रमप्राप्त होते. भाजप शहरी भागांमध्ये बर्‍यापैकी बलिष्ठ आहे. त्यामुळे शहरी भागामधील विधानसभेच्या जागांची संख्या वाढल्याचा फायदा २०१२ मध्ये भाजपलाच झाला होता. मी म्हणत आहे की भाजप शहरी भागांमध्ये बलिष्ठ आहे. वर दिलेल्या तक्त्यावरून ते कळणार नाही. त्यासाठी आपल्याला राज्यातील शहरांमध्ये २०१२ च्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी कशी होती हे बघायला लागेल. ते खालील तक्त्यात दिले आहे.
1

यावरून एक महत्वाची गोष्ट स्पष्ट होते. २०१२ मध्ये भाजपने या शहरांमधील ४१ पैकी ३७ जागा जिंकल्या म्हणजे या शहरांमध्ये भाजपचा 'स्ट्राईक रेट' जवळपास ९०% होता. २०१२ मध्ये भाजपने पूर्ण गुजरातमध्ये १८२ पैकी ११५ जागा जिंकल्या होत्या. याचाच अर्थ ही शहरे सोडून राज्याच्या इतर भागांमधून भाजपने १४१ पैकी ७८ जागा जिंकल्या होत्या म्हणजेच ही शहरे वगळता भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५५% म्हणजे त्या मानाने बराच कमी होता. उरलेल्या १४१ जागांपैकी अनेक जागा निमशहरी भागातील आहेत. या जागांवर भाजपचा स्ट्राईक रेट ९०% नसला तरी ५०% पेक्षा नक्कीच बराच जास्त होता. म्हणजेच ग्रामीण भागातील विधानसभा जागांवर भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५०% पेक्षा थोडा कमीच होता. मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागांमधील जागा वाढल्याचा भाजपला कसा फायदा झाला हे त्यातून समजू शकेल.

गुजरात निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर २०१७ मध्ये काय परिस्थिती आहे याविषयी आता लिहितो.

२०१७ च्या परिस्थितीविषयीचे माझे मत

राज्यात भाजप मार्च १९९५ पासून (सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ या कालावधीतला खंड वगळता) सतत सत्तेवर आहे. इतकी वर्षे सत्तेत असल्यामुळे भाजपला प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसणे अपेक्षित आहे. त्यातच हार्दिक पटेलच्या आंदोलनामुळे भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले होते. २०१५ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शहरी भागात भाजपने आपला बालेकिल्ला राखला पण ग्रामीण भागात मात्र बर्‍यापैकी पिछेहाट झाली होती. अशावेळी भाजपला या निवडणुका जड जाणार का या प्रश्नाचे उत्तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा तौलनात्मक अभ्यास केल्याशिवाय मिळणार नाही. याविषयी मला पुढील मुद्दे मांडायचे आहेतः

१. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार
काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा लोकप्रिय स्थानिक चेहरा नाही हा पक्षापुढे असलेला मोठा अडसर आहे. भाजपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर केलाच पाहिजे ही गरज आता राहिलेली नाही. कारण नरेंद्र मोदींचे स्थान आता इतके मोठे झाले आहे की मोदी राज्यांमध्ये मुख्यमंत्री व्हायला जाणार नसले तरी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजप मोदींच्या नावावर मते मागू शकतो. उत्तर प्रदेशात त्यातून मोठे यश पक्षाने मिळवले होते. पण जर विरोधी पक्षांनी स्थानिक लोकप्रिय मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिला तर मात्र भाजपचा पराभव होऊ शकतो हे दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालातून कळतेच. गुजरातमध्ये काँग्रेसकडे असा चेहरा मुळातच नाही याचा त्रास काँग्रेसला होईल असे मला वाटते.

२०१२ मध्ये मी गुजरात विधानसभा निवडणुकांचा बराच अभ्यास केला होता.तेव्हा जाणवले होते की स्थानिक उमेदवार कोणीही असला तरी मतदारांपुढे मोदींचा चेहरा आणि त्यांची लोकप्रियता हे मुद्दे महत्वाचे होते म्हणजे एका अर्थी सर्व १८२ जागांवर भाजपकडून नरेंद्र मोदीच निवडणुक लढवत आहेत अशी परिस्थिती होती. आज मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून पंतप्रधानपदावर गेले असले तरी या परिस्थितीत फार फरक पडलेला दिसत नाही.

२. नोटबंदी आणि जी.एस.टी
नोटबंदी आणि जी.एस.टी चा भाजपला त्रास होईल का? हे दोन्ही निर्णय घेताना मोदींनी मोठी राजकीय जोखिम उचलली होती. व्यापारी आणि छोटेमोठे व्यावसायिक हा जनसंघाच्या दिवसांपासून पक्षाचा पाठिराखा होता. गुजरातमध्ये या वर्गाचे प्रमाण बरेच मोठे आहे.या वर्गातून करचुकवेपणाचे प्रमाण मोठे होते हे अगदी उघडे गुपित आहे. पण जी.एस.टी मुळे यांनाही कर भरणे सक्तीचे झाले आहे. त्यामुळे त्यांच्यात भाजपविरोधी असंतोष असणे अपेक्षित आहे. तरीही याविषयी मला दोन गोष्टी लिहाव्याशा वाटतातः

२अ: नोटबंदीमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे आणि त्याचे प्रतिबिंब उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये उमटणार असे चित्र उभे केले गेले होते. तसे काहीही झाले नाही. याचे कारण काय असावे? माझ्या मते नोटबंदीनंतर प्रथमच श्रीमंतांची तारांबळ उडत आहे, त्यांना बँकेपुढे रांगा लावाव्या लागत आहेत असे चित्र उभे राहिले. नाही म्हटले तरी गरीब वर्गात श्रीमंतांना असा त्रास द्यायचा निर्णय मोदींनी घेतला याचे समाधान वाटले असेल तरी आश्चर्य वाटायला नको. त्यातूनच पूर्वी भाजपला कधीही मत न दिलेल्या वर्गानेही भाजपला मते दिली. म्हणजे नोटबंदी आणि जी.एस.टी मुळे भाजपचा पारंपारिक समर्थक वर्ग जरी दुखावला गेला असला तरी त्याची भरपाई भाजपला पूर्वी कधीही मत न दिलेल्या वर्गाच्या समर्थनातून होऊ शकेल असे मला वाटते.

२बः दुसरे म्हणजे जरी नोटबंदी आणि जी.एस.टी हे निर्णय आवडले नसले तरी दुखावल्या गेलेल्या वर्गापुढे दुसरा कोणता समर्थ पर्याय आहे का? राहुल गांधींनी कितीही राणा भिमदेवी थाट आणला असला तरी त्यांच्या मर्यादा सर्वांनाच माहित आहेत. याविषयी भाऊ तोरसेकरांनी एका लेखात म्हटले आहे की ऐन दिवाळीत महाराष्ट्रात एस.टी चा संप झाला त्यावेळेनंतर टमटम, खटारा इत्यादी स्थानिक वाहतुक सेवांना पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त बरकत आली का? तर तसे होऊ शकले नाही कारण शेवटी गावांमध्ये सेवा पुरविण्यात एस.टीचा हात कोणी धरू शकत नाही.त्यामुळे लोकांना एस.टी शिवाय पर्याय नव्हता. भाजपची गुजरातमधील स्थिती काहीशी तशीच आहे.

३. हार्दिक-अल्पेश-जिग्नेश त्रिकूट
हार्दिक पटेलने भाजपपुढे सुरवातीला मोठे आव्हान उभे केले ही गोष्ट खरी आहे. पण काँग्रेसने त्याचा योग्य फायदा उचलला नाही असे म्हणावेसे वाटते. हार्दिक पटेलची मागणी आहे पाटिदार समाजाला आरक्षण द्यावे. आणि असे आरक्षण दिल्यास मुळात आरक्षण मिळणार्‍या ओबीसी समाजाच्या आरक्षणात आणखी एक वाटेकरी येणार म्हणून ओबीसींचा या पाटीदार आरक्षणाला विरोध आहे. ओबीसी नेता अल्पेश ठाकोरचे म्हणणे तेच आहे. म्हणजे हार्दिक आणि अल्पेश यांच्या मागण्या परस्परविरोधी आहेत. या दोघांनाही काँग्रेसने एकाच वेळी एकत्र आणले असले तरी त्यामुळे त्यांचे समर्थक मात्र दुखावले गेले आहेत हे नक्कीच.

सुरवातीला आपले आंदोलन गैरराजकीय असेल असे जाहिर करणार्‍या हार्दिकने नंतर काँग्रेसशी हातमिळवणी केली हे न आवडल्यामुळे हार्दिकच्या अनेक समर्थकांनी त्याच्या आंदोलनाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

त्याचप्रमाणे सुरवातीला हार्दिक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याच्याही बातम्या होत्या. तसेच नंतर हार्दिक समर्थकांना उमेदवारी द्यावी लागल्यामुळे काँग्रेसने काही मतदारसंघांमध्ये आधी जाहिर केलेले उमेदवार बदलले. काँग्रेसने उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाबरोबर युती करताना जी चूक केली त्याचीच पुनरावृत्ती गुजरातमध्ये होताना दिसत आहे. जो काही निर्णय असेल तो पडद्याआड घेऊन मग जाहिर करणे श्रेयस्कर ठरले असते पण काँग्रेसने घाईघाईत निर्णय घेतला हे जाहिर केले आणि दुसर्‍या पक्षाच्या हातात जास्त बार्गेनिंग पॉवर आपण होऊन दिली. आता दलित नेता जिग्नेश मेवानीने काँग्रेसबरोबर निवडणुक न लढवता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवायचे ठरवले आहे. इतके दिवस या त्रिकूटाचा पाठिंबा आपल्याला असणार असे चित्र काँग्रेसने उभे केले होते.

भाऊ तोरसेकरांनी हार्दिक पटेलविषयी एक म्हणणे मांडले आहे. ते म्हणतात की २०१२ मध्ये पाटीदार समाजाचे सर्वात ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून मोदींना आव्हान उभे करायचा प्रयत्न केला होता. त्याचे काय झाले? केशुभाईंच्या पक्षाला ३% मतेही मिळू शकली नव्हती. हार्दिक हा केशुभाईंपेक्षा जास्त लोकप्रिय आहे का? भाऊ तोरसेकरांनी आणखी एक मुद्दा मांडला होता. १९७० च्या दशकात गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झाले होते त्यावेळच्या विद्यार्थी नेत्यांची नावेही आपल्या आता लक्षात आहेत का? असे नेते येतात आणि जातात. विशेषत: धरसोडपणा केल्यास अशा नेत्यांची विस्मृतीत अस्तंगत व्हायची शक्यताच सर्वात जास्त.

४. काँग्रेसमधील लाथाळ्या
गुजरात निवडणुकांपूर्वी काही महिनेच शंकरसिंग वाघेला पक्षातून बाहेर पडले. वर दिलेल्या तक्त्यातून समजते की २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपपेक्षा २ जागा जास्त जिंकल्या होत्या. त्याच भागात-- पंचमहल, दाहोद, गोध्रा शंकरसिंग वाघेलांना काही प्रमाणावर जनाधार आहे. वाघेलांनंतर काँग्रेसचे अनेक आमदार बाहेर पडले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हार्दिक पटेलच्या समर्थकांना उमेदवारी द्यायला लागली म्हणून काँग्रेसने आधी उमेदवारी जाहिर केलेल्या काहींचे तिकिट कापले. हे सगळे प्रकार काँग्रेससाठी नक्कीच चांगले नाहीत. विशेषतः २२ वर्षांनंतर भाजपला हरवायची संधी प्रथमच चालून आलेली असताना एकदिलाने आणि व्यवस्थित आखणी करून निवडणुकांना सामोरे जायला पाहिजे होते. तसे होताना मात्र दिसत नाही.

काँग्रेस बर्‍यापैकी सुस्थितीत असलेल्या उत्तर गुजरातमध्ये (पाटण, बनासकांठा जिल्ह्यात) पूर आला होता. त्यावेळी काँग्रेसचे आमदार बंगलोरला जाऊन बसले होते हे चित्र उभे करण्यात भाजप बर्‍यापैकी यशस्वी झाला. जर पूर परिस्थिती हाताळण्यात अपयश आले असेल तर त्याचा दोष राज्य सरकारला जायला हवा. पण नेमक्या त्याचवेळी काँग्रेस आमदार बंगलोरला जाऊन बसल्यामुळे राज्य सरकारला 'तुम्ही काय केलेत' हा प्रश्नही काँग्रेसला विचारायची कोंडी झाली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकांविषयीचे माझे मत
या सगळ्या परिस्थितीत मला वाटत आहे की भाजपला या विधानसभा निवडणुका जिंकायची चांगली संधी आहे. सुरवातीला अनुकूल परिस्थिती असूनही काँग्रेसने नेहमीप्रमाणे सगळ्याचा विचका केलेला दिसत आहे. मला वाटते की भाजप १८२ पैकी १३० ते १३५ जागा जिंकेल. प्रत्यक्षात काय होईल हे १८ डिसेंबरलाच समजेल.

राजदीप सरदेसाईंचे गुजरातमधील राजकीय परिस्थितीविषयी एक विधान देऊन हा लेख संपवतो. राजदीप सरदेसाई म्हणतातः “Only anger can unseat BJP in Gujarat. At the moment, there is disappointment with BJP but not outright anger”

१४ डिसेंबरला दुसर्‍या फेरीतील मतदान झाले की नंतर एक्झिट पोल्सचे निकाल येतील. शक्य झाल्यास त्यापूर्वी मतमोजणीपूर्व धागा काढून कसेही निकाल लागल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतील याविषयी माझे मत मांडेन.

प्रतिक्रिया

अमितदादा's picture

10 Dec 2017 - 1:45 pm | अमितदादा

गुजरात ची निवडणूक दिवसो दिवस तीव्र उत्सुकतेचे होत चाली आहे. मोदी आणि भाजप यांची भाषणे विकासापासून दूर जाऊन जातीय आणि धार्मिक आणि विशेतः भावनिक होऊ लागलेत. भाजप nervous होऊ लागलीय [अर्थात भाजप अजून ही जिंकू शकते]
To keep Gujarat, Narendra Modi’s campaign detours from vikas to caste
मोदी आता विकासाचे बोलत नाहीयेत तर मला किती त्रास झाला, माझा काँग्रेस ने किती अपमान केला, काँग्रेस च्या एका पदाधिकार्याने माझे आई वडील कोण असे विचारले इत्यादी मुद्दे घेऊन मोदी भाषण करतायत.
अहो मोदी साहेब असे बोलणे चुकीचे असले तरी लोकांना एका लिमिट पेक्षा या गोष्टींची फिकीर नाहीये त्यांना विकास, आरक्षण, रोजगार, जमीन आणि शेती हे विषय महत्वाचे आहेत, उगाच मला कुणी चिमटा काढला, माझा अपमान झाला याबाबत ची रडा रडी बंद करा एका पंतप्रधानाप्रमाणे वागा आणि मुद्याच बोला, नाहीतर दिसला कॅमेरा की कर रडायला सुरू ही स्ट्रॅटेजी बंद करा.
आता हळूहळू मोदी पाकिस्तान ला निवडणुकीत घेऊन येतील असे दिसतंय.

विशुमित's picture

10 Dec 2017 - 2:21 pm | विशुमित

<<<आता हळूहळू मोदी पाकिस्तान ला निवडणुकीत घेऊन येतील असे दिसतंय.>>
==>> सकाळ पासून तेच चालू आहे सगळ्या टीव्ही चॅनेल वर,, राहुल गांधी, मनमोहन, अर्षद., पाकिस्तान, गुजरात का बेटा वगैरे वगैरे .... घसा बसला पार. चॅनेल वाल्यानी लगेच जाहिराती चालू केल्या.
तिकडे ते डिम्पल बॉय नी जिथे जिथे मंदिरे आहेत तिथे तिथे सभा आयोजित केले आहेत. एवढे व्रतवैकल्य आधी केले असते तर दोनाचे चार झाले असते.
हार्दिक भाऊ ला मुख्यमंत्री होयचंय कि काय या थाटात वावरत आहेत.
जिग्नेश/अल्पेश बद्दल अजून काही माहिती घेतली नाही.
हीच गुजरातच्या जनतेची नस आहे का, कि जो कोणी ती पकडण्याची धडपड करत आहे?
हेच गुजरात मॉडेल सगळ्या देशासाठी लागू करायचे होते म्हणून देशभर फिरवले होते का?
या पेक्षा आपला महाराष्ट्र लाख पटीने वैचारिक गुणवत्तेने नटला आहे.

गॅरी ट्रुमन's picture

10 Dec 2017 - 5:33 pm | गॅरी ट्रुमन

विरोधी पक्ष मोदींना का हरवू शकलेले नाहीत याचे उत्तरच तुम्ही तुमच्या या प्रतिसादातून दिले आहेत.

मोदी इतकी वर्षे विकासाचा मुद्दा मांडत होते तेव्हा इतर सगळे पण २००२ चे काय हेच टुमणे लावून बसले होते. यावेळीही मोदींनी विकासाचाच मुद्दा सुरवातीला प्रचारांमध्ये आणला होता. सुरवातीची भाषणे कोणताही पूर्वग्रह न ठेवता ऐकली तर ते समजेल. काँग्रेसनेही सुरवात 'विकास गांडा हुआ छे' म्हणून विकासाच्याच मुद्द्यावर केली होती. पण बहुदा त्या मुद्द्यावर आपण भाजपला हरवू शकत नाही हे लक्षात आल्यामुळे हार्दिक-अल्पेश-जिग्नेश या त्रिकूटाला बरोबर घ्यायच्या हालचाली सुरू झाल्या.या त्रिकूटाचा मुद्दा पूर्ण जातीयच आहे तेव्हा काँग्रेसला आता विकासाच्या मुद्द्यावर भाजपला घेरता येणे कठिण आहे. त्यातूनच काँग्रेसने मोदींना हातात आयते मुद्दे आणून दिले आहेत. चायवाला, नीच इत्यादी म्हणून. मोदींसारखा कसलेला राजकारणी आयत्या मिळालेल्या मुद्द्यांना थोडीच सोडणार आहे?

एकूणच इतकी वर्षे मोदी विकासाचा मुद्दा मांडत होते तेव्हा विरोधकांनी त्याचा विरोध केला. आता मोदी देशभक्तीचा मुद्दा मांडत आहेत तेव्हा 'विकासाचे काय' हे नवेच टुमणे लावले आहे. म्हणजेच होत काय आहे की मोदींनी काहीही केले तरी त्याला विरोध करायचा हा विरोधकांचा कार्यक्रम आहे हे लोकांना समजले नाही असे वाटत आहे का? आणि दुसरे म्हणजे निदान २०१४ नंतर प्रत्येक वेळा मोदी खेळवणार आणि सगळे विरोधक मोदींना पाहिजे त्या पध्दतीने खेळणार अशीच परिस्थिती आहे. आपण ठरवू त्या अजेंड्याप्रमाणे मोदी पावले उचलतील हा भ्रम आहे विरोधकांचा. २००२ पासून सगळ्या विरोधकांनीच मोदींना या प्रकाराला तोंड कसे द्यायचे याची इतकी प्रॅक्टिस दिली आहे की त्याचा उपयोग मोदी करणार नाहीत का?

अशा रिअ‍ॅक्शनरी वर्तणुकीतून मोदींना हरवायची शक्यता अधिकाधिक कमी होत जाणार आहे हे या विरोधकांच्या लक्षात कसे येत नाही हेच समजत नाही.

अमितदादा's picture

10 Dec 2017 - 5:50 pm | अमितदादा

विरोधी पक्ष अत्यंत हुशार किंवा विकास प्रेमी आहे हा माझा मुद्दा नाही. माझा मुद्दा हा आहे की भाजप हा सुद्धा काँग्रेस प्रमाणे जातीय आणि धार्मिक मुद्दे च निवडणुकीला वापरतो, आणि विकासाचा मुद्दा लोणच्या प्रमाणे तोंडी लावतो. भाजप हा काँग्रेस पेक्षा खूप वेगळा पक्ष आहे ह्या भाजप समर्थकांच्या दाव्याला माझा कायम विरोध आहे तेच मी माझ्या वरील प्रतिसादातून दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय. सगळे किंवा इतर लोक काय म्हणतात याशी माझा संबंध नाही, मला वैयक्तिक रित्या भाजप च्या भूमिकेत खूप बदल दिसतोय.
भावनिक मुद्यांचा भाजप ला किती फायदा होतो हे थोड्या दिवसात कळेल कारण याबाबत अंदाज बांधणे कठीण आहे, यापूर्वीच्या निवडणुकीत भाजप आणि मोदींनी प्रचंड फायदा उठवला होता हे सत्य आहे पण प्रत्येक निवडणुकीत हे असेच होईल असे म्हणता येणार नाही।
आतापर्यन्त मोदी action घ्यायचे आणि विरोधी पक्ष फक्त reaction ची भूमिका बजावायचे, परंतु आता काँग्रेस action मध्ये आहे आणि भाजप reaction मूड मध्ये आहे हे आपण मान्य कराल. जाहीरनामा प्रकरण, भावनिक मुद्दे, हार्दिक CD प्रकरण ह्याच गोष्टी सिद्ध करतय. पटेल आरक्षणावर न बोलणारे मोदी आता कुठे काँग्रेस ला प्रश्न विचारू लागलेत.
हे होऊन ही काँग्रेस जिंकणे खूप अवघड आहे परंतु भाजप ला नक्कीच निवडणूक सोपी नाहीये चुरशी ची झालीय, आता आहेत त्या पेक्षा जागा कमी होणे भाजप साठी धक्का असेल. भाजप ने जागा वाढवल्या तर मात्र काँग्रेस आणखी दुबळी होईल जे होऊ नये अशी माझी इच्छा आहे.

पगला गजोधर's picture

10 Dec 2017 - 7:09 pm | पगला गजोधर

"मोदींना हरवणे शक्य आहे".....

हा मेसेज जर या निवडणुकीतुन देशभर गेला, तर बीजेपी(एम)
गटाचे धाबे दनानेल...
या धाग्यावरील माझ्या पहिल्या प्रतिक्रियेत जर काळजी पूर्वक वाचलेत, आणि निःपक्षपाती पणे जर मी काय म्हणू इच्छित आहे, हे समजावून घेतले तर पहा...
आता बीजेपी(एम) गटापुढे काठावर जिंकणे हे म्हणजे, ए टी के टी सारखेच आहे, एम गटाला फक्त व फ़क्त स्वीपिंग व्हिक्टरी तारून नेईल,
नाहीतर अंतर्गत लाथाळ्या, शिवसेने सारखे एन डी ए घटक,
डोकेदुखी अजून वाढवतील...
ज्याला पप्पू म्हणून हिनवले त्याच्या समोर जिंकण्यासाठी कुथाव लागत असेल अन तेही होमपिच वर तर मग, थोडंस अवघडच आहे....
धरतीपुत्र म्हणून सर्वोच्य पदी ज्या जनतेनं नेलं, त्या जनतेनं
आपल्या आशा अंकांक्षेचा बळी द्यावा आणि त्यांचे सर्वोच्चत्व टिकवून ठेवावे , यासाठी गुजरातची जनता त्यांची वेठबिगर नाही,
हाच मेसेज आता समोरचे देण्याचा प्रयत्न करतील...

babu b's picture

10 Dec 2017 - 7:15 pm | babu b

हे धरतीपुत्र मला न उलगडलेले कोडे आहे. जगातील यच्चयावत सजीव धरतीपुत्रच असतात ना ?

पगला गजोधर's picture

10 Dec 2017 - 7:34 pm | पगला गजोधर

परसेप्शन...
मोदी व राहुल, यांच्या पैकी गुजराती जनतेला मोदी आपल्या मातीतले वाटतात म्हणुन मोदींच्या पोळीवर अंमळ थोडी जास्त तुपाची धार धरतील, जर दोघे पंगतीला असतील तर....

पगला गजोधर's picture

10 Dec 2017 - 7:36 pm | पगला गजोधर

प्रतिभाताई पाटील उपा च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार...
पण धरतीपुत्र म्हणून एन डी ए च्या शिवसेनेचे मत मिळाले....

नाय नाय. स्पेसमधे पण लाईफ असू शकते. कमित कमी ऑर्गॅनिक मॉलेक्यूल्स तरी असतातच.

पुंबा's picture

11 Dec 2017 - 12:48 pm | पुंबा

अगदी खरे आहे..
सारखं पटेल, गांधी, नेहरू, सावरकर या आणि असल्याच मुद्द्यांच्या आधारावर प्रचार चालू आहे(सगळ्याच पक्षांचा). आता काय संबंध या लोकांचा आताच्या समस्यांशी. ते बिचारे गेले मरून. आता, त्यांचं कशाला उकरून काढायचं? शिक्षण, आरोग्य, सिंचन, आदीवासींचे प्रश्न, पर्यावरण, कुपोषण या मुद्द्यांच्या आधारावर काही बोलले पाहिजे तर असलं जुनं उकरून काढत आहेत. आता, मला नावं ठेवतात म्हणून तो तुमचा अपमान असलं विचित्र लॉजिक घेऊन पंप्र प्रचार करताहेत. हा काय खुळचटपणा आहे? आणि तुम्ही अंदाज बांधलेलात तसे पाकिस्तान सुद्धा गुजरात निवडणुकीतील मुद्दा झालेला आहे. असं करून माझ्या मनातून मोदी उतरत चाललेले आहेत. २०१४ साली भाजपला मत दिलेले ते विकासासाठी आणि केवळ विकासासाठी. शिक्षण, आरोग्य या मुद्द्यांच्या बाबतीत काही अमूलाग्र बदल व्हावेत म्हणून. हे असलं रडकं, भवनिक अन धार्मिक, जातिय मुद्द्यांना हात घालण्याचे प्रकार करत राहतील तर मोदी लोकांच्या नजरेतून उतरतील असे मला वाटते.

mayu4u's picture

11 Dec 2017 - 2:53 pm | mayu4u

... राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला प्रधानमंत्री, नगरपालिका प्रचाराला मुख्यमंत्री हे पण मला खटकलं... यांनी अनुक्रमे देशाचा आणि राज्याचा कारभार चालवण्याकडे लक्ष द्यायला हवं. प्रचाराला उरलेला पक्ष आहे की!

अमितदादा's picture

11 Dec 2017 - 4:59 pm | अमितदादा

सहमत

सुबोध खरे's picture

10 Dec 2017 - 4:43 pm | सुबोध खरे

ओ साहेब
गुजरात निवडणुकीचा प्रचार परवाच थांबला आहे.
हे बाकी सर्व चालू आहे ते प्रेस्टिट्यूट लोकांचं टी आर पी साठी चालू असलेलं नाटक आहे.

दुसरे चरण वोटिंग अभि बाकी है.

अमितदादा's picture

10 Dec 2017 - 5:36 pm | अमितदादा

ओ काका, दुसरा टप्पा बाकी आहे अजून, प्रचार आणि प्रचारसभा चालू आहेत अजून माहिती घेऊन बगा जरा.

मार्मिक गोडसे's picture

10 Dec 2017 - 8:06 pm | मार्मिक गोडसे

ओ काका, दुसरा टप्पा बाकी आहे अजून, प्रचार आणि प्रचारसभा चालू आहेत अजून माहिती घेऊन बगा जरा.

घ्या सांभाळून त्यांचा केविलवाणा विनोद.

सुबोध खरे's picture

11 Dec 2017 - 12:15 pm | सुबोध खरे

@गोडसे बुवा
विनोद जिव्हारी लागलाय का?
हलके घ्यायला शिका.

सुबोध खरे's picture

11 Dec 2017 - 12:13 pm | सुबोध खरे

@ विशुमित अँड अमित
क्षमस्व गैरसमज झाला होता.

babu b's picture

10 Dec 2017 - 7:16 pm | babu b

ही निवडणूक एव्हीएमनेच आहे का? की ते , नवीन प्रिंट आउटची सोय असलेली मशीन आहे म्हणे, त्याने झाले आहे?

काल पहिल्या फेरीत झालेले ६८% मतदान आणि गुजरात मध्ये राहणारे नातेवाईक, मित्र व व्यावसायानिमित्ताने ओळखीचे झालेले काही व्यापारी ह्यांच्याशी झालेल्या बोलण्यावरुन असा अंदाज वर्तवायचे धाडस करतोय कि (अमित शहा व बाकीच्या कार्यकर्त्यांचा अंदाज १५०+ असला तरी) बीजेपी १४० चा आकडा गाठण्याची शक्यता आहे.

babu b's picture

10 Dec 2017 - 7:33 pm | babu b

छान . छान

इरसाल's picture

10 Dec 2017 - 9:39 pm | इरसाल

आज दुपारी शिवसेना शिवसेना अस स्पीकरवर घोषणा देत जातानाचे ऐकु आले.
पण जय महाराष्ट्र! असं काय ऐकु आल नाही, अस पण गुजरातमधे ते म्हटल तर कस होईल म्हणा.
मुद्दे काय मांडताय मतांसाठी तपास करावा लागेल.

गामा पैलवान's picture

11 Dec 2017 - 3:21 am | गामा पैलवान

पगला गजोधर,

एम गटाला फक्त व फ़क्त स्वीपिंग व्हिक्टरी तारून नेईल,
नाहीतर अंतर्गत लाथाळ्या, शिवसेने सारखे एन डी ए घटक,
डोकेदुखी अजून वाढवतील...

या विधानास फारसा आधार नाही. गुजरात भाजपमध्ये फारशा लाथाळ्या नाहीत. शिवसेनेसारखे एनडीएचे घटक तसेही डोकेदुखी वाढवणारे आहेतंच. गुजरातेतल्या यशाने त्यांची मात्रा कमी होणार नाही.

आ.न.,
-गा.पै.

गुजरात काँग्रेसच्या आय.टी. सेलचे प्रमुख आणि ए.आय.सी.सी चे मिडिया कोऑर्डिनेटर रोहन गुप्ता यांनी गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या जागांपैकी ६५ जागा काँग्रेस जिंकणार आहे असे चाणक्य या संस्थेच्या चाचणीत स्पष्ट झाले आहे असे खोटेच ट्विट केले. चाणक्यने त्याने लगोलग खंडनही केले आहे.

एकूणच सोशल मिडियावर दोन्ही बाजूंनी असत्याचा भडिमार करायचा प्रयत्न केला जात आहे हे वाईट आहे. त्यात हौशे फेसबुकी लोक असे करत असतील तर ते एकवेळ तरी समजू शकतो. पण पक्षाने अधिकृत केलेले लोकही असे कसे करायला लागतात हे समजत नाही.

गॅरी ट्रुमन's picture

11 Dec 2017 - 11:47 am | गॅरी ट्रुमन
babu b's picture

12 Dec 2017 - 12:26 am | babu b

https://youtu.be/ICmqBckmEkI

हा ऑनलाइन ओपिनियन पोल आहे , जो २ महिने सुरु आहे. वेबसाइटचे नावही चाणक्य इंडिया आहे.

babu b's picture

11 Dec 2017 - 12:15 pm | babu b

गुजरात निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे , असे साक्षात मोदीजीच बोलले आहेत. त्याचेही पुरावे ते देतील तर बरे होइल. म्हणजे कोण कुठे कुणाला भेटला , व्हिसा तारीख इ इ ..

विनाकारण आमच्या काँग्रेसवर किटाळ नको.

सुबोध खरे's picture

11 Dec 2017 - 12:50 pm | सुबोध खरे

आमच्या काँग्रेसवर
बढिया है?

गब्रिएल's picture

11 Dec 2017 - 12:50 pm | गब्रिएल

बाबू बी,
जरा टीवि बगा की ! काल मोदी झूट बोलतात आसं टीवीवर म्हण्णारा आनंद शर्मा, सोत्ता म्हंतोय की मणीच्या घरी पाकी अंबाशिट्टर, कसूरी, ममोसिंग, वग्रेवग्रेंची मिटिंग झाली. आनि काल टिवीवर काय झूट बोल्ला ते इसरून वर तोंड करून बोल्तोय की भेटले तर काय झालं सर्कार्ची परमिशन काढायला हवी होती काय. निर्लज्जपनाची पन एक शीमा आस्ती आसे तुमच्या शर्मा साय्बांन्ला सांगा, बबुवा ! =))

आकाश कंदील's picture

11 Dec 2017 - 2:26 pm | आकाश कंदील

बाबू जी जरा गौर फर्माइये

लोकमत मधील बातमी
http://www.lokmat.com/national/modi-accuses-facts-aiyars-meeting-was-hel...

महाराष्ट्र टाइम्स मधील बातमी
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/former-army-chief-dee...

babu b's picture

11 Dec 2017 - 2:42 pm | babu b

पेप्रात छापलं म्हणजे खरेच का ?

परदेशी माणूस येउन गेला याचे सर्वात विश्वासार्ह प्रूफ कोण् देउ शकेल ? सरकार उर्फ मोदी , मनमोहन की पेपरवाले ?

मग सरकार स्वत:चा डेटा न देता पेप्रांचा संदर्भ का देत आहे ?

आकाश कंदील's picture

11 Dec 2017 - 3:14 pm | आकाश कंदील

अग्गोबै म्हणजे नक्कीच माईसाहेब. सरकारच्या डेटावर तुमचा कुठे विश्वास बसणार काहीतरीच मागणी तुमची

babu b's picture

11 Dec 2017 - 4:13 pm | babu b

बाकी , ते आले , कुठे राहिले , काय चर्चा केली , तो एक वेगळा भाग झाला.

( पण दुसर्या देशात गेले की सत्ताधीशाऐवजी विरोधी पक्षाकडे जेवायला जावे , हा तर हिंदू शिकवणुकीचाच भाग आहे ना ?

महाभारतात उदाहरण आहे ना ? )

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Dec 2017 - 4:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

राहूल गांधी देवळात जातात की नाही? मंदीर-मस्जीद्,हार्दिक पटेलचे मनास न पटेल असे केलेले चित्रीकरण... सत्ताधारी भाजपाच्या जमीनीखालची वाळू सरकू लागली आहे असे ह्यांचे मत.

arunjoshi123's picture

11 Dec 2017 - 4:43 pm | arunjoshi123

जमिन कि वाळू?

मोदीसोबत भ्रमनिरास झालेल्या लोकायहो, तुमाला ज्याला मत द्यायचं त्याला द्या. पण मागे तुम्हीच दिलेलं मत आजही वैध आहे असं वागा.

पण मागे तुम्हीच दिलेलं मत आजही वैध आहे असं वागा.

ह्यामागे लॉजिक काय? तांत्रिक मुद्द्याचं म्हणत असाल तर आहेच वैध. वैध असल्यासारखे वागा म्हणजे काय? काय करायचं? प्रत्येक मुद्द्यावर सरकारची तळी उचलायची?
जर राईट टू रिकॉल असता तर आज ते मत वैध नाही असे म्हणून काही अ‍ॅक्शन घेता आली असती. सध्या तसे करता येत नाही निव्वळ या कारणापायी ते वैध आहे.

वैध असल्यासारखे वागा म्हणजे काय? काय करायचं?

चूक केली ना? मग भोगायची फळं. पुढच्या निवडणूकीपर्यंत दम धरायचा.
------------------------
आता विधानसभेला, ग्रामपंचायतीला बरोबर मतदान केलंत ना? मग सगळं व्यवस्थित होइल हळूहळू.

जर राईट टू रिकॉल असता तर...

कभी कभी मेरे दिल में
खयाल आता है
राईट टू रिकॉल असता तर
पता नहीं मैंने क्या क्या रिकॉल किया होता।

प्रत्येक मुद्द्यावर सरकारची तळी उचलायची?

सरकारच्या प्रत्येक निर्णयाला तात्विक, कायदेशीर आणि नैतिक पातळीवर तुम्ही जबाबदार आहात. म्हणजे विद्यमान चुकाही तुम्हीच करत आहात आणि पश्चात्तापही तुम्हीच करत आहात असं वागायचं. इतर कोणी करत आहे अशी वाक्यरचना करायची नाही.

हे सगळं सांगणारे तुम्ही कोण?
आम्हाला संवैधानिक अधिकार आहेच विरोध करण्याचा किंवा कुठल्याही माध्यमातून आमचे मत व्यक्त करण्याचा. तो आम्ही बजावतोय. एकदा सरकार निवडून दिलं की झालं असं असतं तर मग आणिबाणीला विरोधच नव्हता करायला हवा जनतेने.

हे सगळं सांगणारे तुम्ही कोण?

चर्चा अगोदर परिचय करून मग करायची असते हे विसरलोच एक मिनिट. हॅलो, मी अरुण जोशी.
(अवांतर - यनावालांनी मी कोण चे उत्तर म्हणून आधार कार्ड वरचे नाव पुरेसे आहे हे मिपावर सिद्ध केले आहे. http://www.misalpav.com/node/41497 ओळ २७. त्या कृपाकणाचा लाभ घेत उत्तर दिले आहे.)

आम्हाला संवैधानिक अधिकार आहेच विरोध करण्याचा किंवा कुठल्याही माध्यमातून आमचे मत व्यक्त करण्याचा.

कोणत्या कायद्यानुसार तुम्हाला विरोध करायचा अधिकार आहे म्हणे? आम्हाला देखील सांगता का? आम्हाला देखील खूप गोष्टींचा विरोध करायचा आहे.
शिवाय आपणांस मत व्यक्त करावयाचा अबसॉल्यूट अधिकार आहे का?
आणि तो फक्त तुम्हालाच आहे का?
मला नाही का?
----------------------
तुमचा कोणता अधिकार मी कधी अमान्य केला?
प्रत्येक अधिकाराच्या वेळी संविधानाचा दाखला द्यायची काय गरज? आपण मनुश्ञ म्हणून संवाद करू शकत नाही का?
---------------------------
तर थोडक्यात, प्रश्न हा मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचा नसून मताच्या योग्यतेचा आहे. तुम्हाला मत व्यक्त करायचा १००% अधिकार असला तरी ते मत चुकिचे असू शकते म्हणून मी बापडा काहीतरी संवाद साधत आहे.
==================================

एकदा सरकार निवडून दिलं की झालं असं असतं तर मग आणिबाणीला विरोधच नव्हता करायला हवा जनतेने.

आणिबाणि असो नैतर मोदी, मत दिल्यावर जो विरोध करायचा आहे तो स्वतःच्या चुकिचा विरोध आहे अशा ग्लानीपूर्ण भावनेने करावा. घटनेने आपल्याला चुकिची सरकारे निवडून द्यायचा नि त्यानंतर त्यांच्या नावाने खडे फोडायचा अधिकार दिला आहे असा विपर्यास्त अर्थ काढू नये.
मोदिंना शिव्या घालण्याअगोदर स्वतः काय चूका केल्या, मतदानावेळी कोणत्या गोष्टी नजरेआड केल्या त्या सांगा मंजे आमच्यासारख्यांना मार्गदर्शही होइल.

मोदी ज्या पद्धतीने पाकिस्तान चा प्रचारामध्ये उपयोग करून घेत आहेत किंवा ज्या पद्धतीचे आरोप करत आहेत ते एका पंतप्रधानाला न शोभणारे आहेत, पंतप्रधान पदाची किमंत उतवणारे आहेत. कॉंग्रेस च्या लोकांची पाकिस्तानच्या अधिकारी शी झालेल्या मिटिंग बद्दल मोदी किंवा भाजप प्रश्न जरूर विचारू शकते , परंतु गुजरात च्या निवडणुकीत पाकिस्तान दखल देतोय किंवा तो कॉंग्रेस च्या बरोबर आहे असे direct किंवा indirect सुचवणे हे अत्यंत धोकादायक आहे, जर असा भीषण प्रकार होत असे तर पंतप्रधानाच्या पदावर ५६ इंच छाती घेवून अजून का बसून आहात, करा न कारवाई. तुमच्या देखरखीखाली हे होत असे तर तुमचा काय उपयोग? मुळात हे आरोप निवडणुकीपुरते आहेत ते एकवेळ अमित शाह यांनी केले असते तर ठीक होत परंतु पंतप्रधानांनी ते करण हे अत्यंत घाणेरड आहे, कारण हा राष्ट्रीय सुरक्षा आणि निवडणुकीची विश्वासाहर्ता याचा मुद्दा आहे. मोदि निवडणूक जिंकण्यासाठी कोणताही पातळीला उतरू शकतात हे सिद्ध होतंय.
Pakistan working with Congress to beat BJP in Gujarat polls: PM
राष्ट्रीय निवडणुकीत पाकिस्तान चा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित म्हणून समजू शकतो पण गुजरात च्या निवडणुकीत काही वेळा त्याचा वापर समजू शकतो परंतु सगळी भाषणे पाकिस्तान भोवती फिरवणे, तेही कॉंग्रेस जिंकण्याची श्यक्यता कमी असताना , हे वैफल्याच लक्षण आहे. गुजरात च्या निवडणुकीत अफगाणिस्तान, पाकिस्तान, बंगालदेश यावर नको तर लोकल मुद्द्यवर बोला. किती रोजगार निर्मिती केली, गरिबी किती दूर झाली, किती विकास झाला, पायाभूत सुविधा किती उभारल्या, नोटाबंधी आणि gst कसे चांगले हे सांगा.
'Reject PM Modi's falsehoods'

गॅरी ट्रुमन's picture

11 Dec 2017 - 5:28 pm | गॅरी ट्रुमन

मोदींनी काहीही केले तरी ते अनेकांच्या दृष्टीने पंतप्रधानपदाची शान घालवणारेच असते. त्यामुळे असले कोणी काही बोलले तर माझ्यासारखे सामान्य लोकही फार दखल घेणार नाहीत. तेव्हा मोदी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतील हे नक्कीच. आणि मोदींनी कुठलेही मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात मांडले तरी ते सोडून इतर मुद्दे मांडा असेच विरोधक म्हणणार. म्हणजे इतकी वर्षे विकासाचा मुद्दा होता तेव्हा २००२ चे टुमणे, आता वेगळे मुद्दे आल्यावर 'अरे पण विकासाचे काय'. हा प्रकार विरोधक चालूच ठेवणार आहेत. त्यामुळे असले कोणी काही बोलायला लागले तर त्याची दखलही घेऊ नये.

राहुल गांधी, केजरीवाल, कम्युनिस्ट आणि जवळपास सगळ्या विरोधकांनी अफजल गुरूच्या 'पुण्यतिथीनिमित्त' कार्यक्रम साजरा करणार्‍या कन्हैय्याकुमार आणि इतर जे.एन.यु च्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे कॉंग्रेसचा जीव पाकिस्तानसाठी तीळ तीळ तुटतो असे कोणी म्हणत असेल तर मला तरी त्यात अजिबात म्हणजे अजिबात चुकीचे वाटत नाही.

अमितदादा's picture

11 Dec 2017 - 5:42 pm | अमितदादा

राहुल गांधी, केजरीवाल, कम्युनिस्ट आणि जवळपास सगळ्या विरोधकांनी अफजल गुरूच्या 'पुण्यतिथीनिमित्त' कार्यक्रम साजरा करणार्‍या कन्हैय्याकुमार आणि इतर जे.एन.यु च्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे कॉंग्रेसचा जीव पाकिस्तानसाठी तीळ तीळ तुटतो असे कोणी म्हणत असेल तर मला तरी त्यात अजिबात म्हणजे अजिबात चुकीचे वाटत नाही.

इथ अफझल गुरु सारख्या अनेक दहशतवादी लोकांना direct किंवा indirect पाठींबा देणाऱ्या PDP बरोबर भाजप सत्तेत आहे हि तुमच्या दृष्टीने देशभक्तीच असेल असे मी समजतो. मेह्म्बुबा मुफ्ती मुख्यमत्री नसताना अनेक आतंकवाद्यांच्या दफनविधीला जातीने उपस्थित राहत होत्या. Read Here

त्यामुळे असले कोणी काही बोलले तर माझ्यासारखे सामान्य लोकही फार दखल घेणार नाहीत.

मोदींना विरोध करणारे सुधा आमच्यासारखे सामान्य लोकच आहेत याची कृपया नोंद घ्यावी.

गॅरी ट्रुमन's picture

11 Dec 2017 - 5:59 pm | गॅरी ट्रुमन

इथ अफझल गुरु सारख्या अनेक दहशतवादी लोकांना direct किंवा indirect पाठींबा देणाऱ्या PDP बरोबर भाजप सत्तेत आहे हि तुमच्या दृष्टीने देशभक्तीच असेल असे मी समजतो.

वाटलंच होतं हा मुद्दा कसा आला नाही ते. याविषयी माझ्या माहितीप्रमाणे मिपावरही बरीच चर्चा झाली आहे. सरकारमध्ये प्रवेश मिळवून प्रशासनावर काही प्रमाणात वचक बसवायला मदत मिळाली आहे. निर्मला सीतारामन यांनी मध्यंतरी जम्मू-काश्मीर पोलिसांचे दहशतवादविरोधी मोहिमेतील कारवाईबद्दल मुद्दामून अभिनंदन केले होते. आतापर्यंत काश्मीरात लष्कर आणि बी.एस.एफ यांनी दहशतवाद्यांविरोधात नेहमीच सक्रीय भूमिका घेतली आहे. पण काश्मीर पोलिसांनी पुढाकार घेऊन इतकी सक्रीय भूमिका कधी घेतली होती हे तपासून बघा. या वर्षी रेकॉर्ड प्रमाणावर दहशतवादी मारले गेले आहेत त्यात पोलिसांची भूमिका मोठी आहे. आता कनेक्ट द डॉट्स.

दुसरी गोष्ट म्हणजे सरकार पी.डी.पी चे बनणे क्रमप्राप्त होते. कारण आकडेच तसे होते. अशावेळी सरकारमध्ये काँग्रेस जाऊन बसली असती तर पी.डी.पी ला त्यांच्या कारवाया करायला पूर्णच मोकळीक मिळाली असती. तिथे पी.डी.पी वर लगाम घालायला भाजप सत्तेत गेला आहे असे का म्हणू नये? १९४० च्या दशकात अगदी हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या परस्परभिन्न पक्षांनीही हातमिळवणी केली होती आणि काही प्रांतिक सरकारमध्ये मुख्यमंत्री लीगचा आणि काही मंत्री हिंदू महासभेचे अशीही परिस्थिती होती. त्या सरकारमध्ये हिंदू महासभा का सामील झाली? त्याचे कारणही तेच. लीगला सत्तेत राहून लगाम घालायचा प्रयत्न करायचा.

तिसरे म्हणजे भाजप बरोबर सत्तेत राहण्यासाठी पी.डी.पीला त्यांचा अजेंडा डायल्युट करणे भाग पडले असे का म्हणायचे नाही? भाजपनेच सत्तेसाठी तडजोड केली असे का म्हणायचे?

तेव्हा काश्मीरातील परिस्थिती वेगळी आहे. त्याला हे नेहमीचे मापदंड लावता येणार नाहीत.

तिसरे म्हणजे भाजप बरोबर सत्तेत राहण्यासाठी पी.डी.पीला त्यांचा अजेंडा डायल्युट करणे भाग पडले असे का म्हणायचे नाही?

पॉइंट है।

अमितदादा's picture

11 Dec 2017 - 6:15 pm | अमितदादा

अगदीच ज्या न्यायाने भाजप PDP च्या फुटीरवादी मुद्यांना पाठींबा न देता , common ground वर किंवा common agreed agenda वर काम करतंय. तसेच गांधी किंवा केजरीवाल यांनी कन्हैयाकुमार च्या फुटीरवादी विचारांना पाठींबा न देता, आदिवासी, दलित, कामगार तसेच इतर गोष्टी बाबतची त्याची मते यांना पाठींबा देवू शकते ना=:) कि एखाद्याला पाठींबा द्यायला त्याच्या A to Z मताशी १०० % सहमत असावे लागते असे तुमचे मत आहे? कि देशभक्तीच certificate भाजप वाटत फिरणार आहे.

गॅरी ट्रुमन's picture

11 Dec 2017 - 6:24 pm | गॅरी ट्रुमन

काश्मीरातील परिस्थिती वेगळी आहे आणि इतर ठिकाणचे निकष तिथे लावणे अयोग्य आहे हे वर लिहिलेच आहे.

तसेच गांधी किंवा केजरीवाल यांनी कन्हैयाकुमार च्या फुटीरवादी विचारांना पाठींबा न देता, आदिवासी, दलित, कामगार तसेच इतर गोष्टी बाबतची त्याची मते यांना पाठींबा देवू शकते ना

राहुल आणि केजरीवाल यांनी नक्की कोणत्या गोष्टीवर आणि कधी कन्हैय्याला पाठिंबा दिला आहे हे जरा तपासून बघा. उगीच काहीतरी लिहायचेच आहे म्हणून लिहू नका.

अमितदादा's picture

11 Dec 2017 - 6:47 pm | अमितदादा

गांधी किंवा केजरीवाल यांनी कन्हैयाकुमार च्या फुटीरवादी विचारांना पाठींबा दिला आहे असे माझ्या वाचनात अजून तरी आले नाही, तरीही अधिक शोध घेवून पाहतो. बाकी तुमच्या मताशी सहमत नाही एवढ सांगतो. गुजरात मध्ये मोदीच्या चुकांना त्यांचे समर्थक ज्या पद्धतीने पाठीशी घालतायत ते पाहून आश्चर्य वाटल, असो बगुया १८ ला याचा किती फायदा होतोय भाजप ला ते.

तेव्हा काश्मीरातील परिस्थिती वेगळी आहे. त्याला हे नेहमीचे मापदंड लावता येणार नाहीत.

१००% सहमत .. सरकारला फक्त आपला विचार करून चालत नाही , सर्वान्गीण विचार करावा लागतो.

काश्मिर मधे पी.डी.पी शी युती ही माझ्या मते आम्ही शान्तता प्रस्थापित करण्यासाठी आणि राखण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत हे जगाला दाखविण्याचा भारत सरकार( भा.ज.पा किन्वा कोन्ग्रेस) ची योजना आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मिर मधे लोकशाही कशी नाही आणि आम्ही कसा प्रामाणिक प्रयत्न करतो हे भारत दाखवतो. त्यामुळे बाकी देश पाकिस्तानवर दबाव टाकतात आणि त्यान्च्या सार्वमताच्या प्रस्तावाला विरोध करतात.

नावापुरता नागरी सरकार आणि आतून लष्कर नियन्त्रीत कारभार अशी आत्ताची परिस्थिती आहे.त्यामुळेच काश्मिर मधील अतिरेकी मारले तरी जातात किन्वा शरण येतात.

arunjoshi123's picture

11 Dec 2017 - 6:08 pm | arunjoshi123

आपल्या लिंकेतून...

In fact, Chief Minister Mehbooba Mufti is widely reg­arded as a pioneer in this. When she was an Opp­osition leader, she would visit the houses of militants who were killed and mourned their deaths. In 2002, when her party, the Peoples Democratic Party (PDP), won 16 of the 87 seats in the J&K assembly, it asked the militants to give up the gun as they now had “16 representatives in the assembly to plead their case”.

तेव्हा बाई नुकत्याच काँग्रेसमधून बाहेर पडल्या होत्या.
अ‍ॅनी वे, भाजपने एका शांतीवादी पक्षाला राष्ट्रीय प्रवाहात आणले आहे. मंजे आता त्या अशा भेटी देत नाहीत.
http://www.thecitizen.in/index.php/en/NewsDetail/index/3/10112/Mehbooba-...
आता त्या म्हणतात -
“It gives me immense happiness to see that 12 youth, who had joined militants in the last year, have returned to their homes. Our government will see to it that more youths who have deviated from the path are returned to their families safely," Mufti said.

मोदी ज्या पद्धतीने पाकिस्तान चा प्रचारामध्ये उपयोग करून घेत आहेत किंवा ज्या पद्धतीचे आरोप करत आहेत ते एका पंतप्रधानाला न शोभणारे आहेत, पंतप्रधान पदाची किमंत उतवणारे आहेत.

असेच वर्तन पुरोगामी क्लिंटनताई आणि ओबामाभाऊ करतात तेव्हा मात्र ते अत्यंत सुशोभनीय असते.

आणि निवडणुकीची विश्वासाहर्ता याचा मुद्दा आहे.

मग इ व्ही एम हॅक केलंय असं काँग्रेस १५ दा म्हणाली तेव्हा निवडणूकीची विश्वासहर्ता वाढवायची होती का?

कारण हा राष्ट्रीय सुरक्षा आणि निवडणुकीची विश्वासाहर्ता याचा मुद्दा आहे.

समजा मोदी खोटं बोलले असले तरी त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रीय सुरक्षा कशी बाधित होईल याचा मेकॅनिझम कळेल काय?

राष्ट्रीय निवडणुकीत पाकिस्तान चा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित म्हणून समजू शकतो पण गुजरात च्या निवडणुकीत काही वेळा त्याचा वापर समजू शकतो परंतु सगळी भाषणे पाकिस्तान भोवती फिरवणे, तेही कॉंग्रेस जिंकण्याची श्यक्यता कमी असताना , हे वैफल्याच लक्षण आहे. गुजरात च्या निवडणुकीत अफगाणिस्तान, पाकिस्तान, बंगालदेश यावर नको तर लोकल मुद्द्यवर बोला. किती रोजगार निर्मिती केली, गरिबी किती दूर झाली, किती विकास झाला, पायाभूत सुविधा किती उभारल्या, नोटाबंधी आणि gst कसे चांगले हे सांगा.

खरंय म्हणा तुमचं, पण गुजराती लोकांना देशाची काळजी पडलेली असते हो.

अमितदादा's picture

11 Dec 2017 - 7:14 pm | अमितदादा

@अजो साहेब
तुमच्या अनेक प्रतिसादानं आणि प्रश्नांना एकत्रित प्रतिसाद देतो
१. ओबामा आणि हिलरी याविषयी मी कोणतही मत प्रदर्शित केल नवते त्यामुळे मी त्याला उत्तर देवू शकत नाही
२. EVM च्या बाबत विरोधी नेत्यांच्या भूमिकीशी मी सहमत नाही, निवडणूक आयोगावर माझा पूर्ण विश्वासआहे. EVM छेडछेडीच्या काही घटना मध्ये संशय असेल हि परंतु पूर्ण निवडणूक फिरवणे अश्यक्य आहे. EVM मुळे कॉंग्रेस पंजाब मध्ये जिंकली हे विसरता कामा नये.
३. पाकिस्तान चा मुद्दा गुजरात मध्ये अति प्रमाणात वापरणे मला योग्य वाटत नाही.

तुम्ही एक ओळीचे प्रश्न विचारण्यापेक्षा तुमचे मत लिहित चला, मुद्देसुद्ध प्रतिसाद लिहून माझे मुद्दे खोडत चला हि विनंती.

हतोळकरांचा प्रसाद's picture

11 Dec 2017 - 10:22 pm | हतोळकरांचा प्रसाद

पाकिस्तान चा मुद्दा गुजरात मध्ये अति प्रमाणात वापरणे मला योग्य वाटत नाही.

या पद्धतीने आपल्या मूळ भूमिका सोडून चार पक्ष/लोक एकत्र येऊन जातीपातीच्या राजकारणाने निवडणुका जिंकायचा प्रयत्न करत असतील तर भाजपने काय वाट्टेल ते करावे आणि ते हाणून पाडावेत असं माझं वैयक्तिक मत आहे. बिहार मध्ये झाले ते पुन्हा होऊ देऊ नये. काय आहे जातीची गणिते घातली की जिंकता येतं हा चुकीचा पायंडा मोडून काढायलाच हवा!

पगला गजोधर's picture

11 Dec 2017 - 11:24 pm | पगला गजोधर

काय आहे जातीची गणिते घातली की जिंकता येतं हा चुकीचा पायंडा मोडून काढायलाच हवा!

होय बरोब्बर आहे तुमचं,
त्याऐवजी धर्मा धर्मांमधे पोलरायझेशन करून नाझी टाईप पोग्राम... असा नवा पायंडा पडायला हवा, असंच म्हणायचंय तुम्हाला सर....?

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Dec 2017 - 12:08 am | हतोळकरांचा प्रसाद

परत नीट वाचा! धर्मधर्माचं कौतुक हा देश 70 वर्षांपेक्षा जास्त काळ पाहत आहे त्यामुळे त्याचं एक राहुद्याच! बाकी धर्म वि. धर्म आणि जात वि. जात यापैकी जास्त घातक कोणतं याचा जरा शांततेने विचार करा आणि ठरवा!!

पगला गजोधर's picture

12 Dec 2017 - 7:33 am | पगला गजोधर

धर्म वि. धर्म आणि जात वि. जात यापैकी जास्त घातक कोणतं याचा जरा शांततेने विचार करा आणि ठरवा!!

दोन्हीही ....

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Dec 2017 - 8:19 am | हतोळकरांचा प्रसाद

असहमत! जातींमध्ये फूट पडणे अत्यंत धोकादायक आहे आणि ते अगदी उघडपणे करणारे पक्ष दुसऱ्या पक्षांना हिंदुत्ववादी वगैरे म्हणतात हेच मुळी हास्यास्पद आहे. भाजपने अगदी जशास तसे "राजकारण" करावे आणि निवडणुका जिंकाव्यात. उगाच पार्टी विथ डिफ्फरन्स वगैरे च्या भानगडीत समोरच्याच्या गलिच्छ राजकारणाला विजयी होऊ देऊ नये. हा मार्ग चालत नाही कळल्यावर तरी मार्ग बदलतील.

आत्ताच समजलं कि मोदींच्या कालच्या भाषणाला उत्तर म्हणून पूर्व पंतप्रधानांनी एक उत्तर लिहिलंय. बातम्यांमध्ये त्या पत्राची जोरदार चर्चा सुरु आहे. व्यक्तिशः मला देखील मोदींचं या भाषणात केलेलं वक्तव्य अजिबात आवडलेलं नाही. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे सरळ सरळ पाकिस्तानचा हस्तक्षेप आहे या निवडणुकीत आणि मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या स्नेह भोजनात मनमोहन सिंग, पूर्व मिलिटरी चीफ, आणि काही ब्युरो क्रॅट्स यांचा काही पाकिस्तानी ऑफिसिअल्स शी गुजरात निवडणुकांच्या संदर्भात चर्चा झाल्या असा आरोप आहे.( अहमद पटेलनी मु.मं.व्हावं असं म्हणे पाकिस्तानला वाटतं.) आणि बराच काही म्हणालेत नमो. या सगळ्या आरोपांचा किंवा शंकांचा जाहीररीत्या शंख करायची आवश्यकता काय होती?दोषी व्यक्तींना टाका सरळ तुरुंगात..
प्र.पदाला शोभेल असं थोड तरी वागायला हवं होतं.

गॅरी ट्रुमन's picture

11 Dec 2017 - 6:36 pm | गॅरी ट्रुमन

दोषी व्यक्तींना टाका सरळ तुरुंगात..

एक गोष्ट सांगा. समजा खरोखरच मोदींनी यांना तुरूंगात टाकले तर तुम्ही त्याचे समर्थन करणार आहात का? जर उत्तर नाही असे असेल तर असल्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही.

भारताच्या राजधानीत भारतीय संसदेवर हल्ला करायच्या भयंकर प्रकारातल्या दहशतवाद्याची 'पुण्यतिथी' साजरी होते, घराघरातून अफजल निघतील अशा घोषणा होतात, भारत देशाचे तुकडेतुकडे होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे जाहिरपणे म्हटले जाते आणि अशांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगात टाकले तरी लोक त्याविरूध्द बोलणारे पण असतात. तेव्हा मणीशंकर अय्यर आणि मनमोहनना तुरूंगात टाकले तर सर्व पुरोगामी किती हलकल्लोळ करतील याची कल्पनाच केलेली बरी.

एकूणच या देशात या पुरोगामी आणि ढोंगी सेक्युलर लोकांची विषवल्ली फारच फोफावलेली आहे. तिची पाळेमुळे उध्वस्त व्हायला हवीत आणि अजूनही मोदी ते करण्याच्या स्थितीत नाहीत. मिडियामध्ये, विद्यापीठांमध्ये पुरोगाम्यांचे मोठे वर्चस्व आहे. ते पूर्ण उध्वस्त करायची ताकद मोदींमध्ये यावी म्हणूनच मोदींना माझ्यासारखे लोक पाठिंबा देतात. जर का या हलकटातल्या हलकट डाव्या पुरोगाम्यांना कोणी देशोधडीला लावू शकेल तर तो नेता म्हणजे मोदीच आहे. सध्या तरी दुसरा नेता दिसत नाही.

चष्मेबद्दूर's picture

11 Dec 2017 - 10:18 pm | चष्मेबद्दूर

भाजपा वाल्यांची स्वतः सोडून बाकीचे सर्व देशद्रोही किंवा negative विचारांचेच आहेत अशी मनस्थिती झालीये हे परत स्पष्ट होतंय तुमच्या प्रतिसाद वरून. असो, कुठल्याही देशभक्ताला वाईट गोष्टी करणारे तुरुंगात जावे असंच वाटत असतं. आणि देशद्रोह्यांना त्यांचा गुन्हा सिद्ध करून शिक्षा द्यावी अशीच त्यांची इच्छा असते.
देशभक्ती म्हणजे फक्त तिरंगा फडकवणे आणि सिनेमाच्या आधी राषट्रगीताला उभे राहणे नाही, हे समजून घ्यावं.
राहवलं नाही म्हणून प्रतिसाद लिहिला.

______________===_______===___________
जल्पकांच्या या जगी जाहले कठीण हे जगणे,
भाळी बसती कित्येकांच्या नकोसे शिक्के..
च.ब.

गॅरी ट्रुमन's picture

11 Dec 2017 - 10:27 pm | गॅरी ट्रुमन

ओक्के.

या सगळ्या आरोपांचा किंवा शंकांचा जाहीररीत्या शंख करायची आवश्यकता काय होती?

पाकिस्तानला बिजेपी आणी कॉग्रेस एकच वाटत नाही, त्यांना काँग्रेस जास्त पसंद आहे, त्यातली त्यात काँग्रेसमधले मुस्लिम नेते अजून जास्त पसंद आहेत आणि पाकिस्तान हा आपला शत्रू देश आहे हे काही गुजराथी लोकांना माहित नसेल म्हणून केला असेल शंख.

श्रीगुरुजी's picture

12 Dec 2017 - 11:32 am | श्रीगुरुजी

आत्ताच समजलं कि मोदींच्या कालच्या भाषणाला उत्तर म्हणून पूर्व पंतप्रधानांनी एक उत्तर लिहिलंय. बातम्यांमध्ये त्या पत्राची जोरदार चर्चा सुरु आहे.

ते पत्र वाचून हसू आलं आणि चीडही आली. म्हणे मोदींनी घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळविली. म्हणे गुजरातमध्ये पराभवाच्या भीतिमुळे मोदींनी अपशब्द वापरणे सुरू केले आहे. म्हणे मोदी कोणतेही निमंत्रण नसताना पाकिस्तानला गेले. म्हणे मोदींनी देशाची माफी मागावी.

आपल्या १० वर्षाच्या कारकीर्दीत हे भारतातील सर्वाधिक सामर्थ्यवान पदावर असूनसुद्धा एका कठपुतळीसारखे वावरल्यामुळे घटनात्मक संस्थांच्या प्रतिष्ठेत भर पडली होती का त्या संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती? आसाममध्ये कधीही वास्तव्य केले नसताना खोट्या भाडेपावत्या सादर करून तिथून राज्यसभेची निवडणुक लढताना घटनात्मक संस्थांच्या प्रतिष्ठेत भर पडली होती का त्या संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती?

देशातील साधनसंपत्तीवर सर्वात पहिला हक्क हा मुस्लिमांचा आहे असे सर्वोच्च पदावरून भेदभाव करणारे वक्तव्य करताना घटनात्मक संस्थांच्या प्रतिष्ठेत भर पडली होती का त्या संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती?

हे क्वचितच पत्रकारांना सामोरे जायचे. परंत जानेवारी २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान होणे हे देशासाठी अत्यंत घातक ठरेल हे अपशब्द वापरताना त्यामागे लोकसभा निवडणुक पराभव होईल अशी भीति नव्हती का? सोनिया गांधी, राहुल, दिग्विजय, इम्रान मसूद, मण्या अय्यर, गुरूदास कामत अशा असंख्य कॉग्रेसजनांनी यांच्याच कारकीर्दीत मोदींविषयी वारेमाप अपशब्द वापरले, तेव्हा आपल्या सहकार्‍यांना यांनी का माफी मागण्यास सांगितले नव्हते?

यांच्या कारकीर्दीत भ्रष्टाचाराने कळ्स गाठला होता. त्याबद्दल यांनी आपल्या तोंडातून आजवर अवाक्षर तरी काढले का? देशाचे प्रचंड नुकसान यांच्या १० वर्षांच्या कारकीर्दीत झाले. यांच्या नाकाखाली लूटमार सुरू असताना हे होयबासारखे तोंडात मिठाची गुळणी घेऊन डोळे मिटून स्वस्थ बसून होते. त्याबद्दल हे कधी माफी मागणार?

मोदी कोणतेही निमंत्रण नसताना पाकिस्तानला गेले असे तब्बल १० वर्षे पंतप्रधान पदावर बसविलेल्या व्यक्तीने म्हणावे हे आश्चर्यकारक आहे. अधिकृत पदांवर असलेल्या देशांमधील नेत्यांमध्ये अशा आकस्मिक भेटी होत असतातच. अशा भेटी कधी पूर्वनियोजित असतात आणि तर कधी अचानकही ठरतात. २००० साली क्लिंटन फक्त भारतभेटीवर येऊन परत जाताना अचानक ४-५ तासांसाठी पाकिस्तान भेटीवर गेले होते. ही भेट अजिबात पूर्वनियोजित नव्हती. त्यांच्या या भेटीबाबतही असेच म्हणावे लागेल का? पूर्वी रशियाचे पंतप्रधान (नाव विसरलो) दुसर्‍या देशाला भेट देऊन रशियाला परत जाताना अचानक भारतात येऊन तत्कालीन पंतप्रधानांना भेटून गेले होते. त्यामुळे मोदी पूर्वनियोजित भेट नसताना अचानक पाकिस्तानला २-३ तासांची भेट देऊन आले यावर निदान पंतप्रधानपदावर बसून गेलेल्या व्यक्तीने तरी शंका व्यक्त करायला नको होती.

दुसरं म्हणजे मोदी पाकिस्तानला गेले ते कॅमेर्‍यांच्या गराड्यात. त्यांच्या भेटीचा प्रत्येक क्षण नागरिकांना दिसत होता. त्या भेटीसंबंधात काहीही लपवाछपवी केलेली नव्हती. याउलट हे मात्र पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्याला गुपचूप भेटले व भेट गुप्त ठेवायचा प्रयत्न केला. जुलै २०१७ मध्ये डोकलामध्ये भारत व चीनचे सैन्य हातात शस्त्रे घेऊन समोरासमोर युद्धाच्या पावित्र्यात उभे होते. कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होईल इतके वातावरण तापलेले होते. अशा प्रसंगी पप्पू माजी संरक्षण सचिव शिवशंकर मेनन यांच्या बरोबर गुपचूप चिनी राजदूताला भेटला व जेव्हा भेटीची बातमी फुटली तेव्हा काँग्रेसचा सुरजेवालाने पत्रकार परीषद घेऊन अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे छातीठोकपणे सांगितले. परंतु चिनी दूतावासाने भेटीची प्रकाशचित्रे प्रसिद्ध करून भेट झाल्याचे मान्य केल्यानंतर खांग्रेसी तोंडावर पडले होते. संरक्षण सचिव असल्याने शिवशंकर मेनन यांना अनेक लष्करी गुपिते माहिती असणार. अशी व्यक्ती युद्धाच्या वातावरणात शत्रू देशाच्या राजदूताला गुपचूप भेटते हे अत्यंत संशयास्पद आहे. खांग्रेसवाले गुपचूप पाकिस्तानी व चिनी अधिकार्‍यांना का भेटत आहेत याचा खुलासा विचारणे म्हणजे घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळविली असे होते का? खांग्रेस, पाकिस्तान व चीन यांच्यात नक्कीच काहीतरी संशयास्पद सुरू आहे आणि हे ढुढ्ढाचार्य मौनीबाबा सुद्धा त्यात आता सामील झाले आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

12 Dec 2017 - 11:57 am | गॅरी ट्रुमन

सहमत. या प्रकारामुळे मनमोहनसिंगांविषयी जो काही थोडाथोडका आदर शिल्लक राहिला होता तो पण आता धुळीला मिळाला आहे.

प्रतिसादात थोडी सुधारणा सुचवतो.

२००० साली क्लिंटन फक्त भारतभेटीवर येऊन परत जाताना अचानक ४-५ तासांसाठी पाकिस्तान भेटीवर गेले होते. ही भेट अजिबात पूर्वनियोजित नव्हती.

नाही बिल क्लिंटन यांची पाकिस्तान भेट होणार हे आधीच ठरले होते. पाकिस्तानात मुशर्रफने बंड करून लष्करी राजवट आणल्यामुळे बिल क्लिंटन पाकिस्तानला गेले ती 'स्टेट व्हिजिट' नव्हती तर त्याला भारतातून परत जात असताना 'स्टॉप-ओव्हर' असे म्हटले गेले होते. बिल क्लिंटन त्याच भेटीत वॉशिंग्टनला परतण्यापूर्वी मस्कत आणि जीनीव्हाला पण गेले होते. त्या भेटी आधीच ठरल्या होत्या की ते अचानक तिथे गेले होते हे माहित नाही.

जॉर्ज डब्ल्यू बुश २००६ मध्ये भारतात आले तेव्हा येताना काबूलला त्यांनी अशी अचानक भेट दिली होती. सुरक्षेच्या कारणामुळे त्यांच्या भेटीची माहिती आधी जाहिर करण्यात आली नव्हती असे सांगण्यात आले होते. बहुदा बराक ओबामाही २०१० मध्ये येताना (किंवा जाताना) काबूलला गेले होते असे वाटते. तपासून बघायला हवे.

राजीव गांधींनी १९८५ मध्ये अमेरिकेला भेट दिली होती. त्यावेळी त्यांची रॉनाल्ड रेगन यांच्याशी चांगली चर्चा होऊन दोन देशांमधील संबंध चांगले होतील अशी शक्यता निर्माण होते आहे असे वाटत असतानाच राजीव गांधी परतताना मॉस्कोला असेच अचानक थांबले होते. याविषयी अधिक http://indiatoday.intoday.in/story/mikhail-gorbachev-gave-rajiv-gandhi-t... इथे. रेगन उघडपणे सोव्हिएट रशियाला 'इव्हिल इम्पायर' आणि कम्युनिझमला मानवतेला लागलेला कलंक असे म्हणत असत. अशावेळी भारतासारख्या देशाचा नेता अमेरिकेतून परत जाताना मॉस्कोमध्ये थांबला हे रेगन प्रशासनाला फार आवडलेले नव्हते. मोदींच्या डिसेंबर २०१५ मधील लाहोर भेटीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यार्‍या काँग्रेसला राजीव गांधींच्या १९८५ मधील मॉस्को भेटीचा विसर पडला होता असे http://www.asianage.com/india/congress-targets-pm-forgets-rajiv-gandhi-s... इथे पण म्हटले आहे.

चष्मेबद्दूर's picture

12 Dec 2017 - 2:13 pm | चष्मेबद्दूर

पण एकानी गाय मारली म्हणून दुसऱ्यानी वासरू मारावे का, हा प्रश्न आहे. काँग्रेस हलकट आहेच म्हणूनच भाजपला निवडून दिलं. आता त्यांच्याच सारखं वागून काय मिळवणार ?
एक गोष्ट नक्की आहे कि, मोदी विरोध म्हणजे देशद्रोह नाही आणि मोदी म्हणजेच भाजपा नाही. मी भाजप ला फक्त डेव्हलपमेंट च्या मुद्द्यावर मत दिलं होतं. पण आता अशी खात्री वाटत आहे कि सत्ता मिळाल्यावर सगळे सारखेच.
शहा पुत्र, डोवल पुत्र यांच्या कंपन्या, जज लोयांच्या हत्येबाबत समोर आलेल्या गोष्टी, गोरक्षकानी केलेल्या हत्या आणि आता गोमांसावरची उठवलेली बंदी...या सगळ्या उलट सुलट घटना काय दाखवतात? माझ्या देशात हे सगळं व्हावं याच फार वाईट वाटतं.

विशुमित's picture

12 Dec 2017 - 2:27 pm | विशुमित

<<<शहा पुत्र, डोवल पुत्र यांच्या कंपन्या>>>
==>> शाह पुत्राच्या उड्या माहित होत्या, पण त्या प्रकरणात एवढा दम नव्हता. पण डोवाल पुत्राने काय केले ? वाचले नाही कुठे ?

अनुप ढेरे's picture

12 Dec 2017 - 2:55 pm | अनुप ढेरे

डोव्हल पुत्राची गोष्ट शाहपुत्राहून फुस्की आहे. पण त्या आर्टिकल्सनी त्यांचं काम बजावलं आहे. त्या आर्टिकल्सचं काम मोदी विरोधकांना वॉटाबाऊटरीसाठी खाद्य पुरवणे एवढच होतं. भ्रश्टाचाराविरोधी काही नाही. शाहपुत्राचा लेखात भ्रष्टाचाराचा आरोप देखील नाही. आर्टिकल लिहिलंच अशा प्रकारे होतं की वाचक आपोआप भ्रष्टाचार आहे असं मत बनवेल.

श्रीगुरुजी's picture

12 Dec 2017 - 3:10 pm | श्रीगुरुजी

पण एकानी गाय मारली म्हणून दुसऱ्यानी वासरू मारावे का, हा प्रश्न आहे. काँग्रेस हलकट आहेच म्हणूनच भाजपला निवडून दिलं. आता त्यांच्याच सारखं वागून काय मिळवणार ?

त्यांच्यासारखे कधी वागले? मोदींची पाक भेट पूर्वनियोजित नसली तरी त्यात लपवाछपवी नव्हती.

शहा पुत्र, डोवल पुत्र यांच्या कंपन्या, जज लोयांच्या हत्येबाबत समोर आलेल्या गोष्टी,

लोयांचा ३ वर्षांपूर्वी झालेला नैसर्गिक मृत्यू म्हणजे हत्या?

गॅरी ट्रुमन's picture

11 Dec 2017 - 10:26 pm | गॅरी ट्रुमन

मोदींनी काहीही केले तरी ते पंतप्रधानपदाची शान कशी कमी करत आहेत वगैरे गोष्टी मोदीविरोधक बोलत आहेतच. पण मोदी कोणतीही महत्वाची गोष्ट अशी 'लूज एन्डेड' ठेवतील हे शक्यच नाही.

पाकिस्तानी लष्कराच्या अर्शद रफिकने गुजरातमध्ये अहमद पटेल मुख्यमंत्री व्हावेत असे म्हटले. ती बातमी पुढीलप्रमाणे:

असे झाल्यानंतर पाकिस्तानला गुजरात निवडणुकांमध्ये आणि त्यातही काँग्रेसच्या यशात का इंटरेस्ट आहे हा प्रश्न उभा का राहू नये? बरं तो लष्करी अधिकारी त्याचे तो काहीतरी बरळला आहे आमचा त्याचा काही संबंध नाही असे काँग्रेसकडून म्हटले गेले आहे का? तसे कोणतेही स्पष्टीकरण काँग्रेसकडून आले नाही तर संशय नक्कीच वाढेल.

आता राहिला प्रश्न मनमोहनसिंगांनी पाकिस्तानी हायकमिशनरला गुप्तपणे भेटण्याचा. मनमोहनसिंग १० वर्षे पंतप्रधान असल्यामुळे त्यांना अनेक गोपनीय गोष्टी माहित आहेत हे नक्कीच. अशी गोपनीय माहिती असलेल्या कोणीही पाकिस्तानसारख्या देशाच्या हायकमिशनरला गुप्तपणे भेटणे कितपत योग्य आहे? मनमोहनसिंग जर खरोखरच निस्पृह वगैरे असतील तर आपण असे पाकिस्तानी हायकमिशनरला भेटणार आहोत आणि अमुक तमुक गोष्टींवर चर्चा करणार आहोत एवढे जरी त्यांनी आधीच म्हटले असते तर संशयाला काहीच जागा राहिली नसती. आजी/माजी पंतप्रधानांना खाजगी आयुष्य नसते आणि त्यांचे आयुष्य हीच एक 'खुली किताब' बनते. त्यामुळे पाकिस्तानी हायकमिशनरला आपण भेटणार आहोत एवढे तरी त्यांनी आधी जाहिर नक्कीच करायला हवे होते. राजकारणाशी काहीही संबंध नसलेल्या कोणालाही मनमोहनसिंगांनी भेटणे आणि ती माहिती जगजाहिर न करणे आणि पाकिस्तानी सरकारच्या प्रतिनिधीला भेटणे यात नक्कीच फरक आहे हे नक्कीच.

इतकेच नव्हे तर ही बातमी मिडियामध्ये आल्यानंतर सुरवातीला काँग्रेसने तर अशी कोणतीही भेट झालीच नव्हती असेही म्हटले. ते का? जर तुमच्याकडे लपविण्यासारखे काहीच नसेल तर ही बातमी आल्यानंतर सुरवातीला खंडन का केले? काही महिन्यांपूर्वी डोकलाम प्रकरण चालू असताना राहुल गांधी चीनी राजदूताला भेटले होते. त्यावेळीही नेमका हाच प्रकार काँग्रेसने केला होता. त्याचीच पुनरावृत्ती परत झाली.

या सगळ्या गोष्टी संशयास्पद न वाटता नेहमीप्रमाणे मोदींना दोष देणे याला कमालीचा पूर्वग्रह सोडून दुसरे काय म्हणता येईल? नशीबाने बहुसंख्य भारतीय जनता सुशिक्षित नाही त्यामुळे या गोष्टी त्यांना तरी नक्कीच संशयास्पद वाटतील अशी अपेक्षा आहे.

babu b's picture

11 Dec 2017 - 11:40 pm | babu b

आता ते चमच्यावर गेले.

सोन्याचा ( सोनियाचा ) चमचा घेउन जन्मलेल्या राहूलना गरिबी काय ठावूक ? मी उन्हाळ्यात गरिब मुलांची काळजी करतो , अंबानीच्या मुलांची नव्हे !

babu b's picture

12 Dec 2017 - 7:38 am | babu b

गरीब राहिले तरच गरिबांबद्दल कळवळा रहातो !

मग गरीबी असणं चांगलं की नसणं , हे नवीन कन्फ्युजन आता निर्माण झाले आहे ..

पिढ्यानपिढ्या कष्ट केल्यावर कोणती तरी पिढी सोन्याचा चमचा घेउन येणारच की ! की पुढच्या पिढीला गरिबांचा कळवळा रहावा म्हणून मागच्या पिढीने सगळे चमचेच टाकून द्यायचे का ?

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Dec 2017 - 8:22 am | हतोळकरांचा प्रसाद

होका, मग हे लॉजिक चायवाला म्हणून हिणवताना कुठे गेले होते म्हणे?

babu b's picture

12 Dec 2017 - 9:04 am | babu b

मोदी चहा विकत होते , हे त्यानी आणि भाजपानेच जाहीर केले ..

arunjoshi123's picture

12 Dec 2017 - 11:09 am | arunjoshi123

बाबूजी,
स्पष्टीकरण द्यावं लागावं इतकं माणसाचं ज्ञान गरीब नसावं. किंवा तसं सोंग करू नये.
----------------------
मोदिंची सद्य लायकी "फक्त" काँग्रेसवाल्यांच्या ऑफिसात चहा विकायची आहे असं काँग्रेस म्हणाली.
भाजप प्राचीन काळी ते चहा विकत असे म्हणे.

babu b's picture

12 Dec 2017 - 11:40 am | babu b

मोदी चहा विकायचे हे त्यानी बायोडेटात नव्हते लिहिले .. तसे काही एक्पिरिअन्स सर्टिफिकेटही नव्हते ..

निवडणुकीच्या जाहिराती सुरु झाल्यावर हेच बोलू लागले , मी चहा विकायचो म्हणून.

आरटीआयखाली रेल्वेत माहिती मागितली तर त्यानाही माहीत naahee की ते कुठे अन कधी चहा विकायचे ...

मग इतराना कसे ठावूक असणार ते चहा विकायचे म्हणून ?

arunjoshi123's picture

12 Dec 2017 - 12:57 pm | arunjoshi123

नेहरू लफडी करायचे असं त्यांच्या बायोडाटात नव्हतं लिहिलं. त्या बायकांनी त्यांना तसं अनुभव प्रमाणपत्र दिलं नव्हतं.
मग त्यांचेच सहकारी लिहू लागले.
आरटीआय मधे हॉटेलांत किंवा दिल्लीच्या वा लंडनच्या भवनांत माहीती मागीतली तरी मिळणार नाही.
=============================
तरी भाजपने त्यांना किंवा त्यांचा वारसा सांगणार्‍या राहुलला भाजप भवनाबाहेर लफडी करायला (आणि राजकारण सोडायला) बोलावले का?

गब्रिएल's picture

12 Dec 2017 - 1:37 pm | गब्रिएल

न्हेरू-गांधी परिवार आनि "पिढ्यानपिढ्या कष्ट"... हहपुवा... पिढ्यानपिढ्यांचे बलिदान काय कमी पल्डं म्हनून आत्ता हे कायबाय नवं की काय ?!

झ्येंडा मिर्वताना सुदीक यवडं भान ईस्रून कसं चालंल बाबूजी ?! =)) =)) =))

babu b's picture

12 Dec 2017 - 2:11 pm | babu b

मी इन् जनरल बोललो.

सोन्याचा चमचा तोंडात घेउन आलेल्याना गरिबी कशी समजणार ? संदर्भ जरी राहूल गांधींचा असला तरी ते इन् जनरल कुणालाही ॲप्लिकेबल आहे.

म्हणून मी म्हटलं की जनतेने श्रीमंत व्हायचे सोडून द्यायचे की काय ?

म्हणून मी म्हटलं की जनतेने श्रीमंत व्हायचे सोडून द्यायचे की काय ?

तसं नाय हो. पण काँग्रेसी पुरोगामी मार्गाने श्रीमंत होऊ नये. देश लुटत नव्हे तर वैध मार्गाने श्रीमंत व्हावे.

babu b's picture

13 Dec 2017 - 2:26 pm | babu b

१. बाजपेयीची ५ आणि मोदीची ४ ... ९ वर्षात भ्रष्टाचाराबद्दल किती लोकाना अटक झाली ? किती रिकव्हरी झाली ?

२. काँग्रेस, रावा , सेनेच्या कितीतरी लोकाना भाजपाने आपल्यात सारवासारव करुन समाविष्ट केलेले आहे.

जर काँग्रेसवाले अवैध मार्गाने श्रीमंत होतात , तर भाजपा हे सर्व का करत आहे ?

१. बाजपेयीची ५ आणि मोदीची ४ ... ९ वर्षात भ्रष्टाचाराबद्दल किती लोकाना अटक झाली ? किती रिकव्हरी झाली ?

एवढी नोटबंदी होऊनही ससिकला कडे किती पैसे सापडले.
https://www.ndtv.com/tamil-nadu-news/tax-officials-find-1-4-crore-undecl...
( हा चॅनल तुमचाच)
३,००,००० कंपन्या रद्द केल्या आहेत.
बर्‍याच प्रकारचा फ्रॉड सरकारने आटोक्यात आणला आहे.
---------------
वायपेयींच्या काळात काही झालं नाही. हे मान्य.
---------------------------------------
प्रॉब्लेम असा कि मागच्या सरकारने एकदा सगळं काळ्याचं पांढरं केलं की पुढच्या सरकारला अवघड जातं चोर पकडणं. मागचं सरकारच चोरांचं असेल तर असंभव. पण स्वामींनी (जे बीजेपीचे आहे) घातलं कि लोकांना जेलमधे.
------------------------------------------------
उरलेले हळूहळू जातील. पकडून जेलात टाकायचा मोदी काय इंदिरा बाय नाहीत. ते सगळे कायदे बनवत आहेत. मागचे पकडता येतील का माहित नाही पण पुढे शिस्त असेल असं फ्रेमवर्क देशात येत आहे.

१. बाजपेयीची ५ आणि मोदीची ४ ... ९ वर्षात भ्रष्टाचाराबद्दल किती लोकाना अटक झाली ? किती रिकव्हरी झाली ?

एवढी नोटबंदी होऊनही ससिकला कडे किती पैसे सापडले.
https://www.ndtv.com/tamil-nadu-news/tax-officials-find-1-4-crore-undecl...
( हा चॅनल तुमचाच)
३,००,००० कंपन्या रद्द केल्या आहेत.
बर्‍याच प्रकारचा फ्रॉड सरकारने आटोक्यात आणला आहे.
---------------
वायपेयींच्या काळात काही झालं नाही. हे मान्य.
---------------------------------------
प्रॉब्लेम असा कि मागच्या सरकारने एकदा सगळं काळ्याचं पांढरं केलं की पुढच्या सरकारला अवघड जातं चोर पकडणं. मागचं सरकारच चोरांचं असेल तर असंभव. पण स्वामींनी (जे बीजेपीचे आहे) घातलं कि लोकांना जेलमधे.
------------------------------------------------
उरलेले हळूहळू जातील. पकडून जेलात टाकायचा मोदी काय इंदिरा बाय नाहीत. ते सगळे कायदे बनवत आहेत. मागचे पकडता येतील का माहित नाही पण पुढे शिस्त असेल असं फ्रेमवर्क देशात येत आहे.

१. बाजपेयीची ५ आणि मोदीची ४ ... ९ वर्षात भ्रष्टाचाराबद्दल किती लोकाना अटक झाली ? किती रिकव्हरी झाली ?

एवढी नोटबंदी होऊनही ससिकला कडे किती पैसे सापडले.
https://www.ndtv.com/tamil-nadu-news/tax-officials-find-1-4-crore-undecl...
( हा चॅनल तुमचाच)
३,००,००० कंपन्या रद्द केल्या आहेत.
बर्‍याच प्रकारचा फ्रॉड सरकारने आटोक्यात आणला आहे.
---------------
वायपेयींच्या काळात काही झालं नाही. हे मान्य.
---------------------------------------
प्रॉब्लेम असा कि मागच्या सरकारने एकदा सगळं काळ्याचं पांढरं केलं की पुढच्या सरकारला अवघड जातं चोर पकडणं. मागचं सरकारच चोरांचं असेल तर असंभव. पण स्वामींनी (जे बीजेपीचे आहे) घातलं कि लोकांना जेलमधे.
------------------------------------------------
उरलेले हळूहळू जातील. पकडून जेलात टाकायचा मोदी काय इंदिरा बाय नाहीत. ते सगळे कायदे बनवत आहेत. मागचे पकडता येतील का माहित नाही पण पुढे शिस्त असेल असं फ्रेमवर्क देशात येत आहे.

babu b's picture

13 Dec 2017 - 6:12 pm | babu b

नोटाबंदी झाली भाजपाच्या काळात , नव्या नोटा छापल्या भाजपाच्या काळात, अन भ्रष्टाचारी माणसाच्या घरात करोडोंच्या नव्या नोटा सापडल्या तर त्याला जबाबदार कोण ? काँग्रेस की भाजपा ?

शशिकला भ्रष्टाचारी ! एकेकाळी जयललिता भाजपा सरकारच्या पार्टनर होत्या ना ? वाजपेयींच्या काळात ?

काळ्याचे पांढरे ? नोटाबंदीच्या वेळेस वॉलंटरी डिस्क्लोजर कुणी जाहीर केले होते ? काँग्रेसने की भाजपाने ? अन त्यात सर्वात जास्त पैसे भरणारा मनुष्य गुजरातचाच निघाला हा निव्वळ योगायोग . !!

नोटाबंदी झाली भाजपाच्या काळात , नव्या नोटा छापल्या भाजपाच्या काळात, अन भ्रष्टाचारी माणसाच्या घरात करोडोंच्या नव्या नोटा सापडल्या तर त्याला जबाबदार कोण ? काँग्रेस की भाजपा ?

नोटबंदी मुळेच काळे पैसे ट्रेस झाले ना शशिकलाचे? का मनमोहनने केले?
----------------------------------------------
नोव्हेंबर १६ ते नोव्हेंबर १७ इतक्या काळातच शशिकलेने (पकडलेल्या नोटांइतका) भ्रष्टाचार केला आणि त्याच्या पूर्वी सावपणे बसली होती मनमोहनाच्या काळात? मस्तंय कि.
================================

शशिकला भ्रष्टाचारी ! एकेकाळी जयललिता भाजपा सरकारच्या पार्टनर होत्या ना ? वाजपेयींच्या काळात ?

नक्की? मग सुब्बू नं कुणाचं सरकार कसं पाडलं? उगंच काहीही?
=============================================

काळ्याचे पांढरे ? नोटाबंदीच्या वेळेस वॉलंटरी डिस्क्लोजर कुणी जाहीर केले होते ? काँग्रेसने की भाजपाने ? अन त्यात सर्वात जास्त पैसे भरणारा मनुष्य गुजरातचाच निघाला हा निव्वळ योगायोग . !!

वेळेस नै हो, पूर्वी.
आणि स्वस्फूर्त डिस्क्लोजर हा तर चिदंबरमचा आवडता आणि नेहमीचा धंदा होता ना? एकूण कितीदा हे झालंय हे माहित आहे?
------------------------
नोटबंदीत ३०% चलन एकट्या भिकारड्या पुरोगामी बंगालमधे डिपॉझिट झालंय. तिथं गुजराती नाहीत. पूर्वाश्रमीचे काँग्रेसी आहेत.

सुबोध खरे's picture

13 Dec 2017 - 8:09 pm | सुबोध खरे

भिकारड्या पुरोगामी बंगालमधे
ह ह पु वा

अर्धवटराव's picture

12 Dec 2017 - 5:27 am | अर्धवटराव

प्रधानसेवकांनी गुजरात निवडणुकांमधे पाक हस्तक्षेपाचे जे तुणतुणे लावले आहे ते लाजिरवाणे आहे. आता मोदि फोर्मली दिग्विजयसिंग प्रभृतींच्या मांदियाळीत जाऊन बसले.
डिस्गस्टींग.

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Dec 2017 - 8:24 am | हतोळकरांचा प्रसाद

छान छान! चला आता मिळून एका पक्षाच्या अधक्ष्यासमोर मान तुकवून उभे राहणार्यांना प्रधानसेवक करू.

तर ते हि दिवस दिसतील. तसंही युवराजांचं आणखी ३० वर्षाचं राजकारण शिल्लक आहे. त्यात कमितकमी ६ लोकसभा निवडणुका होतील. त्यातली किमान एक तरी नक्की जिंकेल युवराज. पण ते दिवस आणायला मोदिंना इतकी घाई का झाली आहे कळत नाहि.

४७ ते ७७ या ३० वर्षात असं काही झालं नव्हतं. हां २०३९ मधे मोदिंनी आणिबाणी लादली तर स्कोप आहे राहुलला.

अर्धवटराव's picture

12 Dec 2017 - 12:22 pm | अर्धवटराव

इकडे आड तिकडे विहीर =))

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Dec 2017 - 9:00 pm | हतोळकरांचा प्रसाद

मोदींना नाही मोदीद्वेष्ट्याना/विरोधकांना घाई झाली आहे एवढे मात्र नक्की! त्यांनी अमुक असं भाषण केलं की २०१९ मध्ये ते जाणार वगैरे कल्पनाविलास सुरु झालेलेच आहेत. का बुआ? त्यांना लढू द्या ना निवडणूका जशा लढायचं आहेत तशा. जर त्यांच्या अशा वागण्याने त्यांना जनता हाकलणारच असेल तर बेष्टच की! जनतेने निवडणुकांबाबत असेच राहावे हीच तर अपेक्षा आहे. घाणेरडे राजकारण करून निवडणुका जिंकायची संधी भाजपने विरोधकांना का द्यावी?

अर्धवटराव's picture

13 Dec 2017 - 1:20 pm | अर्धवटराव

घाणेरडे राजकारण करून निवडणुका जिंकायची संधी भाजपने विरोधकांना का द्यावी?

तशी संधी देऊ नये असं वाटतं.

SHASHANKPARAB's picture

13 Dec 2017 - 11:49 am | SHASHANKPARAB

मला वाटत पाकिस्तानी लोकांबरोबर कॉंग्रेसची मीटिंग झाली याचा मुद्दा बनविण्यात कॉंग्रेसचीच चुक आहे. मोदिन्चि नाही. कारण अशी बैठक झाली याचे कुठल्याही वृत्तपत्रात वृत्त नाही. मोदिन्नि जेव्हा अशी बैठक झाल्याचे सांगितले तेव्हा कॉंग्रेसने त्याचा त्वरित इन्कार केला. मुख्य म्हणजे तिथे काय चर्चा झाली हे कॉंग्रेसने अजूनही स्पष्ट केलेले नाही. मनमोहन सिंगंनी गुजरात बद्धल कोणतीही चर्चा झाली नाही असे सांगितले, पण ते त्यांच्या पुरते मर्यादित आहे. बाकीचे सर्वजण अजूनही गप्पच आहेत. मुळात अशा बैठकीत जाण्यासारखे त्या बैठकीत काय होते हे त्यानी स्पष्ट करायला हवे. मणिशन्करने पाकिस्तानकडे मोदिन्ना हटविण्यासाठी उघड मदत मागितली हेही "सत्यच" आहे. तर अशा बैठकीत काय झाले याचे वृत्त कुठेही प्रसिद्ध न झाल्यामुळे त्या बैठकीचा "अंदाज" बांधण्याला मोदिन्ना वाव मिळाला. आणि त्यानी त्याचा निवड्णुकिय मुद्दा बनविण्याची संधी का सोडावी?

मोदिपण टिकवण्यासाठी, मोदिपण आणखी ग्लोरिफाय करण्यासाठी.

मोदिंनी असले मुद्दे निवडणुकीत उचलणे त्यांचं स्वतःचं प्रतिमाहनन आहे (असं मला वाटतं)

प्रधानसेवकांनी गुजरात निवडणुकांमधे पाक हस्तक्षेपाचे जे तुणतुणे लावले आहे ते लाजिरवाणे आहे.

हस्तक्षेप सिद्ध झाला कि कपाळ बडवून घेऊ.

श्रीगुरुजी's picture

12 Dec 2017 - 5:36 pm | श्रीगुरुजी

Newly-inducted Congress leader Alpesh Thakor today said that imported mushrooms have helped Narendra Modi get a "fair" complexion.

Addressing a rally in Gujarat on the last day of the election campaign for the second phase, OBC leader Thakor said, "Modi ji eats mushrooms from Taiwan and one mushroom costs Rs 80,000 and he eats five mushrooms everyday".

"He was dark like me but he became fair because of imported mushrooms," said Thakor, who is contesting from Radhanpur constituency in Patan district.

http://m.indiatoday.in/story/alpesh-thakor-gujarat-election-mushroom-nar...

काहीही दिवसांपूर्वी हार्दिक बरळला होता "मोदींनी दाढीमिशीच्या मशागतीसाठी एक खास डिझाइनर ठेवलेला आहे व त्यासाठी ते रोज हजारो रूपये खर्च करतात. "

पप्पू पूर्वी बरळला होता "मोदी रोज इंपोर्टेड डाळ खातात. "

आणि आता अल्पेशची बरळ!

अभ्या..'s picture

12 Dec 2017 - 6:12 pm | अभ्या..

असेलही.
पूर्वी म्हणे चाचा नेहरुंचे कपडे पॅरीसच्या लौन्ड्रीत धुवायला जात असे ऐकले होते.
इंदीराजींची ती कोणतीतरी महेश्वरी का काय साडी ३ लाखाची असायची असे ऐकले होते,
जोंगा जीप, लोट्टोचे शूज हे राजीव गांधीमुळे माहीत झाले.
तसेच कैतरी असावे.
बडे लोगा...बडी बाते......

सिंथेटिक जिनियस's picture

13 Dec 2017 - 10:18 am | सिंथेटिक जिनियस

पप्पू पूर्वी बरळला होता
>>
त्यात बरळणे कुठे दिसले?
फेकूसुद्धा पचास करोड की गर्लफ्रेंड असे भारतीय स्त्रीला च हिणवत होता हे विसरला काय? एका प्रतिष्ठीत बाईचा "भाव" सांगणे हे तिचे चारित्र्यहनन नव्हे काय?
पण काय आश्चर्य नाही,स्वतःच्या बायकोला सोडुन देणार्या आणि दुसर्याच्या बायकोचे भाव, दर सांगत फिरणार्या फेकूचे संस्कार रेशिमबाग, नागपुरचे . हे अगदी स्पष्ट आहे.

गामा पैलवान's picture

13 Dec 2017 - 1:16 pm | गामा पैलवान

सिंजि, ५० कोटींची गर्लफ्रेंड हा काय प्रकार आहे? हा पैसा त्या बाईच्या खात्यात आढळून आला ना? मग हा तिचा 'भाव' कसा झाला?
आ.न.,
-गा.पै.

त्यात बरळणे कुठे दिसले?

मग काय लताचे गाणे ऐकू आले कि काय?
आपल्याकडे भिकारीदेखील आयात केलेलीच दाळ खातो काही विशिष्ट महिन्यांत.
आणि मश्रूमने पुरोगामी लोक गोरे होतात का?
===============================

एका प्रतिष्ठीत बाईचा "भाव" सांगणे हे तिचे चारित्र्यहनन नव्हे काय?

पुरोगामी मन घाणच असते. अहो, त्यांनी कधी तिचा भाव असं म्हटलं?
=========================
http://www.livemint.com/Politics/JRHi8Pmh9m9j2bmNfoV63L/Jaiswal-under-fi...
जुन्या बाईत (आणि चक्क बायकोत) मजा येत नाही असं स्टेजवर म्हणणारा पुरोगामी मंत्री मात्र आदरणिय असतो?

मला वाटत की मोदिन्नि कुणाच्याही गर्लफ्रेंडचा किंवा बायकोचा भाव किंवा दर सांगत नव्हते. जर त्या "विशेषणा" सबंधित बातम्या नीट वाचल्या तर लक्षात येईल की सुनंदा पुष्करना काहीही ना करता 50 कोटींची भागीदारी मिळाली त्यामुळे हे विशेषण मोदिन्नि त्याना दिले.. अर्थात प्रत्येकजण याचा हवा तसा अर्थ लावतो. जसे काही सुद्न्य लोकांना सपूर्ण काळा पैसा भारतात परत जरी आला तरी कुठलेही सरकार 15 लाख लोकांमध्ये वाटणार नाही हे माहीत आहे, त्याचवेळी काही लोक अजूनही त्या 15 लाखांच्या प्रतीक्षेत आहेत.. अगदी तसेच

श्रीगुरुजी's picture

13 Dec 2017 - 3:21 pm | श्रीगुरुजी

अल्पेश, जिग्नेश, पप्पू, हार्दिक . . . काँग्रेसमध्ये अक्षरशः नमुने भरलेत.

पुरोगामी काँग्रेसने शेवटी भारतातील मुस्लिमांना अपिल करायचा पाकिस्तानच्या लष्कराचा माणूस आणून गुजरातचा मुख्यमंत्री काँग्रेसी मुस्लिम झाला पाहिजे असं म्हणवून घेतलं. किती ते व्होटबँकेचं राजकारण!
======================
पण पुरोगाम्यांना आता हे कळत नाहीय की इस्लाम इ निवडणूकीचा मुद्दा असूच शकत नाही. हिंदूत्ववाद्यांचा सगळ्यात खतरनाक नेता मोदी पंतप्रधान झाला तरी सर्व त्रास पुरोगाम्यांनाच (अवार्ड वैगेरे वापस द्यावं लागतं, इ) होतो (मुस्लिमांना नाही) हे मुस्लिम जाणून चुकले आहेत. एरवीही त्यांना इस्लाम/पाक इ विषयांत रस नाही. हे तथाकथित सेक्यूलर पुरोगामी उगाचच बीजेपीचा बाऊ दाखवत असतात.
================================
तरी सलग २२ वर्षे एकच पक्षाचे सरकार मंजे अयोग्य आहे. दिल्लीत (राज्यात) सोडून काँग्रेसवाले मंजे अशक्य देशद्रोही आहेत. त्यांच्यापेक्षा अनागोंदी परवडली. म्हणून गुजरातेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार यावे अशी इच्छा आहे.

http://www.firstpost.com/politics/rahul-gandhi-asks-sc-to-dismiss-basele...
थेट बलात्काराचे आरोप असणारा पक्षाध्यक्ष मात्र पुरोगामी ठरतो

कपिलमुनी's picture

13 Dec 2017 - 2:55 pm | कपिलमुनी

आतापर्यंत ३-४ वेळा तेच तुटलेले तुणतुणे वाजवतोय ?
आरोप कोर्टाने नाकरला आहे आणि खोट्या आरोपाबद्दल दंड लावला आहे .

http://www.firstpost.com/india/sc-dismisses-rape-case-against-rahul-gand...

आरोप कोर्टाने नाकरला आहे आणि खोट्या आरोपाबद्दल दंड लावला आहे .

हांग कसं लायनीवर आलात. कोर्टानं मोदींना २००२ च्या दंग्यांत सहभागी असल्याचा आरोप नाकारला आहे ना? पण मानतात कुठे पुरोगामी?
सरकारचं जे काही चालू आहे ते मायनॉरिटीज साठी धोकादायक आहे, ब्ला ब्ला ब्ला.
========================
कोर्टानं एखादी गोष्ट सुस्पष्ट शब्दांत सांगीतली असताना (जसं कि आर एस एस एक नॉमल संस्था आहे, बीजेपी एक नॉर्मल पार्टी आहे, मोदी २००२ मध्ये निष्पाप आहेत) आपल्यालाच जास्त अक्कल आहे म्हणत या तिघांना (संघ, बीजेपी, मोदी) दिवसरात्र शिव्या घालणं हेच केवळ का मान्य असावं?
तोच येडा (का येडझवा?) कित्ता गिरवत राहुल गांधी बलात्कारी आहे असं दिवसरात्र का म्हणू नये?
पुरोगामी आरोपी असले न्यायालयाने मुक्तता केली कि बाकीच्यांनी गप्प राहावं आणि प्रतिगामी आरोपी असले कि न्यायालयाची ही चूक असू शकते?
हा काय न्याय आहे?
त्यामुळे कपिलमुनी व्यक्तिशः तुम्ही येडे नसाल तर भारताच्या सगळ्या घटनात्मक संस्थांना मान्य असलेल्या फ्रेमवर्कच्या मर्जीनुसार जे जे काही होत आहे ते ते अधिकृत आहे म्हणा. काही गोष्टींशी वैचारिक असहमती असेल तर तिचा आदर आहे. पण घटनात्मक मान्य गोष्टींना क्रिमिनल, विकृत इ ठरवण्यार्‍या लोकांचा समाचार घेतलाच पाहिजे.

गॅरी ट्रुमन's picture

13 Dec 2017 - 3:21 pm | गॅरी ट्रुमन

हांग कसं लायनीवर आलात. कोर्टानं मोदींना २००२ च्या दंग्यांत सहभागी असल्याचा आरोप नाकारला आहे ना? पण मानतात कुठे पुरोगामी?

जबराट.

इतकेच नव्हे तर संजीव भट या पोलिस अधिकार्‍याने गोध्रा ट्रेन जळीतकांडानंतर मोदींनी 'हिंदूंना त्यांचा राग व्यक्त करू द्या' असे आपण एका बैठकीत सामील होतो त्या बैठकीत सांगितल्याचे म्हटले होते. नंतर संजीव भट त्या बैठकीत हजर नव्हतेच असे उघडकीला आले आणि कोर्टाने या संजीव भटला मस्त तासले होते. तरी केवळ मोदींविरोधात काहीतरी बोलले या एका क्रेडेन्शिअलमुळे हा मनुष्य यच्चयावत सगळ्या पुरोगाम्यांच्या गळ्यातला ताईत आहे.

नंतर संजीव भट त्या बैठकीत हजर नव्हतेच असे उघडकीला आले आणि कोर्टाने या संजीव भटला मस्त तासले होते. तरी केवळ मोदींविरोधात काहीतरी बोलले या एका क्रेडेन्शिअलमुळे हा मनुष्य यच्चयावत सगळ्या पुरोगाम्यांच्या गळ्यातला ताईत आहे.

शिक्षा करायचीच आहे या न्यायाने काँग्रेसने मोदींची चौकशी केली. गुजरातमधे न्याय होणार नाही म्हणून गुजरातबाहेर चौकशी केली.
बलात्कारी (आरोप असलेला) राहुल गांधीला कोर्टाने मुक्त केले तेव्हा न्यायालय दिल्लित होते आणि दिल्ली राज्य सरकार आणि केंद्र सरकार काँग्रेसचेच होते. म्हणून मला मोदींसारखी या आरोपाची फेअर चौकशी झाली आहे असे वाटत नाही.
================================
राहुलला बलात्कारी म्हटल्याने काही पुरोगामी लोकांना जसा त्रास होतो तसाच त्रास मोदींना मुस्लिमविरोधी म्हटल्याने आम्हाला होतो.
==============
सबब नेहमी चांगले बोलावे. राजकारणात विविध पक्षांची सत्ता येत जात असते. त्यातला नेमका एक निवडून न भूतो न भविष्यति असा कांगावा करू नये. सत्याधारित प्रमाणात विरोध/आरोप/असहमती इ इ प्रकार करावेत.

कपिलमुनी's picture

13 Dec 2017 - 5:06 pm | कपिलमुनी

टिट फॉर टॅट असे विधान असेल तर तुमचे चालू द्या !

( मी वैयक्तीकरीत्या न्यायलायाला मानतो , मोदीना निर्दोष ठरवले आहे तर ते मान्य करायलाच हवे पण लगेच साध्वी , पुरोहित यांच्या बाबतीत न्यायलय चुकीचे आहे असे पलटी मारणे योग्य नाही. तसेच रागा ला निर्दोष ठरवले आहे हे मान्य करयल हवे तसेच त्यांना National Herald मधे शिक्षा झाली तर त्याचाही स्विकार हवा .)

तुमच्याइतक्या समजदार आणि संतुलित व्यक्तिसाठी माझा उपरोध नसतो.
============
ज्या केसेस बंद त्या बंद, ज्या चालू त्या चालू. चालू केस मधे बोलायचा अधिकार आहे. आरोप सिद्ध झाल्यावर नाही.

गब्रिएल's picture

13 Dec 2017 - 11:09 pm | गब्रिएल

बाय ग्वॉड, कैसा गुग्ली डाला हाय !? मान गये, अजो !!!

तुमच्याइतक्या समजदार आणि संतुलित व्यक्तिसाठी माझा उपरोध नसतो.

हेच्यासाटी +१००

पन, जेंच्यासाटी त्यो बान होता त्येंच्या त्यो बर्राबर जिव्हारी लाग्लाच की हो ! लई जळ्जळ, लई जळज्ळ ! आता तुमी तेन्ला जळिस्तळिकाष्टीपाषानि दिसत र्‍हानार आनि... संभाळून र्‍हावा ;) =)) =)) =))

ट्रेड मार्क's picture

14 Dec 2017 - 12:34 am | ट्रेड मार्क

सुपर गुगली!!!

babu b's picture

13 Dec 2017 - 11:53 pm | babu b

तेव्हा न्यायालय दिल्लित होते आणि दिल्ली राज्य सरकार आणि केंद्र सरकार काँग्रेसचेच होते. म्हणून मला मोदींसारखी या आरोपाची फेअर चौकशी झाली आहे असे वाटत नाही.

......

कायपण लोकांच्या अपेक्षा असतात. !!

मग सगळीकडे राज्यात देशात एकाचेच् राज्य् आले , तर कोर्ट कुठे उत्तर ध्रुवावर नेणार काय ?

सुबोध खरे's picture

14 Dec 2017 - 9:23 am | सुबोध खरे

मक्केला नेता येईल का?
पुरावा नको साक्षीदार नको
मुत्तवा कि काय म्हणतात ते
एकदम शिक्षा देऊन मोकळे.

कायपण लोकांच्या अपेक्षा असतात. !!

हे विधान संदर्भासहित निट लिहिले तर काँग्रेसी व पुरोगामी लोकांच्या अपेक्षा कायपण असतात असे होइल.
--------------
भाजपवाले अशी अपेक्षा ठेवत नाहीत. काँग्रेसने एक निर्बुद्ध, खडूस म्हातारी राज्यपाल म्हणून मोदींच्या उरावर बसवली होती कैक वर्षे. तिला हाकला अशी देखील तक्रार कधी मोदिंनी केली नाही. तेच पुरोगामी केजरीवाली दुसर्‍या स्पेसिसच्या पुरोगामी काँग्रेसने नेमलेल्या राज्यपालाच्या नावाने जबरदस्त ठणाणा करत होता.
========================================

मग सगळीकडे राज्यात देशात एकाचेच् राज्य् आले , तर कोर्ट कुठे उत्तर ध्रुवावर नेणार काय ?

सगळीकडे आपलीच सत्ता असल्याने मागे पेंग्विन करतील त्यापेक्षा बिनडोक अन्याय नेहरूच्या पिढीने केलेले आहेतच. प्रश्न तोंड मागे वळवून तिकडच्या साईडला विचारला.
=================
माझं फक्त इतकं मत आहे कि मोदींनी जी अग्निपरीक्षा दिली त्यामानानं राहुल निवांत सुटला. त्याला डाव्या माध्यमांनी बलात्कारी म्हणून बदनाम केले नाही याचे दु:ख आहे. केले असते तर तो देखील मोदींइतकाच निखरून आला असता.

गब्रिएल's picture

14 Dec 2017 - 2:14 pm | गब्रिएल

केले असते तर तो देखील मोदींइतकाच निखरून आला असता.

हीहीही ! निखरून याय्ला मूळात सोनं आसायला लाग्तं, अजोसाब ! :) नायतर जळून राख =))

आमचा राहुल बाबा मूळात सोनंच आहे मूळ्ळी!!! सोनखत आहे सोनखत अस्सल ते!!!

सुबोध खरे's picture

13 Dec 2017 - 8:13 pm | सुबोध खरे

हांग कसं लायनीवर आलात. कोर्टानं मोदींना २००२ च्या दंग्यांत सहभागी असल्याचा आरोप नाकारला आहे ना? पण मानतात कुठे पुरोगामी?
सरकारचं जे काही चालू आहे ते मायनॉरिटीज साठी धोकादायक आहे, ब्ला ब्ला ब्ला.

अ जो साहेब
तुम्ही तर कपिल मुनींना शॉर्ट बॉल टाकून स्टंपबाहेर खेचलं आणि मागून स्टंपिंग केलं कि हो.
मान गये

जो मोदींना मुस्लिमविरोधी म्हणतो त्या प्रत्येक बॅट्समनला आउट करायचा राहुलला बलात्कारी म्हणणे हा स्टँडर्ड बॉल आहे.

श्रीगुरुजी's picture

14 Dec 2017 - 11:23 pm | श्रीगुरुजी

हांग कसं लायनीवर आलात. कोर्टानं मोदींना २००२ च्या दंग्यांत सहभागी असल्याचा आरोप नाकारला आहे ना? पण मानतात कुठे पुरोगामी?
सरकारचं जे काही चालू आहे ते मायनॉरिटीज साठी धोकादायक आहे, ब्ला ब्ला ब्ला.

जबरदस्त!

तुम्ही एकदम मुनीवर्यांच्या कफनीलाच हात घातला की!!!!!

babu b's picture

13 Dec 2017 - 8:01 pm | babu b

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपला जोरदार झटका दिला आहे. केंद्र सरकारने नुकतीच जीएसटीतील १७८ वस्तूंवरील करात कपात केली आहे. त्याचा निवडणूक प्रचारात वापर करू नका, असे आदेशच निवडणूक आयोगाने दिले आहेत. ऐन मतदानाच्या आधी निवडणूक आयोगाने दिलेल्या या आदेशामुळे भाजपला जोरदार झटका बसला आहे.

जीएसटीमधील वस्तूंच्या करपातीचा मुद्दा पुढे करून मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केला होता. त्यालाच निवडणूक आयोगाने सुरुंग लावला आहे. मात्र कोणत्याही वस्तूचं वा सेवांचं नाव न घेता कर प्रणाली सुलभ करण्याच्या प्रक्रियेबाबत बोलण्याची मुभा मात्र आयोगानं भाजपला दिली आहे.

असे आदेशच निवडणूक आयोगाने दिले आहेत. ऐन मतदानाच्या आधी निवडणूक आयोगाने दिलेल्या या आदेशामुळे भाजपला जोरदार झटका बसला आहे.

संहिता लागू झाल्यावरचा निर्णय आहे का सरकारचा?

जीएसटीमधील वस्तूंच्या करपातीचा मुद्दा पुढे करून मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केला होता.

नाय हो.

गॅरी ट्रुमन's picture

13 Dec 2017 - 9:47 pm | गॅरी ट्रुमन

असे आदेशच निवडणूक आयोगाने दिले आहेत. ऐन मतदानाच्या आधी निवडणूक आयोगाने दिलेल्या या आदेशामुळे भाजपला जोरदार झटका बसला आहे.

म्हणजे प्रचाराची वेळ संपल्यावर राहुल गांधींनी टिव्ही चॅनेलला मुलाखत दिली याविषयी निवडणुक आयोगाने राहुल गांधींकडे स्पष्टीकरण मागितले आहे त्यामुळे निवडणुक आयोगाला पक्षपाती म्हणता पण येणार नाही. कारण भाजपला झटका देणारा निवडणुक आयोग नि:पक्षपाती असेल तर तोच निवडणुक आयोग राहुल गांधींकडे स्पष्टीकरण मागितल्यावर पक्षपाती होऊ शकणार नाही ना?

http://www.hindustantimes.com/assembly-elections/gujarat-elections-elect...

babu b's picture

13 Dec 2017 - 10:55 pm | babu b

मुलाखत दिलेली चालते म्हणे.

मत मागण्याला प्रतिबंध आहे .

( म्हणे )

मुलाखत दिलेली चालते म्हणे.

मत मागण्याला प्रतिबंध आहे .

पण घोर तपस्वी राहुल बाबांनी मुलाखतीत पुरोराज्य स्थापनाय मते मागीतली. वर गुजरातची जनता आम्हाला ती देईलच्च असा पुरोविश्वास व्यक्त केला.
===============
आता यामुळे राहुल बाबावर देशद्रोहाचा खटला (कायपण झालं तरी मोदिंवर देशद्रोहाचाच खटला भरायची मागणी पुरोंमधे जास्त सुप्रसिद्द आहे त्याच धर्तीवर) भरून त्यांना जेल मधे टाकावे.

babu b's picture

14 Dec 2017 - 9:26 am | babu b

भाजपाच्या लोकाना नोटीसा नाहीत.
.........
Congress in-charge of communications department Randeep Surjewala, who led a party delegation to the EC office, said the same rule should apply to the PM, Finance Minister Arun Jaitley and BJP chief Amit Shah as well. "Why didn't the EC do anything when the FICCI chairman made a pro-Modi speech today? Action should also be taken against the PM for holding the Mann ki Baat radio programme during elections."

"If Arun Jaitley can release the BJP vision document a day before Phase 1 voting, should he not be booked for model code of violation? If Amit Shah can make poll-related statements in Ahmedabad, should be not be booked? We appealed to the EC to not show double-standard in applying rules," Surjewala told reporters outside the EC office.
http://www.news18.com/news/politics/gujarat-elections-2017-election-comm...

बब्बु भैया आणि रंजित भाय सुरजेवाला,
मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मंजे नक्की काय ते शिकाया माह्याकडं या. आणि बाबुराव, काँग्रेसमधे शिकलेले कोण कोण आहेत? जरा त्यांचे आरोप सांगत जा. तसं प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर विरोधकांचा आरोप वेगळा आणि कमिशनने पाठवलेली नोटीस वेगळी.

babu b's picture

13 Dec 2017 - 10:48 pm | babu b

ते मटा ऑनलाइनवरचे क्वापि पेस्ट आहे.

पैसा's picture

14 Dec 2017 - 10:19 am | पैसा

जामोप्या?

यादवांचा काँफिडन्स आवडला. गुजरात राज्याच्या निवडणूकिमधे भाजपचे केंद्र सरकार पराभूत होऊ शकते ही चौथी रेअर ऑफ रेअरेस्ट संभावना त्यांच्या ट्वीट मधे लिहायची राहीली.
=====================
यादव बाबा, दिल्लीत अण्णांनी लै मोठ्ठं आंदोलन केल्तं. त्यांनी माजं नाव घिउ नका मंडलं तरी पन आपवाल्यांनी आमच्या घरी पँप्लेट आणून दिले - अण्णा हजारे यांचे आवाहन - केजरीवालला मत द्या.
अन्नांच्या पुण्याईनं तो ६७/३ चमत्कार झाला. असे चमत्कार सर्वत्र हवेतून होत नसतात.
-------------------
गुजरातमधे कदाचित कॉग्रेस येईलही, पण ते तुम्ही दिल्लिच्या अनुभवावरून म्हणत असाल तर चूक असेल.
==============
ते काही असो, आमचं मत एन सी पी ला. देशद्रोही काँग्रेस नको, कंटाळा आलेली भाजप नको. अब की बार, शरत्चंद्र पवार. गुजरातचे मुख्यमंत्री प्रफुल्ल पटेल होणार. पाटीदार भी खुष. शिवसेना भी खुश.

babu b's picture

14 Dec 2017 - 1:01 am | babu b

प्रचारासाठी फिरताना मोदीनी सी प्लेन वापरले. जपानी बनावटीचे , अमेरिकेत रजिस्टर्ड असलेले आणि कराचीवरुन आलेले विमान वापरून मोदीजीनी मेक इन इंडियाचा सुंदर आदर्शच ठेवला आहे.

प्रवासखर्च मात्र ४५ लाख. ( हे कोण घालणार ? भाजपा ? गुजरात सरकार ? भारत सरकार ? की एखादा डोनर ? )

सिंगल सीटर सीप्लेन सिक्युरिटीच्या सर्व नियमाना बाजूला ठेवून वापरले गेले.
http://www.business-standard.com/article/elections/modi-s-seaplane-flew-...

arunjoshi123's picture

14 Dec 2017 - 11:31 am | arunjoshi123

कराचीचा विटाळ आहे का विमानांना?

विशुमित's picture

14 Dec 2017 - 6:10 pm | विशुमित

का विटाळाच चालत नाही का " त्यांना "??

पैसा's picture

14 Dec 2017 - 10:35 am | पैसा

उत्तम लेख. काही प्रतिक्रिया वाचून यत्ता दुष्ली च्या पोरांसमोर 'हॅम्लेट' चा प्रयोग चालू आहे असे वाटले.

इरसाल's picture

14 Dec 2017 - 3:52 pm | इरसाल

सध्या बडोद्यात वास्तव्य आहे.
आज कंपनीने मतदानासाठी दोन पर्याय दिले होते सकाळी दोन तास अथवा दुपारी दोन तास. मी दुपारचे दोन तास हा पर्याय निवडला आणी स्वपत्नी सोबत जावुन मतदान करुन आलो. मतदान केंद्र घराजवळच आहे.
सकाळी ऑफीसला जाताना केंद्रावर फार गर्दी होती. साधारणतः तितकीच गर्दी आता सुद्धा होती. स्री-पुरुष आणी जेष्ठ नागरिक अशा वेगवेगळ्या रांगा असुनसुद्धा.
मतदानासाठी लोकांमधे असणारा उत्साह कायम(शाबुत) दिसत आहे.

मी गुप्त मतदान केलेय. खालील पुरवणी(इरसालपणा) वरुन मी कोणाला मतदान केले याचा चुकीचा अंदाज काढु नये.

आता इरसालपणा........
ईथे मोठी गंमतच झालीय, ज्यांच्या ज्यांच्या डाव्या हाताच्या दुसर्या बोटाला मतदानाची शाई लावलीय त्या सगळ्यांनी भाजपला मतदान केले असे ऐकण्यात आलेय. ;)

विशुमित's picture

14 Dec 2017 - 6:07 pm | विशुमित

दुसऱ्यांना नैतिकतेचे डोस पाजणारे स्वतः वर वेळ येति तेव्हा कुठे मती पेंड खायला जाती काय माहित?
आपला मतदान करायचे आणि शांत निघून जायचे सोडून कारच्या फुटबॉर्डवर उभे राहून लोकांना अभिवादन करत "माझी इझत वाचवा" (हि माझी मन कि बात आहे, नाहीतर लगेच पुरावा मागताल) अशी याचना करत ३०० मीटर रोड शो करत गेले .
परीक्षेच्या काही मनीटे शिल्लक असते वेळेस वर्गात घुसत अभ्यास करणारे विध्यार्थी आठवले. तेवढेच २-३ मार्क वाढले तर वाढले.
जाऊ दे परीक्षा झाली आहे. उत्तर पत्रिकेत काय लिहले आहे काही माहित नाही.. आता रिझल्ट लागेल तो लागेल.
प्रश्न पत्रिका Tally करण्यात काही पॉईंट नाही.
चिल्लाक्स ...!!

सुबोध खरे's picture

14 Dec 2017 - 6:10 pm | सुबोध खरे

तुम्ही मन कि बात करायला लागलात यातच सगळे आले
भरून पावलो!!

विशुमित's picture

14 Dec 2017 - 6:12 pm | विशुमित

काय सगळे आले ??

सुबोध खरे's picture

14 Dec 2017 - 6:14 pm | सुबोध खरे

जे तुमच्या मनात आहे तेच

विशुमित's picture

14 Dec 2017 - 6:35 pm | विशुमित

माझ्या मनात काय आहे तेच तर विचारतोय??

हीच प्रतिक्रीया काल टी व्ही वर प्रासारित झालेल्या आपल्या आदरणीय राहुल गांधींच्या मुलाखती नंतर यायला हवी होती.

विशुमित's picture

14 Dec 2017 - 6:34 pm | विशुमित

परीक्षेच्या अदल्यारात्री अभ्यास करणाऱ्या च ठीक आहे, समजू शकतो. त्यांनी अगोदर काहीच अभ्यास नाही केला त्यामुळे ते फेल झाले तर काही आश्चर्य वाटणार नाही पण वर्गात अव्वल समजणाऱ्या, परीक्षा केंद्रात घुसताना पण अभ्यास करणार्यांबद्दल बोलत होतो.
कॉप्या बद्दल तर बोलोच नाही अजून मी...

इरसाल's picture

14 Dec 2017 - 6:16 pm | इरसाल

गुजरातेत भाजप जिंकला तर...................(अरे बापरे...................मिपावरील इतरेजनांचे काय होईल जे हिरीरिने मोदींच्या आत्यंतिक विरोधात आहेत.(ओफ्फो ओफ्फो इव्हीएम च्या रुपाने पक्क शस्त्र आहे अजुन.....))

गुजरातेत काँग्रेस जिंकला तर...................(अरे बापरे...................मिपावरील इतरेजनांचे काय होईल जे हिरीरिने गांधींच्या आत्यंतिक विरोधात आहेत.(ओफ्फो ओफ्फो इव्हीएम च्या रुपाने पक्क शस्त्र नाही अजुन.....))