पेजावर स्वामीजींचे आभार

साहना's picture
साहना in काथ्याकूट
27 Nov 2017 - 9:40 pm
गाभा: 

pejawar rte

भारतीय घटनादुरुस्ती करून कलम ३० खाली जे अधिकार अल्पसंख्यांक लोकांना दिले आहेत तेच अधिकार बहुसंख्यांक लोकांना मिळावे आणि विशेषतः हिंदू समाजातील विषमता कमी करण्यासाठी शाळा चालवण्याचे हिरावून घेतलेले स्वातंत्र्य बहुसंख्यांक लोकांना पुन्हा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पेजावर स्वामीजींनी केली आहे. हिंदू धर्मातील एखाद्या प्रमुख धार्मिक नेत्याने कलम ३० आणि ९३वि दुरुस्ती ह्याविरोधांत आवाज उठवण्याची हि पहिलीच वेळ आहे.

ह्या मागणीसाठी काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहेच पण काही विद्यार्थी संघटनांनी त्यांच्या विरुद्ध FIR सुद्धा दर्ज केली आहे.

https://t.co/n1krEpgPCv

“We only want the same facilities to be provided to the majority also. There should not be partisanship or discrimination on the grounds of religion. The Constitution should be amended for this,” he said.

pejawar rte

प्रतिक्रिया

धर्माच्या नावाखाली शिक्षणक्षेत्रात कसलाही भेदभाव किंवा झुकते माप देण्याचा प्रकार होऊ नये.