२६ नोव्हेम्बर संविधान दिन

ओम शतानन्द's picture
ओम शतानन्द in काथ्याकूट
23 Nov 2017 - 12:20 am
गाभा: 

२६ नोव्हेंबर१९४९ रोजी देशाचे संविधान -घटना- तयार झाली , त्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो
काही ठिकाणी बौद्ध समाजाच्या संघटनांनी -२६ नोव्हेंबर संविधान गौरव दिन असल्यामुळे संविधानाच्या प्रतिकृतीची भव्य मिरवणूक किंवा तत्सम काही कार्यक्रम करून उत्सव साजरा करण्याचे banner लावलेले आहेत , हे पाहून माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले
१) भारतीय संविधान -घटना - यास धार्मिक ग्रंथाप्रमाणे पावित्र्य प्राप्त होऊ होऊ लागले आहे काय
२) संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ऐवजी अन्य कुणी सवर्ण व्यक्तीने लिहिले असते तर असले उत्सव साजरे केले गेले असते का
३) उत्सव साजरे करणारे लोक, संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले असल्यामुळे त्यास अपरिवर्तनीय समजतात काय

प्रतिक्रिया

babu b's picture

23 Nov 2017 - 7:28 am | babu b

१. संविधानानंतर राजेशाही / सुल्तानशाही / राणीशाही खर्या अर्थाने संपून लोकाना अधिकार मिळाले . मग केला साजरा सण तर बिघडले कुठे ?

२. सवर्णानी संविधान दिन साजरा करु नये , असे कुठे लिहिलेले नाही .. आनंद वाटत असेल तर करावे. पाळण्यात संविधान घालून , पाळणा हलवून नंतर सुंठवडा वाटला तरी चालेल.

३. परिवर्तनीय / अपरिवर्तनीय ... तज्ञ उत्तरे देतील.

माहितगार's picture

23 Nov 2017 - 8:27 am | माहितगार

Constitution Day, also known as Samvidhan Divas, is celebrated in India on 26 November every year to commemorate the adoption of Constitution of India. On this day in 1949, the Constituent Assembly of India adopted the Constitution of India, and it came into effect on 26 January 1950.[1]

The Government of India declared 26 November as Constitution Day on 19 November 2015 by a gazette notification. The Prime Minister of India Narendra Modi made the declaration on 11 October 2015 while laying the foundation stone of the B. R. Ambedkar memorial in Mumbai.[2] संदर्भ

भारतीय राज्यघटना भारतातील सर्व समुदायांनी मनोमन स्विकारली आहे. आणि राज्यघटना केवळ मर्यादीत लोकांना माहिती राहण्यापेक्षा जनतेस माहिती पडत असेल तर ते स्वागतार्हच आहे. राज्यघटना सर्वांसाठी आहे विशीष्ट चष्म्यातून पहाण्याची आवश्यकता नसावी. या निमीत्ताने लोकशाही मुल्यांवरील श्रद्धा बळकट होणार असेल आणि आणखी एका सेक्युलर सणाची भर पडणार असेल तर बरेच आहे.

एखाद्या गोष्टीशी वेगवेगळे समुह वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःस जोडून घेत असतात. ज्यांचा बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास आहे ते त्यांच्या नावाने जोडून घेतात इतर लोक इतर कारणांनी जोडून घेतील. जोडून घेण्याशी मतलब आहे. राज्यघटनेच्या परिवर्तनशीलते बाबत घटनेतच मार्गदर्शन आहे. आणि गैरवाजवी परीवर्तनांपासून थांबवण्याच्या दृष्टीने घटनेतील तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकात पुरेशी बळकटी आहे. परिवर्तन शक्य नसते तर जिएसटी अस्तीत्वात आले नसते ना ?

२६ नव्हेंबर साजरा करण्यास मला आनंद आहे. राज्यघटनेला वर कुणी म्हटल्या प्रमाणे पाळण्यात ठेऊन जिलेबीचे गोड जेवण देण्याचा विचार करतोय :)

फारएन्ड's picture

6 Dec 2017 - 11:17 pm | फारएन्ड

माहितगार - प्रतिसाद आवडला व सहमत आहे.

जानु's picture

25 Nov 2017 - 8:25 am | जानु

"दलित समाजाने आपल्या ब्राह्मणीकरणाचा वेग वाढवला आहे"

ओम शतानन्द's picture

25 Nov 2017 - 2:31 pm | ओम शतानन्द

संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ऐवजी अन्य कुणी सवर्ण व्यक्तीने लिहिले असते तर असले उत्सव साजरे केले गेले असते का या बद्दल शंका आहे ,
हे उत्सव गेल्या काही वर्षात दलित अस्मितेचे प्रकटी करण आणि उजव्या विचारसरणीला असलेला विरोध यामुळे सुरु झाले अशी शंका घेण्यास वाव आहे.
१९५० नंतर असले उत्सव कितीवेळा, काय प्रमाणात साजरे केले हे शोधले तर मी काय म्हणतो आहे ते लक्षात येईल ,
संविधाना बद्धल असलेला आदर हा फक्त उत्सवी वातावरण निर्मितीतून दाखवणे हे कृती पेक्षा दिखाव्याला महत्व देण्याच्या भारतीय मानसिकतेचे द्योतक आहे.

माहितगार's picture

25 Nov 2017 - 8:12 pm | माहितगार

उत्सवी वातावरण निर्मितीतून दाखवणे हे कृती पेक्षा दिखाव्याला महत्व देण्याच्या भारतीय मानसिकतेचे द्योतक आहे.

दिखाव्या पेक्षा कृती महत्वाची हे मान्यच. शब्द पुजा विरोधकांचे अनुयायी जसे शब्दपुजाच करतात तसे व्यक्तीपुजा विरोधकचे अनुयायी व्यक्तीपुजा करतात दोन्हीतनही सुटका नाही ! ;) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच भारतीय माणूस प्रत्येक युगात नवा देव शोधण्यात कुशल आहे म्हटले आहे. त्यातुन डॉक्टर साहेबांची सुटका नाहीच त्यांची आणि त्यांनी ज्या ज्या वस्तुस हात लावला त्याची पुजा अटळ आहे. माणूस जात्याच उत्सवी असतो पुजेत सहभागी न होणारे कमी असतात पुजेत सहभागी होणार्‍यांची संख्या वाढत असते, कोणत्याही पुजेत सहभागी न होणार्‍यांनी स्थितप्रज्ञता अंगी बाळगण्या शिवाय इतर पर्याय फारसे नसतात.

अर्धा पान महाराष्ट्र शासनची जाहिरात आहे.

मोदी व फडणवीसांचे फोटू आहेत.

संविधान दौड व गौरव यात्रा , वरळी सी फेस , सकाळी ७.३० वाजता , २६ नोव्हेंबर २०१७.

डॉ. आंबेडकरांचा फोटो , त्याखाली शब्द आहेत .. अभिमान आम्हाला संविधानाचा ... समता , स्वातंत्र्य , न्याय आणि बंधुत्वाचा.

...

साक्षात मोदीजी , फडणवीस यांचे फोटू ! मंत्रालयाने दिलेली जाहिरात आहे.

गामा पैलवान's picture

25 Nov 2017 - 3:41 pm | गामा पैलवान

माहितगार,

भारतीय राज्यघटना भारतातील सर्व समुदायांनी मनोमन स्विकारली आहे. आणि राज्यघटना केवळ मर्यादीत लोकांना माहिती राहण्यापेक्षा जनतेस माहिती पडत असेल तर ते स्वागतार्हच आहे.

राज्यघटना सर्व समुदायांनी स्वीकारलेली असूनही केवळ मर्यादित लोकांनाच माहित आहे. मग राज्यघटना ही एक नवीन पोथीच झाली म्हणायची की. मग जुनी पोथ्यापुराणं काय वाईट आहेत?

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

25 Nov 2017 - 8:01 pm | माहितगार

उत्सवी स्वरुप केल्याने पोथीपुजेचे स्वरुप येऊ शकते, आणि त्यात काल सुसंगत बदल होणे थांबल्यास अशा ग्रंथपुजा घ्तातक ठरु शकतात हे मान्यच; पण सुयोग्य बदलास सध्यातरी घटनेत वाव दिसतो. इतर पोथ्या आणि राज्यघटनेत कालानुरुप बदल करता येणे हा मोठा फरक आहे, त्री स्तरीय लोकशाहीचा आधार - संघ शासन राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्था, त्रि स्तरीय न्याय व्यवस्था, कायदा मंडळे आणि प्रशासन यांचे स्वतंत्रपणे काम करणे, समता , स्वातंत्र्य , न्याय आणि बंधुत्व इत्यादी मुल्ये या मुळे इतर पोथ्या आणि राज्यघटनेमुळे बराच फरक पडू शकावा असे वाटते.

तोंडाने पोथी घोकून मुल्यांचे संवर्धन होतेच असे नाही पोथी पेक्षा मुल्ये महत्वाची , पोथ्या माणसासाठी आहेत माणसे पोथ्यांसाठी नाहीत याचा विसरपडू नये पण माणूस हा प्राणी पुरेसा रॅशनल नसल्या मुळे त्याबद्दल शास्वती देणे कठीण असो. तुर्तास या निमीत्ताने तोंड गोड करू.

भारतात दोगले लोक राहतात, भारताचा इराक,सिरीया व्हावा असे मला वाटते, यांना जातीवरच आरक्षण हवेय,समान नागरी कायदा नकोय.