चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
21 Nov 2017 - 5:22 am

१८ नोव्हेंबर २०१७ : महाराष्ट्र टाईम्स । मुंबई
 

चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत
संमेलनाध्यक्षपदी डॉ. विठ्ठल वाघ यांची निवड

कल्पनाविश्वात रमणाऱ्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्यक्षेत्राकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी बुधवार, ३१ जानेवारी २०१८ रोजी पु. ल देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे चौथ्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषविणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते अभिजित फाळके यांनी तर अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरुप धारण केले आहे पंरतु प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फारसा उहापोह आणि उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाहीत. अगदी साहित्यक्षेत्रसुद्धा या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहत आहे असे आढळून येत नाही. मागील तीन वर्षातील सततच्या अवर्षणग्रस्त परिस्थितीने शेतकरी हतबल झालेला असतानाच विद्यमान सरकारच्या फसव्या कर्जमाफीने शेतकरी आणखीनच हवालदिल झालेला आहे. जवळजवळ सर्वच शेतमालाचे भाव केंद्रशासनाने निर्धारित केलेल्या हमीभावापेक्षाही (MSP) कमी दराने बाजारात विकले जात आहे. शेतकरी देशोधडीस लागत असतानाही समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात मात्र वास्तवाचे प्रभावीपणे चित्र प्रतिबिंबित होताना दिसत नाही, ही बाब साहित्यक्षेत्रातील उदासीनता अधोरेखित करणारी आहे.

साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूर येथे तर २०१७ मध्ये तिसरे साहित्य संमेलन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते.

या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणाऱ्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्तारासाठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे आणि सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पीढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.

या संमेलनात "आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण", "स्वामिनाथन आयोग: शेतीला तारक की मारक?", "शेतकरी विरोधी कायद्यांचे जंगल, "सावध! ऐका पुढल्या हाका", अशा विविध विषयावरील एकूण ४ परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे. संमेलनात शेतकरी गझल मुशायरा व शेतकरी कवी संमेलन अशी दोन स्वतंत्र सत्रं ठेवण्यात आली आहेत.

संमेलनाच्या आयोजनासाठी नियोजन समिती, व्यवस्थापन समिती, आयोजन समिती, आणि स्वागत समिती अशा चार समित्या गठीत करण्यात आल्या असून या समित्यांचे अध्यक्ष म्हणून अनुक्रमे प्रा. भुपेश मुडे, प्रा. रमेश झाडे, प्रा. कुशल मुडे, व जनार्दन म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-t...

वाङ्मयसाहित्यिकबातमी

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

21 Nov 2017 - 10:56 am | कपिलमुनी

Noted.

गंगाधर मुटे's picture

21 Nov 2017 - 12:02 pm | गंगाधर मुटे

धन्यवाद. संमेलनात आपले स्वागत आहे.

संमेलनाचे उद्देश कळकळीचे वाटतात. परंतु, अशा साहित्य संमेलनाचा या उद्दिष्टांना कितपत उपयोग होईल याबाबत शंका वाटते. असो. कृषिसाहित्य संमेलनाला मनःपूर्वक शुभेच्छा. हे संमेलन मुंबईत घेताय हे चांगले आहे. त्या निमित्ताने सरकारी यंत्रणा आणि शहर-केंद्रित प्रसारमाध्यमे यांच्या कानावर आपले गाऱ्हाणे घालता येईल.

गंगाधर मुटे's picture

22 Nov 2017 - 1:31 pm | गंगाधर मुटे

अशा साहित्य संमेलनाचा या उद्दिष्टांना कितपत उपयोग होईल याबाबत शंका वाटते.

वास्तवाचे दर्शन घडविणारे साहित्य निर्माण होण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल. साहित्याचा तातडीने प्रभाव पडणार नाही मात्र दूरगामी परिणाम नक्कीच मिळतील.

पुंबा's picture

21 Nov 2017 - 1:15 pm | पुंबा

संमेलनाला शुभेच्छा..
झगमगाट, राजकिय सत्कार, प्रस्थापितांचे नखरे अन शाही मेजवान्या हे आणि असले इतरही दोष जे मराठी साहित्य संमेलनाला जडलेले आहेत त्यांची बाधा आपल्या उपक्रमाला न होवो आणि जाणीवपुर्वक पठडीच्या बाहेर जाऊन नविन कृषी साहित्याच्या वाटांवर चिंतन होवो अशी सदिच्छा.

विनिता००२'s picture

21 Nov 2017 - 4:55 pm | विनिता००२

संमेलनाला शुभेच्छा मुटे सर

नक्की येणार __/\__

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2017 - 10:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संमेलनाला शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

संमेलनाला शुभेच्छा.

- मोदक.

नाखु's picture

22 Nov 2017 - 10:11 pm | नाखु

हार्दिक शुभेच्छा

काही नवीन विधायक कार्यक्रम आणि शेतकरी सबलीकरणासाठी व्यवहार्य उपाय येवोत

नाखु

गंगाधर मुटे's picture

30 Nov 2017 - 2:57 pm | गंगाधर मुटे

चौथे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८ 

स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई
 

ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)

प्रतिनिधी सहभाग शुल्क : शुल्काची रक्कम इच्छेनुसार पण अनिवार्य
 

प्रतिनिधी सहभाग नोंदणीची पद्धत :

  • सभागृहाची आसन क्षमता लक्षात घेता गैरसोय होऊ नये म्हणून आपली जागा अग्रिम आरक्षित करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • प्रतिनिधी सहभाग शुल्क म्हणून स्वेच्छेने यथाशक्ती शुल्काची रक्कम अदा करणे अनिवार्य आहे. भरलेल्या रकमेची रीतसर पावती संमेलनस्थळी किट मध्ये दिली जाईल.
  • एक ते पाच प्रतिनिधी सहभाग शुल्क सामूहिकपणे भरुन एकत्रितपणे ऑनलाईन नोंदणी करू शकतात. 
  • प्रतिनिधींना २ वेळ भोजन, २ वेळ चहा, अल्पोपहार, माहिती किट आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
  • ऑनलाईन अग्रीम नोंदणी केल्यानंतर SMS द्वारे किंवा दूरध्वनीद्वारे प्रतिनिधीला नोंदणी क्रमांक ७२ तासाचे आत कळवला जाईल.
  • निवासाची व्यवस्था करणे शक्य न झाल्याने दिलगीर आहोत.
  • पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
  • झालेल्या नोंदणीमधूनच परिसंवादातील वक्ते, कवी आणि गझलकार निवडले जातील.
  • नोंदणी झालेल्या सर्व वक्ते, कवी आणि गझलकार यांना व्यासपीठावर संधी मिळेलच असे नाही, याची नोंद घ्यावी.
  • कोणत्याही सबबीखाली नोंदणीची रक्कम परत मिळणार नाही.
  • महत्वाची सूचना : नाव शक्यतो मराठीतच लिहावे, जेणेकरून प्रमाणपत्रावर नाव चुकीचे येणार नाही. 

प्रतिनिधी सहभाग शुल्क कसे भरावे :

पर्याय क्र. १ : ऑनलाईन किंवा थेट शुल्क खालील खात्यात जमा करावे. 

Punjab National Bank 

Branch - Hinganghat 

A/c Name - SHETI ARTH PRABODHINI 

A/c No - 0202000105179647

IFSC Code - PUNB0020200 

MICR Code - 442024005

*  *  *   *

पर्याय क्र. २ : खालील पत्त्यावर मनीऑर्डर करावा.

शेती अर्थ प्रबोधिनी
मु.पो. आर्वी छोटी
ता. हिंगणघाट जि. वर्धा
पिन - ४४२३०७
मनीऑर्डर फॉर्मवर प्रतिनिधीने स्वतःचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नं. लिहिणे आवश्यक.

*  *  *   *

ऑनलाईन नोंदणी :

शुल्क भरून झाले की, Transaction No/Refference No/मनिऑर्डर किंवा पावतीचा नंबर हाती ठेऊन ऑनलाईन नोंदणीसाठी  येथे  *Fingure-Right*    क्लिक करावे फॉर्ममध्ये माहिती भरून प्रकाशित करावे.

टीप : ऑनलाईन नोंदणीचा फॉर्म भरण्यापूर्वी LOG IN (www.baliraja.com चे सदस्य नसणाऱ्यांनी SIGN IN व नंतर LOG IN) करून नोंदणी केल्यास त्यांना त्यांची नोंदणी www.baliraja.com/rep-18b या लिंकवर पाहता येईल.

*  *  *   *

पर्याय क्र. ३ : ईमेल द्वारे प्रतिनिधी नोंदणी 
पर्याय १ किंवा २ प्रमाणे सहभाग शुल्क भरून झाले की  abmsss2015@gmail.com या ईमेलवर खालीलप्रमाणे माहिती भरून ईमेल करावा.
ईमेलच्या विषयात ''अग्रिम प्रतिनिधी नोंदणी'' लिहिणे आवश्यक आहे.

  1. पूर्ण नाव (शक्यतो मराठी):
  2. पूर्ण पत्ता : 
  3. तालुका : 
  4. जिल्हा : 
  5. स्त्री/पुरुष : 
  6. वय : 
  7. ईमेल : 
  8. मोबाईल नंबर : 
  9. भरलेले प्रतिनिधी सहभाग शुल्क रुपये : 
  10. Txn/Ref/Rcpt No : 
  11. शुल्क भरण्यासाठी वापरलेला पर्याय :
  12. शुल्क भरल्याचा दिनांक : 

आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत!

             आपला स्नेहांकित 

                 गंगाधर मुटे

                 कार्याध्यक्ष

४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई 

*  *  *   *

कपिलमुनी's picture

30 Nov 2017 - 3:32 pm | कपिलमुनी

मुंबई मधे एकही शेतकरी नाही किंवा जवळपास सुद्धा फार कमी शेतकरी राहिले आहे
मुंबईला हे शेतकरी संमेलन अटेंड करायचे असेल तर इतर शेतकर्‍यांना महाग पडेल .
मुंबईमधे कितीजण हे संमेलन अटेंड करतील ? ते पण कामाच्या दिवशी ?
या ऐवजी एखद्या शेतीबहुल जिल्ह्यात घेतला असता तर बरे झाले असते. कमीतकमी आपल्यावर साहित्य लिहिले जातेय हे तरी शेतकर्‍ञांपर्यन्त पोचल असते

गंगाधर मुटे's picture

26 Dec 2017 - 11:43 pm | गंगाधर मुटे

sanmelan

गंगाधर मुटे's picture

26 Jan 2018 - 10:06 pm | गंगाधर मुटे

sahitya Sanmelan

sahitya Sanmelan