आक्रंदन

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
20 Nov 2017 - 2:43 pm
गाभा: 

चुकीच्या बाजूने वाहन घालणाऱ्यांची संख्या वाढते आहे हे चिंताजनक होतच आणि आहेच. परंतु त्यातील संकोच कमी होतोय. त्यात काही चूक आहे असे हल्ली बघ्यांनाच वाटेनासे झालंय.

प्रत्येक कायदा, नियम बेदरकर पाने मोडणार्यांची संख्या वाढते आहे, नियम पाळणारे बावळट मूर्ख ठरताहेत ....
दंडात ताकद, खिश्यात दमड्या किंवा सत्तेशी जवळीक ही जीत की अधिक तितका हा माज जास्त ..
सिस्टीम समाज गेला खड्ड्यात तू तुझा फायदा बघ आणि तेवढच बघ असे पालकच मुलांना सांगत आहेत. त्यात त्यांचा नाईलाज आहे असं म्हणतात ...

व्याख्याच बदलताहेत
उर्मटपणा : धडाडी.
नम्रपणा : बुळेपणा,
सहनशक्ती : अशक्त असहाय्य
फसवणूक करणारा : हुशार
फसवला जाणारा : अज्ञानी बावळट
रक्षक : भक्षक
भक्षक : रक्षक

कुणीच कुणाला उत्तरदायी नाही म्हणे ...

हे भयंकर आहे, विनाशकारी आहे

मग ?
काय झालंय ??
मग काही नाही हो ...आज काही झालेलय असं नाही

पण रोजच चालू आहे दिसतंय आजूबाजूला

म्हणून
एक आक्रंदन किंवा अरण्यरुदन ...

एवढच ...बाकी चालू देत तुमच

वेळ वाया घालवला का तुमचा ??? माफ करा ...

चालू देत तुमचं

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

20 Nov 2017 - 3:01 pm | मराठी_माणूस

निरिक्षण बरोबर आणि उद्वीग्न करणारे आहे.

चुकीच्या दिशेने वाहन चालवण्या संबंधातील एक निरिक्षण असे आहे की, लोक जाब विचारण्या ऐवजी जाण्यासाठी जागा करुन देतात.

भ ट क्या खे ड वा ला's picture

20 Nov 2017 - 7:51 pm | भ ट क्या खे ड वा ला

मी सायकलिंग करताना एक करतो , मी माझी डावी बाजू सोडत नाही .. समोरच्यालाच हसत हसत खूणा करुन त्याच्या डावीकडे जायला लावतो ..
मग मागच्याच्या शिव्या खातो तो ..

किंवा सरळ थांबतो समोरच जाउन ..

आवशीचो घोव्'s picture

20 Nov 2017 - 8:17 pm | आवशीचो घोव्

जाब विचारणार्याला मार खाताना पाहिलं आहे. :(

रामदास२९'s picture

20 Nov 2017 - 5:38 pm | रामदास२९

निरीक्षण दुर्दैवाने बरोबर

एस's picture

20 Nov 2017 - 5:55 pm | एस

पोटतिडकीने सहमत! :-(

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2017 - 6:48 pm | टवाळ कार्टा

बेंगलोरात सद्ध्या रिक्शा चालवतात तश्या बसेस चालवतात

भ ट क्या खे ड वा ला's picture

20 Nov 2017 - 7:48 pm | भ ट क्या खे ड वा ला

ही किड वाढतच जाणार असं दिसतय ..
राज्यकर्त्याना / प्रशासनाला या गोष्टी शुल्लक वाटतात ..
त्यात आपलाच कार्यकर्ता असेल तर मग तोच बरोबर ..
खरच कठिण आहे सगळंच

गबाळ्या's picture

22 Nov 2017 - 4:15 am | गबाळ्या

मला वाटते हा राजकीय/प्रशासकीय या पेक्षा वैयक्तिक वागणुकीचा प्रश्न आहे. आजकाल दुसऱ्या बद्दल चा आदर कमी होत आहे. मीच श्रेष्ठ, मलाच सगळे मिळाले पाहिजे, तेही मी म्हणेल तसे. मुख्यत्वे दुसऱ्याला डावलून/कमी लेखून काही मिळवणे याचा असुरी आनंद. आता हेच पहा ना आपण आपल्या ठिकाणी वेळेवर पोहोचल्याच्या आनंदापेक्षा, कोणाला कसे overtake केले किंवा पुढे जाऊ दिले नाही याचाच लोकांना जास्त आनंद असतो. आणि अशा घटनांचे रसभरीत वर्णन आणि त्यांचे तेवढेच कौतुक घडोघडी ऐकायला मिळते.

वैयक्तिक पातळीवर एकमेकांबद्दल आदर वाढला तर यातल्या बऱ्याच गोष्टी सुधारतील असे मला वाटते.

अरिंजय's picture

20 Nov 2017 - 9:16 pm | अरिंजय

१००% सहमत

सौन्दर्य's picture

21 Nov 2017 - 9:46 am | सौन्दर्य

माझ्या लहानपणी रेशनसाठी, केरोसीन घेण्यासाठी लांबलचक रांगा लागायच्या. आमच्या कॉलोनीतील दहा बारा वर्षाची एक मुलगी बिनदिक्कत रांगेत घुसायची. आधी ती रांगेत पुढे असणारी एखादी बाई अथवा मुलगी हेरायची, नंतर तिच्याशी बोलण्याच्या बहाण्याने तिच्याजवळ उभी राहायची. जर मागच्यांनी आरडाओरडा केला तर ती त्यांच्याच अंगावर ओरडायची, म्हणायची, "मी फक्त बोलत उभी आहे, रांगेत घुसली नाही" वगैरे. जर कोणीच काही बोलले नाही तर (आणि बहुतेक वेळा तसेच व्हायचे) रांगेत न उभे राहता ती आमच्या आधी रेशन घेऊन घरी परतत असे आणि आम्ही सज्जनपणे (की बावळटपणे) दोन दोन तास रांगेत उभे राहत असू. त्या मुलीची आई त्या मुलीला "हुशार" म्हणत असे व इतरांना बावळट.

सुबोध खरे's picture

21 Nov 2017 - 10:20 am | सुबोध खरे

रेल्वेच्या तिकिटाच्या रांगेतपण कधी कधी तरुण मुली आमच्याकडे (तरुण असताना) तिकीट काढण्यासाठी उगाच इंग्रजीत बोलून गूळ लावायला येत असत. अशा वेळेस मी ठेवणीतील खर्जातील आवाज काढून त्यांना स्पष्टपणे विचारत असे कि "एवढी रांगेत माणसं उभी आहेत ती काय मूर्ख आहेत का?"
लाजे काजेने का होईना पण त्यांना रांगेत मागे जावे लागत असे.
दुर्दैवाने माणसे पण आपल्या बायकोला किंवा मुलीला असेच कुठल्यातरी बाईकडे तिकिटासाठी "वशिला" लावण्यासाठी पाठवत असत. स्त्रीदाक्षिण्याचा किंवा "स्त्रीत्वाचा" हा एक गैरफायदा घेण्याचा प्रकार हीन आहे
रांगेत माझ्यापुढेजर असे प्रकार चालले असतील तर मी आवाज वाढवून बोलत असे. "आवाजा"वर बरीच कामे होतात असा माझा अनुभव आहे.
दुर्दैवने हि "विषवल्ली" कमी न होता वाढतच चालली आहे

सौन्दर्य's picture

22 Nov 2017 - 1:25 am | सौन्दर्य

माझी गुजरातमधे पोस्टिंग असताना सुरत स्टेशनवर एक वेगळाच प्रकार बघायला मिळायचा. त्यावेळी म्हणजे १९९०-१९९५च्या आसपास, सुरत स्टेशनवर तिकिटे काढण्याच्या खिडकीवर स्त्रियांसाठी वेगळी रांग असायची. संध्याकाळी ५ नंतर सुरतहून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त असायची त्यामुळे सर्व तिकीट खिडक्यांसमोर लांबलचक लाईन्स असायच्या. कित्येक वेळा गर्दीमुळे आलेली गाडी निघून जाईपर्यंत आपला नंबरच येत नसे. अश्या गर्दीच्या वेळी काही बायका एक-दोन रुपये जास्त घेऊन पुरुष प्रवाश्यांची तिकिटे विकत घेऊन द्यायच्या. ह्या बायका काही प्रवासी नसत तर तो त्यांचा धंदाच होता. खोटं सांगत नाही पण एकदोन वेळा गाडी चुकू नये म्हणून मी देखील अशा स्त्रियांकडून तिकीट काढून घेतले आहे.

स्मिता.'s picture

22 Nov 2017 - 1:40 am | स्मिता.

आजकाल असले प्रकार सर्रास घडतात. रेल्वेच्या तत्काल आरक्षणाच्या जागा पहिल्या ५ मिनीटात भरतात, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या जागा तर बहुदा २-३ मिनीटातच संपतात. त्यामुळे तत्काल तिकिटाकरता रांगेत पहिला किंवा दुसरा क्रमांक अनिवार्य असतो. हल्ली दलाल किंवा त्यांची माणसं जागा पकडून ठेवतात आणि त्याचे पैसे घेतात. त्यांचे दरसुद्धा असतात. उदा. रांगेत पहिल्या क्रमांकाचे करता रु. ७५०, दुसर्‍या क्रमांकाचे र. ५००, इ.
दोन वर्षांपूर्वी मला तातडीने बंगलोरला जायचे होते. ३ दिवस दररोज आरक्षण खिडकी उघडायच्या २-३ तास आधी पोहोचूनही मला पुढची जागा आणि पर्यायाने तिकीट मिळाले नव्हते. तेव्हा हा सगळा प्रकार समजला होता.

या सगळयाचा सारांश "भारत हा समाज नाही, ही निव्वळ गर्दी आहे" या चर्चिल च्या वाक्याने करता येतो !

सिरुसेरि's picture

22 Nov 2017 - 12:56 pm | सिरुसेरि

अशाच अर्थाचा "जिन्हे नाझ है हिंदपर वो कहां है ? " असा संत्रस्त सवाल साहिरने केला आहे .

झेन's picture

23 Nov 2017 - 12:49 pm | झेन

आपल्या दैनंदिन जीवनात आपण ठरवून सुद्धा काही गोष्टी नियमितपणे करू शकत नाही, जसे की योग, प्राणायाम. ही एक संधी आहे आपोआप हे घडण्याची.

- योगासने - रस्त्यांची स्थिती, बेसुमार बेदरकार वाहनांनमुळे अनेक आसने आपसूकच होतात.

- प्राणायाम - वायुप्रदूषण प्राणायाम करवून घेते. सिक्ससिटर/जुनी डिझेल वाहने यामुळे खरेतर डास प्रतिबंधक धूर सोडण्याची सेवा होते.

- बाकी उन्मत्त नियम तोडणा-यांमधे एकता बघा सर्व झेंडे/स्टिकर वाले, सगळ्या वयाचे पुरूष स्त्रिया, सरकारी/प्रायव्हेट/सेनादलाचे लोक. . . कसली जबरदस्त एकी.

- शाळेसमोर बेशिस्त वाहनचालक पालक बघून भविष्यातही कायपण बदलणार नाही सो नो टेंशन.

- या सर्व गोष्टीकडे अत्यंत त्रयस्थपणे बघणारे वाहतूक पोलीस हे तर अध्यात्मात पोचलेले "साधू"च, त्यांना गुरू मानले पाहिजे.

- सगळ्याचा राग येवून काही उपयोग ही नाही त्यामुळे काय काय ते यम, नियम असतील ते सगळे अपोआप पाळले जातात.

फक्त द्रुष्टी बदलायला पाहिजे.

ओम शतानन्द's picture

25 Nov 2017 - 2:34 pm | ओम शतानन्द

हा अनुभव पुण्यातील आहे का ?
मुंबईत एवढी बेशिस्त नाही

तेजस आठवले's picture

25 Nov 2017 - 3:55 pm | तेजस आठवले

चुकीच्या बाजूने बिनधास्त जोराने वाहने पळवणे हे आता सर्वत्र दिसू लागले आहे. कोणाला त्याचे काहीही वाटत नाही. उलट्या बाजूने नाईलाजाने जावे लागल्यास दुचाकी/ चारचाकी चा पुढचा दिवा प्रखर(अप्पर) करून पार्किंग दिवे चालू करून गाडी १० च्या गतीने चालवता येऊ शकते. पण त्यात शौर्य कुठाय ?
बोलू नये पण आपल्या स्वतःच्या गाढवपणामुळे बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात झालेल्यांबद्दल मला काडीचीही सहानुभूती नाही.

सुपरमार्केट मध्ये बिलिंगच्या रांगेत चांगले ५०-६० वयाचे स्त्री-पुरुष माझी एकच वस्तू आहे म्हणून बिनधास्त मला न विचारता माझ्या पुढे घुसतात तेव्हा आवाज वाढवून त्यांना मागे यायला भाग पडले आहे.

माझ्या देशात नियम पाळले जात आहेत हे पाहण्याची वेळ माझ्या आयुष्यकाळात येणार नाही सार्वकालिक असलेले हे वाक्य अनंत काळापर्यंत सत्यच राहील.

मराठी_माणूस's picture

27 Nov 2017 - 10:37 am | मराठी_माणूस

५०-६० वयाचे स्त्री-पुरुष........

हे सर्व वयांच्या लोकांच्या बाबतीत अनुभवले आहे.

टवाळ कार्टा's picture

28 Nov 2017 - 6:02 pm | टवाळ कार्टा

उलट्या बाजूने नाईलाजाने जावे लागल्यास दुचाकी/ चारचाकी चा पुढचा दिवा प्रखर(अप्पर) करून पार्किंग दिवे चालू करून गाडी १० च्या गतीने चालवता येऊ शकते.

उलट असे कधीही करु नये...अप्पर दिव्यामुळे समोरुन येणार्या गाडीच्या चालकाला काहिही दिसत नाही...डिप्पर दिवा ठेउन आणि पार्किंग लाईट्स सुरु करुन यावे अश्या वेळी

रेल्वे रेझर्वेशनचे काम फारच चांगले चालते आमच्या इथे. ट्राफिकचे आक्रंदन मुंबईत नक्कीच नाही.
तुमच्या शहराबद्दल सहानुभूती आहे.

मराठी_माणूस's picture

29 Nov 2017 - 10:55 am | मराठी_माणूस

ट्राफिकचे आक्रंदन मुंबईत नक्कीच नाही.

ही मुंबई कुठे आहे ?

झेन's picture

30 Nov 2017 - 5:41 pm | झेन

परत एकदा मुंबई आणि पुणे यात महाराष्ट्र संपला.

झेन's picture

30 Nov 2017 - 6:16 pm | झेन

परत एकदा मुंबई आणि पुणे यात महाराष्ट्र संपला.

ओरायन's picture

5 Dec 2017 - 12:20 am | ओरायन

आपले अवलोकन व म्हणणे ऐकदम रास्त आहे. अहो ,असा राग येतो या बेशिस्त लोकांचा ...ज्या देशात आलीशान कारमधील माणुस पचकन मध्येच थुंकतो तिथे असे घेणार.