"दशक्रिया "चित्रपट,नक्की काय वाद आहे?????

सिंथेटिक जिनियस's picture
सिंथेटिक जिनियस in काथ्याकूट
17 Nov 2017 - 9:15 pm
गाभा: 

सध्या "दशक्रीया" या चित्रपटावरुन वाद सुरु आहे.हा नक्की काय वाद आहे हे मला नक्की कळलेले नाही.काहीजणांकडून कर्मकांडाचे अवडंबर माजवणार्या प्रवृत्ती विरोधात हा चित्रपट आहे असे समजते आहे.नक्की काय प्रकार आहे???
जर हा चित्रपट कर्मकांडा विरोधात संदेश देणारा असेल तर नक्कीच या चित्रपटाला संरक्षण दिले पाहीजे व विरोध करणार्यांना पोलिसी खाक्या दाखवला पाहीजे.

प्रतिक्रिया

babu b's picture

18 Nov 2017 - 12:02 am | babu b

कर्मकांड हा विषय नाही असे वाटते.

दशक्रिया करणारे ब्राह्मण / किरवंत हे इतर ब्राह्मणांपेक्षा कनिष्ठ मानले जातात , त्यावर असेल असे वाटते.

किरवंत नावाचे नाटकही पूर्वी होते. त्याच कथेवर आहे का , माहीत नाही.

त्यावर नाही. किरवंतचा विषय वेगळा होता. यात जगण्याची साठमारी हा मुख्य विषय आहे. टाईमपास, फांद्री वगैरेंच्या लायनीतला पिक्चर दिसतो. त्यामुळे तसाही मला बघण्यात उत्साह नाही.

पण प्रदर्शन बँड पाडण्यात अर्थ नाही. त्यामुळे हा वाद म्हणजे पब्लिसिटी स्टंट वाटतो

आनन्दा's picture

18 Nov 2017 - 10:59 am | आनन्दा

बाय द वे, आज प्रोनो बघितला, आणि खरेच कीव आली त्या लेखकाची आणि दिग्दर्शकाची देखील.
अश्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळत असतील तर आपल्या दारिद्र्याबद्दल काय बोलावे

सिंथेटिक जिनियस's picture

18 Nov 2017 - 9:03 am | सिंथेटिक जिनियस

हम्मम्म,डॉ.लागूंचे नाटक होते असे स्मरते.

खालील लिंक पुस्तकाच्या हिंदी अनुवादाची काही पाने आहेत. किरवंत असणाऱ्या ब्राह्मणाचे दु:खं यामध्ये वर्णन केलेले आहे असे दिसते.

https://books.google.co.in/books?id=p06x2LLBMkEC&pg=PA168&lpg=PA168&dq=%...

या चित्रपटाला विरोध करण्याचे कारण समजले नाही

क्रिया करणे हे मंत्युनंतर आत्म्याचे काय होते या गोष्टी मानण्यावर आहे. ते मानत असणारे आप्तेंष्टांसाठी ग्रंथांत सांगितलेले विधि ब्राम्हणांकडून करवून घेत असतात.
ही श्रद्धा ज्याचीत्याची आहे, आपल्याला त्रास होण्याचा संबंध नसतो.
सिनेमात असे काय आहे की संभाजिब्रिगेडने उडी घ्यावी किंवा ब्रम्हवृंदाने विरोध करावा.
ब्रम्हवृंद ते काम ग्रंथाप्रमाणे करवतो पण तुम्ही करा सांगितल्यावरच. तुम्हास काही आग्रह करत नाही किंवा जबरदस्तीही नाही. त्यांचा मोबदला विचारून मगच ठरवावे अथवा वाद कशाला?

शब्दबम्बाळ's picture

19 Nov 2017 - 6:56 am | शब्दबम्बाळ

सिनेमात असे काय आहे की संभाजिब्रिगेडने उडी घ्यावी किंवा ब्रम्हवृंदाने विरोध करावा.

वाक्य उलट हवं होत, आधी ब्राम्हण महासंघाने विरोध करून शो बंद पाडले होते, पण असो!
ब्रम्हवृंद वगैरे फॅन्सी शब्द असतात ना ब्राम्हणांच्या समूहाने विरोध केला कि... भारी आहे हा!
कुठल्या सिनेमाला ब्रिगेड ने विरोध केला कि बी-ग्रेडी वगैरे उद्धार इथेच होतील!

मुळात सिनेमा न पाहता त्याला विरोध करणाऱ्यांच्या बुद्धीला काय म्हणावे! आजच पुण्यात विरोध करणाऱ्यांपैकी एकाचे मत ऐकले व्हिडीओ मध्ये तर म्हणे सिनेमा पहिला नाही पण ब्राम्हणविरोधी आहे! त्यांनी आधी आम्हाला दाखवायला हवा होता!
कोण लागून गेले हे लोक त्यांना दाखवायला, सगळ्यांनाच फुकटात दाखवत बसू देत निर्मात्यांनी सिनेमा मग...

ती करणी सेना असो किंवा हा ब्राम्हण महासंघ असो यांना काडीची किंमत दिली गेली नाही पाहिजे. सेन्सर जर सिनेमाला परवानगी देत असेल तर...
आपण पण सिनेमा पहिला आहे का? कारण नक्की वाद होण्यासारखे काय आहे इतके त्याशिवाय काय बोलणार...
मनोज जोशींना राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय सहायक अभिनयासाठी... त्यांची प्रतिक्रिया पण पहा!
लोक जीव ओतून एखादी कलाकृती निर्माण करतात आणि अशी काही लोक एकत्र येऊन त्यावर पाणी फिरवतात....

श्रीगुरुजी's picture

19 Nov 2017 - 2:59 pm | श्रीगुरुजी

मराठा मोर्चाच्या वेळी "सामना"त छापलेल्या व्यंगचित्राविरूद्ध ब्रिगेडी व इतर अनेकांनी थयथयाट केला होता हो आठवत असेलच.

शब्दबम्बाळ's picture

21 Nov 2017 - 12:41 am | शब्दबम्बाळ

त्या व्यंगचित्राचा इथे कुठून संबंध लावतात बरे? मराठा मोर्च्या च्या धाग्यावर उगाळून मन भरलं नाही वाटत तेव्हा.. असो!
जातीवर काही आलं की प्रतिसादाची बौद्धिक पातळी कमीच होते हे दिसतेच कायम!
आणि मग तसेही ब्रिगेडी आणि हे ब्राम्हण महासंघ वाले एकाच लायकीचे दिसतात मग... काम ना धाम उगाच बाकीच्यांना त्रास!

श्रीगुरुजी's picture

21 Nov 2017 - 3:20 pm | श्रीगुरुजी

वरती ब्रिगेडचा उल्लेख केलात म्हणून लिहिलं ब्रिगेडच्या दुटप्पीपणाबद्दल. ब्रिगेडी आता या चित्रपटाच्या संरक्षणाला उतरलेत. पण व्यंगचित्राच्यावेळी मात्र सामनाच्या कार्यालयावर दगडफेक केली होती.

सिंथेटिक जिनियस's picture

18 Nov 2017 - 10:49 am | सिंथेटिक जिनियस

सांस्कृतीक दहशवाद हा प्रकार लोकांना भीती घालण्यासाठी वापरला जातो.जर तुम्ही मेलेल्या बापाचं आईचं श्राद्ध घातलं नाही तर त्यांचा आत्मा भटकत राहील वगैरे भीती घातली जाते.
वास्तुशांत ,भरणी श्राद्ध ,नारायण नागबळी वगैरे प्रकार फिअर माँगरींगसाठी कसे पसरवले ,स्वतःच्या तुंबड्या कशा भरल्या गेल्या याचा मोठा इतिहास आहे,तो इथे लीहीत नाही.
समाजातल्या विशिष्ट वर्गाने लोकांना हजारो वर्षं भोळसट व भित्रे बनवले आहे.त्याविरोधात एकादा चित्रपट येत असेल तर स्वागतच करायला हवे.

इथे नको, पण लिहच तुम्ही. येऊ दे के ते एकदा बाहेर

अनिरुद्ध.वैद्य's picture

18 Nov 2017 - 7:48 pm | अनिरुद्ध.वैद्य

संयोग म्हणा, कावळा बसो फांदी तुटो न्याय म्हणा,

किंवा अजूनकाही.

नारायण नागबळीनं मला वैयक्तिक फायदा झाला. तस्मात ह्याविषयी हो वा नाही असे क्लियर सांगता येणं मुश्किल झालंय.

हा ग्रे एरिया आहे.

And honoring departed souls is global phenomena. त्यामुळं विशिष्ट वर्गातलेही बरेच भोळसट लोक्स हे करत बसतात.

अर्थात मानो या ना मानो!

ओरिजिनल नारायण नागबळी कोणताच ब्राह्मण करत नाही हे मला एका ब्राह्मण गुरुजींनीच सांगितले होते. त्रिंबकेश्वरला वगैरे जे करतात ती शुद्ध फसवणूक असते असे त्यांचे म्हणणे आले. त्या ऐवजी पितृ दोषांसाठी त्यांनी त्रिपिंडी श्राद्ध घालण्याचा सल्ला दिला होता.
जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

बाकी मेल्यानंतर नक्की काय असते याबद्दल अजून कन्सेप्ट क्लीयर झालेली नाही. अनुभव घेऊन धागा काढील म्हणतो. स्वर्गात आणि नरकात दोन्ही ठिकाणी ४ जी नेटवर्क असावे म्हणजे झाले.

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Nov 2017 - 9:57 am | अनिरुद्ध.वैद्य

तर ज्या हेतूने तो केला जातो, तो हेतू बऱ्यापैकी सयुक्तिक वाटतो. न जाणो कोण कुठला आप्त ज्याचं श्राद्ध राहून गेलं असेल तर त्याचे प्रतीकात्मक संस्कार त्यास गती मिळते.

त्रिपिंडी मला नाही माहिती. त्यामुळे बोलता येणार नाही. त्यानेही हाच हेतू साध्य असेल तर ते करावं.

(अर्थात हे सगळ जे मानतात त्यांसाठीच पण अगदी परिचयातली २ ३ उदाहरणे अन स्वतःच अनुभव ह्यावून म्हणावेसे वाटते, मानो या ना मानो, कुछ तो है!)

विशुमित's picture

21 Nov 2017 - 12:11 pm | विशुमित

विधी तर महत्वाची आहे ना.
जर मला समजले की केलेला विधी अर्धवट आहे तर नागबळी मुळे फायदा झाला असे माझे मन तयार होयला पाहिजे ना.

गावठी फिलॉसॉफर's picture

20 Nov 2017 - 8:06 am | गावठी फिलॉसॉफर

जे आज दशक्रियेला विरोध करतात त्यांनी प्रथम ती प्रथा बंद करावी. मग समाजाला सांगत फिरावे. कुणीही कुणावर सक्ती केली नाही.

गामा पैलवान's picture

18 Nov 2017 - 9:56 pm | गामा पैलवान

सिंथेटसिन्थेतिक,

समाजातल्या विशिष्ट वर्गाने लोकांना हजारो वर्षं भोळसट व भित्रे बनवले आहे.त्याविरोधात एकादा चित्रपट येत असेल तर स्वागतच करायला हवे.

निव्वळ स्वागत नको. सोबत योग्य कृतीही हवी.

आता तुम्ही म्हणता की मागील हजारो वर्षे काही लोकं भोळसट व भित्री होती. याचा अर्थ आज जे तुमच्यासारखे स्वत:ला बंडखोर म्हणवून घेणारे आहेत त्यांचे बापजादे बेअक्कल होते. अशा बेअक्कल कुळांत जन्म घेतल्यानेच तुमच्या बुद्धिमत्तेची कदर होत नाहीये. तेव्हा ब्राह्मणांना दोष देणं सोडा. आणि योग्य कुळांत अवतरण्यासाठी दुसऱ्या जन्माची तयारी करायला घ्या. चालू जन्म तुमच्या फारश्या फायद्याचा नाही.

आ.न.,
-गा.पै.

कपिलमुनी's picture

18 Nov 2017 - 11:19 pm | कपिलमुनी

ब्राह्मण लोकांना फसवतात , भीती घालतात म्हणणारे अप्रत्यक्ष कबूल करत असतात की बाकी सगळे चुत्या आहेत !
कुणी सक्ती केलीये का ?

तर्राट जोकर's picture

18 Nov 2017 - 11:23 pm | तर्राट जोकर

तुमच्या वक्तव्याने जरा दिवसांआधी झालेली यनावालांच्या लेखावरची चर्चा आठवली. त्यातही असेच काहीतरी होते ना? श्रद्धा असणारे मूर्ख नसतात वगैरे...

चुत्या शब्द मिपासंमत आहे का? असेल तर सांगा, सढळ हस्ते वापरण्यास उतावीळ आहे.

चु* असे लिहिलेले चालत असेल तर सरळसरळ चुत्या लिहिलेलेपण चालायला हरकत नसावी :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Nov 2017 - 2:07 pm | अनिरुद्ध.वैद्य

मुळात कर्मकांडास विरोध असल्यांनी आपले मृत शरीर तसेच मांसाहारी प्राण्यांना खाऊ घालावे! किंवा सडत ठेऊन द्यावे.

सतिश गावडे's picture

20 Nov 2017 - 12:02 am | सतिश गावडे

त्यापेक्षा देहदान का करु नये?
उगाच विरोधाला विरोध म्हणून काहीही लिहीता राव. :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Nov 2017 - 10:01 am | अनिरुद्ध.वैद्य

पण नंतर एखाद्या सश्रद्ध माणसाने ते अवयव घेतले अन तो मेल्यावर अंतिम संस्कार करून घेतले तर ह्यांचा आत्मा तळतळाट लावणार नाही ह्याची काय खात्री ;)

सुबोध खरे's picture

21 Nov 2017 - 10:13 am | सुबोध खरे

वासांसि जीर्णानी यथा विहाय
अंतिम संस्कार हे मृतात्म्यांपेक्षा त्याच्या जिवंत नातेवाईकांच्या मानसिक समाधानासाठी असावेत. जिवंत असताना त्या माणसासाठी "काही तरी" करायचं राहून गेलेलं असतं त्या पश्चात्तापापासून मुक्तीसाठी हे संस्कार केले जात असावेत. त्यात नंतर कर्मकांड शिरलं असावं आणि "शास्त्रात रूढी बलीयसी" या नात्याने भाव राहिला बाजूला कर्मकांडच प्रबळ झालं असावं
हा सर्व माझा तर्क आहे. याला पुरावा विचारू नये.

परिंदा's picture

21 Nov 2017 - 4:18 pm | परिंदा

सहमत!!

वैदिक धर्मानुसार आत्म्याचे अस्तित्व मान्य आहे तसेच पुनर्जन्मही. त्यामुळे अंतिम संस्कार हे मृतात्म्यासाठीही नक्कीच केले जात होते. सोबत आपण म्हणत आहात त्याप्रमाणे 'त्याच्या जिवंत नातेवाईकांच्या मानसिक समाधानासाठी असावेत' ही शक्यता तर नक्कीच आहे.
'भाव राहिला बाजूला कर्मकांडच प्रबळ झालं असावं' यामताशीही सहमत आहे.

मराठी पुस्तकाची प्रत सापडली नाही म्हणून हिंदी अनुवादित दशक्रिया कादंबरीचा आढावा घेतला. बाबा भांड लिखित ही कादंबरी अतिशय चांगल्या पद्दतीने मर्तिककर्म करणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या गरीबीवर आणि दुखावर बोट ठेवते.
यापूर्वी प्रेमानंद गज्वी लिखित 'किरवंत' नाटक (भूमिका - श्रीराम लागू, राजीव खंडागळे इ.) बघण्याचा योग आला. किरवंत ब्राह्मणास इतर पुरोहित कर्म करणारे ब्राह्मण विटाळाचे धनी मनात असत. पुरोहित कर्मापेक्षा मर्तिक कर्म हीन दर्जाचे मानून त्यांना दलितांसारखी वागणूक याचे मर्मभेदी चित्रण या नाटकात होते.

दशक्रिया कादंबरीत अशा मर्तिककर्म करणाऱ्या ब्राह्मण जातीला बदलत्या काळात ज्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागते याचे चित्रण आले आहे. गरिबी कुठ्ल्यासही समाजात का असेना ही सिव्हिलायझेशन मधे चांगली बाब नाही. महात्मा फुले यांनी देखील 'तृतीय रत्न' नाटकात जरी ब्राह्मण्यावर टीका केली असली तरीही ब्राह्मण जातीचे नकळत असणारे गरीबीचे चित्रण ही केले आहे. जर एखाद्या समाजाचे भीषण वास्तव सामोरे येत असेल तर त्यात काही गैर आहे असे मुळीच नाही.

या चित्रपटाला विरोध करणे अतार्किक आहे. मला शंका आहे की किती किरवंत स्वत: या चित्रपटाला विरोध करतील.

मला व्यक्तिश: असे वाटते की सत्तास्थानातील माणसे आपले दु:खं जगासमोर येऊ देऊ इच्छित नसत्तात. कारण तसे केले तर आपण कमजोर ठरू आणि समाज आपल्याला ताकदवर मानणार नाही ही भीती. दुसरे उदाहरण सुचते. 'पुरुषाला' बालपणापासून न रडण्याचे संस्कार मिळत असतात. आणि एखादा रडलाच तर "पोरीसारखे काय मुळूमुळू रडतो" अशी टीका होते. या वाक्यातून एकीकडे पुरुषसत्ताक व्यवस्था पुरुषांना भावनिक होऊ देत नाही आणि दुसरीकडे रडणे हे दुय्यम दर्जाचे मानून स्त्रियांविषयी लिंगविषमता असणारा भाव जागृत करतात. खरेतर न रडणे हे अमानवी आहे; अनेक वेळेस जनावरे रडत्तात पण माणसातल्या पुरुषांनी रडायचे नसते. असा पितृसत्ताक समाज पुरुषांनाही धोकादायक आहे पण जीवनाच्या / कुटुंबाच्या सत्तेची सूत्र आणि सत्तेची नशा त्यांना स्वत:चे दु:ख स्वत:लाही मान्य करू देत नाही. बदलत्या जगात अनेक पुरुष निर्माण झाले आहेत जे त्यांना धोकादायक असणारी पितृसत्ताक समाजव्यवस्था सोडून समतेच्या रस्त्याने चालत आहेत.

व्यवस्थेचा हाच नियम धर्मसत्तेला लागू होतो. सत्ता सूत्र आणि सत्तेची नशा स्वत: दुखी आहोत हे मान्य करायला तयार नसते. जातीव्यवस्था ब्राह्मणांनी तयार केली, रुजवली पण या व्यवस्थेचे त्यांनाही तोटेच आहेत अनेक ब्राह्मण व्यक्तींना हे तोटे जाणवतात आणि अनेक जण यातून बाहेरही पडतात. किरवंतांना जातीव्यवस्थेचा तोटा नाही झाला का?! पेशव्यांच्या काळात चित्पावन आणि देशस्थ यातील वाद विकोपाचा आहे; इतका की चित्पावन ब्राह्मण पुण्यात नदीवर स्नानास जात असेल तर त्याकाळात देशस्थ ब्राह्मणाने जाऊ नये असा संकेत होता. तेंव्हा जातीव्यवस्थेचे तोटे खुद्द ब्राह्मण जातीला स्वत:कडूनच झाले आहेत. हे तोटे त्यांनी मोकळेपणाने मान्य केले तर त्यात त्यांचाही फायदा आहे. अखिल भारतीय म्हणूनही ब्राह्मण समाज एकत्र येत असेल ते चूक नाही पण जाती घट्ट करण्यासाठी एक होणार असतील तर दीर्घकालीन जीवनात त्यांचा त्रास वाढणारच आहे. (अर्थात हे सर्व जातींच्या मंडळांनाही लागू आहे).

कादंबरीत किरवंत धर्माची भीती घालून अधिक आर्थिक लाभाची अपेक्षा करतो असा एक आक्षेप ऐकावयास मिळाला आहे. हे तर सगळीकडेच आहे. एकीकडे गरिबी आणि दुसरीकडे धर्मसत्ता त्यामुळे आर्थिक लाभ करून घेतला याचे चित्रण आले तर गैर काही जाणवत नाही. एकंदरीत चित्रपट पाहणे रोचक असणार!

जातीव्यवस्था ब्राह्मणांनी तयार केली

या वाक्याशी असहमत. बाकी प्रतिसादाशी सहमत.

गामा पैलवान's picture

19 Nov 2017 - 5:01 pm | गामा पैलवान

Duishen,

तुमच्या या वाक्याशी प्रचंड असहमत :

जातीव्यवस्था ब्राह्मणांनी तयार केली, रुजवली

सावरकरांनी रत्नागिरीतून अस्पृश्यतेचं निर्मूलन करून दाखवलं. त्यांचा अनुभव होता की जातीभेद नाकारण्यात ब्राह्मणांना विशेष वाटंत नसे. मात्र इतर जातीचे लोकं आपापल्या जातीविषयी ठाम ग्रह बाळगून असंत. उदा. : एक चांभार महाराच्या सोबत पंक्तीस बसायला तयार नसे. यावरून ब्राह्मणांनी जातीव्यवस्था रुजवली नाही हे दिसून येतं.

आ.न.,
-गा.पै.

Duishen's picture

19 Nov 2017 - 7:01 pm | Duishen

गामाजी,
जातीव्यवस्था उगम हा वैदिक कालखंडातील आहे. साधारणत: ३००० वर्षापूर्वी. आर्य अनार्य संघर्षातून जेत्या लोकांनी पराजित लोकांवर लादलेली (...आणि स्वत:वरही लादून घेतलेली) व्यवस्था. कधी युद्ध तर कधी स्मृतीच्या आधाराने ती रुजवत नेलेली. यावर आपण दुसऱ्या एखाद धाग्यात नक्की चर्चा करू.

अस्पृश्यता हे जातीव्यवस्थेचे एक अंग आहे. ही व्यवस्था खूपच दृश स्वरूपात होती. आजही अनेक मागास राज्यात पाळली जाते. महाराष्ट्रातीलही उदाहरणे आहेत.

जातीभेद सर्वच जातीत आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. जसा तो ब्राह्मणांमधील चित्पावन-देशस्थ अशा उपजाती स्वरूपात आहे तसा तो दलितांमधील चांभार-महार अशाही स्वरूपात आहे. जसा तो मराठा-ब्राह्मण आहे तसा तो मराठा-दलित वा दलित-ब्राह्मण अशा स्वरूपात आहे.

अस्पृश्यता आणि जातीभेद निर्मुलन यासाठी प्रत्येक जातीतील काही सुधारकांचे चांगले कार्य आहे. ब्राह्मण समूहातील अशा सुधारक व्यक्तीचे नाव घ्यायचे असेल तर माझ्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिले नाव श्रीधरपंत टिळक यांचे असेल (टिककांचे सुपुत्र). अल्पायुषी असलेल्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राने अस्पृश्यता निर्मुलनासाठी प्राथमिक पाउल म्हणून सहभोजन कार्यक्रम राबविला. ते दीर्घायुषी ठरले असते तर जातीनिर्मुलानाचा महाराष्ट्राचा इतिहास अधिक चांगल्या वळणावर गेला असता.

श्रीगुरुजी's picture

19 Nov 2017 - 7:38 pm | श्रीगुरुजी

>>> आर्य अनार्य संघर्षातून जेत्या लोकांनी पराजित लोकांवर लादलेली . . .

आर्यांचे आक्रमण ही भाकडकथा आहे.

>>> जसा तो ब्राह्मणांमधील चित्पावन-देशस्थ अशा उपजाती स्वरूपात आहे

असा कोणताही जातीभेद अस्तित्वात नाही.

मला खात्री होती श्रीगुरुजी की आपण माझ्या या मुद्द्याला प्रतिसाद द्याल.

मला याविषयी आपल्यासोबत इतर दुसऱ्या धाग्यात चर्चा करायला नक्कीच आवडेल. पण चर्चा होऊनही "ऍग्री टू डीसऍग्री" अशीच परिस्थिती असणार आहे. कारण माझ्या अभ्यासातून माझे हे मत तयार झाले आहे. मी वापरलेली संदर्भ आणि तुम्ही वापरलेली संदर्भ किंवा त्याचे विवेचन वेगवेगळे असणार.

सिंथेटिक जिनियस's picture

20 Nov 2017 - 10:06 am | सिंथेटिक जिनियस

पुलं कुठल्यातरी शाळेत शिकायला होते,तिथे चित्पावनांची मोनोपॉली होती.पुलंचच वाक्य आहे,"चित्पावन नसलेला कुणीही ब्राह्मण असला तरी त्याला अस्पृश्यासारखं वागवायचे"
साक्षात पुलंसारखा समाजमानची उत्तम जाण असणारा असं लिहीतो त्यामागे काही अर्थ असेलच,पण श्रीगुरुजी पुलंपेक्षा हुशार दिसतात,त्यांच्या मते कर्हाडे सारस्वत देशस्थ चित्पावन असा भेदच नाही म्हणे.

श्रीगुरुजी's picture

20 Nov 2017 - 10:22 am | श्रीगुरुजी

आधी पु. लं. च्या विधानाचा संदर्भ द्या. नंतर उत्तर देईन.

मदनबाण's picture

19 Nov 2017 - 10:13 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मौला मौला मेरे मौला... :- Halal

कंजूस's picture

20 Nov 2017 - 5:51 am | कंजूस

,तेलगु लोकांचे ब्राम्हण दोन्ही कार्ये करतात, उत्तरेकडे महापात्र हे किरवंत असतात. गावाबाहेर राहतात. बरेच सधन असतात कारण क्रियाकर्मांत बरेच पैसे उकळतात. तिकडे जातपात फार आहे. ब्राम्हणांच्या मर्तिकेचे इतर जातींपेक्षा खूप पैसे खर्च करावे लागतात. म्हणून प्रेमचंदने लिहिलं आहे 'ब्राम्हण को मरना भारी और दूसरों को जीना भारी।'

रमेश आठवले's picture

20 Nov 2017 - 9:40 pm | रमेश आठवले

माझे लहानपण बडोद्यात गेले. तेथील मराठी समाजासाठी स्मशानात क्रिया कर्म करणारे खास ब्राह्मण असायचे. तेथील मराठीत त्यांना कारटा असे सम्बोधीले जायचे.हा शब्द क्रियावन्त किंवा किरवन्त या शब्दाचा अपभ्रन्श असावा असे आज समजले. श्राद्धाच्या जेवणाला जाणाऱ्या ब्राह्मणांचा सुद्धा एक खास वर्ग होता. सर्व साधारण पौरोहित्य करणारे ब्राह्मण अशा जेवणा साठी जात नसत.

चौथा कोनाडा's picture

21 Nov 2017 - 5:12 pm | चौथा कोनाडा

http://www.tarangan.net/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0...

आव्हानात्मक विषयावर सिनेमा बनवून मराठीचा झेन्डा फडकवल्याबद्दल खरंच दाद द्यायला पहिजे !

गामा पैलवान's picture

22 Nov 2017 - 2:29 am | गामा पैलवान

चौथा कोनाडा,

तुम्ही दिलेल्या लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद. लेख वाचला. चित्रपट आशयघन आहे म्हणून लेखात दावा केला आहे. तर चित्रपटाचा आशय काय, तर ब्राह्मणाने अडवणूक केली. म्हणूनंच उत्तरक्रिया म्हणजे फसवाफसवी आहे. हाच अर्थ दिग्दर्शकाला अपेक्षित असेल तर चित्रपटास आशयघन कशाच्या आधारावर म्हणायचं?

आ.न.,
-गा.पै.

चौथा कोनाडा's picture

22 Nov 2017 - 5:31 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, गा.पै.

आशयघन आहे म्हणून लेखात दावा केला आहे:
बरोबर, हा निर्मात्यांचा दावा आहे, तो मानायचा किंवा नाही हे आपल्या चित्रपट पाहण्यावर व वैयक्तिक आकलनावर आहे.

चित्रपट ठाकठीकच आहे असं चित्रपट पाहिलेल्यां काहींचं मत आहे. पण, चित्रपट नक्कीच वेगळ्या विषयावरचा आहे. त्या बद्दल त्याला योग्य ती पारितोषिकं मिळालेली आहेत.
चित्रपट काढताना हा आर्थिक बाबींचे आव्हान पेलून अशी वेगळी कलाकृती प्रेक्षकांना सामोरं जाणं या मोठ्या धाडसाला दाद द्यायला हवी !
अश्या कलाकृतींमुळं मराठी चित्रपट नावाजला जातोय हे माझ्या सारख्या मराठी मनाला खुप सुखवणारं आहे.
वाद-प्रतिवाद करताना मला हे अधोरेखित करायंच होतं !

चित्रपट काढताना हा आर्थिक बाबींचे आव्हान पेलून अशी वेगळी कलाकृती प्रेक्षकांना सामोरं जाणं या मोठ्या धाडसाला दाद द्यायला हवी !
अश्या कलाकृतींमुळं मराठी चित्रपट नावाजला जातोय हे माझ्या सारख्या मराठी मनाला खुप सुखवणारं आहे.

+१११

गामा पैलवान's picture

22 Nov 2017 - 8:32 pm | गामा पैलवान

चौथा कोनाडा,

मराठी चित्रपटास नावाजलेलं पाहायला मलाही आवडेल. मात्र त्यात्त विशिष्ट वर्गास म्हणजे ब्राह्मणांस लक्ष्य केलेलं असू नये. अशी माझी अपेक्षा आहे. अन्यायाचं चित्रण करा हवं तेव्हढं, पण तो अन्याय ब्राह्मणांमुळे झाला असं रंगवलेलं बरोबर दिसंत नाही.

आ.न.,
-गा.पै.

नाखु's picture

27 Nov 2017 - 8:56 am | नाखु

गा पै म्हणूनच कोपर्डी व नितीन आगे घटना सारख्याच गंभीर व नृशंस असूनही
आगे साठी " नाही मोर्चा नाही (मिपावर) चर्चा"

सतत काडीकाम कार्यरत राहुन ब्राह्मण द्वेष सांडणार्या जीवांची मनस्वी चीड असलेला नाखु

चौथा कोनाडा's picture

27 Nov 2017 - 6:02 pm | चौथा कोनाडा

चित्रपट 'दशक्रिया’ या पंचवीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या कादंबरी वर आधारीत आहे, ज्याचा फोकस दहाव्याच्या विधीपेक्षा, या विधीवर एखाद्या गरिबाचं आयुष्य कसं अवलंबून असतं, याची शोकांतिका आहे (माझ्या महिती नुसार, कादंबरी मी वाचलेली नाही) आणि अर्थातच पार्श्वभुमीला ब्राह्मण समाज आहेच.
(सिनेमातली एखाद्या पात्राच्या सुष्ट्/दुष्ट पणावर त्याची जात/समाज/धर्म काढुन (अन विशेषतः जुन्या काळातील घटना) एखाद्या घटकास लक्ष्य करण हा आजकाल उद्योगच झाला आहे)
या सिनेमांच निमित्त करुन विशिष्ट वर्गास लक्ष्य करुन बदनाम करणे / राजकारण करणे हे निषेधार्च आहे.

मला उचित वाटलेलं दशक्रिया या सिनेमाचं मटा मधील परिक्षण. लिंक खाली दिलीयः
https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/movie-reviews/dash...

गामा पैलवान's picture

27 Nov 2017 - 7:14 pm | गामा पैलवान

चौको,

तुमच्या वरील संदेशाशी सहमत आहे. मात्र मला आवडलेलं परीक्षण इथे आहे : https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/cityspace/dashkriya-it-wou...

निळू दामले डाव्या विचारांचे असले तरी विषयाला थेट भिडणारे असल्याने माझे आवडते लेखक आहेत.

आ.न.,
-गा.पै.

चौथा कोनाडा's picture

28 Nov 2017 - 5:09 pm | चौथा कोनाडा

गा.पै.
भन्नाट लिंक दिली आहे तुम्ही !
सिनेमाचं परखड परिक्षण, खरंतर चीरफाड केलीय निळू दामलेंनी ! वाचलाच पाहिजे असा लेख आहे हा !

जाती प्रश्नावरुन मी ही सैराटचा उल्लेख करणारच होतो, सुरवातीचे थोडे दिवस त्यावर चिखलफेक करायचे प्रयत्न झाले होते.
हे निळू दामलेंनी लेखाच्या शेवटी भारी मांडलंय !

चित्रपटावर जातीच्या मुद्द्यावर वाद चाललाय. सैराट एक चांगला चित्रपट आहे. त्यावरही विनाकारण जातीच्या मुद्द्यावर चर्चा झाली.वाद घालणारी माणसं जाणकार दिसत नाहीत, टाईमपास दिसतात. माध्यमं आणि राजकीय पुढारीही नको त्या गोष्टीसाठी या वादात पडतात. दिद्गर्शकानं त्याच्या परीनं चित्रपट हाताळला आहे. दिग्दर्शकाला काही म्हणायचं आहे. ते भले त्याला जमलं नसेल पण ते म्हणण्याचा त्याचा अधिकार शाबूत ठेवायला हवा. झुंडशाही होता कामा नये.

लेखामधला खालील परिच्छेद खुपच आवडला :

जगात कोणतीही गोष्ट एका सरळ रेषेत नसते, अनेक दिशा, अनेक रेषा, अनेक पदर असतात. ते पदर, त्या रेषा यांतून एक जैविक कथन गुंफावं लागतं. ते फार कष्टाचं असतं. अनंत गुंते एकादा कवी एकाच शब्दात किंवा एकाच ओळीत आणतो तेव्हां कवीला कित्येक महिने-वर्षं त्यावर खर्च करावी लागत असतात. अरूण कोलटकर यांच्या असंख्य कविता एकादा शब्द पक्का न झाल्यानं अप्रकाशित राहिल्या. सिनेमात तर शेकडो दृश्यं, शेकडो सेकंदांची दृश्यं, शेकडो सेकंदांचे संवाद आणि ध्वनी गुंफायचे असतात. दहा सेकंदांचं दृश्य पुढे मागं झालं, अनावश्यक ठरलं, कळलं नाही तरी घोटाळा होतो. दशक्रिया चित्रपट अधिक घट्ट विणला जायला हवा होता. पात्रं आणि घटना ढिगासारखी एकत्र केल्यागत वाटतात.

वाह, क्या बात हैं |

धन्यू, गा.पै. वन्स अगेन, या महत्वाच्या लिंकसाठी !

पुंबा's picture

28 Nov 2017 - 6:16 pm | पुंबा

गापै,

निळू दामले डाव्या विचारांचे असले तरी

दामले कुठले डाव्या विचारसरणीचे? लवासाचे समर्थन करणारा एकमेव माणूस माहितीये हा.
शिवाय शरद जोशींवर पुस्तक लिहीलेय म्हणजे तर डावा नसावाच.

चौथा कोनाडा's picture

28 Nov 2017 - 11:20 pm | चौथा कोनाडा

गा.पै ना समाजवादी विचारसरणीचे म्हणावयाचे असेल.
निळू दामलेंचा उल्लेख समाजवादी विचारसरणीत जडणघडण झालेले पत्रकार असा केला जातो.

गामा पैलवान's picture

28 Nov 2017 - 11:46 pm | गामा पैलवान

पुंबा,

इथे त्यांना समाजवादी चळवळीतले (socialist movement) म्हणून म्हंटलं आहे.

आ.न.,
-गा.पै.