ताज्या घडामोडी - भाग १६

गॅरी ट्रुमन's picture
गॅरी ट्रुमन in काथ्याकूट
13 Nov 2017 - 8:21 pm
गाभा: 

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे हा नवीन धागा.

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

25 Nov 2017 - 12:22 pm | गॅरी ट्रुमन

चांगला निर्णय आहे. फक्त निवृत्ती जवळ आलेल्या कर्मचार्‍यांचे पी.एफ मधील पैसे बाजारात गुंतवले नाही म्हणजे झाले. जर वयाच्या २२-२३ व्या वर्षापासून शिस्तबध्द पणे शेअरबाजारात पैसे गुंतवत गेले तर निवृत्तीच्या वेळी मोठे घबाड हाती मिळू शकेल. शॉर्ट टर्ममध्ये शेअरबाजार खाली येऊ शकतो पण २०+ वर्षांचा विचार करता शेअरमार्केटसारखे लॉन्ग टर्म संपत्ती तयार करायचे प्रभावी माध्यम दुसरे नाही.

माझ्या आठवणीप्रमाणे २००८ मध्ये चिदंबरम अर्थमंत्री असतानाही हा निर्णय घेतला गेला होता पण मनमोहन सरकारला पाठिंबा देणार्‍या डाव्यांच्या दबावामुळे या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती आणि तो निर्णय रद्द करण्यात आला होता. २००८-०९ मध्ये मार्केट कोसळल्यावर 'बघा म्हणूनच आम्ही सांगत होतो' असा आव प्रकाश करातनी आणलाही होता. फक्त मार्केट पडलेले असताना तेवढ्याच गुंतवणुकीत जास्त युनिट्स घेता आले असते आणि त्या युनिट्सचे आता किती रक्कम झाली असती वगैरे प्रश्न करातसारख्यांना पडत नसतात.

अभिजीत अवलिया's picture

25 Nov 2017 - 1:24 pm | अभिजीत अवलिया

सहमत.

सुबोध खरे's picture

25 Nov 2017 - 9:17 pm | सुबोध खरे

वाममार्गी लोकांच्या मूळ विचारसरणी मध्येच गोची असते.

स्टॅन्डर्ड अ‍ॅन्ड पुअर्सने भारताचे रेटिंग अपग्रेड न करायचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी जानेवारी २००४ मध्ये मुडीजने, ऑगस्ट २००६ मध्ये फिचने तर जानेवारी २००७ मध्ये भारताचे रेटिंग अपग्रेड केले होते. यावरून असे वाटते की एस अ‍ॅन्ड पी रेटिंग अपग्रेड करण्यासाठी तीन संस्थांपैकी सर्वात कडक निकष लावते. इंडिआ अनबाऊंडचे लेखक गुरचरण दास यांंनी त्यावेळी “This is long overdue. S&P have been overly cautious.” असे म्हटल्याचे त्याच बातमीत म्हटले आहे. पुढील २-३ वर्षात इतर दोन संस्थाही भारताचे रेटिंग अपग्रेड करतील अशी आशा करू.

गामा पैलवान's picture

27 Nov 2017 - 1:29 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

हे पतमानांकन वाढल्याने कोणाचा फायदा होत असतो?

आ.न.,
-गा.पै.

गॅरी ट्रुमन's picture

27 Nov 2017 - 1:51 pm | गॅरी ट्रुमन

भारताचे मानांकन वाढविले तर त्याचा फायदा भारतीय कंपन्यांना होतो. आंतरराष्ट्रीय रेटिंग संस्था भारतीय कंपन्यांना भारत देशाच्या रेटिंगपेक्षा जास्त चांगले रेटिंग बहुतांश वेळा देत नाहीत. रिलायन्ससारख्या कंपन्यांना फार तर देशाच्या रेटिंगपेक्षा एक (किंवा क्वचित प्रसंगी दोन) नॉच इतकेच जास्त चांगले रेटिंग या कंपन्या देतात. मध्यंतरी मुडीजने भारताचे रेटिंग वाढविल्यानंतर त्याबरोबरच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एच.डी.एफ.सी बँकेचे रेटिंगही भारताच्या रेटिंगइतकेच म्हणजे Baa2 (एस अ‍ॅन्ड पी च्या BBB ला समकक्ष) इतके वाढविले. या बँकांना भारतीय रेटिंग एजन्सी (क्रिसिल वगैरे) AAA रेटिंग देतात. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की भारतात AAA कंपनी असली तरी आंतरराष्ट्रीय रेटिंग कंपन्या त्या कंपनीला भारताच्या रेटिंगइतकेच जास्तीत जास्त रेटिंग बहुतांश वेळा देतात.

भारताचे रेटिंग वाढविल्यामुळे भारतीय कंपन्यांना आंतरराष्ट्रीय बाजारातून पैसे उभे कमी व्याजात करता येतात. हा त्यांना फायदा होतो.

तसेच अमेरिकेतील आणि युरोपातील अनेक वित्तीय संस्था अमुक एक इतके कमितकमी रेटिंग नसेल तर त्या देशात पैसे गुंतवत नाहीत. या रेटिंग अपग्रेडचा फायदा अशा काही संस्थांना मिळून त्यांना भारतात पैसे गुंतवायचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

priyankash's picture

18 Mar 2018 - 1:55 am | priyankash

IGNOU University is every year, also if you have seen in past year more and more students coming to IGNOU University from the Maharahtra State, Hence you can get all latest IGNOU University Updates at IGNOU Exam Website.

श्रीगुरुजी's picture

27 Nov 2017 - 2:01 pm | श्रीगुरुजी

नारायण राणेच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेतील जागेसाठी ७ डिसेंबरला निवडणूक होत आहे. या जागेसाठी भाजपतर्फे प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेसकडून सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी दिली जाणार आहे.  

फडणविसांनी धूर्तपणे शिवसेनेची ढाल पुढे करून राणेचा पोपट केला. आधी त्याला भाजपत येऊन दिले नाही आणि आता आमदारकी नाही म्हणजे मंत्रीपदसुद्धा नाही. इतर कोणत्याही पक्शात थारा नाही. 'तेल गेले तूप गेले हाती राहिले धुपाटणे' अशा राणेची अवस्था झाली आहे.

अभिजीत अवलिया's picture

27 Nov 2017 - 4:10 pm | अभिजीत अवलिया

फडणविसांनी धूर्तपणे शिवसेनेची ढाल पुढे करून राणेचा पोपट केला. आधी त्याला भाजपत येऊन दिले नाही आणि आता आमदारकी नाही म्हणजे मंत्रीपदसुद्धा नाही.

सद्य स्थितीत असे वाटत असले तरी भविष्यात काय होते ते पाहून अनुमान काढणे इष्ट राहील. ७ डिसेम्बरला केवळ एका जागेसाठी मतदान असल्याने विजयासाठी आवश्यक असलेली १४५ मते मिळणे ही राणेंसाठी किंबहुना भाजपासाठी थोडी कसरत होती. कारण राणेंना भाजपने उमेदवारी दिल्यास शिवसेना+काँग्रेस+राष्ट्रवादी एकत्र येऊन लढले असते. विधानपरिषदेची पुढील निवडणूक जून जुलै मध्ये आहे. त्यावेळी ११ जागांसाठी मतदान होईल. त्यामुळे जानेवारी फेब्रुवारी मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन राणेंना मंत्रिपद दिले जाऊ शकते. म्हणजे ६ महिन्याच्या आत ते विधान परिषदेचे आमदार होऊ शकतील. ह्या सगळ्या जर-तरच्या गोष्टी झाल्या. सेनेचा राणेंना मंत्री बनवण्यास असलेला तीव्र विरोध लक्षात घेता राणेंची पुढची वाट खूप कठीण आहे हे नक्की. जर सेनेने 'राणे मंत्री झाल्यास आपण सरकारमधून बाहेर' अशी निर्णायक धमकी दिल्यास एकट्या राणेंसाठी भाजप आपले सरकार पणाला लावेल असे वाटत नाही.

विशुमित's picture

28 Nov 2017 - 10:48 am | विशुमित

फडणवीस कसे धूर्त चतुर आणि हुशार (विध्यार्थी) आहेत फक्त एवढेच लोकांच्या निदर्शनात आणून द्याचे होते.
बाकी राणे शिवसेना सोडल्यापासूनच ना घर ना घाट का झाले आहेत. २०१४ पूर्वीचा इतिहासच इतिहासजमा झाल्यामुळे सर्व काही नव्याने घडत आहे अश्या मृगजळातून काही लोक बाहेर यायला तयारच नाही.

babu b's picture

27 Nov 2017 - 4:28 pm | babu b

जस्टिस लोया प्रकरण काय आहे ?

भारतीय वायुदल २६/११ चा बदला घेण्यासाठी सज्ज होते आणि इतर दोन्ही सैन्यदलांशी बोलून तत्कालीन पंप्र. मनमोहन सिंग आणि संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांच्या समोर माजी एअर चीफ मार्शल फली होमी यांनी सर्जिकल स्ट्राईक करायचा प्रस्ताव ठेवला होता. युपीए सरकारने त्याला मंजुरी दिली असती तर १५-१८ तासांमध्ये अतिरेक्यांचे ट्रेनिंग कॅंप्स उध्वस्त करता आले असते. पण परवानगी मिळाली नाही.

http://www.timesnownews.com/india/video/2008-mumbai-terror-attack-iaf-in...

विशुमित's picture

28 Nov 2017 - 12:05 pm | विशुमित

"""विरोधी पक्षात असताना टोल नाके बंद करण्यासंदर्भात घेतलेली भूमिका चुकीची होती. परंतु उभ्या आयुष्यात सत्तेत येणार नाही याची खात्री असल्याने आम्ही विरोधात असताना अशी भूमिका घेत होतो. देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना गोपीनाथ मुंडे आणि फडणवीस यांनी टोल नाके बंद करण्याची भूमिका घेतली. यामुळे राज्याची तिजोरी रिकामी होईल, असे सांगत होतो. त्यावर फडणवीस यांनी आपले सरकार थोडेच येणार आहे, असे उत्तर दिले होते. आता टोल नाके बंद झाल्याने राज्यावर प्रचंड ताण पडत आहे, असे गडकरी म्हणाले."""

==>> सत्तेसाठी काहीही. जुम्ल्यावर जुमले. लोकशाहीसाठी हे खूप घातक असावे. त्यामुळेच २०१४ नंतर लोकांच्या विचारांमध्ये २ प्रबळ गट पडले आहेत असे वाटते. समर्थक भक्त आणि विरोधक देशद्रोही आणि तटस्थला दोन्ही कडून जोडे...!

मराठी_माणूस's picture

28 Nov 2017 - 12:42 pm | मराठी_माणूस

सामान्य माणसाला मात्र भाबडेपणे वाटत रहते की आपली बाजु कोणी तरी मांडत आहे

विशुमित's picture

28 Nov 2017 - 12:13 pm | विशुमित

आणखी एक सनसनाटी बातमी, ती सुद्धा सत्ताधारी राज्यमंत्रांची. भक्तांची गोची होतेय खूप...

https://www.loksatta.com/pune-news/ncp-leader-chhagan-bhujbal-will-get-b...

मार्मिक गोडसे's picture

28 Nov 2017 - 3:08 pm | मार्मिक गोडसे

लवकरच केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी पक्ष ' कोणत्याही प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाहीत', "घरचेही"(घरचेच जास्त येत असावेत), असं आवाहन करेल असं वाटतंय.

babu b's picture

6 Dec 2017 - 12:56 pm | babu b

नवीन इन्कम ट्याक्स् कायद येतोय् म्हणे.

१० लाखापर्य्ंत स्लॅबमध्ये फारसा फरक नाही.

नियम कडक होत आहेत

सुबोध खरे's picture

6 Dec 2017 - 7:52 pm | सुबोध खरे

कोण म्हणे?

babu b's picture

6 Dec 2017 - 11:26 pm | babu b

नवीन नियम , अंमलबजावणी काटेकोर , ऑनलाइन व्यवहार , आधार - पॅनचे व्य्ववहार ट्रेसेबल ठेवणे ... या सगळ्यातून मोदी सरकार चांगला रेव्हेन्यू जनरेट करु शकेल ... मोदीजींचे अभिनंदन
.

पीडीएफ फाइल असल्याने इथे डिटेल्स देता येत नाही आहेत.

सुबोध खरे's picture

7 Dec 2017 - 10:44 am | सुबोध खरे

मोदीजींचे अभिनंदन
काय सांगताय काय?
६ डिसेंबर या दिवसात काहीतरी जोरदार असावं. ( मी इतिहासाबद्दल बोलत नाही)
म्हणजे आज मोगा खान मोदीजींचे अभिनंदन करत आहेत.
हा दिवस मिपाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा आहे.

आज सुर्य पश्चिमेकडेच उगवलेला असावा !!

" नीच आदमी " ह्या वरुन काँग्रेस समर्थकांची काँग्रेस सारखीच केविलवाणी परिस्थीती झालेली आहे.

मोदीं म्हणे जर्सी गाय, हायब्रीड वासरू, पचास करोड की गर्लफ्रेंड, एके ४७, इ.इ. मुक्ताफळांचे उद्गाते. पण ह्या काँग्रेसवाल्यांनी मोदींना काय काय दुषणे दिलीत ?

मौत का सौदागर !
खुन के दलाल !
बुचर ऑफ गुजरात !!

गॅरी ट्रुमन's picture

8 Dec 2017 - 2:57 pm | गॅरी ट्रुमन

आणि गंदी नालीका किडा, पिसाळलेल्या कुत्र्याने चावलेला, बेडूक, माकड इत्यादी सुध्दा.

priyankash's picture

18 Mar 2018 - 1:51 am | priyankash

I Have searched various Sites and various links, but still i'm not able to download exam admit card, i don't know why. where i'm not getting the main link of official Admit Card.

But i have visited the official Examzip Page and what i have found the main link of download official online Maharashtra Police Constable Admit Card 2018 you can also easily download your exam admit card from there.

Official Website Link: Examzip