पदार्थधर्मसंग्रह: ग्रंथारंभ व उद्देश (Padarthdharmsangraha: Salutation and reasons for studying physics)

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
10 Nov 2017 - 2:50 pm

(टीप: मागे एका लेखात २ऱ्या शतकातल्या ज्या प्रशस्तपादभाष्य/पदार्थधर्मसंग्रह पुस्तकाचं वर्णन केलं होतं त्याच्या पहिल्या धड्यातील संस्कृत श्लोक, १९१७ सालचं आता कुठंही न मिळणारं इंग्रजी भाषांतर व त्यावर आधारलेला मराठी भावानुवाद देताना अतिशय छान वाटतंय..नंतरच्या तिरक्या अक्षरातील मराठीतील टिपा या अर्थ सोपा करण्याच्या हेतूने देण्यात आल्या आहेत.कोण्या अधिकारी/शास्त्रज्ञ माणसाने विषयाला अधिक न्याय जरूरच दिला असता अशी जाणीव मनात ठेवून पहिल्या धड्याचं भाषांतर खाली देत आहे..)

ग्रंथारंभ

पदार्थधर्मसंग्रह ग्रंथाची सुरुवात प्रशस्तपादऋषी खालील प्रमाणे करतात:

प्रणम्य हेतुमीश्वरं मुनिं कणादमन्वत:‌|
पदार्थधर्म्मसङग्रह: प्रवक्ष्यते महोदय: ||1||

Having bowed to Ishwara, the cause, and then to the sage Kanada. I am going to describe the nature of things (or compose the work called Padarthdharmasangraha) leading to the best of results.

हेतुरूप ईश्वराला प्रणाम करून मी कणाद मुनिंना प्रणाम करतो. त्यानंतर मी मोक्षाला सहाय्यक होऊ शकेल असा पदार्थधर्म्मसङग्रह नावाचा ग्रंथ लिहितो.

वैशेषिक विचारांची झलकच प्रशस्तपाद ऋषी या पहिल्या श्लोकातून देतात. एकतर ईश्वराला परमात्मा, किंवा देवांच्या अवताराचे नाव न देता ते पदार्थधर्मामागे असणाऱ्या हेतूचे स्थान देतात. वैशेषिक पदार्थविज्ञान हे ज्ञानरूपी ईश्वरप्राप्तीचे व त्यामार्गे मोक्षप्रप्तीचे साधनच असल्याचे ते या पहिल्या श्लोकातूनच दाखवून देतात.

उद्देश: पदार्थविज्ञानाचा अभ्यास का करायचा?

द्रव्यगुणकर्म्मसामान्यविशेषसमवायानां षण्णां पदार्थानां साधर्म्यवैधर्म्यतत्वज्ञानं नि:श्रेयसहेतु:|
A knowledge of the true nature of the six categories – substance, quality, action, generality, individuality and inherence – through their similarities and dissimilarities, - is the means of accompanying the highest bliss.

सर्वोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी कोणत्याही पदार्थाच्या द्रव्य(substance), गुण(qualities), कर्म(motion), सामान्य(classification), विशेष(individuality) आणि समवाय(inseparable components) या सहा अंगांचे व त्या दृष्टीने इतर पदार्थांशी असलेल्या साधर्म्य वैधर्म्याचे ज्ञान आवश्यक आहे.
पदार्थधर्माची ही ६ अंगे आहेत. यातील पहिली तीन अंगे ही इंद्रीय गोचर जाणीवेतून लक्षात येणारी तर राहिलेली तीन ही तार्किक विश्लेषणांती कळणारी आहेत.

तच्चेश्वरचोदनाभिव्यक्ताध्दर्म्मादेव ||2||

This knowledge proceeds from dharma manifested by the injunctions of the Lord.
ईश्वराचे विविध आदेशच वर दिलेल्या पदार्थधर्मातून अभिव्यक्त होतात. पदार्थाच्या या ६ अंगांच्या अभ्यासातूनच पदार्थधर्माचे व परिणामी ईश्वराच्या हेतूंचे आकलन होते.

या विधानामागे मोठा अर्थ दडलेला असून तो कळण्यासाठी पूर्ण ग्रंथाचा अभ्यास आवश्यक आहे. निव्वळ दैववाद हा संकुचित अर्थ इथे अपेक्षित नाही. पाश्चात्यांकडून आलेल्या भौतिकशास्त्रात कार्यकारणभाव, जडवाद, व पर्यायाने निश्चिततावाद अधिक होता. आईनस्टाईनच्या सापेक्षतावादानंतर तसेच पुंजयामिकीनंतर तो अनिश्चिततेकडे झुकला. पण प्रशस्तपादाने पदार्थाच्या या अभ्यासामागे परमेश्वरी हेतुंचा अभ्यास करणे असा उद्देश असल्याचे सांगून पुन्हा एकदा ज्ञानमार्गाने मोक्षप्राप्तीचा हेतू ठसवून दिला आहे. हे एकंदर वैशेषिक दृष्टिकोनाचेच वैशिष्ट्य ठरावे.

प्रशस्तपादांविषयीचा लेख: प्रशस्तपाद ऋषी – भारताचे विज्ञानेश्वर आणि त्यांचा पदार्थधर्मसंग्रह – भारताची पदार्थविज्ञानेश्वरी

मूळ लेख: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात

प्रतिक्रिया

उत्तम लेख. अजून विस्ताराने लिहावे ही विनंती.

अनिकेत कवठेकर's picture

11 Nov 2017 - 4:44 pm | अनिकेत कवठेकर

प्रशस्तपाद ऋषींनी लिहिलेला ग्रंथ आधी प्रस्थापित करणे महत्वाचे आहे. म्हणून आधी भाषांतर देत आहे. शिवाय असे केल्याने पदार्थ विज्ञान विचारला एक अधिष्ठान प्राप्त होते. त्यातील अस्सल भारतीय दृष्टिकोन प्रस्थापित होतो. मग सोपेपणा आणण्याचा प्रयत्न करता येईल. शिवाय आधुनिक विज्ञानाशी संबंध प्रस्थापित करता येईल.

ओरायन's picture

14 Nov 2017 - 3:18 pm | ओरायन

अजुन माहिती यासंदर्भात मिळावी, ही विनंती. हा लेख चांगला आहे.

अनिकेत कवठेकर's picture

15 Nov 2017 - 9:55 am | अनिकेत कवठेकर

प्रशस्तपाद भाष्य पुस्तकाचा दुसरा धडा लवकरच टाकेन. त्यातून हळू हळू उलगडा होईल .