इंडीयन डिमन डे -३०१६ कहाणी एका सणाची !

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
8 Nov 2017 - 4:28 pm

१००० वर्षांनंतर भारतात साजरा होणार्‍या एका सणाचे हे वर्णन आहे." मुलांच्या पुस्तकातला हा धडा अर्थातच इंग्रजीत आहे.

मुलांनो, आपण दरवर्षी इंडियन डीमन डे साजरा करतो. खरे म्हणजे हा डीमन डे म्हणजे दैत्याचा दिवस असा गैरसमज तुमच्या मनात झाला असेल तर तो काढून टाका.
या सणाचे मूळ नाव ’इंडियन डीमॉनीटायझेशन डे’ असे आहे.हा सण दरवर्षी ८ नोव्हेंबरपासून तीन दिवस साजरा केला जातो.

पहिल्या दिवशी म्हणजे ८ नोव्हेंबरला नवर्‍याने उशीरा घरी यायचे असते.
बायकोने दार न उघडता नवर्‍याला (भटो ,भटो कुठे गेला होता या चालीवर ) विचारायचे असते "नमो, नमो कुठे गेला होतात"?
नवर्‍याने यावर काही उत्तर न देता गप्प उभे रहायचे असते.
त्यावर दार उघडताना बायकोने "असला कसला रोज नवा जुमला? "असे म्हणून त्याला घरात घ्यायचे असते.
नवरा येताना एक पांढर्‍या दाढीवाल्याचा फोटो घेऊन आला असतो, तो डायनिंग टेबलवर ठेवून घरातल्या सगळ्यांनी त्यासमोर उभे रहायचे असते.
घरच्या लक्ष्मीने म्हणजे बायकोने फोटोसमोर बँक पासबुक ठेवून "अच्छे दिन आयेंगे कब? " असे विचारायचे असते.
बाकीच्यांनी मोठ्यानी हसून "Rejoice, For worst is yet to come" असे म्हणायचे असते.
त्यानंतर रात्रभर चिंताक्रांत राहून नवर्‍याने उपाशी झोपायचे असते.
दुसर्‍या दिवशी सकाळी बायकोने घरातल्या नोटा नवर्‍यासमोर समोर ठेवून त्या बँकेत जमा करायला सांगायच्या असतात.
मुलांनो सण म्हणजे बँकेत गर्दी असणारच नाही का ?
या दिवशी बँका नव्या नोटा छापतात आणि ग्राहकांना देतात. नोटा देण्यापूर्वी ग्राहकांनी "BIG BROTHER IS WATCHING YOU…" हा फॉर्म भरून घरी जायचे असते. लहान मुले या दिवशी रिकाम्या डब्यात खोटी नाणी भरून त्याचा खुळखुळा बनवून वाजवतात आणि जोरजोरात "छन छन लक्ष्मी नमोस्तुते "असे म्हणतात. या दिवशी सरकारने विशेष सरकारी सुट्टी दिलेली असते.
तिसर्‍या दिवशी सकाळी पुढार्‍यांनी राजकारणाला, उद्योगपतींनी उद्योगाला. बिल्डरानी नव्या प्रोजेक्टला सुरुवात करून नव्या खोट्या हिशोबाच्या चोपड्यांचा शुभारंभ करायचा असतो आणि इतरांनी आपापल्या कामाला जायचे असते.

इतिहासविचार

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

8 Nov 2017 - 4:53 pm | कपिलमुनी

भारीये !
इतर सणांच्या प्रतीक्षेत !

चौथा कोनाडा's picture

8 Nov 2017 - 5:21 pm | चौथा कोनाडा

हा... हा... :-))

एक नंबर !

ह्या नविन सणासाठी रामदासजींना मानाचा मुजरा !

असंका's picture

8 Nov 2017 - 5:56 pm | असंका

अगायाया....!!!!!

अनन्त अवधुत's picture

8 Nov 2017 - 8:13 pm | अनन्त अवधुत

भारी आयडिया आहे.
तसं पण वर्षश्राद्ध/ काळा पैसा विरोधी दिन असे दोन दिन झालेच या दिवसाचे.

तर्राट जोकर's picture

8 Nov 2017 - 8:46 pm | तर्राट जोकर

आता तुम्ही काळ्या यादीत.

पगला गजोधर's picture

8 Nov 2017 - 8:56 pm | पगला गजोधर

;)

तुम्ही एकदम देशद्रोही आहात..

पीसीजेसी पूर्ण करा कृपया. हे असलं काय लिहीत बसला आहात?

mayu4u's picture

9 Nov 2017 - 12:56 pm | mayu4u

आणि इतर अपुऱ्या मालिकासुद्धा.

सुनील's picture

9 Nov 2017 - 8:12 am | सुनील

लय भारी!!

थीम म्हणून आवडलं, पण घाईघाईत लिहिलंय तुम्ही..

एमी's picture

9 Nov 2017 - 10:54 am | एमी

=))

टवाळ कार्टा's picture

9 Nov 2017 - 11:10 am | टवाळ कार्टा

आरारा....इथे राडा होईल का आता?

अरेरेरेरे !! आता फुरोगामी, सिक्युलर, लिबटर्ड अशा विशेषणांचा पाऊसच पडेल इकडं. "काय मग तुमचा काळा पैसा किती गेला?" आणि तत्सम कुजकट प्रश्न फेकले जातील. "कुठे काय ? मस्त चाललंय की सगळं" असे सकारात्मक विचार ऐकायचा लाभ होईल.

चालू द्या मग!

अनन्त्_यात्री's picture

9 Nov 2017 - 2:57 pm | अनन्त्_यात्री

...नोटा, बँक, हिशोबाच्या चोपड्या? भविष्यकथनात कालसुसंगत तपशील हवा होता. :)

दीपक११७७'s picture

9 Nov 2017 - 3:55 pm | दीपक११७७

१००० वर्षांनी इंडियन डीमॉनीटायझेशन डे साजरा होईल....सुजलाम सुफलाम....म्हणजे,
मग डीमॉनीटायझेशन मुळे सगळ बरबाद झालं, देश खड्ड्यात गेला असे म्हणना-यांच बोल खोटे ठरतीलं......, कारण फ्लॉप झालातर साजरा कसा होईल.....,अरे बापरे...,

पगला गजोधर's picture

9 Nov 2017 - 7:23 pm | पगला गजोधर

काळजी करू नका ...
एखादा मनमोहन/रघुराम येऊन .... सावरेल हो ....

रेफेर :
यदा यदा ही इकॉनॉमीस्य ग्लानिर्भवति भारत ! अभ्युत्थानमइकॉनॉमीस्य तदात्मानम सृज्याहम ।।

दीपक११७७'s picture

10 Nov 2017 - 12:19 pm | दीपक११७७

@ पग जी
आपल्या भावना मी समजु शकतो पण.... नोटबंदीचा सण साजरा होणे हे त्याचे फेलुअर दर्शवत नाही.....

असे वाटते

पगला गजोधर's picture

9 Nov 2017 - 7:23 pm | पगला गजोधर

काळजी करू नका ...
एखादा मनमोहन येऊन .... सावरेल हो ....

रेफेर :
यदा यदा ही इकॉनॉमीस्य ग्लानिर्भवति भारत ! अभ्युत्थानमइकॉनॉमीस्य तदात्मानम सृज्याहम ।।

पगला गजोधर's picture

9 Nov 2017 - 8:47 pm | पगला गजोधर

बार बार फेकों, हज़ार बार फेकों ।
के फेकनेंमें तेज है, विकासके पिता ।।
भक्तो....
मित्रो....
नमोनमो .....

कोळसा घोटाळा करून?

मराठी कथालेखक's picture

9 Nov 2017 - 7:40 pm | मराठी कथालेखक

तुलना १) मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना वि. ममो पंतप्रधान असताना
वि
तुलना २) रामदास - शिंपीणिचं घरटं लिहिणारे वि. रामदास - "इंडीयन डिमन डे..." लिहिणारे...
असो :)

गामा पैलवान's picture

9 Nov 2017 - 8:24 pm | गामा पैलवान

मी 'दोन तुलनांची तुलना' याच्याऐवजी 'फोनललनांची तुलना' असं वाचलं!

:-)))))))))))))

सुबोध खरे's picture

9 Nov 2017 - 7:43 pm | सुबोध खरे

रामदास साहेबांचा लेख म्हणून मोठ्या आशेने उघडला पण निराशा झाली.
मोदीभक्त म्हणून आरोप असण्याचा धोका स्वीकारून म्हणतो कि यावेळेस तो "खास रामदास टच" कुठेच जाणवला नाही
असो

प्रचेतस's picture

9 Nov 2017 - 8:38 pm | प्रचेतस

काकांकडून अगदीच फुळकावणी लिखाण झालं.

चांदणे संदीप's picture

10 Nov 2017 - 9:24 am | चांदणे संदीप

"Form is temporary, class is permanent!"
:)

Sandy

चौकटराजा's picture

10 Nov 2017 - 8:57 am | चौकटराजा

खरे तर नोटबंदी ही काही जगात पहिलीच नव्हे. दुसरे असे की आताच त्यात समर्थक ( निरर्थक) व विरोधक( हे ही निरर्थकच ) यात पुरेसे डोळस युद्ध चालू नाही. त्यामुळे हा दिवस लक्षांत ठेवणे फार तर २०१९ पर्यंत टिकेल. २०१९ ला राहुल गांधी प्रधानमंत्री होतील व सन्मानाने १००० व ५०० च्या नोटाना परत आणतील. सर्व इतिहास पुसला जाईल.

नाखु's picture

10 Nov 2017 - 9:24 am | नाखु

इतिहास हा पुसण्यासाठी (विचारण्यासाठी असतो, विचार करण्यासाठी नसतो.

वरील डॉ यांच्या प्रतिसादाशी सहमत

नाखु पांढरपेशा बिनसुपारीवाला

खंडेराव's picture

25 Mar 2019 - 4:50 pm | खंडेराव

इतर लेख वाचतांना हा सापडला..बाकी निश्चलीकरणाचे फायदे दाखवणारी जनता गायब झालीय, १९% जास्त चलन आले मार्केटला 2 वर्षात, आणि निवडणूक प्रचारात हा ठोकून सांगायचं मुद्दा नाही म्हणजे फेल गेले हे निश्चितच!