चोर कोण?

नेत्रेश's picture
नेत्रेश in जनातलं, मनातलं
28 Oct 2017 - 1:01 pm

अस्सा संताप आला होता! चोरी, आणी ती ही माझ्या अंगणात? बघतोच आता.

तर मंडळी, आज शुक्रवार, तेव्हा ऑफीसमधुन संध्याकाळी जरा लवकर परतलो. घरी कुणीच नव्हते. मागे पाहीले तर उन्हाने सर्व झाडे कोमेजलेली वाटली. अंगणात गेलो तेव्हा या आठवड्यात माळ्याने टांग दील्याचे दीसले, हा येवढा परसातल्या पानांचा कचरा. ते वाढलेले काम पाहुन जरासा मुड ऑफ झाला. हल्ली असे बर्‍याचदा करायला लागलाय , तरीच त्याला शेजार्‍याने काढले असणार. मनातच त्याला दोन शीव्या घातल्या. या आठवड्यानंतर त्याला काढुन शेजार्‍याकडे येणार्‍या माळयाला ठेवायचा विचार करायला हवा. तर सुकत आलेल्या झाडांना पाणी घालण्याचे काम चालु केले. मागच्या झाडांना मस्त टोमॅटो, मीरच्या, फुले वगैरे लागले होते.

मागे पाणी घालुन झाल्यावर पुढे आलो. पुढे सगळी फुलझाडे. पुढच्या अंगणातले एक सुरुचे (पाईन) झाड काढले होते, त्या ठीकाणी एक बुटके डाळींबाचे झाड लावले होते. या झाडाचीपण एक कहाणीच आहे. तीथे लावायच्या आधी जवळ जवळ दीड वर्ष ते कुंडीत लावले होते. खुप फुले यायची पण फळे काही लागत नव्हती. शेवटी या वर्षी जमीतीत लावायचे ठरवले. पण जागेवर काही एकमत होईना. पुढच्या अंगणात लावायला बायकोची हरकत. कारण काय, तर आजुबाजुच्या सगळ्यांच्या अंगणातही फक्त फुलांचीच झाडे आहेत. मग एक दिवस ती घरी नसताना मस्त मोठ्ठा खड्डा खणला आणी लाउन टाकले. पाईन वृक्ष गेल्यामुळे मोकळ्या असलेल्या जागेला जरा शोभा आली. नाहीतरी तीथले लॉन सुकत चालले होते. एकदा डाळींबाचे झाड लावल्यावर मात्र आम्ही दोघे ही त्याला रोज पाणी घालु लागलो व झाड अल्पावधीत फुलांनी बहरले. या वेळी मात्र नेहमीप्रमाणे फुले पडुन न जाता चक्क छोटी छोटी डाळींबे दीसु लागली. आम्ही सगळेच खुष झालो. या वेळी चांगले खत ही घातले. ते एवढेस दोन अडीच फुटाचे ढोपराएवढे बुटके झाड चक्क १५ वेगवेगळ्या आकाराच्या डाळींबांचे ओझे वागउ लागले. आता त्या झाडाला आधार द्यावा कसा यावर चर्चा चालु झाली. असेच ३ महीने गेले व डाळींबे चांगलीच मोठी झाली. बहुतेक फळांचा हीरवा रंग लाल झाला. आता चिरंजीवालाही त्यांचे आकर्शण वाटु लागले होते. आता महीन्याभरात फळे काढायला होतील.

तर काय सांगत होतो, पुढच्या अंगणातल्या झाडांना पाणी घालत डाळींबाच्या झाडापर्यंत आलो, आणी पडायचाच बाकी होतो. सर्व छोटी मोठी अर्धी कच्ची फळे गायब. अगदी अलगत झाडाला न दुखावता काढुन नेलेली. झाडावर एकही फळ नाही. डोकच गरगरायला लागले, असा संताप आला. जुणाचे कृत्य असावे? आमच्या गल्लीत १० घरे, त्यात कुणी लहान मुले नाहीत. बाकी ती कच्ची फळे नेउन कोण काय करणार होते? कुणी मुद्दाम त्रास देण्यासाठी केले असेल? असे असेल तर मात्र जरा जास्तच काळजीचे कारण होते. कारण आज कुणी अंगणात आले असेत तर उद्या घरापर्यंत येउ शकते. तेवढ्यात आठवले घराबाहेर सिक्युरीटी कॅमेरे लावलेले आहेत, एकातरी कॅमेरॅत चोर नक्कीच दीसेल. लगेच आत जाउन लॅपटॉप उघडला व रेकॉर्डींग तपासु लागलो. कॅमेर्‍यासमोर दीवाळीला लावलेले लायटींग (जे एकदम न्यु ईयर नंतर उतरते) नाचत होते. तरी मागे डाळींबांचे झाड दीसत होते, पण थोडे अस्पष्ट. झाडावर फळे आहेत की नाही ते समजत नव्हते. पण सकाळी ऑफीसला जाताना झाडाव फळे होती असे अंधुक आठवत होते. मग बसलो अर्धातास फास्टफॉर्वर्ड मोडमध्ये रेकॉर्डींग तपासत. संपुर्ण दीवसाचे रेकॉर्डींग तपासले, चोर काय कुत्रा सुद्धा झाडा जवळ आल नव्हता. आता आणखीच डोके फीरले. रात्री कुणी हे कृष्णकृत्य केले असावे का? रात्री माणसापेक्षा रॅकुन (raccoon) ने केले असण्याची शक्यता जास्त होती. आता सगळा राग त्या नतद्रष्ट रॅकुन्सच्या विध्वंसक गँगवर निघणार होता. परत दीसले की BB गनचा प्रसाद देण्याचे ठरउनच टाकले.

एवढ्यात बायको, व पाठोपाठ मुलगाही आला. दोघेही गायब झालेली डाळींबे पाहुन नीराश व थोडे दु:खी झाले. बायकोने आता टॉर्चच्या प्रकाशात ईन्व्हेस्टीगेशन चालु केले. तीला गवतात एक छोटे कुरडतडलेले कच्चे डाळींब सापडले. मग आठवले की रेकॉर्डींग तपासताना ४ ते ५ वेळा एक खार तीथे बागडताना दीसली होती. पण एवढीशी खार, नेहमीच अंगणात बागडत असते, तीने अजुन तरी कधी डाळींबाला त्रास दीला नाही, मग तीच्यावर कसा संशय घेणार? चला परत रेकॉर्डींग तपासायला.

यावेळी खारुताईच्या हालचालींवर जरा बारीक लक्ष ठेवले. बाईसाहेब बरोबर १२च्या सुमारास आल्या, अलगत झाडावर चढल्या, डाळींबांचा भार कशीबशी पेलणारी फांदी वाकुन जमीनीला टेकली. अलगत एक फळ फांदी वेगळे झाले. एवढे मोठे डाळींब घेउन खारुताई उजवीकडच्या कुंपणापलीकडे गेलया. पाचच मिनीटात पतल्या व दुसरे फळ घेउन विरुद्ध दीशेला नाहीशा झाल्या. अशा एका तासात १५ फेर्‍या मारुन १५ फळे गायब केलेली. मी बघतच बसलो. "ती वींटरसाठी आर्वेस्टींग करतेय. म्हणुन सगळीकडे आपले फुड हाईड करतेय!" इती चिरंजीव, घरात मराठी बोलायचे या नियमाचे पालन करत उद्गारले. "तरी मी सांगल होते पुढच्या अंगणात फळझाडे लाउ नको म्हणुन. आपले नेबर वेडेआहेत का फक्त फुलझाडे लावायला?" ईती सौ. (जणु मागच्या अंगणात जायचा रस्ता खारीला माहीतच नाही अशा थाटात). "म्हणजे गेले काही महीने ही बया उगीच नव्हती पुढच्या अंगणात नाचत, ती तीचे पीक तयार व्हायची वाट पहात होती आणी बाकी खारींना दुर ठेवत होती. आपल्याला वाटत होते की ही आपण झाड लावले म्हणजे त्यांना लागणारी फळेही आपलीच आहेत म्हणुन". असो, पण चोर कोण ते समजले आणी राग मात्र गेला. मिस्टरी सॉल्व्ह्ड!

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

28 Oct 2017 - 1:56 pm | सिरुसेरि

मस्त अनुभव . छोटा चोर एकदम भारी .

प्रमोद देर्देकर's picture

28 Oct 2017 - 2:39 pm | प्रमोद देर्देकर

लेखन आवडले मस्त अनुभव. मलाही फळ आणि फुलझाडे लावायची आहेत. बाकी त्या तिने लपवून ठेवलेल्या जागेत जावून पाहून या. तुमची फळं तिथं असतील. तीने काही एकदम खाल्ली नसतील सगळी. . नवं करायला २/३ घेवुन या.

नेत्रेश's picture

29 Oct 2017 - 3:23 am | नेत्रेश

धन्यवाद सिरुसेरि आणी प्रमोद देर्देकर.
फळे अजुन कच्ची होती, फण झाडावरुन काढताना खार देठाजवळ फळ कुरतडते, देठ कुरतडत नाही. त्यामुळे खारुताईने लपवलेली फळे सापडली तरी खाण्यालायक नसणार.