फास्टर फेणे च्या निमित्ताने

ओरायन's picture
ओरायन in जनातलं, मनातलं
25 Oct 2017 - 12:52 am

काही दिवसांपासून टीव्हीवर फाफे च्या प्रमोशनची जहिरात बघत आहे. हे बघतांना मन भुतकाळात जाते.
सहावी, सातवीत होतो. तेंव्हा टीव्ही असणारे कुटूंब फार कमी होते. त्यामुळे असेल कदाचित,पण आमचा फावला वेळ मैदानी खेळ व वाचनात जात असे. मला वाचनाची आवड होतीच. त्यात त्यावेळेचे प्रसिद्ध वाचनालय ( अजूनही आहे.) चितळे रस्त्यावरील 'अहमदनगर वाचनालय' येथील बालविभागात आमचा मुक्कामच असायचा. सभासदाला तिथे काही मासिकै,कथा,कादंबर्या चकट फु वाचण्याची मुभा असायची.
भा.रा. भागवतांचा बन्या ऊर्फ फास्टर फेणे आमचा हिरोच असायचा. त्याचे नविन कोणते पुस्तक आले आम्ही लागलीच झडप मारून वाचुन फस्त करत असु.
हे वाचत असतांना जो डोळ्यापुढे फाफे उभा राही त्याची तुलना आत्ताच्या टीव्हीवरील फाफेशी होऊच शकत नाही .खुपच मिसमँच होत आहे. मला ह्यातील कलाकारांना नावे ठेवायची नाहीत. पण काहीतरी विसंगत ऩक्कीच आहे. अर्थात ये सिर्फ़ ट्रेलर है, पुरा पिक्चर अभी बाकी हैं !
मला राहून राहून असे वाटते की, आपण कधा, कांदबरी वाचतांना जसे आपले मन , त्यातील व्यक्तिरेखा छानपणे रंगवते, तेवढी कोणती टीव्ही सिरिअल अथवा चिञपट नाही रंगवू शकवत.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

सहमत. फाफे जसा डोळ्यांसमोर आहे तसा या चित्रपटाच्या ट्रेलरमधून समोर येत नाही.

चला हवा येऊ द्या ने विडंबन सादर केले ते छान आहे.

ज्योति अळवणी's picture

25 Oct 2017 - 9:07 am | ज्योति अळवणी

एक फा. फे. सुमित राघवनने रंगवला होता. बहुतेक तीस-बत्तीस वसर्षं तरी झाली असतील त्याला. तो बराचसा पुस्तकातल्या फा फे च्या जवळचा तेव्हा वाटला होता

अगदी खरं आहे. अमेय वाघ 'मुरांबा 'त आवडला होता. इथे तो फील येत नाहीये.

ओरायन's picture

26 Oct 2017 - 11:28 pm | ओरायन

ज्या वयोगटासाठी फा.फे. होता त्या वयोगटाला (साधारणपणे ११ ते १५,१६) सुमित राघवन शोभत होता.

पगला गजोधर's picture

25 Oct 2017 - 9:34 am | पगला गजोधर

शालेय जीवनात आठवतंय, सकाळ मध्ये, रोज एक पान फार फे च्या कादंबरीतील छापून यायचं, त्यामुळे घरात पेपर आला की त्यावर उडी मारायला तयार रहायचो...

किसन शिंदे's picture

25 Oct 2017 - 10:44 am | किसन शिंदे

भा.रा.भागवतांचा फाफे माझ्याही आधीच्या पिढीचा असावा बहुधा, कारण माझ्या लहानपणी नव्वदीच्या सुरूवातीला फास्टर फेणेची पुस्तके फारशी हातात आली नाहीत.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Oct 2017 - 11:49 am | अत्रुप्त आत्मा

प्लस वण टू किसनद्येव.

चौकटराजा's picture

26 Oct 2017 - 7:36 pm | चौकटराजा

फाफे साधारण १९६७ च्या सुमाराचा . माझ्या लहानपणी मला भा रा भागतानी वेडच लावले होते. जूल व्हर्न च्या सर्व कादंबर्‍या त्यानी एका मासिकात क्रमाने मराठीत आणल्या. फुर्सुंगीच्या " बन्या" आजही लक्षात आहे.

आदूबाळ's picture

26 Oct 2017 - 7:51 pm | आदूबाळ

फाफेचा 'जन्म' १९६१च्या युद्धातला. अगदी सुरुवातीसुरुवातीच्या फाफेकथा (फाफेचा रणरंग आणि जवांमर्द फाफे) या मूळ कथा आहेत. फाफेच्या जन्माची रोमहर्षक कथा (फुरसुंगीचा फाफे) हीदेखील नंतर लिहिलेली / डेरिव्हेटिव्ह आहे.

ओरायन's picture

26 Oct 2017 - 11:40 pm | ओरायन

१९८३ ते १९८४ च्या दरम्यान मी फा.फे चे पहिले पुस्तक वाचले होते. त्यानंतर जसे नविन ( पुस्तक कदाचित काही वर्ष अगोदर प्रकाशित होत असावे पण आमच्या हातात ते वाचनालयात दाखल झाल्यानंतरच पडे.) येत होती तसतसे आम्ही वाचत गेलो.

दिल दोस्ती दुनियादारी ( पहिली ) मालिका एवढी लोकप्रिय झाली होती की त्यातले मुख्य कलाकार आता कुठेही दिसले तरी ती पात्रंच आधी डोळ्यासमोर येतात ... हा कैवल्य , हि मीनल , हा सुजय , हि रेशमा , हा आशू ..... आता कैवल्यने फास्टर फेणेवर आधारित चित्रपटात फास्टर फेणेचं कॅरॅक्टर साकारायचा प्रयत्न केला आहे असं वाटतं ते प्रोमो पाहताना.... अयशस्वी प्रयत्न ..... एकतर फास्टर फेणेच्या पुस्तकात त्याचं वय 11 पासून जास्तीत जास्त 14 - 15 दाखवलं आहे तर अमेय वाघ आता तिशीला आला आहे . फास्टर फेणेच्या साहसांमध्ये टेक्नॉलॉजी , मोबाईल , इंटरनेट, प्रोग्रामिंग वगैरे वगैरे चा दुरान्वयानेही संबंध आलेला नाही . तर नवा चित्रपट नव्या युगाचा आहे . तो फार तर एक बुद्धिमान तरुणाच्या साहसाबद्दलचा चित्रपट ठरेल , फास्टर फेणे न वाचलेल्या लोकांना , बच्चे कंपनीला आणि त्याचा फास्टर फेणेशी काही संबंध असणार नाही .

फास्टर फेणे न वाचलेल्या लोकांना , बच्चे कंपनीला आवडेलही पण त्याचा फास्टर फेणेशी काही संबंध असणार नाही .

सुमीत's picture

26 Oct 2017 - 9:31 am | सुमीत

१०० टक्के सहमत, सुमीत राघवन चा फाफे अजून लक्षात आहे पण पुस्तकांतून भेटणारा आपला फाफे ची सर कुठेच नाही ह्या चित्रपटात.
माझ्या ७ वर्षाच्या मुलाला माझी जुनी पुस्तके वाचून दाखवत आहे, नाही तर नवीन पीढी ला हाच नवीन फाफे खराव करील.
किंडल वर सध्या बरीच फाफे पुस्तके आहेत, वाचत आहे परत.

ओरायन's picture

27 Oct 2017 - 12:02 am | ओरायन

फास्टर फेणे न वाचलेल्या लोकांना , बच्चे कंपनीला आणि त्याचा फास्टर फेणेशी काही संबंध असणार नाही . पुर्ण सहमत.

बोलघेवडा's picture

26 Oct 2017 - 11:12 am | बोलघेवडा

आपल्या कल्पनेतील पात्र हे सिनेमा किंवा नाटकात जसाच्या तस कधीच उतरू शकत नाही. कारण आपल पात्र हा आपल्या मनाची निर्मिती असते. त्यामुळे असा नाही तर थीदा असा दाखवायला पाहिजे होत असा वाटत राहणारच. मग तो स्पायडरमॅन असो, हॅरी पॉटर असो की फाफे!!

मला वाटते हा उत्तम प्रयत्न आहे. त्या निमित्ताने का होईना एक अस्सल मराठमोळा नायक पुन्हा लोकांसमोर येतोय. कालानुरूप थोडा फरक पडणारच आणि तो योग्यही आहे.

माफ करा पण हॅरी पॉटरसाठी डॅनिएल रॅडक्लिफ पेक्षा जास्त चांगला कलाकार मिळूच शकला नसता .... हॅरी पॉटरमधले 90 % कलाकार त्या त्या भूमिकेसाठीच जन्माला आले असावेत असं म्हणण्याइतपत परफेक्ट आहेत . या बालकलाकारांची निवड हि तज्ज्ञ डायरेक्टर्स आणि स्वतः लेखिकेने अक्षरशः हजारो मुलांच्या ऑडिशन्स घेऊन केली आहे ... हॅरी पॉटरच्या बहुसंख्य वाचकांना चित्रपटसुद्धा अतिशय आवडतात याचं हेच कारण आहे . पुस्तकातल्या अनेक प्रसंगांना चित्रपटात काट दिला आहे , अनेक प्रसंग बदलले आहेत तरीसुध्दा वाचकांना चित्रपट आवडतात याचं कारण अचूक कास्टिंग आणि उत्कृष्ट दर्जाचा अभिनय हेच आहे . फास्टर फेणे चित्रपट हॅरी पॉटरच्या आसपासही येणार नाही ....

अनुप ढेरे's picture

27 Oct 2017 - 10:27 am | अनुप ढेरे

रोलिंगने कलाकारांची निवड मी करणार ही अट घातलेली चित्रपट बनवण्याचे हक्क विकताना असं वाचलय कुठेशी.

जेम्स वांड's picture

26 Oct 2017 - 3:50 pm | जेम्स वांड

अरे फाफे इतकाच आधुनिक करायचा होता तर पूर्णच करायला हवा होता, गॅजेट सेवी फास्टर फेणे उर्फ बन्या लीलया कंप्युटर अन मोबाईल हँडल करतोय अन...

बुडाखाली अजून सायकलच!!

सायकलचा बॅकवर्ड म्हणून अपमान करण्याचा मानस नाही पण हल्ली मध्यमवर्गीय घरातली, टेक-गॅजेट सेवी पोरं सायकलवर हिंडताना खचित दिसत नाहीत म्हणून जास्तच जाणवला मिसमॅच...

NiluMP's picture

26 Oct 2017 - 5:32 pm | NiluMP

Good Catch

NiluMP's picture

26 Oct 2017 - 5:32 pm | NiluMP

Good Catch.

अभिदेश's picture

27 Oct 2017 - 1:31 am | अभिदेश

न बघताच असले प्रतिसाद बघून मनोरंजन झाले. २ मिनिटाच्या ट्रेलर मधून केवळ अंदाज येतो चित्रपटाचा . माझ्या मुलांनां (वय १४ ,८ ) ट्रेलर आवडले. त्यांनी फा.फे वाचलेला नाही. त्यामुळे अमेय शोभून दिसत नाही वगैरे आक्षेप घेण्यासाठी किमान चित्रपट रिलीज होण्याची तरी वाट पहा. राहता राहिला प्रश्न नवीन गॅजेट्सचा , आता २०१७मध्ये १९६० चा कालखंड दाखवण्यापेक्षा , नवीन फा.फे दाखवणे नक्कीच शहाणपणाचे आहे. त्यानुसार नवीन गॅजेट्स योग्यच.सायकलचा नक्की किती आणि काय उपयोग केलाय ते चित्रपट बघितल्यावर कळेलच.

ओरायन's picture

27 Oct 2017 - 7:02 am | ओरायन

मालगुडी डेज् या नावजलेल्या जुन्या मालिकेची या निमित्ताने आठवण झाली. यात जुन्या कथा त्याच काळातील दाखवल्या होत्या ,नविनपणाचा हव्यास त्यात कुठेही नव्हता.तरी चांगल्या दर्जाच्या कथा होत्या.
नविन साहसपटाला म्हणजे कालानुरूप चिञपटाला विरोध असण्याचे कारण नाही, पण त्याला तुम्ही फास्टर फेणे हे नाव नका देऊ. जर चांगला साहसपट असेल तर त्याला आम्ही पण डोक्यावर घेऊ. पण फास्टर फेणे याला त्याच्या मुळ रूपात पाहायला अधिक आवडले असते.

ओरायन's picture

27 Oct 2017 - 7:22 am | ओरायन

मालगुडी डेज् या नावजलेल्या जुन्या मालिकेची या निमित्ताने आठवण झाली. यात जुन्या कथा त्याच काळातील दाखवल्या होत्या ,नविनपणाचा हव्यास त्यात कुठेही नव्हता.अर्थात ते विषयानुरूप काही कालानुरूप नविन दाखवू शकत नव्हतेच.तरीही मालिकेतील कथा चांगल्या दर्जाच्या कथा होत्या. तसेच बोक्या सातबंडे, गोट्या यांच्याबाबतीत.
नविन साहसपटाला म्हणजे कालानुरूप चिञपटाला विरोध असण्याचे कारण नाही, पण त्याला तुम्ही फास्टर फेणे हे नाव नका देऊ. जर चांगला साहसपट असेल तर त्याला आम्ही पण डोक्यावर घेऊ. पण फास्टर फेणे याला त्याच्या मुळ रूपात पाहायला अधिक आवडले असते.

मराठी_माणूस's picture

27 Oct 2017 - 10:31 am | मराठी_माणूस

सहमत.

एखादे नविन पात्र जन्माला घालता आले असते. पण ते यशस्वी झाले असते का नाही ह्या बद्दल खात्री नसावी त्यामुळे आधीच यशस्वी झालेल्या हीरोचे पात्र घेतले असावे.
रीमिक्स गाण्यामधे जसे जुने प्रसिध्द गाणे वापरलेले असते तोच प्रकार.

जेम्स वांड's picture

27 Oct 2017 - 8:26 am | जेम्स वांड

आता २०१७मध्ये १९६० चा कालखंड दाखवण्यापेक्षा , नवीन फा.फे दाखवणे नक्कीच शहाणपणाचे आहे

हे कसे काय बुआ? माझ्यामते चित्रपट असा धंदा आहे जिथे ऑथेंटीसिटी वर धंदा चालतो (नव्हे पळतो) पुस्तकाला जितकी प्रामाणिक पटकथा तितकी यशस्वी तिकीटबारी असते न सिनेमाची? रितेश देशमुखाने त्यासाठीच काढलाय न फाफे?
मग जर पुस्तकात १९६० चा जमाना आहे तर तो २०१७ मध्ये मॉडिफाय करण्यात कसलं शहाणपण?

बरं, १९६० निर्माण करणे म्हणजे काही पार शिवकालीन पेशवेकालीन सेट तयार करावे लागतील इतकं खर्चिकही नाही (त्या काळाची बरीच चिन्हे, इमारती जागा इथं आजही आपला राबता असतोच) , दुनियादारी अन शाळा ही दोन उदाहरणे डोळ्यासमोर आहेतच.....

सिरुसेरि's picture

27 Oct 2017 - 12:01 pm | सिरुसेरि

"दुनियादारी" , "कट्यार" हे चित्रपट मुळ साहित्यकॄतीमधे फेरफार करुन बनवले तरी त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला . त्यामुळे हा फाफे कुठल्याही अवतारात अवतरला तरीही तो गाजणार अशी अपेक्षा करायला हरकत नाही . बोलुन चालुन फास्टर फेणे .

आदिजोशी's picture

27 Oct 2017 - 12:39 pm | आदिजोशी

शरलॉक होम्स ह्या पात्रावर सिनेमे आणि मालिका निघाली. त्यातला सिनेमा मधल शरलॉक (RDJ जे साकारलेला) हा त्यावेळची ऑथेंटिक टाईमलाईन जपणारा होता तर Benedict Cumberbatch चा शरलॉक हा नव्या युगाचा टेक सॅव्ही. शरलॉकचे हे दोन्ही अवतार लोकांना अत्यंत आवडले.

असाच प्रयत्न (कॉपी) फा.फे.च्या बाबतीत करायचा प्रकार दिसतोय. सिनेमा बघितल्याशिवाय तो चांगला आहे की वाईट हे सांगता येणार नाही.

सिनेमा बघितल्याशिवाय तो चांगला आहे की वाईट हे सांगता येणार नाही.

हे सगळ्यात महत्वाचे बाकी उगाच हवेतल्या गप्पा..

आम्ही फाफे या पात्रावर प्रेम असल्याने ऍडव्हान्स बुकिंग करून चित्रपट बघायला जातोय.

मी नव्वदीच्या दशकातील मुलगी आहे. मला माझ्या नशिबाने हि पुस्तके वाचायला मिळाली. फाफेची पुस्तके मी दापोलीला माझ्या आत्याच्या घरी वाचली आहेत. भा. रा . भागवतांची इतर पुस्तके आमच्याइथे उपलब्ध होती पण हि नव्हती. प्रचंड फॅन!! शेरलॉक वाचला सातवीत तोही त्यांनी अनुवादित केलेला. सो, त्यांच्यावरील प्रेमामुळे चित्रपट बघायला जाणार!

आता मुद्दा चित्रपटाचा. वयाचा मुद्दा महत्वाचा आहे. पण तो दुर्लक्षण्याजोगा आहे. अमेय वाघ वयाने खूप मोठा स्क्रीनवर तरी वाटत नाही. दुनियादारी मधल्या पोट सुटलेल्या श्रेयस पेक्षा खूप बरा! आणि टेक सावी म्हणाल तर बीबीसीचा शेरलॉक बघा. शेरलॉक लिहिला गेला होता एकोणिसाव्या शतकात. पण आता सीरिज मध्ये त्यांनी त्याला एकविसाव्या शतकात आणलंय. ते इतका मस्त ब्लेंड केला आहे, तर ते आपल्याला खटकत नाही. मग हे का बरे खटकावं? अर्थात, चित्रपट पाहिल्यावर डिटेल कंमेन्ट करण्यात येईल.

आणि कधीही पुस्तके आणि चित्रपट यांची तुलनाकेल्यास पुस्तकेच श्रेष्ठ ठरतात. कारण त्यात आपली कल्पनाशक्ती असते आणि चित्रपट हि दिग्दर्शकाची!चित्रपटाला वेगळी कलाकृती म्हणून बघणेच श्रेयस्कर.

~
मनातल्या रमा-माधव च्या कल्पनेला धक्का लागू नये म्हणून कधीही रमा-माधव न पाहिलेली
हर्मायनी

अभिदेश's picture

27 Oct 2017 - 10:17 pm | अभिदेश

मला हेच म्हणायचे होते. आता लगोलग चित्रपट कसा वाटला ते लिहा पाहू.

हर्मायनी's picture

1 Nov 2017 - 1:21 pm | हर्मायनी

ही घ्या लिंक : य मजा आणणारा फाफे!

श्रीरंग's picture

28 Oct 2017 - 7:49 am | श्रीरंग

माझ्या मते तरी, फास्टर फेणे वर चित्रपट बनवणं हा एक उत्तम प्रयत्न आहे. तेच तेच चाकोरीबद्ध चित्रपट ढीगभर येऊन कोसळत असताना, असा वेगळा प्रयत्न कौतुकास्पद आहे. अर्थात, आपण सर्वांनी इतक्या वर्षांपूर्वी वाचलेली भागवतांची पुस्तकं, त्याचा मनावर अजूनही पगडा असल्यामुळे मनात फाफे ची एक प्रतिमा घट्ट असणार यात शंका नाही.
पण थोडा मोठा झालेल्या बन्याला या काळात आणून, त्याभोवती चित्रपट बनवण्याच्या कल्पकतेला मला तरी दाद द्यावीशी वाटते. चित्रपट लवकरच बघणार आहे. आदित्य सरपोतदार या दिग्दर्शकाचे यापूर्वीचे "क्लासमेट्स" आणि "नारबाची वाडी" मस्त होते. फाफे पण चांगलीच करमणूक करेल असं वाटतंय.

बोलघेवडा's picture

28 Oct 2017 - 11:17 pm | बोलघेवडा

आजच फाफे बघून आलो. अगदी मस्त आहे. अमेय फाफेच्या भूमिकेत एकदम फिट बसला आहे. गिरीश कुलकर्णीचा खलनायक जबरदस्त!!! कथानक एकदम वेगवान!!!

धागालेखकाने फाफे पाहिला का? कसा वाटला? काही आक्षेप तरी दूर झाले का?

ओरायन's picture

5 Nov 2017 - 8:05 pm | ओरायन

नाही. अजूनतरी बघितलेला नाही. माञ बाकी प्रतिसाद बघता नक्कीच बघेल.

आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! माझ्या मनात असणारी फाफे.ची प्रतिमा कायम ठेवत नविन रूपातील फाफे नक्कीच बघेल.

सिरुसेरि's picture

6 Nov 2017 - 3:18 pm | सिरुसेरि

लेखक भा . रा. भागवत हे स्वता आधुनीक विचारांचे होते . नव नवीन प्रयोगांना प्रोत्साहन देणारे होते . त्यामुळे या नवीन , आधुनीक स्वरुपातील फाफेचे त्यांनीही स्वागतच केले असते . ( असा एक कयास आहे . )

अजुन सिनेमा पहायचयात. पण पुस्तकातल्या आपल्या मनातल्या व्यक्तिरेखा वेगळ्याच असतात.

आमच्याकडे काल दाखवलेला फाफे बर्‍याचजणान्ला बघता न आल्याने किंवा बरेच लोक पहायचे उरल्याने पुढील रयवारी दुसरा शो झाईर केलाय.