ती.

बोलघेवडा's picture
बोलघेवडा in जनातलं, मनातलं
23 Oct 2017 - 10:16 am

ती गेली. अगदी नक्की.
ऑफिसची बॅग उचलताना खात्रीच पटलीये तशी.
पण मन मात्र अजूनही तिच्याच आठवणीत रमलय.
ऊन ऊन गरम पाण्याने आंघोळ करून, नवीन कपडे घालून, मुलाबरोबर फटाके उडवायला सोकावलेल्या मनाला आता ऑफिस नावाच्या चौकोनी खोक्यात नाईलाजाने कोंबावं लागेल.
जिभेवर अजूनही फराळाची चव रेंगाळतीय. तिला ऑफिस मध्ये जाऊन पोळी भाजीचा डबा खायची सवय करायला थोडा वेळ द्यावा लागेल.
आकाशकंदील, पणत्यांतून झिरपणारा तो पिवळा प्रकाश आता भकास ट्युबलाईटच्या पांढऱ्या प्रकाशात विरघळून जाईल.
मुलांत मुल होऊन सजवलेली ती किल्ल्याची मोरपंखी दुनिया आता नुसतीच मातीची ढेकळं बनून जाईल.

"आत्ताशी गणपती गेलेत, अजून दिवाळी बाकी आहे!!" असं म्हणत कामं रेटणाऱ्याला मात्र आता काडीचाही आधार राहिला नाही.
जगाच्या रामरगाड्याची सवय व्हायला अजून काही दिवस जातील. सुगंधी तेलानं मऊ पडलेलं मन हळूहळू निबर होत जाईल.
तशी फार हुरहूर वाटू देऊ नका. ती येईलच लवकर परत, अजून 12 महिन्यांनी !!!
( बोलघेवडा, 2017)

मांडणीविचारआस्वाद

प्रतिक्रिया

मिपावर ब्लॉग साठी वेगळा विभाग असावा का?

बाजीप्रभू's picture

23 Oct 2017 - 11:50 am | बाजीप्रभू

आवडलं!!

विनिता००२'s picture

23 Oct 2017 - 12:12 pm | विनिता००२

चांगलंच जाणवतंय आज!!
ऑफिस नक्को नक्को झालंय :(

Pradeep Phule's picture

24 Oct 2017 - 2:27 pm | Pradeep Phule

वा..!
छान लिहलंय.
दिवाळी संपवून ऑफिसला जाताना माझ्याही मनाची अशीच काहिशी अवस्था झाली होती.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.