दिवाळीसाठी पेशल फराळाचे खाद्यपदार्थ सुचवा !!

चामुंडराय's picture
चामुंडराय in काथ्याकूट
15 Oct 2017 - 4:20 am
गाभा: 

प्रेर्ना : सद्य मिपाकालीन अमुक-सुचवा, तमुक-सुचवा अश्या असंख्य सुचवात्मक जिल्ब्या

आम्ही दोघे आणि आमच्या दीड वर्षाच्या तिळ्या मांजरी, या सर्वांकरिता दिवाळीचा काहीतरी विशेष फराळ तयार करावा म्हणतो.

आता एक रविवार आणि आणखी एक दोन दिवस असा कालावधी उपलब्ध आहे; तरी त्यातल्या त्यात किमान दिवाळीच्या शेवटच्या तीन मुख्य दिवसांसाठी फराळ तयार करावा असं डोक्यात आहे (मागे पुढे करू शकतो).

आमच्या मांजरी खूप खादाड असल्याने चवी पेक्षा पोटभरीच्या फराळाची अपेक्षा आहे. मांजरी लहान असल्यामुळे खूप मोठे फराळाचे पदार्थ जसे लाडू, करंजी, चकली नको. त्या दृष्टीने शंकरपाळी, बारीक शेव, चिवडा आयडियल होते, पण खूप तेलकट नको असे वाटते.

मी सध्या पारंपारिक फराळाच्या पदार्थांचा विचार करतोय. फराळाचे पदार्थ किती करावेत हे फिक्स नाही (अंदाज नाही म्हणा हवं तर), पण जास्तीत जास्त दोन आठवडे तरी पुरावेत अशी अपेक्षा आहे.

आम्ही दोघेही आजकालच्या जमान्याला साजेसे जिमकरी, 'वेट वाच'स्पती, कॅलरीमापक, आरोग्य संवर्धक, कनसर फुडी, ऋजुता सेक्टेरियन / कल्टीस्ट इत्यादी इत्यादी असल्या कारणाने प्रथिनयुक्त, नाविन्यपूर्ण परंतु ग्लोकल फराळाचे पदार्थ पाक्रुसह सुचवावेत. पंचक्रोशीत मिळत असतील तर अत्युत्तम.

मी अगदी पारंपरिक पदार्थांपासून सुरुवात करून कप-केक्स, पेस्ट्रीज, वाफल्स, टॉफिज, बकलावा, बासबूस्सा, कूनाफे, कुकीज, ब्राऊनिज, टार्ट पर्यंत विचार करून बसलोय पण काही पक्के होत नाहीये!

खूप काही restrictions नसल्या तरी वेळ कमी असल्याने बराच गोंधळात पडलोय, मान्य आहे! :) त्यामुळे आपल्या सूचनांचं स्वागत आहे. (इतरही काही सूचना असतील, मांजरीच्या फराळासाठी तर उत्तमच!).

विसू: दिवाळी हा मांगल्याचा सण असल्या कारणाने मांजरीसाठी नॉन-व्हेज फराळाचे पदार्थ सुचवू नयेत. सुचवलेस फाट्यावर मारण्यात येतील.

प्रतिक्रिया

विनटूविन's picture

15 Oct 2017 - 9:29 am | विनटूविन

दूध
मांजरींसाठी प्लेन दूध
आणि तुमच्यासाठी मसाला दूध(दिवाळी विशेष म्हणून कप, बशा या नव्या घ्या)
सोपे, स्वस्त आणि मस्त
शिवाय पौष्टिक
उरणे, संपले नाही घोळही नाही.

विनटूविन's picture

15 Oct 2017 - 9:30 am | विनटूविन

अतिशय पारंपारिक पदार्थ आहे हा

पैसा's picture

15 Oct 2017 - 3:39 pm | पैसा

गोव्यात करतात तसे ५ प्रकारचे पोहे बेस्ट, मी चिवड्याबदली हेच करते हल्ली. बेसन/मुगाच्या पिठाचे लाडू, शिरवाळ्या, खीर, पुऱ्या, मिल्क पावडरचे गुलाबजामुन, बर्फी, पेढे, बासुंदी, पुडिंग, नाचण्याच्या सत्त्वाच्या वड्या, खजूर लाडू/वड्या वगैरे कित्येक प्रकार करता येतील.

दीड वर्षाच्या मांजरी लहान हे काय पटलं नाय. खरंच मांजरी आहेत का मुलं?

खव्याच्या जिल्ब्या करा.

पगला गजोधर's picture

16 Oct 2017 - 1:21 pm | पगला गजोधर

खव्याच्या जिलब्या करा व त्याला उंदरांचा आकार द्या ...

खव्यात साखर घालून तळा म्हणजे काळ्याही पडतील नीट.

सुबोध खरे's picture

16 Oct 2017 - 1:25 pm | सुबोध खरे

पाणी पुरी हा पदार्थ ठेवा.
फराळाचं आणि मिठाया, गोड पदार्थ खाऊन पाहुणे मित्रमंडळी कंटाळलेले असतात.
आपल्याकडे आल्यावर "पाणीपुरी खाणार का" या प्रश्नावर हमखास आणि आनंदाने मित्रमंडळी आणि आप्तेष्ट हो म्हणतात.
एक वर्ष हा प्रयोग आमच्या घरी केला होता आणि तो कमालीचा यशस्वी झाला होता.
चिंच खजुराचे गोड पाणी आणि उकडलेले मूग आणि रगडा फ्रिज मध्ये चार दिवस व्यवस्थित टिकतो.( लागेल तसे काढून मायक्रो वेव्ह मध्ये कोमट करायचे) पाणीपुरी मसाला वापरून तिखट पाणी लगेच करता येते आणि पुऱ्या बाहेर कधीही मिळतात.

कपिलमुनी's picture

16 Oct 2017 - 1:34 pm | कपिलमुनी

मांजरीना शिल्लक राहिलेली बियर पाजा
ता.क. बियर व्हेज आहे.

पगला गजोधर's picture

16 Oct 2017 - 2:06 pm | पगला गजोधर

नाही ..... बिअर जर अल्कोहॉलिक असेल तर, तर १८ वर्ष्याखालील मांजरांना पाजता येणार नाही ....

कपिलमुनी's picture

16 Oct 2017 - 2:25 pm | कपिलमुनी

मांजरे लौकर सज्ञान होउन लग्न करतात आणि मुलेबाळे होतात , त्या वयात त्यांना सज्ञान गृहीत धरून पाजयला हरकत नसावी

पगला गजोधर's picture

16 Oct 2017 - 3:52 pm | पगला गजोधर

मी म्हणतो, 'लग्न करून मुलेबाळे होण्याच्या' वयात मांजरांना अश्या नशाकारक सवयी का लावायच्या त्यांनी ?
मांजराचा भावी संसार उघडा नाही पडणार का ? मांजराच्या पिल्लाना आजूबाजूची पिल्लं "तेरा बाप पेताड है " असं म्हणून हिणवणार ...
मग मांजराच्या पिल्लांचा कॉन्फिडन्स डाऊन होणार ... मग त्यांचा कॉन्फिडन्स अप करण्यासाठी परत रेसिप्या शोधाव्या लागणार ....
शिवाय मांजराला अल्कोहॉलची आवड निर्माण झाली तर ? .. पुढच्या दिवाळीत लेखक मोहोदयांना ..
पेशल कॉकटेल च्या रेशिप्या सांगा म्हणून धागा टाकावा लागेल ...