मधुघट१

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
10 Oct 2017 - 12:12 pm

मधुघट कुणा मिळे भरलेला
शोधते जळकुंभ कुणी ।।धृ ।।

बळ कैसे
येईल अंगा
जळही दुर्मिळ भासतसे
अमृताची जरी हाव नसे
ऐकेना व्याकूळ आर्जवाला ।।१।।

लोळे कुणी
मखमालीवरी
वणवण, हाय! कुणा ललाटी
भलीबुरी, ही जगरहाटी!
कमवेना कुणी त्या गोडीला? ।।२।।

भला जाणता
दीन नेणता
कष्ट करी अमाप जरी
जैसे तैसे रहावे धरी
साखरपाणी तो प्यालेला ।।३।।

- संदीप चांदणे

कविता माझीकरुणशांतरसकलाकविता

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

10 Oct 2017 - 7:42 pm | अभ्या..

जब्बरदस्त, सुपर की रे सॅन्डीबाबा.

गीत आवडले. याला चाल लावून म्हटले असेल तर व्हिडीओ बनवून अपलोड कराल का?

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Oct 2017 - 11:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली मधुघट २ च्या प्रतिक्षेत
पैजारबुवा,