दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - गुणामामा

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in दिवाळी अंक
19 Oct 2017 - 12:00 am

Header2
लेखक :- पिवळा डांबिस
अभिवाचन :- यशोधरा

व्यक्तिचित्र हा विषय आणि मिपावरच्या एक से एक रत्नांमधल्या व्यक्तिचित्रांची वर्णी लागणार नाही असं कसं होईल? पिवळा डांबिस यांच्या एका धमाल आणि फणसा सारख्या व्यक्तिचित्राला श्राव्य रुपात घेऊन येत आहेत यशोधरा.

Footer

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

19 Oct 2017 - 4:05 am | पिवळा डांबिस

सुरेख अभिवाचन केलंस यशो. माझ्याकडून पुढल्या खेपेला तुला पार्टी!! :)
मी मिपावर अनेक व्यक्तिचित्र लिहिली आहेत. भाग्याची गोष्ट अशी की त्यातली बहुतेक मिपाकरांना आवडली, तसे त्यांचे अभिप्रायही मिळाले. गुणामामा ह्या व्यक्तिचित्राचं वैशिष्ट्य हे की मी ते प्रथम इतरत्र प्रकाशित केलं होतं. पण त्या ठिकाणचा वाचकवर्ग संख्येने लहान असल्याने गुणामामा थोडासा अपरिचित राहिला होता. नंतर ह्या व्यक्तिचित्रालाही इतर व्यक्तिचित्रांसारखंच चांगलं भाग्य मिळावं म्हणून माझाच नो रीपिटेशनचा नियम मोडून मी ते इथे मिपावर पुनःप्रकाशित केलं. त्याला मिपाकरांचा प्रतिसादही चांगला मिळाला...
आणि काय नशिबाचा खेळ असतो बघा!
आज माझ्या सर्व व्यक्तिचित्रांमध्ये हेच व्यक्तिचित्र अभिवाचनाचा मान पटकावून जातंय.
ह्या अभिवाचनातलं अचूक टायमिंग, मालवणी भाषेचा लहेजा संभाळणं, काही लांबलचक वाक्यं एका दमात पूर्णं करणं, ह्या सगळ्याचं श्रेय यशोधरेला.
आणि ह्यातल्या मालवणी शिव्यागाळीचं खापर माझ्यावर! :)
एन्जॉय!!

यशोधरा's picture

19 Oct 2017 - 9:24 am | यशोधरा

तुमका आवडला मां, झाला तर! :)

पद्मावति's picture

19 Oct 2017 - 2:30 pm | पद्मावति

खूपच मस्तं. मजा आली ऐकतांना.

मित्रहो's picture

24 Oct 2017 - 2:28 pm | मित्रहो

मस्त आहे