चिकन ६५ का ब्वा??

सत्याचे प्रयोग's picture
सत्याचे प्रयोग in पाककृती
7 Oct 2017 - 9:12 pm

बऱ्याच वेळा चिकन ६५ घरी केले गेले आणि सारखा मनात प्रश्न घोळत होता या रेसिपीला चिकन ६५ का ब्वा म्हणत असतील ?? उत्सुकतेने गूगल काकाकडे काही माहिती शोधली तर बरीच रंजक माहिती मिळाली.
1) पुर्वीच्या साऊथ इंडियन लोकांमध्ये 'कोण किती मिरच्या खातो' याच्यावरून चुरस असायची. यातूनच एका हॉटेल व्यावसायिकाने एक डिश बनवली. त्या डिशमध्ये एक किलो चिकनमध्ये ६५ मिरच्या असायच्या. म्हणून चिकन-६५ !
2) ही डिश अस्तित्वात आली, त्यावेळी तिला आधी काही दिवस लोणच्यासारखं साठवून ठेवलं जायचं आणि मगच सर्व्ह केलं जायचं. साठवून ठेवण्याचा हा कालावधी ६५ दिवसांचा असायचा आणि म्हणून चिकन-६५ !
3) डिशमध्ये चिकनचे ६५ पीस असायचे आणि सोबत त्यात मसालेही बरोब्बर ६५ प्रकारचे वापरले जायचे म्हणून चिकन-६५ !

4) आणि आता हा शेवट . या डिशला चेन्नईमधल्या सुप्रसिद्ध बुहारी रेस्टॉरंटने सर्वप्रथम १९६५ मध्ये बनवलं होतं. या सालावरूनच त्यांनी या डिशला चिकन-६५ हे नाव दिलं. याच रेस्टॉरंटने नंतर चिकन -७८, चिकन-८२ आणि चिकन-९० या डिशही आणल्या. ज्या अनुक्रमे १९७८, १९८२ आणि १९९० साली तयार करण्यात आल्या होत्या. पण यात लोकप्रिय झाली ती चिकन-६५.

आणि अजून काय काय किस्से असतील तर जरूर सांगा आणि आता मी बनवत असलेली चिकन ६५ ची रेसिपी
साहित्य
बोनलेस चिकन १/२ किलो ,३ चमचे दही , १ चमचा आले लसूण पेस्ट , १ चमचा गरम मसाला , १ चमचा dhane pavder , १/२ चमचा हळद , २ चमचा लाल तिखट , १ अंडे , मीठ ( आपल्या ब्लड प्रेशर नुसार / ब्लड प्रेशर भीतीप्रमाणे ) मी पाऊण चमचा घेतलेल .हे सर्व एका भांड्यात मस्तपैकी फेटा नंतर यात चिकन चे तुकडे टाका मिक्स करा १/२ तास फ्रीझ मध्ये ठेवा या वेळात do whatever you want to do man !!!
नंतर फ्रीझ मधून काढून तळा .

तळताना २ मिनिटे उच्च ज्योत ५ मिनिटे मंद ज्योत आणि पुन्हा २ मिनिटे उच्च ज्योत मस्त कुरकुरीत होतात आणि आता बसा माफ करा खा !!!

प्रतिक्रिया

विनटूविन's picture

8 Oct 2017 - 10:06 am | विनटूविन

४ क्रमांकाची गोष्ट माहिती होती. जास्त तर्कशुद्ध देखील तीच वाटते.

पगला गजोधर's picture

8 Oct 2017 - 1:18 pm | पगला गजोधर

कांदा ??
कांदा नसतो या चिकन मधे ?

संजय पाटिल's picture

8 Oct 2017 - 3:26 pm | संजय पाटिल

छे!!! किसलेला कोबी देतात त्या बरोबर...

पगला गजोधर's picture

8 Oct 2017 - 3:33 pm | पगला गजोधर

धागाकर्ते माफ करा मला, पण एक सांगूंका ?

गरम मसाला (रोस्ट मसाल्याचे) व धनेपावडर (रोस्ट) ही चाळून, तळून झाल्यावर भुरभुरतात....
तळण्यापूर्वीच जर तुम्ही याला मॅरीनेशनमध्ये वापरलं तर, त्या मसाल्यांमध्ये असलेला नाजूक ऍरोमा नष्ट होईल तळताना...
स्वानुभवावरून सांगतोय...

सत्याचे प्रयोग's picture

9 Oct 2017 - 4:31 pm | सत्याचे प्रयोग

आपल्या सुचनेबद्दल धन्यवाद! हा प्रयोग करून पाहू

सुनील's picture

9 Oct 2017 - 8:48 am | सुनील

मी ऐकलेल्या कहाणी प्रमाणे, कोंबडीचे पिल्लू ६५ दिवसांचे असताना केलेला पदार्थ म्हणून त्याचे नाव चिकन-६५.

नंतर एकदा विजयवाड्यातील एका रेस्टॉरन्टात मटण-६५ नावाचा पदार्थ पाहिला आणि ६५ आकड्यावरील विश्वासच उडून गेला!

असो, चिकन-६५ ही डिश चखणा म्हणून अतिउत्तम, यात वाद नाही!!

सत्याचे प्रयोग's picture

10 Oct 2017 - 8:41 am | सत्याचे प्रयोग

चखण्यावरुन आठवले 90 ml का ब्वा असाही धागा काढता येईल की.

पगला गजोधर's picture

10 Oct 2017 - 9:32 am | पगला गजोधर

त्याऐवजी,
"एकचं प्याला" का बॉं ?...
असा काढा.

प्रभाकर पेठकर's picture

9 Oct 2017 - 1:37 pm | प्रभाकर पेठकर

चेन्नईत एका उपहारगृहात हा पदार्थ बनवला जायचा. स्वातंत्र्यपूर्व काळात तिथे अनेक इंग्रज सैनिकांची ये-जा असायची. ह्या पदार्थाचे मद्रासी नांव कांही केल्या त्या गोर्‍या सैनिकांना उच्चारता यायचे नाही आणि लक्षातही राहायचे नाही. ही चिकन पाककृती पदार्थ सूचीमध्ये (मेन्यू मध्ये) ६५ क्रमांकावर होते. तेंव्हा ते सैनिक तो पदार्थ मागवताना 'चिकन-६५' अशी मागणी नोंदवायचे. मद्रासी वेटर्सनांही हे समजायला बरे पडायचे तिथून ते 'चिकन६५' हे नांव प्रचलित झाले. (ऐकीव माहीती).

सुबक ठेंगणी's picture

13 Oct 2017 - 1:00 pm | सुबक ठेंगणी

मी बंगलोरला असताना तिथले स्थानिक कर्नाटकी किंवा ऑफिसमधले तामिळी लोक हॉटेलात फक्त चिकन-६५ खायला जायचे कधीमधी. मुंबईत ह्या पदार्थाचं एवढं प्रस्थ मी तरी पाहिलं किंवा ऐकलेलं नाही. त्यावरून ह्याच्या जन्माशी दक्षिण भारताचा काहीतरी संबंध असावा असं वाटलं होतं तेव्हा. आता लिंक लागली. :)