मोदीप्रेम आणि मोदीद्वेष: -१०० ते +१००

arunjoshi123's picture
arunjoshi123 in काथ्याकूट
6 Oct 2017 - 6:04 pm
गाभा: 

मित्रहो,
तुमच्या मते तुमची आणि मिपावरच्या इतर आयडींची मोदीभावना काय आहे? याच्या सर्व्हेमधे जर तुम्हाला रस असेल तर सहभागी व्हा.
शून्यापेक्षा जास्त ते १०० = चढती चांगली भावना.
शून्यापेक्षा कमी ते -१०० = चढती वाईट भावना.
इथे चांगली आणि वाईट हे शब्द पात्रता, चांगुलपणा, नशीब, क्षमता, इ इ अनेक गुण आणि तसलेच अवगुण अशा अर्थाने आहेत.
============================
अर्थातच लोकांचं मत नेहमी तेच नसतं. शिवाय प्रत्येक मुद्द्याबद्दल तेच नसतं. प्रत्येक मुद्द्याचं महत्त्व तेच नसतं. कोणाला हे रिलेटीव नजरेने पाहायचं असेल, कोणाला संदर्भ पाहायचे असतील, कोणाला देशाचं पडलं असेल, कोणाला संकुचित अस्मितांचं पडलं असेल, कोणाला काही दूरगामी बाबी आवडत असतील. तर मोदी आहेत, असतील, पंतप्रधान झालेत, होतील, काही करताहेत, काही करत नाहीयेत, खरे आहेत, खोटे आहेत, सच्चे आहेत, नाटकी आहेत, सक्षम आहेत, अक्षम आहेत, असायला पाहिजेत, असायला नको होते, इ इ अनेक विचार असणार. या सर्वांचं एकत्रीकरण करून, गेल्या ७० वर्षांत जे पंतप्रधान होऊन गेले आणि येत्या १०-१५ वर्षांत जे होतील (मोदी राजकारणात असेपर्यंत), त्यांच्या तुलनेत वा अशी काही तुलना न करता, -१०० ते १०० पैकी किती मार्क द्यावे वाटते?
===================================
तुम्ही तुमचे मार्क्स या धाग्यात बदलू शकता, एकदा दिलेले मार्क्स लढवायची फार आवश्यकता नाही. वाटल्यास स्पष्टीकरण देऊ शकता. एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या एकूणत्वात त्या त्या संदर्भात तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं हे तुम्ही कसं ठरवता हे तुम्ही सांगाल तर उत्तमच.
=========================
रेंजच्या बाहेरची उत्तरे बाद. अग्राह्य.
=============================================
ज्यांचे उत्तर ० नाही ते लोक देखिल संतुलित मानण्यात येतील. असल्यास.
====================================
लेखात तुम्ही मार्क दिले मंजे तुम्ही मत देणार असं मानलं जाणार नाही. त्याचा संदर्भ वेगळा असू शकतो.
============================
व्यक्तिशः मला लोक जेव्हा एखाद्या सार्वजनिक व्यक्तिस "खोटा तो खोटा" वा "खरा तो खराच" हे कसे, कधीपासून, का मानायला चालू करतात यात रुची आहे.

प्रतिक्रिया

साहना's picture

6 Oct 2017 - 6:40 pm | साहना

माझ्या मते :

वाजपेयी => +२५
मन्नूजीं => -१००
नरेंद्र मोदी => -५०

पॉलिसी च्या दृष्टीने मोदी आणि मनमोहन ह्यांत विशेष फरक नाही. विदेशनीती ह्या एका क्षेत्रांत मोदींनी भरीव कामगिरी केली आहे असे दिसते पण त्यांत सुद्धा पॉलिसी बदल असा काही नाही.

विजुभाऊ's picture

20 Mar 2018 - 11:34 am | विजुभाऊ

पी व्ही नरसिंहराव सारखा द्रष्टा पंतप्रधान आपल्याला लाभला नसता तर आपण बहुतेक व्ही पी सिंग आणि प्रभुतींच्या मूर्ख आणि योजनाशून्य व्यक्तींच्या पॉलीसीज मुळे आज आपल्या शेजार्‍यांपेक्षाही मागासलेले राहिलो असतो.
काँग्रेस ने त्याना नेहमीच अनसंग हीरो ठेवले.

प्रचेतस's picture

6 Oct 2017 - 6:50 pm | प्रचेतस

मोदी +१००

अभ्या..'s picture

6 Oct 2017 - 6:53 pm | अभ्या..

मोदीकाका १०० पैकी १००

यश राज's picture

6 Oct 2017 - 7:06 pm | यश राज

मोदी +१००

पगला गजोधर's picture

6 Oct 2017 - 7:06 pm | पगला गजोधर

नेहरू +१००
इंदिरा +५०
लालबहादूर , नरसिम्हा राव +२५
राजीव गांधी , अटल बिहारी +२०
मनमोहन , देवेगौडा, गुजराल, चंद्रशेखर - ०
मोदी -२०
देसाई -४०

भंकस बाबा's picture

6 Oct 2017 - 7:51 pm | भंकस बाबा

मनमोहन+5
नेहरू -100
इंदिरा+10
बाकीच्यांचे माहीत नाही

एक छायाचित्रकार's picture

6 Oct 2017 - 8:39 pm | एक छायाचित्रकार

मोदि +५०

१. अटल पेन्शन योजना. खुप फायदेशिर आहे. तपासुन पहा.
२. प्रधान मंत्रि जन धन योजना
३. प्रधान मंत्रि जीवन बिमा योजना
४. प्रधान मंत्रि सुरक्षा बिमा योजना
५. बर्याच सरकारि योजना / कामे ओनलाइन होत असल्यामुळे कमी होत चाललेलि खाबुगिरी. उदा. आरटीओ साठि एम परिवहन , सर्व ठिकणी आधार लिंक करणे , ग्रुह खरेदि व विक्रि , आणि अनेक .
६. सुधारलेली रस्त्यांची अवस्था. झटपट होत असलेली रस्त्यांची कामे. मेरि सडक अअ‍ॅप ( वापरुन पह, मी स्वत: वापरलेले आहे
७. नोटबंदी.
८. देशाच्या संरक्षणाच्या द्रुश्टीने चालु असलेली भरीव कामे.

अभिजित - १'s picture

7 Oct 2017 - 4:04 pm | अभिजित - १

पोलिसी documents घरी आली ? कि नुसते पैसेच भरत आहात ?
३. प्रधान मंत्रि जीवन बिमा योजना
४. प्रधान मंत्रि सुरक्षा बिमा योजना

इथे सर्व कागदपत्रे बरोबर असताना पण विमा कंपन्या पैसे अडकवतात. मग तुमच्या कडे काहीही कागदपत्रे नसताना कोण पैसे देणार ? कि राष्ट्रसेवा म्हणून पैसे भरता ? ३३० रु दर वर्षी , प्रति माणशी ?

आनंदयात्री's picture

6 Oct 2017 - 10:25 pm | आनंदयात्री

मोदींना +७५,
कारण, ९०च्या दशकात शाळकरी वयात जसा रोजचा पेपर वाचायला सुरुवात केला तसे अमके हजार कोटी - तमके हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या आणि त्याचा वर्षानुवर्षे चालणारा तपास ही अगदी अपघातांच्या बातम्यांसारखी रोजची गोष्ट होती. यात झालेली लक्षणीय घट ही मोदी सरकारचं एक मुख्य यश आहे.

पैसा's picture

6 Oct 2017 - 10:28 pm | पैसा

मला बरेच पंतप्रधान आवडतात. अगदीच चंद्रशेखर देवेगौडा असले लोक आवडायचे काही कारण नाही म्हणा! पण आवड ही फार वैयक्तिक गोष्ट आहे नाही का! एखादा माणूस दुर्गुणी आहे हे माहीत असले तरी आवडतो त्यामुळे तसे कारण देऊ शकणार नाही. मोदी मला नक्कीच आवडतात, +१००? हरकत नाही. तसा राहुल गांधी जर भावी पंतप्रधान असेल तर त्याच्या करमणूक मूल्यामुळे तोही आवडतो! :P किती ते त्या त्या वेळच्या मूडवर अवलंबून! अर्णव गोस्वामीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये तोही +१०० आवडला होता. =))

विकास's picture

11 Oct 2017 - 9:07 pm | विकास

मला तर वाटतं, अर्णवच पंतप्रधान झाला तर कित्ती मज्जा येईल! :D

पगला गजोधर's picture

11 Oct 2017 - 11:37 pm | पगला गजोधर

विकास.... वेड्या....
अक्खा देश तुला देशभरात सगळीकडं हुडकतोया ....
अन तू फकस्त हिथ, मोदींच्या धाग्यावरच फकस्त, कसा सापडतुया लका....

विकास's picture

12 Oct 2017 - 12:21 am | विकास

मी विकास आहे, पगला नाही!

मार्मिक गोडसे's picture

12 Oct 2017 - 7:54 am | मार्मिक गोडसे

असं प्रत्येक पगला म्हणतो.

पगला गजोधर's picture

12 Oct 2017 - 9:15 am | पगला गजोधर

आजका हर 'पगला', पहले कभी 'विकास' हुआ करता था |
गुमशुदा रहाता है आजकल वो मगर,
कभी उसके चाहने वालोकीं आँखोका, 'प्रकाश' हुआ करता था ||

पगला गजोधर's picture

12 Oct 2017 - 9:22 am | पगला गजोधर

आजका हर 'पगला', पहले कभी 'विकास' हुआ करता था |
गुमशुदा है आजकल, भक्तीकीं अंधियारी गालियोमें वो मगर,
कभी उसके चाहने वालोकीं आँखोका, 'प्रकाश' हुआ करता था ||

पिवळा डांबिस's picture

6 Oct 2017 - 10:45 pm | पिवळा डांबिस

माणूस वैयक्तिक भ्रष्टाचारमुक्त वाटतोय,
भरपूर श्रम करतांना दिसतोय,
जुन्या सरकारचे चांगले प्रयत्न उगाचच जुन्या सरकारचे म्हणून मोडीत (नो पन इंटेंडॅड!) काढत नाहिये.
बाकी आता यापुढे चढणीवर वा उतरणीवर जाईल हे त्याच्या यापुढील कर्मावर अवलंबून!!

विकास's picture

11 Oct 2017 - 9:06 pm | विकास

पहील्या ३ ओळींमधे सगळे बरे लिहून शेवटी फक्त २५ मार्कच? बरे झाले तुम्ही माझे मास्तर नव्हता! :)

सुचिता१'s picture

6 Oct 2017 - 10:54 pm | सुचिता१

नोटबंदी पूर्वी +१०० होते. पण एव ढ्या धाडसी निर्णया ची अंमलबजावणी जमली नाही , म्हणून
+७५

कोण's picture

6 Oct 2017 - 11:32 pm | कोण

मोदि +७५

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

6 Oct 2017 - 11:33 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

मोदींईतकी टिका कोणाच्याच वाट्याला आली नसेल. पण जराही विचलीत न होता हा माणुस प्रचंड कष्ट उपसतोय. +१००

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2017 - 12:17 am | श्रीगुरुजी

नेहरू = -१०० (यापेक्षा कमी आकडा द्यायला परवानगी असेल तर त्यातील सर्वात कमी आकडा देईन. खरं तर मायनस इन्फिनिटी द्यायची इच्छा आहे).
शास्त्री = +५०
इंदिरा गांधी = +२५
देसाई = ०
राजीव गांधी = -५०
वि. प्र. सिंह = -५०
चंद्रशेखर = ०
नरसिंहराव = +२५
देवेगौडा = -२५
गुजराल = -२५
वाजपेयी = +५०
म. म. सिंह = -९९
मोदी = आतापर्यंत +७५
गुलझारीलाल नंदा २ वेळा पंतप्रधान होते. परंतु ते अत्यंत अल्पकाल व हंगामी पंतप्रधान असल्याने गुण दिलेले नाहीत.

सर्वाधिक वाईट नेहरू आणि म. म. सिंह. या दोघांच्या वाईट कामगिरीत फारसा फरक नाही.

सर्वात चांगले मोदी, वाजपेयी, शास्त्री, इंदिरा गांधी व नरसिंहराव.

गामा पैलवान's picture

7 Oct 2017 - 2:16 am | गामा पैलवान

माझेही हेच गुण. फक्त काही फरक असे :

मनमोहन सिंग = -१०० कारण टेररिस्ट फायनान्सिंग
मोरारजी देसाई आणि गुजराल = -१०० कारण दोघांनी भारतीय गुप्तचर खात्यांची वाट लावली

-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2017 - 8:31 am | श्रीगुरुजी

चरणसिंह राहिले. त्यांना अर्थातच ० गुण.

गौतमीपुत्र सातकर्णि's picture

7 Oct 2017 - 9:26 am | गौतमीपुत्र सातकर्णि

1) जवाहर लाल नेहरू : -30
2) गुलझारीलाल नंदा : 00
3) लाल बहादुर शास्त्री : 20
4) इंदिरा गांधी : 80
5) मोरारजी देसाई : -20
6) चरण सिंह : 00
7) राजीव गांधी : -50
8) वी. पी. सिंह : -20
9) चंद्र शेखर : -20
10) पी. वी. नरसिम्हा राव : 60
11) अटल बिहारी वाजपेयी : 60
12) एच. डी. देवेगौडा : -100
13) इंदर कुमार गुजराल : - 100
14) मनमोहन सिंह : -40
15) नरेंद्र मोदी : 40*

चौकटराजा's picture

7 Oct 2017 - 9:28 am | चौकटराजा

माझा या प्रश्नाला पास आहे कारण खरोखरच " प्रधानमंत्री" पद शक्तीमान पद आहे की नाही याविषयी मला शंका आहे. समजा एखादा माणूस पंतप्रधान पदी अगदी अचाट असे व्यवस्थापन कौशल्यवाला असेल , प्रामाणिक असेल तर भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असली तरी सर्वात " भंपक" लोकशाही आहे हे ही तितकेच खरे. सबब आपले पुरे कसब दाखवायला त्याला भारतीय जनता वावच देणार नाही इतका प्रचंड अन्तर्विरोध भारत देशात आहे. इथे शेतीमालाचे भाव उतरले तर ते एक संकट मानणारे लोकही आहेत. माझ्या मते भारताची सर्वांगीण प्रगति " शहाणी" हुकुमशाही आली तरच शक्य आहे व " शहाणी हुकुमशाही " ही संज्ञाच मुळी वाद निर्माण करणारी आहे.

वरील प्रतिसाद नक्कीच एक मत म्हणून ग्राह्य आहे. पण लेखात म्हटलं आहे तसं उत्तर फक्त -१०० ते १०० इथेच असायला हवं. म्हणून लेखातील प्रकट उद्देशाच्या दृश्टीने अग्राह्य मानण्यात येत आहे.

अभिजीत अवलिया's picture

7 Oct 2017 - 9:39 am | अभिजीत अवलिया

गुण देणार्यांनी कोणत्या मुद्द्याच्या आधारावर गुण दिलेत हे जरा लिहिले तर बरे होईल. म्हणजे अमक्या तमक्या पंतप्रधानाने ही कामे चांगली केलीत म्हणून त्याला इतके जास्त गुण, ही कामे वाईट केली म्हणून कमी गुण वगैरे. म्हणजे निदान प्रत्येक पंतप्रधानाने नक्की काय काय चांगले वाईट केले हे तरी सगळ्यांसमोर येईल.

एमी's picture

7 Oct 2017 - 10:28 am | एमी

+१

चौकटराजा's picture

7 Oct 2017 - 10:47 am | चौकटराजा

हे काम श्री गुरुजी च करू शकतीलसे वाटतेय !

अभिजीत अवलिया's picture

7 Oct 2017 - 12:29 pm | अभिजीत अवलिया

श्रीगुरुजींनी व्यवस्थित विश्लेषण करून मार्क दिले तरी ते त्यांचे वैयक्तिक मत राहील. त्यामुळे प्रत्येकाने विश्लेषण करून मार्क दिले तर बरे होईल. नाहीतर अंदाजपंचे काहीतरी आकडा टाकून द्यायला काय जातंय. अर्थात ही माझी फक्त अपेक्षा आहे.

तिमा's picture

7 Oct 2017 - 10:48 am | तिमा

मार्कस देण्याबद्दल पास. कारण,
या देशांत खरे सत्य कधीच समजत नाही. मिडियावर जे दाखवले जाते, त्यावरुन मत ठरवणे मूर्खपणाचे ठरेल.
आजवर झालेल्या आणि सध्याच्या पंतप्रधानांना त्यांचे अनेक निर्णय कोणत्या परिस्थितीत घ्यावे लागले, ते सामान्य नागरिकांना माहित असणे शक्य नसते.
आजपर्यंतच्या सर्वाच पंतप्रधानांनी देशहित डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले असणार. ते निर्णय बरोबर होते का चुकीचे ठरले, हे काळच सांगू शकेल. पण त्यांचा हेतू चांगलाच असणार.
इतक्या अवाढव्य देशांत, सर्व प्रवृत्तीची माणसे रहातात. त्यामुळे काहींना वाटणारे अच्छे दिन, बाकी अनेकांसाठी बुरे दिन असणार.
जनतेला एकदा 'चकटफु' ची संवय लावली की त्याच गोष्टींसाठी पैसे मोजावे लागले की दु:ख्ख होते. आता ही संवय लावणारे वाईट की ती संवय मोडायचा प्रयत्न करणारे वाईट, याबद्दल मतभिन्नता असणार.
भ्रष्टाचाराने देश अंतर्बाह्य पोखरलेला असताना, तो सुधारायला अनेक वर्षे लागतील. पण तेवढा संयम अगदी विचारवंतांमधेही नसतो तर सामान्य जनतेत कसा असणार ?

arunjoshi123's picture

7 Oct 2017 - 12:36 pm | arunjoshi123

प्रिय तिमाजी,
तत्त्वज्ञानाच्या दृश्टीने सत्य कशास म्हणावं यावर चिकार गहमागहमी झालेली आहे.
विज्ञानाच्या दृष्टिने देखिल सत्याचं नक्की स्वरुप काय याच्या बद्दल बरीच वादावादी दिसते.
वास्तविक जीवनात देखिल सत्याचा कटू आग्रह नसायला हवा.
प्राप्त परिस्थितीत आपलं एक मत असतं.
ते हवं आहे.
======================================
तसंच @ चौकटराजा, जे हवं ते नसलं तरी जे आहे ते कसं आहे त्याबद्दल एक मत असतंच.

मराठी_माणूस's picture

7 Oct 2017 - 12:51 pm | मराठी_माणूस

आजपर्यंतच्या सर्वाच पंतप्रधानांनी देशहित डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले असणार. ते निर्णय बरोबर होते का चुकीचे ठरले, हे काळच सांगू शकेल. पण त्यांचा हेतू चांगलाच असणार.

"आणीबाणी" चा हेतु सुध्दा ?

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2017 - 1:02 pm | श्रीगुरुजी

आजपर्यंतच्या सर्वाच पंतप्रधानांनी देशहित डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले असणार.

असहमत

पाचच्या पटीत सोडून आकडे दिसत नाहीत. हा हा हा

नितिन थत्ते's picture

7 Oct 2017 - 1:13 pm | नितिन थत्ते

मुळात मोदी हे गोरक्षक टाइप हिंसाचाराला आळा न घालण्याच्या अपेक्षेवर पंतप्रधान झाले आहेत. त्याचसाठी आम्ही त्यांचा द्वेष करतो. त्यामुळे इथेच -१०० होतात.
त्यांचीआर्थिक धोरणे आणि परफॉर्मन्स खरे तर इर्रिलेव्हंट आहेत. (तो ही वाईटच आहे).

नितिनजी, आपण मत व्यक्त करू शकावं इतपत आजपावेतो बीजगणिताचा विकास होऊ शकलेला नाही हे आमच्यासारख्या सर्व्हेकर्त्यांचं दुर्भाग्य. पण तरिही जे काही लुळं पांगळं विज्ञान उपलब्ध आहे, त्याचा आपण उपयोग करून काहितरि मत नोंदवलं यासाठी आभार. पण आमच्या मागच्या अनुभवावरून या अपेक्षा तुमच्या नाहीत तेव्हा तुमचे मार्क्स किती ते सागा.
==============================
आळा न घालण्याच्या अपेक्षा असणारांची एक लिस्ट मिळेल काय? यांचा फार वारंवार उल्लेख आपण करता. आपण एका मिनी गांधीस्तानात राहत असाल तर निवासस्थान बदलावे अशी विनंती. (गांधिजींना गाईंचा फार पुळका होता, मंजे इतका कि बाबाने आयुष्यात एकदाच हिंसेचे समर्थन केले ते गोरक्षेसाठी! आता अहिंसेच्या पुजार्‍याची ही हालत तर बाकी भारत किती मागास असावा!!!).
========================================
या अपेक्षा मोदिंसोबत कुठे कशा अ‍ॅग्री झाल्या होत्या ते कळेल का? तुमचे मायक्रोफोन कुठे कुठे पेरलेत? ते रेकॉर्डिंग्ज मिडियाला द्यायला हवे.
================================================
हे अशा अपेक्षा असलेले लोक इतकी वर्षे मन मारून का जगत होते म्हणे? गोरक्षा करायला वा तिच्या नावे धिंगाणा करायला स्वतःचे सरकारच लागते का? अहो, दिल्लित पाकिस्तानचे सरकार नसताना देखिल लोक काश्मिरात धिंगाणा घालतात. १९४७ ते २०१४ मधे किती गोररक्षक कोंडवाडे पुरोगामी सरकारने ठेवलेले? किंवा गोरक्षा नावाचं भारताच्या संस्कृतीशी काही संबंध नसलेलं मूल्य अचानक भूतकाळात कधीच महत्त्वाचं नव्हतं तर तुमच्या लाडक्या काँग्रेसची सत्ता असताना ते वर्धित कसं झालं? लाडक्या काँग्रेसने हिंसाचाराची मानसिकता, जी मागे कधी नव्हती, ती कशी काय स्फोटक स्थितीला आणली?
गाईच्या नावाने धिंगाणा करणारी लोक मंजे काय पावसाळी बेडकं आहेत का जी फक्त २०१४ च्या पावसातच पडली? इतकी लाडिक काँग्रेस असताना, ती हारली तर अजून १५०० पक्ष असताना हे हिंसाचारी कसे काय आपले लोक पंतप्रधानपदी बसवू शकतात? करत काय होतात तुम्ही?
=================
आणि त्यांचा भ्रमनिरास झाला आहे म्हणजे काय? मोदींना हिंसा जमली नाही? का धमक नाही? नियोजन नाही हिंसेचं? का ती फसवणूक होती हिंसावाद्यांची सत्तेसाठी? नक्की काय? समजा जरी मोदिंना हिंसा जमत नाही वा त्यांनी फसवलं हिंसावाद्यांना यापैकी काहीही सत्य असलं तरी हिंसावाद्यांची संख्या अतिप्रचंड आहे हे आपण मानताय. देशात पंतप्रधान, राष्ट्रपती, १०-१५ मुख्यमंत्री जमवण्याईतकी!!! मोदिंनी त्यांना २०१४ मधे फसवलं वा अपेक्षापूर्ती केली नाही मंजे मोदी असं नेहमीच करू शकतील असं नाही. म्हणजे देशाच्या भविष्यात ते ज्याला +१०० मार्क देणार आहेत असा पुढचा हिंसाचारी बाबा वाढून ठेवला आहे पुढच्या १-२ निवडणूकींत!
========================================
पुरोगाम्यांकडून तार्किकतेची अपेक्षा केली तर आपल्या म्हणण्याचे असे निश्कर्ष निघत जातात. आपलं असंच म्हण्णं आहे नं?

नितिन थत्ते's picture

7 Oct 2017 - 6:00 pm | नितिन थत्ते

>>आळा न घालण्याच्या अपेक्षा असणारांची एक लिस्ट मिळेल काय?

माझे फेसबुकवर ५०० + फ्रेंड आहेत. त्यापैकी ७० टक्क्यांहून अधिक फ्रेंड्स [जे आंतरजालावर माझे मित्र झाले आहेत ते सोडून - नातेवाईक व कलीग्ज] हे अशी अपेक्षा ठेवणारे आहेत असे मी म्हणू शकतो. यात नातेवाईक महिलांचाही अपवाद नाही. माझ्या नातेवाईकांपैकी ९० टक्के + इतके लोक नथुराम भक्त असतील.

>>या अपेक्षा मोदिंसोबत कुठे कशा अ‍ॅग्री झाल्या होत्या ते कळेल का?
हा हा हा. अपेक्षा अशा अ‍ॅग्री होत असतात का? एक ट्रेंड पहा १९८४ पासून भाजपाला मिळणार्‍या सिटांचा.
१९८४- गांधीवादी समाजवाद- २ सिटा (हिंदुत्ववाद बाजूस ठेवलेला असताना)
१९८९ ते १९९९- बाबरी मशीद आंदोलन, रथयात्रा, बाबरी पतन, दंगली- सिटा सातत्याने वाढून भाजपचे सरकार स्थापन झाले. (मुस्लिमविषयक
२००४- (मुस्लिमविषयक) अपेक्षा पूर्ण होत नसल्याने पराभव. मधल्या काळात २००२ गुजरात घडले. भाजपचा केंद्रात पराभव झाला तरी गुजरातमध्ये भक्कम स्थिती झाली.
२००९- अडवाणी जिनांना सेक्युलर वगैरे म्हणू लागले म्हणजे पुरताच भ्रमनिरास. २००९ च्या निवडणुकीत पुन्हा पराभव
२०१४- मोदींचा भावी पंतप्रधान म्हणून उदय. २००२ मध्ये अपेक्षा पूर्ण केलेल्या असल्याने देशपातळीवर अपेक्षा ठेवणार्‍यांकडून (उत्तरेतील आणि पश्चिमेतील राज्यांत) भरभरून मते. शत-प्रतिशत भाजप. ५६ इंची छातीचा महिमा पाकिस्तान परिप्रेक्ष्यात असण्यापेक्षा देशांतर्गत परिप्रेक्ष्यात जास्त.

>>आणि त्यांचा भ्रमनिरास झाला आहे म्हणजे काय? मोदींना हिंसा जमली नाही?
मोदींनी या बाबतीत अपेक्षा ठेवणार्‍यांचा भ्रमनिरास केला असं मी कधी म्हणालो?

>>गोरक्षा नावाचं भारताच्या संस्कृतीशी काही संबंध नसलेलं मूल्य अचानक भूतकाळात कधीच महत्त्वाचं नव्हतं
आता गोरक्षकांकडून जे उपदव्याप सुरू आहेत ते "गायींच्या रक्षणासाठी" आहेत असा तुमचा समज आहे की काय? धन्य आहे !!

त्यांचीआर्थिक धोरणे आणि परफॉर्मन्स खरे तर इर्रिलेव्हंट आहेत.

गांधी न्हेरू घराण्याची हुजरेगिरी तुमच्यासाठी रिलेव्हन्ट असेल तर तुमचे म्हणणे (नेहमीप्रमाणे) बरोबरच असेल.

विरोध आणि द्वेष मध्ये फरक असतो, तुमच्याकडून अपेक्षा नाही पण हा मुद्दा शिकून घ्या. काँग्रेसच्या फायद्यासाठी तरी वापरता येईल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 Oct 2017 - 1:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

नेहरू- १००
इंदिरा- ४०
शास्त्री ८०
राजीव- ३५
नरसिंहराव- ६५
गौडा,गुजराल्,चंद्रशेखर- २०
वाजपेयी- ७०
मनमोहन- ४५
मोदी-(सध्याच्या अनुभवानुसार) ६५

हे हायफन आहे, ॠण चिन्ह नाही , असं मानायचं का?

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2017 - 2:02 pm | श्रीगुरुजी

कायप्पावरून -

_______________________________________

अभक्त - अबब!! कोण आहात तुम्ही?

मोदी - नरेंद्र दामोदरदास मोदी

अभक्त - अशक्य आहे, मोदी पंतप्रधान आवास सोडून इथे कशाला येतील...भ भ भूत तर नाही ना?

मोदी - मित्रा, मी हल्ली इथेच असतो...

अभक्त - ई ई इथे म्हणजे कुठे...?

मोदी - इथे म्हणजे तुझ्या डोक्यात...!

अभक्त - नाही नाही हे कसं शक्य आहे, माझ्या डोक्यात केमिकल लोचा नाही, मी वेडा नाही, मी वेडा नाही...

मोदी - तू वेडा मुळीच नाही, पण तुझ्या मनन, चिंतन, लेखन, वदन यात सतत मीच असतो, त्यामुळे मी तुला सर्वत्र दिसतो...

अभक्त - अरे देवा, मग यावर उपाय काय...?

मोदी - फार सोपा उपाय आहे, तू तुझा अमूल्य वेळ, तुझी सारी क्रयशक्ती माझ्यावर खर्च करतो आहे... माझं राजकारणात काय बरं वाईट व्हायचं ते होऊ दे, पण तू पहिले स्वतःचा विचार कर...
माझा विकास गांडो असेल किंवा नसेल, ते लोक ठरवतील, पण तू तुझी प्रगती कशी होईल याचा विचार कर...

मी किती वाईट आहे हे सांगत असताना तू लोकांपुढे सक्षम पर्याय उभा कर. दुसरा कसा चांगला आहे, हे लोकांना पटवून दे. माझे समर्थक तर माझा प्रचार करतातच, पण तुझ्यासारखे विरोधकही अप्रत्यक्षपणे माझाच प्रचार करतात...

अभक्त - मी कुठे तुमचा प्रचार करतो, मी तर तुमच्यावर प्रचंड टीका करतो...

मोदी - कुणी माझी प्रशंसा करो वा निंदा, पण सर्व प्रसार माध्यमांमधील चर्चा, फेसबुक पोस्ट्स, कमेंट ट्रोल्स, ब्लॉग्ज, वर्तमानपत्र यात केंद्रबिंदू कोण असत...?

अभक्त - मोदी...म्हणजे तुम्ही!!

मोदी - मित्रा, राजकारणात एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी म्हटल्या जाते. मला सोनियाबाईंनी "मौत का सौदागर" म्हटले होते, त्याचा फायदा कुणाला झाला...?

अभक्त - मोदींना, म्हणजे तुम्हाला...!

मोदी - तू दिवसभर किती पोस्ट टाकतोस...?

अभक्त - दहा ते बारा...!

मोदी - कुणाबद्दल टाकतोस...?

अभक्त - तुमच्याच विरोधात...!

मोदी - तुझ्या आवडत्या नेत्याच्या समर्थनार्थ किती पोस्ट्स टाकतोस...?

अभक्त - एकही नाही...!

मोदी - मग ज्या वर्गात माझ्याखेरीज अन्य कुणी विद्यार्थीच नाही, तिथे मी पास झालो अथवा फेल झालो, काय फरक पडतो...?

अभक्त - काहीच नाही...!

मोदी - मग माझ्या समर्थकांपेक्षा मला अधिक फायदा कुणाचा होतो...?

अभक्त - विरोधकांचा म्हणजे आमचा...!

मोदी - मग अशाने दिवसेंदिवस अधिक बलशाली कोण होत जाईल...?

अभक्त - तुम्हीच...!

मोदी - मग लोक गांडो कुणाला म्हणतील...?

अभक्त - आम्हाला आय मीन तुमच्या विरोधकांना...!

मोदी - मग मनोरुग्ण किंवा नमोरुग्ण होऊन माझा द्वेष करण्यापेक्षा माझे राजकीय विरोधक होणे योग्य नाही का...?

अभक्त - पण मला उठता, बसता, खाता-पिता, दिवसरात्र तुम्हीच दिसता, यावर उपाय काय...?

मोदी - स्वतःमधील नकारात्मकता सोडून सकारात्मक विचार करणे. मोदी किती वाईट आहे, हे सांगण्यात सर्व ऊर्जा दवडण्यापेक्षा मी कसा चांगला आहे किंवा होऊ शकेल याचे चिंतन करणे...

अभक्त - धन्यवाद मोदीजी, तुम्ही माझे डोळे उघडले. आता मी तुमचीच भक्ती करणार...!

मोदी - हा हा हा गेट वेल सून मामू!! तुला तसे करायची गरजच नाही, फक्त स्वतःवर, स्वतःच्या पक्ष्यावर, स्वतःच्या नेत्यावर विश्वास ठेव...

अभक्त - हो हो पण तुम्ही मला दिसता हे गुपित कुणाला सांगू नका हं प्लिज!!
हॅलो...मोदीजी...हॅलो...कुठे गायब झालात...??

*(मी तुझ्या डोक्यातच आहे मित्रा, हा हा हा!!)*

राजीव : +२५ (जरी सहानभुतीने सत्ता मिळाली,तरी ंकाँम्प्युटर युगालां चलाना दिली.
इंदिरा : +५० सुवर्णमंदिरात कारवाईचा योग्य धाडसी निर्णय, सिक्कीम ला मुख्य प्रवाहात आणले.
शास्ञी: +६० जय जवान जय किसान
वाजपेयी : + ७०
मोदी : + ७५
नेहरू : + ३०
मनमोहनसिंग : + २० ( पंतप्रधान म्हणून )
: +८० ( अर्थमंञी म्हणून )
व़्हि पी सिंग : उणे ५०

नेहरूंबद्दल लोकांच्या मतांत वाईल्ड डिफरंस आहे. सर्वसाधारणपणे मिसळपाव वाचकांत मोदींची छवी चांगलीच आहे असं वाटतं.

नाखु's picture

7 Oct 2017 - 4:49 pm | नाखु

+७५
राजकीय जीवन पणाला लावून काही धाडसी निर्णय घेतले आहेत
बरेचदा सहकार्याची मतं, अपेक्षा पहात नाहीत म्हणून काही गुण कमी
मनमोहन
पहिला डाव +५०
सुधारणा राबवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न
दुसरा डाव -१२५
पहिल्या डावात कमावले त्याच्या चौपट घालवून टाकलं
अधेर नगरी चौपट राजा
नरसिंहराव​ +१००
मोह माया ममता संभाळून शकट हाकला
स्वतः ते अस्तित्व दाखवून दिले परिणिती मरणोपरांत अवहेलना नशीबी
नेहरू -५०
गांधी भांडवल चालवून काश्मीर विचका,
राजीव +४५
उदारीकरणाच्या धोरणामुळे विकासाने वेग घेतला
चांडाळ चौकडी दूर ठेवू शकले नाहीत
लालबहादूर+८०
अल्पजीवी कारकीर्द, तरीही परिणामकारक कदाचित अजुन ५-१० वर्ष जगले असते तर कॉंग्रेस गांधी नेहरू मुक्त झाली असती
गुजराल+चरणसिंग+देवेगौडा अपघाती पंतप्रधान गुण नाहीत
मोरारजी -५०
प्रांतीय पक्षपाती वागणूक पंतप्रधान असताना त्यांनी वारंवार दिली
अटलबिहारी वाजपेयी+१००
अगदी उशीराने संधी मिळाली तरी अगोदर केलेल्या कामांचे अनुभव पंतप्रधान असताना पुरेपूर उपयोग करून घेतला

मोदी भक्त असा शिक्का बसलेला
वाचकांचीच पत्रेवाला नाखु पांढरपेशा

मोदींना निवडून दिलं तेव्हा काही वाहिलेल्या विरोधकांची ते कसे निघतील याबद्दल अशी अपेक्षा होती:
१. हा एकदम रावडी सांड निघेल. मॅनरलेस. घाण भाषा बोलणारा. उद्धट. भारताचा अपमान. पदाचा अपमान. घटनेची अजिबात इज्जत नसणारा.
२. हा टोटल फ्रॉड निघेल. उघड.
३. हा आणिबाणी लावेल. काहीही कायद्दे करेल. विरोधकांना जेलात टाकेल.
४. स्पष्ट मुस्लिम विरोधी बोलेल. त्यांना मरू देईल. लोकांना त्यांना मारू देईल. दंगली माजवेल. प्रशासन मुसलमान मारायला (२००२ प्रमाणे हो) मदत करेल.
५. भारत हिंदू देश घोषित करेल.
६. अर्थव्यवस्थेची वाट लावेल.
७. प्रशासन, पोलिस, सेना वाहवत जातील. व्यवस्थात्मक अनागोंदी माजेल.
८. संपूर्ण एकाधिकारशाही असेल. (यशवंत, शत्रुघ्न, जोशी, आडवाणी, बंगारू, इ कोणी नसेल)
९. गांधीजींना व्हिलेन नि गोडसेंना हिरो म्हणेल.
१०. मुसलमानांचे घटनात्मक अधिकार खाडकन काढून घेईल. संपत्तीचे अधिकार पण काढून घेतले जातील.
११. जर्मनीप्रमाणे जाहिर काँसेंट्रेशन कँप्स निघतील.
१२. मुसलमानांना पाकिस्तानात ढकलले (दुसरं क्रियापद सुचत नाहिये) जाईल.
१३. भारतात लोकशाही नष्ट होइल.
१४. भारतीय सेक्यूलरिझम नश्ट होइल.
१५. भारतात मध्ययुगीन नंगानाच चालू होइल.
१६. अगदी घाणेरड्या हिंदू परपरांना, प्रथांना जिवंत केले जाईल.
१७. हिंदू धर्मांला सरकारी करातून पैसे मिळतिल.
१८. पाकिस्तानवर अणूबाँब टाकले जातील आणि ते आपल्यावर टाकतील तेव्हा किमान २५-३० कोटी लोक मरतील. संपत्तीचं नुकसान वायलं.
१९. अखंड भारत करायचा म्हणून प्रत्येक शेजार्‍यावर हल्ला करतील.
२०. स्वकिय उद्योग नको तितके सुरक्षिले जातील.
२१. शिक्षणात फक्त पुराणे शिकवतील आणि प्रयोगशाळेत सत्यनारायण

हे मुद्दे मी बरीच वर्षे एकतोय आणि अजूनही सोशल मिडियावर दिसतात.
==================================================================
(नितिनजींसारख्या) विरोधकांच्या डोक्यात मोदींची, संघाची हीच प्रतिमा आहे. पण वास्तवात मोदींनी पहिल्यांदा भूअधिग्रहण कायद्यात चक्क संसदेसमोर गुडघे टेकले. नंतर न्यायिक सुधार कायदा (चांगला पास झालेला) जेव्हा कोर्टानं रद्द केला तेव्हा कोर्टासमोर गुडघे टेकले. मग मात्र २१ कलमी विरोधकांना कळेना कि या माणसाचा, पक्षाचा वा विचारसरणीचा पूर्वीच्यासारखा अपमान कसा करावा. पदं संपली, अवार्डं संपली, मुद्दे संपले, त्यांची स्वतःची प्रतिष्ठा संपत आली, आपल्या कटुतेचा फायदा कोणाला होतोय याचा गोंधळ उडाला, सत्ता संपू लागली, आपल्याला अजिबात अकलेचा गंध नसलेल्या क्षेत्रांत काहीच्या बाही विरोधी मतं प्रकटून झाली तरी मोदी नावाचं प्रकरण स्नोबॉलच होतंय. मोदी नावाचं प्रकरण फेकू, खोटारडं असल्याची आत्मिक ग्वाही असताना देखिल ज्यांना ज्यांना ते सांगायला जाऊ ते आपल्यालाच खोटारडा मानू लागले अशी गोची झाली. छिद्रान्वेष चालू झाला. चिडचिड वाढली.
=================================================================================
मोदी हा काही बिळातून बाहेर आलेला विषारी साप नाही. उगाच इतका कल्ला करायला. ही इज जस्ट अनादर पिएम ऑफ इंडिया. अजून एक पंतप्रधान. कोणाला थोडा बरा वाटेल कोणाला थोडा वाईट. पण इतकं बाऊ करण्याइतकं काय? पदास किति लायक आहे नाही, देशाचं किती मोठं सुदैव वा दुर्दैव आहे हे १९-२० असेल. पण असं अव्वाच्या सव्वा अपेक्षा ठेवणं किंवा दुसर्‍या बाजूला ती जातच घातक मानणं अनुचित आहे. आपल्या इतक्या खासदारांना, आमदारांना, लोकांना आवडले आहेत आणि अनेक विरोधकांना पण ५ वर्षे मान्य आहेत तेव्हा आपली देखिल कटुता सिमित असावी.
===========================================================================================
वर अनेक लोकांनी नेहरूंना -१०० मार्क दिले आहेत. अतिद्वेषाबद्दलचा हा सल्ला त्यांना देखिल लागू पडतो. कंपनीचे चेअरमन "चीप, मीन" असू शकतात, पण त्यांच्यात काहीही चांगलं नाही असं कसं? नेहरूंमधे सत्ताहव्यास एकिकडे आणि देशाचे हित काँप्रो करणारा भाबडेपणा दुसरीकडे होता म्हटलं तरी त्यांनी केलेल्या कार्यांत बरिच चांगली पण असणार ना? तुम्हाला -१०० (सर्वस्वी दुर्गुणी?) मार्क्स द्यावेत असा वाटणारा मनुष्य १५ वर्षे निवडून कसा आला? लोक इतके मूर्ख होते? किंवा इतर शब्दांत माझे, तुमचे पणजोबा इतके मूर्ख होते? हा त्या काळातल्या त्यांना नेते मानणार्‍या सर्व खासदारांचा अपमान नाही का? नेहरूंना एकही मार्क न देण्यातलं अनौदार्य आणि मोदींना २१ कलमी दोष देणे यात गुणात्मक फरक आहे का? (नाही असं माझं मत आहे. नाहीच असा दावा तुमच्यासाठी नाही, आहे का असा प्रश्न आहे.). त्यांच्या विचारसरणी आपल्याला मान्य नसणं वेगळं, त्याच्या चुका दिसणं वेगळं मात्र त्यांची त्यांचि जी काही विचारसरणि आहे तिच्याशी देखिल त्यांची प्रामाणिकता नव्हती याची खात्री असणं विचित्र आहे.
पहा, एकूणात, मला देखिल नेहरू द्वेष (तसलं कैतरि) आहे, मात्र -१०० वैगेरे नाही हो.
================================================================
-१०० च्या मानाने +१०० बद्दल माझं चांगलं मत आहे, नेता कोणताही असो.

नितिन थत्ते's picture

7 Oct 2017 - 6:06 pm | नितिन थत्ते

क्र २, ३ ६ व ८ हे ऑलरेडी झाले आहे/होऊ घातले आहे. यातलं विरोधकांना तुरुंगात घालण्याचं काम सरकारतर्फे होत नाहीये तर त्यांच्या एजंट्सकडून होत आहे. परवाच प्रकाश राज या अभिनेत्याने मोदींवर टीका केली म्हणून त्याच्यावर लखनौ न्यायालयात खटला दाखल झाला आहे.

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2017 - 8:32 pm | श्रीगुरुजी

एखाद्याविरुद्ध न्यायालयात दाद मागणे हा घटनादत्त अधिकार आहे. परंतु मोदी विरोधकांविरूद्ध कोणी कायदेशीर मार्ग सुद्धा वापरू नये आणि तो वापरल्यास तुम्ही असहिष्णु अशी मोदी विरोधकांची धारणा दिसते. गौरी लंकेशला कायदा हातात न घेता कायदेशीर मार्गाने शिक्षा झाली. पण तरीही ती निर्दोष आणि तिच्याविरूद्ध कायद्याच्या मार्गाने जाणारे दोषी.

थोडक्यात म्हणजे आम्ही काहीही करू, पण आम्हाला विरोध करायचा नाही. आम्ही वाटेल ते आरोप करू, पण आमचे आरोप खोडण्याचा प्रयत्न करायचा नाही. आम्ही वाटेल त्या घाण शब्दात टीका करू, पण आमच्या बरळण्याविरूद्ध कायदेशीर मार्गाने दाद मागायची नाही. आम्ही जे करतो किंवा बरळतो त्याला विरोध न करता गप्प बसा. आमच्या टीकेला उत्तर दिले किंवा न्यायालयात गेलात तर आम्ही तुम्हाला असहिष्णु म्हणून पुरस्काराचा कागद परत करू (पुरस्काराची रक्कम अर्थातच परत देणार नाही).

नितिन थत्ते's picture

7 Oct 2017 - 6:55 pm | नितिन थत्ते

>>वर अनेक लोकांनी नेहरूंना -१०० मार्क दिले आहेत. अतिद्वेषाबद्दलचा हा सल्ला त्यांना देखिल लागू पडतो.

याबद्दल सहमत आहे. पण माणसाची काही तडजोड न करता येण्यासारखी मते असतात त्यामुळे माणूस -१०० पर्यंत जातो. नेहरूंबाबतही कदाचित तसेच आहे.

बघण्यासारखी रोचक गोष्ट म्हणजे नेहरूंनी स्वातंत्र्यानंतरच्या काळात खूप पायाभूत कामे केली. आणि त्यांची फळे आपण भोगतो आहोत. पण काश्मीर आणि चीन या दोन बाबतीत त्यांचे निर्णय चुकले असे लोक मानतात आणि त्यामुळे त्यांची सर्व चांगली कामे धुवून जातात.

उलट इंदिरा गांधी यांनी राजकारण म्हणून खूप वाईट कामे केली. लोकशाही खिळखिळी करणे, व्यक्तिकेंद्रित राजकारण, राजकारणाचे भणंगीकरण, आणीबाणी आणून विरोधाचा गळा घोटणे वगैरे. आणि बांगला देश निर्मितीचे एक काम चांगले केले. त्या एका गोष्टीने त्यांची सगळी पापे धुवून निघाली.

आज अनेक लोक नेहरूंपेक्षा इंदिरा गांधी चांगल्या पंतप्रधान असे मानतात.

खरे पाहिले तर चीन / काश्मीर आणि बांगलादेश यात जे काय चांगले वाईट झाले त्याने देशातल्या बहुतांश जनतेच्या आयुष्यात फार काही चांगले किंवा वाईट होणार नव्हते/झाले नाही.
-----------------------------------------------------
त्याचप्रमाणे मोदींनी सध्या जे आर्थिक क्षेत्रात चालवले आहे त्याचे दीर्घकालात खूप फायदे होतील असे म्हटले जाते. तसे झालेले दिसले तर आम्ही त्यांना ६० - ७० मार्क देऊ. (सब्जेक्ट टु हिंदुत्ववाद्यांचा हिंसाचार हाताबाहेर जाऊ न देण्यात त्यांनी यश मिळवले).
-----------------------------------------------------
राव पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे खूप आरोप झाले. राजीव गांधींच्या जवळच्यांनी बोफोर्स प्रकरणात पैसे घेतले असे आरोप झाले. पण राव यांच्यावर स्वतःच पैसे घेतल्याचे आरोप झाले. हर्षद मेहताने "मी राव यांना एक कोटी रुपये सूटकेसमधून दिले" असा आरोप केला . त्याचप्रमाणे लखुभाई पाठक या लोणचेसम्राटाने "मी कुठल्यातरी परमिट्साठी राव यांना पैसे दिले" असा आरोप केला. त्याचप्रमाणे झारखंड मुक्ती मोर्चाच्या शिबू सोरेन यांना लोकसभेत सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी पैसे दिले गेल्याचे प्रकरण गाजले आणि राव यांना आरोपी बनवण्यात आले. परंतु आज राव यांना लोक खूप मानतात असे दिसते. राव हे गांधी कुटुंबातले असते तर त्यांना हे भाग्य लाभण्याची शक्यता नव्हती.

मामाजी's picture

8 Oct 2017 - 8:06 am | मामाजी

थत्ते साहेब,

(सब्जेक्ट टु हिंदुत्ववाद्यांचा हिंसाचार हाताबाहेर जाऊ न देण्यात त्यांनी यश मिळवले).

मोदि सत्तेवर आल्यापासून हिंदुत्ववाद्यांनी केलेला हिंसाचार व हिंदुत्ववाद्यांवर झालेला हिंसाचार याची आकडेवारी आपण देउ शकाल काय?

सुबोध खरे's picture

11 Oct 2017 - 10:03 pm | सुबोध खरे

पाकिस्तानचे सैन्य शरणागत आले असताना आणि त्यांचे 93000 सैनिक युद्ध कैदी असताना आणि तशी लेखी कबुली दिली असताना काश्मीरचा प्रश्न कायमचा सोडवण्याची सुसंधी असताना ती वाया घालवली यातच बांगला युद्धाचे श्रेय फुकट गेले. बाकी राजकारण संपूर्ण स्वकेंद्रित केल्याबद्दल त्यांना -1000

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2017 - 8:38 pm | श्रीगुरुजी

वर अनेक लोकांनी नेहरूंना -१०० मार्क दिले आहेत. अतिद्वेषाबद्दलचा हा सल्ला त्यांना देखिल लागू पडतो.

खरं तर नेहरूंना उणे इन्फिनिटी गुण द्यायला पाहिजेत. भारतातील सांप्रत सर्व भीषण समस्यांंचे जनक नेहरू आहेत.

पिंट्याराव's picture

7 Oct 2017 - 6:13 pm | पिंट्याराव

स्वच्छ वैयक्तिक आणि राजकीय चारित्र्य, प्रचंड टीका होत असूनही न खचता, न थकता काम करणे आणि लोकांना न रुचणारे परंतु देशहिताचे निर्णय घेण्याचे धाडस दाखवणे यासाठी...

नकारात्मक - इतर पक्षाच्या भ्रष्ट लोकांना संधी देणे

अनुप ढेरे's picture

7 Oct 2017 - 6:18 pm | अनुप ढेरे

वाजपेयी + ५०, बेस्ट
बाकी सगळे त्यांच्याहुन कमी. वाजपेयींचे ग्राम सडक योजना, गोल्डन क्वाड्रिलॅटरल हे प्रकल्प २००३-०७मधल्या भारताच्या नेत्रदीपक प्रगतीची मह्त्वाची कारणं होती. पेंशन रिफॉर्म हे अजून एक अति महत्वाचा निर्णय. याचे फायदे अजून ३०-४० वर्षांनी दिसतील. आज जो एन्पीएचा प्रॉब्लेम आहे तसाच वाजपेयी सरकारच्या काळात देखील होता जो सिन्हा/जसवंतसिंग त्यांनी व्यवस्थित सोडवला. याखेरीच शेअर बाजारातदेखील चांगले बदल आणले होते. वाजपेयी सरकारचा २००४मधला पराभव हे फार वाईट ठरलं आहे. मोदी वाजपेयींच्या जवळपास देखील नाहीत.

मनमोहनसिंग -९०. वर्स्ट
वाजपेयी यांनी चांगली बनवलेली अर्थव्यवस्था युपीएने उडवली. आणि मग १०-१२% महागाईने जगायची वेळ आली. २०११ पासून. एवढे नावाजलेले अर्थतज्ञ पंतप्रधान असून. याखेरीच ९३वी घटनादुरुस्ती सारखी विषवल्ली पेरणारे हेच. IBचा राजकारणासाठी वापर करणे, मनमानीने राज्य सरकारे बरखास्तं करणे वगैरे प्रकार होतेच. आत्ता देखील ममो तुम्ही परत या सारखा कढ काढणारे दिसतात. १२% महागाईची झळ यांना बसली नसावी. आज ज्या एन्पीएच्या शिव्या मोदींना बसतायत ती कर्जे सर्व मनमोहनाने दिली होती. मल्ल्याला देखील. बर अजुन २जी, कोळसा, चॉपर, कॉमनवेल्थ घोटाळ्याचा विषय देखील नाही. ते प्रताप वेगळेच. एअर इंडिया, बिएसेनेल वगैरे वाजएयींच्या काळी फायद्यात असलेल्या कंपन्या अगदी व्यवस्थित दिवाळखोरीत नेल्या. नोटबंदीचे फायदे असोत नसोत. त्याला निर्लज्जपणे ओर्गनाइज्ड लूट म्हणणारे हेच. देशाला नागवे करणारे हे दुसर्‍यावर ऑर्गनाइज्ड लूटचे आरोप करतात? न्युक्लिअर डील ते एकच पॉझिटीव्ह. पण ते देखील न्युक्लिअर लायबिलिटी लॉने टूथलेस यांनीच केलं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Oct 2017 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक सर्वे !

या सर्वेत तुलनात्मक मतप्रदर्शन करताना उपयोगी पडेल अशी (एका लोकप्रिय कार्यक्रामाचा भाग असलेली) एक किंचित चित्रफीत (केवळ ३९ सेकंद) कर्मधर्मसंयोगाने आजच कायप्पावरून फिरत आली. काहींना कदाचित तिचा उपयोग होईल. या उपक्रमाला माझे दोन पैशांचे सहाय्य म्हणून ती इथे देत आहे. काहींना कदाचित तिचा उत्तरे देताना उपयोग होईल.

मराठी कथालेखक's picture

7 Oct 2017 - 10:25 pm | मराठी कथालेखक

राजीव गांधी -१००
नरसिंह राव ९०
अटलबिहारी वाजपेयी ८०
मनमोहन सिंग -३०
नरेंद्र मोदी -१०

सर टोबी's picture

7 Oct 2017 - 10:30 pm | सर टोबी

देश स्वतंत्र झाल्या नंतरची माझी दुसरी पिढी. शाळेत शिकताना जाणवायचे कि एखाद दुसरा थोर शास्त्रज्ञ फक्त भारताचा. बाकी सर्व परदेशातील. त्या काळी जे कोणी परदेशात जाऊ शकत ते त्या प्रदेशाची इतकी स्तुती करत कि असे वाटे कि स्वर्ग असला तर तो परदेशातच. भारतात सणासुदीच्या दिवसांमध्ये अन्नधान्य बाजारातून गायब होणे हि तर नित्याची बाब. दुष्काळ जणू काही पाचवीला पुजलेला. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, वीज या सगळ्यांची वानवा. माझ्या वडिलांना, शिक्षण पूर्ण झाल्यावर आमच्याकडे नोकरी करायची या अटीवर एका बँकेने कर्ज दिले होते.

त्या काळी कुठलीही कंपनी भांडवली बाजारात उतरली कि त्यांची एक कॅच लाईन ठरलेली असे: मागणी आणि पुरवठा या मध्ये असलेली प्रचंड तफावत, या मुळे उत्पादन विक्रीला कुठलाच अडसर नाही.

कल्पना करा, आज भक्त मोदींना कुठली गोष्ट जमली नाही तर साठ वर्षांच्या 'घाणीची' सबब सांगतात. नेहरूंना तर दीडशे वर्ष पुरता लुटलेला देश हातात मिळाला होता. देशाला स्वतःची घटना नाही, रोजगार पुरविणारे मोठे उद्योग नाही, पटकी, क्षय अशा रोगांचे थैमान असायचे (कारण पाण्याची उपलबध्दता नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य असायचे). तेथपासून सुरुवात करून त्या काळात भिलईचा पोलाद प्रकल्प, भाक्रा नांगलसारखे मोठे प्रकल्प, या प्रकल्पांच्या नियोजन आणि पूर्ततेसाठी पंचवार्षिक योजनांची चौकट अशा गोष्टींची निर्मिती केली.

इंदिरा गांधींनी याच पायावर अनेक सरकारी उद्योगांची निर्मिती केली. औषध निर्मितीमध्ये हिंदुस्थान एन्टीबीओटीक, हाफकिन इन्स्टिटयूट, इंजिनीरिंगमध्ये HMT, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन, दळणवळणासाठी VSNL, कॉम्प्युटरसाठी CMC. हि यादी फार मोठी आहे.

आज आपण सिंहावलोकन करताना फार गोष्टी सहज सोप्या होत्या असे गृहीत धरतो. जसे देशाचा दृष्टिकोन समाजवादी असायला हवा होता कि भांडवलशाही, देश चालवण्यासाठी सरकारने उद्योगांची निर्मिती का केली वगैरे. आज मोठी स्वप्न दाखवून काम करताना जेव्हा सध्याचे सरकार अडखळते तेव्हा खरे तर नेहेरुंचे मोठेपण जास्तच जाणवायला हवे.

गामा पैलवान's picture

8 Oct 2017 - 12:31 am | गामा पैलवान

सर टोबी,

तुमचं हे विधान रोचक आहे :

नेहरूंना तर दीडशे वर्ष पुरता लुटलेला देश हातात मिळाला होता.

नेहरूंनी मोठमोठाले प्रकल्प उभारले खरे, पण त्यांचा फायदा होण्यासाठी जी प्रशासकीय यंत्रणा हवी होती ती उभारण्यासाठी अक्षरश: काहीच प्रयत्न केले नाहीत. काळाबाजारवाल्यांना फासावर द्यायला पाहिजेत म्हणून गर्जना करणाऱ्या नेहरूंच्या कारकिर्दीत प्रत्यक्षात एकही काळाबाजारवाला फासावर गेला नव्हता. विकासाची फळं जनतेला एकतर मिळाली नाहीत किंवा निवडक लोकांच्या घशात गेली. लायसन्स राज खास नेहरूंची देणगी. जर प्रशासकीय सहाय्य मिळालं असतं तर भारत कधीच विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसला असता.

आ.न.,
-गा.पै.

आपलं बरंच म्हणणं ग्राह्य वाटतं.

आज आपण सिंहावलोकन करताना फार गोष्टी सहज सोप्या होत्या असे गृहीत धरतो.

मग व्यवस्था फेल गेलेल्या, फेल्यूअर स्टेट म्हणून मानल्या गेलेल्या, आपल्या शेजारच्याच, आपणच भंग केलेल्या किमान पाकिस्तानपेक्षा भारतीय जीवन विकासांक बरे असायला हवेत कि नै? म्हणजे श्रीलंका, भूतान, चीन, अफगाणिस्तान, म्यानमार, हे सगळे तर नेहरू मरताना भारताच्या पुढे होतेच पण पाकिस्तानपण होता. जसं पाकिस्तानच्या इतिहासात त्या भूमिचा गौरवशाली पूर्वेतिहास शिकवला जात नाही तसं आपण देखिल आपल्या शेजार्‍यांपेक्षा आपलं असलेलं मागासलेपण लपवून ठेवायचो. आजही तसा थोडासा प्रयत्न करतो. (उदा. चीन भारतापेक्षा जितके पट पुढे आहे तितके पट आपण त्याला मान देत नाही. स्वातंत्र्य नसलेल्या दबलेल्या लोकांचा देश असंच चित्र प्रामुख्यानं मांडतो.).
सिंहावलोकन करताना ३०० वर्षे ब्रिटिशांनी लुटलेला पाकिस्तान देखिल त्याच्या प्रथम शासकांनी कसा विकसित केला - (विकिपेडिया)

1950s and 1960s: Initial Decades[edit]
Between 27 October 1958 and 25 March 1969 under Ayub Khan Pakistan economic growth averaged 5.82% growth during his eleven years in office. Manufacturing growth in Pakistan during this time was 8.51%, far outpacing any other time in Pakistani history. It was the time when Pakistan first got an automobile industry, a cement industry and few other heavy manufacturing industries. However tax collection was low averaging less than 10% of GDP.[15] The Export Bonus Vouchers Scheme (1959) and tax incentives stimulated new industrial entrepreneurs and exporters. Bonus vouchers facilitated access to foreign exchange for imports of industrial machinery and raw materials.

Tax concessions were offered for investment in less-developed areas. These measures had important consequences in bringing industry to Punjab and gave rise to a new class of small industrialists.[16] Land reform, consolidation of holdings, and stern measures against hoarding were combined with rural credit programs and work programs, higher procurement prices, augmented allocations for agriculture, and, especially, improved seeds were introduced as part of the green revolution. However, academics have argued that while the HYV technology enabled a sharp acceleration in agricultural growth, it was accompanied by social polarization and increased inter personal and inter regional inequality.[17]

Mahbub ul Haq blamed the concentration of economic power to 22 families which were dominating the financial and economic life of the country controlling 66% of the industrial assets and 87% of the banking.[18] During the same period there were construction of several infrastructure projects (notably Tarbela Dam and Mangla Dam), including canals, dams and power stations, began Pakistan's space programme.

In 1959 the country began the construction of its new capital city.[19] A Greek firm of architects, Konstantinos Apostolos Doxiadis, designed the master plan of the city based on a grid plan which was triangular in shape with its apex towards the Margalla Hills.[20] The capital was not moved directly from Karachi to Islamabad; it was first shifted temporarily to Rawalpindi in the early sixties and then to Islamabad when the essential development work was completed in 1966.[21]

पाकिस्तानात जे काही केलं गेलं ते भारतापेक्षा उत्तम होतं. (आर्थिक, ई.)
नेहरूंच्या जागी कोण्याही सोम्या गोम्याला बसवलं असतं तरी हेच सिंहावलोकन झालं असतं.
वास्तविक, नेहरू एक जस्ट सोम्या गोम्या होते. पण आता इतकी हजार वर्षे पारतंत्र्य आणि गुलामीत राहिलेल्या लोकांच्या पहिल्या निवडीला सोम्या गोम्या म्हणायचं म्हणजे एक मोठा आत्मापमान होता. आपल्याच आनंदात विरजण. शिवाय पंतप्रधान कोण आहे यापेक्षा आपण स्वतंत्र आहोत, आपलाच कुणी आहे, कसा का असेना अशीच भावना जास्त होती. त्यात चिकित्सा, टिका इ बुद्धी नव्हती. लोकही अशिक्षित होते. माय मेली म्हणून ४०५ सिटा देणारांपेक्षा अशिक्षित होते!!!
==============================================
सर्वधर्मसमभाव, शांति, शेजार्‍यांशी सलोख्याचे संबंध, जमिनीची लालसा नसणे, युद्धखोर नसणे, समाजवाद, स्वातंत्र्य, समता, बंधुता, खेड्याकडे चला, समाधान, मर्यादित विकास, आपल्या अस्मितांना आपण कसे चार हात दूर ठेवतो, नोबेल लालसा, केंद्रिय प्लॅनिंग, इ इ तेव्हाची पुरोगाम्याची फॅडं होती. आणि नेहरू अर्थातच या सगळ्या फॅशनचे व्हिक्टिम होते. यातलं काहीही त्यांचं स्वतःचं, नवं नव्हतं. त्यांचेसारखे लोक जगभर हेच करत होते. जिथे अनागोंदी माजली तिथे असले भोळसट सोम्या गोम्या लष्करशहांनी गिळले. अन्यत्र लोकांनी हाकलले. भारतात मात्र नेहरू, गांधी खानदानातल्या समोर ठेऊन (जसं अगोदर ब्रिटिशांना ठेवलं होतं) देशाला लुटणार्‍या नेत्यांचं , बाबूंचं, उद्योजकांचं, गुंडांचं, शत्रूंचं, अधिकार्‍यांचं विस्तृत जाळं निर्माण झालं.
===================================================================
लांब सर्व करणं पण महान नव्हे. इथे राजघराण्याचे नसलेले जगातले नेते आहेत ज्यांनी खूप खूप लांब सत्ता केली.
https://en.wikipedia.org/wiki/List_of_longest-ruling_non-royal_national_...
यांच्यात नेहरूंचं नाव पण नाही. तेव्हाच्या लोकांना असले येडचोट सतत निवडून देणे , सत्तेत राहू देणे सामान्य वाटत असावे. आत्ता हा ट्रेंड बदलला आहे.
========================================================================================
नेहरूंच्या समकालीन जागतिक नेत्यांत आपल्या देशाचे हित करणारे वा उत्तुंग दिर्धकालीन हित साधणारे म्हणून नेहरू एक मेडीऑकर पंतप्रधान होते. तत्कालिन उपलब्ध काँग्रेसच्या आणि विरोधक नेत्यांतही नेहरू एक मेडिऑकर नेते होते. त्यांच्यानंतरच्या झालेल्या अनेक नेत्यांच्या तुलनेत देखिल ते मेडिऑकर आहेत. मंजे "व्यक्तिगत अवगुणांमुळे" देशाच्या केलेल्या नुकसानाचे गुण वजा करण्यापूर्वी १५-२० गुण द्यावे असे.
============================================================
जगात तीन क्रमांकाचे जास्त पाणी असलेल्या नदीवर धरण बांधणे, जगात दुसर्‍या क्रमांकावर जास्त असलेल्या खनिजाचा धातू काढणे हे सुचायला फार अक्कल लागत नाही. ते ही नेमकं त्यांच्याच डोक्यात सुचायची गरज नाही. (जशी नोटबंदी नेमकी नेमकी मोदींच्या दोक्यात सुचली याची जगाला का जाणो खात्री आहे!)

चौकटराजा's picture

9 Oct 2017 - 8:20 am | चौकटराजा

भारतीय लोकांचे एक अत्यंत आवडते वाक्य आहे ते असे " ही सुवर्ण भूमी होती इथे सोन्याचा धूर निघत होता.....! " इतके भंपक धादांत खोटारडे वाक्य मी आज तागायत ऐकले नाही. नेहरूं पुढे दीडशे वर्षे लूटून नेलेला भारत होता असे जर असेल तर इंग्रजानी भारतीय वास्तू लूटून नेल्या, तलावे नेले, की नदीचे घाट .. शेते नेली की गंगाकाठची सुपीक भूमी... ? भारतीय लोकानी मिळेवेलेली पेटंट्स की आणखी काही... ? दोन हजार वर्षात राजे लोकांनी स्वतः चे मोठमोठे महाल बांधण्याखेरीज काय केले याची जरा यादी इथे इतिहासाचे अभ्यासक देतील काय..? हजारो साल भारतीय लोक धर्म प्रेमी, देव प्रेमी रूढी प्रेमी , जातीभेद प्रेमी च राहिले, आळशी राहिले व गरीब राहिले.

चौरा साहेब,
भारतीय लोकांचे एक अत्यंत आवडते वाक्य आहे ते असे " ही सुवर्ण भूमी होती इथे सोन्याचा धूर निघत होता.....! " इतके भंपक धादांत खोटारडे वाक्य मी आज तागायत ऐकले नाही. . साधा सरळ प्रश्न की हजारो वर्षे आपल्या देशावर आक्रमणे कशासाठी केली गेली? कंगाल, भिकार्यां च्या घरी लूटपाट करायला कोणी जात नाही. थोडक्यात इथे असलेली संपत्ती लूटून नेण्यासाठी सुद्धा आक्रमकांना हजारों वर्षे लागली. जी व्यक्ति स्वत:च्या डोळ्यांवर पुरोगामी, विज्ञानवादी, नास्तिक इत्यादी झापडे लाऊन घेते ती व्यक्ति स्वत:ची सारसार विचार करण्याची क्षमता गमावून बसते याची मला खात्री पटली.
स्वामि विवेकानंदांनी सांगीतलेली ही एक गोष्ट. ऐका विहीरीत एक मोठा तगडा बेडूक रहात होता. जन्मापासून ते अत्तापर्यंतच सर्व आयुष्य त्याने त्या विहीरीतच घालवले होते. तो चांगला हट्टाकट्टा असल्यामूळे बाकि सर्व बेडके त्याच्या आज्ञेत रहात असत. ऐके दिवशी चुकून त्या विहीरीत समुद्रातला ऐक बेडूक येउन पडला. सर्व बेडके कुतूहलाने त्याच्याकडे पाहू लागली. राजा बेडकाने त्याला विचारले की तू कुठून आला आहेस. पाहुण्या बेडकाने सांगीतले की मी समुद्रातून आलो आहे. राजाने परत विचारले समुद्र म्हणजे काय? तेव्हा पाहुण्या बेडकाने सांगीतले की समुद्र म्हणजे खूप मोठा जलाशय असतो. ते ऐकून त्या राजा बेडकाने विहीरीच्या एका टोका पासून दुसर्या टोकापर्यंत लांबलचक उडी मारली आणि विचारले की या माझ्या विहीरी पेक्षा सुद्धा तूझा समुद्र मोठा आहे? त्यावर पाहुणा बेडूक हसून म्हणाला मित्रा तूझ्या या विहीरीची तुलना समुद्राशी कदापीही होऊ शकणार नाही. हे ऐकून त्या राजाला राग आला व तो बाकीच्या बेडकांना म्हणाला हा पाहुणा बेडूक खोटारडा आहे. आपल्या या विहीरीपेक्षा मोठा जलाशय असूच शकत नाही. याला ताबडतोब हाकलून द्या.
तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की पुरोगामी, विज्ञानवादी, नास्तिक इत्यादी झापडे काढून कूपमंडूक वृत्तीतून स्वत:ला बाहेर काढा.

नक्की काय लुटून नेले व किती याचे उत्तर नसल्याने मामाजी तुमचा प्रतिसाद फाट्यावर मारण्यात येत आहे. आपण तपशील दिला तर मी माझे विधान मागे घेतो. अन्यथा भारतावर हल्ले का झाले याचे उत्तर .. एक तर पराक्रमाचा अभाव ,आंभी सारखे फितूर , आपापसातील भांडणे ई आहेत असे मी तरी इतिहासाच्या पुस्तकात शिकलो आहे. आता तो इतिहास साहेबाने लिहिला आहे असे आपले म्हणणे असणारच यात शंका नाही मला . बाकी मी या विहिरीच्या बाहेरही जाऊन आलो आहे . मी जर भारत देश महान ( माझीच विहीर महान ) असे म्हटलो असतो तर आपले बेडकाचे उदाहरण युक्त होते. सबब बेडकाचे हे उदाहरणही फाट्यावर मारण्यात येत आहे.

मामाजी's picture

9 Oct 2017 - 9:28 pm | मामाजी

चौरा साहेब,
प्रतिसादासाठी धन्यवाद,
काय लुटून नेले हे कळण्यासाठी काय होते याची नोंद असावी लागते ती माझ्याकडे नाही. सबब काहीही लुटून नेले नाही इथ पासुन ते जे होते ते सर्वकाही लुटून नेले इथपर्यंत हा माझ्याकडून तर्किक शेवट. हो एका कोहिनूर हीरा घेऊन गेले त्याची नोंद आहे.
आता तो इतिहास साहेबाने लिहिला आहे असे आपले म्हणणे असणारच यात शंका नाही मला . या प्रकारे उल्लेख करून आपण पूर्वानुमानानेच मला संघ परिवातील वा तत्सम संस्थांचा समर्थक या श्रेणि मधे समाविष्ट करून टाकलेत. असो आपल्याला आलेल्या अनुभवांवरून हे अनुमान काढल्याची शक्यता असावी. या पैकी कोणत्याही संस्थेशी माझा संबंध नाही.
कूपमंडूक वृत्तिचे ऊदाहरण देण्यामागचा माझा उद्देश हा पूर्णपणे वैचारिक प्रगल्भतेच्या दृष्टिकोनातून होता पण आपण त्याचा संबंध देशाशी जोडलात असो. शालेय जीवनापासून स्वामी विवेकानंदांचे साहित्य अभ्यासून व माझ्या कुवतीनुसार त्यांची पडताळणी करून मी या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहे की आपला धर्म ( फक्त आपलाच नव्हे) (स्वामी विवेकानंदांच्या व्याख्येनुसार सनातन हिंदु धर्म), देश व संस्कृति महान होती, महान आहे व महान राहील.
आपल्याला जर उत्सुकता असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. यात 12 पीडीफ पुस्तके आहेत. आपल्याच शब्दात सांगायचे तर साहेबानी नोंद केलेला ( सन 1780 ते 1850 ) पण आपल्या समोर कधीही न आणलेला ईतिहास आहे. धर्मपाल नावाच्या ऐका गांधीवादी गृहस्थाने ब्रिटन मधे जाऊन तेथील दस्तावेज पडताळून त्यांचे संकलन केले आहे.
जर शक्य असल्यास वरील पुस्तके वाचुन आपल्या सारख्या अनुभवी व्यक्तिकडून माझ्या ज्ञानात भर पडावी ही अपेक्षा अन्यथा फाट्यावर मारण्यचा पर्याय आपल्यापुढे आहेच.

https://1drv.ms/f/s!AuFt4YPB-CeYzkwZwKYJ5LQYlCVh

इथली नैसर्गिक साधन सम्पत्ती आणि प्रत्येक खेड्याची स्वायत्तता.
आपल्या इथे लागणारा पक्का माल आपल्या इथेच तयार व्हायचा. सेल्फ सस्टेनिन्ग सिस्टीम होती.
गेलेली स्वायत्तता, आलेली मानसिक गुलामगिरी, लाचारी.
त्याच पद्धतीचे शिक्शण घेऊन त्याच पद्धतीने नोकरी करत रहाणे ह्याला आलेले ग्लोरिफिकेशन.
निसर्गाची झालेली अवस्था (त्या आधी आपण निसर्गाधारीत जगायचो. प्रत्येक ठिकाणचा निसर्ग त्या ठिकाणी रहाणार्‍या लोका न्ना पोसण्यास समर्थ असतो.)

एक साध उदाहरण द्यायच तर पूर्वी एकरी शेतसारा न घेता आलेल्या प्रोड्युस वर घेतला जायचा.
एकरी पद्धत आल्यापासून गरजेचे अन्न पिकवणे हळूहळू परवडेनासे झाले. मग हळूहळू कॅश क्रॉप्स कडे कल वाढला.
आजच्या शे तीच्या दुरावस्थेचे मूळ तिथे आहे
एखाद्या वर्षी दुष्काळ झाला तरी गतवर्षी साठवून ठेवलेले धान्य वगैरे उपयोगी पडायचे. इन्ग्रजानी हे लुटून नेले.
होलोकास्ट इन व्हिक्टोरियन एरा म्हणून गुगल करा. तुम्हाला थोडा अन्दाज येऊ शकेल मी काय म्हणतेय त्याचा.

नवीन बिलिफ्स देऊन ट्रॅडिशनल विज्डम मागे टाकायला लावले - हे लुटुन नेले.

कुठलाही समाज स्वायत्त असतो तेव्हा वेगळ्या सोन्याच्या धुराची गरज नसते.

मराठी_माणूस's picture

11 Oct 2017 - 10:41 am | मराठी_माणूस

कुठलाही समाज स्वायत्त असतो तेव्हा वेगळ्या सोन्याच्या धुराची गरज नसते.

फार सुंदर मांडलेत.

पगला गजोधर's picture

11 Oct 2017 - 12:31 pm | पगला गजोधर

कुठलाही समाज स्वायत्त असतो तेव्हा वेगळ्या सोन्याच्या धुराची गरज नसते.

म्हणूनच

"चातुर्वर्ण" आधारित समाज, "स्वायत्त" असणे, शक्य नसतो.

त्यामुळेच व्हाट्सएपी गळे काढणाऱ्यांच्या सुपीक मेंदूतून, सोन्याचा धुराचे, पिल्लू निपजले असावे बहुदा...

sagarpdy's picture

9 Oct 2017 - 6:05 pm | sagarpdy

https://infogram.com/share-of-world-gdp-throughout-history-1gjk92e6yjwqm16
हे बघा - ऐतिहासिक अंदाजे GDP चा आलेख आहे.
हा जगाच्या एकूण gdp चा % आहे हे लक्षात घ्या.
टीप : gdp चा % आणि लोकांचे स्टॅंडर्ड ऑफ लिविंग यात सरळ संबंध सांगता येणार नाही. जास्तीत जास्त इथले स्टॅंडर्ड ऑफ लिविंग आणि दुसऱ्या एका देशाचे स्टॅंडर्ड ऑफ लिविंग यात तुलना होऊ शकेल.

यशोधरा's picture

8 Oct 2017 - 12:26 am | यशोधरा

रोचक धागा आणि चक्क शांततापूर्ण (अजून तरी) पद्धतीने चाललेली चर्चा वगैरे. वाचतेय.

मालोजीराव's picture

9 Oct 2017 - 12:36 pm | मालोजीराव

1) जवाहर लाल नेहरू : +100 (आधुनिक भारताचे जनक,शेणापासून अणूयुगाकडे नेणारे,सामान्य चहावाला सुद्धा प्रधानमंत्री होऊ शकेल इतकी सक्षम लोकशाही बनवणारे )
2) गुलझारीलाल नंदा : ००
3) लाल बहादुर शास्त्री : +२५
4) इंदिरा गांधी : +७५ (-२५ आणीबाणी आणि शास्त्री गव्हर्नमेंट मध्ये हस्तक्षेप )
5) मोरारजी देसाई : -१००
6) चरण सिंह : +२० ( + २० स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग व शेतकरी नेते )
7) राजीव गांधी : +५० (+५० दृष्टा नेता ,माहिती तंत्रज्ञान क्रांती , -५० शाहबानो , लिट्टे,बोफोर्स)
8) वी. पी. सिंह : +२०(-८० मंडल कमिशन )
9) चंद्र शेखर : -५०
10) पी. वी. नरसिम्हा राव : ७५ (इकॉनॉमिक रिफॉर्म्स )
11) अटल बिहारी वाजपेयी : -२० (मशीद पाडून आलेले सरकार ,पोखरण मुळे आर्थिक निर्बंध ओढवून घेतले,चान्गले रस्ते )
12) एच. डी. देवेगौडा : - १००
13) इंदर कुमार गुजराल : -१००
14) मनमोहन सिंह : युपीए १ +५० , यूपीए २ -५०
15) नरेंद्र मोदी : +४० (- जी एस टी ,नोटबंदी ,फेकाफेक,महागाई,GDP , + एकहाती निर्णय घेण्याची क्षमता, काश्मीर पॉलिसी,फॉरेन पॉलिसी,अजून शिल्लक असलेली २ वर्षे )

गामा पैलवान's picture

9 Oct 2017 - 12:46 pm | गामा पैलवान

चौकटराजा,

दोन हजार वर्षात राजे लोकांनी स्वतः चे मोठमोठे महाल बांधण्याखेरीज काय केले

जगात कुठली संस्कृती दोन हजार वर्षं टिकून राहिली आहे? एक चीनी सोडल्यास दुसरी कुठलीच नाही.

भारत ही सुवर्णभूमी होती हे परदेशी प्रवाशांनी लिहिलेलं आहे.

आ.न.,
-गा.पै.

आकाश कंदील's picture

9 Oct 2017 - 3:34 pm | आकाश कंदील

मोदी + १००

कायप्पावरून –

मी खूपच निराश झालो होतो, हताश झालो होतो. कोणीच मला भाव देत नसे रस्त्यावरचा कुत्रासुद्धा मला विचारात न्हवता. ""कशातच मला कर्तृत्व दाखवता येत न्हवत .....""
:
:
:
:
मग मी चौकात उभा राहून मोठयाने ओरडलो - ""मोदीने देशाची वाट लावलीय, देश विकायला काढलाय”"
:
:
:
:
प्रत्येक ग्रुपवर मोदींविरोधात मेसेज (स्वतः ला न कळलेले/ पूर्ण न वाचलेले देखील) फॉरवर्ड करू लागलो.

आज प्रत्येक वाहिनी आणि वृत्तपत्र मला ""परखड, अभ्यासू, राजकीय विश्लेषक आणि आलम दुनियेतील कोणत्याही विषयाचा तज्ज्ञ"" म्हणून बोलावतात

श्रीगुरुजी's picture

11 Oct 2017 - 3:21 pm | श्रीगुरुजी

मी खूपच निराश झालो होतो, हताश झालो होतो. कोणीच मला भाव देत नसे रस्त्यावरचा कुत्रासुद्धा मला विचारात न्हवता.

परफेक्ट! याची प्रत्यक्ष उदाहरणे म्हणजे शत्रुघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा, अरूण शौरी . . .

श्रीगुरुजी's picture

9 Oct 2017 - 11:38 pm | श्रीगुरुजी

अमेरिकन अर्थतज्ज्ञ रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर आहे. त्यांनी मागील वर्षी भारतातील निश्चलीकरणाचे समर्थन केले होते. अमेरिकेच्या दबावामुळे मोदींनी नोटाबंदी केली हे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे.

शब्दबम्बाळ's picture

9 Oct 2017 - 11:42 pm | शब्दबम्बाळ

अमर्त्य सेन यांनाही अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले होते नाही का?
पण असो..

श्रीगुरुजी's picture

10 Oct 2017 - 12:02 am | श्रीगुरुजी

बरोबर. परंतु या दोघांची तुलना अप्रस्तुत आहे. थेलर यांचा भारताचा तसा काही संबंध नाही किंवा त्यांचे भारतात काही हितसंबंधही गुंतलेले नाहीत. त्यामुळे एक निष्पक्ष अर्थतज्ज्ञ या भूमिकेतून ते या निर्णयाचा विचार करू शकतात. मात्र अमर्त्य सेन यांच्याबाबतीत असे म्हणता येणार नाही. एकतर ते भारतीय असल्याने त्यांची स्वतःची एक ठाम विचारसरणी आहे व ती डावी विचारसरणी आहे. दुसरं म्हणजे २०१५ मध्ये त्यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची पहिली ३ वर्षांची टर्म संपल्यानंतर त्यांना इच्छा असूनसुद्धा दुसरी टर्म मिळाली नाही (त्यावेळी त्यांचे वय ८१ होते). त्यामुळे तसेही ते मोदींवर खार खाऊन होते. त्यामुळे त्यांचे मत निष्पक्ष मानता येणार नाही.

थॉर माणूस's picture

10 Oct 2017 - 12:27 am | थॉर माणूस

>>>अमेरिकेच्या दबावामुळे मोदींनी नोटाबंदी केली हे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे.
कसे? आणि काय रेफरंस आहे याचा?

इधरभी तुम उधरभी तुम खेळताय काय?

मोदक's picture

10 Oct 2017 - 8:02 am | मोदक

बहुतेक उपरोध असावा..!

थॉर माणूस's picture

10 Oct 2017 - 12:04 pm | थॉर माणूस

उपरोध आहे म्हणुनच रेफरंस मागितला आहे. नसेल तर त्या वाक्याला कुचाळक्या या पलीकडे किंमत उरत नाही. बाकी चालूद्या.

थॉर माणूस's picture

10 Oct 2017 - 12:34 pm | थॉर माणूस

>>>त्यांनी मागील वर्षी भारतातील निश्चलीकरणाचे समर्थन केले होते.

त्यांच्या आणि राजन यांच्या मतात फरक असेल तर याविषयी अधिक वाचायला नक्की आवडेल. काही दुवा वगैरे उपलब्ध आहे का त्यांच्या लेखाचा?

शाम भागवत's picture

10 Oct 2017 - 4:56 pm | शाम भागवत

अर्थव्यवस्था कॅशलेस कडे जाण्यासाठी ते मोठ्या नोटांना विरोध सुचवतात. तसेच त्यामुळे भ्रष्टाचार कमी होतो असे त्यांचे म्हणणे आहे.
थोडक्यात पाठिंबा व विरोध दोन्हीही आहे

५०,१०० व २०० च्या नोटा भरपूर छापून झाल्यावर व वितरण व्यवस्था व्यवस्थित स्थापीत झाल्यावर २००० च्या नोटा रद्द होऊ शकतात. तसेच छोट्या नोटांचा व्यवस्थित पुरवढा असेल तर मागील वर्षीच्या चूका टाळता येतील. असे झाले तर मात्र त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे असे म्हणता येईल.

शाम भागवत's picture

10 Oct 2017 - 5:18 pm | शाम भागवत

अगदी थोडक्यात सांगायचे झाल्यास भष्टाचारी, निवडणूकात पैशाचा उपयोग करणारे राजकारणी, अतिरेकी, गुन्हेगार, काळाबाजारवाले, हवालावाले यांना मोठ्या नोटांबद्दल काय वाटते त्याचा अभ्यास करून त्या ठेवायच्या की नाहीत हे ठरवणे. त्यांना जर त्या हव्या असतील तर त्या रद्द करणे.
तसेच या लोकांना १०, २०, ५०, १००, २०० वद्दल काय वाटते हे लक्षात घेणे. त्यांना त्या त्रासदायक वाटत असतील तर त्यांचे प्रमाण वाढवणे.

गामा पैलवान's picture

11 Oct 2017 - 12:44 pm | गामा पैलवान

नानबा,

कुठलाही समाज स्वायत्त असतो तेव्हा वेगळ्या सोन्याच्या धुराची गरज नसते.

काय बोललात. समाज स्वायत्त असणे ही नव्या युगाच्या भाषेत अधोगती आहे. सगळ्यांना सगळं जग एकमेकांना जोडलं गेलेलं बघायचंय. ही जोडणी करतांना आर्थिक स्वायत्ततेचा बळी द्यायलाच हवा का, यावर काहीच विचारमंथन होत नाही.

आ.न.,
-गा.पै.

प्रतापराव's picture

12 Oct 2017 - 8:09 pm | प्रतापराव

नेहरु 80
इंदिरा गांधि 70
राजिव गांधि 80
अटलबिहारी वाजपेयी 5
व्हि पि सिंग १००
नरेंद्र मोदी 5

manguu@mail.com's picture

19 Mar 2018 - 11:45 pm | manguu@mail.com

नेहरु ९०
इंदिरा गांधि ९०
राजिव गांधि ९०
अटलबिहारी वाजपेयी ३
व्हि पि सिंग ८०
मनमोहन ९०

नरेंद्र मोदी ( १५ लाख दिले तर ९० नाहीतर ० )

या धाग्यात नेहरूंबद्दल मी टाकलेल्या प्रतिसादांत विखार पाहणारांस ................ च्या शुभेच्छा.

डँबिस००७'s picture

20 Mar 2018 - 2:51 pm | डँबिस००७


मनमोहन ९०
नरेंद्र मोदी ( १५ लाख दिले तर ९० नाहीतर ० )

जबरदस्त न्याय मोगा !!
ज्याच्या का ळात देशातला काळा पैसा बाहेर गेला त्याला ९० मार्क
ज्याने हा बाहेर गेलेला काळा पैसा परत आणण्याचा निर्धार केला त्याला ० मार्क ?

१५ लाख फुकटचे मिळणार म्हणुन गेले ४ वर्ष लाळ टपकत आहे ह्याचा अर्थ खालिल गोष्टी तुम्हाला मान्य आहे !!

१. बराच पैसा बाहेरर्च्या देशात गेलेला आहे
२. सध्याच सरकार बाहेत गेलेला पैसा परत आणण्याचा प्रयत्न करत आहे

बोलघेवडा's picture

20 Mar 2018 - 4:30 pm | बोलघेवडा

नेहरु 70
इंदिरा गांधी 40
राजिव गांधी 30
अटलबिहारी वाजपेयी 80
व्हि पि सिंग हे कोण??? ओळखत नाही.
मनमोहन 10
नरेंद्र मोदी 50

जवळजवळ प्रत्येक प्रतिसादकाने सर्वच पक्षांच्या पंतप्रधानांना कमीअधिक मार्क्स दिले आहेत.
तेव्हा जालावर दिसते तितकी कट्टरता नसावी.