काहीतरी नक्कीच आहे....२

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in जनातलं, मनातलं
6 Oct 2017 - 12:35 pm

या विषयावरील आधीच्या लेखाची लिंक खाली
काहीतरी नक्कीच आहे...

प्रसंग ५-
भावाचे लग्न झाले होते म्हणून मी अणि बायको, जवळच असलेल्या आमच्या दुसरया घरी रहायला गेलो होतो. ते घर दुमजली होते. वरच्या अणि खालच्या मजल्यावर भाडेकरू ब्याचलर मुले बरयाच वर्षांपासून राहत होती. आम्ही रहायला आल्यावर खालची मुले दुसरीकडे रहायला गेली. त्यांचा आजुबाजुच्या लोकांना कधीच त्रास न्हवता अणि त्या मुलांना देखिल कुणाचा त्रास कधी न्हवता. तिथे जवळच माझा शाळकरी मित्र मंग्या राहत होता. त्यामुळ त्याला सारा परिसर चांगलाच महित होता. ते घर घेउन बरीच वर्ष झाली होती पण मी जेव्हा रहायला गेलो तेव्हाच ते पहिल्यांदा पाहिले होते. त्या घरात सूर्यप्रकाश अणि हवा तितकीशी आत येत न्हवती. घरात शिरले की उदास वाटायला लागायच. आमच्यात सारखी भांडण होत होती त्यामुळ आम्ही फक्त रात्रीच त्या घरी फक्त झोपायला जात होतो. मंग्याने एकदा सांगितले होते की त्या सोसयाटित एक भुताटकी घर आहे, जिथे एक गरोदर बाई बाथरूम मधे पडून मेली होती, अणि एक MTV रोडीज मधल्या व्यक्तीने आत्महत्या केली होती. हे तेच घर जे आम्ही नंतर विकत घेतले होते. तिथे एकही फॅमिली कधीच टिकली नाही त्यामुले बरिच वर्ष ब्याचलर भाडेकरू ठेवले होते. एकदा बायको माहेरी गेल्यावर मंग्याचा अणि माझा घरी दारू पिण्याचा प्लान झाला. त्यानिमित्ताने मंग्या ही घर पहायला आला असता.

मंग्याला पत्ता देऊन मी घरी त्याची वाट पाहत होतो तर मंग्या आणि अजुन एक मित्र त्यांनी बेल वाजवली. मी दरवाजा उघडल्यावर दोघे मला त्या घरात पाहून एकमेकांकडे बघून हसले. दुसरया दिवशी मला मंग्याने सांगितले की तो ज्या भुताटकी घराबद्दल बोलत होता ते आमचेच घर होते.
एके रात्री ८-९ वाजता टीवी पाहत बसलो होतो तर सोफ्यावर ठेवलेल माझे सिगरेटचे पाकिट खाली पडले. घरात मी एकटाच होतो अणि वारा इतक्या जोरात न्हवता की त्यामुळ ते पाकिट खाली पडेल. दिवाळीला दारावर एक मोठा अणि बरेच लहान कंदील सजवले होते, दुसरया दिवशी ते सर्व तुटलेल्या अवस्थेत दिसले, कुणी लहान मुलगा अस करू शकेल पण ते कंदील इतक्या उंचावर होते की तिथे लहान मुलांचे हात पोहोचणार नाहीत. अणि कुणी मोठा माणुस असे करू शकेल पण का करेल? दोन्ही गोष्टीकड़े मी दुर्लक्ष केले. २-३ वेळा बायकोला बाथरूम मधून दरवाजा ठोठव्ण्याचा आवाज आला हे तिने मला सांगितले तर मी तिला सांगितले की तुला भास झाला असेल. एके रात्री नुकताच डोळे लागले होते तर किचन मधून आवाज यायला लागला, कोणीतरी लाटण्याने चपात्या लाटतय. अंदाजे १ मिनिट हा आवाज मी माझ्या कानाने ऐकत होतो. बायकोही जागीच होती, म्हणाली तुम्हाला येतोय का आवाज? म्हटले हो येतोय.

तिथे मी एक मांजर पाळली होती स्वाती नाव तिचे. अणि एक कुत्राही होता सोसायटीत त्याच नाव टोम्या. बायको त्यांना पसंत करत न्हवती त्यामुळ मी घरी आलो के ते धावतच माझ्या मागे घरी यायचे. स्वाती सदासर्व काळ मला बिलगून असायची, तर टोम्या रोज रात्री न चुकता १०.३० वाजता चपाती खायला घरी यायचा. पण कधीकधी दोघ फार विचित्र वागायचे. स्वाती दारात उभी राहून म्याव म्याव करायची पण आत येत न्हवती, टोम्याही तसाच करायचा दारात बसायचे पण आत येत न्हव्ते. ज्या पंडित ने होम केले होते त्याला एके दिवशी सहज हे सांगितले तर त्याने प्रश्न विचारला की त्या घरात सुर्याचे उन पड़ते का? म्हटले नाही. तो म्हणाला तिथे राहू नका.
शेवटी एकदा स्वातीला प्रसूतिकळ सुरु झाली तिने दरवाज्याच्या बाहेर पिल्लाला जन्म दिला तर ते मेलेले होते. मग आम्ही लगेच ते घर सोडले.
आमच्यानंतर देखिल तिथे ३-४ कुटुंब रहायला आले, पण १५ दिवसाच्यावर कोणीच टिकले नाही. आजही ते खालचे घर रिकामेच आहे.

प्रसंग ६-
एका प्रख्यात टूर कंपनीमधे असिस्टंट टूर म्यानेजर म्हणून काम करत होतो, बरीच वर्ष दिल्ली चंडीगढ़ शिमला मनाली अश्या टूर केल्या, ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी नवीन होतो, मनाली मधले ते होटल जिथे मी पहिल्यांदाच जात होतो. मनाली मधे आमचा ४ दिवस मुक्काम असायचा. सगळ्या होटेलात आम्हा टूर म्यानेजरची खोली फिक्स असायची. बेसमेंटची. ज्या रुमला जास्त मागणी नसते अणि जिथे जास्त कुणाची ये जा नसते. त्या होटेलला संध्याकाळी पोहोचलो, खुप मोठे अणि सुंदर होटल. रुममधे पोहोचलो तर तिथे आधीच २ टूर म्यानेजर होते. ते ग्रुप घेउन आले होते आणि उदया त्यांचे चेक आउट होते. रूम बरीच मोठी होती त्यामुळ आम्ही ४ टूर म्यानेजर तिथे आरामत राहू शकत होतो. तिथे एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे सगळ्या खोलीत देवांचे फोटो लावले होते. हे मी माझ्या सीनियरला विचारले तर तो म्हणाला की जो आधी आलेल्या ग्रुपचा टूर म्यानेजर आहे न खुप देवभक्त आहे. म्हणून त्याने सगळीकड़े देवाचे फोटो ठेवलेत. दुसरया दिवशी सकाळी त्या ग्रुप अणि फोटोसकट तो टूर म्यानेजर चंडीगड़ला निघून गेला. आता आम्ही उरलो दोघेच . दिवसातून २ वेळा त्या रूमच्या दरवाज्यावर टक टक व्हायची. टक टक टक टक.
एकाच लयीत अणि एकाच आवाजात. न कधी आवाज जास्त न कमी. दरवाजा उघडून पाहिले तर बाहेर कुणीच नसायचे. दरवाजा नाही उघडला तर थोड्या वेळात परत टक टक टक टक. पण एकदा दरवाजा उघडून पाहिल्यावर पुन्हा संध्याकाळ पर्यंत टक टक व्हायची नाही.

लिफ्ट बाबत देखिल एक गोष्ट व्हायची. दिवसातून २ वेळा तरी. लिफ्त्मधे गेल्यावर दरवाजा बंद होउन तुम्ही वरच्या मजल्यावर जाणार इतक्यात पुन्हा दरवाजा उघडला जायचा. जणू काही पुन्हा कोणतरी आत येतेय. ४ दिवस असेच गेले नंतर दिल्लीला आलो. ते आमचे हेडक्वार्टर होते. तिथल्या ४-५ नवीन टूर म्यानेजराला विचारले तर त्यांनीही हेच सांगितले.
उद्या पुन्हा टूर होती अणि मनालीचे होटेलही तेच होते. तिथे पोहोचल्यावर एक वेटरला हेरले. त्याला सहज सांगितले आमच्या रूम मधे का्य का्य घडते ते. तो म्हणाला ऐसा कुछ नाही दादा आपको शायद वेहम हो गया है. तुझ्या बापने ठेवलय वेहम. दुसरया दिवशी सकाळी मी त्याला टिप म्हणून ३०० रुपये सुट्टे दिले. १०, ५० च्या नोटा होत्या सगळ्या. १०० च्या ३ नोटापेक्षा ५० च्या ६ नोटा जास्त वाटतात. शेवटी मूल्य एकच. मग त्यानेच सांगायला सुरुवात केली की तो ६ महीन्या पुर्वीच इथे कामाला लागलय त्यामुळ त्याला जास्त काही माहित नाही. पण मी त्याला ओळखले होते. याला नक्कीच काहीतरी माहित आहे पण साला अजुन पेशे पाहिजेत याला.
पुढच्या दिवशी पुन्हा सकाळी त्याला पेशे दिले टिप म्हणून. तो पर्यंत ते टक टक टक टक रोज चालूच होते. अणि माझा सीनियर त्या रूममधे एकटा थांबत न्हवता. मी बाहेर पडलो की तो ही बाहेर यायचा, आणि मी आत गेल्याशिवाय तो आत जात न्हवता. वर लोबीतच माझी वाट पहायचा.
वेटर सांगत होता, की २-३ वर्षा आधी एक जोडपे त्या रूम मधे थांबले होते, रात्री त्या माणसाने त्या बाईचा खून करुण सकाळी कल्टी मारली होती. ते त्याच बाईच भुत होत. ती रोज २ वेळा दरवाजा वाजवते आणि दरवाजा उघडल्यवर आतमधे पाहते. रोज ती बाई त्या माणसाची वाट पाहते आहे. आणि लिफ्टमधे सुद्धा तिच येते. आता सगळा उलगडा झाला होता.

ही गोष्ट मी माझ्या सहकारी सीनियरला सांगितली. तो कमालीचा भित्रा होता. त्याने सल्ला दिला की आपण आता बसमधे ड्रायवर सोबत झोपुया. पण मी त्याला धीर देऊन थांबवले.
त्यानंतर पूर्ण सीजन आम्हाला मनालीत तेच होटल मिळत होते. अणि आता आम्हाला सवयच झाली होती. टक टक वाजले की मी जाऊन दरवाजा उघडाय्चो अणि म्हणायचो हम लोग है, अंदर और कोई नहीं.
पण लिफ्टमधे खुप भीती वाटायची. आत शिरल्यावर वरच्या मजल्यावर जायच्या आधी जेव्हा कधी पुन्हा दरवाजा उघडला जायचा तेव्हा हवा टाईट व्हायची. दरवाजा उघडला म्हणजे ती येणार आहे, ती आलीये लिफ्त्मधे दरवाजा परत बंद झालाय लिफ्त्मधे तुम्ही दोघच आहात पण ती तुम्हाला दिसत नाहीये. खुप भयानक.
एकदा सीनियर खुप घाबरला म्हणून त्याने माझ्यापुढे २ पर्याय ठेवले.
१- आपण बसमधे झोपायला जाऊया
२- आपल्या सोबत होटेलच्या एखाद्या कर्मचार्याला झोपायला बोलावुया.

एवढ्या मरणाच्या थंडीत बर्फ पडत असताना मला बाहेर बसमधे जाऊन झोपायची इछा न्हवती. म्हणून रामलालला झोपायला बोलवायचे ठरले. रिसेप्शन ला फोन करुन रामलाल ला खाली बोलावले. तो आला अणि त्याने दार थोठावले टक टक टक टक. दार वाजवन्याच्या लयिवरून मी ओळखले की ही ती न्हवे. २ वेळा दार वाजवायचा तिचा आजचा कोटा संपलाय, हा रामलालच आहे. मी म्हटले खुला है दरवाजा.
त्याने दार उघडले अणि म्हटला क्या हुआ दादा? सीनियर म्हणाला आ जाव सोने हमारे साथ. तो दारातच उभा. मी म्हटले अरे नाही तुम जाव हम कर लेंगे म्यानेज. मी बोलायचा अवकाश अणि रामलाल लगेच छु.
सीनियर म्हटला अरे का त्याला पाठवले परत, मी म्हटले नको घाबरू मी आहे पण त्याने ऐकले नाही. परत रामलाल ला फ़ोन केला रिसेप्शन ला तर तिथल्या माणसाने तो फोन ट्रांसफर केला रूम सर्विसला तिथे कोणीतरी फोन उचलला अणि म्हटला रामलाल तो सो गया कबका. सो गया? २ च मिनिटे झाली असतील नसतील रामलाल तिथे पोहोचून अंथरुण टाकुन झोपला देखिल?
रामलाल खरच आला होता का खाली? का रामलाल ने त्या फोनवरच्या माणसाला खोट बोलायला लावले की तो झोपलाय म्हणून सांग? त्याने का खोट बोलायला लावले?
फोनवरचा माणुस स्वताहून खोट बोलणार नाही कारण टूर म्यानेजरशी पंगा त्यांना परवडणारा न्हवता

रूम साधारण अशी होती की, बेडच्या समोर लांबलचक खिड़की खिडकीच्या पलिकडे लोबी अणि पलिकडे दुसरया रूम. बाकीच्या सगळ्या रूम नेहमी रिकाम्याच. खिड़कीजवळ टीवी. खिडकीला पारदर्शक काच अणि पारदर्शक पडदा. लोबी अणि खिडकीच्या डाव्या बाजूला एक गेट होता तो बाहेर बगीच्यात जाण्यासाठी. पण गेट नेहमी बंद. उजव्या बाजूला लांबलचक लोबी अणि सगळ्या बंद खोल्या. बेडच्या उजव्या बाजूला पायापाशी दरवाजा अणि दरवाजातून डाव्या बाजूला ती लोबी अणि उजव्या बाजूला लिफ्ट.
त्या दिवशी दोघेही गप्पा मारत टीवी पाहत बेडवर झोपलो होतो. बाहेर बर्फ पड़त होता त्यामुळ मजबूत थंडी वाजत होती. रात्रीचे १२.१५ वाजले होते अणि लाईट गेली. आधीच दुष्काळ अणि त्यात तेरावा महिना.
सीनियर ची मजबूत फाटली. तो डोक्यावर चादर घेउन गुडुप झाला. आणि मी समोर खिडकित पाहिले, पलिकडे डाव्या बाजूने जिथे बगिच्यात जाण्याचा गेट आहे तिथून एक आकृति लोबीतुन चालली होती. तिच्या हातात काहीतरी होते त्यातुन अंधुक प्रकाश पडला होता, मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत न्हवता. ती एक स्त्री होती. हे लिहिताना अजूनही अंगावर काटा आला. डोळ्यातून पाणी आले.

मी क्षणभर स्तब्ध्च. म्हटले पंकज तू पाहिलेस का जे मी पाहिले? तो चाद्रीच्या आत मोठ्याने हनुमान चालीसा म्हणत होता. मी तडक अंधारात मोबाईल घेउन उठलो आणि दरवाजा उघडून बाहेर त्या लोबित गेलो.
त्यावेळी मोबाईल ला टोर्च न्हवती. नोकियाच तो फोन, त्याची स्क्रीन चालू केल्यावर जो प्रकाश पडतो तेवढाच प्रकाश. लोबित कुणीच नाही. त्या गेट्जवळ जाऊन पाहिले तर त्याला कुलुप. मग इथून कोण आले आत? मेंदूला झिनझिन्या आल्या. खाली लादीवर पाहिले तर डाव्या पायाचे नाजुक ओले ठसे दिसले ४ . पण फ़क्त डाव्याच पायाचे. हे जे मी पाहिले अणि अनुभवले ते मी उभ्या आयुष्यात विसरणार नाही. आताही अंगावर काटा आलाय. रूममधे जाऊन पाहिले तर पंकज उठून बसला होता. हलू आवाजात सतिश सतिश असा बडबडत होता. फक्त तो रडायचा बाकी होता. बस मधे जाऊन झोपुया म्हटला. पण आता बाहेर जाण्याची हिम्मत दोघातही न्हवती. आणि रामलाल वर आमचा भरोसा न्हवता. कारण तो नक्की रामललाच आहे असे आम्हाला वाटत न्हव्ते.
पंकजच्या मोबाईल मधे साईं बाबांचा स्क्रीन सेवर फोटो होता. स्क्रीन लाईट always on मोड़ वर ठेउन आम्ही झोपायचा प्रयत्न केला. रात्री केव्हातरी झोप लागली. सकाळी ५चा गजर झाला तेव्हा लाईट आली होती.

प्रसंग ७-
शिमल्याला निघताना आमचा चंडीगड़ला झिरकपुर या ठिकाणी मुक्काम असतो. नेहमीप्रमाण बेसमेंटचीच रूम होती, माझा सीनियर काही कामानिमित्त बाजुच्या होटेलला गेला होता. अणि मी रूम मधे एकटाच होतो. नुकताच चेक इन केले होते. थोडा रिकामा वेळ होता म्हणून बाथरूमच्या बेसिन मधे मोज़े धुवत होतो. बाहेर एसी अणि टीवी चालू होता. इतक्यात लैंडलाईन फोन वाजला म्हणून बाथरूम मधून बाहेर आलो अणि फोन घेतला तर पलिकडे कुणीच नाही. मला वाटले फोन कट झाला. पुन्हा मोज़े धुवायला लागलो अणि पुन्हा फोन वाजला. पलिकडे कुणीच नाही.
तिसर्यांदा जेव्हा फोन वाजला अणि मी बाहेर आलो तेव्हाही कुणीच नाही. अणि इतक्यात बेसिनचा तो बंद केलेला नळ जोरात सुरु झाला. मी तसाच तडक रूमच्या बाहेर पडलो. पायात शुज न्हव्ते. रिस्पेशन ला जाऊन सिनियारची वाट बघत बसलो. मोबाईल रूम मधेच होता. अनवाणी होतो म्हणून सीनियर मला पाहताच ओरडला. त्याला म्हटले आधी रूमवर चल. रूममधे गेल्यावर पाहिले तर नळ बंद झाला होता. सिनियराला सगळ सांगितले पण त्याने हसण्यावारी नेले.

प्रसंग ८-
शिमला. नालदेहरा गोल्फकोर्स जवळचे ते होटल. आमची रूम होती टेरेसवर. तिकडे होटल मालकाने २ रूम बांधल्या होत्या ऐसपैस. त्यातली एक आमच्यासाठीच बुक असायची. यावेळीही एका नवीन सीनियर सोबत टूर करत होतो. सकाळी ७ ला शिमला वरून मनालीला निघायचे होते म्हणून बेडटी ५ वाजता होता, त्यासाठी मला ४ वाजता उठायचे होते. ४ चा गजर मोबाईलमधे लावून झोपलो होतो.
फोन बाजुलाच लैंपटेबल वर ठेवला होता. ४ वाजता गजर झाला, तो १० मिनिटसाठी snooz करून फोन उशीखाली ठेउन पुन्हा झोपलो. १० मिनिटांनी गजरच्या आवाजाने जाग आली तेव्हा फोन उशीखाली न्हवता, तो टेबलवर होता, झोपेत मला नक्की आठवेना मी नक्की फोन कुठे ठेवला होता ते. पुन्हा snooz करून उशीखाली ठेवला अणि झोपलो.
१० मिनिटांनी गजर झाला तेव्हा परत फोन टेबलवरच होता. मला वाटले मला भास् होतोय म्हणून परत snooz करून फोन परत उशी खाली ठेवला अणि आपण फोन नक्की उशीखाली ठेवलय हे लक्षात रहावे म्हणून पालथा झोपून हातपण उशीखाली ठेवला.
गजर झाला. जाग आली अणि पाहिले तर फोन टेबलवर होता. अणि माझा हात उशिखालीच.

होटलसारख्या ठिकाणी तुम्ही कितीही बोम्बाबोम्ब केलीत की इथे तुम्हाला विचित्र अनुभव येतोय,, तरी ते लोक तुमच्यवर विश्वास ठेवत नाहीत, तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. किंवा तुम्हाला वेडेपट ठरवतात.
कारण याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर होतो.

तुम्हाला कधीही असा अनुभव जर आला कुठल्या होटलमधे, तर रूम आवडली नाही असे सांगुन रूम किंवा होटल बदलून घ्या.

कथा

प्रतिक्रिया

सतिश म्हेत्रे's picture

6 Oct 2017 - 12:51 pm | सतिश म्हेत्रे

मानसोपचार तज्ञ ना भेटा.

सतिश पाटील's picture

6 Oct 2017 - 2:34 pm | सतिश पाटील

आपण दिलेल्या सल्ल्याबद्दल आपला खुप आभारी आहे.

सतिश म्हेत्रे's picture

6 Oct 2017 - 4:43 pm | सतिश म्हेत्रे
सतिश म्हेत्रे's picture

6 Oct 2017 - 4:44 pm | सतिश म्हेत्रे
देशपांडेमामा's picture

6 Oct 2017 - 1:22 pm | देशपांडेमामा

एकापेक्षा एक डेंजर अनुभव आहेत !

देश

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2017 - 2:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी अनुभव ! तुम्ही टूर घेऊन जाता की भूतांना भेटायला जाता ?! =))

आम्हाला भुते घाबरून आहेत असे वाटते ! ११ वीला (पूर्वीची एस एस सी) हायर मॅथ्सच्या शिकवणीला भल्या पहाटे चार वाजता भर स्मशानातल्या रस्त्याने सतत रोज सहा महिने गेलो होतो. आम्ही पोचलो की तिथली भुते बहुतेक लपून बसत असत, एकदाही एक भूत दिसले असेल तर शपथ :)

अभिजीत अवलिया's picture

6 Oct 2017 - 2:12 pm | अभिजीत अवलिया

भाग्यवान आहात. भूत, आत्मा काहीतरी येईल व आपल्याशी ४ शब्द बोलेल म्हणून लहानपणी किती तरी वेळा प्लँँचेटचा घाट घातला होता. पण कधीच यश मिळाले नाही. :(

रामलाल ह्या नावातच काहीतरी गूढ आहे राव.
बादवे आण्भव वाचून घाबल्लो.

रामलाल ह्या नावातच काहीतरी गूढ आहे राव.

आर यू शुअर ? रामलाल की रामदीन?

निनाद आचार्य's picture

6 Oct 2017 - 4:11 pm | निनाद आचार्य

तुम्हाला भुतं घाऊक दराने दिसतात राव. विश्वास बसत नाही.

सतिश पाटील's picture

6 Oct 2017 - 5:41 pm | सतिश पाटील

आता विश्वास ठेवा किंवा नका ठेवू.
पण जे आहे ते आहे तसे लिहिलय.

दीपक११७७'s picture

7 Oct 2017 - 12:46 am | दीपक११७७

साहेब पत्ता देता का त्या अजुनही रिकाम्या असलेल्या घराचा

सतिश पाटील's picture

7 Oct 2017 - 11:17 am | सतिश पाटील

दीपक साहेब, व्यनी केलाय आपल्याला.

खूप दिवसांनी भूतांच्या कथा वाचल्या. मज्जा आली!
अजून लिहा बघू.

सतिश पाटील's picture

9 Oct 2017 - 11:27 am | सतिश पाटील

धन्यवाद ...

टीकोजीराव's picture

8 Oct 2017 - 10:11 pm | टीकोजीराव

नशीबवान आहात, एव्हढ्या वेळा भुताचा अनुभव घेऊन सहीसलामत राहिलात. जरा शिमला, मनाली हॉटेल चे नाव सांगा in case कधी गेलो तर हॉटेल टाळण्यासाठी

सतिश पाटील's picture

9 Oct 2017 - 11:32 am | सतिश पाटील

मी याच व्यवसायात आहे आणि त्या होटलशी आजही माझा व्यवसाय चालू आहे. त्या होटेलचे नाव ख़राब होऊ नये म्हणून मी ते देऊ शकत नाही.
अणि हे अनुभव फ़क्त त्या रुममधेच येत होते, अणि तशाही ह्या रूम्स फ़क्त टूर मेनेजरसाठीच होत्या. शिवाय हे असे अनुभव तुम्हाला इतर कुठल्याही होटलमधे येऊ शकतात.

कपिलमुनी's picture

9 Oct 2017 - 12:08 pm | कपिलमुनी

भुताटकीच्या जागांची टूर काढली तर भरपूर रीस्पॉन्स मिळेल !

आमच्या इथे खात्रीने भुते दाखवली जातील !

जे जे भेटेल भूत ते ते मांडावे जिल्बीत

तुमचे भुतांचे एव्हढे अनुभव वाचता काही लोकं कशी ऍक्सिडेंट प्रोन असतात तसे तुम्ही भूत प्रोन आहात का?