पोस्टरबाजी - ऐक दिखाऊपणाची गरज

ओरायन's picture
ओरायन in जनातलं, मनातलं
5 Oct 2017 - 6:08 pm

तुम्ही शहराबाहेर, गावाबाहेर बाईकने, कारने, अथवा अन्य वाहनाने जात असतांना ,बाहेर रस्त्याच्या कडेला हास्यमुद्रेत असलेले ४,५ किंवा जास्त जणांचे टोळकं दिसतच. अर्थात हे टोळकं असत पोस्टरवर..कोणाचा वाढदिवस, किंवा कोणाची कुठेतरी लागलेली वर्णी ह्या साठी हे सर्वजण पोस्टरवर, शुभेच्छा देण्यासाठी किंवा अभिनंदन करण्यासाठी , विराजमान झालेले असतात. हे तुम्हांला तुमच्या शहरात, गावात पण मोक्याच्या ठिकाणी पण हास्यवदन करीत असतात.
बर ,नाही बघायचे ठरवले तरी ते अशाप्रकारे लावलेले असतात की त्यांचे मुखदर्शन ओझरते का होईना होतेच. ऐकवेळ देवळात नाही गेलो तर देवाला टाळता येईल.पण ह्या हसतमुख टोळक्यांना तुम्ही टाळू शकत नाही. :-)
मग मी या पोस्टरांचा स्टडी चालु केला.
अशी पोस्टर बहुधा राजकीय असतात. ही पोस्टर नवशिक्या पण राजकीय महत्वाकांक्षा असणाऱ्या उत्सवमुर्तींची असतात. ह्यात गल्लीतील शेंबड्या पोऱ्यापासून थेट राज्यपातळीवरील वा राष्ट्रपातळीवरील नेते ऐकमेकांशेजारी हसतखेळत ऊभे़ असतात. तो आनंददायी सोहळा बघत बघत भान हरपून जाते राव !
ह्यात बहुतेकवेळेस ऐखाद्याचा फोटो फारच मोठा व सूचक हास्य करणारा असतो..हीच ती आपली ऊत्सवमुर्ति होय.. बाकी राज्यपातळीवरील, राष्ट्रपातळीवरील नेते कोपऱ्यात आकाराने छोटे होऊन असतात.तरी ते पण बिचारे हसतच असतात.
सर्वात मानले पाहिजे ते पेंटर लोकांना.अगदी जसेच्या तसे ते भाव चेहेऱ्यावर उतरवतात.छदमीपणा,कणखरपणा,चतुरता, कोडगेपणा, मुजोरीपणा, करारीबाणा असे कितीतरी भाव तो चेहेऱ्यावर दर्शवितो..त्याच माणसाचे ३,४ ठिकाणचे पोस्टर पाहिले तरी स्वभावाचा प्राथमिक अंदाज करता येतो.
गमंत म्हणजे प्राण्याची अभिनंदन वर पोस्टर लावणारी कमी नाहीत. मात्र प्राणी व माणुस असे एकत्रित फोटो असतात. ती कधी कधी नीट काळजी घेतली नाही तर हास्यापद दिसतात.
गावातील पोस्टरबाजी :- भावी वर / वधू यांचे हिरो/हिरॉइन स्टाइल फोटो असतात. मोठ्या कापडी फलकावर हे हास्यवदनाने आल्या गेल्याचे स्वागत करत लग्नाची तारीख व वेळ ( ज्यात कमीतकमी दिड तास मिळवावा.) सांगत असतात. मी अश्या पोस्टरकडे बघून मनात म्हणतो, हसा लेकांनो हसा , काही काळ आहे अजून असा मोठा ' हा' करून हसण्याचा ...
शहरातील पोस्टरबाजी :- ह्यात मुख्य करून ,राजकीय नेते मंडळी आघाडीवर असतात. तसे ते गावात पण असतात पण फारसे 'शब्द' बंबाळीत नसतात . शहरात , मात्र अनेक वजनदार शब्दांचे 'पेव' फुटलेले असते. 'आदर्श ' , 'हुरहुन्नरी' 'तरुण' ( पन्नाशीला पण हा शब्द चालतो.) 'खंबीर' , 'तडफदार' (मला तर तडफडणारा मासाच आठवतो.) ' साहेब' 'धुरंधरी' .....
याशिवाय गावात, निमशहरी व शहरी भागात दहीहंडी व गणेशोत्सव हे पोस्टरबाजी साठी सुगीचे दिवस असतात. दहीहंडी मध्ये 'मुख्य आकर्षणा' बरोबर नेहमीचे हसतमुख दर्शन पण असते. जसे गल्लीतील कुत्रांचा एक एक भाग असतो तसाच भाग 'राजकीय नवशिके' पोस्टरसाठी गणेशोत्सवासाठी वाटुन घेतात.
यात पण दोन बॅग पडतात . अधिकृत व अनाधिकृत
नगरपालिका, महानगरपालिका किंवा 'आकाश परवाना विभाग' फार ओरड झाल्यावर काही अनाधिकृत फलक काढते पण त्यात फारसा दम नसतो
ता.क :- लाइटली घेणे विशेषतः राजकीय गोष्टींची आवड असणाऱ्यांनी .

मांडणीविचार

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

5 Oct 2017 - 6:34 pm | अभ्या..

अभ्यास करुन लिहा.
लै वरवर आणि काडीचीही माहीती नसताना केलेले लिखाण.
शुभेच्छा.

संग्राम's picture

5 Oct 2017 - 8:30 pm | संग्राम

दादा, तुम्हाला या पोस्टरबाजीची बरीच माहिती आहे .... होऊ दे एक फर्मास लेख

अधिक माहितीपुर्वक लेख करण्याचा माझा उद्देश नव्हता व नाही , केवळ प्रचलित गोष्टी मी उपहासत्मक पद्धतीने लिहण्याचा प्रयत्न केला. अभ्यास कमी पडत आहे यावर सहमत. आपल्याला अजुन काय हवे आहे ते कृपया सांगितले तर बरे होईल. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

अभ्या..'s picture

6 Oct 2017 - 3:54 pm | अभ्या..

अधिक माहितीपुर्वक लेख करण्याचा माझा उद्देश नव्हता व नाही,

ते तुम्ही स्टडी केला वगैरे लिहिले म्हणून म्हणले. बाकी कै नै.

आपल्याला अजुन काय हवे आहे ते कृपया सांगितले तर बरे होईल.

मला तर कैच नको. बस बस झालाय हा धंदा. कंटाळून सोडला २ वर्षापूर्वीच.
.
पण मज्जा बघा हे फ्लेक्सबाजीचे अगदी आपल्या मिपासारखेच असतेय हा.
अगदी बोर्डावरचे धागे अन गावचा चौक. सेम कळा.
मिपाची महापालिका जरा उदारमतवादी आहे. कुणाला म्हनून मज्जाव करत नाही फ्लेक्स लावायला हे एक चांगलेय. फारच प्रक्षोभक भाषा असेल तर फ्लेक्स काढला जातो किंवा झाकला जातो इतकेच.
गावातले उदयोन्मुख नेते ज्या उत्साहाने स्वतःचे फ्लेक्स बनवून लावतात तसेच अगदी नवेनवे उदयोन्मुख लेखक धागे बोर्डावर पाडतात.
गावच्या नेत्यांना कसे काहीही कारण चालते, दिवाळी शुभेच्छा असो की रमजान, पीव्ही सिंधूला मेडल मिळो की सायनाला. स्वतःला झळकावून बोर्ड लावणे हाच उद्देश तसे काही लेखक नित्यनेमाने लेख पाडत असतात. मोदीकाका, नोटाबंदी, भाववाढ, स्त्रीपुरुष, आयटी हे इथले हिट्ट विषय. एक प्रकारचे सणच म्हना ना. सगळे जण हात धुवुन घेतात.
मुख्य नेत्यांच्या खाली कसे बारके चिल्लर भरलेले असतात तसे इथे अगदी अगदी किंवा +१ प्रतिसाद देणारे लाईन लावतात.
खंबीर साथ तर इथे कंपूबाजीतूनच मिळते. काहीही लिहा हो, कंपू पाठीशी असला की धागारुपी फ्लेक्साचे कौतुक ठरलेलेच.
काही नेते कसे डायरेक्ट दिल्लीत बसून स्वतःच्या गावात फ्लेक्स झळकावयाला तरबेज असतात तसेही काही मुरलेले लेखक दुसर्‍याकडून स्वतःची आरती ओवाळून घ्यायला तरबेज. व्हाटसपावर फोटो टाकून माझा फ्लेक्स बघा असे मेसेज आन लेखाच्या लिंका देऊन प्रतिसाद द्या अशा भिका मागणारे इथे सेमच बघा अगदी.
काही नेते अगदी मोक्याची जागा पकडून फ्लेक्स लावायला एक्सपर्ट तसे इथले काही लेखक बरोब्बर हमखास प्रतिसाद मिळणारे विषय साधून लेख पाडायला एक्सपर्ट. धार्मिक भावना अन अस्मितांना जागृत करणारे विषय हुडकून स्व्तःची छबी त्यात घुसवण्यात कसे काही नेते हुशार तसेच इथेपण.
एखादा नवा तडफदार युवा विदाऊट पक्ष स्वतःचे फ्लेक्स लावायल्यावर कसे त्याला स्वतःच्या पक्षात ओढायची गेम खेळली जाते तसेच इथेही चालते बरंका. त्याच्या फ्लेक्साला कुणी नावे ठेवली की नावे ठेवणार्‍यांकडून दुखावले गेलेले बरोब्बर जागृत होतात. मग त्या नवसदस्यालाही मिळते खंबीर साथ. त्यालाही वाटू लागते आपलेही स्थान आहे बरंका राजकारणात. असे मोहरे खेळवून कंपूबाजी साधणार्‍यांचे राजकारण दिल्लीच्या राजकारणाला मागे सारेल हे निश्चित.
काही फ्लेक्समूर्ती बेसिकलीच काड्याखोर असतात. बघतोस काय रागानं, फ्लेक्स लावलाय वाघानं असं डिवचणार्‍या भाषेत आवाहन करणारे नेते आणि अशाच काड्याखोर भाषेत लेख पाडणारे चिवट लेखक ह्यांच्यात भरपूर साम्य आहे. धाग्यावर भरपूर गोंधळ झाला तरी एकही प्रतिसाद न देता सगळे करुन नामानिराळे राहण्याचे कसब अंगी असतेच.
काही फ्लेक्सांचे बजेट मात्र हायकमांडकडून आलेले असते. वरुन कुठलीही योजना जाहीर झाली की पेट्रोल पंपावर ज्या नित्यनेमाने मोदीकाका झळकतात त्याच नियमीतपणे हायकमांडचे गुणगौरवगान गाणारे फ्लेक्स आणि इथले धागे अगदी सेम. वेळप्रसंगी स्वत:च्या खिशातले पैसे खर्चून फ्लेक्स लावायला हे कट्टर कार्यकर्ते कमी करत नाही तसाच इथे वेळ खर्चून मेगाबायटी प्रतिसादातून हायकमांडचे फ्लेक्स लावले जातात.
काही सोज्ज्वळपणाचा आव आणून लावलेले फ्लेक्स पाहताना त्यामागे केलेला खर्च जाणवत असतो पण त्याचा काही उपयोग होणार नाहीये हे माहीत असणारे पब्लिक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात तसे स्वयंभू सोज्ज्वळ धागाकर्तेही इथे असतात. मग कधी कधी कंटाळून ते दुसर्‍या मिडीयाच्या मागे लागतात अन तेथे रिस्पॉन्स मिळतोय का हे चाचपतात.
फ्लेक्सावरचा मॅटर, फोटो हे देणारे नेते असतात. त्यांचेच सगळे कर्तुत्व, पैसा आणि जनसंपर्क असतो. अर्थात फ्लेक्सबाजीतल्या सगळ्या गलिच्छ्पणाचे श्रेय त्यांनाच जायला पाहिजे पण बदनाम होतात ते फोटोशॉपमध्ये एडीट करुन छापणारे, पेस्टिंग करुन बोर्ड चढवणारे आणि परांचा लावणारे. तसेच इथल्या धाग्यावरल्या गोंधळाचे, भाषेचे अन संस्थळाच्या दर्जाचे सारे खापर फोडले जाते संस्थळमालकावर, तंत्रज्ञावर आणि संपादकावर हेही एक विलक्षण साम्य.
असो. लिहिण्यासारखे बरेच आहे. तूर्तास इतकाच २० बाय १० चा फ्लेक्स लावून आटोपतो. हा काढल्यास अजून एखादा छापू. हायकायनायकाय.
अ‍ॅपल म्हणतं आयफोन घे, गुगल म्हणतं मोटो घे.
शुभेच्छांच्या फ्लेक्सासाठी तेवढा माझा फोटो घे.
flex

अभिजीत अवलिया's picture

6 Oct 2017 - 1:28 pm | अभिजीत अवलिया

अभ्यासपूर्ण प्रतिसाद.

झेन's picture

6 Oct 2017 - 1:34 pm | झेन

फ्लेक्स आणि मिपा :-)

विशुमित's picture

6 Oct 2017 - 1:57 pm | विशुमित

चौफेर पोस्टरबाजी.!!

तुषार काळभोर's picture

6 Oct 2017 - 2:57 pm | तुषार काळभोर

अतिशय अभ्या...सपूर्ण प्रतिसाद.
फ्लेक्स आणि मिपाच्या अंतरंगाचा अगदी खोल अभ्या..स करून दिलेला प्रतिसाद आवडला.

मास्टरमाईन्ड's picture

5 Oct 2017 - 7:17 pm | मास्टरमाईन्ड

कहना क्या चाहते हो?

रानरेडा's picture

5 Oct 2017 - 8:49 pm | रानरेडा

भाऊ पोस्टर रंगवायचा जमाना संपला हो ? हे फ्लेक्स असतात - म्हणजे प्रिंटाऊट .... आणि चित्रे काढली जात नाही हो - फोटो फोटोशॉप केले जातात ! खरेच काहीही माहिती नसताना लेख लिहिला आहे !

ओरायन's picture

5 Oct 2017 - 9:01 pm | ओरायन

पेंटरलोक म्हणजे हे सर्व फ्लेक्स करणारे हो..मान्य तिथे पेंटरलोक हा शब्द चुकलाच.पण फ्लेक्स करणार्यांना खात म्हणणार?

ओरायन's picture

5 Oct 2017 - 9:03 pm | ओरायन

काय असे वाचावे

पैसा's picture

5 Oct 2017 - 9:23 pm | पैसा

तांत्रिक संज्ञा सुधारून घ्या, पण लेख मजेशीर आहे. आता काल परवाच आमच्या बँकेत त्याचे कर्ज एनपीए झाले म्हणून नोटीस पाठवल्याबद्दल दमदाटी करून लेजर्स फेकून मारणाऱ्या एका गुंडांचा थोर समाजसेवक म्हणून फ्लेक्सवर हसरा फोटो बघून आ वासला होता. तसाच अजून एक स्मगलरलाही असेच समाजसेवक बनवलेले हल्लीच पाहिले होते.

धन्यवाद सकारात्मक प्रतिसादाबद्दल , जसे काही जणांनी व आपण तांञिक बाबी किंवा अभ्यास नीट करण्यासाठी सांगितले आहे ते मी पुढील लेखापासुन नक्कीच अंमलात आणेल.

एस's picture

6 Oct 2017 - 1:14 am | एस

चांगला आहे. ही पोस्टरबाजी, धाक-दडपशाही ही सगळी 'माझं कोण काय वाकडं करणार आहे?' छाप मानसिकता वाढत चालल्याचं लक्षण आहे. नियम तोडणं, कायदा वाकवणं, नैतिक दबावाला न जुमानणं ह्या प्रकारच्या कृत्यांत लोकांना पुरुषार्थ वाटू लागला आहे.

ओरायन's picture

6 Oct 2017 - 10:19 pm | ओरायन

एस, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

रुपी's picture

6 Oct 2017 - 1:28 am | रुपी

लेख वाचला नाही.

शीर्षकातला 'ऐक' शब्द पाहूनच पुढे काही वाचायची हिंमत झाली नाही (प्रकाशित करण्याआधी 'एक'दा पूर्वपरीक्षण करा.)

कपिलमुनी's picture

6 Oct 2017 - 2:01 am | कपिलमुनी

आमच्या गावात एका नुकत्याच नेता बनू पाहणाऱ्या गुंडाचा फ्लेक्स लागला होता , त्यावर 20-25 पोरांचे फोटो नावासकट होते , एका पोलीस अधिकाऱ्याने ते फ्लेक्स उतरवून नेले . पोस्टर वरच्या सगळयांना उचलले आणि धुलाई करून भावी नेत्याच्या तावडीतून गावाची सुटका केली

इरसाल's picture

6 Oct 2017 - 10:00 am | इरसाल

एक फ्लेक्स पाहिला.
काँग्रेस पक्षाने लावलेला दसर्‍यानिमीत्त, कॅच लाईन होती "सत्यपर असत्य का विजय"

टवाळ कार्टा's picture

6 Oct 2017 - 10:59 am | टवाळ कार्टा

फोटो कुठाय

इरसाल's picture

6 Oct 2017 - 3:37 pm | इरसाल

https://photos.google.com/search/_tra_/photo/AF1QipOlO4q-qWHYTPQQXrzD1XoWlLpJP8YLhXVDcPgW

पुंबा's picture

6 Oct 2017 - 11:58 am | पुंबा

लेख ठीकठाक.
सवांतरः हिंजवडीत दोन वर्षांपुर्वी तिथल्या सरपंचाच्या वाढदिवशी किमान २००-२५० फ्लेक्स लागले होते ते आट्।अवले. अक्षरशः डांगे चौकापासून ते वाकड, हिंजवडीत इतके फ्लेक्स दिसत होते की बासच. गिफ्ट म्हणून 'कार्यकर्त्यांनी' लँड रोव्हर दिली असे नंतर कळले. कार्यकर्त्यांचे प्रेम बघून भारावून व्हायला झाले. आमची दोस्तमंडळी वाढदिवशी लाथा, बुक्क्या घालून तुडवतात वर थोबाडाला शिवसैनिकांच्या स्टाईलमध्ये केक फासडतात.

ओरायन's picture

6 Oct 2017 - 10:27 pm | ओरायन

धन्यवाद सौरा, आपला वाढदिवस व तथाकथित पुढारीचा वाढदिवस यातील फरक छान रंगविला आहे.

दुर्गविहारी's picture

6 Oct 2017 - 12:32 pm | दुर्गविहारी

खरंतर या विषयावरचा लेख खुमासदार होउ शकला असता. यासाठी थोड्या फ्लेक्सवाल्यांची गाठ घेउन चर्चा केली असती तर बरेच मजेदार किस्से टाकता येतील. मुळात घरचेही काडीचेही महत्व देत नसणारे हे युवा नेते, गल्लीतले बेकार फिरणारे त्यांचे मित्र हे सगळे पोस्टरवर आल्यावर डोक्यात जातात. हातातल्या दहाही बोटात अंगठ्या, गळ्यात साखळदंडासारख्या दिसणार्‍या बेंटेक्सच्या माळा, पांढरा शर्ट ,पँट व पांढरे बुट असले हे गुंठा मंत्री छाप लोक, यांच्यावर बरेच काही लिहीता आले असते. या शिवाय स्कॉर्पिओच्या मागे शिवाजी महाराजांचा स्टिकर लावून , 'राजे तुम्ही परत या' अशी विव्हळणारे मावळे ( वास्तविक राजे खरचं परत आले तर आधी यांनाच टकमकावरून खाली ढकलतील) नाही तर तलवारीचे किंवा बंदुकीचे चित्र लावलेले पैलवान, नाद खुळा, जाणता राजा, दादा, नाना, आण्णा असले साहित्य प्रसवणारे उदयन्मुख नेतृत्व हा सगळाच प्रकार तिरस्कार आणतो. यांच्या बर्याच गमती जमती सांगणे शक्य आहे. असो.
पण तुम्ही प्रयत्न केलाय तरी. अश्या प्रकारचा लेख लिहीताना थोडी तयारी करायला हवी याबध्दल वरच्या मताशी सहमत.

ओरायन's picture

7 Oct 2017 - 12:26 am | ओरायन

आपले म्हणणे , पुर्वतयारीबाबत ,पटले. तुम्ही ज्या सुचना केल्या आहेत त्या योग्यच आहेत.आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद .

ओरायन's picture

7 Oct 2017 - 12:29 am | ओरायन

आपस दिलेल्या दुव्यावरून मागील आपला लेख वाचला. आवडला.

सिरुसेरि's picture

6 Oct 2017 - 6:24 pm | सिरुसेरि

लेखाचा उद्देश आवडला . प्रतिसादही माहितीपुर्ण आणी सावध करणारे .

"बघतोस काय , मुजरा कर " / "ये आडा मारेगा "

ओरायन's picture

7 Oct 2017 - 12:31 am | ओरायन

धन्यवाद !