ये कलरफुल ऐक ना

पवन तिकटे's picture
पवन तिकटे in जनातलं, मनातलं
4 Oct 2017 - 8:01 pm

ये कलरफुल ऐक ना !

आज खूप दिवसांनी तिचा फोन आला.
ती : काय करतोय
मी : हॅलो कोण ? (मी हळूच विचारलं)
ती : अरे मी तुझी पिल्लू
विसरलास की काय इतक्या लवकर.
मी : नाही ग, इतक्या लवकर कसे विसरेल तुला.
खूप स्वप्न बघितली आहे ना तुझ्यासोबत.
अन ते साक्ष करण्याचं ध्येय देखील ठरवलं आहे
मग सहजासहजी कसे विसरेल मी तुला
शक्यच नाही .
ती : हो का ?
मी : का बरं, म्हणजे काही संशय.
ती: नाही रे वेड्या
मी: मग
ती : असच
मी : बर ऐकना,
तुझा कॉल आल्याशिवाय मी जेवण कधीच करणार नाही.
ती : ठीक आहे रे पिल्लू,
मी रोज करत जाईल तुला कॉल, नको tension घेऊस.
चल बाय भेटू कॉलेज मध्ये
मी : बाय
बाय म्हणालो अन सकाळी कॉलेजला लवकर गेलो.
वेडीच्या भेटीसाठी आनंदातच तिच्या येण्याची वेड्यागत वाट पाहू
लागलो. कॉलेज च्या गेटवर एकटाच उभा राहत.
पाहता पाहता कॉलेज भरायला शेवटची पाच मिनिटे बाकी होती.
तरी तिची वाट पाहणं मी सोडत नव्हतो. अस वाटायच आता येईल
नंतर येईल पण नाही कॉलेजची घनटा वाजली.
वर्गामध्ये जाऊन बसलो तिच्या मैत्रनिना विचारणा केली,
की माझी पिल्लू आज का नाही आली.
उलट माझीच थट्टा करत " तुला माहिती तुझी पिल्लू का नाही आली ती"
तिची मैत्रिन बोलली...

जसाजसा वेळ जात होता, सैरावैरा जीव होत होता. की अजूनही का नाही आली.
तिच्याविना एकांत असा भासू लागला की जणु कुणीतरी हृदयाच्या
आरपार थेट काळजावर जोरदार घाव केला असावा....
कॉलेज सुटणायची वेळ झाली, मी जोरात धापा टाकत टाकत घरी आलो
कपाटातुन मोबाईल काढला , अन missed call चेक केले ... एकही नाही.
मेसेज चेक केलं तेही नाही..
स्वतःला दोष देऊ लागलो, की काय झालं असावं तिला.
"किती दुःख मनात माझ्या
मी स्वतःच झेलतो, दुःख माझे
किती घाव हृदयात माझ्या
मी स्वतःच पेलतो, घाव माझे"

संध्याकाळ झाली तिच्या फोनची वाट पाहू लागलो,
वाट पाहता पाहता कधी ती रात्र सरली कळलच नाही.
सकाळी जाग आली तसाच ताडकन उठलो अन मोबाईल घेतला
पाहतो तर काय सकाळचे पाच वाजलेले .
अन एकही मिसकॉल नाही...
पहिला दिवस सरला, दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी निघालो
चहा आटोपला अन कोलेजकडे धाव घेतली.
तिची वाट नेहमी रोजच्या सारखी पाहत होतो , ती नाही आली.

वर्गामध्ये बसलो अन माझे डोळे अचानक फिरू लागले,
अशक्तपणा जाणवू लागला कारण ठरवलं होतं ना की, तिचा कॉल
आल्याशिवाय जेवण करायचं नाही.
तो दुसरा दिवसही कसाबसा काढला. तिच्याविना,
कॉलेजमधून आल्यावर डोकं जड पडलं . काहीच सुचत नव्हते
अन सलग दोन दिवस जेवण न केल्याने अशक्तपणा जाणवणे साहजिकच
होते.
घरी आल्यावर जशी बॅग फेकून दिली अन रडत रडत कॉटवर तसाच पडलो
तिच्या आठवणीत, आई म्हणाली की दोन दिवसापासून जेवण करत नाहीये
काय झालंय.?
मी तिच्या रागाच्या भरात बिचाऱ्या आईवर ओरडलो, की " मला भूक
नाहीये, मनात आल्यावर करेल जेवण"
तीही बिचारी ऐकून शांतपणे काहीही नाही बोलली.
तिसऱ्या दिवशीही कॉलेजमध्ये नाही आली,
त्या दिवशी मित्राचा वाढदिवस होता. वर्षातून एकदाच येणारा
आनंदाचा क्षण म्हणजे वाढदिवस..
मित्राचा मोठा हट्ट होता म्हणून थोडंफार केक खाल्ला.
सलग तीन दिवस जेवण नाही , तब्बेतीमध्ये कमतरता भासू लागली
अन हे घरच्यांच्या पण लक्षात आले.

सरता सरता एक आठवडा सरला.सलग सात दिवस ती कॉलेजला आली नाही.
मग आठव्या दिवशी तिचे आगमन झाले.
तिला पाहिल्यावर एकदम भारावून गेलो. काय करावे काहीच सुचत नव्हते.
तिच्यावर रागवाव की प्रेमाने समजूत घालावी, की, तुला या प्रेमवेड्याची आठवण
नाही आली का ग.?
मला तिला बोलायचं होत पण माझी एक अट होती,की सुरुवात तिने करावी.
कॉलेज भरल्यावर ती आली वर्गामध्ये बसली. मी सारखा तिच्याकडे पहात होतो.
रडूही येत होतं. की माझी पिल्लू एकवेळ माझ्याकडे वळून बघेल. पण नाही
ती तिच्या मैत्रनिना बोलण्यात, हसण्यात इतकी व्यस्त होती की एकक्षण तिची
मान माझ्याकडे नाही वळाली..

तासांवर तास निघून गेले. कॉलेज सुटण्याची देखील वेळ झाली.
तरी तिची मान काही वळाली नाही.
कदाचित माझयाहीपेक्षा जास्त ती तिच्या मैत्रनिवर प्रेम करत असेल, या कारणास्तव
तिने पाहिले नसेल.....

कहते हे,अगर किसीं चीझ को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने
की कोशीष मे लग जाती हे.........
पण माझ्या आयुष्यात उलटंच....

तिला पाहिल्यावर माझ्या आतील कवी जागा व्हायचा त्याक्षणी तसच,

अफाट होती तुझी समरणशक्ती
मलाच कसे काय विसरलीस
कुणास ठाऊक
अबोल होते तुझे बोल
मग मला बोलण्यासाठी का नाही निघाले
कुणास ठाऊक.......

निराश होऊन घरी आलो,
तिच्या कॉल ची वाट पाहू लागलो कॉल आलंच नाही
ये कलरफुल ऐक ना!
मला बोलायचं आहे तुझ्याशी,
एकतरी कॅल कर ना मला...जिवंत राहण्यासाठी..

:- पवन बालाराम तिकटे
राहेरी ,
ता. सिंदखेड राजा
जि. बुलडाणा
7350942506

<strong></strong>

कथालेख

प्रतिक्रिया

पवन तिकटे's picture

4 Oct 2017 - 8:02 pm | पवन तिकटे

काळजाला फातिमा फासनरा माझा
हाहृदय चिरून काढणारा लेख

प्रचेतस's picture

4 Oct 2017 - 8:04 pm | प्रचेतस

फातिमा फासणारा म्हणजे काय?

अनन्त अवधुत's picture

5 Oct 2017 - 1:30 am | अनन्त अवधुत

काळिमाची बहीण असावी बहुतेक. लेख वाचून एक अंदाज.
काळजाला काळिमा फासणारा म्हणण्याऐवजी 'फासळ्यांना फातिमा फासणारा' हा अनुप्रास जास्त चांगला दिसतो. शिवाय इतके दिवस उपवास करून नायकाच्या फासळ्या दिसत असतीलच.

पुंबा's picture

5 Oct 2017 - 12:19 pm | पुंबा

हाहाहा..
'फासळ्यांना फातिमा फासणारा'
हहपुवा

चिनार's picture

5 Oct 2017 - 5:29 pm | चिनार

तसं नाय ते...

"पुन्हा ती जांभळी पाहात फफफ्फफफ्फफफ्फ फेसाळते...."
ह्यातला फ वापरलाय त्यांनी.
-- 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' फेम नानू सरंजामे

चिनार's picture

5 Oct 2017 - 5:30 pm | चिनार

*पहाट

जेम्स वांड's picture

7 Oct 2017 - 11:27 pm | जेम्स वांड

कधी कधी तुमच्याही मनाचा पारवा नागवा होतो का म्हणे ?
:D:D:D:D

थॉर माणूस's picture

4 Oct 2017 - 11:11 pm | थॉर माणूस

हृदय चिरण्याचं माहिती नाही, पण थेट आयक्यूवर आघात करणारा लेख किंवा डोक्यावरचे केस कमी करणारा लेख असे काहीतरी नक्की म्हणता येईल.

अभ्या..'s picture

4 Oct 2017 - 8:56 pm | अभ्या..

वाटलंच च्यायला,
केकच्या तुकड्यावर तीन तीन दिवसं काढणार्‍या पिल्लू, शोना, जानू, स्वीटूचेच गुणगान असणार.
.
शोनाची पानपट्टीची उधारी झालीय पाच हजार. द्यायची कुणी?
शाना बन सोनू.....काय नसतंय हे

Rahul D's picture

8 Oct 2017 - 8:12 am | Rahul D

अहो कॉलेजच्या मागे हॉटेल होते, त्याचे मिसळ आणि चहा कॉफीची उधारी देताना नाकीनऊ यायचे.

अभिजीत अवलिया's picture

4 Oct 2017 - 9:52 pm | अभिजीत अवलिया

तुझा कॉल आल्याशिवाय मी जेवण कधीच करणार नाही.

प्रेम वगैरे ठीक आहे. पण असलंं काही कशाला?
जेवायला सुरवात केलात का आता?

अगर किसीं चीझ को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने
की कोशीष मे लग जाती हे.........

हे फक्त शाहरुख खानच्या रीळ लाईफ मधे होते. रिअल लाईफ मधे (कुणाच्याही) होत असेल असे तुम्हाला वाटते का?

सतिश म्हेत्रे's picture

4 Oct 2017 - 10:47 pm | सतिश म्हेत्रे

सांगा बरं...

कदाचित माझयाहीपेक्षा जास्त ती तिच्या मैत्रनिवर प्रेम करत असेल, या कारणास्तव
तिने पाहिले नसेल.....

हम्म्म्म..

तुझा कॉल आल्याशिवाय मी जेवण कधीच करणार नाही.
जेवणात चिकन असेल तरी?

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Oct 2017 - 7:34 pm | अमरेंद्र बाहुबली

बहुतेक तीने आणखी दोन चार जणांना त्याच दिवशी काँल केले असतील. आता ती बिचारी कोणाकोणाला लक्षात ठेवेल. तुम्ही इतकं लावून नव्हतं घ्यायचं.

सतिश गावडे's picture

5 Oct 2017 - 9:28 pm | सतिश गावडे

तुमची पिल्लू उडाली भूर
तुम्ही फातिमा फासला

तुषार काळभोर's picture

6 Oct 2017 - 9:52 am | तुषार काळभोर

मागच्या दहा हजार वर्षात उभ्या महाराष्ट्रात अशी लवष्टोरी कोणी लिहिली नव्हती.

अवांतर:
YZ चित्रपटातील काका गाण्याचे शब्द

मनू पिल्लू बाबू म्हणवता,
ही तर बोक्याची नावं सारी.
हे कायम म्हणतात डिअर,
पण स्टेटस नसतं कधीच क्लिअर.
हे कामं घेतात करून,
पण प्रेम बरोबर दुसऱ्यावर.
ठरते लग्न,
हातात नुसतंच.....
.
.
.
बघणं!

चाणक्य's picture

6 Oct 2017 - 9:55 am | चाणक्य

.

पिवळा डांबिस's picture

6 Oct 2017 - 10:07 pm | पिवळा डांबिस

कथा/संवाद अतिशय आवड्ले.
मिपावर असं साहित्य क्वचितच येतं, अजून भरभरून येऊ द्यात!!
(अवांतरः आज बायकोला, "ये कलरफुल, ऐक ना!" अशी हाक मारायचा विचार आहे. बघू काय प्रतिक्रिया येतेय ती!)
कलरप्रेमी,
पिवळा डांबिस

काकीक मारल्यात काय कलरफुल हाक? काय झाला मगे? =)))

जव्हेरगंज's picture

7 Oct 2017 - 11:17 pm | जव्हेरगंज

जंगी

भयानक करमणूक झाली प्रतिसाद वाचूनच! =)))

सस्नेह's picture

8 Oct 2017 - 7:14 am | सस्नेह

मी तर बसमधे इतकी हसले की मागचे पुढचे लोक्स वाकून वाकून बघायला लागले. =))

तिमा's picture

8 Oct 2017 - 12:36 pm | तिमा

इतकी हृदयद्रावक लव-स्टोरी आजपर्यंत वाचली नव्हती.
माझं ऐका. तुमच्या पिल्लुला गोव्यात डोना पावला ला घेऊन जा. पुढचं सगळं काळ बघून घेईल.

सस्नेह's picture

8 Oct 2017 - 3:44 pm | सस्नेह

हृदय द्रावक नाही हो, हृदय चीरून काढणारी !

नाखु's picture

8 Oct 2017 - 6:30 pm | नाखु

कवीता वारंवार येवोत,भले लोक डँमफुल होउन, ब्युटिफुल गोष्टी विसरतील असं आमचे हे म्हणतात.
मिपा सार्वकालिन माई

मी : नाही ग, इतक्या लवकर कसे विसरेल तुला.

म्हणजे इतक्या लवकर नाही विसरणार, पण हळूहळू विसरणार, असंच ना??

हरवलेला's picture

8 Oct 2017 - 7:29 pm | हरवलेला

अजून थोडा प्रयत्न केला तर जीवन मोहित्यांसारखे अजरामर व्हाल.

एका नवकवीची भ्रूणहत्या केली मिपाकरांनी :(

जेम्स वांड's picture

8 Oct 2017 - 8:36 pm | जेम्स वांड

आईवर ओरडणाऱ्याला खरंच कानफाटायची इच्छा होते राव.