दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - आन्जीच्या गोष्टी

Primary tabs

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in दिवाळी अंक
21 Oct 2017 - 12:00 am

Header2

लेखिका - आतिवास

अभिवाचन - अनुष्का सचिन पत्की (इयत्ता ६ वी), वाशी, उस्मानाबाद
आप्ल्या मिपावर एक लई इपितर कार्टी हाय. बरोब्बर १०० शब्दात बोलती. पण असं बोलती की ज्याचं नाव ते! मिपा दिवाळी अंकात बोलायला मिळणार म्हण्लं की बराब्बर आली . कशी चुरुचुरु बोलती बगा!

ह्या आन्जीला आवाज दिला हाय आमच्या अनुष्कानं. वाचशील का ग गोष्ट? विचारलं तर धा मिंटात फाईल पाठवल्यात खटाखट! असं बोल न तसं बोलं करू करू आमी काई लेकराला तरास दिला नाई. तिनं तिच्या मनानीच गोष्टी वाचल्या. अशा ह्या गुणाच्या बाळाला आपल्या मिपाकडून खना खन पर्तिसाद यायला पायजेत बर्का!!

पैला नंबर

नौस

शरयत

गपचिप

Footer

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

21 Oct 2017 - 5:17 pm | पद्मावति

अरे वाह वाह, खुद्द आन्जक्का आल्या आहेत आज गोष्टी सांगायला :)
खूप खूप सुंदर अभिवचन केलंय बरं का अनुश्का ताई तुम्ही. मज्जा आली ऐकून. खणखणीत आवाज आणि परफेक्ट उच्चार...मस्तच!

अरे काय! किती सुंदर...! अहो अनुष्काताई, तुमचं नाव आजपासून आंजी बरं का…! एक काम कराल का? युट्यूबवर आंजीच्या पोशाखात ह्या कथांचे कथाकथन कराल का? आंजीला आवाज दिलात, तिची भूमिकाही करा. तुमचं किती कौतुक करू असं झालं आहे. खूपखूप आवडलं अभिवाचन. भरभरून आशीर्वाद. खूप मोठी हो!

('गोष्ट...' टीम, कास्टिंग पर्फेक्ट आहे. तुम्हांला खास धन्यवाद.)

आवाज छाने, उच्चार पण स्पष्ट.
अनुष्काचे कौतुक आहे पण ती तीची रोजची भाषा नाहीये हे कळतेय. बरेच शब्द प्रचलित भाषेपेक्षा अत्यंत वेगळ्या पध्दतीने उच्चारले गेलेले आहेत.

पिलीयन रायडर's picture

21 Oct 2017 - 7:13 pm | पिलीयन रायडर

हो अर्थातच! ती उस्मानाबादची आहे. पण एकाच ट्राय मध्ये हे अगदी झ्याक झालंय असं मला वाटतं (स्वाभाविक आहे, पुतणी आहे माझी!) आणि तिला योग्य उच्चार सांगायला मलाही ते माहिती नव्हते ;)
वेळ असता अजून निवांत हातात तर बरेच प्रयोग करायचे होते. नेकष्ट टाइम! तयारी करून घेतली तर पोरगी उत्तम करेल हे अजून.

अभ्या..'s picture

21 Oct 2017 - 7:15 pm | अभ्या..

बेस्टच,
मला सांगायचं की नै मग. उस्मानाबाद कीती लांबसे? आम्ही हपिसात बसून केलं असतं रेकॉर्डिंग. :)
एनीवे कीपीटप

पिलीयन रायडर's picture

21 Oct 2017 - 8:03 pm | पिलीयन रायडर

अरे मग लेको द्या की आता! हे नाही तर दुसरं काही वाचून द्या. गोष्ट... टीम आहेच. करत राहू आम्ही अपलोड.

रेवती's picture

21 Oct 2017 - 6:57 pm | रेवती

अगदी झ्याक जमलय वाचन!
एकदम आन्जी येऊन वाचायलिये असं वाटलं.
अनुष्काचे कौतुक करावे तितके थोडे.

सविता००१'s picture

21 Oct 2017 - 10:26 pm | सविता००१

आंजी तर आवडतेच भन्नाट. पण या अनुष्काताई पण खूप खूप आवडल्या बुवा आम्हाला.
वरती एस यांनी जो प्रतिसाद दिलाय तो खरंच भारी आहे पिरा.
अभ्याला विचारून खरे उच्चार माहिती करून घ्यायचे आणि अनुष्काकडून मस्त आंजीच्या पोषाखात यू ट्यूब व्हिडिओ कर.
भारीच होईल हे.
आतिवास ताई, तुमचंही म्हणणं कळूदे.

नाखु's picture

22 Oct 2017 - 12:52 pm | नाखु

ने अर्थ सांगुन काही शब्द "त्या टेचात आणि हेलात" नक्की ऐकविले असते, हे अभिवाचन आणखीनच खुलून आलं असते

अनुष्काच्या आवाजात आणि उच्चारात सफाई व हुकुमत दोन्ही आहे.

मजा आली

श्रुतिका लक्षात असलेला नाखु रेडिओवाला

स्नेहांकिता's picture

23 Oct 2017 - 12:24 pm | स्नेहांकिता

शाब्बास हो आन्जी, न्हवं, अनुष्का !!

चिगो's picture

23 Oct 2017 - 5:28 pm | चिगो

अनुष्काचा प्रयत्न आवडला. तिचे उच्चार सुस्पष्ट आहेत. त्यासाठी कौतूकच आहे. पण अभ्या म्हणाल्याप्रमाणे तिला आन्जीची भाषा/बोली बोलण्याची सवय नाही किंवा तीने प्रचलित बोली ऐकलेली नसावी हे जाणवतंय.

मित्रहो's picture

23 Oct 2017 - 7:17 pm | मित्रहो

अतिवास ताईंनी आंजीला शब्द दिले तर अनुष्काताईंनी आन्जीला आवाज दिला. मस्त एकदम. आन्जी पण आवडली आपल्याला. सुस्पष्ट उच्चार.

सिरुसेरि's picture

24 Oct 2017 - 5:44 pm | सिरुसेरि

खट्याळ आंजी .

सुखीमाणूस's picture

27 Oct 2017 - 4:18 pm | सुखीमाणूस

मला आंजी माहीत नाही. माझे मिपा वाचन गेल्या २ , २.५ वर्षातले. त्यामुळे आंजी वाचलेली नाही.
आता शोधुन वाचायला हवे.

अनुष्काचे खुप खुप कौतुक. तिचा आवाज मस्त आहे.