पुढील लोकसभेसाठी काँग्रेसकडे असलेले पर्याय..

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in काथ्याकूट
27 Sep 2017 - 4:55 pm
गाभा: 

राजकारणातला माझा अभ्यास दांडगा नाही.
पण सध्या देशातले उलट सुलट मतप्रवाह बघितल्यास निदान काही प्रमाणात तरी मोदी सरकार विरोधात जनमत तयार होत आहे असे दिसते आहे (मुद्दे: नोटाबंदी , GST ई).
पण या विरोधी जनमताचा फायदा पुढील लोकसभेत पदरात पाडून घ्यायचा असल्यास काँग्रेसला पंतप्रधानपदासाठी सक्षम उमेदवार द्यावा लागेल (म्हणजे लगेच काँग्रेसला बहूमत मिळेल असे मला म्हणायचे नाही, पण निदान असलेल्या जागा टिकवता येतील वा काही प्रमाणात वाढवता येतील ) राहूल गांधींची लोकप्रियता फारशी नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसने कोणत्या नेत्याला समोर आणावे असे तुम्हाला वाटते ?

[मी मोदीभक्ती वा मोदीप्रेम यापैकी कशानेही प्रेरित न होता तटस्थपणे हा धागा काढत आहे, फक्त कॉंग्रेसकडे असलेल्या पर्यांयाचा उहापोह करणे इतकाच माफक उद्देश]

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

27 Sep 2017 - 4:57 pm | मराठी कथालेखक

पृथ्वीराज चौहान
कारणे :
१) स्वच्छ प्रतिमा,
२) मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात लाभलेली माफक लोकप्रियता
३) एक अभ्यासू तसेच खंबीर नेता अशी काहीशी प्रतिमा

सगळ्यात महत्वाचे क्वालिफिकेशन तर तुम्ही दिलेच नाही

४) गांधी घराण्याशी निष्ठावंत

मराठी कथालेखक's picture

27 Sep 2017 - 5:10 pm | मराठी कथालेखक

नाही.. कारण मला ते महत्वाचं वाटत नाही (सोनिया/राहूल गांधीना वाटू शकतं)

पगला गजोधर's picture

27 Sep 2017 - 5:27 pm | पगला गजोधर

कारण मला ते महत्वाचं वाटत नाही

मला सांगा, तुम्हा-आम्हाला वाटून काय उपेग ?

शेवटी सोनिया / राहुल च तिकीट देणार, पक्षाचा पंप्र चा चेहेरा कोण ते ठरवणार ...
बाकी पक्षांतर्गत निवडणूक इज जस्ट फॉर्मॅलिटी

मराठी कथालेखक's picture

27 Sep 2017 - 5:31 pm | मराठी कथालेखक

अहो असं कसं .. आपल्याला जे वाटतं त्याचाच आपण काथ्या कुटणार ना..
काँग्रेसवाले तर 'रागा'चाच राग आवळत राहणार निदान सोनिया हयात असेपर्यंत तरी.. त्यांच्या पश्चात काय होते ते बघायचे.

पुंबा's picture

27 Sep 2017 - 5:13 pm | पुंबा

उत्तम पर्याय..
पण गांधींना लोक जास्त विटलेत हो..
त्यांचा पत्ता कट करू शकणारा असेल कुणी तरच त्याला स्विकारतील लोक..

जेम्स वांड's picture

27 Sep 2017 - 5:26 pm | जेम्स वांड

त्यांचा पत्ता कट करू शकतील अश्या नेत्यांना काँग्रेस मध्ये गांधी लोकच कट करून टाकतात. ह्याच निर्नायकी परिस्थिती मुळे त्यांचे लोकसभेत पानिपत झाले, असं आपलं माझं वैयक्तिक मत.

काँग्रेस मध्ये अतिशय गंभीर लीडरशिप डेफिसिट आहे, पण हे काँग्रेस पैकीच कितीजण मंजूर करतील? त्यांच्यामते राहुल गांधी ह्यांचे 'सक्षम युवा नेतृत्व' मोदींच्या 'फासिस्ट हुकूमशाही सरकारला' धूळ चारणारच आहे २०१९ मध्ये. शहामृगाप्रमाणे काँग्रेसी नेते वाळूत डोके खुपसून बसलेले आहेत, आता हे देशाचं सुदैव म्हणा का दुर्दैव पण पृथ्वीराज चव्हाण सुद्धा जितकं वजन राखून आहेत ते एकतर त्यांच्या वैयक्तिक घराण्याच्या नावामुळे अन दुसरे म्हणजे 'गांधी फॅमिली लॉयलिस्ट' असल्यामुळे, एक ते दुसरे अशोक चव्हाण , त्यांची तर छवी सुद्धा साफ नाही अन ते 'गांधी फॅमिली लॉयलिस्ट' आहेतच. बाकी दिग्विजय अन थरूर वगैरे न बोललेलं बरं. पर्यायच नाहीये, अन अशी अवस्था काँग्रेसने स्वतःची स्वतःच करुन घेतली आहे असं वाटतंय.

जेम्स वांड's picture

27 Sep 2017 - 5:15 pm | जेम्स वांड

पृथ्वीराज साहेब कराडचे आहेत म्हणजे मराठी आहेत तरी

ते 'चौहान' ऐवजी 'चव्हाण' असं लिहिलंत तर बरं होईल.

मराठी कथालेखक's picture

27 Sep 2017 - 5:28 pm | मराठी कथालेखक

चूक मान्य.. पण आता कशी दुरुस्त करणार ?
संम पैकी कुणी इकडे फिरकले तरच दुरुस्त होईल..

जेम्स वांड's picture

27 Sep 2017 - 5:30 pm | जेम्स वांड

संपादक मंडळ कृपया मराठी कथालेखक ह्यांना मदत कराल का?

१) मनमोहन सिंग (रिटर्न्स, माझी पहिली पसंती) - त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि धोरणात्मक निर्णयाची फळे आता जनतेला पटू लागली आहेत.
२) प्रियांका गांधी - गांधी घराण्याची छाप बाकी नेतृत्वाबद्दलची माहिती नाही.
३) नंदन नीलकेणी (काँग्रेस कडून लढायला तयार झाले तर) - अभ्यासू व्यक्तिमत्व. भारताच्या सोशो-इकॉनॉमिक प्रश्नांची चांगली जाण.
4) सचिन पायलट/ ज्योतिरादित्य - खूप तरुण आहेत पण अभ्यासू बरोबर ग्लॅमर्स चेहरे आहेत.

जेम्स वांड's picture

27 Sep 2017 - 5:42 pm | जेम्स वांड

नंदन निलकेणी, थेट पंतप्रधान चेहरा? आय एम स्केपटीकल, त्यांना अंतर्गत थेरं सांभाळता सांभाळताच घाम फुटेल, काँग्रेस मधली बडी धेंड इतक्या सहज कोणालाही मागाहून येऊन पुढं जाऊ देतील असं वाटत नाही पाटील.

प्रियांका गांधी म्हणजे चक्क काँग्रेसच्या गांधी घराणे अवलंबित्वाचं उदाहरण वाटतं, त्या स्वतः राजकारणात रस नाही असं म्हणल्याचे स्मरते तरी , 'मॅडम आता तरी या म्हणत आळवणे' म्हणजे घराणेशाहीचा परमोच्च अध्याय वाटतो.

सचिन पायलट/ज्योतिरादित्य शिंदे, हे तर दोन पिढ्यांपासून गांधी घराणे अंकित लोक, वाडवाडीलांपासून गांधी फॅमिली लॉयलिस्ट, ते पर्याय कसे होणार? ते स्वतःच रेजिमेंटेड आहेत ते काय पर्याय होणार?

जयराम रमेश हे एक नाव आहे, पण त्यांच्या गांधी परिवार भक्ती बद्दल मला कल्पना नाही, त्यातल्या त्यात स्वतंत्र बाणा असणारे तेच एक आठवले.

विशुमित's picture

27 Sep 2017 - 5:54 pm | विशुमित

२-३-४ तशी तगडी नावे नाहीत याची मला जाणीव आहे. फक्त काँग्रेसच्या उपलब्ध पर्यायामधील माझी पसंती होती.
प्रियांका गांधींच्या घराणेशाहीला सपोर्ट नाही पण गांधी घराण्याच्या वालयामुळे सक्षम नेतृत्व उभे राहू शकते म्हणून पसंती होती.

जयराम रमेश हे नाव लिस्ट मध्ये घायला विसरलो. त्यांच्या स्वतंत्र बाणा याबद्दल सहमत.
अजून आठवली तर टाकतो.

भंकस बाबा's picture

28 Sep 2017 - 12:53 pm | भंकस बाबा

थोडे निर्भीड वाटतात खरे ! माझी पसंती

मराठी कथालेखक's picture

27 Sep 2017 - 6:10 pm | मराठी कथालेखक

काँग्रेसचे वेगवेगळ्या राज्यांतील कोणते विद्यमान/माजी मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत /होते ?
राज्य सांभाळण्याचा अनुभव असलेल्यास पंतप्रधानपदाची संधी द्यावी असे मला वाटते (मोदींप्रमाणे )

मराठी कथालेखक's picture

27 Sep 2017 - 6:15 pm | मराठी कथालेखक

मला वाटते गांधी घराण्याशी असलेली एकनिष्ठा ही अनेक काँग्रेस नेत्यांसाठी अपरिहार्य असावी. अशी एकनिष्ठा आहे म्हणून ती व्यक्ती पंतप्रधान बनण्यास अयोग्य असे मला वाटत नाही. योग्य वेळ आल्यावर सूत्रे स्वतःच्या हातात घेण्याची क्षमता असलेला नेता काँग्रेसच्या सर्वोच्चपदी यावा, पण योग्य वेळ न येताच असे काही धाडस महागात पडू शकते.

पगला गजोधर's picture

27 Sep 2017 - 6:22 pm | पगला गजोधर

योग्य वेळ आल्यावर सूत्रे स्वतःच्या हातात घेण्याची क्षमता असलेला नेता काँग्रेसच्या सर्वोच्चपदी यावा

असा पी व्ही नरसिंहा राव विरळाच .....

जेम्स वांड's picture

27 Sep 2017 - 6:49 pm | जेम्स वांड

सूत्रं स्वहाती घेतली अन मयत झाले तेव्हा बाईंनी अकबर रोड मुख्यालयात त्यांचे पार्थिवही कार्यकर्त्यांना अंतिम दर्शन व्हावे म्हणून ठेऊ दिलं नाही, थेट दारं लावून घेतली की हो , काँग्रेस मध्ये सूत्रे हाती घेणे म्हणजे ब्लास्फेमी म्हणावी असली परिस्थिती आजही आहे (सुदैव/दुर्दैव सापेक्ष)

पगला गजोधर's picture

27 Sep 2017 - 7:18 pm | पगला गजोधर

काही का असेना, पी व्ही आणि ममो या जोडगळी ने भारताला वाचवले असेच माझे मत राहील....

तसं बघायला गेलं तर, माझी आई सांगते, ती लहान असताना, नेहरू गेले, तेव्हा घरातले सर्व काळजीयुक्त चर्चा करत असल्याचे तिला स्मरते की "आता कसं होणार या देशाचं",पण पहा देशाने तरीही प्रगती केलीच न ....
त्यामुळे भारतातील लोकांची ही भीती अनाठायी वाटते, की फक्त एकच विशिष्ठ व्यक्ती, या देशाला वाचवू शकतो ....
या अश्या व्यक्तिपूजक मेन्टॅलिटी पासून दूर व्ह्यायला हवं ...

जेम्स वांड's picture

27 Sep 2017 - 8:26 pm | जेम्स वांड

त्या मतात काही गैर आहे असं माझं म्हणणं नाहीये. ऑन अ लार्ज आजही अर्थव्यवस्था 'राव-सिंह पॅरामीटर' वर चालत असेलही. पण त्यांना गांधी फॅमिली कडून चांगली वागणूक मिळाली नाही, हे पण खरं, मनमोहन पंप्र असताना अध्यादेश फाडून टाकणे वगैरे निषेधार्ह प्रकार झाले होते..

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Sep 2017 - 7:25 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

एक व्यक्ती देश बदलू शकते ह्यावर अनेकांचा विश्वास आहे हे बघून आश्चर्य वाटले. खंबीर नेत्रुत्व,वाक्चतुर्य ह्यांचे एका मर्यादेपर्यंत कौतुक असते. अमेरिकन स्टाईल अध्यक्षीय पद्धत लोकांना आवडायला लागली आहे की काय असे वाटायला लागले आहे.!

पगला गजोधर's picture

27 Sep 2017 - 8:18 pm | पगला गजोधर

तिथेही बोंबच आहे,

"मेक अमेरिका ग्रेट अगेन" म्हणत सत्तेत आला, पण तो एक जुमला होता हे दिसतंय.

ओबामाकेअर रिपिल करेन म्हणाला ... चांगला पर्याय देऊ शकला नाही त्याच्या पार्टीत सर्वमान्य होईल..

निओनाझींनी दंगल केली तर म्हणे बऱ्याच बाजू जबाबदार ...

मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याचा पांढरा हत्ती मनोनित , पैसे म्हणे मेक्सिकोकडून घेणार ....

हा माणूस ट्विटरवर एवढा फेकूगिरी करतो की आता अमेरिकेत याचा सपोर्ट कमी होतोय...

थॉर माणूस's picture

28 Sep 2017 - 1:45 am | थॉर माणूस

तिच भीती आहे, अध्यक्षीय लोकशाही चा प्रयोग सध्या ग्रामपंचायतीमधे सुरू झालाच आहे. आपल्या व्यक्तीपूजक जनतेला अशी लोकशाही कीतपत परवडेल ही जरा शंका आहे.

विशुमित's picture

28 Sep 2017 - 10:56 am | विशुमित

ग्रामपंचायत निवडणूक मी आता अनुभवतो आहे. खरंच जनतेतून सरपंच निवडणे गावासाठी परवडण्यासारखे नाही आहे असे वाटते.
अजून थोडा अनुभव घेऊन या विषयांबद्दल.टंकतो

पैसा's picture

27 Sep 2017 - 7:49 pm | पैसा

नरेंद्र मोदी

मोदक's picture

27 Sep 2017 - 8:44 pm | मोदक

सुब्रमण्यम स्वामी.

श्रीगुरुजी's picture

27 Sep 2017 - 8:42 pm | श्रीगुरुजी

सध्या तरी काँग्रेसकडे देशपातळीवरील मतदारांना आकर्षित करेल असा चेहरा नाही. काँग्रेसने असा कोणताही चेहरा तयार होऊन दिलेलाच नाही. निदान २०१९ साठी काँग्रेस कोणताही नवीन चेहरा पुढे न करता राहुलचाच चेहरा पुढे करेल असे वाटते. २०१९ मध्ये अर्थातच काँग्रेसची संख्या ४४ च्या खाली न उतरता त्यात वाढच होईल. त्यात किती वाढ होईल त्यावर राहुलचे भवितव्य अवलंबून राहील. काँग्रेस ४४ वरून ११० च्या पुढे पोहोचली तर संख्या वाढविण्याचे श्रेय राहुलला दिले जाऊन तो नेतेपदावर कायम राहील. जर काँग्रेस ७०-७५ पर्यंतच पोहोचली तर मात्र राहुल काँग्रेसला यश मिळवून देण्यास समर्थ नाही असा निष्कर्ष निघून काँग्रेसमध्ये नेता बदलाचे वारे सुरू होतील.

राहुलला पर्याय आणणे सोपे नाही. काँग्रेसमधील कोणताही जुना किंवा सध्या राजकारणात असलेला नेता निवडून फायदा नाही. यश मिळविण्यासाठी जनतेपुढे एक पूर्णपणे नवीन चेहरा आणायला लागतो जो लोकांना नवीन असल्यामुळे आशादायी वाटू शकेल. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने अतिशय योग्य चाल खेळून मोदींचे नाव पुढे आणले. जरी मोदी त्यावेळी गुजरातच्या राजकारणात ११-१२ वर्षे होते, तरीसुद्धा देशपातळीवर नेता म्हणून त्यांचे नाव कधीच आले नव्हते. २०१३ पर्यंत भाजपच्या नेतेपदासाठी वाजपेयी, अडवाणी, कधीतरी जेटली किंवा सुषमा स्वराज हीच नावे चर्चिली जायची. त्यापैकी वाजपेयींची कारकीर्द २००९ मध्येच संपली. अडवाणी हे २००९ मध्ये पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार होते. त्यांना जनतेने नाकारले होते. २०१३ मध्ये त्यांचे वयसुद्धा ८५ हून अधिक होते. त्यामुळे त्यांचा चेहरा पुढे करण्यात काहीच अर्थ नव्हता. उरलेल्यांपैकी जेटली हे जनाधार नसलेले नेते होते. सुषमा स्वराज या नक्कीच लोकप्रिय होत्या व अनेकवेळा निवडूनही आल्या होत्या. परंतु मोदी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीमुळे सर्वत्र माहित असणारे नाव होते. त्यांचे जितके कट्टर विरोधक होते तितकेच त्यांना कट्टर समर्थनही होते. त्यांना मुख्य विरोध २००२ ची गुजरात दंगल या कारणावरून होता. या कारणावरून त्यांना जितका विरोध व्हायचा तितके जास्त समर्थन त्यांना मिळत गेले कारण हा विरोध हिंदू वि. मुस्लिम, राष्ट्रवादी वि. राष्ट्रद्रोही, पाकिस्तानवादी वि. पाकिस्तानविरोधी या पातळीवर नेऊन ठेवण्यात ते यशस्वी झाले. त्यांना अडकविण्याचे काँग्रेसने असंख्य प्रयत्न केले. परंतु प्रत्येक वेळी ते त्यातून सहीसलामत निसटले व त्यातून त्यांची लोकप्रियता वाढत गेली आणि काँग्रेसबद्दल वाईट मत होत गेले.

जेव्हा त्यांना २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार निवडले तेव्हा जनतेसमोर राष्ट्रीय पातळीवर एक पूर्णपणे नवीन पर्याय निर्माण झाला. जर २०१३ मध्ये भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलाच नसता किंवा मोदींऐवजी अडवाणी किंवा जुन्या नेत्यांपैकी एखादा चेहरा पुढे आणला असता तर भाजपला फारसे यश मिळाले नसते. मोदींनी निवडणुक प्रचारात दोन धोरणांवर भर दिला. मनमोहन सिंह यांची कारकीर्द किती भ्रष्ट आहे, अकार्यक्षम आहे इ. वाईट गोष्टींवर भर दिला आणि त्याचवेळी आपण कोणते चांगले बदल करणार आहोत, परिस्थिती कशी सुधारणार आहोत हेही लोकांसमोर मांडले. त्यामुळे मोदींनी एकाचवेळी नकारात्मक आणि त्याच बरोबरीने सकारात्मक प्रचार करून निवडणुक जिंकली. त्यांनी आपण काय करणार आहोत हे फारसे न सांगता मनमोहन सरकार किती वाईट आहे याच मुद्द्यावर भर दिला असता तर त्यांना एवढे यश मिळाले नसते.

काँग्रेसला जर नेता बदलायचा असेल राष्ट्रीय पातळीवर जनतेला माहित असलेला परंतु राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात नसणारा एखादा लोकप्रिय नेता निवडावा लागेल. राहुलला पर्याय म्हणून ज्योतिरादित्य सिंदिया, सचिन पायलट, पृथ्वीराज चव्हाण इ. पैकी कोणीही योग्य पर्याय नाही कारण हे अनेक वर्षे राष्ट्रीय राजकारणात आहेत व त्यांनी आजतगायत फारसे काही स्पृहणीय केले नाही हे जनतेला माहित आहे. फारसे काही न करणार्‍या अनेक वर्षे राजकारणात असणार्‍या एखाद्या जुन्या नेत्यापेक्षा ज्याची पाटी पूर्ण कोरी आहे व जो फारसा राजकारणात नाही असा नेता पर्याय म्हणून लोकांना आवडतो. यादृष्टीने २०१९ नंतर काँग्रेसमधून प्रियांका गांधी-वडरा हे एकमेव नाव डोळ्यांसमोर येते. प्रियांका जनतेला माहित आहे. आजवर राजकारणात नसल्याने पाटी कोरी आहे. वयाने तरूण आहे. गांधी आडनावाचा फायदाच आहे. या सर्व दृष्टीने प्रियांका गांधी-वडरा हेच नाव २०२४ मधील काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा चेहरा असेल असे वाटते. अर्थात काँग्रेसने प्रियांकाला लगेच २०१९ मध्ये राजकारणात आणण्याची घाई करू नये, कारण तसे झाले तर २०२४ पर्यंत तिच्याभोवतीचे वलय फिके झाले असेल. मोदींप्रमाणेच निवडणुकीला काही महिने असताना २०२३ मध्ये प्रियांकाचे नाव पुढे आणले तर २०२४ मध्ये नक्कीच काँग्रेसला पुष्कळ फायदा होईल. अर्थात त्यावेळी कॉंग्रेसला बहुमत मिळेल का नाही हे पुढील ६-७ वर्षांवर अवलंबून राहील.

मोदक's picture

27 Sep 2017 - 9:10 pm | मोदक

योग्य विवेचन.

भारतासारख्या खंडप्राय देशात सक्षम विरोधक नाही हे सत्य पचवणे जड जात आहे, अर्थात राहूल आणि सोनीया गांधी यांच्या लघुदृष्टीला याचे श्रेय जाते. पक्ष टिकावा आणि वाढावा म्हणून दुसर्‍या फळीतले नेतृत्व उभे करणे ही पक्षनेतृत्वाची आणि वरिष्ठ नेत्यांची जबाबदारी असते, अशा ठिकाणी हुजरे शोभावेत असे मर्जीतले नेते ठेवल्याने काँग्रेसवर ही अवस्था आली आहे.

२०१९ ला भाजपाचे संख्याबळ कमी होईल हे नक्की आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी भाजपाला आत्ताच तातडीने पाउले उचलावी लागतील.

२०२४ ला भाजपाला उजवीकडेच पण सक्षम विरोधक तयार झालाच पाहिजे.

विशुमित's picture

28 Sep 2017 - 2:30 pm | विशुमित

बहुतांशी मुद्दे पटले आहेत.

रागा कडे एक राजकीय व्यक्ती म्हणुन अद्याप कोणीच पाहत नाही. सोनियांच्या मुलाचे आयुष्य सेटल करणे हेच कॉग्रेसी नेत्यांच्या आयुष्याचे परम ध्येय्य आहे. रागांना आपल्याला सिध्द करण्यासाठी अजुन किमान ५ ते १० वर्ष रात्रंदिवस कष्ट करावे लागतील. तेवढी तयारी त्यांची आहे असे वाटत नाही. प्रियंका गांधी यांना नेता म्हणुन स्विकारणे म्हणजे रागांचे करीयर संपले यावर शिक्कामोर्तब. आणि त्यांच्या पतिदेवांची करणी कितीही कष्ट केले तरी त्यांना मातीमोल करणारे पुर्वायुष्य.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Sep 2017 - 11:47 pm | अमरेंद्र बाहुबली

राँबर्ट वाड्रा ची जमीन घोटाळ्या संबंधात सीडी बनवून ठेवलीय भाजपने.

पुंबा's picture

28 Sep 2017 - 10:47 am | पुंबा

पर्फेक्ट..
खरं तर राहूल गांधीला इंटरेस्टच नाहीये या सार्‍यात असे वाटते. एखादा बळंच आई म्हणतो म्हणून इंजिनीअरींगला डोनेशन भरून अ‍ॅडमिशन घेतो तसल्यातला तो प्रकार आहे. कष्ट तर सोडूनच द्या निदान धंदा बुडतोय म्हटल्यावर दुकानाच्या धाकट्या मालकाला वाटेल तसे दु:ख सुद्धा कधी वाटल्याचे आढळ्ले नाही. १६ मे चे ते सुप्रसिद्ध स्मित आठवा. ५६ दिवसांची थायलंड ट्रिप आठवा. असं पार्टटाईम राजकारण कसं होईल?

विकास's picture

28 Sep 2017 - 12:13 am | विकास

आजचा खरा प्रश्न आहे की एकही विरोधी पक्ष नाही. त्यात काँग्रेसपण आले. दुसरे म्हणजे एकही स्वच्छ प्रतिमा नाही. मनमोहनसिंग जरी असले तरी त्यांची प्रतिमा ही दुर्दैवाने प्रधानमंत्री/प्रधानसेवक असण्या पेक्षा गांधीघराण्याचे (त्यातही सोनिया-राहूलचे) निष्ठावंत पाईक अशी झाली आहे. काँग्रेस स्वबळावर जिंकून येण्याची शक्यता कमी वाटते. कडबोळी सरकार मधे काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळणे आत्ता तरी अवघडच वाटत आहे. महाआघाडी वगैरे शब्द आणि त्यातील नेतृत्वाबद्दल चर्चा करणे आणि त्यातून ते जिंकण्याची आणि देशाचे चांगभल होण्याची आशा करणे म्हणजे Not failure but low aim is a crime असेच नुसते म्हणणे नाही तर वागण्यासारखे आहे.

आत्तापर्यंत तरी, या सरकारकडून कुठलेही भ्रष्ट वर्तन दिसलेले नाही. त्यांची काही/बरीच मते कुणाला आवडतील तर कुणाला आवडणार नाहीत. त्याला पर्याय देणारे, पक्षी: स्वच्छ प्रतिमा असलेले आणि तसे राहू शकणारे पर्याय आहेत का? का केवळ मोदींना हरवण्यासाठी, पप्पू गांधी, मुलायम, अखिलेश, लालू आणि लालूची पिलावळ चालणार आहे?

त्यामुळे काँग्रेसचा प्रधानमंत्री म्हणून उमेदवार कोण असेल याची एकदम चर्चा करायला लागण्याआधी काँग्रेसने (आणि इतर विरोधी पक्षांनी देखील) भाजपाला टक्कर देण्यासाठी नक्की काय करायला हवे या वर चर्चा (इथेच नाही तर इतरत्रही) झाली पाहीजे असे वाटते. दुर्दैवाने आपली माध्यमे आणि समाज यांच्या अपेक्षा कमी आहेत. राजकारण हे (प्रामुख्याने) देश घडवण्यासाठीचे क्षेत्र आहे आणि सत्ताकारण हा त्यातील एक अविभाज्य आणि अपरीहार्य भाग आहे हे आपण लक्षात घेत नाही आणि राजकारण्यांच्या खेळाकडे दोन बैलांच्या झुंजींप्रमाणे बघून बैलांचा पण अपमान करतो आणि देशाचा पण खेळखंडोबा...

सुबोध खरे's picture

28 Sep 2017 - 1:08 pm | सुबोध खरे

डॉ मनमोहन सिंह यांचे वय आता ८५ आहे आणि निवडणूक होईस्तोवर ८६. मी स्वतः त्यांना २००८ मध्ये दुसऱ्या बायपासच्या वेळेस पाहिले होते तितके ते चौकस आणि एकाग्र वाटत नाहीत. एकंदर वयाचा आणि प्रकृती अस्वास्थ्याचा( मधुमेह आणि हृदय विकार दोन्ही रोग आहेत) बऱ्यापैकी परिणाम दिसतो आहे. परवाच म्हणजे २६ सप्टेंबर रोजी त्यांचा ८५ वा वाढदिवस झाला. पण एकंदर पत्रकार किंवा काँग्रेस गटात कुठेच त्याबद्दल बातमी सुद्धा आली नाही. म्हणजेच निश्चलनीकरण कसे चूक होते एवढे सांगण्यापुरता त्यांचा काँग्रेस आणि वृत्तपत्रांना त्यांचा उपयोग राहिला आहे. माझ्या मताने त्यांनी आता सन्माननीय रित्या राजकारणातून निवृत्त व्हावे अन्यथा काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीत त्यांच्यासारख्य अत्यंत हुशार आणि विद्वान माणसाचे हे लोक "पोतेरे" करून टाकतील

मागच्या एक-दीड महिन्यापूर्वी एक बातमी होती कि सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन समोर २५ केसेस अशा आहेत कि त्यांची चौकशी होण्याची गरज आहे. पण त्यांना त्या साठी मुहूर्तच सापडत नाहीये. म्हणजे सध्या भ्रष्टाचार होत नाहीये कि त्याच्या बद्दल बोलले जात नाहीये? मला वाटते कि दुसरी शक्यताच जास्त आहे.

अण्णा हजारेंचे आंदोलन राजकारण मुक्त आहे असा त्यांचा अभिनिवेश होता. पण एवढे अटीतटीचे आंदोलन ज्या कारणासाठी केले ते कारण संपले कि मुदलात कारण वेगळेच होते? तीच गोष्ट बाबा रामदेव यांच्या काळ्या पैशांचे आंदोलन.

विशुमित's picture

2 Oct 2017 - 11:47 am | विशुमित

<<<आत्तापर्यंत तरी, या सरकारकडून कुठलेही भ्रष्ट वर्तन दिसलेले नाही>>
==> काय झालंय, आता जे विरोधक आहेत ते पूर्वी बराच काळ सत्तेत होते. त्यामुळे आंतरिक बाबींचे खाचखळगे त्यांना चांगले अवगत असणार. त्यामुळे या सरकारमधील लोकांना गफला करणे एवढे सोपे नसणार. गफला करण्याचा प्रयत्न जरी केला तरी लगेच एक्सपोस होतील. त्यात आता जनता पण प्रशासन आणि राजकारणाबाबत खूप सजग झाली आहे.
आपल्या राज्यच उदाहरण घ्याचं तर " तूर घोटाळा, चिक्की घोटाळा, भोसरी घोटाळा, लोकमंगल घोटाळा'. पचवायला जमलंच नाही. लगेच उघडे पडले. म्हणून तर मिस्टर क्लीन आहेत.
---
त्यामुळे ते "हाणून मारून इमानदार झाले आहेत"... असो.!!

श्रीगुरुजी's picture

2 Oct 2017 - 1:10 pm | श्रीगुरुजी

आपल्या राज्यच उदाहरण घ्याचं तर " तूर घोटाळा, चिक्की घोटाळा, भोसरी घोटाळा, लोकमंगल घोटाळा'. पचवायला जमलंच नाही. लगेच उघडे पडले. म्हणून तर मिस्टर क्लीन आहेत.

हे सगळे घोटाळे म्हणजे नबाब मलिक, धन्या मुंडे, अजित पवार असल्या असंतुष्ट निरूद्योग्यांनी पत्रकार परीषदेत केलेले बिनबुडाचे फुसके आरोप होते. आरोपात दम असता तर ते न्यायालयात गेले असते.

त्यामुळे ते "हाणून मारून इमानदार झाले आहेत"... असो.!!

कॉंंग्रेस-राष्ट्रवादीवाले फासावर चढवले किंवा त्यांना हत्तीच्या पायाखाली दिले तरी ते इमानदार होणार नाहीत.

<<<हे सगळे घोटाळे म्हणजे नबाब मलिक, धन्या मुंडे, अजित पवार असल्या असंतुष्ट निरूद्योग्यांनी पत्रकार परीषदेत केलेले बिनबुडाचे फुसके आरोप होते. आरोपात दम असता तर ते न्यायालयात गेले असते.>>>
==>> माझ्या माहिती प्रमाणे धनंजय मुंडे आणि अजित पवारांनी नुसती पत्रकार परिषदच नव्हे पण विधानपरिषदेत/ विधानसभेत "तूर आणि चिक्की घोटाळ्याबाबत" आवाज उठवला होता. न्यायालयाचे सुद्धा दार ठोठावले आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी (बहुदा हेमंत पाटील आहेत). (डिटेल्स देतो).
भोसरीच्या एम आय डी सी घोटाळ्यातून दाऊदचे कथित मित्र अजून सहीसलामत सुटलेले नाहीत.
देशमुखांचे 'लोकमंगल" नोटबंदीच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच वादाच्या भोऱ्यात अडकले होते. पण मिस्टर क्लीन यांच्याकडून जास्त अभ्यास न करता लगेच क्लीन चिट मिळाली.
माझा सांगायचा मुद्दा एवढाच होता की मनात इच्छा असून आणि कितीही प्रयत्न केले तरी सध्याच्या मंत्र्यांना मोठे भ्रष्टाचार करणे वाटते तेवढे सोपे नाही. कारण विरोधक खाचखळग्यात माहीर आहेत, मीडिया असल्याच खुराकावर टपून आहे आणि डेटाच्या मुबलक उपलब्धीमुळे जनता सजग आहे.
('धन्या मुंडे' असले पातळीहीन शब्द तुमच्याकडून अपेक्षित नव्हते. सयंत आणि सुसंस्कृत प्रतिक्रियांसाठी मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. असो. ज्याची त्याची मर्जी.!!)
---
<<<कॉंंग्रेस-राष्ट्रवादीवाले फासावर चढवले किंवा त्यांना हत्तीच्या पायाखाली दिले तरी ते इमानदार होणार नाहीत.>>
==>> हसायला आले तुमची प्रतिक्रिया वाचून. विनोद ऎकुवून मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद.

श्रीगुरुजी's picture

2 Oct 2017 - 5:51 pm | श्रीगुरुजी

विधीमंडळाच्या सदनात वाटेल ते निराधार आरोप करता येतात, कारण सदनातील वक्तव्यांना न्यायालयात आव्हान देता येत नाही. घोटाळ्यांच्या आरोपात थोडेसे तथ्य असते तरी न्यायालयाने त्याची दखल घेतली असती. मागील वर्षी नबाब मलिक गिरीश बापटांवर असेच हास्यास्पद आरोप करीत होता. आधी म्हणाला की त्यांनी तूरडाळ खरेदीत २०० कोटींचा घोटाळा केला. काही दिवसांनी त्याने हाच आकडा २००० कोटींवर नेला. नंतर हा आकडा २०००० कोटींवर नेला. आता हा आकडा २००००००००००००० कोटींवर गेला असेल. या आरोपामागे पुरावे शून्य. त्यामुळे न्यायालयात जायची हिंमत नाही. याच मलिकला २००३ मध्ये घोटाळा बाहेर आल्याने राजीनामा द्यावा लागला होता.

तथाकथित चिक्की घोटाळा तसाच पोकळ. नुसतेच आरोप, पुरावे काहीही नाहीत. धन्याच्या आरोपांमागे चुलत घराण्याचे शत्रुत्व आहे हे लपलेले नाही. हा माणूस सूतगिरणीमधील घोटाळ्याच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आहे.

सुब्रह्मण्यम् स्वामी बघा. २ जी घोटाळा, कोळसा घोटाळा, National Herold प्रकरण इ. घोटाळ्यांबाबतीत ते नुसते आरोप करून थांबले नाहीत तर त्यांनी प्रकरण न्यायालयात नेले. भाजपच्या मंत्र्यांविरूद्ध न्यायालयात जायची विरोधकांची हिंमत आहे का?

सर टोबी's picture

2 Oct 2017 - 8:33 pm | सर टोबी

एकदम स्वच्छ असण्याचा दावा केला गेला आणि इतके प्रतिसाद? स्वच्छता थोडी संशयास्पद आहे का?

श्रीगुरुजी's picture

2 Oct 2017 - 11:46 pm | श्रीगुरुजी

दाऊदचे कथित मित्र

आआपची अंजली दमानिया ही केजरीवालांप्रमाणेच एक वाचाळ महिला आहे. बेफाट निराधार आरोप करायचे एवढेच आआपवाल्यांना चांगले जमते.

मागील वर्षी आआपच्या गुजरातस्थित मनीष भंगाळे नामक व्यक्तीने असा आरोप केला होता की त्याने पाकिस्तानी फोन कंपनीचे संकेतस्थळ हॅक केले व त्यातून त्याने दाऊदचा क्रमांक मिळविला. त्या क्रमांकावरून केलेल्या कॉल्सच्या यादीत एकनाथ खडसेंचा क्रमांक आहे.

या आरोपानंतर लगेचच दमानिया बाईंनी पत्रकार परीषद घेऊन खडसेंचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करून त्या मोकळ्या झाल्या. वास्तविक हे प्रकरण व हा आरोप अत्यंत हास्यास्पद होता. दाऊदला पाकिस्तानने संपूर्ण संरक्षण दिले आहे. तो २४ तास आयएसआयच्या संरक्षणात असतो. असल्या माणसाचा दूरध्वनी क्रमांक सार्वजनिक रित्या त्याच्या नावावर नोंदलेला असणे अशक्य आहे. हा आरोप करणार्‍या भंगाळेने आपण हॅक करून मिळविलेल्या पाकिस्तानमधील दूरध्वनी क्रमांकाची यादी ( ज्यात खडसेंचा क्रमांक आहे असा त्याचा दावा आहे) कोणालाही दिलेली नाही अथवा दाखविलेली नाही. सगळी बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात!

या आरोपानंतर खडसेंनी पत्रकार परीषद घेऊन सांगितले ही तो क्रमांक एक वर्षापासून वापरात नसल्याने बंद आहे व मला त्या क्रमांकावर पाकिस्तानमधून कधीही फोन आलेला नव्हता. पण हे ऐकण्याच्या मनःस्थितीत दमानिया बाई नव्हत्या. त्यांचे बेलगाम आरोप सुरूच होते.

पोलिसांनी या प्रकाराची दखल घेऊन भंगाळेला आपले पुरावे घेऊन चौकशीसाठी बोलाविले. दोन वेळा बोलावून सुद्धा तो हजर झाला नाही. शेवटी तिसर्‍या वेळी समन्स पाठविल्यानंतर तो नाईलाजाने पोलिसांसमोर हजर झाला. पुराव्यांविषयी विचारल्यानंतर त्याने कानावर हात ठेवले व असे हास्यास्पद स्पष्टीकरण दिले की कोणीतरी त्याचा संगणक हॅक करून ते पुरावे नष्ट केले. जो माणूस स्वतः हॅकर आहे त्याने आपल्या संगणकाला इतरांच्या सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी संरक्षण व्यवस्था उभारली नसेल यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. समजा त्याचा संगणक कोणीतरी हॅक केला यावर क्षणभर विश्वास ठेवला तरी त्याने जे पुरावे गोळा केल्याचा दावा केला होता त्या पुराव्यांचा एखादा बॅकअप ठेवला नसेल यावर विश्वास ठेवणेही अशक्य आहे.

चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व कोणतेही पुरावे समोर न आल्याने पोलिसांनी बदनामीच्या आरोपावरून त्याला अटक केली. कालांतराने तो जामिनावर सुटला. त्यानंतर दमानिया बाईंचा आवाज गप्प झाला होता.

आता जवळपास सव्वा वर्षानंतर दमानिया बाईंनी तेच नाटक परत सुरू केले आहे. मागील आठवड्यात त्यांनी आरोप केला की त्यांना पाकिस्तानहून एक फोन आला होता व फोनवरील माणसाने त्यांना खडसेंवरील खटले मागे घेण्यासाठी धमकी दिली. त्यांनी तो क्रमांक कॉलरआयडीवर तपासल्यावर त्यावर दाऊद-२ असे नाव आले. हा आरोप सुद्धा अत्यंत हास्यास्पद आहे. दाऊद-२ या नावाने दाऊदच्या नावावर दूरध्वनी नोंदलेला आहे या कल्पनेने सुद्धा हसू येते. दमानिया बाईंचा हा बार सुद्धा फुसकाच ठरला. स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी व चर्चेत राहण्यासाठी असे हास्यास्पद बिनबुडाचे आरोप करीत राहण्याचे काही व्यक्तींना व्यसन लागलेले आहे.

पगला गजोधर's picture

3 Oct 2017 - 9:17 am | पगला गजोधर

गुरुजी तुम्ही म्हणताय तसंही असेल कदाचित,
.
.
.
पण मग, जाहिरपणे खडसे असे का म्हणाले ? की
माझ्या स्वतः च्या पक्षातीलचं उच्च पदस्थ लोक माझ्या वाईटावर टपून, बाहेरच्या लोकांकडून माझ्यावर असे छुपे हल्ले करत आहेत ???

थॉर माणूस's picture

2 Oct 2017 - 10:32 pm | थॉर माणूस

>>>आरोपात दम असता तर ते न्यायालयात गेले असते.

१००% सहमत. सत्ताधार्‍यांवर केलेल्या विरोधकांच्या बर्‍याचशा आरोपांमधे फारसे तथ्य नसतेच. तसे असते तर आज कित्येक नेते तुरूंगात असते. तरीही त्यांच्या दाव्यावर विश्वास ठेऊन अमुक एक नेता भ्रष्टच (आमचे साहेब म्हणाले म्हणून) आणि तमुक एक नेता स्वच्छच (तुमच्या साहेबांनी आरोप केले म्हणून) असे म्हणत फिरणार्‍यांची गंमत वाटते. :)

श्रीगुरुजी's picture

2 Oct 2017 - 11:26 pm | श्रीगुरुजी

ज्यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य असते त्यांच्याविरूद्ध न्यायालयात गेल्यानंतर कायदेशीर कारवाई होतेच. महाराष्ट्रात छगनबाप्पा, त्यांचा पुतण्या समीर, रमेश कदम भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून दीड वर्षाहून अधिक काळ तुरूंगात आहेत. अशोक चव्हाणांचे आदर्श घोटाळ्याच्या आरोपपत्रात नाव आहे व आरोपपत्रातून आपले नाव वगळावे यासाठी त्यांनी केलेले आटोकाट प्रयत्न आतापर्यंत तरी फोल ठरले आहेत. सुरेश जैन बराच काळ तुरूंगात होते. सध्या जामिनावर बाहेर आहेत. दुसरे आरोपी गुलाबराव देवकरही काही काळ तुरूंगात होते. पद्मसिंह पाटलांवर दोन खुनांचा आरोप असून काही दिवसांच्या अटकेनंतर ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. दस्तुरखुद्द मनमोहन सिंहांचे नाव कोळसा घोटाळ्याच्या आरोपपत्रात असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन उच्च न्यायालयातील कारवाईला स्थगिती मिळविली आहे. राहुल, सोनिया समवेत एकूण ६ जण नॅशनल हेरॉल्ड घोटाळा प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत. सुरेश कलमाडी ११ महिने तुरूंगात राहून सध्या जामिनावर मुक्त आहे.

जर आरोपांमध्ये तथ्य असेल आणि सरकार किंवा तपास यंत्रणा कारवाई करीत नसतील तर न्यायालयात गेल्यास न्यायालय नक्कीच कारवाईचा आदेश देते.

चिक्की घोटाळा, तूर डाळ घोटाळा इ. आरोप हे पोकळ आरोप आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. २०१५ पासून हे आरोप होत आहेत. आरोप करणार्‍यांकडे कोणतेही पुरावे नाहीत. असते तर त्यांनी केव्हाच पुरावे बाहेर आणले असते व सरकार कारवाई करीत नाही असे सांगून त्यांनी न्यायालयात दाद मागितली असती. हे आरोप करणारे पुरावेही देत नाहीत व न्यायालयात जाण्याचीही त्यांची तयारी नाही. पुरावे नसल्याने न्यायालय आपल्या आरोपांची दखल घेणार नाही हे त्यांना माहित आहे. त्यामुळे पत्रकार परीषदेतून किंवा विधिमंडळाच्या सदनात बिनबुडांच्या आरोपांचा भडीमार करणे इतकेच ते करू शकतात.

अस्वस्थामा's picture

3 Oct 2017 - 8:41 pm | अस्वस्थामा

जर आरोपांमध्ये तथ्य असेल आणि सरकार किंवा तपास यंत्रणा कारवाई करीत नसतील तर न्यायालयात गेल्यास न्यायालय नक्कीच कारवाईचा आदेश देते.

चिक्की घोटाळा, तूर डाळ घोटाळा इ. आरोप हे पोकळ आरोप आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. २०१५ पासून हे आरोप होत आहेत. आरोप करणार्‍यांकडे कोणतेही पुरावे नाहीत. असते तर त्यांनी केव्हाच पुरावे बाहेर आणले असते व सरकार कारवाई करीत नाही असे सांगून त्यांनी न्यायालयात दाद मागितली असती. हे आरोप करणारे पुरावेही देत नाहीत व न्यायालयात जाण्याचीही त्यांची तयारी नाही. पुरावे नसल्याने न्यायालय आपल्या आरोपांची दखल घेणार नाही हे त्यांना माहित आहे. त्यामुळे पत्रकार परीषदेतून किंवा विधिमंडळाच्या सदनात बिनबुडांच्या आरोपांचा भडीमार करणे इतकेच ते करू शकतात.

ह्म्म.. या न्यायाने शरद पवार महाराष्ट्रातील निर्विवाद स्वच्छ असे नेते आहेत, असे तुम्ही म्हणावे अशी आशा. ;)

शब्दबम्बाळ's picture

5 Oct 2017 - 12:40 am | शब्दबम्बाळ

अगदी हेच म्हणणार होतो! :P
इथून पुढे पवारांवर आरोप केले कि हाच प्रतिसाद त्याखाली चिटकवता येईल!

बाकी ते व्यापम ची काय भानगड? माणसेच गायब होतात म्हणे नाव काढलं कि!
आणि "दामाद श्री" ची सीडी काढून काय घरी बघत बसतात का ३ वर्ष होऊन गेली तरी? सगळे पुरावे होते ना?
राजस्थान मधून आता केसेस फाईल होऊ लागल्यात, तयारी सुरु झाली का पुन्हा?

श्रीगुरुजी's picture

5 Oct 2017 - 2:14 pm | श्रीगुरुजी

ह्म्म.. या न्यायाने शरद पवार महाराष्ट्रातील निर्विवाद स्वच्छ असे नेते आहेत, असे तुम्ही म्हणावे अशी आशा. ;)

पवारांवर न्यायालयात खालील खटले दाखल आहेत.

http://indiatoday.intoday.in/story/hazare-files-pil-alleging-25000-crore...

http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-andhrapradesh/Case-a...

थॉर माणूस's picture

6 Oct 2017 - 2:27 am | थॉर माणूस

ते इनोसंट अंटील प्रूव्हन गिल्टी का काहीतरी असतं म्हणे न्यायदानात. तसं नसेल तर मग निवडून गेलेले किती नेते तुमच्या निकशांवर स्वच्छ ठरतील हा मोठा प्रश्न आहे.

राहुल गांधी नुकतेच बे एरिया मध्ये येऊन गेले. त्यांचा दौरा आखणारे मिलिंद देवरा आणि सॅम पित्रोदा अचानक निवांत भेटले. मिलिंद देवरांशी थोडा वेळ मराठीतून बोललो. एकंदरीत या अमेरिका दौऱ्यातून असे दिसते की राहुल गांधी स्वतःची PM इन waiting अथवा शॅडो PM अशीच प्रतिमा बनवत आहेत. जर त्यांना पंतप्रधान पद नाही मिळाले तरी त्यांची अजून ५ वर्षे वाट पाहण्याची तयारी आहे. त्यामुळे ते इतर कोणत्याही काँग्रेस नेत्याला पंतप्रधान बनू देणार नाहीत. मंत्री बनण्याची घाई काँग्रेस नेत्यांना आहे, कारण त्यांना निवडून आल्यावर मिळालेल्या 'संधीचा पुरेपूर फायदा' उठवायचा आहे. राहुल गांधींचे पद वारशाने आहे, त्यांना निवडून यावे लागत नाही, असे काही पराभव ते नक्की पचवू शकतात. जयराम रमेश यांनी हे बरोबर मागच्या निवडणुकीच्या वेळी मांडले होते. शशी थरूर याना भेटायचे होते पण ते शक्य झाले नाही, नाहीतर नक्कीच काहीतरी चांगले ऐकायला मिळाले असते - त्यांचा पक्ष कोणताही असो, त्यांचे भाषण नक्कीच श्रवणीय असते. चर्चिल आणि ब्रिटिश राज्य यावर त्यांचे भाषण नक्की ऐका जर ऐकले नसेल तर. राहुल गांधी त्यांच्यापुढे अगदी नवशिके वाटतात. अजूनही राहुल गांधी प्रश्नाची उत्तरे देताना गोंधळ करतात. भारतासारख्या देशाचा कारभार चालवणे अत्यंत अवघड आहे, कधी कधी सरकारची चूक नसतानासुद्धा त्यांना संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे राहुल गांधी यांची भिस्त मोदी काय चुका करतात त्यावर आहे. एकदा मोदींनी स्वतःच स्वतःचे रेकॉर्ड डागाळून घेतले की भाजपला पर्याय मग तो स्वतः किती का खराब असेना तो काँग्रेस आणि राहुल गांधी हा आहे असे त्यांना वाटते.

राहुल गांधी त्यांच्यापुढे अगदी नवशिके वाटतात.

भयंकर आक्षेप!
कोणाची कोणाबरोबर तुलना करताय ?!

अभिजीत अवलिया's picture

28 Sep 2017 - 11:22 am | अभिजीत अवलिया

खरे तर काँग्रेस कडे मनमोहन सिंग नावाचा सद्य स्थितीतला देशाचे नेतृत्व करण्यास सर्वोत्तम मनुष्य आहे. पण काँग्रेसच्या दरबारी राजकारणात मनमोहन सिंग सारख्या व्यक्तीची वाट लागली. २००९-१४ ह्या काळात इतके प्रचंड भ्रष्टाचार उघडकीस येऊन देखील त्यावर त्यांनी बाळगलेले मौन संतापजनक होते. जर तो एक दुर्गुण त्यांनी सोडून दिला असता आणि गांधी घराण्याला भीक न घालता काम केले असते तर खूप बरे झाले असते. असो पण ते होईल असे वाटत नाही.

श्रीगुरुजी's picture

28 Sep 2017 - 2:35 pm | श्रीगुरुजी

खरे तर काँग्रेस कडे मनमोहन सिंग नावाचा सद्य स्थितीतला देशाचे नेतृत्व करण्यास सर्वोत्तम मनुष्य आहे. पण काँग्रेसच्या दरबारी राजकारणात मनमोहन सिंग सारख्या व्यक्तीची वाट लागली. २००९-१४ ह्या काळात इतके प्रचंड भ्रष्टाचार उघडकीस येऊन देखील त्यावर त्यांनी बाळगलेले मौन संतापजनक होते. जर तो एक दुर्गुण त्यांनी सोडून दिला असता आणि गांधी घराण्याला भीक न घालता काम केले असते तर खूप बरे झाले असते. असो पण ते होईल असे वाटत नाही.

ज्या माणसाकडे स्वतः निर्णय घेण्याची धमक नाही व जो कायम दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पीत आला, असा माणूस परत कशाला पाहिजे? अणुकरार हे एकमेव उदाहरण सोडले तर सिंगांनी स्वतःहून घेतलेले निर्णय फारसे सापडणार नाहीत.

भ्रष्टाचाराविरूद्ध मौन बाळगणे एवढेच फक्त चुकीचे काम त्यांनी केले नव्हते. स्वतःच्या मंत्रीमंडळातील मंत्री निवडणे सुद्धा त्यांच्या हातात नव्हते. किंबहुना हा आपला अधिकार आहे हे विसरून हायकमांडने निवडलेल्या टीमबरोबर त्यांनी काम केले. पाकिस्तानविरूद्ध त्यांची भूमिका अत्यंत बोटचेपेपणाची होती. "अल्पसंख्याकांचा, विशेषतः मुस्लिमांचा, देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क आहे" असे पक्षपाती विधान त्यांचेच होते. पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीने इतकी टोकाची पक्षपाती भूमिका घेणे अत्यंत संतापजनक होते. चिदंबरम्, सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील इ. मंडळी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह, स्वामी असीमानंद इ. वर खोटे आरोप लावून बॉम्बस्फोटाच्या खटल्यात अडकवून पाकिस्तानी अतिरेक्यांना क्लीन चिट देऊन भारताची दहशतवादाविरूद्धची लढाई दुर्बल करीत असताना हे ढुढ्ढाचार्य स्वस्थ बसून होते. २००५ मध्ये बोफोर्स खटला बंद करण्याचा निर्णय व क्वात्रोकीचे लंडनस्थित बँकेत अडकवून ठेवलेले ४० लाख डॉलर्स मुक्त करून त्याला ते पैसे मिळवून देण्याचा उद्योग त्यांच्याच कारकीर्दीतला. २००९ मध्ये क्वात्रोकीला अर्जेंटिनात पकडल्यानंतर तब्बल दीड महिना न्यायालयांना अंधारात ठेवून काँग्रेसचे नेते गुपचूप क्वात्रोकीला मुक्त करायला अर्जेंटीनाला गेले होते. त्याविरूद्ध यांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही. चुकीचे असो वा बरोबर, पण पंतप्रधानपदावरील व्यक्तीने स्वतः निर्णय घ्यायला हवेत. दुसर्‍यांच्या ओंजळीने पाणी पिणारी अशी व्यक्ती पुन्हा कधीही पंतप्रधानपदावर नको.

स्रुजा's picture

28 Sep 2017 - 4:46 pm | स्रुजा

+१११११११११

कुठल्या तरी पक्षाचा चेअरपर्सन हा देशाच्या पंतप्रधानापेक्षा मोठा असूच शकत नाही. जर पंप्र बनणार्‍या माणसाला त्या पदाचा सन्मान सांभाळता येत नसेल किंव अंतर्गत पक्ष-राजकारण त्याला तितकं डिसग्रेसफुल वागण्यास भाग पाडत असेल तर सरळ पाय उतार व्हावं पण पंप्र पदाला इतकं स्वस्त करुन ठेवु नये. आणि आता ८५ व्या वर्षी काय पंप्र होणारेत ते? सतत सगळे इतके वयोवृद्ध च लोकं का हवे आहेत?

धर्मराजमुटके's picture

28 Sep 2017 - 12:24 pm | धर्मराजमुटके

राहुल गांधी यांनी चांगली कन्या बघुन लग्न करावे आणि सौ. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहिर करावे.

कपिलमुनी's picture

28 Sep 2017 - 1:50 pm | कपिलमुनी

बेस्ट आहे हे !

एखादा अपवाद सोडला तर " संघटना कोंग्रेस " या पक्षाची निर्मिती झाल्यापासून कॉंग्रेस सतत रसातळाला जात आहे. कर्नाटक व इतर एक दोन राज्यात पुन्हा प्रस्थापित होण्याजोगती फक्त ती उरली आहे. महाराष्ट्रात तर ती पुन्हा सत्तेवर येणे पवारांच्या मदतीशिवाय शक्य नाही. तेंव्हा काँग्रेस हा भाजपाला पर्याय सध्या तरी नाही. कदाचित गांधी हा शब्दाचा नाद सोडला तर ते काहीसे शक्य आहे पण काहीसेच. संघ व भाजपा यांचे जोरदार युद्ध लावून देण्याची ताकद असलेला नेता कॉंग्रेसला मिळाला तर काही चान्सेस आहेत.

मोदींनी अगदी काहीतरी क्रांतिकारी होणार आहे असे जे चित्र निर्माण केले त्याचा त्याना आतून पस्तावा नक्कीच होत असेल. तसे ते थंडावलेले नेते दिसत आहेत. भारतातील एकूणच व्यवस्था व अवस्था इतकी भिकार आहे की टोलेजंग इमारती व मस्त रस्ते आता व्हिएतनाम मधेही दिसायला लागलेत. त्यावरून त्या देशाची आपल्याशी तुलना वा आपल्या देशातील इमारतीवरून जर्मनीशी आपली तुलना करायची का ?

असो समजा काँग्रेस ला राजीव हाच पर्याय वाटला तर तो मनमोहन सिंग यांच्या पेक्षा बरा. कारण भारत देशात तरी मुका माणूस सामर्थ्यवान मानायला लोक तयार होणार नाहीत.

पगला गजोधर's picture

28 Sep 2017 - 1:36 pm | पगला गजोधर

असो समजा काँग्रेस ला राजीव हाच पर्याय वाटला तर तो मनमोहन सिंग यांच्या पेक्षा बरा.

कोण आहे हा, राजीव पर्याय म्हणून ?

श्रीगुरुजी's picture

28 Sep 2017 - 2:06 pm | श्रीगुरुजी

राजीव शुक्ला

चौकटराजा's picture

28 Sep 2017 - 9:17 pm | चौकटराजा

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र !!

चौकटराजा's picture

28 Sep 2017 - 9:28 pm | चौकटराजा

नशीब की मी " रॉबर्ट " असे चुकून टायपलो नाही.

पगला गजोधर's picture

28 Sep 2017 - 9:30 pm | पगला गजोधर

रॉबर्ट व मोना, सोना घेऊन, प्लेनमधून दूssssर निघून गेलेत ....

प्रसाद_१९८२'s picture

28 Sep 2017 - 2:59 pm | प्रसाद_१९८२

राजीव त्यागी हा पर्याय कसा वाटतो. नाहितरी आजकाल न्युजरुम चर्चांमध्ये असंबध बरळण्यात त्याने दिग्वीजय सिंगला देखील मागे टाकलेय.

श्रीगुरुजी's picture

28 Sep 2017 - 3:09 pm | श्रीगुरुजी

खि खि खि

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Sep 2017 - 3:58 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मिपाकर कोणताही पर्याय निवडोत पण शेवटी 'हाय कमांड्चा आदेश शिरसावंद्य' असे एका सुरात काँग्रेसचे सर्व खासदार म्हणणार आहेत. तसेच 'शहा-मोदी' म्हणतील ती पूर्व दिशा असे भाजपातही चालू झाले आहे असे ह्यांचे मत.

इरसाल's picture

28 Sep 2017 - 4:54 pm | इरसाल

मला असं वाटत की, श्रीमती सोनिया गांधी यांनी श्री. नरेंद्र मोदी यांना दत्तक घेवुन काँग्रेसतर्फे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणुन घोषीत करावे.
भावाचा भाव राहील आणी नेतेपद घरातच.

ज्या माणसाकडे स्वतः निर्णय घेण्याची धमक नाही व जो कायम दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पीत आला, असा माणूस परत कशाला पाहिजे? अणुकरार हे एकमेव उदाहरण सोडले तर सिंगांनी स्वतःहून घेतलेले निर्णय फारसे सापडणार नाहीत.

आपणांस नक्की माहिती असेल की भारतात १९९१ मध्ये जेव्हा जगाला दारे उघडून जागतिकीकरण प्रक्रियेअंतर्गत खाउजा धोरण राबवले गेले तेव्हा मनमोहन ह्यांनी तो तंबू एकखांबी पेलला होता, पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव ह्यांनी त्यावेळी पूर्ण निर्णय करण्याची ताकद मनमोहन ह्यांना दिली होती, इतकी का एका पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने खवचटपणे रावांना विचारलं होतं की 'तुम्ही काही निर्णय घेताय का नाही?' त्यावर राव शांतपणे म्हणाले होते की 'मी एक निर्णय घेतलाय की मी कुठलाच निर्णय घेणार नाहीये' साक्षात पंतप्रधानांचा इतका विश्वास इतक्या नाजूक विषयात ज्या माणसावर होता, त्याला निर्णयक्षमता नाही हे म्हणणे, मला एक मोदीप्रेमी देशभक्त नागरिक असूनही शक्य नाही.

पगला गजोधर's picture

28 Sep 2017 - 7:38 pm | पगला गजोधर

मला एक मोदीप्रेमी देशभक्त नागरिक असूनही शक्य नाही.
'मोदींप्रेमी' असं लिहिल्यावर शेपरेट 'देशभक्त' असं लिहायची गरज नाही.. आजकाल भारतात .....

मोदींप्रेमी
म्हणजेच
देशभक्त
म्हणजेच
मोदींभक्त
म्हणजेच
देशप्रेमी

They all are same for some people.

कोणी सामान्य मोदीप्रेमी कसा देशद्रोही असेल याचं मॉडेल मांडता येत नाही. सबब समीकरणं सुयोग्य वाटतात.

पगला गजोधर's picture

29 Sep 2017 - 5:26 pm | पगला गजोधर

आणि या समीकरणांचा व्यत्यास लगे हाथो सांगून टाका .....

आपणच व्यत्त्यासांसहित समीकरण तीनदा लिहिलं आहे.

प्रसाद_१९८२'s picture

28 Sep 2017 - 7:43 pm | प्रसाद_१९८२

पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव ह्यांनी जे अधिकार मनमोहन सिंग यांना त्यावेळी दिले होते तसेच अधिकार मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान कालखडांत कॉंग्रेस नेतृत्वाने त्यांना दिले होते का ? उलट राहुल गांधीसारख्या कॉंग्रेसच्या परिपक्व नेत्यांने पंतप्रधानानी काढलेला अध्यादेश "नॉनसेन्सं" म्हणत भर पत्रकार परिषदेत फाडून टाकला होता.

श्रीगुरुजी's picture

28 Sep 2017 - 7:56 pm | श्रीगुरुजी

१९९१-९६ मधील अर्थमंत्री मनमोहन सिंह आणि २००४-२०१४ मधील पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.

१९९१-९६ या काळात ते सर्वोच्च पदावर नव्हते. परंतु नरसिंहरावांनी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्यांच्या निर्णयांच्या सर्व परीणामांची जबाबदारी नरसिंहरावांवर होती. मनमोहन सिंहांचे नरसिंहराव हे बॉस होते.

याउलट २००४-१४ या काळात मनमोहन सिंह हे स्वतःच पंतप्रधान असल्याने सर्वांचे बॉस होते. त्यांना कोणालाही उत्तर द्यायचे नव्हते कारण सर्वाधिकार त्यांच्या हातात होते. असे असतानाही आपल्याला घटनेने दिलेले अधिकार न वापरता ते सोनिया गांधींवर अवलंबून राहिले. १९९१ मध्ये आपल्याला कोणती व्यक्ती अर्थमंत्रीपदावर हवी आहे व मंत्रीमंडळात कोणत्या व्यक्ती हव्या आहेत व त्यांना कोणती खाती द्यायची हा नरसिंहरावांचा अधिकार होता व आपला अधिकार त्यांनी पूर्णपणे वापरला. याउलट मनमोहन सिंह पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रीमंडळात कोण असणार व कोणाला कोणते खाते द्यायचे हे त्यांनी न ठरविता सोनिया गांधी ठरवित होत्या. मला २००६ मधील एक घटना आठविते. एका वाहिनीवर मनमोहन सिंह व सोनिया गांधींचा पत्रकारांशी वार्तालाप दाखवित होते (मनमोहन सिंहांच्या पहिल्या टर्ममध्ये पत्रकारांशी बोलताना सोनिया गांधी कायम शेजारी बसलेल्या असायच्या). एका पत्रकाराने मनमोहन सिंहांना विचारले की तुम्ही तुमच्या मंत्रीमंडळात उपपंतप्रधान नेमणार का? यावर मनमोहन सिंहांनी उत्तर देण्याआधीच सोनिया गांधींनी त्यांच्यासमोरील माईक ओढून घेतला व सांगितले की उपपंतप्रधान नेमण्याचा आमचा विचार नाही. प्रश्न होता पंतप्रधानांना, पण उत्तर दिले सोनियांनी. उपपंतप्रधान नेमायचा का नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांचा. पण उपपंतप्रधान नेमायचा नाही हा निर्णय सोनियांनी परस्पर घेऊन टाकला होता. आपल्याला शिबू सोरेन, लालू इ. भ्रष्ट मंडळी मंत्रीमंडळात नको होती असे नंतर मनमोहन सिंह म्हणाले. परंतु त्यांचे मंत्रीमंडळ व खातेवाटप परस्पर दुसर्‍याच कोणीतरी ठरविले होते. २६/११ नंतर चिदंबरमला गृहमंत्री केले गेले व अर्थमंत्रीपद प्रणव मुखर्जींकडे गेले. मनमोहन सिंहांना मनातून हे मान्य नव्हते. परंतु सर्वोच्च पदावर असून सर्वाधिकार हातात असताना सुद्धा त्यांचे अधिकार दुसर्‍याच व्यक्ती वापरत होत्या व ते निमूटपणे माना डोलवित होते.

अजून एक गोष्ट केली ती म्हणजे पंतप्रधानांवर नियंत्रण ठेवण्या साठी सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सल्लागार समिती ची स्थापना.

ट्रेड मार्क's picture

28 Sep 2017 - 8:39 pm | ट्रेड मार्क

मनमोहन सिंगांच्या ज्ञानाविषयी आणि निर्णयक्षमतेविषयी शंका नाही, पण त्याचा वापर त्यांनी कसा आणि कुठे केला आणि केला का हा प्रश्न आहे. २००४ - २०१४ या दहा वर्षात एवढे सगळे चुकीचे घडताना त्यांनी त्यांची निर्णयक्षमता कुठे वापरली? पंप्रचे अधिकार, एवढे प्रचंड ज्ञान असूनही वापर केला का?

तेजस आठवले's picture

30 Sep 2017 - 6:41 pm | तेजस आठवले

लाचारीपुढे हुशारी चालली नाही.

मराठी कथालेखक's picture

29 Sep 2017 - 3:57 pm | मराठी कथालेखक

पी चिंदबरम यांच्याबद्दल मिपाकरांची मतं जाणून घ्यायला आवडेल.. ते पंतप्रधानपदाचे चांगले उमेदवार ठरु शकतात का ?

श्रीगुरुजी's picture

30 Sep 2017 - 10:32 pm | श्रीगुरुजी

चिद्दू अत्यंत भ्रष्ट, उर्मट व नालायक आहे.

तेजस आठवले's picture

29 Sep 2017 - 4:46 pm | तेजस आठवले

माझे वैयक्तिक मत फारसे चांगले नाही. मला चिदंबरम उर्मट वाटतो का कोण जाणे. लोकसत्तेमध्ये मोदी सरकार आल्यापासून त्याचा साप्ताहिक एक लेख येतो. सरकारचे काय चुकले हे दाखवणारा. त्याबद्दल काहीच म्हणणे नाही. पण ह्या सरकारवर ज्या गोष्टींवरून खरपूस टीका करतात त्या गोष्टी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केल्या होत्या ह्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. जर देशात असहिष्णुता आहे आणि सरकार विरोधात कोणाला बोलू दिले जात नाहीये म्हणताना अश्या लेखांकडे सोयीस्कर दुर्लक्ष का?
माझ्या मते प्रियांका हा एकमेव पर्याय आहे. पण काँग्रेस तो अगदी सावकाश आणि उशिरात उशिरा वापरेल. रागांचे नाव चर्चेत ठेवून सर्वाना बेसावध ठेवून निवडणुकीआधी प्रियांकाचे नाव घोषित केले जाईल. रागा असो नाहीतर ममो नाहीतर प्रिगा, शेवटी चाव्या सोगांच्याच हाती असणारेत.
शशी थरूर असोत किंवा जयराम रमेश, त्यांची हुशारी आणि पांडित्य कितीही असले तरी ह्या गुणांना काँग्रेस मध्ये किंमत नाही.
माझ्या मते नितीश कुमार काहीतरी घडवून आणतील(काँग्रेस मध्ये जातील?) आणि सर्वानाच धक्का देतील.(उगीच आपला एक अंदाज)

समजा सारे पक्ष इतके मस्त असते कि कोणता निवडायचा हे ठरवणे अवघड व्हावे तरी मला असला विषय अजब वाटतो. २०१९ च्या नियमित निवडणूकांची चर्चा आज का व्हावी? असल्या कुस्तीतला भारतीय इंटरेस्ट कधी कधी अतिरेकी, तिटकार उत्पन्न करणारा वाटतो. सत्ताधारी पक्ष सत्तेत म्हणून आणि विरोधी पक्ष विरोधात म्हणून आज काय काम करत आहेत, किती चांगलं करत आहेत, हे महत्त्बाचं नाही का? सरकारं येतात नि जातात, कोणाला काही फरक पडत नाही. पाशवी शक्तीचा फूंकरही अंगावर येत नाही. मग यांना एवढा भाव का द्यायचा? यांच्या करियर (देशाच्या राजकारणाचं नव्हे) सेलेब्रिटिकरण का करायचं?
========================
सच्चे, संवेदनशील, ज्ञानी, अभ्यासू, देशप्रेमी, सहिस्णू, नम्र, स्वच्छ, शीलवंत, लोकमान्य, दूर्दृष्टि असलेले, संकुचित नसलेले, इ इ नेते निवडून यावेत, अपक्ष का असेनात आणि कोण्या टिचूकल्या पक्षाचे का असेनात.

अभ्या..'s picture

29 Sep 2017 - 6:30 pm | अभ्या..

अगदी अगदी,
सरकारच्या कामाचे मूल्यमापन/त्याविषयी तक्रारी/त्यांचे निवारण वगैरे ठिक आहे पण इदर सत्ता राबवणे ऑर ती मिळवायचा येनकेनप्रकारेण प्रयत्न करणे हे समीकरण करणारे राजकारणी हे सवयीचे झालेय सार्‍यांनाच. ते समीकरण जनसामान्यात झिरपून सत्तेत असलेल्याचा उदोउदो करणारे भाट ऑर त्यांना अपोज करणारे निंदक अशातच विभागणी होत चाललीये. सरकारच्या भाटांनासुध्दा कित्येक गोष्टी आवडत नसतात पण त्यांचा उल्लेख केला तर परत लंगडी बाजू पडते अन त्याचा विपरीत परिणाम सत्तेवर झाला तर काय म्हनून या विषयावर ते गप्प. विरोधक त्याच त्याच गोष्टी उकरत ह्या सेलेब्रेटीकरणाला जास्त सेलेब्रेट करताहेत. ऑलोव्हर सार्‍याच निगेटिव्ह गोश्टींची चर्चा अधिक प्रभावीपणे अन मुद्द्यांना वगळून होत राहते. सामान्य नागरिकांची खरोखरच प्रत्येक गोश्टीवर मतप्रदर्शन करायची गरज आहे का? तितकी कुवत त्यांची आहे का? निदान ज्यांची कुवत आहे त्यांची मते स्वीकारायची सार्वत्रिक तयारी आहे का? कुठलेही सरकार येते अन जाते पण त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीत इतका १८० अंशाचा फरक असतो का की ईतके टोकाचे राजकारण अन चर्चा त्यावर होत राहावी? सारे खरोखर अनाकलनीय होते.

सच्चे, संवेदनशील, ज्ञानी, अभ्यासू, देशप्रेमी, सहिस्णू, नम्र, स्वच्छ, शीलवंत, लोकमान्य, दूर्दृष्टि असलेले, संकुचित नसलेले, इ इ नेते निवडून यावेत, अपक्ष का असेनात आणि कोण्या टिचूकल्या पक्षाचे का असेनात.

हजारबार सहमत. तथास्तु

सुबोध खरे's picture

29 Sep 2017 - 6:48 pm | सुबोध खरे

सच्चे, संवेदनशील, ज्ञानी, अभ्यासू, देशप्रेमी, सहिस्णू, नम्र, स्वच्छ, शीलवंत, लोकमान्य, दूर्दृष्टि असलेले, संकुचित नसलेले, इ इ
लोक नेते होऊच शकत नाहीत
कारण सामान्य जनता आजही माझ्या पोटजातीचा, जातीचा, धर्माचा, मला काय फुकट देईल किंवा माझा काय फायदा करून देईल त्यालाच नेता म्हणून निवडणार. मग राष्ट्र गेलं खड्ड्यात.
मागे एकदा मी लिहिलं होतं १००० रुपये माणशी दिले तर आपण दाऊद इब्राहिमला पण निवडून देऊ.
मुंबईची तुंबई झाली म्हणून मुंबईत प्लास्टिकच्या बॅगा वापरणे बंद झाले का?
भगत सिंह हा शेजाऱ्याच्या घरात जन्माला यावा.
नोट बंदी नंतर आर्य चाणक्य ला सुद्धा फेफरं यावं इतक्या सुरस आणि चमत्कारिक क्लृप्त्या वापरून लोकांनी आपले काळे पैसे पांढरे करून घेतले. ते कोणी लिहायला बसला तर एक ५२ भागांची मालिका होईल मिपा वर.
अशा देश"प्रेमी" जनतेचा( म्हणजे तुम्ही आम्हीच) नेते "सच्चे, संवेदनशील, ज्ञानी, अभ्यासू, देशप्रेमी, सहिस्णू, नम्र, स्वच्छ, शीलवंत, लोकमान्य, दूर्दृष्टि असलेले, संकुचित नसलेले, इ इ
तेंव्हा हे होणे नाही.

दोसत १९७४'s picture

30 Sep 2017 - 12:35 am | दोसत १९७४

सहमत!

चौकटराजा's picture

30 Sep 2017 - 6:29 pm | चौकटराजा

आपल्या सोसायटी पासून , ऑफिस पासून चुकीचा माणूस वर नेण्याची प्रक्रिया ज्या देशात घडते अशा देशात भले इमारती, रस्ते, बागा होतील. त्या जगात सर्वत्र आहेत पण
सुप्रशासन आपल्या कडे ना खाजगी नोकरीत असते ना सरकारी.
६ वर्षे सरकारी व २२ वर्षे खाजगी नोकरी केल्यावर पक्के झालेले मत .

पिजा's picture

1 Oct 2017 - 5:29 pm | पिजा

चालू घडामोडींवर हे ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देतात त्यावरून ते पुढे-मागे काँग्रेसमध्ये जातील अशी दाट शंका वाटते.

संग्राम's picture

1 Oct 2017 - 10:06 pm | संग्राम

आजकाल नेते मंडळी पण "स्वीच" करण्यात तरबेज आहेत .... मोठ मोठी मंत्रिपदे मिळवतात.....
कदाचित पंतप्रधान कोणी प़क्षाबाहेरचा नवीन आलेला नाही होणार, पण कल क्या होगा क्या पता ?

नाखु's picture

2 Oct 2017 - 6:54 pm | नाखु

आत्ता "आठवले" होतें पुन्हा आठवले की सांगतो.

"राखी"व कुरणांच्या राजकारणाने पंचवार्षिक बैलपोळा मुकाट्याने बाकिचा साक्षीदार

सरकारसाहेब's picture

3 Oct 2017 - 9:25 am | सरकारसाहेब

राजकारणाला माझा अभ्यास दांडगा नाही. ..

तसा सोनिया, प्रियंका व रागाला तरी कुठं अभ्यास आहे ?

विकास's picture

4 Oct 2017 - 7:27 pm | विकास

आज ज्या पद्धतीने काँग्रेसपक्ष आहे, त्यामुळे काँग्रेसकडे काय पर्याय आहेत यावर चर्चा करण्यापेक्षा देशाला काँग्रेस हा पर्याय असू शकतो का याचा विचार करायला हवा असे वाटते. ;)

सर टोबी's picture

4 Oct 2017 - 10:45 pm | सर टोबी

यूपीए सरकारच्या दोन मोठ्या घोटाळ्यांपैकी हा एक. महालेखापालांनी स्पेक्ट्रम विक्रीतून सरकारचा महसूल १.७२ लाख कोटींऐवजी जेमतेम ३० हजार कोटी जमा झाला आहे असा त्या विक्रीवर आक्षेप घेतला. लक्षात घ्या कि स्पेक्ट्रम हि काही वस्तू नाही तर व्यवसाय करण्याचा परवाना असतो तसा तो परवाना होता.

या ठिकाणी व्होडाफोनला प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना पूर्वलक्षी प्रभावाने ३०० कोटींचा दंड ठोठावला त्याचा विचार करणे संयुक्तिक ठरेल. हि रक्कम १.७२ लाख कोटीच्या तुलनेत जेमतेम २ टक्के इतकी आहे. तरीसुध्दा व्होडाफोनने त्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय लवादासमोर आव्हान दिले. म्हणजे १.७२ कोटी रुपये मोबईल कंपंन्यान्नी हसत हसत दिले असते अशी शक्यताच नाही. वर यंत्रसामुग्री, पायाभूत सुविधा, विक्रीवरील खर्च या सगळ्यांचा विचार करता हि गुंतवणूक प्रॅक्टिकलली वसूल होऊन परतावा देण्याची शक्यता नव्हती. बर, या क्षेत्रातली दिवसागणिक होणारी प्रगती पाहता, जी गुंतवणूक काही दिवसांनी कवडीमोल होणारच आहे त्यावर कोणी इतके पैसे लावण्याची शक्यताच नाही.

अजून एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे पैसा हि एक प्रकारची इको सिस्टिम आहे. आपण सर्वजण पैशांमुळे एकमेकांना जोडलेलो आहोत. मोबईल कंपन्यांनी एव्हडा पैसा भांडवली बाजारातून उभा केला असता आणि नंतर त्या कर्ज बाजरी झाल्या असत्या तर आपणही त्या प्रकारात बाधित झालोच असतो. म्हणजे, मोबईल कंपन्यांनी तो पैसा कसा उभा केला असता तो त्यांचा प्रश्न आहे असे म्हणून आपण त्यातून बाजूला होऊ शकत नाही.

आता महालेखापालांनी असा आक्षेप घेतल्यानंतर सरकारची अवस्था बिकट झाली. सरकारच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचविला म्हणून महाभियोग चालवावा तर सचोटीने काम करणाऱ्यांनवर सरकार सूडबुद्धीने कार्यवाही करते असा ठपका येण्याची शक्यता. काही न करावे तर अप्रतिष्ठा ठरलेलीच. पक्षनेतृत्वाला या मध्ये बहुदा संधी दिसत असावी. म्हणजे ममोंकडून पद काढून घेण्याची संधी. पण एका मागोमाग एक घटना अशा घडत गेल्या कि काँग्रेसला सावरण्याची संधीच मिळाली नाही.

या ठिकाणी महालेखापालांविषयी एक नमूद करावे लागेल. आऊटलूकच्या पत्रकाराने त्यांना विचारले कि हा १.७२ लाख कोटींचा अतरंगी आकडा तुम्ही कोठून शोधून काढला. त्यावर त्यांचे म्हणणे असे कि त्यांनी ममोंनीच सुचविलेला फॉर्मुला वापरला. स्वतःची बाजू सांभाळण्यासाठी हा युक्तिवाद एक वेळ मान्य. पण त्या रकमेविषयीचे त्यांचे उत्तरदायित्व कमी होत नाही.

नंतर काय झाले तो इतिहास सर्वांनाच माहित आहे. महालेखापालांना त्यांच्या 'सचोटीचे' बक्षीससुद्धा मिळाले आहे. भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. BCCI चे सध्या ते अध्यक्ष आहेत. इतरही उपकृत केलेल्या व्यक्तींना योग्य इनाम मिळाले आहेत. आणि आपण जनता भ्रष्टाचाराचा नायनाट झाला आहे म्हणून निश्चिन्त आहोत.

ट्रेड मार्क's picture

4 Oct 2017 - 11:23 pm | ट्रेड मार्क

असंच कोळसा घोटाळा, ऑगस्ता वेस्टलँड, हेरॉल्ड आणि इतर अनेक घोटाळ्यांचं पण स्पष्टीकरण असेलच. ते पण देऊन टाका.

श्री गावसेना प्रमुख's picture

5 Oct 2017 - 9:30 am | श्री गावसेना प्रमुख

बी सी सी आय चे अध्यक्ष पद त्यांना कोर्टाने दिलेल आहे कि सरकारने?

विशुमित's picture

5 Oct 2017 - 11:23 am | विशुमित

तुम्ही म्हणताय अगदी जवळपास त्याच पद्धतीने चालू सरकारवर सुद्धा अशा प्रकारे आरोप होत आहेत.

आरोप काँग्रेस ने केले असले तरी त्याचे महत्व कमी होत नाही. त्याची सत्तेता पडताळून पाहिली पाहिजे. यावर चांगली चर्चा होऊ शकते.

http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/24-thousand-crore-spec...

श्रीगुरुजी's picture

5 Oct 2017 - 3:16 pm | श्रीगुरुजी

इतक्या वर्षात हा पहिलाच आरोप होत आहे आणि वरील बातमीनुसार तो पूर्ण फसलेला आहे.

बातमीतील खालील दोन परिच्छेद वाचा

पहिला परिच्छेद -
यशस्वी बोली लावणाऱ्या कंपन्यांना ६५ हजार ७८९ कोटींपैकी ३२ हजार कोटी आगाऊ जमा करून उर्वरित ३३ हजार ७८९ कोटी दहा वर्षांमध्ये टप्प्या-टप्प्याने जमा करायचे आहे. पण, त्यांचा कालावधी १० ऐवजी १६ वर्षे करण्यात आला आहे.

दुसरा परिच्छेद -
पण, स्पेक्ट्रम मिळविल्यानंतर या तिन्ही कंपन्यांनी आपली आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सांगून उर्वरित रकमेच्या परतफेडीची मुदत वाढविण्यासाठी आग्रह धरला. त्यासाठी अर्थ आणि दूरसंचार मंत्रालयाची एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने उर्वरित रक्कम भरण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना १० ऐवजी १६ वर्षांची मुदत दिली असून हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे मांडला जाणार आहे. मोदी सरकारने अशी मुदतवाढ दिल्यास सर्वोच्च न्यायालयाने टूजी स्पेक्ट्रम प्रकरणात दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन होणार असल्याचा दावा सुरजेवाला यांनी केला.

पहिल्या परिच्छेदात म्हटलंय की कालावधी वाढविलेला आहे. दुसर्‍या परिच्छेदात म्हटलंय की कालावधी वाढविण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे मांडला जाणार आहे व कालावधी वाढविल्यास न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होईल. काय फालतूगिरी आहे!

असल्या फालतू आरोपांची चौकशी करायची?????

अनुप ढेरे's picture

5 Oct 2017 - 2:41 pm | अनुप ढेरे

२जी घोटाळ्यावर पडदा टाकायचा प्रयत्न २०१० पासून चालू आहे. तो घोटाळा लीलावाच्याऐवजी वाटप केलं हा नव्हताच. २००१मध्ये देखील लीलाव न करता वाटप केलं गेलं.
राजाने केलेला भ्रष्टाचार हा की त्याने फस्ट कम फस्ट सर्वच्या तारखा केवळ विशिष्ट कंपन्यांनाच अप्लाय करता येईल अशा बदलल्या.
साधारण क्रम असा.
ऑक्टोबर २००८मध्ये अप्लाय करण्याची मुदत संपली.
जानेवारी २००९मध्ये राजाने ठरवलं की ऑक्टोबर २००८ची तारीख सोडुन २९ सप्टेंबर २००८ पर्यंत आलेले अर्जच कंसिडर होणार.
यात फायदा झालेल्या कंपन्या स्वान टेलिकॉम, युनिटेक आणि टाटा. यातल्या स्वान टेलिकॉम आणि युनिटेक यांचा टेलिकॉमशी अर्थाअर्थी संबंध नव्ह्ता. तरी त्यांआ स्पेक्ट्रम दिला गेला. १६०० कोटी किंमत बहुधा.

नंतर स्वान आणि युनिटेकने आपल्या स्पेक्ट्रम मिळालेल्या कंपन्यांचे शेअर काहीच्या काही भावात विकले. युनिटेकने टेलिनॉरला आणि टाटाने डोकोमोला. १६०० कोटीमध्ये स्पेक्ट्रम मिळाल्यावर कंपनीचे ४०% शेअर ७००० कोटीला विकला गेले. यावरून १००% शेअरची किंमत काढता येते. अशा सर्व लायसंसची किंमत एकत्र करून दीड लाख कोटी आकडा आला होता.

सो घोटाळा हा लीलाव केला नाही हा नसून आपल्याच लोकांना स्पेक्ट्रम मिळेल अशी व्यवस्था करणं हा होता.

अधिक चर्चा इथे.
http://www.aisiakshare.com/node/5707

श्रीगुरुजी's picture

5 Oct 2017 - 2:45 pm | श्रीगुरुजी

या ठिकाणी महालेखापालांविषयी एक नमूद करावे लागेल. आऊटलूकच्या पत्रकाराने त्यांना विचारले कि हा १.७२ लाख कोटींचा अतरंगी आकडा तुम्ही कोठून शोधून काढला. त्यावर त्यांचे म्हणणे असे कि त्यांनी ममोंनीच सुचविलेला फॉर्मुला वापरला. स्वतःची बाजू सांभाळण्यासाठी हा युक्तिवाद एक वेळ मान्य. पण त्या रकमेविषयीचे त्यांचे उत्तरदायित्व कमी होत नाही.

महालेखापालांनी वृत्तांतातच सांगितले होते की १,७६,००० कोटी रूपयांचा महसूल बुडाला हा अंदाज आहे. हा अप्रत्यक्ष तोटा आहे. म्हणजे तत्कालीन संपुआ सरकारने तरंगलहरी स्वतःच्या मर्जीतील व्यक्तींना खिरापतीसारख्या न वाटता त्यांचा रितसर लिलाव केला असता तर सरकारला १,७६,००० कोटी रूपये मिळू शकले असते. परंतु सरकारने लिलाव न करता स्वतःच्या मर्जीतील कंपन्यांना त्याचे अल्पकिंमतीत थेट वाटप केल्याने सरकारचा प्रचंड महसूल बुडाला व वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण होऊन प्रचंड भ्रष्टाचार झाला.

महालेखापालांच्या या अहवालाची काँग्रेसने टर उडविली होती. या वाटपातून सरकारला 'झेरो लॉस' झाला. उलट फायदाच झाला असा संतापजनक दावा कपिल सिब्बलने केला होता. परंतु नंतर महालेखापालांचा अहवाल योग्य असल्याचे यथावकाश सिद्ध झाले व व संपुआ सरकारने तरंगलहरी व कोळसा खाणींचे वाटप करताना देशाचे प्रचंड नुकसान केले व त्यात भरपूर आडवा हात मारला हे सिद्ध झाले. ज्यांना सध्या मनमोहन सिंहांचा एवढा पुळका आला आहे त्यांना हे कदाचित माहिती नसावे की दस्तुरखुद्द मनमोहन सिंह हेच त्या काळात कोळसा मंत्री होते व स्वतःच्या डोळ्यादेखत देशाचे नुकसान होत असताना व भ्रष्टाचार होत असताना ते डोळ्यांवर कातडी घेऊन तोंडात मिठाची गुळणी घेऊन स्थितप्रज्ञासारखे शांत बसून होते.

हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलावाच्या माध्यमातून पुन्हा एकदा वाटप करण्याचा आदेश दिल्यानंतर मार्च २०१५ मधील लिलावाच्या पहिल्या फेरीत एकूण १,१०,००० कोटी रूपयांचा लिलाव झाल तर नंतर सप्टेंबर २०१६ मधील लिलावाच्या दुसर्‍या फेरीत २३५५ MHz पैकी ९६५ MHz तरंगलहरी लिलावात एकूण ६५,७८९ कोटींना विकल्या गेल्या. पहिल्या दोन फेरीत लिलावाच्या माध्यमातून ,१७६,००० कोटी रूपयांच्या तरंगलहरी विकल्या गेल्या.

संपुआ सरकारच्या कारकीर्दीत कोळसा खाणींच्या वाटपातही सरकारला १,८६,००० कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागले असाही महालेखापालांचा अहवाल होता. परंतु रालोआ सरकारच्या कारकीर्दीत आधी वाटप केलेल्या कोळसा खाणींचे वाटप रद्द करून खाणींचा लिलाव सुरू केल्यानंतर तरंगलहरी लिलावाप्रमाणेच त्यातून लाखो कोटी रूपयांच्या खाणी विकल्या गेल्या. जेव्हा तरंगलहरी व कोळसा खाणी वाटपाच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा सरकारला लिलावातून १५ लाख कोटी रूपयांहून अधिक उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे.

नंतर काय झाले तो इतिहास सर्वांनाच माहित आहे. महालेखापालांना त्यांच्या 'सचोटीचे' बक्षीससुद्धा मिळाले आहे. भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. BCCI चे सध्या ते अध्यक्ष आहेत. इतरही उपकृत केलेल्या व्यक्तींना योग्य इनाम मिळाले आहेत. आणि आपण जनता भ्रष्टाचाराचा नायनाट झाला आहे म्हणून निश्चिन्त आहोत.

महालेखापालांना दुसर्‍या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला हे योग्यच झाले. देशाला संपुआ सरकारमधील मंत्री व सत्ताधारी अक्षरशः ओरबाडून खात होते व पंतप्रधानांची त्याला संमती होती. अशा परिस्थितीत हा प्रचंड मोठा गैरव्यवहार बाहेर काढण्याचे जे मोठे काम त्यांनी केले ते नक्कीच पुरस्कारास पात्र आहे.

त्यांना BCCI चे अध्यक्ष न्यायालयाने केले आहे, सरकारने नाही. सध्या BCCI पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चालत आहे. त्यांना BCCI चे अध्यक्ष करून त्यांनी मोदींनी/सरकारने आपल्या कामाच इनाम दिले हा शुद्ध अपप्रचार आहे व असे आरोप वस्तुस्थितीचे अज्ञान दर्शवितात.

रमेश आठवले's picture

5 Oct 2017 - 4:28 am | रमेश आठवले

मला काल स्वप्न पडले होते. त्यानुसार राहुल गांधी हे देशाचे भावी पंत प्रधान होतील आणि त्यांचे खंबीर नेत्रुत्व व वाक्चतुर्य यामुळे काँग्रेस ला २०१९ मधे लोकसभेत ४०० जागा मिळतिल.

विशुमित's picture

5 Oct 2017 - 11:05 am | विशुमित

स्वप्न पहाटे पडले होते का ??
नसेल तर चिंता करू नका.

रमेश आठवले's picture

5 Oct 2017 - 8:25 pm | रमेश आठवले

लक्षात नाही. मी शालजोडी पांघरून झोपलो होतो एवढे लक्षात येत आहे.

श्रीगूरुजी यांचे प्रतिसाद अत्यंत वाचनीय असतात. त्यातील अभ्यासपूर्णतेच्या मानाने आवेश नगण्य असतो. त्यांचे वैचारिक विरोधक देखिल माहितीपूर्ण प्रत्यारोप करतात. राजकारण आवडणारांस मिपावरील अशी चर्चा एक गिफ्ट आहे.

गामा पैलवान's picture

5 Oct 2017 - 5:44 pm | गामा पैलवान

प्लस वन सर!
आ.न.,
-गा.पै.

संग्राम's picture

5 Oct 2017 - 8:34 pm | संग्राम

आता गॅरी भाऊंनी पण लेखन संन्यास सोडावा