संघर्षाला बळ कसे द्यावे ???

सन्घमित्रा's picture
सन्घमित्रा in काथ्याकूट
23 Sep 2017 - 9:57 pm
गाभा: 

हि कथा एका तिशीतल्या तरुण बांधकाम व्यावसायिकाची (सरकारी ठेकेदार) चार पाच वर्षांपासून धंद्यात स्थिर स्थावर होणाऱ्या माणसाची .
सरकारच्या बदलणाऱ्या पॉलिसीस ,बोकाळलेला भ्रष्टाचार ह्यातून जिद्दीने मार्ग काढून यशस्वी उद्योजक होऊ पाहणाऱ्या तरुणाची ...
असंख्य स्पर्धा ती तर सगळी कडे असतेच पण बापाच्या वयाचे प्रतिस्पर्धी ,गुंड मवाली लेबर ठेकेदार (ज्यांना पर्याय नाही ),स्थानीक लोकांचा विरोध अडचणी ,लोकांच्या धमक्या ,मारामारी ,अडकलेलं भांडवल त्याची चिंता ,भरमसाठ सिक्युरिटी डेपोसिटस गुंतलेल ,पण जिद्दी ...
पण कधी कधी वाटत सर्व सोडून द्यावं ... पण मन परत ऊंचंबळून येत ... कसा हे टेन्शन सहन करायचं ... स्वतःच्या आणि फॅमिली च्या जीवाला धोका तर नाही होणार ना ह्याची चिंता . पण कधी कधी विचार येतो असे प्रसंग सर्वांच्याच आयुष्यात येत असावेत ... मोठमोठे प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी ,राजकारणी ,पोलीस जज ,वकील कसे सहन करत असतील हे टेन्शन ... कुठून येत असेल हिम्मत संघर्षाची ???
कुणी मार्गदर्शन करू शकेल का स्वतःला उभारी कशी द्यावी ?संघर्षाला बळ कसे द्यावे ???