खूप दूध शिल्लक आहे

गम्मत-जम्मत's picture
गम्मत-जम्मत in पाककृती
23 Sep 2017 - 5:23 pm

घरी २ लिटर दूध शिल्लक आहे. खाणारी तोंडे २ च आहेत.
कृपया आरोग्य दायक पाकृ/ पर्याय सुचवा.

१. पिउन टाकणे हा पर्याय करून झाला आहे. जास्त प्यायला जमत नाही.
२. नवरोबा जास्त गोड खात नाही.

हे मला प्रश्नोत्तरे मध्ये लिहायचे होते. पण access denied.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

23 Sep 2017 - 5:44 pm | कपिलमुनी

मांजर पाळा

विनटूविन's picture

28 Sep 2017 - 9:57 am | विनटूविन

कुत्रे पण चालेल

अनुप ढेरे's picture

4 Oct 2017 - 4:33 pm | अनुप ढेरे

नको! तो भुंकला आणि शेजारच्याला त्रास झाला तर गवि चिडतील.

गम्मत-जम्मत's picture

23 Sep 2017 - 5:57 pm | गम्मत-जम्मत

हाहाहा

Ana's picture

23 Sep 2017 - 6:18 pm | Ana

पनीर बनवा

उगा काहितरीच's picture

23 Sep 2017 - 6:33 pm | उगा काहितरीच

अंघोळ करा .

१) पनीर करा. त्यात एक लीटर संपेल.
२) उरलेल्या दुधाचा खवा करा.
३)किंवा अर्धा लिटर कणिक भिजवायला म्हणजे दशम्या करायला वापरा. या दशम्या टिकावू आहेत म्हणून प्रवासात नेतात.
मग प्रवास प्लॅन करा. तेवढेच फिरणे होईल.
४) उरलेल्या अर्ध्या लिटरधील पाव लिटर दुधाचा चहा करा व बेकरीतून खारी, टोस्ट असे आणून त्याबरोबर संपवा.
मी चहा घेत नाही पण आमच्या पूर्वीच्या शेजार्‍यांना हे प्रकार आवडायचे म्हणून सुचवतिये.
५)अजूनही दूध उरले आहेच ना, हरभरा डाळीचे पीठ थोड्या थोड्या दुधात कालवून चेहर्‍याला मास्क म्हणून लावा. अठवडाभरात सतेज कांतीचा लाभ होईल.
६) आता इतकं छान दिसल्यावर नवरा खूष होऊन शॉपिंगला नेईल. संसारी बायकांना कितीही शॉपिंग केलं तरी स्वयंपाकघारील एखादी संपलेली डाळ, रवा, कणिक असे आठवतेच. मग ग्रोसरीत जावा. तुम्हाला हवी ती खरेदी करा. आपल्याकडे दोन लीटर दूध खपत नाही हे एव्हाना लक्षात आले असेलच. मग एकच लीटर विकत घ्या व तेवढे तरी संपतेय का हे बघा.
(तुमच्याकडून धपाटे मिळण्याआधी मी पळते)

अभिजीत अवलिया's picture

23 Sep 2017 - 7:04 pm | अभिजीत अवलिया

वा. ह्याला म्हणायचे उत्तर. असो. पण घरी फक्त २ तोंडे असताना इतके दूध मुळात आणलेच कशाला हा प्रश्न पडून राहिलाय.

सरनौबत's picture

3 Oct 2017 - 5:07 pm | सरनौबत

हा हा हा! जबरदस्त

तेजस आठवले's picture

23 Sep 2017 - 8:08 pm | तेजस आठवले

मसाला दूध बनवा आणि आम्हाला प्यायला बोलवा.

पैसा's picture

23 Sep 2017 - 9:01 pm | पैसा

दही लावा, ते जमेल तेवढे संपवा. मग दह्याचे काय करू म्हणून धागा काढा.

त्यांचे आरोग्य सुधारेल . .

गम्मे, फक्त दोन लिटरच दूध आहे ना. दहा लिटर तर नाही ना.

सरळ पनीर बनवून ठेव आणि १५-२० दिवसांत वाट्टेल तेव्हा वापर.

मराठी कथालेखक's picture

24 Sep 2017 - 11:41 pm | मराठी कथालेखक

पनीर बरोबर खव्याचाही पर्याय आहे.

मनिमौ's picture

25 Sep 2017 - 9:43 am | मनिमौ

घरी येणार्या मदतनीस मावशी असतील तर त्यांना देऊन टाका.

आटवून खवा करा आणि मग त्या खव्याच्या पोळ्या करा. त्यातूनही खवा शिल्लक राह्यलाच तर दिवाळी अंकात पाकृ येतेच आहे.

ज्ञानेश's picture

25 Sep 2017 - 2:50 pm | ज्ञानेश

नमस्कार,
एक चांगला पर्याय... गरीब मुलांना द्या. बऱ्याच वेळा सिग्नल वर लहानमुले असतात, त्यांना दिले प्यायला तर पुण्य हि मिळेल आणि मानसिक समाधान त्याहून हि जास्त.

कपिलमुनी's picture

25 Sep 2017 - 4:26 pm | कपिलमुनी

दूध कुणाचे आहे ?
हे अजून स्पष्ट केलेले नाही :)

पगला गजोधर's picture

25 Sep 2017 - 4:29 pm | पगला गजोधर

इश्श्य !!!!.... मुनिवर

पगला गजोधर's picture

25 Sep 2017 - 4:32 pm | पगला गजोधर

कुणाचं म्हणजे काय ? चितळ्यांचं दूध असणार नं !

ते आमच्या पुण्यात हो!! दुसर्‍या ठिकाणी कुठे चितळे दूध मिळायला.

कपिलमुनी's picture

25 Sep 2017 - 7:27 pm | कपिलमुनी

पनीर किंवा इतर पदार्थ करताना दूध गायीचे कि म्हशीचे यावरून फरक पडतो !
त्यात इश्श हुश्श क्रू नै

पगला गजोधर's picture

25 Sep 2017 - 7:53 pm | पगला गजोधर

नै मले भीती वाटून राहिलेली, की तुमाले "खरवसची " रेशिपी द्यायची व्हती का कांय ?
म्हणून एवढी तपशिलात चौकशी करताय दुधाच्या उद्गमाबद्दल !

:)

चहा करून सगळ्या शेजार्‍यांना चहाला बोलवा. पुण्यात असाल तर लिम्का नाय तर गिनीज बुकात नोंद होण्याची शक्यता आहे.

चा बि करायची अन सग्ग्ग्गळ्या शेजार्‍यांना बोल्वायची काय गरज आहे?
नुसते एखाद्याला बोलावले तर रेकॉर्ड होईल म्हणा.

अभिजीत अवलिया's picture

25 Sep 2017 - 7:38 pm | अभिजीत अवलिया

धागा दोन दिवसापूर्वीचा आहे. आतापर्यंंत दूध संंपले पण असेल.

अभिदेश's picture

26 Sep 2017 - 11:28 pm | अभिदेश

एवढ्या लोकांना विचारले आणि त्यांनी एवढे सल्ले दिले .. निदान काय केले हे लिहिण्याचे सौजन्य दाखवा.

एस's picture

26 Sep 2017 - 11:56 pm | एस

ओतून द्या आता. नासले असेल एव्हाना.

गम्मत-जम्मत's picture

27 Sep 2017 - 5:06 pm | गम्मत-जम्मत

धागा काढण्या आधी च्या माझ्या कल्पने प्रमाणे केले. दही लावले मग त्याचा चक्का केला. आणि मग अर्थात श्रीखंड. भरपूर जायफळ घालून. अप्रतिम झालेलं.
मला वाटलं होतं इथे विचारून काही नवीन कल्पना मिळेल. असो.
@पिंगु- पनीर चा पर्याय ही चांगला आहे.
दूध 'शिल्लक 'राहिले होते. मुद्दाम इतके का आणेन २ साठी!! खवा वगैरे मेरे बस की बात नाही ओ.. धन्यवाद!!

पगला गजोधर's picture

27 Sep 2017 - 5:24 pm | पगला गजोधर

दूध 'शिल्लक 'राहिले होते. मुद्दाम इतके का आणेन २ साठी!

पण शिल्लक राहण्यासाठी, आधी त्याला "आणावेच" लागते न ?

इरसाल's picture

27 Sep 2017 - 11:20 pm | इरसाल

यो तो पोप्पट हो ग्यो !!