इमारत पुनर्विकास संदर्भात सल्ला हवा

सचिन७३८'s picture
सचिन७३८ in काथ्याकूट
13 Sep 2017 - 8:49 pm
गाभा: 

सन ऑक्टोबर २०१३ आम्ही आमची जागा पुनर्विकासासाठी एका विकसकास दिली होती. त्या जागेवर आमच्या मालकीचा बंगला होता. तो विकसकाने विकसन करण्याच्या नावाखाली त्याच वर्षी पाडला. त्याच्यासोबत आम्ही विकसनाचा रितसर करारही केला होता तसेच मुखत्यारपत्रही त्याच्यासोबतच केले होते. मुखत्यारपत्राच्या आधारे त्याने डिसेंबर २०१३ ला ती जागा दुसऱ्या विकसकास पुनर्विकास करण्यासाठी दिली. त्याच्यासोबतही त्याने करार केला आहे. परंतु गेले ४ वर्ष दुसरा विकसक बांधकाम परवानगी न मिळण्याचे कारण सांगून इमारत विकसित करण्यास टाळाटाळ करत आहे. पहिल्या विकसकास याबाबत विचारले असता ‘मी ती जागा दुसऱ्या विकसकास दिली आहे’ असे सांगून हात वर करतो.

याबाबत काय करता येऊ शकेल? अजूनही काही डिटेल्स हवे असतील तर मी ते देतो.

प्रतिक्रिया

तुमच्या करारात कुठल्याही प्रकारची एंड डेट नव्हती का? उदा इमारत ३१-डिसे-२०१५ पर्यंत विकसित करुन न दिल्यास हा करार रद्द समजला जाइल अश्या पद्धतीची.

सचिन७३८'s picture

14 Sep 2017 - 10:36 am | सचिन७३८

नाही

Minal Rao's picture

14 Sep 2017 - 1:39 pm | Minal Rao

Tumche Devolopment Agreement ani Power of Attorney che clauses barkaine tapasun tyatach tumhala yatun baher yenyassathi kahi marga sapadtoy ka te pahava lagel. By the way to tumhala Alternate Accommodation sathi pay kartoy ka?

मी निलेश's picture

8 Oct 2017 - 3:58 pm | मी निलेश

जागा विकासासाठी देताना development अग्रीमेंट केले जाते यामध्ये अमुक तमुक flat ,गाळे जागा मालकाला अमुक तमुक कालावधी मध्ये दिली जाईल असे स्पष्ट लिहावे लागते ,तुमच्या वकिलाने हे तुम्हाला सांगायला हवे होते .

माझी जागा माझ्या ताब्यात ताबडतोब द्या (अजून काहीही बांधकाम झाले नसल्यास )असा तगादा तुम्ही लावा,जागा दुसऱ्या विकासकाला देण्याची गरज काय तुझी कॅपॅसिटी नसेल तर मी स्वतः दुसरा विकासक पाहतो असे तुम्ही पहिल्या विकासकाला सांगायला हवे होते.

ह्या दोन्ही लोकांना ह्या गोष्टीने काही फरक पडत नाहीये पण तुमचा कालावधी वाया जातो आहे आणि अशी अनेक उदाहरणे आसपास आहेत
नवीन प्रोफेशनल आणि त्यातला त्यात रेप्युटेड आणि ओळखीचा विकासक पहा आणि त्याला काम द्या .