मानवेतरप्राण्यांनासुद्धा खासगीपणाचे आणि पर्सनालिटी राईट्स असावेत का ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
12 Sep 2017 - 2:34 pm
गाभा: 

इ.स. २०११ मध्ये नारुटो (Naruto) नावाच्या माकडाने स्वतःच्या बोटांनी स्वतःचा सेल्फी काढला. आंतरजालावर त्याला वारेमाप प्रसिद्धी मिळाली पण वेगळाच कॉपीराईट कुणाचा असा कायदेशीर मुद्दा उपस्थित होऊन प्रकरण कोर्टात गेले. अर्थातच कॅमेराच्या मालक फोटोग्राफरने कॉपीराईट दावा करणे आणि प्राणी सद्भाव संस्था तो त्या प्राण्याचा आहे म्हणणे आणि कॉपीराईट मुक्ततावादी ते छायाचित्र कॉपीराईट मुक्त असले पाहीजे असे सगळे वाद झाले कॉपीराईट कायदे प्रत्येक देशाचे स्वतंत्र असतात आणि प्रत्येक देशाची न्याययंत्रणा वेगवेगळे निर्णय देऊ शकते. युस्टे आमेररीकेतील लेटेस्ट एका निकालात कॅमेरा मालकाने २५ टक्के उत्पन्न प्राणी संवर्धनासाठी खर्च करण्याच्या दाखवलेल्या तडजोडीस तुर्तता मान्यता मिळाल्याचे दिसते.

ह्युमन राईट्स तसे माणसा करता असतात प्राण्यांच्या हितासाठी झगडणार्‍या संस्थाही असतात. भारतात उपरोक्त माकडाने स्वतःच्या काढलेल्या छायाचित्रासाठी काय निकाल न्यायालय देईल माहित नाही. कारण तसे कॉपीराईट ज्याने कॅमेरा क्लिक केला त्याचा असतो. पण कॅमेराचा मालक कॅमेराचे पोझिशनींग करण्याचे कौशल्य माझे होते म्हणू शकतोच.

प्राण्यांसाठी नाही पण भारतीय मानवी नागरीकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने राईट टू प्रायव्हसी नुसतेच मुलभूत अधिकार नाही तर पब्लिक प्लेस मध्ये राईट टू प्रायव्हसी असल्याचे म्हटले आहे. आता समजा तुम्ही पब्लिक प्लेस मध्ये आहात पण पब्लिक स्टेजवर नाही आहात जसे कि रस्त्यावर उभे आहात किंवा गार्डन मध्ये तर समोरच्या व्यक्तिने तुमचे छायाचित्र काढण्या आधी तुमची लेखी परवानगी घ्यावयास हवी. म्हणजे आता पर्यंत भारतीय कायद्यात उपलब्ध नसलेला पर्सनॅलिटी राईट मागच्या दाराने येऊन उभा टाकला आहे. एखादी सेलिब्रिटी तुमची शेजारी असली तरी त्यांच्या लेखी परवानगी शिवाय त्यांचा छायाचित्र काढणे दुरापास्त होऊन जाणार आणि याचा सर्वाधिक आर्थीक लाभ सेलिब्रिटींना होणार हे नक्की.

आता भारतात असा खासगीपणाचा आणि पर्सनॅलिटी राईट प्राण्यांसाठी नाही. पण आमेरीकेतल्या प्रमाणे कॉपीराईट अमाऊंटचा हिस्सा प्राण्यावर खर्च करणे आले तसे आपण समजा जंगलात किंवा प्राणि संग्रहालयात शुटींग करत आहात तर त्या प्राण्यांना खासगीपणाचा आणि पर्सनॅलिटी राईट असावा असे तुम्हाला वाटते का ? समजा तुम्ही रस्त्यावरच्या कुत्र्याचा फोटो काढू इच्छिता तसा तुम्हाला अधिकार असावा का आणि समजा तुम्हाला त्याचा फोटो काढू दिला तर त्या बद्दल तुम्हाला महानगर पालिकेने किंवा ग्रामपंचायतीने बिल द्यावे का ?

प्रतिक्रिया

हा निकाल नसून कोर्टाबाहेर केलेली सेटलमेंट वाटते.

माहितगार's picture

12 Sep 2017 - 3:30 pm | माहितगार

केस भारतीय नसल्याने मी सुद्धा डिटेलमध्ये वाचलेले नाही, आपण म्हणता तसे असावे.

सेटलमेंट असेल तर फोटोग्राफर ने नाव खराब होऊ नये तसेच फोटो कॉपीराईट फ्री होऊ नये म्हणून सेटलमेंट केलेली वाटते, त्याला फार काही कायदेशीर आधार आहे असे वाटत नाही, कारण बातमीतच म्हणाले आहे तसे माकड कॉपीराईट धारक असू शकत नाही.

राहिला प्रश्न प्रायव्हसी चा. जर फोटो काढणे या सारख्या मानवनिर्मित गोष्टीबाबत प्रायव्हसीचा प्रश्न असेल तर माझ्या मते प्राण्याला काही हरकत नसावी. प्राण्याच्या मालकाला असू शकेल (तसं पाहिलं तर पाळीव माणूस नसतो तर पाळीव प्राणी तरी का असावे ?). आणि या हरकत घेण्या - ना घेण्याची, आणि ते कळवण्याची प्राण्याची बौद्धिक क्षमता असते असे वाटत नाही - सबब प्रायव्हसी चा कायदा पारंपरिक रित्या लावता येईल असे वाटत नाही.

पण, मोदक म्हणाला तसे, मानवाने तारतम्य पाळले पाहिजे, त्या करिता वेगळे कायदे (जसेकी गोवंश हत्या बंदीचा प्राणी स्पेसिफिक कायदा आहे तसं) करता येऊ शकतील.

असावे की नसावे हे आपण कोण ठरवणार..?

त्या त्या प्राण्यांचे खाजगीपण इतर प्राणी पाळतात.. आणि माणूस त्यात ढवळाढवळ करतो.. त्यामुळे माणासाने हे तारतम्य पाळले पाहिजे.

अगदी हेच म्हणायचं होतं.

कॅापी राइट मुद्दयाशिवाय त्यांना त्रास देऊन ,फसवून फोटो काढू नयेत. रातकिड्यांवर फ्लॅश मारू नका.

पैसा's picture

12 Sep 2017 - 10:40 pm | पैसा

त्रास देऊ नये हे खरे. माकडाला सेल्फी काढायला लावणे हेही अनैसर्गिक आहे. प्राण्याना 'इंडिव्हिजुअल" हा स्टेटस नसेल तर कॉपीराईटही देता येत नसावा.

सप्तरंगी's picture

25 Sep 2017 - 6:10 pm | सप्तरंगी

जिथे माणसांचेच copyrights, खासगीपणा इतर लोकांना मान्य नाहीत तेंव्हा ते मुक प्राणी तर फार दूरची गोष्ट आहे. इतरांनी काय खावे, काय परिधान करावे, धर्म पाळावा कि नाही पाळल्यास नक्की काय follow करावे हे बाकी लोकच ठरवत असतात, किंवा संस्कृतीच्या नावावर किमान त्यावर सतत भाष्य तरी करत असतात. माणुस बोलुन विरोध करतो तर त्याचे तोंड बंद केले जाते. आधी आपण आप-आपसात आपली कर्तव्ये आणि अधिकार ओळखूयात मग प्राण्यांचा विचार करूयात. तसेही त्या सध्या त्या प्राण्यांना माणसासारखा फरक पडतो का त्यांचा फोटो कुठे कुठे येतो आहे त्याने.