प्रतिशोध भाग-४

कऊ's picture
कऊ in जनातलं, मनातलं
12 Sep 2017 - 10:03 am

भाग १ -http://www.misalpav.com/node/40584

भाग २ -http://www.misalpav.com/node/40583

भाग ३- http://www.misalpav.com/node/40568

भाग ४

पुढच्या दिवशी
कॉलेज कँटिन मध्ये काव्या स्वतःच्याच तंद्रीमध्ये बसली होती.
आतापर्यंत सियालचे किती कॉल येऊन गेले पण तिने उचलला नाही.

"हाय काव्या, आज एकटीच,गँग कुठे ग तुझी.."स्वरा तिच्या समोरच्या खुर्चीत बसून बोलली.

"माहित नाही.स्वरा तू या कॉलेजमध्ये अकरावी पासून आहे ना?"

"हो ,का ग??अस अचानक?"

"स्वरा मला तुला काहीतरी विचारायच आहे, प्लीज हेल्प मी यार."

"अग रिक्वेस्ट काय करते,आपण क्लासमेट आहोत..
विचार पण त्या आधी काही खाऊया का?थांब मी सँडविच घेऊन येते."

स्वरा पुन्हा येईपर्यंत काव्याने तिचा फोन बंद केला.
सियालसोबत बोलायची तिची इच्छा नव्हती.

"हे घे...आणि चल विचार आता.. तसपण तू त्या ग्रुप सोबत एवढी असते की आम्हाला विसरली."

"अस नाही ग,मला तुला कस्तुरी बद्दल विचारायच होतं."कसबस तिने विचारले.

स्वरा खायची थांबली.
"काव्या तू कोणत्या कस्तुरीबद्दल विचारतेय?"

"जी अकरावीला तुझ्यासोबत होती.."

"तुला कस माहित तिच्याबदद्ल ??ओह तुझ्या ग्रुप वाल्यांनी सांगितल का?"

काव्या तिला सर्व काही सांगते..

"काव्या...कस्तुरी माझी मैत्रीण होती. आणि तुला माहित नाही.
मी तुझ्या याच ग्रुप सोबत असायची.. कुमार माझा bf होता .पण नंतर आमच ब्रेकअप झालं.
आणि मी तो ग्रुप सोडला.
असो,कस्तुरी कुमारला,बबलुला ,श्रीला आणि सँडीला या सर्वांना भाऊ मानायची.
का ते नाही माहित.
पण सियाल,तो तिच्या साठी खूप खास होता.
आम्ही हॉस्टेलमध्ये एकाच रुममध्ये होतो त्यामुळे बाकीच्यांना तिच्या बद्दल जास्त माहित नसल तरी मला माहित आहे.
मी तुला सर्व सांगेन पण आता इथे नाही आपण संध्याकाळी भेटू,सहाच्या आसपास.तुला चालेल का?"

"हो चालेल,पण कुठे भेटणार?"

"सांगेन तुला कॉल करून,चल आता लेक्चरला तर जाऊया."

"हा वेळ आहे ना अजून, आणि खरं सांगू तर इच्छा नाही ग काही करायची."

"मी समजू शकते काव्या, होईल सर्व नीट.पण तुला आता एवढच सांगेन तू त्या ग्रुप मध्ये पुन्हा एवढ्यात तरी जाऊ नको.कस्तुरीचा विषय चालू आहे आणि जर त्यांच्या पैकी कोणाला समजल की मी तुला कस्तुरी बद्दल काही सांगणार आहे तर मग प्रोब्लेम होईल."

"एक मिनिट , काय प्रोब्लेम होणार??हे बघ तु कस्तुरी बद्दल नंतर सांग ठिक आहे पण तू जे आता बोलली ते का हे तर सांग."

"काव्या,मी जाते पुढे.15 मिनिटे आहेत अजून, तुला ठिक वाटल तरच ये लेक्चरला,नाहीतर भेटू तेव्हा नोटस देईन.
आणि हा आजचा ब्रेकफास्ट माझ्याकडून हा..बाय , काळजी घे."

काव्याच डोक भणभणत होतं.ती bag उचलून निघतच होती तेवढ्यात अचानक तो तिच्या समोर आला.

"मला बोलायच आहे, काव्या.."

"पण मला काही बोलायच नाही आणि ऐकायच सुध्दा नाही.एकट राहायच आहे. समजून घे सियाल."

"ठिक आहे, जातो मी पण एवढ ऐक की कस्तुरी माझा भूतकाळ होती. तु माझं वर्तमान आहेस. माझी चुकी हीकी मी तुला से सर्व आधीच सांगायला हवं होतं.पण आम्ही ठरवलेलं की हा विषय पुन्हा काढणार नाही."

"सियाल,मी घरी जातेय.मला ठिक वाटलं की बोलेन."काव्या निघाली तर पण वाटेत एक नवीन चेहरा तिची वाट बघत उभा होता.त्याला बघून काव्या खूष झाली.

"तू इथे??अरे वा आजकल पोलीस पण सरप्राईज द्यायला लागले.आलाच आहेस तर घरी चल माझ्यासोबत मम्मी पप्पा पण खूष होतील."

"अग हो हो,जरा हळू..तुलाच न्यायला आलो आहे. चल बस आता गाडीत , निघुया."
काव्या त्याच्यासोबत निघाली.
सियाल मागून तिच्याकडे आणि त्या नवीन माणसाकडे बघत राहिला.

********

तो:- कुठे आहेस तू??सर्व ठीक आहे ना??
प्लॅननुसारच चालू आहे ना सर्व??

ती:-हो,काही काळजी करू नको.

तो:- ठिक आहे "के"
मी येणार आहे तिथे, भेटू आणि मग पुढच ठरवू

ती:-तु मला टोपणनाव "के"अस काय दिलं,काहीतरी चांगल तरी द्यायच.

तो:-आता यावरून भांडणार आहेस का तू??भेटून भांडूया ओके ,काळजी घे.

ती:- ठिक आहे, तू पण काळजी घे.

****

स्थळ : काव्याचे घर

"काव्या , गौरव कुठे चाललात एवढ्या घाईत? मस्त काहीतरी बनवते मी,बसा तुम्ही."

"मम्मी बाहेर जातोय आम्ही, तू बनवून ठेव ना,आल्यावर खाऊ आम्ही."

"आई,येतो आम्ही थोड्या वेळात, आणि हो उगाच काळजी नको करू, मी आहे तिच्या सोबत."एवढं बोलून गौरव काव्याच्या मागे निघाला.

"अग हळू जरा, किती घाई?"

"दा,घाई तर करावीच लागणार ना,मला कस्तुरी बद्दल सर्व जाणून घ्यायचय.बोलली होती तुला तरी..."

"काव्या , मी गाडी काढतो, थांब जरा."

"का, रिक्षाने जाऊया चल."

"गाडी असताना रिक्षा??एवढी कोणाला घाबरते?नाटक नको करू चल लवकर."

"सियालने कॉल केला तेव्हा होता ना तू समोरच..तुझ्याबद्दलच विचारत होता तो.कोण होता तुझ्यासोबत?त्याला काय वाटलं असेल रे??"

"सियालपुराण थांबवणार आहेस का आता?"

"तिला कॉल करते एकदा."

काव्या :- "अग आम्ही निघालो आहोत."

स्वरा:- "काव्या मी तुलाच कॉल करणार होती. आपण प्लीज अजून कुठेतरी भेटूया,का ते विचारू नको.मी...मी तुझ्या घरी येऊ का??ते जास्त सेफ राहणार."

काव्या:- "ठिक आहे, ये तू,घर माहित आहे ना?"

स्वरा:- "हो,बाय"

काव्या:-"बाय"

"काय झालं ग,दा चल घरी "

"घरी??का??ती घरी येतेय ते तर समजल मला पण बाहेर भेटणार होतो ना."

"माहित नाही , काय झाल तू चल , ती येईल बरोबर."

****

"कुमार मला वाटतयं की काहीतरी गडबड आहे."

"सँडी, मी खरच तिला बघितलं, ती कस्तुरीच होती.मी नाही ओळखणार का तिला."

"तु फक्त एक ब्रेसलेट असलेला हात बघितला, हे तूच बोलला?"

"सँडी,कुमारने तर तिला खूप जवळून बघितलं आहे.तो कस विसरेल तिला."हसतच बबलु बोलला.

"ए,बस फक्त मी नाही , तुम्ही सर्व होता तेव्हा तिथे.
तिला धमकी दिली तेव्हा म्हणून वाचलो..
सियालसाठी पागल होती ती.जस आता ही काव्या आहे."बेडवर पडलेला कुमार खवळला.

"तेच,ती सियाल मुळे गप्प बसली.सोड यार,विसर आता.अनु कुठे गेली आहे ?"

बबलु : "जाताना तर बोलली की काव्याला भेटायला जातेय.सियाल पण नाही म्हणजे नक्की काव्याला समजावयला गेले ते.."

श्री : "सकाळ पासुन बघतोय, अनु आणि सियाल टेंशन मध्ये आहेत.. काहीतरी आहे जे आपल्याला माहित नाही"

कुमार : "आणि अस खूप काही आहे जे त्यांना माहित नाही."

बबलु: "आणि अनुला यातलं काही माहित नाही झालं तर बर..नाहीतर आपण फसणार."

*****

"दादा स्वरा अजून कशी नाही आली,
कॉलेज हॉस्टेलवरून इथे यायला इतका वेळ नाही लागत रे दा.
ती ठिक असेल ना?

"तिला कॉल कर आणि विचार ग वेडाबाई.."

"दादासाहेब तुझ्याच समोर तिलाच कॉल करतेय ना उचलत नाही ती.
मला टेंशन येतयं दा."

गौरव काही बोलणार इतक्यात दारावरची बेल वाजते.
काव्या आणि गौरव काव्याच्या रूममधून बाहेर येईपर्यंत काव्याच्या मम्मीने दरवाजा उघडला.
"अरे सियाल तू?
आत ये,आणि ही कोण?"

काव्या संभ्रमात पडली.
स्वरा सियालसोबत का आली असेल..

पण सियाल आणि अनु ला सोबत बघून ती अजून जास्त गोंधळली.
तिच्या डोक्यात प्रश्नच प्रश्न होते.
जेव्हा पासून कस्तुरीचा विषय निघाला होता , तेव्हापासून काव्याच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी काहीतरी विचित्र घडायच आणि ती प्रश्नांच्या वादळात हरवायची.
आज फक्त तीच नाही तर गौरव सुध्दा विचारात होता.

"स्वरा अजून आली नाही पण अनु आणि सियाल कसे आले ते सुध्दा अस अचानक माझ्या घरी."काव्या तिच्याच विचारात होती.

"काऊ अगं बोल तू यांच्या सोबत,
मी मार्केट मध्ये जातेय"

"आई,आम्ही काव्याच्या रूममध्ये बसून बोलतो,तू जा आरामात ये."

काव्या , गौरव, अनु आणि सियाल आत रूममध्ये जातात.

"सियाल तू इथे का आला??
प्लीज इथे काही तमाशा करू नको."

"काऊ,यार माझं ऐकून तर घे.
मी इथे...."

"सियाल काही बोलू नको आता , बसं झालं.
मला थोडा वेळ दे.माझं डोक शांत झालं की बोलू.यावेळी काहीही बोलणन योग्य नाही.
आपण नक्कीच फ्रेंडस पेक्षा जास्त आहोत.
पण तू तुझा भूतकाळ माझ्यापासून लपवला,मान्य आहे प्रत्येकाचा पास्ट हा असतो. तुला माझ्यावर विश्वास नव्हता का??
फक्त जगाला दाखवण्यासाठी नातं ठेवायच आहे तुला,तुझी प्रत्येक गोष्ट मी का म्हणून ऐकू. आपण ज्या वयात आहोत , या वयात प्रेम की आकर्षण तेच समजत नाही.
आपण हे नात तोडूया,
जर तू हे माझ्यापासून लपवलं तर अजुन किती काय असेल..
अनु दी याला घेऊन जा इथून, माझ्या घरी काही सीन नको.
गौरव दादा तू समजव याला, ओरड काहीही कर..."काव्या खूप रागात होती.

"काऊ काम डाऊन..
सियाल , अनु तुम्ही चुकीच्या वेळी आलात."

"ठीक आहे,
सियाल चल निघुया.."

एवढ बोलून अनु जवळपास सियालला खेचतच घेऊन गेली.गौरव ही त्यांच्या मागे गेला आणि ते गेल्यावर दरवाजा लावून पुन्हा काव्याच्या रूममध्ये आला.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

दिपक लोखंडे's picture

12 Sep 2017 - 11:15 pm | दिपक लोखंडे

छान.!
पु.ले.शू.

दिपक लोखंडे's picture

12 Sep 2017 - 11:15 pm | दिपक लोखंडे

छान.!
पु.ले.शू.