कन्हैया कुमार आणि उमर खालिद : एक निवांत चर्चा

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in काथ्याकूट
10 Sep 2017 - 9:03 pm
गाभा: 

शीर्षक वाचून बऱ्याच लोकांच्या मनात लगेच प्रश्न आला असेल "देशविरोधी/देशद्रोही लोकांबरोबर निवांत चर्चा?"
आपल्याकडे हल्ली सोशल मीडियावर आणि काही ठरलेल्या चॅनेल्स वर स्वतःला सोयीस्कर अशा लोकांच्या प्रतिमा उभारल्या जात आहेत.
देशप्रेम, स्वदेशी या गोष्टी काही लोकांच्या सोयीनुसार ठरत आहेत आणि काही लोक तर स्वतःच्या अख्या कंपन्या कथित देशप्रेमावर चालवू लागल्या आहेत!

मग अशा वातावरणात निष्पक्ष चर्चा कशा होणार आणि लोकांचे खरे विचार समोर कसे येणार...
पण याच सोशल मीडियावर काही बऱ्यापैकी कन्टेन्ट पण असते कधीतरी सापडते!

असाच एक व्हिडीओ पहिला आणि तो शेअर करावासा वाटला. यात काही गहन चर्चा वगैरे नाहीये.
एका तरुण मुलाने दुसऱ्या २ मुलांशी मारलेल्या निवांत गप्पा... या प्रकारात हा व्हिडीओ आहे!
(यात काही अडल्ट जोक पण आहेत त्यामुळे सांभाळून बघा! )

हि चर्चा पाहिल्यावर जाणवलं कधीकधी आपल्यासमोर उगीचच एक बागुलबुवा उभारला जातो, जो प्रत्यक्षात कुठेच नसतो पण त्याची भीती मात्र वाटते!
लहानपणी मुलांकडून जेवण संपवून घ्यायला, अभ्यास करून घ्यायला इत्यादी अनेक कामांसाठी त्याचा वापर व्हायचा.
आता देखील तसेच बागुलबुवा निर्माण केले जातात, पण त्यांचा उद्देश सत्ता मिळवणे, लोकांचे आपल्याला हवे तसे विभाजन करणे, त्यांच्याकडून आपली काम करून घेणे असे असतात.
लहान मुलांना जोपर्यंत माहित नसत कि बागुलबुवा नाहीये आणि तो आपल्याला काही करणार नाही तोपर्यंत ते सगळं ऐकतात पण जेव्हा त्यांना कळू लागत कि हे मोठे लोक सरळ सरळ आपल्याला फसवत आहेत तेव्हा ती त्या गोष्टी ऐकणं बंद करू लागतात! परिस्थिती ताब्यात राहत नाही.

हेच काही राजकीय पक्षांना नको असते, जोपर्यंत देशातल्या लोकांना कळत नाही कि "अरे हा देशविरोधी नाही" "तो देशद्रोही नाही" तोपर्यंत लोकांना त्या लोकांचा बागुलबुवा दाखवायचा आणि आपल्या बाजूला करून घ्यायचं! काही चॅनेल वाले साथ द्यायला असतातच. एक नसलेला शत्रू सगळ्या देशाला निर्माण करून द्यायचा. आणि मग आम्हीच फक्त देशप्रेमी हे सिद्ध करायचे. दुसऱ्या पक्षाचे विचार दाबून टाकायचे! जेणेकरून बागुलबुवा "जिवंत" राहावा.
तसेच हे दोन बागुलबुवा! उमर खालिद आणि कन्हैया कुमार.
पण हा व्हिडीओ बघितल्यावर जाणवले कि अरे, हे पण आपल्यासारखेच आहेत. त्यांचे स्वतःचे काही विचार आहेत आणि त्या दृष्टीने ते समाज बघतात आणि बोलतात. यांच्यापासून माझ्या देशाला काय धोका आहे? आपल्याला यांची भीती का दाखवली जात आहे? माहिती नाही...

काही वाक्य खरंच आवडली कन्हैया कुमारची, एक स्पेशल वाक्य २७:३३ मिनिटांवर आहे.
ट्रोल्स वर तर सहीच बोलले आहेत दोघेपण!

जर आपण व्हिडीओ पाहिलात तर यांच्याबद्दल आपल्या आधीच्या आणि नंतरच्या विचारात काही फरक पडला का हे नमूद करू शकता.

तरुणांनी तरी, हा व्हिडीओ नक्की पहा!

विशेष सूचना: मी देशद्रोही वगैरे नाही(असे मला तरी वाटतंय) मी यांना व्यक्तिशः ओळखत नाही!

व्हिडीओची लिंक.

प्रतिक्रिया

पण कोणाही देशप्रेमी व्यक्तिंचे ओवाळून कौतुक करण्यास आमची आजीबात ना नाही. आम्ही विभूती पूजा आणि विभूतीविरोधाच्या नावाखाली होणारी विभूतीपूजा दोघांचीही मनोभावे आरती करणार्‍यांसाठी खालील पंचारती ताट प्रेमपुर्वक भेट करतो.

Pancharati

कोणी काय दिवे लावणे अपेक्षित आहे?
इथे विभूतिपूजा कुठे दिसली तुम्हाला?

अरे, हे पण आपल्यासारखेच आहेत.

हे वाक्य लिहिले आहे लेखात!
आपण शक्यतो बॅलन्सड प्रतिक्रिया देता असे बघतो, इथे असे काय घडलंय?

श्रीगुरुजी's picture

10 Sep 2017 - 11:52 pm | श्रीगुरुजी

खालील धाग्यातील मुलाखतीतूनही कन्हैयाकुमार हा एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती या स्वरूपात समोर येतो.

http://www.misalpav.com/node/35187

गामा पैलवान's picture

11 Sep 2017 - 3:03 am | गामा पैलवान

शब्दबम्बाळ,

अरे, हे पण आपल्यासारखेच आहेत.

नेमकं हेच तर चिंताजनक आहे. आपल्यासारखाच वागणारा, आपल्यासारखाच दिसणारा, आपल्यासारखाच हसणारा, आपल्यासारखाच चालणारा अचानक भारत तेरे तुकडे होंगे अशी घोषणा का देतो? शिवाय त्या घोषणेस इन्शा अल्ला इन्शा अल्ला अशी शेपटी का जोडतो? अल्लाचा संबंधच काय इथे?

जिना पण सेक्युलर आणि प्रोग्रेसिव्हच होता. भारताचे तुकडे होतांना अमाप हिंसाचार उसळतो हे आम्हाला जिनाने दाखवून दिलंय. परत पाहण्याची आमची इच्छा नाही. म्हणूनंच मी कन्हैय्याला आपल्यासारखाच समजंत नाही.

आ.न.,
-गा.पै.

पुंबा's picture

12 Sep 2017 - 12:38 pm | पुंबा

आपल्यासारखाच वागणारा, आपल्यासारखाच दिसणारा, आपल्यासारखाच हसणारा, आपल्यासारखाच चालणारा अचानक भारत तेरे तुकडे होंगे अशी घोषणा का देतो? शिवाय त्या घोषणेस इन्शा अल्ला इन्शा अल्ला अशी शेपटी का जोडतो? अल्लाचा संबंधच काय इथे?

हे कन्हैय्या किंवा उमर यांनी केले?
टीपः मला व्यक्तिशः दोघेही आवडत नाहीत, पण ते लगेच राष्ट्रद्रोही पण वाटत नाहीत. हा, विचारांध मात्र वाटतात.

आदिजोशी's picture

11 Sep 2017 - 1:34 pm | आदिजोशी

हीच तर डाव्यांची गंमत आहे. नक्षलवादीही असेच आहेत आणि युरोपात पळून आलेले शरणार्थीही असेच आहेत. आपल्यातलेच, आपल्यासारखेच वाटणारे... पण वेगळ अजेंडा असणारे.

तेजस आठवले's picture

11 Sep 2017 - 1:57 pm | तेजस आठवले

हेच काही राजकीय पक्षांना नको असते, जोपर्यंत देशातल्या लोकांना कळत नाही कि "अरे हा देशविरोधी नाही" "तो देशद्रोही नाही" तोपर्यंत लोकांना त्या लोकांचा बागुलबुवा दाखवायचा आणि आपल्या बाजूला करून घ्यायचं! काही चॅनेल वाले साथ द्यायला असतातच. एक नसलेला शत्रू सगळ्या देशाला निर्माण करून द्यायचा.

हे तर खूपच पटले. जेव्हा जेव्हा मी रागाला हागल्या पादल्या संघ आणि मोदींचे नाव घेताना पाहतो तेव्हा. तसेच जेव्हा भगवा दहशदवाद हा शब्द संसदेत मांडला गेला तेव्हा.

शब्दबम्बाळ's picture

12 Sep 2017 - 11:46 am | शब्दबम्बाळ

सगळेच राजकीय पक्ष हेच करत असतात. राहुल गांधी ठणाणा नाही करणार तर काय बीजेपी ला मतदान करणार?! :P
बीजेपी विरोधी बाकांवर होते तेव्हा ते काँग्रेसच्या नावाने शंख करायचे. आणि तसे करणे अपेक्षितच आहे. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांच्या दबावाखाली असणे लोकशाहीसाठी गरजेचेच आहे!
पण लोकशाही मध्ये विरोधी मतांवर चर्चा होणेच अपेक्षित असते. त्यासाठी समोरच्याशी सभ्य भाषेत बोलले गेले पाहिजे तर चर्चा मुद्द्यांवर पुढे जाऊ शकेल नाहीतर ती लगेच गुद्द्यांवर येते. हेच सगळीकडे होऊ लागलाय.
आता इथेही तुम्हाला एखादयबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरण्याची काय गरज होती बरे? इतके कोणीच तावातावाने बोलत नाहीये अजून इथे...

कन्हैय्याची देखील जी मते चुकीची वाटतात त्यावर त्याला सरळ प्रश्न विचारून त्याची उत्तरे मिळवणे किंवा त्याला खोटे पाडणे हे होणे अपेक्षित आहे. याच व्हिडीओ मध्ये काही चॅनेल्स वरच्या "डिबेट्स" जे छोट्या क्लिप आहेत, कशापद्धतीने लोक त्यांच्यावर तुटून पडलेत ते दिसेल. चर्चेला बोलवायचं आणि बोलू पण द्यायचं नाही म्हणजे गम्मतच आहे!

आणि बघितलं तर हि कॉलेजची पोर! करून करून काय करणारेय? भाषण देतील, नारेबाजी करतील... जर कायदा हातात घेतला तर पोलीस आहेत बघून घ्यायला! न्यायालये आहेत निवाडा करायला! आपल्याला कशाचं टेन्शन आहे?
का आम्हाला न पटणारे विचारच ऐकून घ्यायचे नाहीयेत असे काही आहे?(त्याची सगळी मते मला पटतील असे नाही)
पण प्रत्येकाला बुद्धी आहे, सारासार विचार करून एखाद्याच्या पटणाऱ्या मतांना समर्थन आणि न पटणाऱ्या मताला विरोध दर्शवता येतो...
त्यासाठी समोरचा माणूस कसा नालायक, निर्लज्ज, देशद्रोही हे मीडियाने किंवा व्यक्तिसमूहाने लोकांच्या गळी उतरवायचा ठेका का घ्यावा?

इरसाल's picture

12 Sep 2017 - 12:10 pm | इरसाल

मला बर्‍याचदा शंका येते राहुल गांधी, भाजपलाच मतदान करत असावेत. म्हणजे ९९% खात्री आहे.

शब्दबम्बाळ's picture

12 Sep 2017 - 1:04 pm | शब्दबम्बाळ

:D
तसेही असू शकत म्हणा!

शब्दबंबाळांना अ‍ॅग्री करायचे नसेल न करू देत, पण बाकी अ‍ॅक्च्युअली तेजस आठवलेंनी मुद्दा बरोबर पकडला आहे. विरोधीपक्षाने गुद्द्यावर न जाता बागुलबुवा दाखवण्यात काही अयोग्य नसेल तर उजव्या गटाने डाव्यांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या कन्हैय्या कुमारादींचा बागुलबुवा दाखवण्यावर आक्षेप का असावा ? बरे कन्हैय्या कुमारादींच्या भूमिका काही अगदीच अराजकीय आहेत असे मुळीच नाही. विद्यापीठात असतील पण तिथे बसून राजकारणच करत आहेत.

तुम्ही राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या नाहीत पण दुसरे देत असताना तुम्ही स्वकीयांविरुद्ध बागुलबुवा दाखवणारी गरळ ओकण्यात मशगुल होता ? बर काय तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विद्यार्थी ? म्हणजे उद्या याला विरोधीपक्ष नेता म्हणून संधी मिळाली परदेशी व्यक्ती भारताच्या विरुद्ध बोलू लागल्या तर हा भारताची बाजू मांडण्याचे सोडून स्वकीय सरकार कसे वाईट आहे एवढेच सांगत फिरणार पण देश विरोधी बोलणार्‍यांची तोंडे आधी बंद करण्याचे सुचणार नाही ? असो जे एन यु विषयावर आधीच बराच खीस पाडून झाला आहे त्या सर्वाची पुर्नरावृत्तीसाठी केवळ मला कॉपीपेस्ट करावे लागणार असले तरी बर्‍याच मिपाकरांनी मी दाखवलेल्या अनेक निसटत्या बाजू वाचून झाल्या असणार त्या सर्वांची येथे पुर्नरावृत्ती करत नाही.

जर कायदा हातात घेतला तर पोलीस आहेत बघून घ्यायला! न्यायालये आहेत निवाडा करायला! आपल्याला कशाचं टेन्शन आहे?

शंभर टक्के सहमत फक्त एवढेच की सरकारने त्यांच्यावर जी काही कारवाई केली त्या बाबत आपण म्हणतातसे कायदा आणि न्यायालये निवाडा करण्यास समर्थ असताना सरकारने जर अटक केली केस लावली तरी त्यावरुन मोदीसरकार विरुद्ध बागुलबुवा उभा करण्याचे वस्तुतः काही कारण शिल्लक राहते का ? इतर मुलांनी आख्ख विद्यापीठ डोक्यावर घेण्याची काय गरज आहे ?

त्यासाठी समोरचा माणूस कसा नालायक, निर्लज्ज, अमुकतमुक हे मीडियाने किंवा व्यक्तिसमूहाने लोकांच्या गळी उतरवायचा ठेका का घ्यावा?

अगेन तेजस आठवले आणि भाजपा मित्र मंडळी नेमके त्यांच्या बाजूनेही हेच म्हणतील. पुन्हा उत्तर शब्दबंबाळ यांनी स्वतःच दिले आहे जो पर्यंत ते बदनामी विषयक कायद्यांचे उल्लंघन करत नाहीत मिडीया आणि विरोधी पक्ष त्यांच्या पद्धतीने त्यांना पटणारा मुद्दा पुढे करण्यास स्वतंत्र आहेत. आणि समजा बदनामी कायद्याचे उल्लंघन होत असेल तर निवाडा करण्यास न्यायालये समर्थ आहेत.

तुम्ही स्वतः देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत हे मान्य. पण तुमच्या विद्यापीठात येऊन देश विरोधी घोषणा दिली जाते तो गुन्हा करणार्‍यांना पकडण्यात साहाय्य देण्याचे सोडून त्यांचा सुस्प्ष्ट निषेध करण्याचे सोडून आणि खास करून तुमच्या कडे नेतृत्व असताना तुम्ही फक्त तो मी नव्हे वर भागवता. पुन्हा नक्षलवादी हिंसाचाराचा सुस्पष्ट निषेध नाही , कायदा मोडला नसेल पण ज्यांच्या निष्ठा पातळ आहेत त्यांच्या सोबतच्या व्यासपिठावर उभे टाकून आपापले राजकीय बागुल बुवा उभे करण्यात दंग असता ? कायदेशीर गुन्हा नसेल केला पण तरीही यांना देशाचे उगवते लायक नागरीक कोणत्या तोंडाने म्हणावे असा काहींना प्रश्न पडला असेल आणि त्यांनी त्या बाबत नाराजी व्यक्त केली तर बिघडले नाहीच आणि अशी रास्त टिका बागुलबुवाही म्हणवली जाणार नाही असा विश्वास वाटतो.

शब्दबम्बाळ's picture

12 Sep 2017 - 9:33 pm | शब्दबम्बाळ

कदाचित कन्हैय्याबद्दलच्या पूर्वग्रहामुळे असेल.. पण आपण बघूया एक एक मुद्दा..
आठवलेंनी वापरलेल्या असभ्य शब्दांवर आपल्याला "आक्षेप" घ्यावा वाटलं नाही याच आश्चर्य वाटलं पण असो...

१. विरोधीपक्षाने गुद्द्यावर न जाता बागुलबुवा दाखवण्यात काही अयोग्य नसेल तर उजव्या गटाने डाव्यांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या कन्हैय्या कुमारादींचा बागुलबुवा दाखवण्यावर आक्षेप का असावा ?

वरच्या प्रतिसादात देखील मी म्हणालो कि सगळेच पक्ष एकमेकांच्या नावाने ठणाणा करत असतात, त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. त्या वापरण्यापासून आपण त्यांना रोखू शकत नाही. त्यामुळे कन्हैय्याकुमारचा बागुलबुवा दाखवण्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही!
पण तो बागुलबुवा उभा करण्यासाठी व्यक्तींना "देशद्रोही" "देशविरोधी" ठरवण्याचा प्रयत्न करणे हे आक्षेप घेण्यासारखे आहे.

२. कन्हैय्या कुमारादींच्या भूमिका काही अगदीच अराजकीय आहेत असे मुळीच नाही. विद्यापीठात असतील पण तिथे बसून राजकारणच करत आहेत.

बर मग? राजकीय/अराजकीय असोत नसोत काय फरक पडतो? विद्यापीठांमध्ये राजकारणाला बंदी तर नाही ना?

३. म्हणजे उद्या याला विरोधीपक्ष नेता म्हणून संधी मिळाली परदेशी व्यक्ती भारताच्या विरुद्ध बोलू लागल्या तर हा भारताची बाजू मांडण्याचे सोडून स्वकीय सरकार कसे वाईट आहे एवढेच सांगत फिरणार पण देश विरोधी बोलणार्‍यांची तोंडे आधी बंद करण्याचे सुचणार नाही ?

आपल्याला लक्षात नसेल तर आठवण करून देतो मा.मोदींनी "परदेशात" विधान केले होते कि "मागच्या जन्मातील पापांमुळे भारतात जन्माला आलो असे भारतीयांना वाटायचे!!" हे गौरवास्पद वाटते का बरे?
आणि असतील भारतात अनेक प्रश्न... गरिबीचा आहे, जातीपातीचा आहे, भ्रष्टाचाराचा आहे याविषयी बाहेरच्या किंवा भारतातल्या लोकांनी टीका केली तर त्या गोष्टी लपवून भारताचे गुणगान गायचे की त्यावर काम करायचे हा प्रश्न देखील आहेच.
तसाही तो जर विरोधी पक्षनेता झाला तरी विरोधकांचा मूळ हेतू पुन्हा सत्तेत येणे हाच असतो त्यामुळे जनमत दुखवून त्यांनाही चालत नाही. जेव्हा तो कुठल्या पक्षाशी अधिकृतपणे जोडला जाईल तेव्हा त्या पक्षाची जी बंधने असतील ती हि पाळावी लागतील, त्यामुळे तुमचे हे गृहीतक फारसे चालणारे नाही.

४. आपण म्हणतातसे कायदा आणि न्यायालये निवाडा करण्यास समर्थ असताना सरकारने जर अटक केली केस लावली तरी त्यावरुन मोदीसरकार विरुद्ध बागुलबुवा उभा करण्याचे वस्तुतः काही कारण शिल्लक राहते का ?

"अटक करणे" ही तुमच्यासाठी इतकी साधीसोप्पी गोष्ट आहे का हो? बर अटक करून "देशद्रोहाचे" कलम लावणे ही त्याहूनही साधी गोष्ट आहे का?
अटक करण्यासाठी सबळ पुरावे असणे आवश्यक असते. "देशद्रोहाचा" कायदा काय आहे आणि कसा आहे हे आपणास माहित असेलच! वेगवेगळ्या सरकारांनी आपल्या सोयीने या "ब्रिटिशांच्या" कायद्याचा वापर केला आहे. खुद्द न्यायालयाने याचा वापर अत्यंत गरजेच्या वेळी करण्याच्या सूचना दिलेल्या असूनही या कायद्याचा वापर सोयीने होत आला आहे. त्याबद्दल खाली सविस्तर लिहितो.
तसेच या कायद्या अंतर्गत अटक झालेल्या किती लोकांवर तो आरोप सिद्ध झाला आहे हे एकदा तपासून घ्या, मग अंदाज येईल.
गरजेच्या वेळी भीतीचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी काँग्रेस असो व भाजप यांनी या कायद्याचा वापर केलेला आहे.

५. तुम्ही स्वतः देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत हे मान्य.

अरेच्चा! मग ती अटक, देशद्रोह वगैरे का बरे? केवळ तुमच्या कॉलेजमधल्या गुन्हेगारांना पकडण्यास सुस्पष्ट मदत केली नाही म्हणून? आणि निषेध केला नाही म्हणून?(बादवे, त्याने अनेक व्यासपीठांवर "सुस्पष्ट" निषेध नोंदवला आहे. नक्सालवाद्यांविरुद्ध पण.. जरा शोधा इकडे तिकडे)

आणि जर मदत केली नाही म्हणून अटक केली असेल असे म्हणत असाल... तर हे असे झाले कि सोसायटी मध्ये चोरी झाली पण चेअरमन चोर शोधायला येत नाही म्हणून त्यालाच अटक करून घेऊन गेले!!

याशिवाय इतकाच निषेध म्हणत असाल तर हातात झेंडा घेतलेल्या वकिलांनी आणि जमावाने "न्यायालयाबाहेर" निवाडा होण्याआधीच त्याला बदडले त्याच काय?
न्यायालयाने असे प्रकार रोखायला हवेत असे सांगून पण पुन्हा मारहाण झाली त्याच काय?
जेन्यू च्या विद्यार्थ्याला भाजपच्या विधायकाने भर रस्त्यात लाथा घातल्या होत्या, बंदूक असती तर गोळ्या घातल्या असत्या असेही म्हणाला होता त्याच काय? हे सगळे संविधानाला अनुसरून वाटते का? हे समाजात भीती पसरवणारे वाटत नाही?

अजून अनेक मुद्दे आठवत आहेत पण नंतर लिहीन... कोणीही कोणत्याही पक्षाचा असो त्याने स्वतःला देशाचा "एकमेव" कैवारी समजू नये आणि दुसर्यांना देशप्रेमाची सर्टिफिकेट वाटू नयेत इतकं मला वाटत.

माहितगार's picture

12 Sep 2017 - 11:00 pm | माहितगार

आठवलेंनी वापरलेल्या असभ्य शब्दांवर आपल्याला "आक्षेप" घ्यावा वाटलं नाही याच आश्चर्य वाटलं ...

या आक्षेपात त्यांनी योग्य मुद्द्याकडे दिशा निर्देश केला तिथून पळून जाण्याचा प्रयत्न आहे. "हागल्या पादल्याला" ही शब्द योजना मी स्वतः करणार नाही उठता बसता म्हणेन पण उठता बसता मध्ये अपेक्षीत कठोरता येणार नाही, पण कठोर टिकेसाठी वापरलेली आणि माझ्यादृष्टीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत बसू शकणारी आहे. आणि त्यांच्या दृष्टीने वास्तव चपखलपणे व्यक्त करणारी, मराठी भाषेच्या म्हणीं वाक्प्रचारांच्या सांस्कृतीक चौकटीत बसणारी आणि म्हणून माझ्या दृष्टीने गंभीर आक्षेपाची गरज नसलेली आहे.

पण तो बागुलबुवा उभा करण्यासाठी व्यक्तींना "देशद्रोही" "देशविरोधी" ठरवण्याचा प्रयत्न करणे हे आक्षेप घेण्यासारखे आहे.

वस्तुतः हि न्यायालयांनी ठरवण्याची गोष्ट आहे. कदाचित मी एवढ्या वेगाने वापरणार नाही पण खाली गापै त्यांच्या प्रतिसादात "ताडाच्या झाडाखाली बसून कोणी दूध पितात का?" या शंकेला तुमच्या कडे उत्तर नसते. डोंगराच्या मागून धूर येतो तेव्हा कुठेतरी काही तरी जळते आहे हि शंका घेण्यास जागा राहाते. जे एन यू, डि यू, आणि जादवपूर मधील काही शक्तींच्या स्वच्छतेबद्दल शंका घेण्यास जागा आहे याबद्द्ल पुर्वीच्या धाग्यातून मी बर्‍याच निसटत्या बाजू दाखवल्या आहेत. तुम्हाला हव्या असतील तर जुना दुवा पुन्हा शोधून देतो.

बर मग? राजकीय/अराजकीय असोत नसोत काय फरक पडतो? विद्यापीठांमध्ये राजकारणाला बंदी तर नाही ना?

राजकीय पलटवार झाले तर तक्रार करण्याचेही वस्तुतः कारण नसावे. असंख्य राजकीय आंदोलनात असंख्य कार्यकर्ते कुठलेतरी नियम मोडतात त्याच्या आधारे आत बाहेर येत जात असतात. स्वातंत्र्य हे संस्कृती सिद्ध असते तुम्हाला स्वातंत्र्य हवे असेल तर त्यासाठीची किमंत चुकवावी उगाच रडपड काय कामाची ?

तसाही तो जर विरोधी पक्षनेता झाला तरी विरोधकांचा मूळ हेतू पुन्हा सत्तेत येणे हाच असतो त्यामुळे जनमत दुखवून त्यांनाही चालत नाही. जेव्हा तो कुठल्या पक्षाशी अधिकृतपणे जोडला जाईल तेव्हा त्या पक्षाची जी बंधने असतील ती हि पाळावी लागतील, त्यामुळे तुमचे हे गृहीतक फारसे चालणारे नाही.

जनमत दुखावल्याची चव घेताहेत तर जरा घेऊ द्या की ! देशाच्या ऐक्याची बंधनांच्या म्हणून काही अपेक्षा असतात, राजकारणात पडले आहेत तर जरा त्यांना दबाव समजू द्या की !

"अटक करणे" ही तुमच्यासाठी इतकी साधीसोप्पी गोष्ट आहे का हो?

"ताडाच्या झाडाखाली बसून कोणी दूध पितात का?" या शंकेला असे सुद्धा होऊ शकते त्यात बाऊ करण्यासारखे काही नाही. भारतीय न्याय व्यवस्था पुरेशी सक्षम आहे. पुरावे आहेत की नाही आणि असले तर पुरेसे आहेत जी नाही हे न्यायालय तपासेल. मिडीयाचा आणि विद्यार्थ्यांचा वापर झुंडशाहीने सरकारला वाकवण्यासाठी करणे हे ही तेवढेच वावगे आहे.

देशद्रोहाचा" कायदा काय आहे आणि कसा आहे हे आपणास माहित असेलच! वेगवेगळ्या सरकारांनी आपल्या सोयीने या "ब्रिटिशांच्या" कायद्याचा वापर केला आहे. खुद्द न्यायालयाने याचा वापर अत्यंत गरजेच्या वेळी करण्याच्या सूचना दिलेल्या असूनही या कायद्याचा वापर सोयीने होत आला आहे.

म्हणजे गरजेचा आहे की नाही हे न्यायालय बघते आहे यावर सहमती आहे ना ! मग तक्रार कशाची आहे ? फक्त अटकेचे भांडवल करून राजकारणाची एक खेळी साधायची असेल तर तसे करा पण राजकीय खेळीला राजकीय प्रत्युत्तर आले तर रडक्या डावांचे समर्थन प्रत्येक विश्लेषकाने करावे हि अपेक्षा अनाठायी नाही का ?

तसेच या कायद्या अंतर्गत अटक झालेल्या किती लोकांवर तो आरोप सिद्ध झाला आहे हे एकदा तपासून घ्या, मग अंदाज येईल.

भारतीय न्याय यंत्रणा सह्सा ९९ गुन्हेगार सुटले तरी एका निरपराध्याला शिक्षा होऊ नये या तत्वावरच काम करते. आणि म्हणूनच आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण कमी असेल. आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण कमी आहे कारण न्यायप्रणाली यथोचीत काम करत असावी.

पोलीस यंत्रणेलाही त्यांचे त्यांचे काम करावे लागते ते करतात. राजकीय दबाब असतील तर झेलत मागे पुढे करत मार्गक्रमण करतात. पोलीस यंत्रणा चुकली तरी न्यायालये यथोचीत काळजी घेत असतात. केवळ राजकीय भांडवल बनवण्या पलिकडे मला तरी या विषयात काही दिसत नाही.

गरजेच्या वेळी भीतीचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी काँग्रेस असो व भाजप यांनी या कायद्याचा वापर केलेला आहे.

देश विरोधी कारवायांची शंका आल्यास जरब बसवणारा कायदा देखील लागतोच. जे एन यू बद्दल मी आधीच्या धाग्यातून निसटत्या बाजू स्पष्ट केल्या आहेत त्यांचे इथे पुर्नावृत्ती करत नाही.

मग ती अटक, देशद्रोह वगैरे का बरे? केवळ तुमच्या कॉलेजमधल्या गुन्हेगारांना पकडण्यास सुस्पष्ट मदत केली नाही म्हणून?

ताडाच्या झाडाखाली उभे असल्याची शंका आल्यास तसे होऊ शकते. आत ठेवण्याची गरज वाटली नाही तर न्यायालये जामिन देतात.

आणि निषेध केला नाही म्हणून?

हि नैतिक जबाब्ददारी आहे, संशयाची सुई आल्यास कायदा सुव्यवस्था यंत्रनांनाही बाबी तपासून पहाव्या लागू शकतात, ऑडीटर असो वा पोलीस इन्स्पेक्टर खात्री होई पर्यंत संशय घेणे त्याच्यां कर्तव्याचा भाग असू शकते, तसही आयुष्य राजकारणात वाया घालवताहेत त्यातले चार दिवस असे खर्चले तर हरकत नाही. अभ्यास काय आत बसूनही करता येतो. खूप सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आणि कैद्यांनी चांगल्या साहित्याची निर्मिती त्यांच्या अटके दरम्यान केली आहे,

बादवे, त्याने अनेक व्यासपीठांवर "सुस्पष्ट" निषेध नोंदवला आहे. नक्सालवाद्यांविरुद्ध पण.. जरा शोधा इकडे तिकडे)

न केलेल्या गोष्टींचीपण यादी आहे आणि आपण वर चर्चा केल्या प्रमाणे ह्या प्रेशर मधून जाणे त्यांच्या राजकीय भबितव्याच्या दृष्टीने हिताचेच आहे

आणि जर मदत केली नाही म्हणून अटक केली असेल असे म्हणत असाल... तर हे असे झाले कि सोसायटी मध्ये चोरी झाली पण चेअरमन चोर शोधायला येत नाही म्हणून त्यालाच अटक करून घेऊन गेले!!

हो इन्स्पेक्टरला संषय आला तर तसे होऊ शकते. संशय हा त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे, आणि निरपराध्याला शिक्षा न होऊ देणे न्याय व्यवस्थेचे काम

याशिवाय इतकाच निषेध म्हणत असाल तर हातात झेंडा घेतलेल्या वकिलांनी आणि जमावाने "न्यायालयाबाहेर" निवाडा होण्याआधीच त्याला बदडले त्याच काय?
न्यायालयाने असे प्रकार रोखायला हवेत असे सांगून पण पुन्हा मारहाण झाली त्याच काय?
जेन्यू च्या विद्यार्थ्याला भाजपच्या विधायकाने भर रस्त्यात लाथा घातल्या होत्या, बंदूक असती तर गोळ्या घातल्या असत्या असेही म्हणाला होता त्याच काय? हे सगळे संविधानाला अनुसरून वाटते का? हे समाजात भीती पसरवणारे वाटत नाही?

कायदा त्याची वळणे घेतो. समाजाला एखादी गोष्ट रुचली नाही तर दबाव पडणे सहाजिक आहे. खासकरून देशप्रेमासारख्या गोष्टींबाबत खेळ होतो तेव्हा समाज हातावर हात ठेवून बसेल असे कसे समजावे. जे एन यू डियू आणि जादवपूर मधली बरीच प्राध्यापक मंडळी धुतल्या तांदळाची नसावित आणि ते विद्यार्थ्यांना प्यादी बनवून वापरताहेत हे स्पष्ट दिसते आहे, या बाबत मागच्या धाग्यांमध्ये लेखन केले आहे त्याची पुर्नावृत्ती करत नाही,

कोणीही कोणत्याही पक्षाचा असो त्याने स्वतःला देशाचा "एकमेव" कैवारी समजू नये आणि दुसर्यांना देशप्रेमाची सर्टिफिकेट वाटू नयेत

देशप्रेमा बद्दल ज्यांच्या प्रिऑरिटी सुस्पष्ट आहेत त्यांना प्रश्नांचा बाऊ करण्याचे कारण काय असावे ? मला कूणी एक लाख वेळा देश प्रेमाची शपठ घे म्हटले तर मी अब्जावधी वेळा घेईन, कुणी शंका घेतली तर आधी त्याच्या देशप्रेमाचा आदर व्यक्त करेन आणि मग मी सुद्धा तुझ्या एवढाच देशप्रेमी आहे चल दोघे मिळून देशासाठी कुर्बानी देऊ म्हणेन. ज्यांची हि तयारी नसते त्यांचे देशप्रेम पातळ असू शकते आणि अशा पातळ फाटण्याची शक्यता असलेल्या पोतेर्र्यांकडे समाज बोट दाखवेल याला ते स्वतःच जबाबदार असतात,

शब्दबम्बाळ's picture

13 Sep 2017 - 11:19 pm | शब्दबम्बाळ

आधीच प्रतिसाद बरा होता असे म्हणायला लागेल हा प्रतिसाद वाचून!
हास्यास्पद विधाने आहेत अगदी काहींच्या काही!

१. त्यांच्या दृष्टीने वास्तव चपखलपणे व्यक्त करणारी, मराठी भाषेच्या म्हणीं वाक्प्रचारांच्या सांस्कृतीक चौकटीत बसणारी आणि म्हणून माझ्या दृष्टीने गंभीर आक्षेपाची गरज नसलेली आहे.

मराठीत वाक्प्रचार म्हणून वापरली जाणारी आणि वास्तव चपखल मांडणारी पण सभ्यतेचे निकष न पाळणारी ढीग शब्दसंपदा आहे ती मिपावर यायला लागली तर संपादकांना चालेल का हे ऐकायला आवडेल! मग ती मोदींना वापरायची कि राहुल का आणि कोणी हे पाहता येईल!

२. पण खाली गापै त्यांच्या प्रतिसादात "ताडाच्या झाडाखाली बसून कोणी दूध पितात का?" या शंकेला तुमच्या कडे उत्तर नसते.

कुठलं झाड, दूध करताय? हाच न्याय लावायचा का २००२ जे झालं त्याला? आरोप झाले म्हणजे तथ्य असलंच पाहिजे असे आहे का?
न्यायालय निवाडा करेल.

३. मिडीयाचा आणि विद्यार्थ्यांचा वापर झुंडशाहीने सरकारला वाकवण्यासाठी करणे हे ही तेवढेच वावगे आहे.

कमाल करते हो पांडे जी! वरती आपलेच एक वाक्य आहे. आपण मान्य करता कि "जो पर्यंत ते बदनामी विषयक कायद्यांचे उल्लंघन करत नाहीत मिडीया आणि विरोधी पक्ष त्यांच्या पद्धतीने त्यांना पटणारा मुद्दा पुढे करण्यास स्वतंत्र आहेत. आणि समजा बदनामी कायद्याचे उल्लंघन होत असेल तर निवाडा करण्यास न्यायालये समर्थ आहेत."
आणि आता वावगं वाटतंय? चालायचं...

४. म्हणजे गरजेचा आहे की नाही हे न्यायालय बघते आहे यावर सहमती आहे ना !

न्यायालय असलेला कायदा वापरते. कायदेमंडळाच्या अखत्यारीत कायदा बदलण्याचे/सुधारण्याचे काम येते. ते कुठलेच सरकार करत नाही कारण त्यांना अनिर्बंध सत्ता आवडते. आणि असे कायदे त्याला मदत करतात.

५. म्हणूनच आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण कमी असेल. आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण कमी आहे कारण न्यायप्रणाली यथोचीत काम करत असावी.

आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण कमी असण्याचे कारण "ती व्यक्ती निर्दोष आहे" असेही असू शकते हे आपल्या ध्यानात येत नाही का बरे?
३ वर्षात ६०+ देशद्रोहाचे खटले दाखल झाले आणि एक दोषी सिद्ध झाला आहे. (याचा स्रोत मी शोधून इथे देतो)
कायद्याच्या संदिग्ध भाषेचा गैरवापर भारतात नवीन नाही.

६. देश विरोधी कारवायांची शंका आल्यास जरब बसवणारा कायदा देखील लागतोच.

कायदा असावा पण तो स्पष्ट असावा. सध्याच्या देशद्रोहाच्या कायद्यात "देशाचा" कुठे उल्लेखच नाही! सरकारचा आहे.
कारण तो ब्रिटिशांनी भारतीयांच्या विरोधात वापरायला बनवलेला होता.
भगतसिंग यांच्यावर सुद्धा हाच कायदा (IPC १२४ A )वापरण्यात आला होता.

७. मी दिलेल्या उदाहरणात इन्स्पेक्टर ला संशय आला तर तो चेअरमनला देखील अटक करू शकतो असे आपण म्हणता. अटक वॉरंट वगैरे आपल्या लक्षात आहे का? त्यासाठी पुरावे लागतात हे देखील आपणास माहित असेलच.
"आला संशय कि कर अटक" असला काही अधिकार दिला पोलिसांना तर काय हाहाकार माजेल याची कल्पना करून बघा मग कळेल.

८. समाजाला एखादी गोष्ट रुचली नाही तर दबाव पडणे सहाजिक आहे. खासकरून देशप्रेमासारख्या गोष्टींबाबत खेळ होतो तेव्हा समाज हातावर हात ठेवून बसेल असे कसे समजावे.

एखादी गोष्ट "समाजाला"(म्हणजे नक्की कोण-कोणाला तुम्हालाच माहित) पटली नाही तर त्यांनी कायदा हातात घेऊन केलेल्या कृत्यांना तुमचे एका अर्थी समर्थनच दिसतंय.
असे विचार असतील तर अधिक बोलत नाही यावर. हि रानटी समाजाची लक्षणे आहेत (किंवा हिंसक लोकांच्या जमावाला "समाज" या नावाखाली झाकण्याचा प्रयत्न) बाकी काही नाही.

९. मला कूणी एक लाख वेळा देश प्रेमाची शपठ घे म्हटले तर मी अब्जावधी वेळा घेईन, कुणी शंका घेतली तर आधी त्याच्या देशप्रेमाचा आदर व्यक्त करेन आणि मग मी सुद्धा तुझ्या एवढाच देशप्रेमी आहे

ज्यांना काही कामधंदा नसतो तेच लोक इतरांना देशप्रेमाची शपथ आणि आणखीन काही घे म्हणत फिरतील. आणि ज्यांच्याकडे फुकटचा वेळ भरपूर आहे असेच लोक यांच्यासोबत टाईमपास करतील!

चल दोघे मिळून देशासाठी कुर्बानी देऊ म्हणेन.

अहो! काय वर्गणी द्यायला चालल्या सारखे कुर्बानी द्यायला चाललाय. काय म्हणावं या वाक्याला!(कपाळावर हात मारून घेतल्याचा स्माईली समजा)
बिनडोक लोकच असे उगा काम धंदा नसताना कोणी देशप्रेम विचारताय म्हणून कुर्बानी द्यायला जाऊ म्हणतील!

ज्यांची हि तयारी नसते त्यांचे देशप्रेम पातळ असू शकते आणि अशा पातळ फाटण्याची शक्यता असलेल्या पोतेर्र्यांकडे समाज बोट दाखवेल याला ते स्वतःच जबाबदार असतात,

काय लावलाय हे पातळ, घट्ट! काय मशीन घेऊन फॅट वगैरेपण मोजाल देशभक्तीचे! काहींच्या काही!

समजा एक माणूस पूर्ण टॅक्स भरतो, सगळे नियम पाळतो कुठेही कचरा करत नाही. गरिबांना जेवण देखील देतो. स्वतःच्या कुटुंबासोबत एका गरीबाच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च देखील देतो. "पण तो देशासाठी कुर्बान व्हायला तयार नाही". कारण त्याला या गोष्टी आयुष्यभर करत राहायचं आणि हे सगळे लोक त्याच्यावर अवलंबून आहेत.
मग त्याच देशप्रेम घट्ट, पात्तळ, उतू गेलेलं कि नासलेले? घ्या ठरवून तुम्हीच.

विशुमित's picture

14 Sep 2017 - 12:28 pm | विशुमित

काय लावलाय हे पातळ, घट्ट! काय मशीन घेऊन फॅट वगैरेपण मोजाल देशभक्तीचे! काहींच्या काही!>>

=>> जबरा..

कुर्बानीच म्हणाल तर...
मागच्या महिन्यामध्ये एका सैनिक मित्राबरोबर सैनिक कल्याण बोर्ड ला गेलो होतो. तिथे भरपूर गर्दी होती. कार्यरत फौजी, रिटायर फौजी तर होतेच पण त्याच बरोबर देशासाठी कुर्बानी दिलेल्या शाहिद जवानांच्या पत्नी आणि मुले ही होती. पण त्यांना तेथील सरकारी कर्मचाऱ्यांची मिळणारी वागणूक पाहून वाटले असल्या भाडखाउंसाठीसाठी यांनी कुर्बानी दिली का ? (अधिकाऱ्याच्या कुटुंबियांना विशेष वागणूक होती)

शपथीची घोकंपट्टी करून जर देशप्रेमाची सिद्ध होत असते तर अखिल भारतीय देशप्रेम यज्ञ केला तरी चालू शकेल नाही?

बाकी कन्हय्या वगैरे लोकांच्या विचारांबद्दल अजून मत पक्के झाले नाही.

माहितगार's picture

16 Sep 2017 - 8:25 pm | माहितगार

आपण एखादी गोष्ट देशासाठी करतो तेव्हा इफेक्टीव्हली स्वतःसाठीच करत असतो. मी माझे देशप्रेमाचे विचार मांडताना मी माझी उरफोड असल्या लोकांसाठी करतो का असे कधीही म्हणत नाही. मी जी उरफोड करतो स्वतःच्या देशावरच्या प्रमासाठी जे प्रेम माझ आहे आणि म्हणून माझ्यासाठी करतो. तिथे देशप्रेम टाळण्याचे अप्रत्यक्ष समर्थन करणारी दुसरी मोज माप मुळीच लावत नाही.

माहितगार's picture

16 Sep 2017 - 8:38 pm | माहितगार

समजा एक माणूस पूर्ण टॅक्स भरतो, सगळे नियम पाळतो कुठेही कचरा करत नाही. गरिबांना जेवण देखील देतो. स्वतःच्या कुटुंबासोबत एका गरीबाच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च देखील देतो. "पण तो देशासाठी कुर्बान व्हायला तयार नाही". कारण त्याला या गोष्टी आयुष्यभर करत राहायचं आणि हे सगळे लोक त्याच्यावर अवलंबून आहेत

इंग्रजांच आणि इतर वसाहत वाद्याम्ची राज्ये जगात भारतात आणि इअतरत्र असताना तुमच्या वरच्या क्लासिफीकेशन मध्ये बरीच माणसे बसत पण त्यांना देशप्रेमी म्हणता येत नाही. देशप्रेमासाठी रक्त सांडल नाही तरी रक्त सांडण्याची मानसीक इच्छाशक्ती तयारी महत्वाची असते.

काय लावलाय हे पातळ, घट्ट! काय मशीन घेऊन फॅट वगैरेपण मोजाल देशभक्तीचे! काहींच्या काही!

देशाचे राजकीय स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या इच्छाशक्तीचे मोजमाप असतेच अहो देशप्रेम व्हिएतनामी किंवा अफगाणी सारखे घट्ट असेल तर महासत्तांना पछाड मिळते. जे हे लक्षात घेऊन वेळप्रसंगी देशाच्या सार्वभौमत्वासाठी रक्त देण्याची तयारी ठेवतात त्यांचे प्रेम घट्ट असते आणि ज्या देशात असे प्रश्न पडणारे लोक असतात त यांचे देशप्रेम पातळच असते. जो सर्वत्याग करुन प्रेम करतो सर्वस्वाचा त्यग करण्याची तयारी ठेवतो / ठेवतात देश ही संज्ञा त्यांच्यासाठीच असते.

माहितगार's picture

16 Sep 2017 - 9:05 pm | माहितगार

बिनडोक लोकच असे उगा काम धंदा नसताना कोणी देशप्रेम विचारताय म्हणून कुर्बानी द्यायला जाऊ म्हणतील!

वेडात दौडले वीर हेच देशप्रेमी संज्ञेस पात्र ठरतात आणि त्यांचाच आपल्या देशावर पहिला हक्क असतो आणि दुसर्‍या तथाकथीत शहाण्या पण देशप्रेमात पातळ असलेल्यांना साम दाम दंड भेद वापरून सरळ करण्याचा नैतीक अधिकार देखिल.

एखादी गोष्ट "समाजाला"(म्हणजे नक्की कोण-कोणाला तुम्हालाच माहित) पटली नाही तर त्यांनी कायदा हातात घेऊन केलेल्या कृत्यांना तुमचे एका अर्थी समर्थनच दिसतंय.
असे विचार असतील तर अधिक बोलत नाही यावर. हि रानटी समाजाची लक्षणे आहेत (किंवा हिंसक लोकांच्या जमावाला "समाज" या नावाखाली झाकण्याचा प्रयत्न) बाकी काही नाही.

राज्यशास्त्रातल एक वास्तव व्यवस्थीत अभ्यासा, कोणतही राज्य (बहुजनांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्विकारलेल्या/देऊ केलेल्या) राज्य चालवणार्‍यांच्या वर्चस्वावर अवलंबून असले, देशप्रेमाबाबत कुणी खेळत असेल तर त्यांना होताहोईतो कायद्यानेच वटणीवर आणावयास हवे. पण सत्ता ते करण्यास अशक्त पडत असेल तर देशप्रेम हे सत्तेपेक्षा श्रेष्ठ असते. देशप्रेम पातळ असलेली मंडळी मुजोर होत असतील सत्ता अशक्त असेल तर त्यांची देशप्रेम पातळ असलेल्यांची मुजोरी वेळप्रसंगी गरजपडल्यास अगदी सर्व पद्धतीने मोड्ली जाईल (विशेषणे काय दिले याने फरक पडत नाही हरणारा तोंडातून रानटी वगैरे म्हणणारी बरी वाफ खर्च करेल त्या वाफ खर्च करण्याचा हिशेब उलटे टांगून मिरच्यांचा धूर देऊन घेतला जाईल) हे स्पष्ट केल्याशिवाय अशा मुजोर्‍या मोडता येत नसतात आणि देशप्रेमाचे समर्थन करताना त्यात किंतु परंतु नसतात हे जेव्हा कळते तेव्हा सर्व मुजोर पातळ तोंडवाफे शिस्तीत सरळ येतात किंबहूना तसेच शिस्तीत आणावयाचे असतात.

अर्थात होता होईतो कायदा आणि न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून सरळ आणणे चांगले, पण कायदा पातळ म्हणून देशप्रेम पातळ असणार्‍यांचे चालत असेल तर देशप्रेमीं दबाव टाकणार म्हटल्यावर कायदे सक्त होतील आणि देशप्रेम पातळ असलेले सरळ येऊ लागतील.
अधिकतम अभिव्यक्ती स्वातंत्र्य हि चांगली गोष्ट असते पण स्वातंत्र्य त्यांच्या साठी असते ज्यांना आपल्या देशाची कदर असते. आणि हि कदर तपासण्याचा आणि वेळ प्रसंगी कडक अवतार दाखवण्याचा नैतिक अधिकार देशप्रेमींनी वापरणे हि त्यांची नैतीक जबाबदारी असते. आणि अशा जबाबदारीचे वहन करणार्‍यांसाठीच देश स्वातंत्र्ये असतात.

तेजस आठवले's picture

16 Sep 2017 - 5:37 pm | तेजस आठवले

माझ्या मते माझे वाक्य पातळी सोडून नाही. बाकी चालुद्या.

भंकस बाबा's picture

11 Sep 2017 - 6:39 pm | भंकस बाबा

मुरलेल्या लोणच्यासारखा झाला आहे, कॉलेजपातळी वरून तो आता राजकारणात घुसायला बघत आहे. वरवर निरुपद्रवी दिसणारा हा प्राणी त्याच्या कर्तृत्वावरून अजिबात साधारण वाटत नाही, आता जर त्याने पूर्वीचे कित्ते गिरवले तर नाड्या आवळलेले राजकीय पक्ष त्याची बाजू कदापि घेणार नाही हे तो जाणून आहे. त्यामुळेच तो आता मी किती शांत आहे याचा दिखावा करत असणार!

भंकस बाबा's picture

11 Sep 2017 - 6:39 pm | भंकस बाबा

मुरलेल्या लोणच्यासारखा झाला आहे, कॉलेजपातळी वरून तो आता राजकारणात घुसायला बघत आहे. वरवर निरुपद्रवी दिसणारा हा प्राणी त्याच्या कर्तृत्वावरून अजिबात साधारण वाटत नाही, आता जर त्याने पूर्वीचे कित्ते गिरवले तर नाड्या आवळलेले राजकीय पक्ष त्याची बाजू कदापि घेणार नाही हे तो जाणून आहे. त्यामुळेच तो आता मी किती शांत आहे याचा दिखावा करत असणार!

भंकस बाबा's picture

11 Sep 2017 - 6:40 pm | भंकस बाबा

मुरलेल्या लोणच्यासारखा झाला आहे, कॉलेजपातळी वरून तो आता राजकारणात घुसायला बघत आहे. वरवर निरुपद्रवी दिसणारा हा प्राणी त्याच्या कर्तृत्वावरून अजिबात साधारण वाटत नाही, आता जर त्याने पूर्वीचे कित्ते गिरवले तर नाड्या आवळलेले राजकीय पक्ष त्याची बाजू कदापि घेणार नाही हे तो जाणून आहे. त्यामुळेच तो आता मी किती शांत आहे याचा दिखावा करत असणार!

तुमचा प्रतिसाद चांगलाच मुरलाय :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Sep 2017 - 11:02 am | माईसाहेब कुरसूंदीकर

उत्तम विषय रे शब्दबंबाळा. जगातील सर्वच सत्ताधार्यांना असे 'शत्रू' दाखवून लोकांचे लक्ष विचलीत करण्याची गरज लागत असते.कन्हय्याला समर्थन नाही पण बळेच त्याने पाकिस्तानात जावे म्हणजे जास्त झाले. जिनांचे कौतुक करणारे अडवाणी,लाहोर-दिल्ली बससेवा करणारे वाजपेयी अजूनही येथे निवांत आहेत.

गामा पैलवान's picture

12 Sep 2017 - 11:39 am | गामा पैलवान

अहो माईसाहेब,

जग गेलं गाढवाच्या गाडीतून ! इथं आपण भारत तेरे तुकडे होंगे वर चर्चा करताहोत.

आ.न.,
-गा.पै.

जेम्स वांड's picture

12 Sep 2017 - 7:06 pm | जेम्स वांड

तुम्ही बहुतेक प्रतिसादात, गाढवाच्या 'गा' वर अनुस्वार द्यायला विसरलात बघा, तुमच्याकडून असली चूक म्हणजे एक आश्चर्यकारक बाब आहे. कारण शक्यतो मी अन माझ्यासारखे बरेच लोक तुमच्या विपुल शब्दसंपदेतून सतत काहीतरी शिकत असतो, तुमचे आंग्ल शब्दांचे सुलभ मराठीकरण/संस्कृतीकरण एक गिरवण्यालायक कित्ता असतो. अर्थात अनुस्वाराने ते विविक्षित वाक्य अन एकंदर प्रतिसाद कदाचित सभ्य मर्यादा ओलांडून टाकेलही, पण तुमचे एकंदरीत राष्ट्रप्रेम, धर्महिताची कळकळ अन एकूणच रोखठोक बोलण्याचा स्वभाव पाहता तुम्ही त्या जबाबदारीपासून मागे हटणारे नाही हा आमचा अंदाज अन अपेक्षा तुम्ही चूक ठरवणार नाहीच ही ईश्वरचरणी प्रार्थना.

गामा पैलवान's picture

12 Sep 2017 - 7:23 pm | गामा पैलवान

जेम्स वांड,

अहो गाढवाची गाडी म्हणजे ही बघा :

https://c1.staticflickr.com/9/8329/8087317216_8bd55110b5_b.jpg

देशी व्हर्शन इथे आहे :

http://media.gettyimages.com/photos/an-indian-man-sits-on-his-cart-used-to-transport-oil-as-he-waits-an-picture-id80831286?s=612x612

देशी आवृत्तीत गाढव दिसंत नाहीये, पण मुद्दा स्पष्ट व्हावा. गेलं चुलीत म्हणतात तसं हे गेलं गाढवाच्या गाडीत (=इंडियन ऑईलच्या चुलीत).

आ.न.,
-गा.पै.

जेम्स वांड's picture

12 Sep 2017 - 7:33 pm | जेम्स वांड

आजवर 'गाढवाचे नांगर लावणे' 'गाढवाचा फाळ फिरवणे' अश्या म्हणी ऐकल्या होत्या, 'गेलं गाढवाच्या गाडीत/गाडीतून' हे कधी ऐकलचं नव्हतं, उलट ह्याला समानार्थी अन जवळ जाणारी अनुस्वारसहित शब्दरचना बऱ्यापैकी ऐकली होती. तरीच म्हणलं तुम्ही ताकाला जाऊन भांडी लपवणारे नाहीतच, जे आहे ते रोखठोक, म्हणून म्हणलं अनुस्वार विसरले का काय, स्पष्टीकरणाकरिता आभार, बरंका गापै.

गामा पैलवान's picture

12 Sep 2017 - 1:41 pm | गामा पैलवान

सौरा,

हे कन्हैय्या किंवा उमर यांनी केले?

शितावरून भाताची परीक्षा. ताडाच्या झाडाखाली बसून कोणी दूध पितात का?

आ.न.,
-गा.पै.

ओसामा बिन लादेन च्या मुलाखती अशाच असत. शांत, निर्विकार, निरामय, निराकार, अध्यात्मिक, धार्मिक, इ इ. प्रबुद्ध डोळे जमीनीकडेच रोखून. आणि त्या अशा असत याचा दाखला दिला जाई. त्यांच्या हितचिंतकांकडून.
=============================
असंच पुरोगामी लोक मोहन भागवतांबद्दल समजतात. नुसतं शांतपणे बोलल्यानं कोणाला आजकाल अपिल होत नाही.

शीर्षक वाचून बऱ्याच लोकांच्या मनात लगेच प्रश्न आला असेल "देशविरोधी/देशद्रोही लोकांबरोबर निवांत चर्चा?"

देशप्रेमी असते तर लगेच प्रश्न आला असता.

श्रीगुरुजी's picture

13 Sep 2017 - 3:17 pm | श्रीगुरुजी

कन्हैया कुमार आणि त्याच्या देशद्रोही गँगबद्दल काही जणांना अचानक का कळवळा आला आहे खुदा जाने. हा अत्यंत डांबरट आणि लबाड माणूस आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये जनेविमध्ये देशविरोधी घोषणा देणार्‍यांमध्ये हा आणि याची टोळी होतीच. देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन देशात त्याविरूद्ध संतापाची लाट उसळल्यानंतर त्याच्या समर्थकांनी काही बनावट चित्रफिती तयार करून समाजमाध्यमातून फिरवून खर्‍याखोट्याचा गोंधळ उडवून दिला. या सर्व प्रकाराबद्दल संशय निर्माण होऊन त्याचा फायदा या डांबरटाला मिळावा हाच त्यामागे हेतू होता. जनेविमधील कार्यक्रमाच्या अचानक ६-७ वेगवेगळ्या चित्रफिती फिरायला लागल्या. काही चित्रफितीत हा घोषणा देणार्‍यांमध्ये होता, काहींमध्ये नव्हता. असे करून याला संशयाचा फायदा देऊन वाचविण्याचा हेतू होता. आआपने तर एक बनावट चित्रफीत प्रसिद्ध करून त्यात अभाविपचे कार्यकर्तेच देशविरोधी घोषणा दाखविले होते व त्यामुळे अजून गोंधळ निर्माण झाला होता. कालांतराने फोरेन्सिक प्रयोगशाळेच्या तपासणीनुसार ६ पैकी २ चित्रफिती बनावट असल्याचे सांगितले गेले. परंतु फिरत असलेल्या चित्रफितींपैकी नक्की कोणत्या बनावट व कोणत्या अस्सल याविषयी माहिती दिली गेली नाही.

देशद्रोही व अतिरेकी अफझल गुरूला ९ फेब्रुवारी २०१३ ला फासावर चढविण्यात आले. जनेविमध्ये डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे प्राबल्य आहे. त्यामुळेच काश्मिरी व इस्लामी अतिरेक्यांना स्वातंत्र्य सैनिकांची उपमा देणे, ते मेल्यानंतर त्यांचा उल्लेख हुतात्मा असा करणे, काश्मिरला स्वायत्तता द्या किंवा काश्मिरला वेगळा देश बनवा, काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यांना काश्मिरच्या स्वातंत्र्याचा लढा समजणे, काश्मिरमध्ये सैनिक जनतेवर अत्याचार करीत आहे, गोळ्या घालून मारीत आहे, स्त्रियांवर बलात्कार करीत आहे अशी बोंब ठोकण्याचे देशद्रोही उद्योग तिथे सतत सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून एका टोळक्याने अफझल गुरूची पुण्यतिथी साजरी करण्याचा कार्यक्रम ठरविला. या कार्यक्रमाची माहिती अभाविपच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली. हे विद्यार्थी कुलगुरूंशी बोलत असताना या नालायक कन्हैयाने कुलगुरूंना फोन करून कार्यक्रमावर बंदी घालू नका अशी मागणी केली कारण हा स्वतः देशद्रोही आहे व हा त्यांना सामील होता. त्यादिवशी संध्याकाळी देशद्रोही डावे आणि अभाविपचे विद्यार्थी समोरासमोर येऊन वातावरण तापले. त्यावेळी भारताविरूद्ध घोषणा देण्यात आल्या. 'भारत के तुकडे होंगे', 'हर घरसे अफझल निकलेगा', 'काश्मिर मांगे आजादी', 'मणीपूर मांगे आजादी', नागालँड मांगे आजादी' अशा संतापजनक घोषणा देण्यात आल्या. हा, अर्निबन भट्टाचार्य, उमर खालिद असे अनेकजण घोषणा देणार्‍यांमध्ये होते.

या प्रकाराची चित्रफित प्रसिद्ध झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. आधी कन्हैया व नंतर भट्टाचार्य व नंतर उमर खलिदला देशद्रोहाच्या आरोपावरून अटक झाली. मोदी सरकारने ही कारवाई केल्यानंतर मोदींच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करणार्‍या केजरीवाल व राहुलने अटकेच्या निषेध करून मोदींना शिव्या द्यायला सुरूवात केली. पप्पूने जनेविला भेट देऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला व मोदी निष्पाप विद्यार्थ्यांना अडकवित आहे असे आरोप करायला सुरूवात केली. पप्पू कन्हैयाच्या पाठीशी उभा राहिल्याने त्याला वाचविण्यासाठी त्याचे वकीलपत्र सिब्बलने घेतले. सिब्बल नेहमीच गुन्हेगारांची वकीलपत्रे घेत असतो. कन्हैया प्रमाणे सिब्बलने हार्दिक पटेल, बीसीसीआयचा श्रीनिवासन, तिहेरी तलाक रद्द करण्याला जोरदार विरोध करणारे मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळ, गोव्यातला स्मगलर चर्चिल आलेमाव इ. चे वकीलपत्र घेतले आहे. प्रकरण देशभर पेटले आहे हे पाहून आआप व काही वाहिन्यांनी बनावट चित्रफिती तयार करून घोषणा देणार्‍यांमध्ये कन्हैया नव्हता असा दावा करण्यास सुरूवात केली.

२० दिवसानंतर कन्हैयाला जामीन मिळाला. तुरूंगवासात त्याला सिब्बलने कानमंत्र दिला होता. त्यानुसार त्याने बाहेर आल्यानंतर काश्मिरची आजादी, मणीपूरची आजादी, अफजल गुरू इ. विषयावर बोलण्याचे सोडून धूर्तपणे हमे चाहिए आजादी, गरीबीसे आजादी, भूकसे आजादी, बेरोजगारीसे आजादी, मनुवादसे आजादी इ. घोषणा देण्यास सुरूवात केली व त्याचबरोबर मोदींना शिव्या देण्यास सुरूवात केली. आपला मूळचा देशद्रोही, अतिरेकी समर्थक, पाकिस्तानवादी असा चेहरा झाकण्यासाठी त्याने आपण दलित, गरीब, बेरोजगार इ. च्या बाजूने बोलत आहोत असा बुरखा चढवून मूळ चेहरा झाकून टाकला.

पूर्णपणे विश्वासार्हता हरविलेल्या विरोधी पक्षांना आता त्याच्या स्वरूपात एक आयकॉन मिळाला होता. त्यांनी त्याचे दौरे स्पॉन्सर करायला सुरूवात केली. त्याची सभा पुण्यात निधर्मांध कुमार सप्तर्षींनी आयोजित केली (आयुष्यबर शिवसेनेला विरोध करूनसुद्धा यांनी पंचाहत्तरीला शिवसेनेकडूनच आपला सत्कार करून घेतला होता). त्याच्या दिल्ली ते मुंबई व मुंबई ते पुणे विमान तिकिटाची व्यवस्था यांनीच केली. दिल्लीहून मुंबईला विमानाने आल्यानंतर पुण्याला येण्यासाठी हा जेटच्या विमानात बसलेला असताना शेजारच्या आसनावर बसलेल्या एका प्रवाशाशी बोलाचाली झाल्यानंतर जेटने दोघांनाही बाहेर काढले. बाहेर आल्यानंतर याने कांगावा केला की तो डेका नावाचा सहप्रवासी भाजपचा असून त्याने विमानात माझा गळा दाबायचा प्रयत्न केला. थोड्या वेळातच सत्य उघडकीला आले. त्या प्रवाशाचा व भाजपचा काहीही संबंध नव्हता व गळा दाबला वगैरे शुद्ध थाप होती. या नालायकाला कांगावा करण्याची आणि खोटारडेपणाची सवयच आहे. विमानातून जाता न आल्याने राष्ट्रवादीचा आव्हाड मदतीला आला. आव्हाडने त्याला स्वतःच्या गाडीत घालून स्वतः गाडी चालवत तो त्याला पुण्यात सभेसाठी घेऊन आला. सभेला बाबा आढाव, अमोल पालेकर वगैरे नेहमीचेच यशस्वी कलाकार उपस्थित होते. या नालायकामागे कोणकोण आहे हे अगदी स्पष्ट आहे.

नंतर हा विमानाने नागपूरला चैत्यभूमीवर गेला व तिथेही त्याने मोदींना शिव्या घातल्या. नंतर तो हैद्राबादला गेला व तिथेही मोदींना शिव्या दिल्या. हा एका गरीब घरातून पुढे आलेला आहे. याचे वडील आजारीपणामुळे अंथरूणाला खिळलेले असून आई शिवणकाम करून महिन्याला जेमतेम ३००० रूपये मिळविते. हा पीएचडी करतोय म्हणे. त्यासाठी त्याला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून छात्रवृत्ती मिळते. म्हणजेच याला करदात्यांनी भरलेल्या करातून पैसे मिळतात. परंतु हा देशाशी गद्दारी करतोय. २ वर्षांपूर्वी हा भरदिवसा चारचौघात विद्यापीठातील एका रस्त्यावर विजारीची चेन उघडून लघवी करण्याचे किळसवाणे कृत्य करीत होता. तिथून जाणार्‍या एका वरीष्ठ विद्यार्थिनीने त्याला हटकल्यानंतर याने तिलाच शिवीगाळ केली व तिला धमकीही दिली. तिने विद्यापीठाकडे तक्रार केल्यानंतर याला ३००० रूपये दंड झाला होता.

जनेविमध्ये मकरंद परांजपे या नावाचे अत्यंत शांत व कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलेले एक वरिष्ठ प्राध्यापक आहेत. जनेवितील एका खुल्या चर्चेत बोलताना याने काही चुकीचे संदर्भ दिल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात त्याने दिलेले चुकीचे संदर्भ (हेडगेवार हे फॅसिस्ट आहेत कारण ते मुसोलिनीला भेटले होते असे याने सांगितले होते. परंतु मुसोलिनीला हेडगेवार कधीही भेटले नसून डॉ. मुंजे त्याला भेटले होते असे प्रा. परांजप्यांनी स्पष्ट केले होते.) खोडून काढले. ते बोलत असताना याने व याच्या गँगने त्यांच्या बोलण्यात वारंवार अडथळे आणून त्यांची हुर्यो करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनी अतिशय शांतपणे आपले मुद्दे समोर ठेवल्याने याचे काही चालले नाही. शेवटी त्यांना खिजविण्यासाठी याने कुत्सित हसत त्यांना विचारले की "मैने मेरी पार्टी बता दी है. (आपण उजव्या कम्युनिस्ट पक्षाचा असल्याचे त्याने सांगितले होते). अब आप आपकी पार्टी बताओ.". प्रा. परांजपे भाजपचे नाव घेतील व ते ऐकल्यावर आपण सर्वजण त्यांच्यावर तुटुन पडू अशी त्याची योजना होती. परंतु प्रा. परांजप्यांनी अत्यंत शांतपणे सांगितले की माझा कोणताही पक्ष नाही. मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. हे ऐकल्यानंतर या टोळक्याला गप्प बसावे लागले होते.

मागील वर्षी जनेवितून नजीब नावाचा एक विद्यार्थी गायब झाला आहे. तो अजून सापडलेला नाही. अभाविपनेच त्याला गायब केले असा या टोळक्याचा आरोप आहे. काही महिन्यांपूर्वी प्रा. परांजपे आपल्या कार्यालयात जात असताना त्यांना २५-३० विद्यार्थ्यांनी घेराव घातला व त्यांना जाऊन देण्यास प्रतिबंध केला. "माझ्या कार्यालयात जाऊन काम करणे हा माझा हक्क आहे. त्यामुळे मला अडवून नका. असे सांगूनसुद्धा त्या टोळक्याने त्यांची वाट सोडली नाही. प्रा. परांजप्यांनी विद्यार्थ्यांची नावे विचारल्यानंतर सर्वांनी 'माझे नाव नजीब' असे उत्तर देऊन त्यांची वाट सोडण्यास नकार दिला. वास्तविक प्रा. परांजप्यांच्या आणि नजीब नाहीसा होण्याचा कणभरही संबंध नाही. त्यांचा कोणत्या विद्यार्थी संघटनेशी किंवा पक्षाशीही संबंध नाही. असे असताना नजीब संबंधात त्यांची वाट अडविण्याचे कारणच काय? विद्यार्थी वाट सोडत नाहीत हे पाहून प्रा. परांजप्यांनी सांगितले की मी गांधीवादी पद्धतीने तुम्हाला वाट सोडण्याची विनंती करीत आहे. असे सांगून ते सर्व विद्यार्थ्यांच्या पाया पडले व आपली वाट सोडण्याची विनंती केली. परांजप्यांच्या जोड्याशी बसण्याची सुद्धा ज्यांची लायकी नाही अशांनी त्यांना विनाकारण त्रास दिला.

कन्हैयाचा बागुलबुवा वगैरे निर्माण केलेला नसून तो अत्यंत माजलेला व अत्यंत धूर्त आहे. तो व विद्यापीठातील त्याच्याच्यासारखे उपद्रवी रिकामटेकडे हे देशावर भार आहेत. या सर्वांना सक्तीच्या रोजगार हमी योजनेवर पाठविले पाहिजे.

भंकस बाबा's picture

13 Sep 2017 - 7:19 pm | भंकस बाबा

अगदी योग्य आणि सुस्पष्ट स्पष्टीकरण

शब्दबम्बाळ's picture

13 Sep 2017 - 10:25 pm | शब्दबम्बाळ

तुम्हाला बहुधा सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती आहे!
हे सगळं झालं तेव्हा तिथेच होतात का बरे? कि या कथेतला प्रत्येक जण आधी तुम्हाला येऊन सांगतो कि काय काय करत आहे ते?
नसेल तर तुमची माहिती पण कुठल्या तरी स्रोत वर आधारलेली असणार! मग जर इतके पक्के स्रोत असतील तर न्यायालयाला द्यायचे होते कि कन्हैयाला सोडलंच नसते म्हणजे न्यायालयाने!
किंवा पोलिसांना तरी द्यायची म्हणजे "आता तरी" चार्जशीट फाईल करता आली असती त्यांना!

पण आम्ही इथेच फक्त शिव्या घालणार, तसा अधिकार आहेच म्हणा तुम्हाला त्यामुळे तो पाल्हाळ चालू द्या...
ज्या दिवशी न्यायालय हे सांगेल कि खरोखर याने देशद्रोह केला आहे मी तरी तेव्हाच मान्य करेन. तुम्हाला सगळीकडे त्याच्या नावाने आरडाओरड करण्याचे स्वातंत्र्य देखील आहेच.

आणि भाजपला इतकेच देशप्रेम आहे तर त्या "अफझल गुरूला दिलेली फाशी हि कायद्याची थट्टा आहे" वगैरे मानणाऱ्या PDP बरोबर "सत्तासोबत" करताना जराही लाज वाटत नाही?
का देशप्रेमाचे सगळे नियम बाकीच्या लोकांसाठी, आम्ही करू तीच देशभक्ती असं काही आहे?

श्रीगुरुजी's picture

13 Sep 2017 - 11:40 pm | श्रीगुरुजी

मी तिथे असण्याचा संबंध नाही. मी वर सांगितलेल्या सर्व प्रसंगाच्या चित्रफिती (जनेविमधील देशद्रोही घोषणाबाजी, प्रा. मकरंद परांजपे यांच्याशी संबंधित असलेले प्रसंग) सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत. अनेक वाहिन्यांनी त्या दाखविलेल्या आहेत. त्यात माझ्या मनाचे काहीही नाही. कन्हैयाच्या लघवी प्रकरणाचा वृत्तांत देखील वृत्तपत्रातून छापून आलेला आहे. मी आधी दिलेला धागा संपूर्ण वाचला तर कन्हैयाविषयीच्या अनेक गोष्टी व त्यामागचे संदर्भ सापडतील.

न्यायालयाने त्याला २० दिवसानंतर सशर्त जामीन दिला आहे. http://indiatoday.intoday.in/story/kanhaiya-kumar-granted-6-month-condit...

तो अजूनही विद्यार्थी आहे व त्याची कौटुंबिक परिस्थिती गरीबीची आहे हे लक्षात घेऊन व त्याच्यावरील गुन्हे लक्षात घेऊन जामीनावर निर्णय देताना न्यायालयाने खालील अटी घातलेल्या आहेत.

The judge directed that the accused's surety "should also be either a member of the faculty or a person related to him in a manner that he exercises control on him not only with respect to appearance before the court but also to ensure that his thoughts and energy are channelised in a constructive manner."

While giving monetary concession for furnishing the bond for release, the high court said Kanhaiya has to "furnish an undertaking to the effect that he will not participate actively or passively in any activity which may be termed as anti-national."

जामिनावर सोडणे म्हणजे निर्दोष मुक्तता नव्हे. त्याच्यावरील देशद्रोहाचा गुन्हाही कायम आहे.

ज्या दिवशी न्यायालय हे सांगेल कि खरोखर याने देशद्रोह केला आहे मी तरी तेव्हाच मान्य करेन. तुम्हाला सगळीकडे त्याच्या नावाने आरडाओरड करण्याचे स्वातंत्र्य देखील आहेच.

तीन वेगवेगळ्या न्यायालयांनी दोषी ठरवून सुद्धा अफझल गुरूला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देऊन त्याच्या फाशीनिमित्त सुतक पाळणारे भारतात आहेत. तीन वेगवेगळ्या न्यायालयात गुन्हे सिद्ध होऊन सुद्धा मुंबईवर २६/११ झालेला हल्ला कसाबने केला नसून ते रा. स्व. संघाचे कारस्थान आहे असे छातीठोकपणे सांगणारे "विचारवंत" भारतात आहेत. त्यामुळे न्यायालयाने त्याला दोषी ठरविले तरी त्याला निर्दोष मानणारे तो न्यायालयाचा निर्णय मानणार नाहीत हे नक्की.

आणि भाजपला इतकेच देशप्रेम आहे तर त्या "अफझल गुरूला दिलेली फाशी हि कायद्याची थट्टा आहे" वगैरे मानणाऱ्या PDP बरोबर "सत्तासोबत" करताना जराही लाज वाटत नाही?
का देशप्रेमाचे सगळे नियम बाकीच्या लोकांसाठी, आम्ही करू तीच देशभक्ती असं काही आहे?

त्यात लाज वगैरे वाटण्याचा प्रश्नच नाही. भाजप काश्मिरमधील दुसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरलेला आहे. पीडीपी बरोबर युती करणे हा एक प्रयोग आहे. त्या निमित्ताने भाजपला काश्मिरमधील राजकीय निर्णयांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली व ती संधी स्वीकारून भाजपने पीडीपीचे काही देशद्रोही निर्णय हाणून पाडले. उदाहरणार्थ पीडीपीने दगडफेक्या मसर्रत आलमला तुरूंगातून सोडले होते. परंतु भाजपच्या दबावामुळे त्याला पुन्हा एकदा तुरूंगात टाकावे लागले. पीडीपीच्या विरोधाला न जुमानता भाजपचे अ‍ॅफ्स्पा मागे न घेता सैन्याला बर्‍यापैकी मोकळा हात दिल्याने सैन्याने मोठ्या प्रमाणात अतिरेकी मारले व दगडफेक्यांवर पॅलेट गन्स चालविल्या. भाजपऐवजी पीडीपीबरोबर सत्तेत कॉंग्रेस किंवा नॅशनल कॉन्फरन्स असती तर हे निर्णय झाले असते का याविषयी शंका आहे. किंबहुना भाजप सत्तेत सहभागी असल्याने पीडीपीच्या काही निर्णयांवर नियंत्रण आले आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भाजपचा काश्मिरमधील निर्णयात थेट सहभाग आहे ही चांगली गोष्ट आहे. भाजपने काश्मिरला स्वायत्तता देणार्‍या ३५ अ कलमाविरूद्ध सुद्धा न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू केली आहे. जे कलम काँग्रेसने आणले व जे रद्द करण्याचा काँग्रेसने कधीही प्रयत्न केला नाही ते धाडस भाजप करू पाहत आहे.

बाकी अफझल गुरूला दिलेली फाशी ही कायद्याची थट्टा आहे असे फक्त पीडीपीच नव्हे तर इतर काही जणही बोलतात. त्यात काँग्रेसवाले आहेत, सूझन अरूंधती रॉयसारख्या निधर्मांध आहेत व इतरही अनेक जण आहेत. तांत्रिकदृष्ट्या असे मत व्यक्त करणे हा दखलपात्र गुन्हा नाही. अशा प्रत्येकावर कारवाई करणे व्यावहारीकदृष्ट्या व कायदेशीरदृष्ट्या शक्य नसते. तसे करून काही फायदाही नसतो. न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयावर अनेक बाजूंनी अनेक जण बोलतात. याकूब मेमनच्या फाशीच्या वेळीही अनेक जण अनेक तोंडांनी बोलत होते. तथाकथित २०० विचारवंतांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून त्याला फाशी न देण्याची मागणी केली होती. त्यातल्या कोणावरही कायदेशीर कारवाई शक्य नव्हती.

का देशप्रेमाचे सगळे नियम बाकीच्या लोकांसाठी, आम्ही करू तीच देशभक्ती असं काही आहे?

असे कोणीच म्हणत नाही.

बाकी अफझल गुरूला दिलेली फाशी ही कायद्याची थट्टा आहे असे फक्त पीडीपीच नव्हे तर इतर काही जणही बोलतात....

गुरुजी राजकारणात कोलांट उड्या माराव्या लागतात स्ट्रेंज बेड फेलोज होतात हा राजकारणातला प्रॅग्मॅटीझम झाला. पण ज्यांच्या सोबत जुळवून घेताय त्यांच्या सगळ्या कृतीचे समर्थन करणे गरजेचे आहे काय ?

संसदेवरील हल्ला लोकशाहीवर झालेला हल्ला होता, गुन्हेगारांना शिक्षा न देऊ शकणे ही लोकशाही राज्यव्यवस्थेची मस्करी किंवा थट्टेच्या लेव्हलवर पोहोचत असेल तर तो देशाच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असतो. आणि अशी थट्टा सहन न करण्याचे काम न्यायालयाने व्यवस्थीत बजावले. सत्तेत लाख पार्ट्नर बना पण योग्य बाजू सांगताना ठणकावून सांगा.

तर्राट जोकर's picture

15 Sep 2017 - 1:53 pm | तर्राट जोकर

ओह माय गोडसे!!!! :-)

तिखटाला तिखट इथे गोडाचा सध्या संबंध नाय !

विशुमित's picture

15 Sep 2017 - 2:30 pm | विशुमित

वेलकम बॅक..!!

arunjoshi123's picture

13 Sep 2017 - 5:54 pm | arunjoshi123

प्रजाजनहो,
आपण बाबा राम रहिम यांची एक निवांत दिलखुलास चर्चा सामाजिक माध्यमांत फिरताना पाहिली असेलच. "हम जी बस चंगे काम करदे है। दुसरा कोई काम णा करते है।" हा डायलॉग आठवतो?

Ram ram's picture

14 Sep 2017 - 11:16 am | Ram ram

कन्हैयालाल माxxxx ahe.

पगला गजोधर's picture

15 Sep 2017 - 2:01 pm | पगला गजोधर

कन्हैयालाल माxxxx ahe.

कन्हैयालाल माxxxx असो,
किंवा मोहनजी माxxxx असो,

कन्हैया व मोहन ही भगवंताची वेगळी नावे.....

इरसाल's picture

14 Sep 2017 - 1:11 pm | इरसाल

माननीयच असे आहे ना ?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Sep 2017 - 1:29 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

शरद पवारांचे दाउदशी संबंध आहेत्,त्यांनी भूखंड लाटले आहेत..हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ह्यांचे विधान व पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो,पवारांचे कर्तृत्व महान आहे असे म्हणणारे नरेंद्रभाई.. मुंडे व तेव्हाच्या भाजपा नेत्यांची विधाने खरी मानली तर पवार देशद्रोही ठरतात. व त्यांचे बोट धरून राजकारणात येणारे,त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवणारे गडकरी व मोदी मग देशद्रोही मानायचे का?

श्रीगुरुजी's picture

14 Sep 2017 - 2:05 pm | श्रीगुरुजी

नानासाहेब,

या मुद्द्यावर तुमच्या 'ह्यां'चं काय म्हणणं आहे?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Sep 2017 - 3:42 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

कमळाबाईस मत देऊन चूक केली ह्यांचे म्हणणे आहे गं श्री.

श्रीगुरुजी's picture

14 Sep 2017 - 4:24 pm | श्रीगुरुजी

काय सांगतोस! मग 'हे' आता चुकीचे काय प्रायश्चित्त घेणार?