२-३ महिन्याच्या सुट्टीत काय काय करता येईल.

मन्याटण्या's picture
मन्याटण्या in काथ्याकूट
9 Sep 2017 - 1:57 pm
गाभा: 

नमस्कार, लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. तर, विषय असा आहे की सध्या नोकरी सोडली आहे (सोमवार, ११ सप्टेंबर नोकरीचा शेवटचा दिवस) व दोन तीन महिन्याचा ब्रेक घेणार आहे. नोकरी सोडण्याच कारण की तेच ते काम करून कंटाळा आला होता आणि लगेच दुसरी नोकरी पकडण्याची इछां नाही. तर या दोन तीन महिन्यात काय काय करू शकतो हा विचार करत होतो. दिवसाचे २४ तास कसे पुरेपूर वापरू शकतो व काय काय नवीन करता येईल याबद्दल सल्ला, मार्गदर्शन हवे आहे. शक्यतो outdoor activity करायचा विचार आहे ज्यामुळे निसर्गाशी आणि स्वताशी अजून जवळ जाता येईल.पुण्याजवळचा परिसर bike वर फिरणे (शक्यतो ग्रामीण भाग आणि डोंगर) असा एक विचार आहे. आशा करतो मिपावर अजून नवीन कल्पना सुचतील. धन्यवाद!

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Sep 2017 - 2:07 pm | अमरेंद्र बाहुबली

आपलं वयं??

मन्याटण्या's picture

9 Sep 2017 - 2:11 pm | मन्याटण्या

.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Sep 2017 - 2:17 pm | अमरेंद्र बाहुबली

मग मस्तपैकी जिम लावा. हेवि डाएट करा. रोज भरपुर अंडे खा. दर दोन तासाला 2. रोज 20 ते 25 अंडी, 1 डजन केळ, 1 लिटर दुध, सोयाबीन भिजवून. मस्त शरीर बनेल. ते तुम्हाला आयुष्यभर पुरेल.

मन्याटण्या's picture

11 Sep 2017 - 10:25 am | मन्याटण्या

एवढा heavy diet / gym केल्यावर अजून काही करण्याची इछा होणार नाही व खूपसारा वेळ आराम करण्यात जाईल. पण नियमित व्यायाम करणे हे लिस्ट मध्ये add करत आहे.

रस्ता आणि तेवढे किमी प्रवासात वेळ वाया जाईल. त्यापेक्षा कर्नाटकमधल्या डोंगरभागात आठदहा दिवस घालवावे. गोकाक, चिकमंगळूर ,श्रिंगेरी इत्यादी. राहाणे जेवण्याची सोय होईलच.

अगदी जवळ राधानगरी,अंबा घाट,गगनबावडा

मन्याटण्या's picture

11 Sep 2017 - 10:29 am | मन्याटण्या

धन्यवाद.

>>पुण्याजवळचा परिसर bike वर>>

एकदोन दिवस जाऊन आलात तर परत तोच रस्ता आणि तेवढे किमी प्रवासात वेळ वाया जाईल. त्यापेक्षा कर्नाटकमधल्या डोंगरभागात आठदहा दिवस घालवावे. गोकाक, चिकमंगळूर ,श्रिंगेरी इत्यादी. राहाणे जेवण्याची सोय होईलच.

अगदी जवळ राधानगरी,अंबा घाट,गगनबावडा

पगला गजोधर's picture

9 Sep 2017 - 3:23 pm | पगला गजोधर

सगळ्यात पहिले कम्प्लीट बॉडी चेक अप करा...
लिपिड प्रोफ़ाइल ई ई, चांगल्या फिजिशियन ला दाखवून सल्ल घ्याच... मग पुढचे उपद्वयाप करा....

मन्याटण्या's picture

11 Sep 2017 - 10:30 am | मन्याटण्या

धन्यवाद!

इरसाल's picture

9 Sep 2017 - 3:47 pm | इरसाल

१. मस्तपैकी आराम करा.
२. घरच्यांना वेळ द्या पुरेपुर, त्यांच्या मनासारखे वागा, त्यांना कुठेतरी फिरवुन आणा.
३. आवडीची पुस्तके वाचा किंवा आवडीचा एखादा छंद त्यामधे स्वतःला बुडवुन घ्या.
४. पुर्वी काम करत असलेल्या क्षेत्रातील नवनवीन तंत्र शिकुन घ्या. (जुने न विसरता)
५. एखादं राहुन गेलेलं आहे असं वाटणारं काम पुर्णत्वाला न्या.
६. जुन्या मित्रांचे संमेलन भरवा,
७. कट्टे करा, नोकरीमुळे ज्या मित्रांना, नातेवाईकांना भेटणे शक्य होत नव्हते त्यांच्या बरोबर काही वेळ घालवा.
८. अधुन मधुन धार्मिक स्थळांना भेटी द्या, मानसिक शांतता लाभेल, एखाद्या पुजाअर्चनेत सहभागी व्हा, तिथल्या वातावरणाने एक प्रकारचा मनावर सकारात्मक परिणाम होतो.
९. स्वयंपाक बनवता येत असेल तर बनवुन कधी कधी घरच्यांना खावु घाला, घरच्यांसोबत, असच जेवण बनवुन एखाद्या शेतावर जावुन पुर्ण दिवस आनंदात घालवा.
१०. आतापर्यंत माहित नसलेल्या क्षेत्राबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.
११. आतापर्यंतच्या असलेल्या रोजच्या दिनक्रमात साजेसा बदल करुन बघा, ४/५ वाजेची पहाट ही नेहमीच ७/८ वाजेच्या सकाळीपेक्षा भारलेली असते.
आणी
आणी
आणी
फेसबुक, व्हॉट्स्प पासुन दुर रहा, वर्तमानपत्रांचे फक्त पहिले आणी शेवटचेच पान वाचा.टीव्हीवर बातम्यांचे चॅनल बघु नका.

##सही##

"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

##सहीच##

मन्याटण्या's picture

11 Sep 2017 - 10:37 am | मन्याटण्या

धन्यवाद! तुम्ही सुचवल्यापैकी खालील गोष्टी खास आवडल्या.

<<२. घरच्यांना वेळ द्या पुरेपुर, त्यांच्या मनासारखे वागा, त्यांना कुठेतरी फिरवुन आणा.
३. आवडीची पुस्तके वाचा किंवा आवडीचा एखादा छंद त्यामधे स्वतःला बुडवुन घ्या.
७. कट्टे करा, नोकरीमुळे ज्या मित्रांना, नातेवाईकांना भेटणे शक्य होत नव्हते त्यांच्या बरोबर काही वेळ घालवा.
८. अधुन मधुन धार्मिक स्थळांना भेटी द्या, मानसिक शांतता लाभेल, एखाद्या पुजाअर्चनेत सहभागी व्हा, तिथल्या वातावरणाने एक प्रकारचा मनावर सकारात्मक परिणाम होतो.
९. स्वयंपाक बनवता येत असेल तर बनवुन कधी कधी घरच्यांना खावु घाला, घरच्यांसोबत, असच जेवण बनवुन एखाद्या शेतावर जावुन पुर्ण दिवस आनंदात घालवा.
११. आतापर्यंतच्या असलेल्या रोजच्या दिनक्रमात साजेसा बदल करुन बघा, ४/५ वाजेची पहाट ही नेहमीच ७/८ वाजेच्या सकाळीपेक्षा भारलेली >>

टर्मीनेटर's picture

9 Sep 2017 - 4:20 pm | टर्मीनेटर

तेच ते काम करून कंटाळा आला होता म्हणून नोकरी सोडलीत ह्या बद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन. आपले वय (३०) व अजून २ ते ३ महिन्याचा ब्रेक घेण्याची आपली तयारी ह्या वरून असा अंदाज येतोय कि आपल्यावर कदाचित कोणतीही प्रापंचिक जवाबदारी नसावी. (अर्थात हा अंदाज चुकीचाही असू शकतो. ) कारण ह्या कारणासाठी आहे ती नोकरी सोडून झिरो इन्कम वर येण्याची चैन प्रापंचिक जवाबदाऱ्या असलेल्या व्यक्तीला परवडणे शक्य नसते... असो !
सध्या एका नवीन प्रोजेक्ट वर काम चालू आहे, आणि त्या साठी फुल टाईम , पार्ट टाईम व फ्री लान्सर सर्व्हेयर्स ची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे तुमच्या सवडी नुसार फिरत फिरत काम करून काही पैसेही कमावण्याची जर इच्छा असेल तर अधिक माहिती साठी व्यनि करा. (हि जाहिरात नाही आहे.)

मन्याटण्या's picture

11 Sep 2017 - 10:38 am | मन्याटण्या

धन्यवाद!

काही वर्षांपूर्वी मी ही हेच केलं होतं. जुन्या नोकरीचा राजीनामा दिला. नवीन नोकरी पत्करली पण नवीन ठिकाणी सांगितलं की जॉईन ३ महिन्यांनी होईन. ते बिचारे तयार पण झाले. आणि मी ह्या वेळेचा सदउपयोग मनाली स्थित एका संस्थेत (http://www.adventurehimalaya.org/) BMC ( Basic Mountaineering COurce) करण्यात घालवला. हा कोर्स मला खूप दिवसांपासून करायचा होता पण दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्या आणि व्यापामुळे ते शक्या होत नव्हतं. ते ३ महिने मी मन्मुराद जगलो. ते म्हणतात ना Best days of my life..तसंच काहीस. ३ महिन्यांनी परत आलो तेव्हा मी नविइन जबाबदाऱ्या घ्यायला पूर्णं पणे तयार होतो.

मन्याटण्या's picture

11 Sep 2017 - 10:48 am | मन्याटण्या

धन्यवाद!

नोकरी सोडलीत का! अरे वा! मजा आहे बुवा!
आधीची नोकरी करताना काय करावसं वाटत होतं जे जमलं नव्हतं ते करून टाका. आवड असल्यास ट्रेक करा, लाँग ड्राईव्हला जा. एरवी करावसं वाट्ट्ं पण इतका वेळ नसतो. हे करून दोनेक अठव्ड्यात मन भरेल. मग वर लिहिल्याप्रमाणे आपले फुळ्ळ हेल्थ चेकप करून घ्या. तब्येतीला जिथं कुठं जागेवर आणायचय ते प्लान करा. घरातील लोकांना वन ऑन वन टैम द्या. नातेवाईकांना भेटणे होत नाही. त्यांच्यासाठी एकत्र जमा व दिवसभर टैम स्पेंड करा. नवीन नोकरी सुरु करण्याआधी आपला दिनक्रम जो ठरवाल तो सस्टेनेबल कसा असेल याचा विचार व सराव करा. घरी रोज एकतरी काम नियमाने करा ज्यामुळे तुमच्यासाठी एरवी राबणार्‍या मनुष्याचा ताण हलका होईल. एक तरी पदार्थ नवा शिका व तो हातखंडा होईपर्यंत करत रहा. त्याचे प्रमाण बसवा. फार्फार आत्मविश्वास येतो त्याने. आणि हो, दिवाळी अंकासाठी लिहा.
यातील काहीच जमणार नसेल तर दुसरा धागा काढा. तिथे आम्ही दंगा करणार तो सहन करा.

तुमचा इन्शुरन्स आहे का..? नसल्यास सर्वप्रथम तो काढा..

३ महिने आणि ५० / ७० हजार खर्च करायची तयारी असेल तर गाडीवरून बाहेर पडा. गुजरात राजस्थान च्या वाळवंटात जावा आणि तिथून वर पंजाब बिंजाब करत हिमालयात जा. मोठी शहरे टाळून लहान लहान गावात मुक्काम करा म्हणजे पैसे वाचतील.

आणखी अ‍ॅडवेंचरस अनुभव घ्यायचा असेल तर सायकलने जा पण दोन महिने कमी पडतील. दुचाकीने एक दीड महिन्यात आयुष्यभर सांगण्याजोगी शिदोरी घेऊन घरी परताल.

परत येऊन थोडी विश्रांती घ्या.. आणि एखादी १५ दिवसांची बॅकपॅकिंग ट्रिप करा.. विमान ते टमटम अशा भल्यामोठ्या रेंजच्या वाहनांनून फिरा आणि नवीन ठिकाणे भेट द्या.

बाकीचे मला सुचणारे उद्योग नोकरी सुरू असतानाही करण्यासारखे आहेत. त्यामुळे त्यांबद्दल पास.

इतका सलग वेळ मिळणे शक्य नसते.. त्यामुळे बाहेर पडा आणि फिरा...

मन्याटण्या's picture

11 Sep 2017 - 10:49 am | मन्याटण्या

धन्यवाद!

देशपांडे विनायक's picture

10 Sep 2017 - 12:31 pm | देशपांडे विनायक

अभिनंदन
चाकोरी सोडून देण्याचे धाडस दाखवलेत त्याबद्दल
>>> नोकरी सोडण्याच कारण की तेच ते काम करून कंटाळा आला होता आणि लगेच दुसरी नोकरी पकडण्याची इछां नाही. तर या दोन तीन महिन्यात काय काय करू शकतो हा विचार करत होतो.

1] नोकरी का धरली याचा विचार करा
२] कंटाळा का येतो याचा विचार करा
३] या दोन तीन महिन्यानंतर काय करणार आहात ? यावर ठाम आहात ?
४] असा विचार केल्यास काय करावे हे कळू शकेल आणि ते कसे करावे या साठी मदत मागणे आणि देणे सुलभ होईल असे वाटते

सुबोध खरे's picture

11 Sep 2017 - 10:37 am | सुबोध खरे

मी सरकारी नोकरीत असताना म्हणजे २००३ साली चार महिने अर्न्ड लिव्ह आणि २ महिने अर्ध पगारी रजा घेऊन सहा महिने घरी बसलो होतो आणि काहीच केले नाही. यानंतर २००९ साली नोकरी सोडून व्यवसाय चालू करायचा होता तेंव्हा हि साडे तीन महिने काहीच केलं नाही. (शेवटी आमच्या मद्राशी मोलकरणीने बायकोला विचारले, "अण्णा, कुछ काम क्यू नाही करता?")
दोन वेळा झोपणे, तीन वेळा जेवणे आणि नुसता कालापव्यय करणे.
"यामुळे हा माणूस निवृत्त झाल्यावर याला काय करावे कसे करावे असा कोणताही प्रश्न पडणार नाही असे माझ्या पत्नीचे ठाम मत झाले आहे.)
फार मजा येते. एक महिना असं पण करून पहा

अजया's picture

11 Sep 2017 - 12:39 pm | अजया

:)
सध्या मी पण प्रॅक्टिसमधून ब्रेक घेतलाय. भरपूर वाचतेय, फिरतेय, छान कार्यक्रमांची पुण्यात वानवा नसतेच. मज्जानु लाइफ.
परत कामाला लागावे वाटायला लागले की मागचे रुटिन परत सुरु करीन.
गेल्या दोन महिन्यात जेवढे वाचता आले तेवढे दोन वर्षात नव्हते जमले. नातेवाईकांकडे जाणे होत नव्हते. सगळ्या वयस्कर काका माम्यांना भेटुन आले. बर्याच वर्षांनी भेटण्यात मजा असते. तुला एवढीशी पाहिले होते तुझा मुलगा अठरा वर्षाचा झाला वगैरे ऐकायला फार छान वाटते :) अजून नमस्कार करण्यासारखी माणसे उरली आहेत तोवर त्यांना भेटावे.
इतक्या वर्षात कधी आईबरोबर निवांत राहिले नव्हते. हे कॅच अप पण खूप समाधान देऊन जाते.

अमित खोजे's picture

11 Sep 2017 - 9:25 pm | अमित खोजे

"अजून नमस्कार करण्यासारखी माणसे उरली आहेत तोवर त्यांना भेटावे."

अगदी खरे. दूर देशी असल्यामुळे मला बरेच वेळेस वाटते कि आपल्या जुन्या मावश्या मामा इतर नातेवाईक मंडळी यांना भेटून यावे. परंतु नोकरी, सुट्टी, घरातील इतर काळज्या यामध्ये अडकलो कि काही काही होत नाही.

नोकरी सोडून मी सुद्धा ३ महिने घरी बसलो होतो. त्या काळात नोकरी शोधण्याचे प्रयत्न सुद्धा केले नाहीत. कसे करणार? कॅनडामध्ये हिवाळ्यात मार्केट बंदच असते. त्यामुळे सरळ मस्तपैकी पुण्याला घरी निघून आलो. दर वर्षी मी यायचो परंतु तेव्हा नोकरी चालू असल्याने फक्त ३ आठवडे रजा मिळायची. आता या वेळी निवांत आलेलो असल्याने अगदी आरामात दिवाळी साजरी केली. भटकंती केली. मित्रांना भेटलो. नातेवाईकांना फारसे भेटणे झाले नाही त्यामुळे ती हुरहूर लागून राहिली. परंतु बाकीचे बरेच उद्योग केले. पुस्तके वाचली, लोळत दिवस घालवले. दरवर्षी आईची ओरड असायची - वर्षातून एकदा येतो ते पण ३-४ आठवड्यांसाठी आणि आला कि नुसता बाहेर पळतोस - याला भेट त्याला भेट करत. त्यामुळे या वेळेस अगदी आठवणीने घरातच थांबून घरच्यांबरोबर बराच वेळ घालवला. आईने चांगले चुंगले पदार्थ खायला करून ढेरी वाढवली अन नंतर परत जाड झाला म्हणून वरून शिव्या घातल्या.

नोकरी सोडून काही वेळ स्वतःला देण्याच्या निर्णयाचे मनापासून स्वागत. नोकरीत अडकणे आम्हाला कधी पटले नाही. जरी नोकरी केली तरीही माझे हे मत आहे. दर दीड दोन वर्षांनी एका जागी राहून मला कंटाळा येत असल्याने कंपनी बदलली. आता गेल्या १२ वर्षात माझ्या १0 कंपन्या झाल्या आहेत. खरंच सांगतोय. मध्येच सुट्टी असली कि भटकंती तर भरपूर करायला आवडते. त्यात फोटोग्राफीचा छंद लागला. जमेल तिथे फिरून तेथील फोटो काढून वेबसाइटवर विकायलाही ठेवलेत - विकले हि जातात. वाद्ये शिकण्याचा छंद म्हणून बरीच वाद्ये घरी गोळा करून ठेवली आहेत. त्यांच्यावर हात सफाई करणे चालू असते. ती शिकायची आहेत. नोकरी चालू असताना रोजच वेळ मिळेल किंवा मूड असेल असे नाही. त्यामुळे सुट्टीत बराच सर्व करून होतो. मध्येच चित्रकलेचा एक छोटासा कोर्स केला. १ महिन्याचा. त्यामुळे त्यातही रस वाढला. यु ट्यूब वर बघून बघून चित्रे काढायची. खूप मजा येते.

एक मात्र नक्की सांगेन. येथून ज्या काही कल्पना तुम्हाला मिळतील त्या एका कागदावर लिहून काढा. त्यातील तुम्हाला कोणत्या आवडतात त्यावर टिकमार्क करा. आणि वेळापत्रक बनवा. म्हणजे अगदी परीक्षे सारखे नाही कारण हि सुट्टी आहे पण साधारण पहिल्या १० दिवसात एक तरी चित्र काढेन, पुढच्या १० दिवसात व्हायोलिनवर एक तरी राग शिकेन. त्यापुढे १० दिवसात एक भटकंती करेन - नातेवाईकांना भेटून येईन असे काही तरी. नाही तर ३ महिने कसे संपले कळणार पण नाही आणि अस्मादिक वाढलेल्या ढेरीकडे फक्त बघत बसतील.

चांदणे संदीप's picture

11 Sep 2017 - 11:59 am | चांदणे संदीप

काहीही करा पण जे काही कराल त्याचे अनुभव इथे लिहा! :)

शुभेच्छा!

Sandy

१. मध्यंतरी AMK ट्रेक ला गेलो होतो तेव्हा २ जर्मन मित्र आले होते आमच्या सोबत. पुण्यातच कोणत्याशा कंपनीत कामाला. त्यांना दर वर्षी २-३ आठवडे सलग सुट्टी मिळते. या पट्ठ्यानी सर्व भारतीय रांज्यांना भेट दिली होती. आणि आपण भारतीय असून मुख्य पर्यटन स्थळे वगळता 'भारत' पाहताच नाही.
२. अबकडई च्या निवडक लेखांचं एक पुस्तक हाती लागलं मध्ये एकदा. त्यात एकाच्या प्रवासवर्णनाचा एक लेख आहे. त्याने मध्य भारत अक्षरशः साधूसारखा फिरला. फार सामान नाही, रेल्वेच्या २न्ड क्लास मधून - म्हणजेच स्वस्तात प्रवास, आणि गबाळा वेष. माणसं पहिली त्याने. फॅन झालो त्याच्या लेखांचा.
३. माझे काका रिटायर झाल्यावर पायी नर्मदा परिक्रमेला जाऊन आले. त्यांचेही 'माणसांचे' अनुभव मस्त.

अशी सुट्टी कधीतरी मिळाली, तर एकटयाने असाच पर्यटन स्थलांखेरीज - फक्त फिरायचा म्हणून भारत फिरायचा आहे. पाठीवर फक्त एक सॅक घेऊन. बघू कधी जमेल ते.

पप्पुपेजर's picture

11 Sep 2017 - 3:43 pm | पप्पुपेजर

If you have energy and liking you can work with lokabiradari prakalap in hemalkasa they always want people to work for their cause for at least one month. Then as suggested by others do go on solo road trip it is amazing experience and it gives very different perspective of life. Try to learn something which is totally out of your career something like scuba diving if you are good swimmer ,try to do some maintenance at home for the things which you can fix this will cover your 3 months definitely… happy Holidays…

30 वय म्हणजे काही जास्त नाही, जे मनाला येईल ते करा :)
मी माझे सगळे धंदे बंद करुन सध्या uber वर गाडी चालवत आहे मज्जा व घर चलवण्याएवढे पैसे मिळतात आणि रोज नव्या नव्या लोकांशी भेटी होतात ओळखी होतात हा सरपल्स फायदा.