कथा आहे पण लेखक नाही

आपला निखिल's picture
आपला निखिल in काथ्याकूट
8 Sep 2017 - 10:14 pm
गाभा: 

माझ्या माहिती प्रमाणे पुस्तक लेखनाची पद्धत हि दोन प्रकारची आहे
पहिल्या प्रकारा मध्ये लेखक हा स्वताहा पुस्तक लिहतो तसेच पुस्तकातील कथा हि सुद्धा त्याची स्वतः ची असते. जी काल्पनिक नाहीतर वेगळ्या प्रकारची कथा आसू शकते. दुसऱ्या प्रकारे मध्ये कथा हि लेखकाची असते परंतु त्याने स्वतः त्याचे लेखन केले नसून ते दुसया प्रोफेशनल लेखका कडून घेतलेले असते. ह्याची प्रमुख कारणे म्हणजे अशा लेखकानं कडे चांगली कथा असते परंतु ते लिहण्यासाठी आवश्यक स्कील नसते किंवा वेळ नसतो.

ह्या दोन्ही प्रकारावर जर आपण चर्चा केली तर आवडेल तसेच आवश्यक माहिती मिळेल.
१. फायदे आणि तोटे
२. पुस्तक लिहून घेतल्याचे तोटे
३. पुस्तक लिहून घेण्याची प्रक्रिया
४. काही खबरदारी असल्यास ती नेमकी काय
५. Online पुस्तक प्रदर्शित करण्याचा फायदा

माझ्या कडे कथा आहे परंतु आवश्यक स्किल नाही तसेच वेळही नाही, परंतु पुस्तक लिहायची इच्छा आहे ह्या कसा तोडगा काढता येईल. मला मराठी मधूनच पुस्तक लिहायचे असून एका चांगल्या लेखका कडून लिहून घायचे आहे. ह्या विषया वर चर्चे मधून मार्गदर्शन मिळाल्यास बरेच उपकार होतील तरी कोणास काही माहिती असल्यास कळवावी.

प्रतिक्रिया

बाजीप्रभू's picture

9 Sep 2017 - 5:29 am | बाजीप्रभू

शुभेच्छा!!

ज्योति अळवणी's picture

9 Sep 2017 - 8:14 am | ज्योति अळवणी

फक्त कथा कल्पना तुमची असेल तर तुम्ही लेखक म्हणून नाव कसे काय लावणार बुवा?

पगला गजोधर's picture

9 Sep 2017 - 10:56 am | पगला गजोधर

उदा.
लेखक : आपला निखिल
शब्दांकन : भु. त. दस्तकर

लेखकाला जरी आकर्षक रित्या/ प्रेजेंटेबल रित्या कथा लिहिता येत नसली, तरी कथेच्या मुळ संकल्पनेचा ड्राफ्ट तर त्याला द्यावाच लागतो न घोस्ट रायटर ला.…..

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Sep 2017 - 10:43 am | माम्लेदारचा पन्खा

फार ताप असतो . . हे म्हणजे सरोगसीसारखं होईल . . . उद्या त्या लेखकाने त्याची अपत्यगोष्ट तुम्हाला देणार नाही म्हणून सांगितलं तर काय कराल ?

कानडाऊ योगेशु's picture

9 Sep 2017 - 3:56 pm | कानडाऊ योगेशु

माझ्या माहीतीनुसार कथेच्या मध्यवर्ती संकल्पनेवर (ड्राफ्ट) स्वामित्व हक्क घेता येतो. काही वर्षांपूर्वी सुभाष घईच्या मुक्ता आर्ट्स ने कथा मागवल्या होत्या व त्याच्या अटींमध्ये स्वामित्व हक्क करार करायचा मुद्दा ही होता. म्हणजे लेखकानी कथा पाठवण्याआधीच स्वतःच्या नावे स्वामित्व हक्क घेण्याबाबतची कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या असण्याची आवश्यक्ता होती. कारण उद्या यदाकदाचित एखादी कथा पडद्यावर आली व कोणी बोंबाबोंब केली कि माझी आयडीया चोरली आहे तर असा पुढे त्रास नको म्हणुन.

रानरेडा's picture

10 Sep 2017 - 1:39 am | रानरेडा

मुळात तुम्हाला पुस्तक का लिहायचे आहे ?
पैसे हा हेतू नसावा , कारण मराठी पुस्तकातून काहीही पैसे मिळत नाहीत . आवृत्ती हजार ते दोन हजार पुस्तकांची असते आणि कधी कधी खपाटीला ५ वर्षे जातात . नवीन लेखकाला कुत्रे विचारात नाही
काहीही ओळख नसेल तर चांगल्या प्रकाशन संस्थेत कोणीही विचारात नाही
माझ्या नावावर एक पुस्तक आहे ( ग्रंथाली चे) म्हणून मी अनुभवरून सांगतोय . तसेच वडील लेखक आहेत - तीच ओळख कामाला आली . ते १९९९ साली प्रकाशित झाले .आता तर मराठी वाचकांची हालत अजून वाईट आहे.

तुमचे विचार बघता तुम्हाला तुमच्या नावावर एक पुस्तक पाहिजे आहे , आणि तुम्ही पैशाचा विचार केला असेलच . ४-५ वर्षांपूर्वी मी १००० पुस्तकांची १००-१२५ पानाची प्रकाशन करण्याची किंमत १.२५ लाख ऐकली होती .
हे प्रकाशक पुस्तके बनवून देतात- त्यानंतरच्या विक्रीचे माहित नाही

तुम्ही लेखकाला किती पैसे द्यायला तयार आहात ? तुमच्या अपेक्षा काय आहेत ? किती पानाचे पुस्तक पाहिजे

Online पुस्तक प्रदर्शित करण्याचा फायदा - किंमत बरीच कमी होईल , पण तरीही EDP चा खर्च होईल . तसेच यात पैसे काही मिळत नाहीत तर तुम्ही पुस्तक फुकट देऊ शकता , म्हणजे तेच करावे लागेल . पण लक्षात घ्या अनेक लेखक हे करीत आहेत , आणि फार थोडी पुस्तके यात चांगले आहेत

आणि तुम्हाला दुसया प्रोफेशनल लेखका चे नाव या पुस्तकावर द्यायचे आहे का ? हे कथा कोणत्या प्रकारची आहे ? म्हणजे सामाजिक , भय , प्रेम , रहस्य कि अजून काय ?

तुम्हाला हे करून काय पाहिजे ते नक्की करा.
१) समाजात नाव - मुंबईत मराठी लेखकाला काहीही किंमत मिळत नाही
२) MBA placement / नोकरीत प्रमोशन चा फायदा - होत नाही - तसेही मी placement साठी लिहिले होते ते उशिरा प्रकाशित झाले
३) मुलीवर भाव मारणे - फारसा पडत नाही - मी एक सिंधी मुलीवर लाईन मारायचो - ती एकदाच इम्प्रेस झाली - पण फारसा उपयोग नाही
४) चित्रपट / नाटक / सीरिअल साठी स्क्रिप्ट - यासाठी कॉपी राईट म्हणून - उपयोग व्हावा - पण कथा त्यांना आवडली पाहिजे
५) काही बक्षिसाचे सेटिंग झाले आहे - चांगले आहे

जर तुम्ही मुंबई सोडून इतर मराठीबहुल भागात राहत असाल तर लोक आणि मुली एकाद वेळी इम्प्रेस होतील . माझ्या मित्राने त्याच्या त्या वेळच्या मराठी गर्ल फ्रेंड शी माझी ओळख लेखक म्हणून केली तेवा ती इम्प्रेस झाली होती , पण ती मित्राची होती , नंतर त्यांचा ब्रेक ऑफ झाला ( माझे पुस्तक वाचण्या आधीच)
तर तुम्ही यावर विचार करा. तसेच या गोष्टी पण लिहा आणि आपल्या पैशाचे प्लान पण लिहा . तसेच किती वेळात पाहिजे ते पण . तुम्हाला एकाद वेळी मिसळ पाव वरच लेखक मिळेल - पैसे कॅह्न्गले असतील तर मी सुद्धा विचार करेन

मराठी कथालेखक's picture

10 Sep 2017 - 3:40 pm | मराठी कथालेखक

अरे वा.. मला लिहिता येतं म्हणजे कल्पनाविस्तार करता येतो आणि ते आवडतं सुद्ध...पण नवीन कल्पना फारशा सुचत नाहीत.
अर्थात फारसा वेळ देवू शकणार नाही, पण २५-३० पानांची छोटेखानी कथा असेल तर मदत करु शकतो.

चामुंडराय's picture

10 Sep 2017 - 8:39 pm | चामुंडराय

कामतांची इडली खूप सुरेख असते.

आणि ऑर्चिड खाली बसून खाल्ली कि आणखी छान लागते म्हणे.

इट्टल ... इट्टल....

पुंबा's picture

11 Sep 2017 - 12:31 pm | पुंबा

माझ्या कडे कथा आहे परंतु आवश्यक स्किल नाही तसेच वेळही नाही, परंतु पुस्तक लिहायची इच्छा आहे ह्या कसा तोडगा काढता येईल.

वेळ आणि शैली डेव्हलप करा.. दुसर्‍या लेखकाला कशाला इन्व्हॉल्व्ह करताय?
न चुकता रोज किमान २ तास लिहा. संवादात्मक किंवा डायरी लिहिल्यासारखं लिहा. तुमच्याकडे स्किल नाही असे तुम्हाला वाटत असू शकते.
शैलीचा प्रॉब्लेम प्रत्यक्ष चितमपल्लींसारख्या मोठ्या लेखकाला देखिल आला होता. त्यांनी नियमीत डायरी लेखनातून शैली कमावली असे ऐकले आहे.

पुंबा's picture

11 Sep 2017 - 12:32 pm | पुंबा

सॉरी
वेळ काढा आणी शैली डेव्हअलप करा असे म्हणायचे होते.

आपला निखिल's picture

11 Sep 2017 - 9:01 pm | आपला निखिल

धन्यवाद तुमच्या कंमेंट साठी. सर्व प्रथम मी पुस्तक लिहण्या करीता खूपच नवखा असून पुस्तक लिहण्याची काहीच माहिती नाही. तुम्ही सांगितलेल्या माहितीसाठी धन्यवाद. पुस्तक लिहण्याचा उद्धेश कोणाला इम्प्रेस करायचा नसून केवळ एक आवड, इच्छा, एक वेगळी ओळख मिळवायचा प्रयत्न आणि थोडे फार पैसे कमावणे आसा होता पण पुस्तक लिहून हे सगळं achieve होईल का.. काहीच कल्पना नाही. कथा कितपत चांगली आहे व लोकांना कितपत आवडेल हे देखील माहित नाही. माझा आसा विचार होता कि जर एखादा लेखक प्रॉफिट sharing बेसिस वर पुस्तक लिहण्यास तयार असेल तर त्या कडून पुस्तक लिहून घाएचे. पण तुम्ही लिहल्या प्रमाणे जर मराठी पुस्तकांना प्रॉफिट मिल्ने अवघड गोष्ट असेल तर हे शक्य वाटत नाही. त्या मुळे एकंदर पुस्तक लिहणे अवघड काम दिसते आहे कारण आत्ता पुस्तकासाठी इन्व्हेस्ट करण्या इतके पैसे देखील नाहीत.

मी स्वतः घोस्ट लेखक म्हणून काम केले आहे आणि उलटपक्षी इतरांकडून लेखनाचे हक्क घेऊन स्वतःच्या नावाने प्रकाशित केले सुद्धा आहेत. ह्यांत नैतिक दृष्टया किंवा कायदेशीर रित्या काहीही गैर नाही जर दोन्ही बाजूनी एकमताने तास निर्णय घेतला असेल तर.

पुस्तक लेखनात पैसे अजिबात नाहीत. पुस्तक लिहून पैसे कमावण्यापेक्षा गोव्यांत जाऊन कॅसिनो मध्ये पैसे लावले तर जिंकण्याची जास्त शक्यता आहे.

रानरेडा's picture

11 Sep 2017 - 11:59 pm | रानरेडा

मराठी लेखनात पैसे नाहीत ... इकडे पैसे टाकायची तयारी लागते . तसेच पहिले पुस्तक हे तुमच्यावर उपकार म्हणून छापले जाते .
आता तर नवीन स्पर्धा फेसबुक , साईट्स आणि ब्लॉग्स ची आहे , आणि हे फुकट आहे . तसेच फेसबुक किंवा मिसाक्पाव / मायबोली वर चर्चा हि होते , आणि ती मूळ साहित्यापेक्षा अधिक करमणूक करणारी असते .आणि हे सर्व फुकट .
आपली Online पुस्तक विकायची जर कल्पना असेल तर लक्षात घ्या कि त्याचेही मार्केटिंग करावे लागते आणि त्यात स्पर्धा आहे , मोठ्या प्रमाणात फुकट ए पुस्तके मिळतात ,आणि यात काही बरीही आहेत . तसेच मराठी तरुण वाचक हा कमीकमी होतोय .
माझ्या पुस्तकाच्या ४०-५० प्रती तर मीच विकत घेरल्या होत्या ( खास दारात) वाटण्यासाठी. आणि त्या मित्रांना वाटताना तर ३ - ४ दारू पार्ट्या पण झाल्या , हा असला खर्च तर मी जमेत धरला नाही,
तर पैसा हा उद्देश असेल तर हे शक्य नाही !!