मोडीची_गोडी

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
8 Sep 2017 - 4:54 pm

फारा वर्षाच्या अंतराने पुन्हा विद्यार्थी दशेत गेलो, ते ब्राह्मि अन् मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने.

महिनाभर रोजचा दोन तासाचा वर्ग, दुसरा दिवस सुरु व्हायच्या आत दिलेला होमवर्क पुर्ण करण्यासाठी जागरणे....

एकरेघी, दुरेघी, चाररेघी वह्या, शाईपेनाचा तपानंतर लाभलेला सहवास, शाळेतल्या बाकांवर अजुनही मावत असलेल्या देहाचं अपार कौतुक साधत झालेल्या नव्या ओळखी अन् विस्तारलेला परीघ....

प्रशिक्षकांच एक वाक्य ठसलयं मात्र, ' हे शिकलाय, याचा तुम्हाला काही उपयोग नाही असं जेव्हा वाटेल तेव्हा अजुन कोणाला तरी वाटुन टाका!' माझं ते माझं, तुझं तेही माझंच, असं गोळा करायच्या रुढीत ही नवी दिशा आहे माझ्यासाठी.

लेकीला इतिहास विषय रटाळ वाटतो असं कळाल्यानं सुरू केलेला हा अट्टहास, नवी कवाडं मात्र उघडी झाली माझ्यासाठी! CDAC ने बनवलेलं Android App सोबतीला घेतलय आता. सराव करण्यासाठी . जरा थोडा अजुन सराव करतो मग तुम्हाला पण शिकवीन मोडी वाचायला....

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

8 Sep 2017 - 5:00 pm | विनिता००२

व्वा छान !

अरे वा! कुठला वर्ग आहे? थोडी माहिती द्या.

vcdatrange's picture

12 Sep 2017 - 10:03 am | vcdatrange

हल्ली नाशकात बरेच ठिकाणी मोडी वर्ग चालतात. मी रामनाथ राव ळांसोबत केला

दिपक लोखंडे's picture

8 Sep 2017 - 5:39 pm | दिपक लोखंडे

मस्त..

दिपक लोखंडे's picture

8 Sep 2017 - 5:39 pm | दिपक लोखंडे

मस्त..

दिपक लोखंडे's picture

8 Sep 2017 - 5:40 pm | दिपक लोखंडे

मस्त..

दिपक लोखंडे's picture

8 Sep 2017 - 5:40 pm | दिपक लोखंडे

मस्त..

माहितगार's picture

8 Sep 2017 - 5:47 pm | माहितगार

एक मदत ट्राय करुन पहावयास आवडल्यास पहावे मराठी विकिस्रोत प्रकल्पात या दुव्यावर विल्यम केरी लिखीत मराठीतील पहिला मराठी-इंग्रजी शब्दकोश आहे. त्यातील मराठी बहुधा मोडी लिपीत असावे. सरावा साठी सवड आणि आवडीनुसार जमतील तेवढ्या शब्दांचे देवनागरीकरण करून मिळाल्यास हवे आहे.

लेकीला इतिहास विषय रटाळ वाटतो असं कळाल्यानं

How to develop curiosity असा गूगल सर्च केल्यावर काही उपयूक्त लेख येतात , ते वाचण्यास देण्याचा मी माझ्या पाल्यांवर हा प्रयोग करुन पाहीला आहे.

पगला गजोधर's picture

8 Sep 2017 - 7:11 pm | पगला गजोधर

(हळू घेणे )

How to develop curiosity असा गूगल सर्च केल्यावर काही उपयूक्त लेख येतात , ते वाचण्यास देण्याचा मी माझ्या पाल्यांवर हा प्रयोग करुन पाहीला आहे.

how to avoid traps laid by parent असा गूगल सर्च करून पाल्याने प्रयोग फोल ठरवले तर ?

माहितगार's picture

9 Sep 2017 - 4:03 pm | माहितगार

:)

जगप्रवासी's picture

8 Sep 2017 - 5:58 pm | जगप्रवासी

मी सुद्धा शिकतोय. अजून बाराखडी गिरवतोय. छोटे छोटे लेख, पत्र वाचतोय. लिहायला अजून नीट येत नाहीये. पण सॉलिड मज्जा येते

उत्तम प्रयत्न!!

तुम्हाला या दोन पि.डी.एफ. स्वरुपातल्या पुस्तकाचा काही उपयोग होतो का ते पहा.
Modi prashikshan Pustika

Modi Vachan Saraav

मनो's picture

9 Sep 2017 - 8:05 am | मनो

उद्या दोन्ही पुस्तके प्रिंट करून घेतो

मला हे पुस्तक मोडी शिकण्यासाठी फार उपयोगी पडले

चला शिकूया मोडी आपण
https://archive.org/details/ChalaShikuyaModiAapan

बाजीप्रभू's picture

8 Sep 2017 - 6:12 pm | बाजीप्रभू

आवडेल शिकायला...

पैसा's picture

8 Sep 2017 - 11:04 pm | पैसा

जरूर शिकवा इथे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Sep 2017 - 11:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

क्लास सुरू व्हायची वाट पाहत आहे !

ते अँड्रॉइड aap कोणता ते सांगा नक्की.

vcdatrange's picture

12 Sep 2017 - 10:06 am | vcdatrange

मोडी लिपी या नावानं अँड्रॉइड aap प्ले स्टोअर वर आहे

जेम्स वांड's picture

9 Sep 2017 - 9:29 am | जेम्स वांड

हा पूर्ण धागाच बुकमार्क केलाय

vcdatrange's picture

12 Sep 2017 - 10:11 am | vcdatrange

मोडी लिपी शिकुन सराव करायचा राहिला तर लगेच विसरायला होतं ..... आजचा ताजा अनुभव