मिळून मिसळून!

उपयोजक's picture
उपयोजक in तंत्रजगत
8 Sep 2017 - 1:12 pm

अनेक मिपाकरांनी विचारणा केल्यामुळे या धाग्यावर माहिती देत आहे.

मिळून मिसळून हा फक्त मिपाकरांचा WhatsApp समुह बनवला आहे.(आधी हा समुह टेलिग्रामवर होता.पण सर्वांच्या सोयीसाठी टेलिग्रामवरुन बंद करुन तो WhatsApp वर सुरु केला आहे.

समुहाचे उद्देश:

१] सर्व नव्या-जुन्या मिपाकरांना एकत्र येता यावं,चांगल्या चर्चा व्हाव्यात,विषय मिपावर चर्चा करण्यायोग्य असेल तर धागा काढला जावा,धाग्याच्या लेखनासंबंधी मार्गदर्शन मिळून तो वाचनीय व्हावा.नवीन लेखकांना लेखनासाठी मार्गदर्शन मिळावं हा समुहाचा उद्देश आहे.

२] राजकारण हा विषय वगळता अन्य विषयांवर चर्चा होणे,माहिती मिळणे हे अपेक्षित आहे.

आता कळीचा मुद्दा:

असे WhatsApp ग्रुप बनवल्याने सगळे तिथेच बोलतील.इथे लिहिण्यात कोणाला स्वारस्य उरणार नाही.हे समांतर मिपा कशासाठी?असं कोणाला वाटू शकतं

तर यावर सांगणं एवढंच की WhatsApp मुळे इथे कोणी बोलणारच नाही वगैरे तसं काही होत नाही.कारण याच ग्रुपातल्या चर्चांवर आधारीत असे धागे इथे मिपावरच काढलेले आहेत.तसा संदर्भही त्या त्या वेळी दिला आहे.
समुहामुळे मिपावरील लेखनाला मदतच होईल अशी भुमिका आहे.

हे काही समांतर मिपा नव्हे.तसा उद्देशही नाही.मिपाची व्याप्ती आणि WhatsApp समुहाची व्याप्ती यात गल्लत करु नये.
समुह सर्व मिपाकर स्त्री-पुरुष सदस्यांसाठी खुला आहे.

डिस्क्लेमर: या समुहाचा आणि www.misalpav.com या संकेतस्थळाचा अधिकृतरित्या कोणताही संबंध नाही.किंवा हा www.misalpav.com चा अधिकृत WhatsApp समुह नाही.केवळ मिपाकरांना काही उद्देशांसाठी एकत्र येता यावं यासाठी या समुहाची निर्मिती केली आहे.

सामील होऊ इच्छिणार्‍यांनी व्यनि करावा ही विनंती!

धन्यवाद!!!!