अजून एक हत्या , अजून एक संधी !!

जीएस's picture
जीएस in जनातलं, मनातलं
7 Sep 2017 - 7:01 pm

पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. आज स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनीही भारतात माणसाच्या जीवाला काहीच किंमत नाही, बळी तो कान पिळी हाच कायदा आहे, कुणाच्या शेपटावर कधी पाय पडेल व आपण जीव गमावून बसू अशा समाजात व व्यवस्थेत आपण राहतो याची पुन्हा एकदा भयप्रद जाणीव करून देणारी ही अतिशय निषेधार्ह हत्या आहे.

(१) प्रत्यक्षात व सोशलसह सर्व माध्यमातूनही अराजकीय, उजव्या, मध्यममार्गी, डाव्या अशा सर्व लोकांनी या हत्येचा निषेध केला आहे.
(२) गेल्या तीन-चार वर्षात बावीस पत्रकारांची हत्या झाली आहे. कर्नाटकाचा विचार करायचा झाला तर गेल्या दोन वर्षात कलबुर्गी व आता लंकेश या दोन डाव्या तर उजव्या विचारसरणीच्या १२ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत.
(३) इतर अनेक हत्यांप्रमाणेच याहीवेळी मारेकरी पकडले जाणे , कायदा व सुव्यवस्था सुधारणे वगैरे बाबींची निष्फळ उजळणीही होईल.
(४) पण यावेळी हत्या डाव्या व्यक्तीची झाल्याने देशभरात कशी जबरदस्त उजवी असहिष्णुता थैमान घालते आहे , मोदीविरोधात एक शब्दही बोललात की पडलाच मुडदा अशी परिस्थेती आहे वगैरे तुफानी प्रचारकार्य करायची नामी संधी आपल्या साथींसाठी चालून आली आहे.
(५) या संधीचा मेणबत्या मोर्चे, माध्यमे, सोशल माध्यमे, संकेतस्थळे यावर त्वरित लेख व प्रतिसाद पाडून लाभ घ्यावा ही विनंती.

या संदर्भात काही महत्वाच्या सूचना.
(०) साथींनो, आपल्यासमोर संघ व मोदी हेच दोन भीषण प्रश्न आहेत त्यामुळे ते सोडवण्यासाठी सत्य, देशहित, समाजहित, योग्यायोग्य... कुठल्याही मूल्यांचा बळी द्यायला लागला तरी ते आवश्यक आहे.

(१) लंकेश उजव्याविरोधी होत्या एवढेच लिहावे. त्या नक्षलवाद्यांशी संबंधित होत्या, त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या मालकीचे प्रकाशन त्यांना सोडावे लागले. हे लपवावे. तसेच सध्या त्या सरकारला काही नक्षलवाद्यांच्या माफी/पुनर्वसनासाठी मदत करत होत्या त्यामुळे डाव्या चळवळीत त्यांना शत्रू निर्माण झाले असू शकतात हे नजरेआड करावे. असा खोटेपणा करणे मनाला न पटल्यास सूचना क्र. ० तीनदा वाचणे.

(२) संघ, भाजप वगैरे समस्त उजव्यामधील सर्व पातळीच्या हजारो नेत्या कार्यकर्त्यांनी हत्येचा निषेध केला आहे याकडे दुर्लक्ष करावे व माचोमॅनइनझांबिया या फेसबुकवरील सुमारे सव्वातीन फ्रेंडस असणार्‍या प्रोफाईलची सेलिब्रेशन ची प्रतिक्रिया ही सर्व उजव्यांची प्रतिक्रिया आहे असे मानावे. असे प्रोफाईल न सापडल्यास तयार करावे व स्क्रीनशॉट पाठवावे. असे करणे पटत नाही ? सूचना क्र. ० तीनदा वाचा.

(३) एकदा ही तयारी झाली की ही हत्या हिंदुत्वावाद्यांनीच केली आहे. देशभरात कशी जबरदस्त उजवी असहिष्णुता थैमान घालते आहे , मोदीविरोधात एक शब्दही बोललात की पडलाच मुडदा अशी परिस्थेती आहे वैग्रे तुफानी प्रचार करणारे लेख लिहावेत. सहिष्णुता, अभिव्यक्तीस्वातंत्र्य वैग्रे मूल्यांचा असा स्ट्रॉमॅन तयार करावा की नक्की कोण , किती व का मारले जात आहेत, खरा प्रश्न काय आहे याकडे लोकांचे लक्षच जाणार नाही.

(४) वेळ ही अतिशय महत्वाची आहे. तपास सुरू होउन अधिकृत संशयित कोण आहेत हे कळायच्या आत हा सगळा धुरळा उडवून देणे आवश्यक आहे. म्हणजे नंतर निष्पन्न काहीही झाले तरी हे असहिष्णुता वगैरे लोकांच्या डोक्यात फिट्ट बसते. न पटल्यास.....

(५) साधारणतः श्री. राहुल गांधींएवढा नैसर्गिक आयक्यू असणारे काही साथी राज्य सरकारला जाब विचारत आहेत. पुन्हा पुन्हा आपल्या या साथींच्या चुका होत असल्याने हे सांगणे आवश्यक आहे की या वेळी राज्य सरकारचा राजीनामा मागू नये तर मोदींचा मागावा. खालील कोष्टक पाठ करावे.
_______________________________________________________________________________________
हत्येचे राज्य >>>> राजीनामा कोणाचा मागावा?
_______________________________________________________________________________________
कर्नाटक, केरळ, बंगाल, पंजाब, त्रिपुरा, तेलंगण, दिल्ली >>>> केंद्र सरकार _______________________________________________________________________________________
इतर सर्व राज्ये >>>> राज्य सरकार व केंद्र सरकार
________________________________________________________________________________________

(६) जरी आपल्याला कोणालाच त्या माहित नव्हत्या तरी हत्या झाली असल्याने त्या अतिशय प्रसिद्ध थोर विचारवंत व उजव्या सरकारला सर्वात मोठा धोका होत्या हे मनावर बिंबवणे आवश्यक आहे ( आधी आपल्या मग इतरांच्या). त्या एक भुरट्या पत्रकार असून भाजप नेत्याच्या खोट्या बदनामीच्या अरोपाखाली सहा महिन्याची शिक्षा झालेल्या convicted criminal आहेत हे लपवणे आवश्यक आहे. नाही तर उजवे त्यांचा विरोध कायदेशीर मार्गाने यशस्वीरित्या करत होते हे उघड होऊन हत्येच्या मोटिव्ह बद्दलच शंका निर्माण होईल. असे करणे न पटल्यास सूचना क्रमांक शून्य वाचणे.

(७) सर्वात महत्वाचे : "देशभरात जबरदस्त उजवी असहिष्णुता थैमान घालते आहे , मोदीविरोधात एक शब्दही बोललात की पडलाच मुडदा अशी परिस्थेती आहे " हा आपला प्रचार आहे, कृपया तेच खरे मानून आपले लेख प्रसिद्ध करायला घाबरू नये. हजारो साथी रोज लाखो लेखातून मोदी व संघावर अक्षरशः आग ओकत आहेत. त्यातले कोणीही मरत नाहीत, संघ दुर्लक्ष करतो, तर काही जणांना भक्त जास्तीत जास्त काय करतात तर अधून मधून ट्रोल करतात. तेंव्हा न घाबरता "देशभरात जबरदस्त उजवी असहिष्णुता थैमान घालते आहे , मोदीविरोधात एक शब्दही बोललात की पडलाच मुडदा अशी परिस्थेती आहे " हे सगळीकडे पसरवण्याच्या या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

7 Sep 2017 - 7:12 pm | श्रीगुरुजी

अगदी चपखल लेखन! बैलाक्षाचा अचूक वेध घेतला आहे.

जेम्स वांड's picture

7 Sep 2017 - 7:35 pm | जेम्स वांड

बैलासारख्या मुक्या प्राण्याच्या डोळ्याचा वेध आपल्या तर्कलौल्याचा आनंद घेतल्याचे सूचित करण्यासाठी व्यक्त करणाऱ्या श्रीगुरुजींचा तीव्र निषेध :D:D:D:D:D

(कृपया चेष्टेत घ्या ही विनंती)

ट्रेड मार्क's picture

7 Sep 2017 - 8:18 pm | ट्रेड मार्क

अगदी मुळावरच घाव घातल्यामुळे या लेखावर १० पेक्षा जास्त प्रतिक्रिया येण्याची शक्यता नाही. आल्याच काही प्रतिक्रिया तर विषयाला धरून नसतील.

मंदार कात्रे's picture

7 Sep 2017 - 8:35 pm | मंदार कात्रे

+१२३४५६७८९०

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Sep 2017 - 7:40 pm | अमरेंद्र बाहुबली

मस्त लेखन!जरी आपल्याला कोणालाच त्या माहित नव्हत्या तरी हत्या झाली असल्याने त्या अतिशय प्रसिद्ध थोर विचारवंत व उजव्या सरकारला सर्वात मोठा धोका होत्या हे मनावर बिंबवणे आवश्यक आहे ( आधी आपल्या मग इतरांच्या). त्या एक भुरट्या पत्रकार असून भाजप नेत्याच्या खोट्या बदनामीच्या अरोपाखाली सहा महिन्याची शिक्षा झालेल्या convicted criminal आहेत हे लपवणे आवश्यक आहे. नाही तर उजवे त्यांचा विरोध कायदेशीर मार्गाने यशस्वीरित्या करत होते हे उघड होऊन हत्येच्या मोटिव्ह बद्दलच शंका निर्माण होईल. :)

जयंत कुलकर्णी's picture

7 Sep 2017 - 8:37 pm | जयंत कुलकर्णी

हा लेख राहूल गांधींना वाचायला दिला तर ते खरंच त्यांच्या अनुयायांना फॉरवर्ड करतील :-)

सोमनाथ खांदवे's picture

7 Sep 2017 - 9:16 pm | सोमनाथ खांदवे

सगळे प्यपर वाले दोन दोन पान भरून छापत हायेत लंकेश बद्दल , वातावरण निर्मिती जोरात चालू हाये .

हतोळकरांचा प्रसाद's picture

7 Sep 2017 - 9:27 pm | हतोळकरांचा प्रसाद

लिखाण जोरात आहे. लोल लोल गोल गोल बोल बोल वर व्वाव्वा करणारे इकडे फिरकणार नाहीत.

जानु's picture

7 Sep 2017 - 10:41 pm | जानु

+१

सचिन७३८'s picture

7 Sep 2017 - 11:15 pm | सचिन७३८

सेक्युलर्स ????
छे, हे तर फेक्युलर्स !!!!

सचिन७३८'s picture

7 Sep 2017 - 11:15 pm | सचिन७३८

सेक्युलर्स ????
छे, हे तर फेक्युलर्स !!!!

थिटे मास्तर's picture

7 Sep 2017 - 11:15 pm | थिटे मास्तर

हा लेख राहूल गांधींना वाचायला दिला तर ते खरंच त्यांच्या अनुयायांना फॉरवर्ड करतील :-)
नाहि काका ते ह्याचा Twitter वर वापर करतील. काल पार्वति शि तुलना करुन ऊधारीची कविता छापुन झाली आहे.

पगलैट (आणि फिर्यादि) सुन बे.
राजमान्य राजश्रि महाविद्वान थोर नेते राहुल गांधि ह्याना जर कोणि कडेवर ऊचलुन धरून पंतप्रधानाच्या खुर्चिवर बसवु शकतो तर ति व्यक्ति आहे नरेंद्र मोदि, आणखि कोणी आई चा लाल 2019 पर्यंत तरी दिसत नाहि.
म्हणजे काय ?
कळाले नसल्यास विचारू शकता.

गौरी लंकेश करता RIP पहिलेहि बोल्लो पन बाय भुरटि पत्रकार व्हती म्हाईत नव्हत.

विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे. आपल्या मताव्यतिरिक्त मते असू शकतात आणि विरोधी मतांचाही आदर केला गेला पाहिजे या सहिष्णुतेचा विसर हल्ली पडत चालला आहे. एक किस्सा पं. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असतानाचा आहे. एक ज्येष्ठ विरोधी सदस्य (नाव विसरलो) हे नेहमी सरकारच्या धोरणांतल्या चुका दाखवून देत व सरकारवर अभ्यासपूर्ण टीका करत. त्यांना उद्देशून पं. नेहरूंनी 'यू आर माय बेस्ट एनिमि' असे काहीसे म्हटले. हे सदस्य तात्काळ उद्गारले, 'आय एम युअर ऑप्पोनंट, सर, नॉट युअर एनिमि!' पं. नेहरूंनीही त्यांची चूक दिलखुलासपणे मान्य केली.

"विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे. " 100% सहमत. परंतू दुर्दैवाने हेच तत्वज्ञान कलबुर्गि व गौरी या दोन हत्यांच्या दरम्यान कर्नाटकामधेच झालेल्या 12 संघ व भाजप कार्यकर्त्यांच्या हत्यांच्यावेळी, केरळ मधे सर्रासपणे चालू असलेल्या हत्यांच्यावेळी मांडायचे कोणाला सुचत नाही. तसेच केल्या गेलेल्या हत्यांच्या आकडेवारी वरून सहज लक्षात येवू शकते की कोणामधे आपल्या मताव्यतिरिक्त दुसर्यांच्या मतांचा आदर करण्याची प्रवृत्ती जास्त आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Sep 2017 - 12:06 am | अमरेंद्र बाहुबली

मामाजींशी सहमत! :-)

पिलीयन रायडर's picture

7 Sep 2017 - 11:46 pm | पिलीयन रायडर

लेख खरंच आवडला. सगळे मुद्दे पटले. हत्या झाली त्या पत्रकारबाईंसाठी हळहळ वाटली पण त्याचा सोशल मिडीयावर फार जास्त दंगा करुन ठेवलाय असं वाटतं. श्रीगुरुजींच्या प्रतिसादात त्यांना तुरुंगातही जावे लागले होते हे वाचल्यावर तर कशावरुन ही हत्या मोदींना सपोर्ट करणार्‍या कुणी केली आहे असे वाटले.

बरं अजुन एक म्हणजे "सोबतीची खात्री" नावाचे एक नवे फेसबुक पेज सुरु झाले आहे. ते स्त्रियांच्या समर्थनार्थ आहे. त्यावरही एका बोलणार्‍या स्त्रीला संपवलंय अशा अर्थाची पोस्ट आली. म्हणजे ह्यात फेमिनिझमही आला. पण मुळात ही हत्या ती व्यक्ति "बाई" होती म्हणून झाली आहे का? दु:ख व्यक्त करणे समजु शकते. पण उगाच एक नवं वळण दिलं विषयाला असं वाटलं.

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Sep 2017 - 11:46 pm | अमरेंद्र बाहुबली

हत्या कुठे झाली:-कर्नाटक मधे
तिथे सत्ता कोणाची:-काँग्रेस
दोषी कोण:-मोदी
चप्पल कुठय माझी...
इतका कड़क गांजा नका फुकू रे....

थिटे मास्तर's picture

8 Sep 2017 - 12:13 am | थिटे मास्तर

पण मुळात ही हत्या ती व्यक्ति "बाई" होती म्हणून झाली आहे का?
हे लॉजिक तर दाभोलकरांपासुन ते लंकेश पर्यंत हत्ये चा संबध जोडणारे, वेपन, फॉरेसिंक, बँलिस्टिक etc. Expert ह्यांच्या तोंडाला फेस आणेल.

थिटे मास्तर's picture

8 Sep 2017 - 12:18 am | थिटे मास्तर

एकाला तर ह्यात फेमिनिझम आहे हे वाचुनच फेफर् आलय. ;)
मेथी च्या बिया नाहि टाकायच्या आहेत ओल्या मातित :)

थिटे मास्तर's picture

8 Sep 2017 - 12:30 am | थिटे मास्तर

हे असले """एका बोलणार्‍या स्त्रीला संपवलंय """" फेमिनिझम"""""
असल काहि शेरलॉक ने ऐकल असत तर तो खरच Irene Adler चे स्वप्न पाहणे सोडुन बेडरूम मध्ये ऊसाचि किंवा बांबु किंवा गेला बाजार निलगीरी ची शेती कशी करता येईल हे शोधत बसला असता.

(८) संघ स्वयंसेवकांच्या व काश्मिरी हिंदूंच्या हत्या विसाराव्यात. जणू ही माणसेच नव्हेत.

(९) एक कुतिया कुत्तेकी मौत क्या मरी सारे पिल्ले एक सूरमें बिलबिला रहें हैं. हे प्राणीजगतातलं चिरंतन सत्य आहे हे सोयीस्कररीत्या विसरून जावे. कोण्या प्राण्याचं प्रेत पडलं की कावळे हर्षोल्हासात कावकाव करणारंच.

http://images.jansatta.com/2017/09/ae73cdd2.jpg

-गा.पै.

हे ट्वीट आणि मृत व्यक्तीविषयी अशी भाषा निषेधार्ह आहे.

गामा पैलवान's picture

8 Sep 2017 - 12:27 pm | गामा पैलवान

मोदक,

कुत्री काढून त्याजागी नक्षली हा शब्द टाका. अर्थ तोच राहतो.

आ.न.,
-गा.पै.

थिटे मास्तर's picture

8 Sep 2017 - 2:11 am | थिटे मास्तर

हे सनातन वाले बाष्कळ बडबड करुनच अडकले आहेत, फालतु किलबिलाट करुन आणखी गोत्यात जातायत. मरो.
ईतकी परफेक्ट रेकी, ईतक परफेक्ट किलिंग ह्या बावळटांच काम असुच शकत नाहि.

गामा पैलवान's picture

8 Sep 2017 - 12:38 pm | गामा पैलवान

थिटे मास्तर,

शाळेतले मास्तर दिसताय. सदैव बालकांच्या संगतीत राहून बाळबोध विधानं करायची सवय लागलेली दिसतेय.

सनातनवाल्यांना वेगळ्या कारणासाठी अडकवण्यात आलं आहे.

आ.न.,
-गा.पै.

थिटे मास्तर's picture

8 Sep 2017 - 1:09 pm | थिटे मास्तर

तुम्हाला सांगुन ऊपयोग नाहि. डोळे आणि ग्यानचक्षु सुध्दा सताड ऊघडेच असतात आमचे म्हणुनच आजपर्यंत आमचा ब्रेनवॉश करू नाहि शकल हो कोणि त्यामुळे विचारसरणि सदोष आणि एकांगी होण्यापासुन वाचलो. धर्ममार्तंडांचि दुकाने टाळत आलो पण लांबुन भोळ्या भाबड्या मुर्खाना ते कसे बनवतात ह्याची मजा देखिल घेतलिय. ईस्लाम असो कि हिंदु हे धर्ममार्तंड माणसाला कट्टर बनवु शकतात. पण ज्या खुनांच्या बाबतित ईथे चर्चा चाललिय ते फार प्रिसाईजलि, प्लँनिंग करून, परफेक्ट रेकि करून करण्यात आलेय. शॉट सुध्दा जे घेण्यात आलेय ते सुध्दा फँटल होते. ह्याला एक प्रोफेशनलिझम लागत हो.
नुसते धर्म डोक्यात घालुन धुमसणारे लोक हे नाहि करु शकत. And that's why I called it ह्या बावळटांच हे काम असण शक्य नाहि. किती लोक अरेस्ट झालेयत सनातन चे आतापर्यंत ? वर्ष वर्ष झोडपुन काय माहिती मिळलिय ? Have seized the murder weapon ? Bike ? Phone ?

जाऊद्या पैलवान तुम्हि कँलेंडर लावा मंदिरात समई कशी लावावी, टिळा कसा लावावा ह्याचे बौध्दिक घ्या साधकांचे ;)

तुम्ही दोघेही एकच मुद्दा मांडत आहात.

गामा पैलवान's picture

8 Sep 2017 - 2:19 pm | गामा पैलवान

मोदक,

अहो, तेच तर सांगतोय मी. सनातनच्या लोकांना ज्या कारणासाठी अडकवण्यातआलंय ते कारण 'बाष्कळ बडबड' नव्हे. मुद्दा एकंच मांडत असले, तरी थिटे मास्तरांचं मत वेगळं आहे. याला कोण काय करणार!

आ.न.,
-गा.पै.

थिटे मास्तर's picture

8 Sep 2017 - 2:18 am | थिटे मास्तर

No doubt its a complete professional job, even don't like rowdy underworld. Very nimble and very smart. Just like the people who trained in ," kill and vanish in the thin air ""

रमेश आठवले's picture

8 Sep 2017 - 5:30 am | रमेश आठवले

या दिवंगत बाई जे एन यू च्या कन्हैयाकुमारला आपला मानसपुत्र मानत होत्या. तरीही कर्नाटक सरकारने त्यांच्या राजकीय अंत्यविधीला सरकारी पाहुणा म्हणून त्याला का बोलावले नाही हे समजले नाही.

सोमनाथ खांदवे's picture

8 Sep 2017 - 5:07 pm | सोमनाथ खांदवे

आठवले साहेब , बरोबर बोललात कन्हैया सारख्या माजोर्डया ला व्यक्तिस्वातन्त्र्य जरा ज्यास्तच उपभोगु दिल जाते .

गामा पैलवान's picture

8 Sep 2017 - 2:23 pm | गामा पैलवान

थिटे मास्तर,

जाऊद्या पैलवान तुम्हि कँलेंडर लावा मंदिरात समई कशी लावावी, टिळा कसा लावावा ह्याचे बौध्दिक घ्या साधकांचे ;)

अगदी बरोबर बोललात पहा. या बारीकसारीक गोष्टीच हिंदूंना शिकवायच्या आहेत. अशा बारीकसारीक गोष्टींतूनच देव भक्तांवर प्रसन्न होतो. आणि वीसेक वर्षांत दोनतीनशे पुस्तकांच्या पन्नाससाठ लाख प्रतींची विक्री घडवून आणतो.

आ.न.,
गा.पै.

नाखु's picture

8 Sep 2017 - 11:07 pm | नाखु

लेख आल्यावर मिपाची सहिष्णुता धोक्यात आली आहे का? त्याकरिता अनुक्रमे मोदी-फडणवीस यांना गोत्यात आणायच्या काही शक्यता आहेत का?

डावे करत असलेले उफराटे बोभाटे प्रेक्षक नाखु

भंकस बाबा's picture

8 Sep 2017 - 11:34 pm | भंकस बाबा

जुनी दारू नवीन बाटलीत ठेवल्यासारखे का वाटत आहेत?
जाणकारांनी आयडीचा माग काढावा.

थिटे मास्तर's picture

8 Sep 2017 - 11:44 pm | थिटे मास्तर

काढा कि आन आम्हाला बि कळवा पाव्हन ;)

टर्मीनेटर's picture

9 Sep 2017 - 11:41 pm | टर्मीनेटर

जबरदस्त लेख आणि (काही व्यक्तिगत पातळीवरचे सोडून) चांगले प्रतिसाद सुद्धा.
थिटे मास्तरांच्या प्रतिसादातील ज्या खुनांच्या बाबतित ईथे चर्चा चाललिय ते फार प्रिसाईजलि, प्लँनिंग करून, परफेक्ट रेकि करून करण्यात आलेय. शॉट सुध्दा जे घेण्यात आलेय ते सुध्दा फँटल होते. ह्याला एक प्रोफेशनलिझम लागत हो. ह्या वाक्याशी सहमत. दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे आणि आता ह्या बाई...ज्या पद्धतीने ह्या हत्या झालेल्या आहेत त्यात जबरदस्त प्रोफेशनलिझम आहे. सुपारीबाज गुंड पुंड लोकांचं हे काम नक्कीच नसून कुठल्यातरी इंटेलिजन्स एजन्सीचा ह्यात हात असावा असा संशय घ्यायला भरपूर वाव आहे. अर्थात हि शक्यता गृहीत धरली तर तो एका नवीन धाग्याचा विषय होऊ शकतो.

या बाई एवढ्या मोठ्या पत्रकार होत्या का, त्यांना मारायला गुप्तचर यंत्रणा वापरवी लागली?

जेम्स वांड's picture

10 Sep 2017 - 2:28 pm | जेम्स वांड

भारतीय गुप्तहेर संघटना, त्यांचे कार्य, कार्यशैली, कार्यसनद (चार्टर ऑफ ड्युटी) , त्यांची हापिसे वगैरे माहिती असेल?

मला तरी माहिती नाही, म्हणून मी थेट त्यांच्याच धोतराला हात घालायलाही धजत नाही. चालायचंच.

या काही एवढ्या मोठ्या पत्रकार नव्हत्या, बहुतांश लोकांना तर त्यांचा खून झाल्यावर माहित झालेत(मलातरी). पत्रकार होत्या म्हणजे काही स्थानिक दुष्मनी पण असू शकते की.

विवेकपटाईत's picture

10 Sep 2017 - 11:20 am | विवेकपटाईत

जे लोक पैश्यासाठी इमान विकतात. देशविरोधी (नक्षली इत्यादी) पैश्यावर ऐश करतात, समाजात पुरोगामी म्हणून प्रसिद्धी मिळवितात. पण नुसतेच पैसे घेऊन हि दिलेले कार्य व्यवस्थित कार्य न करणार्याला दंड हा मिळतोच. ते शेवटी याच भस्मासुरांच्या हातून मारले जातात. हा आपल्या देशाचा इतिहास आहे. (मी देशातील सुरक्षा व्यवस्थेच्या उच्चतम अधिकार्यांचा सोबत कार्य केले आहे, त्या अनुभवावरून)

अगदी हेच सेम मत माझं आजकालच्या तथाकथित बाबे, बुआ महाराज ह्यांच्याही विषयी आहे, डाव्यांइतकी ही जमात देखील ऐतखाऊ पुंड अन देशविरोधी आहेच. आता तुम्ही सुरक्षा व्यवस्थेतल्या उच्चतम अधिकाऱ्यांसोबत काम केलेच आहे तर तुम्ही तांत्रिक चांद्रस्वामी ते इतर बाबे अन इतर धर्मातलेही बुखारी ,बिशप वगैरेंची नीचपातळी पाहिलीच असेल नाही?

मराठी कथालेखक's picture

10 Sep 2017 - 2:16 pm | मराठी कथालेखक

हत्येच्या घटनेचं राजकारणं होवू नये हे मान्यचं ..पण हत्येचं समर्थनही होवू नये.

सुबोध खरे's picture

11 Sep 2017 - 8:23 pm | सुबोध खरे

हे हत्येचे समर्थन नसून हत्येच्या बाबत मांडलेली वस्तुस्थिती आहे.
जेवढ्या राजकारणी लोकांनी/ देशांनी दहशतवाद, अतिरेकी, मूलतत्त्ववाद नक्सलवादाचा आश्रय घेतला त्या सर्वांवर हा भस्मासुर उलटलेलाच दिसतो. यात अमेरिका, रशिया, पाकिस्तान सारखे देशहि येतात किंवा आपल्याच देशातील इंदिरा, गांधी राजीव गांधी यांसारखे राजकारणीही येतात.

मला वाटतं तुम्ही म्हणताय ते अगदी रास्त आहे, हत्येचं समर्थन नसून वस्तुस्थिती मांडलेली आहे/ मांडली जाते, समाजमाध्यमांनी दिलेली सामान्यजनांची ताकद आहे ती.

मला वाटतं हे वस्तुस्थिती मांडणे जर शांतपणे, संयत, संसदीय शब्दात मांडले गेले तर त्याचीच धार वाढेल. दधीच ह्यांच्या ट्विट मध्ये असलेली कुत्री, कुत्रीची पोरे वगैरे शब्दरचना, आपला पक्ष बरोबर किंवा लोकशाहीत परमपवित्र असलेलं लोकमत असलं तरी अश्या शब्दांनी मलीन होऊ शकतं ह्याची आपल्याला एक जबाबदार राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून कल्पना असलेली बरी.

डावे, पुरोगामी आत्ता आत्ता मरू लागले आहेत. या आधी यांना नुसते बोलले तरी भयंकर कांगावा होई. तेच शामाप्रसाद आणि दिनदयाल हे सर्वोच्च नेते असून कसे मेले काही पत्ता नाही. अखलाख पूर्वी त्याच्च पश्निम उ प्र मधे एकूण ६-८ भाजपचे नेते मारले गेले होते. त्याचा कोणाला पत्ता नव्हता.
=================
राजकीय मृत्यू कसे टाळावेत? आणि टळत नसले तर सर्वच मृत्यूंना समान महत्त्व कसे द्यावे? (डावे कमी असतात आणि त्यांच्यापैकी कोणी गचकला तर त्या विचारसरणीची फार वाणवा होइल या सुरात कांगावा होत असतो. वास्तवात फक्त डावे, पुरोगामी गेले तरच दखल घेतली जाते. उदा, एका साधुने गंगा शुद्धिकरणासाठी उपोषण करून प्राण दिले. त्याच्या मागण्यांची वा त्याची सरकारने दखल घेतली नाही. http://indiatoday.intoday.in/story/swami-nigamanand-dies-after-115-day-f...
दाभोलकरांपासून जी यादी चालू होते ती या माणसापासून का नाही? हा सरकारी खून नव्हे का? पण तो साधु असल्यानं त्याचं गंगेवरचं प्रेम हे पुरोगामी नसणार.
=====================
गौरि लंकेश एक अत्यंत मेडिऑकर पत्रकार होती. तिच्या अनेक ट्वीट "घाण" या सदरात मोडतात. संघाचे लोक एकतर बलात्काराचे फल वा वेश्यचे पूत्र आहेत (हे दोनच आहेत) असे ती म्हणते. अख्खा पूर्वोत्तर भारत भारतानं बळकावलाय म्हणणारी ही बया, तिचं कशामुळं २१ तोफांनी कौतुक करावं? आणि एरवीही का? पण हे काँग्रेसी डाव्यांना, पुरोगाम्यांना टरकून असतात. दाभोळकर गेले आणि अक्षरशः एन आर आय भेटी आटोपतात तसा १५ वर्षे लटकावलेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आठवड्यात पास केला.
==============================
डावा वा पुरोगामी बुद्धिमाना मनुष्य भारतीय राजकारणात कमी नसूनआवश्यकतेपेक्क्षा खूप जास्त आहे. याविरुद्ध उजव्या बाजूला प्रसिद्ध, पदस्थ, अनुभवी, अभ्यस्त लोकांची भयंकर वाणवा आहे. सोशल मिडिया संतुलित आहे, पण अन्यत्र डावा: उजवा हे प्रमाण - ९५:५ असे असावे.
=============================
मेनस्ट्रिम इंग्रजी माध्यमांत उजव्या विचारांच्या लोकांना प्रस्थापित येउच देत नसणार असं वाटतं.

कोणताही पत्रकार मेला तर मला आनंदच होतो, पोलिस पत्रकार न्यायालय वकील समाजावरील बोजा आहेत. police is unavoidable evil. कायदा फक्त गरीबांना आहे,पैसेवाले तो खरेदी करतात.

गामा पैलवान's picture

14 Sep 2017 - 12:10 pm | गामा पैलवान

रामराम,

तुम्हाला इथे खरेखुरे, प्रामाणिक पत्रकार अभिप्रेत नसावेत.

आ.न.,
-गा.पै.