"पप्पूलीची पिन्नी - पिन्नीचा पप्पूली"

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
3 Sep 2017 - 2:38 pm

"पप्पूलीची पिन्नी - पिन्नीचा पप्पूली" हे ऐकायला वेगळ वाटत असल तरी थोडस वेगळ आहे. पप्पूली शिवाय पिन्नी अपूर्ण आहे का माहीत नाही पण पिन्नी शिवाय पप्पूली अगदीच अपूर्ण आहे. पिन्नी आणि पप्पूली चे नाते बाप-लेकाचे आहे कदाचित त्यापेक्षाही अधिक आहे. विठ्ठल कामतान्चे एक वाक्य आहे " अ चाईल्ड गिव्ज बर्थ टू अ मदर" त्याचेच थोडा बदल करून मी म्हणेन " अ चाईल्ड गिव्ज लाईफ टू अ फादर"

पप्पूली कधी कधी पिन्नीचा अभ्यास घेतो. अभ्यास करताना पिन्नी खुप गमतीदार दिसते. छोट्याश्या टेबलावर पूर्ण अन्ग झोकून देऊन अक्षर आकडे गिरवायला घेते. दोन अक्षर काढल्यावर हळूच पप्पूली कडे बघते. पिन्नी ला पाणि हव असत. आणि दोन अक्षर काढल्यावर मग अचानक शू ला होते. रेषा पूर्ण होई पर्यन्त तर पिन्नीचा डावा हात दूखायला लागतो. तो ती पप्पूली कडून अगदी खान्द्यापासून बोटापरयन्त दाबून घेते. मग हात दूखीचे लोण ऊजव्या हाता पासून डाव्या हाता पर्यन्त पसरते. मग डावा न-लिहीता हात दाबावा लागतो. हे होता होता दोन्ही पाय ही दुखायला लागतो. ते ही पिन्नी दाबून घेते. पप्पूली कडे चोर नजरेने बघत असताना पिन्नीच्या डोळ्यात " कस बनवल ? " म्हणणारा खट्याळपणा असतो. तो पप्पूलीला खुप आवडतो. आणि मग पप्पूलीही त्या खेळात पिन्नी बरोबर सामील होतो.

कधी तरी पप्पूलीचे पाय दूखतात मग तो पिन्नीकडून ते दूखणारे पाय दाबून घेतो. दोन तिनदा पाय दाबून पिन्नी पप्पूलीला विचारते " आता कस वाटतय?" पप्पूली म्हणतो अगदी मस्त वाटतय तुझ्या हातात जादू आहे मग पिन्नी अधिकच जोमाने पाय दाबून द्यायला लागते. थोड्यावेळाने परत विचारते " आता बरे दिसता ? " पप्पूलीने होय म्हटल्यावर पिन्नी म्हणते मग आता तुझे पाय दाबून हात दूखायला लागलेत चल आता माझे हात दाबून दे. पप्पूली ही हसत हसत पिन्नीचे हात दाबायला लागतो. हळूच पिन्नी कडे बघतो. पिन्नीच्या डोळ्यात ते नेहेमीचे ओळखीचे खट्याळ हसू असते.

कधी कधी पिन्नी पप्पूलीला जाम अडचणीत आणते. पप्पूली पिन्नीला शाळेत आळायला जातो. पिन्नीला पप्पूलीची मस्करी करायची लहर येते. ती म्हणते " काय हीरो तू आलास? " पप्पूली मनोमन सुखावतो त्याला अतोनात आनन्द होतो. आनन्दाचे वर्णन करायचे झालेच तर अगदी बघा उडप्याकडच्या साम्बार वाटीत शेवग्याच्या शेन्गे बरोबर जर आपल्याला चुकून वान्ग्याची/ कोहोळ्याची फोड मिळाल्यावर जेवढा आनन्द होईल तेवढा आनन्द पप्पूलीला होतो. पण एवढेच करून पिन्नी थाम्बत नाही. आपल्या सगळ्या मैत्रीणीना हा बघ मला हीरो मला न्यायला आलाय अशी माझी ओळख कर्रोन देते. पप्पूली लाजेने चूर होतो. पूढे जाऊन शाळेतल्या मावश्या, बाई, शिक्षीका सगळ्याना पिन्नी पप्पूलीची हीरो म्हणून ओळख करून देतो. सगळ्या हसतात. पप्पूलीला भूमिगत व्हावेसे वाटते. पण त्यातही अजूनही आपल्याला कुणाला हीरो म्हणावेसे वाटते ह्या कल्पनेने जीव सुखावतो.

कधी कधी सार्वजनीक ठीकाणी पिन्नीला पप्पूलीशी खेळायची हौस येते. मग " सन्त्र लिम्बू पैशा पैशाला" पासून आमची गाडी सुरू होते. वाटेत " आ मीना सुपर सिना क्रेझी बॉईज लेझी गर्ल्स" , " वी वी वी कभी उपर कभी निचे" अशी स्टेशन घेत ती पुढील गाण्यावर पोहोचते:

मेरे पप्पा तेरे पप्पा डॉक्टर डॉक्टर डॉक्टर (तपासण्याची नक्कल)
मेरी मम्मा तेरी मम्मा टीचर टीचर (लिहीण्याची नक्कल)
मेरा भाई तेरा भाई बॉक्सर बॉक्सर बॉक्सर (ठोसे मारण्याची नक्कल)
मेरी दिदी तेरी दिदी डान्सर डान्सर डान्सर (कम्बर हलवण्याची नक्कल )
मै और तू पागल पागल पागल (डोक्याला हात लावून आटा फिरल्याची नक्कल)

पब्लीक थबकून हसून हा खेळ पहात असता. पण पिन्नी आणि पप्पूलीला त्याच्याशी काही देण घेण नसत. ते दोघही वेड लागल्यासारख हसत सुटतात. त्यान्चे जग फक्त दोघान्चे असते त्यात अगदी कुणी म्हणजे कुणीच नसते.

पिन्नीला कृष्ण खुप आवडतो. अहोरात्र ती कृष्णाची आठवण काधत असते. तिला गोकुळेला जाउन कृष्ण बघायचा असतो. पप्पूलीही तिला कृष्ण दाखवणार म्हणून सान्गतो. मग ती कृष्णाची वेगवेगळी चित्र काढते- देवकी वसुदेवा बरोबरचा बालकृष्ण, बालकृष्णाला यमूना ओलान्डून गोकुळाला पोहोचवणारा वसुदेव (त्यात ती हमखास बालकृष्णाचे पाय यमूनेला लागून यमूनेचा पूर ओसरलेला दाखवते), यशोदा बलरामा बरोबर खेळणारा कृष्ण, कालिया मर्दन करणारा कृष्ण, अशी अनेक चित्र काढते. त्यामूळे पिन्नीला कृष्ण भेटेल का माहीत नाही पण पप्पूलीला मात्र त्या चित्रातून कृष्ण नक्के भेटतो. ती नविन नविन चित्र काढून आपल्या मैत्रीणीना भेट देते. मग पप्पूली अश्या वस्तू लोकाना वाटणारा त्याचा बाबा आठवतो आणि त्याला गलबलून येते.

पिन्नी आणिक पप्पूलीचे नाते खरोखरच खुप वेगळे आहे. पिन्नी कधी कधी " पप्पूली" अशी हाक मारते आणि पप्पूली सुद्धा अर्धवट झोपेत " ओ" म्हणून तिला साद देतो. मग ती हसते आणि पप्पूलीला झोपेत येऊन बिलगते. सुख सुख म्हणतात ते ह्यापेक्षा काही जास्त असूच शकत नाही.

मागे पप्पूली कडून पिन्नीचे काही फोटो चुकून डीलीट झाले. पप्पूली खुप हळहळला. पण मग त्याने विचार केला फोटो डीलीट झाले म्हणून काय झाले. पप्पूलीने पिन्न्नी बरोबर जगलेले हे जे सुरेख क्ष्ण आहेत ते कुणीही डीलीट करून शकणार नाही.

पिन्नी बरोबर पप्पूलीने जगलेले असे खुप खुप सुन्दर क्षण आहेत. जे पप्पूली हातात धरू शकत नाही पण प्रयत्न मात्र करतो मग सोडूनही देतो. कारण कधी कधी साबणाचे फुगे हे हातात घेऊन फुटण्यापेक्षा ते गालावर हातावर लागून तेथे टिकून रहाण्यातच जास्त आनन्द असतो.

केदार साखरदान्डे

(दिनान्कः ०१/०९/२०१७)

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

अतिशय तरल आणि मजेशीर लिहिलं आहे. बापलेकीचं नातं छान उतरवलंय शब्दांत.

अप्रतिम. इतके सुंदर नाते नेहमी लेकीशीच झालेले असते : ) फार क्वचित मुलगा आणि बाबाचे इतके गोडुले वर्णन वाचायला मिळते!

पैसा's picture

3 Sep 2017 - 5:28 pm | पैसा

कसलं मस्त लिहिलं आहेस! खूपच गोड!!

ज्योति अळवणी's picture

3 Sep 2017 - 6:22 pm | ज्योति अळवणी

मस्त मांडलंय एक हळुवार नात

यशोधरा's picture

3 Sep 2017 - 7:21 pm | यशोधरा

मस्त लिहिलंय!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2017 - 11:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

बाप-लेकीचे भावविश्व सहजतेनं उतरवलेले आहे ! इतके प्रत्यक्षदर्शी की, जणू सगळा लडिवाळपणा बाजूला उभे राहून आम्ही सगळ्यांनी पाहिला !

झेन's picture

4 Sep 2017 - 10:40 am | झेन

सगळ्त सुंदर नात्याचे अकृत्रिम सहजसुंदर चित्र

सुखीमाणूस's picture

4 Sep 2017 - 1:50 pm | सुखीमाणूस

लाडोबा लेक आणि मायाळू बाप यांच नात छान रंगवलय!!

आमच्याकडे नावं चेंज होत असतात .... "बाबुली" कधी बाबडू , दिदडू आणि बेबडू अस होतं :-)
जे पण काही दिदडू करते ते बेबडूला पाहिजे असते ... नाही तर मी मी मी मी असं सांगून ती बाबुली कडून करुन घेते :-)

दुसर्‍यांदा अनुभवतोय

कविता१९७८'s picture

4 Sep 2017 - 10:29 pm | कविता१९७८

खुपच छान भावुक नाते , वाचताना सर्व डोळ्यासमोरच घडतय असे वाटले इतकं छान लेखन

प्रीत-मोहर's picture

5 Sep 2017 - 9:58 am | प्रीत-मोहर

तुझी पिन्नी खरच गोडु आहे. ट्रेजर दीज मोमेंट्स!!

मूखदूर्बळ's picture

5 Sep 2017 - 10:34 pm | मूखदूर्बळ

Dhanyawaad

vcdatrange's picture

14 Sep 2017 - 5:27 pm | vcdatrange

आवडेश