महालक्ष्मी

मंगेश पंचाक्षरी's picture
मंगेश पंचाक्षरी in जनातलं, मनातलं
1 Sep 2017 - 12:31 pm

 मंगेश पंचाक्षरी, नासिक.
( गुरुवार, 31 ऑगस्ट 2017 रोजी महाराष्ट्र टाइम्सच्या पान क्र 4 वर प्रसिद्ध झालेला माझा लेख)

     एकेवर्षी मी एका महालक्ष्मी आरास स्पर्धेचा परीक्षक होतो. या निमित्ताने मला अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला. महालक्ष्मी बसवणे हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय उत्सव आहे. त्यास जातीपातीचे बंधन नाही. तरीही ब्राह्मणांमध्ये देशस्थ लोक मूर्ती बसवतात तर चित्पावन खड्याच्या गौरी बसवतात. मूर्तींमध्ये उभ्या, बसलेल्या, हाताच्या, बीनहाताच्या, पायाच्या, बीनपायाच्या अशा अनेक मूर्ती असतात. शिवाय रथात, कमळात (याचा भाजपशी काही संम्बंध नाही ), मखरात, पालखीत अश्या विविध आरासी बघावयास मिळतात. हल्ली त्या भोवती लायटिंग वगैरे केलेली असते.   
   
  याचे मूळ हे बायकांच्या स्वभावात दडलेले आहे.
लहान मुलगी असल्यापासून बाहुलीला सजवणे, नटवणे , तिचे लाड करणे हे स्त्रीयांचे  भावविश्व असते. काही बायकांना मुली नसतात. मग त्या लहान मुलानाच मुलीसारखे कपडे आणि केशभूषा करून हौस भागवत असतात.  फार लोभस वाटते ते . पुढे बायका मोठ्या झाल्या तरी ही भातुकलीची हौस कायम असते. गौरी किंवा लक्ष्मीच्या सणाला बायकांची हि हौस पूर्ण होत असते. शिवाय त्यामागे धार्मिक अधिष्टान असल्याने बायकांना हा सण हवाहवासा वाटतो. महालक्ष्मीस अगदी कोरी, घडी न  मोडलेली साडी नेसवणे, विविध आभूषणांनी मढवणे , दागिन्यांनी सजवणे, छोटे बाळ  ठेवणे, त्यांच्यापुढे करंज्या इत्यादी प्रसाद ठेवणे, इतर डेकोरेशन करणे यात रमून गेलेल्या, कितीही धावपळ होत असली तरीही उत्साहात हे सर्व साजऱ्या करणाऱ्या बायकांच्या चेहऱ्यावरील समाधान बघणे खूप आनंददायक असते.      

       काही गौरीना अक्षरश: शंभरहून अधिक वर्ष जुनी परंपरा असते. काही नवसाला पावतात अशी श्रद्धा असते. गौरी माहेरवाशीण असतात. त्या बायकांशी बोलतात. त्यांच्या शांत, सोज्वळ, पवित्र चेहऱ्यावर तेज देखील येते. बायका त्यांचेशी गुजगोष्टी करतात. ज्यांच्याकडे महालक्ष्मी नसतात त्या बायकांना आपणही घरी गौरी किंवा लक्ष्मी बसवाव्यात अशी आस लागते. काही गौरी वडिलोपार्जित आलेल्या असतात तर काही इतर नात्यातून आलेल्या असतात. घरातील पुरूष वर्गाकडे मूर्तींचे मुखवटे साफ करणे, त्यास पोलिश करणे, डेकोरेशन करणे, लायटिंग करणे, स्पोट लाईट लावणे, थर्माकोलचे देखावे उभारणे आणि साड्या, दागिने, मुखवटे सरळ - योग्य बसले आहेत कि नाही यावर अंतिम मत देणे अशी कामे येतात. घरातील बायकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून पुरुष मंडळी देखील ही कामे उत्साहाने करतात.               

       तीन दिवसातील गौरींचे येणे, जेवण, लगबग, हळदी कुंकू, आरत्या आणि सोबत गणपतीचे घरातील वास्तव्य यात वेळ कसा निघून जातो तेच समजत नाही. आणि मग तिसऱ्या दिवशी जेव्हा गौरी विसर्जन होते तेव्हा बायकांचे डोळे पाणावतात, घर सुनेसुने होते. गौरीदर्शन टीवीवर, सोशल मीडियावर घडवले जाते. यथावकाश बक्षिसे जाहीर केली जातात. प्रथम, द्वितीय वगैरे क्रमांक हे आरासीना/ देखाव्याना दिले जातात. प्रत्येक स्त्रीसाठी मात्र तिच्या गौरीच नंबर एक असतात कारण त्यात तिच्या 'भावना' असतात. त्या आता पुनः सासरी जाणार असतात. त्यांची पाठवणी करताना बायका हळव्या होतात. घरातले पुरुष शांतपणे बायकोला डोळ्यांच्या कडांतून न्याहाळत रहातात. एरवी कडकलक्ष्मी असलेल्या बायकोचं हे रूप बघून त्यांना मनोमन पटते कि विसर्जन आरासीचे, डेकोरेशनचे होते. खरी लक्ष्मी तर इथेच आहे.  'त्या' महालक्ष्मीच्या पाऊलखुणा 'गृहलक्ष्मी' च्या रुपात घरभर निरंतर वावरत रहातात. 

- मंगेश पंचाक्षरी, नासिक.
इमेल: mangeshp11@gmail.com

हे ठिकाणसंस्कृती

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

1 Sep 2017 - 1:09 pm | सिरुसेरि

लेख आवडला. +१००

एस's picture

1 Sep 2017 - 1:31 pm | एस

छान आहे लेख.

धर्मराजमुटके's picture

1 Sep 2017 - 1:31 pm | धर्मराजमुटके

लेख आवडला.

सतिश गावडे's picture

1 Sep 2017 - 2:36 pm | सतिश गावडे

लेख आवडला.

गुरुवार, 31 ऑगस्ट 2017 रोजी महाराष्ट्र टाइम्सच्या पान क्र 4 वर प्रसिद्ध झालेला माझा लेख

पान क्र 4 वर कोणत्या कोपऱ्यात? की कडेला? की मध्यभागी?

नाशिकच्या आवृत्तीत आला असेल

बाजीप्रभू's picture

1 Sep 2017 - 5:52 pm | बाजीप्रभू

-

बाजीप्रभू's picture

1 Sep 2017 - 3:32 pm | बाजीप्रभू

लेख आवडला.

पैसा's picture

1 Sep 2017 - 3:47 pm | पैसा

लेख आवडला

गम्मत-जम्मत's picture

1 Sep 2017 - 5:29 pm | गम्मत-जम्मत

छान लिहिलंय

संजय पाटिल's picture

1 Sep 2017 - 5:34 pm | संजय पाटिल

लेख आवडला...

गामा पैलवान's picture

1 Sep 2017 - 5:42 pm | गामा पैलवान

मंगेश पंचाक्षरी,

लेख चांगलाय म्हणून अगोदर लोकांनी मूल्यमापन केलंच आहे. मी काय वेगळं सांगणार!

आता, हीच बायकांच्या गुलामीची लक्षणं आहेत म्हणून स्त्रीवादी बोंबलंत येतील. तेंव्हा फक्त नाराज होऊ नका. त्यांना डिवचून मजा बघंत बसा. एव्हढंच सांगायला आलो होतो.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

1 Sep 2017 - 5:42 pm | गामा पैलवान

मंगेश पंचाक्षरी,

लेख चांगलाय म्हणून अगोदर लोकांनी मूल्यमापन केलंच आहे. मी काय वेगळं सांगणार!

आता, हीच बायकांच्या गुलामीची लक्षणं आहेत म्हणून स्त्रीवादी बोंबलंत येतील. तेंव्हा फक्त नाराज होऊ नका. त्यांना डिवचून मजा बघंत बसा. एव्हढंच सांगायला आलो होतो.

आ.न.,
-गा.पै.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2017 - 6:06 pm | अमरेंद्र बाहुबली

हा आवडला! खुप छान!

माम्लेदारचा पन्खा's picture

2 Sep 2017 - 11:01 pm | माम्लेदारचा पन्खा

जिंकलंत तुम्ही !