ताज्या घडामोडी : सप्टेंबर '१७

तुषार काळभोर's picture
तुषार काळभोर in काथ्याकूट
30 Aug 2017 - 8:14 am
गाभा: 

१) राज्याच्या बहुतेक भागाला पावसाने झोडपले असून, विशेषतः मुंबईत परिस्थिती चिंताजनकझाली आहे. पावसाचे पाणी ट्रॅकवर साठून राहिल्याने कित्येक तास लोकलसेवा बँड असल्याने तसेच पाणी साठलेल्या रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतूक कोलमडली होती.
आता पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती हळू हळू सुधारतेय.
२) डोकलाम प्रश्न तूर्तास सुटल्याचे दिसतेय. पंतप्रधानांच्या ब्रिक्स परिषदेसाठी चीन दौऱ्याआधी हे झालेय. मात्र भारत व चीनच्या बाजूने वेगवेगळ्या अर्थाच्या बातम्या आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांतसुद्धा याविषयी मतांतरे आहेत. दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेतल्याचे भारताने म्हटलेय, तर भारताने घुसवलेले सैन्य माघारी घेतल्याचे चीनने म्हटलेय.
अ) भारताने सैन्य मागे घेणे: भारतासहित सर्वजण असेच म्हणतात.
ब) चीनने सैन्य मागे घेणे: असे फक्त भारत म्हणतोय. काही ठिकाणी चीन तिथे गस्त सुरू ठेवणार असल्याच्या बातम्या आहेत.
क) डोकलाम प्रश्नाच्या मुळाशी असलेला चीनने बांधलेला रस्ता: चीन हे काम सोडून देणार की चालू ठेवणार, यावर कुठेच स्पष्टीकरण दिसले नाही.
BBC सहित बऱ्याच ठिकाणी डोकलाम प्रकरणी चीनचा विजय झालाय, अशा अर्थाच्या बातम्या आहेत.

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

20 Sep 2017 - 12:19 am | आनंदयात्री

धन्यवाद राघव. सरकार पेट्रोल पंपांचे जाळे वापरून चार्जिंग ग्रीड बनवणार किंवा कसे ते जाणण्याची उत्सुकता आहे. त्याबाबत काही वाचनात आले तर इथे नक्की येऊ द्या.

पैसा's picture

20 Sep 2017 - 10:00 am | पैसा

सगळे पेट्रोल डिझेल रिप्लेस करायला किती प्रमाणात वीज लागेल? इतकी वीज उपलब्ध होऊ शकेल का? बॅटरी हा खूप धोकादायक कचरा असेल. त्याची विल्हेवाट लावणे किती सोपे असेल?

जालावर जेवढं शोधलं त्यातून याचं उत्तर सध्यातरी नकारात्मकच आहे. अर्थात् हे सरकारलाही समजत असणारच.
पेट्रोल/डिझेल वर चालणारी वाहने आली तेव्हा त्यासाठीचे इन्फ्रा सर्वत्र नव्हतेच. जसजसा वापर वाढत गेला तसतसे इन्फ्रा तयार होत गेले. असेच आत्ताही व्हावे असे म्हणणे नसले तरी, साधारण दृष्टीकोन सकारात्मक ठेवून प्रयत्न झाले तर उत्तमच. वीज उत्पादनात वाढ होतेच आहे. काही वर्षात परिस्थिती बर्‍यापैकी सुधारेल असे म्हणण्यास वाव आहे.

मार्मिक गोडसे's picture

20 Sep 2017 - 10:38 am | मार्मिक गोडसे

भारताचा पेट्रोलियम इम्पोर्ट वर होणार खर्च ६० बिलियन डॉलर्सने कमी होईल.

बॅटरीवर चालणाऱ्या कार आणून इतका खर्च कमी होईल ह पटत नाही, कारण डिजेल व पेट्रोलच्या च्या एकूण वापरात कारचा हिस्सा अनुक्रमे अंदाजे 25% व 35%इतका आहे. 100% बॅटरी कार रस्त्यावर आल्या तरी दावा केली इतकी बचत होऊ शकत नाही.
बॅटरी तंत्रज्ञानाचा खर्च जोडला तर नोटाबंदी सारखी अवस्था होईल.

खरंय, पण ते फक्त कार नाही तर सर्व २, ३ व ४ व्हीलर वाहनांसाठी प्रयत्नरत आहेत.
सध्या ट्रांसपोर्ट सेक्टर मधे एकूण साठ्यापैकी ७०% डीझेल आणि ९९.६% पेट्रोल वापर होतो. त्यामुळे जर सर्वांसाठी बॅटरी तयार होऊ शकल्यात तर फायदा नक्कीच आहे. अर्थात् या सध्यातरी जर-तर च्या गोष्टी आहेत. आत्ताचे हे पहिले पाऊल म्हणता येईल.

राघव's picture

20 Sep 2017 - 11:49 am | राघव

खरंय, पण ते फक्त कार नाही तर सर्व २, ३ व ४ व्हीलर वाहनांसाठी प्रयत्नरत आहेत.
सध्या ट्रांसपोर्ट सेक्टर मधे एकूण साठ्यापैकी ७०% डीझेल आणि ९९.६% पेट्रोल वापर होतो. त्यामुळे जर सर्वांसाठी बॅटरी तयार होऊ शकल्यात तर फायदा नक्कीच आहे. अर्थात् या सध्यातरी जर-तर च्या गोष्टी आहेत. आत्ताचे हे पहिले पाऊल म्हणता येईल.

अभिजीत अवलिया's picture

22 Sep 2017 - 11:21 am | अभिजीत अवलिया

माजी मुख्यमंत्री नारायण राणे ह्यांनी अपेक्षेप्रमाणे काल काँग्रेसला रामराम केला. मुळात ते काँग्रेस सारख्या दरबारी राजकारण असणाऱ्या पक्षात १२ वर्षे कसे राहू शकले ह्याचेच मला जास्त आश्चर्य वाटते.
राजीनामा देताना नेहमीप्रमाणे मी काँग्रेस आणि शिवसेना रिकामी करणार अशी दर्पोक्ती केलीच आहे. शिवसेना सोडताना मी शिवसेना संपवणार असे विधान त्यांनी केले होते. पण प्रत्यक्षात तसे न होता उलट सेनेनेच रत्नागिरी जिल्ह्यात राणेंना धोबीपछाड देऊन आपले बस्तान पुन्हा बसवले आहे. तर २०१४ च्या निवडणुकीत राणेंना कुडाळ विधान सभा मतदार संघात आणि त्यांच्या ज्येष्ठ चिरंजीवांना रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात अस्मान दाखवले (लोकसभा निवडणुकीत मोदी फॅक्टर ची मदत झाली हे देखील खरे). आपल्याबरोबर शिवसेनेचे २५ आणि काँग्रेसचे १७ आमदार असून बऱ्याच जिल्यातील काँग्रेस पक्ष संघटना आपल्याबरोबर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इतकी ताकद राणे विरोधी पक्षनेते असताना देखील त्यांची होती असे वाटत नाही. काल पक्ष सोडताना देखील त्यांचे पुत्र निलेश राणे (कणकवलीचे आमदार) आणि समर्थक कालिदास कोळंबकर (वडाळाचे आमदार) त्यांच्या बरोबर न्हवते. ह्याचे कारण म्हणजे नारायण राणेंबरोबर उपस्थित राहिल्यास पक्षाने ह्या दोघांवर कारवाई केली असती. ती टाळण्यासाठी हे दोघेही अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्यासोबत किती जण येतील ह्याची शंका आहे. कालिदास कोळंबकर देखील येतील असे वाटत नाही.
राणेंची पुढची वाटचाल काय असणार ते लवकरच स्पष्ट होईल. पण समजा भाजपने त्यांना नाकारले तर त्यांचे आणि त्यांच्या पुत्रांचे राजकीय करियर संपल्यात जमा आहे.

पुंबा's picture

22 Sep 2017 - 11:33 am | पुंबा
अमितदादा's picture

23 Sep 2017 - 3:09 pm | अमितदादा

नक्सलवादाचा इतिहास आणि सध्य परिस्थिती यावर उत्तम भाष्य करणारा एक लेख....
Half a Century of India’s Maoist Insurgency

अनेक नवीन गोष्टी लेखातून कळल्या... उदारणार्थ
The first Communist Party of India (CPI) was formed in 1920 under the aegis of the Soviet regime at a meeting in Tashkent. Following India’s independence in 1947, when the Soviet apparatus supported the centrist Indian National Congress, the CPI followed suit. This led eventually to an acrimonious split, from which the Communist Party of India (Marxist) was formed 1964.

The CPI(M) – now the largest overground communist party in India that pursues a more or less social democratic agenda – split over Soviet hegemony, but declared its distance from the Chinese Communist Party (CPC) as well and followed what it called “Communism with Indian characteristics. But within three years of that split, the CPC managed to engineer another. Led by a man named Charu Majumdar, this new group rejected elections and opted for Mao Zedong’s “protracted people’s war” doctrine.

For example, in 2007, the Maoists played a key role in bringing down the 34-year run of the Communist Party of India (Marxist) as the ruling party of West Bengal. Involving themselves over a land acquisition dispute in Nandigram, Maoist guerrillas declared war on the Marxists and killed and drove members out of their homes in large numbers. This led to a landslide win for the opposition leader, Mamata Banerjee. The operation was led by famed guerrilla leader Mallojula Koteswara Rao a.k.a Kishenji.

तसेच लेखामध्ये माओइस्ट ने ग्रस्त भागाचा सध्य स्थितीचा नकाशा आणि गेल्या १० वर्षातील मनुष्यहानी हि दिलेली आहे. हळूहळू हिंसाचार कमी होत चालला आहे आणि माओवादी च्या अधिपत्याखालील भाग कमी होत आहे हि आनंदाची बाब आहे.

तुषार काळभोर's picture

23 Sep 2017 - 9:11 pm | तुषार काळभोर

तुम्ही टाकलेला परिच्छेद रोचक आहे, लेख वाचून पाहायला हवा.

बांवरे's picture

23 Sep 2017 - 10:59 pm | बांवरे

असेच म्हणतो.

मार्मिक गोडसे's picture

24 Sep 2017 - 12:09 pm | मार्मिक गोडसे

मागील सरकारने गेल्या ७० वर्षात काहीच कामं केली नाही, तर मग ह्या मॅडम कशाच्या जोरावर शेजारील देशाला आत्मपरीक्षण करायला सांगत आहेत?
http://m.economictimes.com/news/politics-and-nation/india-creating-it-ne...

प्रसाद_१९८२'s picture

24 Sep 2017 - 12:52 pm | प्रसाद_१९८२

बिनबुडाची टिका करण्याआधी, त्यांचे युएनच्या महासभेत केलेले संपूर्ण भाषण तरी एकदा ऐकुन घ्या.

मार्मिक गोडसे's picture

24 Sep 2017 - 1:38 pm | मार्मिक गोडसे

हे मी उगाच म्हणत नाही. हे देशाच्या पंतप्रधानांना समजत नाही, मग येतात असे घरचे आहेर. आता हा विडिओ पंतप्रधान, त्याचे अंधभक्त अणि त्यांच्या पक्षाच्या आयटी सेलवाल्यांना दाखवा. उच्छाद मांडलाय त्यांनी खोटेपणाचा.

गामा पैलवान's picture

24 Sep 2017 - 3:14 pm | गामा पैलवान

मा.गो.

गेले ७० वर्षं देशात काँग्रेसचं देशविरोधी शासन असूनही देशाने इतकी प्रगती केली. तरीही मनमोहनसिंग म्हणतात की देशाच्या संपत्तीवर मुसलमानांचा पहिला हक्क आहे. यापेक्षा खरेपणाचा उच्छाद परवडला.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

25 Sep 2017 - 12:40 pm | गामा पैलवान

श्रद्धांजली ! :-(
-गा.पै.

तुषार काळभोर's picture

26 Sep 2017 - 1:36 pm | तुषार काळभोर

With limited options to save bleeding economy, Modi is fighting a tough battle with his hands tied

अर्थशास्त्रातील आपल्याला काही कळत नाही, पण हे वाचून सद्य परिस्थिती व आगामी काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कठीण आहे.

श्री गॅरी ट्रुमन / श्री मिल्टन: तुमच्या insightsच्या प्रतीक्षेत.