बाप्टिस्ट आणि बुटलेगर : सरकारी नियमनाची एक थेअरी

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
27 Aug 2017 - 8:00 pm

बाप्टिस्ट म्हणजे पाद्री आणि बुटलेगर म्हणजे हातभट्टीवाले. ह्या थिअरीचे लेखन अमेरिकेत दारूबंदी होता तेंव्हा अभ्यासकांनी केले म्हणून हे नाव पण आपल्या देशांत किंवा कामाच्या ठिकाणी हा प्रकार आपणाला सर्रास दिसेल.

दारू शरीरास कशी अपायकारक आहे हे पाद्री आधी लोकांच्या मनावर बिंबवतो. वर्तमानपत्रातून लिहितो, राजकारणी मंडळींना सांगतो. जे लोक दारू पित नाहीत त्यांना तो जाहीर रित्या दारूबंदीचा पुरस्कार करायला सांगतो. जे लोक पितात ते सुद्धा जाहीर रित्या ह्याच्या विरोधांत बोलत नाहीत. राजकारणी मंडळी आपली पोळी भाजून घेण्यासाठी जनहितार्थ म्हणून दारूबंदी लावतात.

आता दारू पिणारे लोक हातभट्टीवाल्या कडे जातात. हातभट्टी वाले बेकायदेशीर असल्याने अव्वाच्या सव्वा दाम लावून दारू विकतात. त्यातून जो प्रचंड पैसा येतो त्यातील काही पैसे ते त्या पाद्रीला देणगी म्हणून देतात. अर्थांत पाद्री त्यांच्या कडून लाँच म्हणून हे पैसे स्वीकारतो असे नाही. पाद्रीला खरोखरच दारूचा तिटकारा जरी असला तरी त्या पाद्र्याच्या अस्तित्वामुळे हातभट्टीवाल्याला फायदा होतो म्हणून तो त्याच्या चर्च ची काळजी घेतो.

थोडक्यांत अनेक सरकारी नियमनानी काही लोकांचा प्रचंड फायदा होतो आणि हा फायदा करून देणारे लोक प्रत्यक्षांत त्या विषयावर टोकाची विरोधाची भूमिका घेणारे लोक असतात. एक माणूस (बहुतेकदा प्रामाणिकपणे काम करत) लोकांना मूर्ख बनवतो तर दुसरा चिक्कार पैसे करतो. थोडक्यांत ह्यांत सामान्य ग्राहकाचे नुकसान आणि हातभट्टी वाल्याचा फायदा होतो.

ह्याचीच एक विशेष केस आहे. हि तर सर्वांत त्रासदायक केस आहे. अश्या केस मध्ये बाप्टिस्ट आणि बुटलेगर दोघेही एकाच असतात आणि दुतोंडी सापाप्रमाणे दोन वेगळ्या भूमिकेत ते आपल्याला दिसतात.

उदाहरणे :

महाराष्ट्र सरकारचे दारूविषयक धोरण

एका बाजूने दारू वाईट आहे असे बोलून दाखवायचे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यावर प्रचंड कर लावून पैसा करायचा. राजकारणी मंडळी दारूचे स्मगलिंग करून चिक्कार पैसे करतात ते वेगळे. इथे बाप्टिस्ट आणि बुटलेगर दोघेही सरकार/राजकारणी आहेत.

केरळ मध्ये दारूबंदी साठी चर्च ने पुढाकार घेतला होता आणि त्याच वेळी दारू विकण्याचा परवाना फक्त चर्च ला असावा अशीही मागणी त्यांनी पूर्ण करून घेतली.

चर्च आणि RTE :

RTE आणि सध्याच्या सरकारची NEP ह्यांत चर्चचे योगदान फार मोठे आहे. एकूणच सरकारी शैक्षणिक धोरणात चर्च चा सहभाग मोठा असतो. पण त्याच वेळी हे कुठलेच कायदे आपल्या शाळांना लागू होणार नाहीत हे मात्र चर्च आवर्जून पहाते. त्या शिवाय RTE च्या कुठल्याही कायद्याचे उल्लंघन इतर शाळांनी केले कि ते सरकारच्या नजरेस आणून त्या शाळा बंद पाडण्याचे काम सुद्धा चर्च हिरीरीने करते.

टॅक्सी वाले :

ग्राहक (आणि पर्यावरण) संघटना इथे बाप्टिस्ट लोकांचे काम करतात तर टॅक्सी संघटना बुटलेगर लोकांचे. टॅक्सी संघटना ग्राहक संघटनांची मदत करून रस्त्यावर कमी टॅक्सी असाव्यात, उबर इत्यादींना परवानगी, खाजगी टॅक्सी चालकांना परवानगी देऊ नये असा प्रचार करवतात. दुसऱ्या बाजूने रस्त्यावर कमी गाड्या असल्या तर ह्या लोकांची मक्तेदार राहून ह्यांचा जास्त फायदा होतो. ह्यांत खऱ्या प्रवाश्याचे नुकसान होते.

कामगार संघटना :

कामगार संघटना अरेरावी करून कंपनीला लोकांना कामावरून काढायला देत नाही. म्हणजे एखादा नवीन कामगार घ्यायचा तर कंपनीला १०० वेळा विचार करावा लागतो. इथे सध्या कामाला असलेल्या कामगारांची नोकरी जरी शाश्वत वाटली तरी बेरोजगार लोकांचे प्रचंड नुकसान होते. कंपनी सुद्धा कामगार संघटनांचे निमित्त करून फक्त कंत्राटी पद्धतीवर लोकांना कामावर ठेवायला पहाते आणि पगार सुद्धा कमी देते. आपली नोकर शाश्वत असल्याने कामगार संघटनांना ह्या कंत्राटी लोकांना काढले तर फरक पद्धत नाही.

शेतजमीन विषयक कायदे :

शेतकरी नेहमी गरीब आणि मूर्ख असतो अश्या समजुतीने सरकार शेतजमीन घ्यायला किंवा विकायला निर्बंध घालते. शेत जमीन शेती सोडून इतर कारणासाठी वापरली जाऊ शकत नाही (पूर्वपरवानगी शिवाय), अ-शेतकरी माणूस शेतजमीन घेऊ शकत नाही इत्यादी. ह्यांत शेतकऱ्याचे रक्षण होत आहे असा आव आणला जातो. पण त्याच वेळी राजकारणी मंडळी शेतजमीन अत्यंत कमीदरावर विकत घेतात आणि आपले वजन वापरून त्याला बिगर शेतजमिनीत बदलून अव्वाच्या सव्वा भावांत विकतात.

इथे शेतकऱ्यांचे रक्षण करण्याचा आव आणणारे लोक प्रतिनिधी आणि मतदाते बाप्टिस्ट आहेत तर कामिनीवर फायदा करणारे राजकारणी बूटलेगर.

https://www.youtube.com/watch?v=msQ_khFmKtU

राजकारणविचार

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

28 Aug 2017 - 4:23 pm | चाणक्य

मस्त महिती मिळतीये तुमच्या या लेखांमधून.