सामूहिक अधः पात

sudhirvdeshmukh's picture
sudhirvdeshmukh in जनातलं, मनातलं
27 Aug 2017 - 7:22 pm

#सामुहीक_अध:पात
एक काळ होता साधेपणा, विरक्ती, सभ्य भाषा व उदात्त विचारसरनी ही संतांची लक्षणे समजल्या जायची. आता त्याची जागा भपकेबाजी, पैश्याचे कीळसवाने प्रदर्शन, उग्र भाषा याने घेतली आहे. असे का झाले ? साधी, सरळ राहणी जगणाऱ्या व्यक्तीला पूर्वी समाजात मान होता. आताच्या काळात आपल्या समाजाचे सामुहिक स्खलन झालेले आहे. कुठल्याही मार्गाने धनाढ्य झालेल्या ऐतखाहू माणसाला समाजात जो पर्यन्त डोक्यावर घेतल्या जाईल तोपर्यन्त फक्त 'पैसा' हाच या समाजाचा धर्म राहील. अश्या अध:पात झालेल्या समाजात आदर्श म्हणून स्वीकारावे अशी लोकं अपवादानाचेच निर्माण होतील. आपले आदर्श जर चुकीचे असतील तर ती चूक आपली आहे. आपण केलेल्या चुकीच्या मूल्यांची पेरणी आज आपणच भोगत आहोत. या सामुहीक अध:पतनास समाजातील एक घटक म्हणून आपण सर्वेच जबाबदार आहोत. ही जबाबदारी आपण स्वीकारलीच पाहिजे. येणाऱ्या काळात तर ही विषवल्ली आणखीनच फोपावत जाईल, या साठी कुठल्याही ज्योतिष्याची गरज नाही. चुकीच्या बेंचमार्किंग वर झालेला प्रवास हां चुकीच्याच दिशेने होणार आहे. निघालोय चोराच्या आळंदी आणि पोहचु देवाच्या आळंदीत ही अपेक्षाच चुकीची आहे. पार भुसभूशीत झालेल्या पायावर उभी केलेली इमारत वरुन कितीही देखणी असली तरी आतून मात्र पोकळ राहणारच. अश्या समाजात मग सकाळच्या दुधा पासून तर रात्रीच्या जेवनापर्यन्त सर्वच अशुद्ध मिळणार. आपले डॉक्टर गरज नसताना शस्त्रक्रिया करणार. शिक्षक शिकवनीसाठी हपापनार. पोलीस वेगळ्याच उद्देशाने रस्त्यावर उभे राहनार. शेतकरी भाजीपाल्यावर हार्मोंनची फवारणी करणार. व्यापारी बेलागम भावात माल विकणार, नाना मार्गाने कर बुडवनार्. जमिनेचे भाव कुत्रिम रीत्या वाढवले जाणार. शाळा मोठी फी आकरणार. अश्या काळात सर्वानी योग्य सेवा द्यावी ही अपेक्ष्याच् फोल आहे. आपला सामूहिक अध्:पात झालाय हे परत परत मान्यच करावे लागेल. आपले रेफरन्स पॉइंट (आदर्श) बदलल्या शिवाय काही अर्थ नाही.

सुधीर वि. देशमुख
रविवार
27/08/17
https://sudhirvdeshmukh27.blogspot.in/?m=1

समाजविचारलेखमत

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

27 Aug 2017 - 8:15 pm | अत्रुप्त आत्मा

असं झालं तर ते सगळं एकदंरीत!

साहना's picture

27 Aug 2017 - 10:18 pm | साहना

> एक काळ होता साधेपणा, विरक्ती, सभ्य भाषा व उदात्त विचारसरनी ही संतांची लक्षणे समजल्या जायची.

पूर्वीच्या काळी पुष्पक विमाने, संजीवनी बुटी वगैरे होत्या आज काळ बूटी शब्दाचा अर्थच बदलला आहे.

रानरेडा's picture

28 Aug 2017 - 12:29 am | रानरेडा

हा महा उतारा किंवा लघु लेख १८५७ पासून २१५७ पर्यानात चालेल ..

खाबुडकांदा's picture

28 Aug 2017 - 8:27 pm | खाबुडकांदा

ये सब भगवान की किरपा है
Enjoy yaar

सुबोध खरे's picture

28 Aug 2017 - 8:34 pm | सुबोध खरे

आजच्या पिढीला पैसे हेच सर्वस्व झालेले आहे. आईबापाची किंवा वयोवृद्ध माणसांची चाड राहिलेली नाही. नम्रपणा नावालाही शिल्लक नाही. तरुण मुले माजोरी आणि उद्धट झाली आहेत. येणार काळ अजूनच वाईट आहे कारण असेच चालत राहिलेतर समाज रसातळाला जायला फार वेळ लागणार नाही
.
.
.
.
.
.
. .
.
.
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
--

अशा अर्थाचा इ.स. १७५५ चा लेख फ्रांसमध्ये जुन्या वाचनालयातील नियतकालिकात( डिजिटायझेशन करताना) २०००च्या आसपास सापडला होताहे वाचल्याचे आठवते.
दुवा सापडला तर देईन.

खाबुडकांदा's picture

28 Aug 2017 - 8:57 pm | खाबुडकांदा

रसातळाला गेल्याचा फायदा पण लक्षात घ्या हो.
रसाच्या तळाशी फक्कड साखरपाक असतो तो पिउन झोपायचे झ्याक वाट्ते बघा

sudhirvdeshmukh's picture

28 Aug 2017 - 10:37 pm | sudhirvdeshmukh

मी वरील सर्व प्रतिक्रीयांशी सहमत आहे.
"मानसांशी मानसाची युद्ध झाली नाही
सांगा तो कुठला काळ होता "
असे मी सुद्धा वाचले होते. त्यामुळे हे चालतच राहनार असे वाटते, असो.

sudhirvdeshmukh's picture

28 Aug 2017 - 10:45 pm | sudhirvdeshmukh

मी वरील सर्व प्रतिक्रीयांशी सहमत आहे.
"मानसांशी मानसाची युद्ध झाली नाही
सांगा तो कुठला काळ होता "
असे मी सुद्धा वाचले होते. त्यामुळे हे चालतच राहनार असे वाटते, असो.